Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Restrictions in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    Restrictions in Chandrapur district : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 144 लागू

    Restrictions in Chandrapur district लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच तसेच आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) कलम 144 मधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत.

    वाचा – राजेश बेले यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश 

    त्यानुसार शासकीय कार्यालये / विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे / सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील. शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रपीकरण करण्यास निर्बंध करण्यात आले आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळी ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या / वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात व दालनात 5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, तसेच निश्चित केलेल्या कागदाच्या आकाराप्रमाणे नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध आहेत. Restrictions in Chandrapur district

     

    वाचा – ते नवजात शिशु कुणाचे?

    निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत व्यक्तिंची मते किंवा कृत्ये याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर तसेच सार्वजनिक रहदारी / वर्दळीच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध राहतील. धार्मिक स्थळे,  रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक वा भाषिक गटातील मतभेद अधिक तीव्र होतील किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्यास निर्बंध आहेत. Restrictions in Chandrapur district

     

    निवडणुकीच्या प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निर्बंध राहतील. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक जागेवर / खाजगी व्यक्तिच्या जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधित प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावण्यास निर्बंध आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार / रॅली / रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात सलग 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या / वाहने वापरण्यास निर्बंध राहतील.

    सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा यांच्या स्वाक्षरीने आणि कोर्टाच्या शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आले आहे.

  • Lok Sabha General Election Programme : कामात हलगर्जीपणा चालणार नाही – जिल्हाधिकारी गौडा

    Lok Sabha General Election Programme : कामात हलगर्जीपणा चालणार नाही – जिल्हाधिकारी गौडा

    Lok Sabha General Election Programme लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. या अनुषंगाने जिल्हास्तरीय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नोडल अधिका-यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.

     

    वाचा – एकाच दिवशी 151 मंदिरात आराधना, लोकसभा निवडणूक

    नियोजन भवन येथे बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, मनपा आयुक्त विपीन पालीवाल  यांच्यासह सहा. निवडणूक अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार व इतर विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. Lok Sabha General Election Programme

    वाचा – बधिरभक्तीचा कर्कश भोंगा

     

    यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात 17 विषयांसाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या सहकार्यासाठी इतरही अधिकारी नियुक्त करण्यात आले असून प्रत्येकाने आपापली जबाबदारी गांभियाने पार पाडावी. निवडणूक हा कालबध्द कार्यक्रम असून चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे वाचन करणे आवश्यक आहे. त्यानुसारच काम करणे अपेक्षित आहे. यात वेळी कोणताही हलगर्जीपणा चालणार नाही. काही शंका असल्यास त्या विचारून घ्याव्यात. Lok Sabha General Election Programme

    पुढे जिल्हाधिकारी म्हणाले, सर्व सहायक निवडणूक अधिका-यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रातील स्ट्राँग रुमची पाहणी करावी. तेथील बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, स्ट्राँगरुमची सुरक्षितता आदी बाबी तपासून घ्याव्यात. तसेच आपापल्या क्षेत्रातील फिरते निगराणी पथक (एफ.एस.टी.), स्थायी निगराणी पथक (एस.एस.टी.), व्हीडीओ निगराणी पथक (व्ही.व्ही.टी.), व्हिडीओ पाहणी पथक (व्ही.एस.टी.) त्वरीत कार्यान्वित करून पथकांच्या पॉईंटवर भेट द्यावी. सोबतच आपल्या कार्यक्षेत्रात विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना आणि नियंत्रण कक्ष स्थापन करावा. पोलिंग पार्टीचे प्रशिक्षण अतिशय गांभिर्याने घ्यावे, जेणकरून मतदानाच्यावेळी कोणत्याही चुका होऊ नये. मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा जसे, पिण्याचे पाणी, शौचालय, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची आणि व्हीलचेअरची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Lok Sabha General Election Programme

    यावेळी प्रत्येक नोडल अधिका-यांनी आपापल्या कामकाजाचे सादरीकरण केले.

  • Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरात तेली समाजातर्फे विनायक बांगडे यांची लोकसभेसाठी तयारी पण?

    Chandrapur Lok Sabha Constituency : चंद्रपुरात तेली समाजातर्फे विनायक बांगडे यांची लोकसभेसाठी तयारी पण?

    Chandrapur Lok Sabha Constituency चंद्रपूर – पूर्व विदर्भात तेली समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर लोकसभेची जागा तेली समाजाच्या व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी आज 17 मार्च ला तेली समाजाने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे.

     

    17 मार्च ला आयोजित पत्रकार परिषदेत तेली समाजाचे पदाधिकारी प्रकाश देवतळे यांनी भाजप पक्षाचे आभार मानले, कारण वर्धा लोकसभा क्षेत्रात तेली समाजाचे रामदास तडस यांना उमेदवारी घोषित करण्यात आली, पूर्व विदर्भात काही ठिकाणी विविध निवडणुकीत राष्ट्रीय पक्षाने तेली समाजाला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. Chandrapur Lok Sabha Constituency

    वाचा – चंद्रपुरात निवडणुकीची मतमोजणी कुठे होणार?

    मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष कांग्रेसने तेली समाजाची दखल घेत चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे.

     

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत तेली समाजाचे विनायक बांगडे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र वेळेवर त्यांना तिकीट नाकारत उमेदवारी धानोरकर यांना देण्यात आली होती, तो राग आमच्या मनात आहे, त्याकरिता यंदा 2024 मध्ये तेली समाजाची दखल घेत कांग्रेसने तेली समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
    जर कांग्रेस पक्षाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही वेळेवर वेगळी भूमिका घेऊ असा इशारा सुद्धा यावेळी तेली समाजाच्या जेष्ठ सदस्यांनी दिला आहे. Chandrapur Lok Sabha Constituency

     

    ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेली समाजाने केलेली मागणी राष्ट्रीय पक्षांना अडचणीत आणणारी आहे, याबाबत तेली समाजाने कांग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणारे पत्र लिहले आहे. तेली समाजातर्फे विनायक बांगडे यांना उमेदवारी द्यावी आम्ही त्यांना निवडणुकीत जिंकून दाखवू असा सूर पत्रकार परिषदेत लगावण्यात आला. जिल्ह्यात तेली समाजाची संख्या लाखोंच्या वर आहे, आता कांग्रेस पक्ष तेली समाजाच्या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    विशेष म्हणजे शांताराम पोटदुखे यांच्यानंतर एकही खासदार तेली समाजातून प्रतिनिधित्व करायला आलेला नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तेली समाजाची ही मागणी आश्चर्यकारक आहे, कारण मागच्या निवडणुकीत तेली समाजाचे राजेंद्र हजारे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना समाजाने जाहीर पाठिंबा दिला नव्हता, मात्र आजच्या स्थितीत तेली समाजाचे राजेश बेले हे लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे, मात्र त्यांच्या नावावर अप्रत्यक्षपणे समाजाने “ना” असे म्हटले आहे.

    बेले यांनी आधी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीचा अर्ज भरावा तेव्हा विचार करू असे म्हणत पत्रकारांच्या प्रश्नाला देवतळे यांनी टाळले.

     

  • First phase of Lok Sabha elections : चंद्रपुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कुठे?

    First phase of Lok Sabha elections : चंद्रपुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कुठे?

    First phase of Lok Sabha elections निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा केली, 7 टप्प्यात होणारी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यात निवडणूक पार पडणार आहे, यामध्ये चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे.

     

    जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी निवडणूक नियोजनाबाबत 17 मार्च ला दुपारी 1 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. First phase of Lok Sabha elections

     

    वाचा – चंद्रपुरातील खुशबू ने पटकाविला सौंदर्य स्पर्धेचा मुकुट

    लोकसभा क्षेत्रातील चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, वरोरा, वणी व आर्णी क्षेत्रात एकूण 18 लाख 36 हजार 314 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे, ज्यामध्ये 9 लाख 45 हजार 26 पुरुष मतदार तर 8 लाख 91 हजार 240 स्त्री मतदारांची संख्या व इतर 48, सेवा मतदार 1 हजार 859, मतदान क्षेत्र 205, क्षेत्रीय अधिकारी 235 यांचा समावेश आहे. First phase of Lok Sabha elections

     

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार क्षेत्रात 24 हजार 120 नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहे.
    परदेशातील एकूण मतदार लोकसभा क्षेत्रात 8 असून 85 वर्षे व त्यापेक्षा वयाने अधिक असलेले मतदार 16 हजार 621 आहे. First phase of Lok Sabha elections

     

    दिव्यांग मतदारांची एकूण संख्या 9 हजार 679 असून लोकसभा क्षेत्रात विशेष मतदान केंद्राची संख्या 2 हजार 118 आहे, ज्यामध्ये पडदानशीन 196, दिव्यांग व्यवस्थापित मतदान केंद्र 6, महिला व्यवस्थापित मतदान केंद्र 6, युवा मतदान केंद्र 2, आदर्श मतदान केंद्राची संख्या 10 असणार आहे. First phase of Lok Sabha elections

     

    आदर्श आचार संहिता व निवडणूक खर्च पथकांची संख्या ज्यामध्ये फिरते निगराणी पथकांची एकूण संख्या 42, स्थायी निगराणी पथक 62, व्हिडीओ निगराणी पथक 29, व्हिडीओ पाहणी पथक 9, खर्च पथक 6 व खर्च सनियंत्रक पथकांची संख्या 6 आहे.
    Evm-Vvpat चा संख्यात्मक तपशीलात BU-5289, CU – 3064 व VVPAT-3289 अशी आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात एकूण मतदान केंद्राची संख्या 2 हजार 44 आहे, 6 विधानसभेतील मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून 2 हजार 453, प्रथम मतदान केंद्र अधिकारी 2 हजार 453, इतर मतदान केंद्र अधिकारी 4 हजार 905 काम करणार आहे, प्रशासनाकडे उपलब्ध असलेले एकूण मनुष्यबळाची संख्या ही 12 हजार 403 आहे. लोकसभा क्षेत्रात एकूण 18 मतदान केंद्र संवेदनशील आहे. First phase of Lok Sabha elections

     

    सध्या पोलीस प्रशासनाकडे 154 पोलीस अधिकारी, 2 हजार 726 पोलीस कर्मचारी उपलब्ध असून पोलीस प्रशासनाने 81 पोलीस अधिकारी, 1150 पोलीस कर्मचारी व 2 हजार होमगार्ड ची मागणी केली आहे.

     

    नागरिकांना निवडणूक काळात तक्रार असल्यास त्यांनी तक्रार निवारण क्रमांक 1950, आदर्श आचार संहिता कक्ष – 8788510061, C-Vigil अँप वापरावे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष साठी 07172-271617 क्रमांकावर सम्पर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

     

    4 जूनला शहरातील वखार महामंडळ MIDC या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
    मतमोजणी ठिकाणी 1 CRPF कंपनी, SRPF व स्थानिक पोलीस अशी 3 सर्कल मध्ये सुरक्षा असणार आहे.

     

    चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदान प्रक्रिया शांततेत पार पडणार याची आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिली.

  • Goa Fashion Week : चंद्रपूरच्या खुशबू नळे ने पटकाविला प्रथम रनर अप चा मुकुट

    Goa Fashion Week : चंद्रपूरच्या खुशबू नळे ने पटकाविला प्रथम रनर अप चा मुकुट

    Goa Fashion Week चंद्रपूर : अलीकडेच गोवा येथील सनसिटी रिसॉर्ट येथे मिस फेस ऑफ नेशन गोवा फॅशन विक ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चंद्रपूर येथील खुशबू नळे हिने प्रथम रनर अपचा मुकुट पटकावला आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. तिने सर्वांना मागे टाकत रनर अपचा मुकुट पटकावत राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्यस्पर्धेत चंद्रपूरचे नावलौकीक केले आहे.

     

    खुशबू नळे ही सध्या गोंदिया येथे होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असताना फॅशनचीही आवड तिला बालपणापासून होती. त्यामुळे तिने नागपूर येथे वन डायरेक्शन मॉडेलिंग अकादमीमध्ये फॅशन कोरिओग्राफर इमरान शेख पेजंट कोच पायल शाहू यांच्या मार्गदर्शनात फॅशनचे धडे घेतल्याचे तिने चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. Goa Fashion Week

     

    विशेष म्हणजे डॉक्टरकीचे शिक्षण घेत असताना दर रविवारी गोंदियाहून नागपूर येथे प्रशिक्षणासाठी जात असल्याचे तिने सांगितले. वडील बंडू नळे, आई वेणू नळे यांनीही या स्पर्धेसाठी नेहमी प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले. Goa Fashion Week

     

    पुढे आणखी मोठ्या फॅशन स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी तिच्यासोबत तिची आई वेणू नळे यांचीी उपस्थित होती

  • Dhariwal infrastructure chandrapur : सुर्या अडबाले यांचे आंदोलनात्मक आव्हान

    Dhariwal infrastructure chandrapur : सुर्या अडबाले यांचे आंदोलनात्मक आव्हान

    Dhariwal infrastructure chandrapur चंद्रपूर तालुक्यातील सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या अत्यंत उपयुक्त असलेल्या रस्ता हा धारीवाल कंपनीच्या पाणी व ऐश टॅंक मुळे बंद करण्यात आला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे उपयुक्त साधन सामुग्री नेण्याकरिता शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे.

     

     

    या समस्येचा मागील 10 वर्षापासून शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असून ऐश टॅंक जागोजागी लिक असल्यामुळे छोटे छोटे गड्डे तयार झाले असून त्या दूषित पाण्यामुळे गुरेढोर बिमार होऊन मरण पावत आहेत तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांचा अत्यंत उपयुक्त असलेला रस्ता व छोटा पुल सुद्धा तयार करून द्यावे अशी सोनेगावातील शेतकऱ्यांची मागणी आहे. Dhariwal infrastructure chandrapur

     

    गावातील असलेला नाला हा ऐशच्या गळतीमुळे बुजल्या गेला असून नाल्याचे खोलीकरण सुद्धा करून द्यावे व गावातील युवकांना कंपनीने रोजगार कोणालाही दिला नसून लवकरात लवकर स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटणेच्या वतीने 16 मार्च ला दुपारी करण्यात आली. Dhariwal infrastructure chandrapur

     

    मागणी पूर्ण न झाल्यास गावातील शेतकऱ्यांचा व बेरोजगार युवकांचा जन आक्रोश मोर्चा घेऊन धारिवाल कंपनी वर नेत त्यांना याबाबत जाब विचारण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुर्या अडबाले व डॉ. स्वप्नील बांदूरकर यांनी दिला आहे.

  • Announcement of Lok Sabha Elections : 7 टप्प्यात होणार मतदान, चंद्रपूर लोकसभेचे मतदान 19 एप्रिल रोजी

    Announcement of Lok Sabha Elections : 7 टप्प्यात होणार मतदान, चंद्रपूर लोकसभेचे मतदान 19 एप्रिल रोजी

    Announcement of Lok Sabha Elections देशात 16 मार्च ला निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे.

    वाचा – नागरिकांना मिळणार 300 युनिट वीज मोफत

    देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान होणार आहे, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. Announcement of Lok Sabha Elections

     

    असे आहे निवडणुकीचे वेळापत्रक

    १८ व्या लोकसभेसाठी मतदान सात टप्यात होणार

    टप्पा १:- १९ एप्रिल २०२४
    टप्पा २:- २६ एप्रिल २०२४
    टप्पा ३:- ०७ मे २०२४
    टप्पा ४:- १३ मे २०२४
    टप्पा ५:- २० मे २०२४
    टप्पा ६:- २५ मे २०२४
    टप्पा ७:- १ जून २०२४
    मतमोजणी :- ४ जून २०२४

    देशात एकूण ९७ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत..१ कोटी ८२ लाख नवमतदार

    मतदान केंद्र शोधणे सोपे होणार, मतदारांच्या मदतीसाठी तंत्रज्ञान वापर केला जाईल

    ८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल

    ५५ लाख एव्हीएम मशीन असणार आहेत आणि १ कोटी ५ लाख निवडणूक अधिकाऱ्यांसह सुरक्षा रक्षक असणार आहेत. Announcement of Lok Sabha Elections

     

    निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती माहिती पुरवण्यात आली आहे. त्यामुळे आता मतदान केंद्र शोधणं देखील सोपं होणार आहे.

    नो युवर कँडीडेट या अॅपवरुन तुमच्या भागातील उमेदवाराची सगळी माहिती मिळणार आहे.

     

    हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावलं उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये यासाठी आम्ही सज्ज आहोत. असे प्रशासनाने कळविले आहे.

  • Criticism of Congress MLA : आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने

    Criticism of Congress MLA : आमदार सुभाष धोटेंचे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने

    Criticism of Congress MLA चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    वाचा – लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांचे डिपॉझिट जप्त होणार

    विकासकामांचा झंझावात आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण, रोखठोक भुमिकेमुळे महाराष्ट्रभर त्यांना मानणारा वर्ग आहे. अशा लोकनेत्याला चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने भाजपचा विजय सोपा झाला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या उदासीनतेतून जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे उलटसुलट वक्तव्य करीत ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहात आहेत, असा पलटवार राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला. भोंगळे यांनी आमदार सुभाष धोटेंना यातून प्रत्युत्तर दिले आहे. Criticism of Congress MLA

     

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी धोक्याची घंटा

    आमदार धोटेंनी चंद्रपुरातील महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना या लोकसभा निवडणुकीत ना. सुधीर मुनगंटीवार यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे वक्तव्य केले. त्यावर देवराव भोंगळेंनी धोटेंचा खरपूस समाचार घेतला. २०१४ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याला मागास जिल्हा म्हणून ओळख होती. परंतु राजकारणाला समाजकारणाचा राजमार्ग मानणाऱ्या ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी अर्थ व वनमंत्री पदाची सुत्रे हातात घेतली आणि जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी चंग बांधला. आता चंद्रपूर जिल्ह्याचा चौफेर विकास झाला आहे. जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी गेल्या दहा वर्षात “न भुतो न भविष्यती” असा विकासनिधी खेचून आणला. Criticism of Congress MLA

    वाचा – चंद्रपुरातील सावकार झाले बेजार, परवाने रद्द

    सुधीरभाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, सैनिकी शाळा, बांबू संशोधन केंद्र, वन अकादमी, वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, गावोगावी डिजिटल अंगणवाडी शाळा, सुसज्ज वाचनालये, महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी अगरबत्ती केंद्रे, युवकांसाठी रोजगार मेळावे, अद्ययावत क्रीडा संकुल, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने यशस्वी पाठपुरावा करण्याचे काम ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले आहे. “सत्ता असो अथवा नसो” सुधीरभाऊ मुनगंटीवार विकासासाठी मागे हटत नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही त्यांनी कोरोना सारख्या महासाथीत जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासह गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी पुढाकार घेतला, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे, असे भोंगळे म्हणाले. Criticism of Congress MLA

     

    शिंदे सरकारच्या काळात सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्यभिषेकाचे वर्ष जगभर साजरे व्हावे या उदात्त हेतूने छत्रपतींच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणारी वाघनखं त्यांनी लंडनहून परत आणण्यासाठी यशस्वी करार केला. जिल्ह्याचे वैभव असणारे काष्ठ अयोध्येतील प्रभू श्रीरामलल्लांच्या मंदिराकरीता तसेच नव्या संसद भवनाकरीता पाठविले, ते सुधीरभाऊंनीच. चंद्रपूरची ओळख असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे वैभव जगाला माहित व्हावे या उद्देशाने अलीकडेच ताडोबा महोत्सवाचे यशस्वी आयोजन ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केले, असे भोंगळे यांनी नमूद केले.

     

    पिढ्यानपिढ्या घरात आमदारकी असुनही आपल्या राजुरा विधानसभा क्षेत्रात विकासाचे दिवे लाऊ न शकणाऱ्या सुभाष धोटेंना हे सर्व दिसेनासे झाले आहे, याचे नवल वाटते. त्यामुळे त्यांनी नुसतेच ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहाणे बंद करावे. खरंतर त्यांच्या कॉंग्रेसची देशात झालेली अवस्था बघून ते स्वतःच वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातूनच ते असे वक्तव्य करीत आहेत, असा सणसणीत टोला देवराव भोंगळे यांनी लगावला आहे.

  • National Health System Contract Workers :  आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

    National Health System Contract Workers : आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संघर्षाला यश

    National Health System Contract Workers
    राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेच्या कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अनेक दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे.

    वाचा – सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी निर्भय बनो सभा रेड सिग्नल

    राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कामगार गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पदावर कार्यरत होते. त्यांनी शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने केली. यासंदर्भात त्यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांना शासन दरबारी ठेवण्याची विनंती केली. National Health System Contract Workers

    वाचा – जिल्ह्यातील या सावकारांचे परवाने रद्द

    या संदर्भात आमदार धानोरकर यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावावा या संदर्भात विनंती केली. विधानसभेत लक्षवेधी लावून सभागृहाचे लक्ष वेधले व या आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात शासनाला व नागरिकांना केलेल्या मदतीची माहिती करून दिली. National Health System Contract Workers

     

    शासनाने आमदार धानोरकर यांना शब्द दिला होता व लवकरच यावर निर्णय घेऊ असे सांगितले होते. वारंवार या विषयाचा पाठपुरावा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केल्याने त्याची फलश्रुती प्राप्त झाली असून बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात लवकरच शासन निर्णय निघणार असून हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. National Health System Contract Workers

     

    याबाबत राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आमदार धानोरकर यांचे आभार मानले असून आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू असे मत व्यक्त केले आहे.

  • Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech : निर्भय बनो सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल – असीम सरोदे

    Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech : निर्भय बनो सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल – असीम सरोदे

    Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech 14 मार्चला चंद्रपुरातील न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात निर्भय बनो सभेला हजारो नागरिकांनी प्रतिसाद देत आपली उपस्थिती दर्शविली, नरेंद्र मोदी, अमित शाह कसे देशातील नागरिकांना मूर्खात काढत आहे याबाबत उपस्थित वक्त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

     

     

    निर्भय बनो सभा सायंकाळी 5 वाजतापासून सभास्थळी गर्दी जमायला लागली, लहानापासून ते वृद्धापर्यंत नागरिक सभेच्या दिशेने येऊ लागले, भावी पिढीच्या भविष्यासाठी आपल्याला काय करायला हवं यासाठी हजारो नागरिक सभास्थळी जमा झाले. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

    वाचा – A to Z बाजाराला भीषण आग

    ऍड असीम सरोदे व विश्वंभर चौधरी या दोन वक्त्यांनी सभास्थळ गाजवून दिले, केंद्र सरकारच्या योजनांची पोलखोल या सभेच्या माध्यमातून करण्यात आली, नुकताच संपन्न झालेला ताडोबा महोत्सव कुणासाठी होता? तो कोट्यवधी रुपयांची उधळण ही सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी होती, असे वक्तव्य सरोदे यांनी यावेळी केले. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

     

    वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील 23 सावकारांचे परवाने रद्द

    लंडन मधून येणारे वाघनखे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करीत राजकारण करण्याचा डाव सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार करीत असल्याची माहिती या सभेच्या माध्यमातून देण्यात आली. आजची ही सभा सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी रेड सिग्नल आहे. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

     

    सरकार अनेक नव्या योजना आणतात, मात्र त्या योजनांचे पुढे काय होते, हे कुणालाच कळत नाही, त्या योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च होतात ते फक्त जाहिरात बाजीवर, आज चंद्रपूर शहर हे पूर्णतः प्रदूषित झाले आहे, आपल्या जनप्रतिनिधी यांना निर्भयपणे विचारा चंद्रपुरातील प्रदूषित वातावरण कमी करण्यासाठी आपण काय उपाययोजना करीत आहे?

     

    वाचा – सुरू झाली चंद्रपूर ते मुंबई रेल्वेसेवा

    विश्वंभर चौधरी यांनी या सभेचा उद्देश काय? याबाबत सांगत आपण आपल्या भावी पिढीचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, याबाबत आम्ही जनजागृती करण्यासाठी आलो आहे असे सांगितले, चंद्रपुरात अनेक समस्या आहे, मानवनिर्मित पूर, प्रदूषण मात्र यावर उपाययोजना काहीच नाही.

     

    वर्ष 2024 मध्ये मतदान करताना फक्त इतकं लक्षात ठेवा, संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे, मतदानाच्या माध्यमातून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. Nirbhay Bano Sabha Chandrapur, uncut speech

     

    चंद्रपुरातील निर्भय बनो सभेला हजारो नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.