Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train : पिटलाइन सुविधेमुळे बल्लारशाहचे महत्व वाढले – हंसराज अहीर

    Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train : पिटलाइन सुविधेमुळे बल्लारशाहचे महत्व वाढले – हंसराज अहीर

    Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train चंद्रपूर: बल्लारपूर येथे बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेन (क्रमांक २२१०९/२२११०) ला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हिरवी झेंडी दाखवली.
    दि. १३ मार्च रोजी या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की बल्लारशाहमध्ये ११ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या पिटलाइनच्या सुविधेमुळे आता रेल्वे प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांची सुविधा मिळणार असल्याचे सांगितले.

     

    यासंदर्भात बल्लारशाह-लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट ट्रेन आज सुरु करण्यात आली आहे. बल्लाशाह रेल्वे स्थानकाचे महत्व पिटलाईनमुळे वाढले आहे. अहीर पुढे म्हणाले की, पूर्वी सहा डब्यांची आरक्षण असलेली सेवाग्राम लिंक एक्सप्रेस येथे धावत असे. लिंक एक्सप्रेस गाड्या आता संपुर्ण भारतात बंद करण्यात आल्या आहेत म्हणुन ही गाडी सुरू करण्यात आली आहे. लवकरच नंदीग्राम ही ट्रेन दररोज धावणार आहे. तसेच आता पुण्यासाठीची ट्रेन आठवड्यातुन तीन दिवस धावणार असून, ती येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होईल. Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train

     

    वाचा – निधी अभावी काम रखडले, आणि झाला जीवघेणा हल्ला

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चंद्रपूर आणि बल्लारशाहसाठी रेल्वेच्या अनेक सुविधा दिल्या आहेत, असेही अहीर म्हणाले.
    उल्लेखनीय बाब अशी की, एलटीटी-बल्लारशाह सुपरफास्ट एक्सप्रेस (क्रमांक ०११२७/०११२८) या गाडीला पूर्वी विशेष दर्जा होता, या ट्रेनचे भाडे प्रवाशांना परवडणारे नव्हते. विशेष दर्जा असल्याने ही ट्रेन नेहमीच उशिराने धावत असे. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन हंसराज अहीर यांनी या ट्रेनचा विशेष दर्जा काढून घेतला आहे. आता ही ट्रेन नव्या क्रमांकाने धावत असून, आता या ट्रेनच्या भाड्यातही ३० टक्के कपात करण्यात आली आहे, त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सदर ट्रेन चंद्रपूर रेल्वेस्थानकावर पोहचताच भाजप कार्यकर्त्यांनी या ट्रेनचे जल्लोषात स्वागत केले. Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train

     

    यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिलाध्यक्ष हरीश शर्मा, विजय राऊत, खुशाल बोंडे, रेल आधिकारी, एडीआरएम पी एस खेरकर, एसीएम एच के बेहरा, दामोदर मंत्री, लखन सिंह चंदेल, अनिल फुलझले, चंद्रपुर जिल्हा रेलवे यात्री एसोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास सूंचूवार, रघुवीर अहीर, अरुण मस्की, राजु घरोटे, विनोद शेरकी, रेणुका दूधे, वैशाली जोशी, जयश्री मोहुर्ले, स्वामी रायबरम, देवेंद्र वाटकर, कांता ढोके, किशोर मोहुर्ले, आरती आक्केवार, हनुमानसिंह खेंगर, रामेश्वर पासवान, जुम्मन शेख, ममता बोज्जा, गुलशन खान, गुलशन शर्मा, विकास राजुरकर, ज्ञानेंद्र आर्य, गणेश सैदाने व रेलवे कर्मचारी कृष्णकुमार सेन, एम वेंकटेश्वरलू, जी राजूरकर, रविंद्र नंदनवार, रवी मिश्रा, योगेश बविस्कर, आरपीएफ चे निरीक्षक श्री पाठक आदी उपस्थित होते. Lokmanya Tilak Terminus Mumbai Superfast Train

     

    चंद्रपूर स्थानकावर या ट्रेनचे स्वागत रेल्वे संघर्ष समितीचे रमणिकभाई चव्हाण, विनोद बजाज, नरेंद्र सोनी, प्रदीप माहेश्वरी, डॉ. भुपेश भलमे, डॉ. अशोक रोहरा, मिलींद दाभेरे, संजय मंथाने, अशोक बोथरा, नरेश लेकवानी, भाजपचे विठ्ठल डुकरे, मायाताई उईके, वंदना संतोषवार, प्रदीप किरमे, राजेंद्र तिवारी, अविनाश राखुंडे, प्रमोद शास्त्रकार, बि.बि. सिंह, शालु कन्नोजवार, राजेंद्र कागदेलवार, संजय खनके, मधुकर राउत, सुरेश यादव, मयुर भोकरे, प्रणय डंभारे, बाळा चंदनखेडे, चेतन शर्मा, पराग मलोडे, रेणुकाताई घोडेस्वार, किशोर बंडावार, नरेंद्र गुजराथी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

  • Cultural Festival on International Women’s Day : बाबूपेठ येथे भव्य कार्यक्रम

    Cultural Festival on International Women’s Day : बाबूपेठ येथे भव्य कार्यक्रम

    Cultural Festival on International Women’s Day जागतिक महिला दिनाचे औचित्याने राजराजेश्वरी, गायत्री,सखी, रणरागिणी,श्री संताजी, परिवार, जिजाऊ,माऊली,सावित्रीबाई फुले,सहेली महिला बचत गट बाबुपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक बजरंग क्रीडा संकुल बाबूपेठ येथे महिलांचा सांस्कृतिक महोत्सव आणि आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

     

    कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रपूर चे प्रसिद्ध उद्योगपती चंद्रकांतजी वासाडे यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ,चंद्रपूर च्या प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ इंदूताई अग्रवाल मॅडम तर प्रमुख अतिथी प्रसिद्ध कलावंत अनिरुद्ध वनकर,इन्स्पियर चे संचालक प्रा,विजय बदखल,संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष दिलीप चौधरी,राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संतोष कुचनकर,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनिता बोबडे,जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष अर्चना चौधरी,जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष सारिका कुचनकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश वैरागडे, कार्यक्रमाच्या संयोजक तथा महिला बचत गट संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे उपस्थितीत घेण्यात आला. Cultural Festival on International Women’s Day

     

    कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ ,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तथा द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली,सर्व मान्यवरांचे बचतगटा तर्फे शाल पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

     

    प्रस्ताविकेतून चंदाताई वैरागडे यांनी 10 महिलापासून सुरू केलेला एक बचत गट अनेक झाले आणि 500 च्या वर महिला जुळ्ल्या आहेत हे केवळ महिलांनि दाखविलेला विश्वास आणि केलेल्या प्रामाणिक कार्याची पावती आहेत,महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा,रक्तदान शिबिर ,आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, हळदीकुंकू इत्यादी कार्यक्रम घेण्यात येतात आणि प्रत्येक कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. Cultural Festival on International Women’s Day

     

    आज सुद्धा आनंद मेळाव्यात इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल आणि सांस्कृतिक कार्यक्रमात एका पेक्षा एक सरस असे सामूहिक व एकल नृत्य स्पर्धेत बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला आहे,असेच सहकार्य सदैव द्याल असे प्रस्ताविकेतून सांगितले.

     

    उदघाटक चंद्रकांतजी वासाडे यांनी चंदाताईनी बचत गटाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचं संघटन करून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाल्याचे आजच्या उपस्थितीवरून आणि नियोजनबद्ध कार्यक्रमावरून दिसून येत आहे हीच चंदाताई च्या कार्याची पावती आहे, याप्रसंगी प्रसिद्ध कलावंत अनिरुद्धजी वनकर यांनी प्रोत्साहन गीत म्हटले.

     

    प्रा विजय बदखल,प्राचार्य नरेंद्र बोबडे,संतोष कुचनकर यांनीही मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे अध्यक्षा डाँ इंदूताई अग्रवाल यांनी महिलांनी कुठल्याही कठीन प्रसंगाला घाबरून न जाता संयमाने सामना केला पाहिजे आणि आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक भांड्यात कुठलेही खाण्याच्या वस्तू ठेऊ नये हे सांगितले. आणि महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.

     

    यानंतर सुरू झालेल्या नृत्य स्पर्धेत महिलांनी एकापेक्षा सरस असे नृत्य सादर करून उपस्थितांचे मने जिंकली, यामध्ये प्रथम क्रमांक रणरागिणी ग्रुप पटकाविला, विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

     

    या डान्स चे पर्यवेक्षक रिंकू देठे यांनी केले. आनंद मेळाव्यात स्वादिष्ट वस्तूचे बहुसंख्य स्टॉल लावले होते, त्याचा आस्वाद हजारो च्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी घेतला,कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थित होती, कार्यक्रमाचे संचालन प्रियंका खनके, सरोज चांदेकर यांनी आभार सुरज बिट्टे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बचत गटातील सर्व महिलांनी मोलाचे सहकार्य केले.

  • Marathi Patrakar Sangh Chandrapur : मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बंडू लडके यांची फेरनिवड

    Marathi Patrakar Sangh Chandrapur : मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी बंडू लडके यांची फेरनिवड

    Marathi Patrakar Sangh Chandrapur चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची आम सभा जिल्हा मराठी पत्रकार संघ भवन, चंद्रपूर येथे मंगळवार दि.12 मार्च 2024 रोजी अध्यक्ष बंडूभाऊ लडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभे मध्ये वर्ष 2024 ते 2027 पर्यंतची नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्ष पदी बंडूभाऊ लडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बबनराव बांगडे यांनी कार्य केले.

     

    मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम यांनी अध्यक्ष पदासाठी बंडू लडके यांचे नाव सूचित केले. यावर सर्वांनी एकमताने सम्मती दिली. एक आठवड्यात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल असे नवनिर्वाचित अध्यक्षांनी यावेळी जाहिर केले. Marathi Patrakar Sangh Chandrapur

     

    वाचा – कोट्यवधीचे उत्सव, पण हे काम निधी अभावी रखडले, चंद्रपुरात धक्कादायक प्रकार

    याप्रसंगी परिषद प्रतिनिधि मुरलीमनोहर व्यास, सरचिटणीस सुनील तिवारी, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत धोटे, वैभव पलिकुंडवार, कोषाध्यक्ष मोरश्वर राखूंडे, दीपक देशपांडे,रवी नागपुरे, अनिल बाळसराफ, नामदेव वासेकर,षडाकांत कवठे,राजेश बारसागडे, सुरेश डांगे,अंबिकाप्रसाद दवे,मंगल जीवने,सूरज बोम्मावार, उदय गडकरी यासह मूल, सावली, राजूरा, बल्लारपूर, पोंभुर्णा,चिमूर, नागभीड आदि विविध तालुका पत्रकार संघाचे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

  • Leopard attack on 7-year-old girl : चंद्रपुरात 7 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

    Leopard attack on 7-year-old girl : चंद्रपुरात 7 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

    Leopard attack on 7-year-old girl चंद्रपूर/बल्लारपूर – 13 मार्च ला सकाळी 7 वर्षीय मुलगी घरासमोर खेळत असताना तिच्यावर बिबट्याने झडप घातली, मुलीचा रडण्याचा आवाज ऐकताच काकाने त्या दिशेने धाव घेतली असता बिबट 7 वर्षीय मुलीला पकडून होता, अखेर काकाने पुतनीला वाचवीत तिला रुग्णालयात नेले, मात्र त्या मुलीच्या डोक्यावर गंभीर इजा झाली.

     

    बल्लारपूर शहरातील पंडित दीनदयाळ वार्डातील बांबू डेपो परिसरात ही घटना 13 मार्च ला सकाळी 8 वाजता घडली.

     

    वाचा – चंद्रपुरात 500 खोके एकदम ओके चे नारे

    7 वर्षीय मुलगी आफ्रिना इकबाल शेख ही घरापुढे खेळत होती, अचानक त्याठिकाणी बिबट्याने आफ्रिना वर हल्ला केला, आफ्रिना च्या रडण्याचा आवाज ऐकून काकाने बिबट्या पुढे उडी घेतली, त्या आवाजाने बिबट पळून गेला. Leopard attack on 7-year-old girl

     

    जखमी अवस्थेत असलेल्या आफ्रिना ला काकाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, आफ्रिना च्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.

     

    याबाबत नागरिकांनी सांगितले की आम्ही बऱ्याचं वर्षांपासून परिसरात फेंसिंग लावण्याची मागणी वनविभागाकडे करीत आहो मात्र आमच्या मागणीवर दुर्लक्ष होत आहे, आतापर्यंत या परिसरात अश्या 3 घटना घडल्या असून यामध्ये एकाने आपला जीव गमावला, मात्र त्यानंतर सुद्धा वनविभाग आमच्या मागणीवर दुर्लक्ष करीत आहे. Leopard attack on 7-year-old girl

     

    बल्लारपूर वनपरिक्षेत्र चे वनाधिकारी भोये यांनी सांगितले की आम्ही बिबट्याला पकडण्याचे मागील काही दिवसांपासून प्रयत्न करीत आहो, परिसरात पिंजरे सुद्धा लावण्यात आले आहे, त्या परिसरात 1 किलोमीटर अंतर एवढी फेंसिंग केल्या गेली तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा प्रश्न सुटेल, याबाबत जिल्हा वार्षिक विकास निधी कडे प्रस्ताव पाठविला मात्र अद्यापही निधी मंजूर झाला नाही, याबाबत सध्या पाठपुरावा सुरू आहे, निधी मंजूर झाल्यास तात्काळ फेंसिंगचे काम पूर्णत्वास येईल. Leopard attack on 7-year-old girl

     

    वाचा – मुख्यमंत्री शिंदे चंद्रपुरातील अम्मा च्या भेटीला

    चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून महोत्सवाच्या नावावर कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू आहे, पालकमंत्री मुनगंटीवार हे राज्याचे वनमंत्री असून सुद्धा त्यांच्या जिल्ह्यातील नागरिक वनप्राण्यापासून असुरक्षित आहे.

     

    एकीकडे कोट्यवधी रुपयांची उधळण तर दुसरीकडे निधी मंजूर होत नसल्याने फेंसिंग अभावी वन्यप्राणी नागरिकांवर हल्ले करीत आहे.

     

    वनमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात जर अशी परिस्थिती आहे तर जिल्ह्यात काय परिस्थिती असणार? एकंदरीत वनमंत्री यांच्या जिल्ह्यातील वनखातं स्वतः नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत असंवेदनशील असल्याचे दिसत आहे.

  • Mukhyamantri Eknath Shinde : अम्मा ला दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला

    Mukhyamantri Eknath Shinde : अम्मा ला दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळला

    Mukhyamantri Eknath Shinde अम्मा ने सुरु केलेला अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यात चर्चेत आहे. अम्माने सुरु केलेले काम राज्यासाठी प्रेरणादाई आहे. अनेकदा किशोर जोरगेवार आपल्या मातोश्री बद्दल कुतुहलाने सांगत असतात आज अम्माची भेट घेता आली. त्यांचा आर्शिवाद घेऊन मुंबईला जात आहे. आता नव्या उर्जेने काम करणार असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

     

    वाचा – चंद्रपुरात बॉटनिकल गार्डन चे उदघाटन

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौ-यावर असतांना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली. 2022 ला “मदर हु इंन्स्पायर पुरस्काराने अम्माला सन्माणीत करण्यात आले होते. तेव्हा मुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉल वरुन शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा अम्माने त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आज अम्माच्या भेटीला आलो असल्याचे म्हणाले. Mukhyamantri Eknath Shinde

     

    मुख्यमंत्री सचिव विकास खारगे, विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आदींची उपस्थिती होती.
    चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार यांचा अम्मा का टिफिन हा उपक्रम राज्यभर चर्चीला जात आहे. सदर उपक्रमाअंतर्गत शहरातील गरजवंताना दररोज घरपोच जेवनाचा डब्बा पोहचविला जात आहे. Mukhyamantri Eknath Shinde

     

    या कुटुंबासाठी अम्मा आधार ठरली आहे. त्यांच्या या उपक्रमाबदल अनेक संस्थानच्या वतीने त्यांना सन्माणीत करण्यात आला आहे. 2022 साली त्यांना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते मदर हु स्पा इंस्पायर पुरस्काराने सन्माणीत करण्यात आले. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ काँल करुन अम्माला शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी अम्माने त्यांना भेटीसाठी चंद्रपूरात आमंत्रित केले होते. Mukhyamantri Eknath Shinde

     

    दरम्यान आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चंद्रपूर दौ-यावर असताना त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहचत अम्माची भेट घेतली आहे. यावेळी अम्मा का टिफिन या उपक्रमाची त्यांनी पाहणी करत माहिती जाणून घेतली. हा एक अभिनव सामाजिक उपक्रम असुन राज्याला यातुन प्रेरणा मिळेल. या उपक्रमाबद्दल अनेकदा ऐकल होत. आज भेट देता आली याचा आनंद होत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

  • Inauguration of Botanical Garden in Chandrapur : चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    Inauguration of Botanical Garden in Chandrapur : चंद्रपुरातील बॉटनिकल गार्डन महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    Inauguration of Botanical Garden in Chandrapur चंद्रपूरला आजही ‘चांदा’ या नावाने ओळखले जाते. आज येथे 1667 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत असल्याने चांदाची खऱ्या अर्थाने चांदी आहे. येथील बॉटनिकल गार्डन हे जागतिक दर्जाचे असून महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

     

    चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाचे भूमिपूजन तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन करताना ते बोलत होते. Inauguration of Botanical Garden in Chandrapur

     

    वाचा – चंद्रपुरात 500 खोके एकदम ओके चे नारे

    यावेळी मंचावर राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक महीप गुप्ता, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन,  डॉक्टर जितेंद्र रामगावकर, मनपा आयुक्त विपीन पालीवाल आदी उपस्थित होते. Inauguration of Botanical Garden in Chandrapur

     

    पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी वनसंपदा वाढविणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, येथील बॉटनिकल गार्डन हा राज्यासाठी एक आदर्श प्रकल्प आहे. चंद्रपुरात सर्वोत्तम गार्डन होण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढाकार घेतला. पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक असे हे बोटॅनिकल गार्डन तयार झाले असून लोकांचा याकडे कल वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात महर्षी कर्वे हे मोठे नाव आहे. त्यांनी स्थापन केलेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे उपकेंद्र चंद्रपुरात होत आहे, येथील महिला व तरुणींसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. सोबतच केंद्र शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रकल्प आणि मलनिस्सारण प्रकल्प हे सुद्धा विकासाचे मोठे काम चंद्रपुरात होत आहे, याचा आनंद आहे.

     

    वाचा – आईवरून शिवीगाळ त्याने थेट चाकू भोसकला

    पुढे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, चंद्रपूरला दूरदृष्टी असलेले सुधीरभाऊ सारखे लोकप्रतिनिधी लाभले आहे. हाती घेतलेले काम पूर्ण शक्तीनिशी करणारे ते मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहयोगी आहेत. गतकाळात अर्थमंत्री तसेच यावेळी वनमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून त्यांनी राज्यासाठी खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या उपक्रमशीलतेमुळे वन खाते व सांस्कृतिक खाते बहरले आहे. आपल्या संस्कृतीची जोपासना कशी करायची, हे सांस्कृतिक कार्य विभागाने दाखवून दिले आहे. प्रत्येक विषयाची जाण असलेल्या सुधीरभाऊंनी चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची गंगा आणली, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. Inauguration of Botanical Garden in Chandrapur

     

    पर्यटनासाठी पुढील तीन महिने बॉटनिकल गार्डन मोफत : सुधीर मुनगंटीवार

    वाघाच्या प्रेमापोटी या व्याघ्रभूमीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बॉटनिकल गार्डनचे आज लोकार्पण करण्यात आले. पुढील तीन महिने पर्यटनासाठी बोटॅनिकल गार्डन मोफत असेल, अशी घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

     

    वाचा – तर मुख्यमंत्री शिंदे यांना महागात पडेल

    चंद्रपूर मध्ये नुकताच झालेला ताडोबा महोत्सव हा जागतिक दर्जाचा ठरला असून 20 कोटी लोकांपर्यंत ताडोबा महोत्सव पोहोचला आहे. तसेच ॲडव्हाँटेज चंद्रपूर मध्ये विविध उद्योगांचे 75 हजार कोटींचे सामंजस्य करार येथे करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात चंद्रपूर मध्ये उद्योगांनी गुंतवणूक केली असून पुढील दहा वर्षात येथील बेरोजगारी संपुष्टात येईल.

     

    आज चंद्रपूर मध्ये एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी 590 कोटी, बॉटनिकल गार्डनचा पहिला टप्पा 264 कोटी, महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना 270 कोटी आणि मलनि:स्सारण प्रकल्प 570 कोटी अशा एकूण 1667 कोटी रुपयांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चंद्रपुरात आज करण्यात आले. निवडणुकीनंतरही चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सैनिक स्कूल आदींचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा चंद्रपूरला यावे, असे आवाहनही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Sndt university in chandrapur

     

    वाचा – सुधीर भाऊ महोत्सव झाले किमान शेतकऱ्याकडे लक्ष द्या

    तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे चारही प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून राज्यगीताने सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तावित जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

     

    असे राहील एस.एन.डी.टी विद्यापीठ : ग्रामीण आदिवासी भागातील महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर – बल्लारपूर मार्गावर विसापूर येथे 50 एकर जागेवर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एस.एन.डी.टी.) महिला विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी 589 कोटी 93 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे प्रस्तावित बांधकाम एकूण 87290 चौ. मीटरवर होणार असून यामध्ये शैक्षणिक इमारत, प्रशासकीय कार्यालये, सेमिनार हॉल, वर्गखोली, व्याख्यान सभागृह, बोर्ड मिटींग रुम, फॅकल्टी रुम, 700 विद्यार्थीनींसाठी बाल्कनी व संलग्न शौचालय ब्लॉकसह दोन वसतीगृह इमारती, ग्रंथालय इमारत, डीजीटल लायब्ररी, 860 क्षमतेची सभागृह इमारत, कॅफेटेरीया, भोजनगृह इमारत, क्रीडा सुविधांमध्ये बॅडमिंटन,  टेनिस, बास्केटबॉल व विविध पारंपरिक खेळांकरीता इनडोअर स्पोर्टस् बिल्डिंग,  व्यायामशाळा, कराटे, बॉक्सिंग, कुस्तीसाठी विशेष हॉल, दर्शकांसाठी गॅलरी, अतिथीगृह इमारत, कर्मचारी निवास आदींची तरतूद आहे.

     

    बॉटनिकल गार्डन : चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर विसापूर येथे श्रद्धेय श्री. अटलबिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान (बॉटनिकल गार्डनची) 108 हेक्टर क्षेत्रात निर्मिती करण्यात आली आहे. बॉटनिकल गार्डन निर्मितीचे उद्देश  : निसर्ग शिक्षण, मनोरंजन आणि निसर्ग पर्यटन यात वाढ करणे. स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. फुल व फळ या शास्त्रासोबत रोपवाटिका तंत्राचा व व्यवस्थापनाचा पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक विकास करणे. रोपे लागवड आणि नवीन प्रजातींची ओळख करून उद्यान विज्ञानाचा वापर आणि व्यावसायिक कौशल्य विकसित करणे. तसेच वातावरण बदल व ग्लोबल वॉर्मिंग याबाबत जनजागृती घडून ग्रीन एनर्जीचा वापर करण्याकरिता प्रोत्साहन देणे. Inauguration of Botanical Garden in Chandrapur

     

    चंद्रपूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा व मननि:स्सारण प्रकल्प : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान 2.0 अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेच्या 270 कोटी 13 लाख रुपयाच्या पाणीपुरवठा प्रकल्प व चंद्रपूर शहराकरिता प्रथम टप्प्यात 542 कोटी ५ लाख रुपयाचा मनानिस्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत शहरातील एकूण 54 हजार घरगुती जोडणी करण्यात येईल.

  • Pappu Deshmukh Arrested : देशमुखांच्या आंदोलनाची धास्ती, पोलिसांनी घेतले ताब्यात

    Pappu Deshmukh Arrested : देशमुखांच्या आंदोलनाची धास्ती, पोलिसांनी घेतले ताब्यात

    Pappu Deshmukh arrested 12 मार्चला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पालिकेच्या 542 कोटीच्या मल निस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे, मात्र 15 वर्षापूर्वी 100 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प बुडीत गेल्यावर सुद्धा प्रशासनाने त्यावर चौकशी लावली नाही आणि उलट पुन्हा दुसरा प्रकल्पाचे भूमिपूजन आज होणार आहे आम्ही चंद्रपुरातील जनतेवर अन्याय होऊ देणार नाही असा इशारा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिला होता.

     

    वाचा – लोकसभेसाठी कांग्रेसने हा उमेदवार द्यावा, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत

    12 मार्च रोजी देशमुख यांनी आंदोलन करू नये यासाठी रामनगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, देशमुख यांनी यावेळी सांगितले की आधीच नागरिक प्रदूषणाने त्रस्त आहे, 100 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प बुडीत गेला त्याची चौकशी प्रशासनाने लावली नाही मात्र पुन्हा नवा 542 कोटींचा प्रकल्प सुरू होत आहे, जनतेच्या पैश्याची उघडपणे लूट सुरू आहे. Pappu Deshmukh arrested

     

    आता पुन्हा शहरातील रस्ते मोठ्या प्रमाणात खोदल्या जाणार आहे, आम्ही गप्प बसणार नाही चंद्रपूरच्या जनतेला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा पप्पू देशमुख यांनी दिला. विशेष बाब म्हणजे मलनिस्सारण व अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन चंद्रपूर मनपा हद्दीत न करता बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे करण्यात येत आहे.

    सत्ताधारी पक्षावर विरोध करणारे पक्ष आता चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा उरले नाही, केवळ जनविकास सेना हाच पक्ष नागरिकांच्या हितासाठी सत्ताधारी पक्षाला घेरण्याचे काम करीत आहे.

  • Chief Minister Eknath Shinde in Chandrapur : 1500 कोटीच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

    Chief Minister Eknath Shinde in Chandrapur : 1500 कोटीच्या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

    Chief Minister Eknath Shinde in Chandrapur मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार दि. १२ मार्च रोजी नागपूर आणि चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.

     

    दुपारी ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी ५ वाजता मोरवा विमानतळ हेलिपॅड चंद्रपूर येथे आगमन व मोटारीने वन अकादमी चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 5.15 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. सायंकाळी ६ वाजता मोटारीने श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन चंद्रपूरकडे प्रयाण. Chief Minister Eknath Shinde in Chandrapur

     

    वाचा – तर मुख्यमंत्री शिंदे यांना हे महागात पडणार

    सायंकाळी ६.१५ वाजता बॉटनिकल गार्डनची पाहणी व फिरते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. सायंकाळी ७ वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण व उद्घाटन. रात्री ८ वाजता मोटारीने कोतवाली वॉर्ड चंद्रपूरकडे प्रयाण. रात्री ८.०५ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांचे निवासस्थानी भेट. रात्री ८.१५ वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण. रात्री १०.१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

     

    काय आहे कार्यक्रम?

    चंद्रपुरात 11 मार्चला विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उदघाटन कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते मात्र काही कारणामुळे त्यांचा दौरा रद्द झाला होता, आज 12 मार्च ला मुख्यमंत्री शिंदे चंद्रपुरात येत आहे. सध्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे.

     

    चंद्रपूर व बल्लारपूर येथील एकूण 1500 कोटीच्या विकासकामांचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. Chief Minister Eknath Shinde in Chandrapur

     

    यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचा 270.13 कोटीचा अमृत 2.0 प्रकल्प, चंद्रपूर मनपाचा 542.05 कोटींचा प्रकल्प, SNDT महिला विद्यापीठाच्या 590 कोटीच्या इमारतीचे भूमिपूजन, 238.29 कोटीचे बॉटनिकल गार्डनचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडणार आहे.

  • Chandrapur Underground Sewerage Scheme : चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळणे मुख्यमंत्र्यांना महागात पडेल – पप्पू देशमुख

    Chandrapur Underground Sewerage Scheme : चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळणे मुख्यमंत्र्यांना महागात पडेल – पप्पू देशमुख

    Chandrapur Underground Sewerage Scheme चंद्रपूर: 15 वर्षांपूर्वी 100 कोटी रुपये खर्च करून टाकण्यात आलेली जुनी भूमिगत गटार योजना फसल्यानंतर त्याची साधी चौकशी सुद्धा केली नाही. कंत्राटदाराचे संपूर्ण 100 कोटी रुपयांचे देयके अदा केले. नेते आणि अधिकारी या योजनेतील मलिदा लाटून मोकळे झाले. खड्डे आणि धुळीचे परिणाम मात्र चंद्रपूरकरांना भोगावे लागले.

     

    आता 506 कोटी रुपयांच्या नवीन गटार योजनेचे 12 मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. जनतेच्या हितासाठी नव्हे तर 506 कोटींच्या निधीतून कमिशन लाटण्यासाठी अधिकारी व नेते जबरदस्तीने नवीन भूमिगत गटार योजना चंद्रपूरकरांवर थोपवत आहेत असा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जबरदस्तीने नवीन भूमिगत गटार योजना थोपविण्याचा प्रयत्न केल्यास चंद्रपूरची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही. Chandrapur Underground Sewerage Scheme

    वाचा – शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध

    नवीन भूमिगत गटार योजनेचे काम मिळालेला कंत्राटदार मुख्यमंत्र्यांच्या ठाणे या गावापासून 29 किलोमीटर वरील उल्हासनगरचा आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांचे या कंत्राटदाराशी हितसंबंध असतील. गावाजवळच्या कंत्राटदाराची त्यांना जास्त काळजी असेल. मुख्यमंत्र्यांनी गावा जवळच्या कंत्राटदारापेक्षा चंद्रपूरच्या जनतेची काळजी घ्यावी. अन्यथा मुख्यमंत्री व पालकमंत्री दोघांनाही चंद्रपूरकरांच्या आरोग्याशी खेळ करणे महागात पडेल, त्यांना याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशारा देशमुख यांनी दिला. मलःनिसारण योजना म्हणजेच नवीन भूमिगत गटार योजनेचे 12 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. याच दिवशी 100 कोटीच्या फसलेल्या जुन्या भूमिगत गटार योजनेची चौकशी व नवीन योजनेच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणी करिता जनविकास सेनेतर्फे जन आंदोलन सुरू करण्यात येत आहे. Chandrapur Underground Sewerage Scheme

     

    एवढी घाई का व कोणासाठी ?

    कोणत्याही मोठ्या योजनेचे काम सुरू करताना सर्वप्रथम निवड झालेल्या कंत्राटदाराला लेटर ऑफ इंडेट दिल्या जाते. यानंतर निवड झालेला कंत्राटदार काम करण्यास राजी असल्यास कंत्राटदार नियमाप्रमाणे बॅक गॅरंटीची रक्कम जमा करतो. बँक गॅरंटी ची रक्कम कंत्राटदराने जमा केल्यानंतर मनपाचे आयुक्त स्टॅम्प पेपरवर लेखी करार करून कंत्राटदराला कामाचा आदेश म्हणजेच कार्यादेश देतात. कार्यादेश दिल्यानंतर कंत्राटदराकडून प्रत्यक्ष कामाची सुरुवात करण्यात येते. Chandrapur Underground Sewerage Scheme

    वाचा – कुलर लावताना ही काळजी घ्या

    नवीन भूमिगत गटार योजनेचे 11 मार्च रोजी भूमिपूजन करण्यात येणार होते. मात्र रविवारी 10 मार्च रोजी पर्यंत कंत्राटदाराला कार्यादेश मिळाला नव्हता. कंत्राटदाराने बँक गॅरंटी जमा केली नव्हती. या सर्व प्रक्रियेला बगल देऊन व नियम डावलून भूमिपूजनाची घाई करण्यात येत आहे. 506 कोटी रुपये खर्च असलेल्या योजनेच्या निविदा प्रक्रियेसाठी कमालीची घाई करण्यात येत आहे. नियम डावलून योजनेचे भूमिपूजन करण्याची घाई करण्याचा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केला. Chandrapur Underground Sewerage Scheme

    506 कोटीं मधील वरच्या 60 कोटींचे भागीदार कोण ?

    नवीन भूमिगत गटार योजनेसाठी जानेवारी 2024 मध्ये महाराष्ट्र जिवंत प्राधिकरणाने 448 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मनपा प्रशासनाला दिले. प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर अंदाजपत्रकापेक्षा जास्त दर टाकलेल्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली. तडजोड करून कंत्राटदाराला 13.50% अधिकच्या दराने काम देण्यात आले. Chandrapur Underground Sewerage Scheme

     

    अंदाजपत्रकापेक्षा जवळपास 60 कोटी रुपये अधिकच्या किमतीमध्ये कंत्राटदाराला काम देण्यात आले. अंदाजपत्रकाच्या वरच्या 60 कोटी रुपयांमध्ये कोण कोण भागीदार आहेत याचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जनतेला द्यायला हवे. अमृत पाणीपुरवठा योजना, अमृत मलःनिसारण योजना व जुनी भूमिगत गटार योजनेमध्ये केंद्र सरकारच्या शेकडो कोटींचा निधी खर्च करताना गैरव्यवहार झाल्याने याची सीबीआय मार्फत चौकशी होणे गरजेचे आहे तसेच चंद्रपूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने एसआयटी स्थापन करावी अशी मागणी जनविकास सेनेने केली.

     

    हिम्मत असेल तर चंद्रपुरात भूमिपूजन करून दाखवा

    नवीन भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन विसापूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. योजना चंद्रपूर शहराची आणि भूमिपूजन विसापुरात हा अजब प्रकार आहे. ‘शहरातील सर्व रस्ते खोदून 506 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेसाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन’, असे स्पष्ट फलक लावून मनपा प्रशासनाने चंद्रपूर शहराच्या आत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची हिम्मत दाखवावी असे आव्हान पप्पू देशमुख यांनी प्रशासनाला दिले.

  • Chandrapur lok sabha congress candidate : चंद्रपूर लोकसभेला कांग्रेस पक्षाकडून हा उमेदवार हवा

    Chandrapur lok sabha congress candidate : चंद्रपूर लोकसभेला कांग्रेस पक्षाकडून हा उमेदवार हवा

    Chandrapur lok sabha congress candidate आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे, मात्र चंद्रपुरात अद्यापही उमेदवारीचा घोळ कायम आहे.

     

    भाजप सहित कांग्रेस पक्षात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे, लोकसभेसाठी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर जवळपास शिक्का मोर्तब झाल्यावर अचानक विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केला आहे. Chandrapur lok sabha congress candidate

     

     

    शिवानी वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे कांग्रेस पक्ष व घटकपक्षात संभ्रमाची स्थिती आहे.
    विशेष म्हणजे शिवानी वडेट्टीवार यांनी सरळ दिल्ली गाठत पक्षातील वरिष्ठांना लोकसभा उमेदवारीसाठी विनंती केली आहे.

     

    तर दुसरीकडे 11 मार्च ला चंद्रपुरातील शासकीय विश्रामगृहात इंडिया आघाडीतील घटक पक्षाने शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

     

    आज झालेल्या बैठकीत कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड व समाजवादी पक्षाने संयुक्त बैठक घेत ठरविले की चंद्रपूर लोकसभा ही कांग्रेस पक्षाच्या कोट्यात आहे, त्यामुळे पक्षाने लवकरात लवकर आपला उमेदवार जाहीर करावा. Chandrapur lok sabha congress candidate

     

    उमेदवार कसा जिंकणार त्यासाठी आम्ही सर्व पक्ष मिळून कामाला लागू मात्र सध्या कांग्रेसमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याकरिता पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार द्यावा अश्या मागणीचे पत्र महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पाठविणार असल्याचे बैठकीत एकमत झाले.

     

    राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी चंद्रपूर लोकसभेवर दावा केल्याने पक्षातील अंतर्गत कलह पुढे आला आहे, पुन्हा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार असा संघर्ष पक्षात सुरू झाला आहे.

    शिवानी वडेट्टीवार या गडचिरोली लोकसभा क्षेत्रात येतात, त्यामुळे इंडिया आघाडीतील घटक पक्षाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांची मागणी केली आहे. एकंदरीत हा शिवानी वडेट्टीवार यांच्या उमेदवारीला विरोध आहे.

    वाचा – भाजपच्या यादीत हंसराज अहिर यांचे नाव झळकले

    महाविकास आघाडीमधील पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून लवकरचं सर्व घटक पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करणार असल्याची माहिती या बैठकीत दिली.

     

    आयोजित बैठकीत राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महानगर अध्यक्ष दीपक जयस्वाल, कांग्रेसचे महानगरअध्यक्ष रामू तिवारी, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, आप चे नेते सुनील मुसळे, मयूर राईकवार आप जिल्हाध्यक्ष, समाजवादी पक्षाचे सोहेल खान, संभाजी ब्रिगेडचे खैरे सर यांची उपस्थिती होती.