Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • 5 राज्यातील निवडणुकांची घोषणा

    News34 chandrapur

    वृत्तसेवा – भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेमध्ये सर्व पाच राज्यांसाठी उमेदवारी अर्ज भरणे, मतदानाचे दिवस आणि निकाल जाहीर करणे यासह निवडणूक प्रक्रियेच्या तारखांचा तपशील समाविष्ट आहे.

     

    निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी रणनीती आखण्यासाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निरीक्षकांची बैठक घेतली. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आणि पैशाचा लेव्हल प्लेइंग फील्डवर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी EC चे पोलिस, सामान्य आणि खर्च निरीक्षकांची रणनीती सुव्यवस्थित करण्यासाठी बैठक झाली.

     

    छत्तीसगडमध्ये 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर या दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. छत्तीसगडमध्ये 17 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबरोबरच मध्य प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

     

    राजस्थान आणि तेलंगणामध्ये अनुक्रमे 23 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये 17 नोव्हेंबरला विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मिझोराममध्ये विधानसभेच्या निवडणुका 7 नोव्हेंबरला होणार आहेत.

     

    5 राज्यातील निवडणुकीचे परिणाम 3 डिसेंम्बर ला घोषित करण्यात येतील.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अजित पवार गट सक्रिय

    News34 chandrapur

    चंद्रपूर:- सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेलजी व राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवारजी यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत समाविष्ठ होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नाकरीता संघर्ष करीत आला आहे. यामुळे जनतेचे प्रश्न व अनेक विकासाची कामे सत्तेत मार्गी लावता येतात. असे प्रतिपादन श्री राजेंद्र जैन यांनी केले.

     

    चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक श्रमिक पत्रकार भवन, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष नितिन भटारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खा. श्री प्रफुल पटेलजी यांची आगामी काळात चंद्रपूर येथे होणाऱ्या बैठकी संदर्भात चर्चा करून आढावा घेण्यात आला.

     

    श्री राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता व पदाधिकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त जागा पक्ष लढवेल त्यासाठी जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात क्रियाशील व सक्षम कार्यकर्त्यांची निवड करून अजित दादा पवार, प्रफुल पटेलजी व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. पक्षात सर्व घटकाचा समावेश करून प्रामुख्याने युवक, युवती व महिलांना स्थान देऊन प्रोत्साहन द्यावे. जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात काम करेल अश्याच उत्साही व सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देऊन जिल्ह्यात पक्षाचा विस्तार व मजबुती करीता आपण सर्र्वांनी मिळून प्रयत्त करावे याबाबत मार्गदर्शन केले.

     

    सदर कार्यक्रमाचे संचलन राष्ट्रवादी विद्यार्थी शहर अध्यक्ष कोमील मडावी यांनी केले असुन प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले. तसेच स. आबीद अली, राजीव कक्कड, राकेश सोमानी, विलास नेरकर, महेंद्रसिंग चंदेल यांनी विचार मांडले यावेळी ग्रामीण क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महीला पदाधिकारी उपस्थीत होते.

     

    यावेळी प्रामुख्याने सर्वश्री राष्ट्रीय सचिव राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, केतन तुरकर, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, प्रदेश सहसचिव आबिद अली, युवक जिल्हाध्यक्ष राकेश सोमानी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, चिमुर विधानसभा अध्यक्ष अरविंद रेवतकर, ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष अविनाश राऊत, राजुरा विधानसभा अध्यक्ष शरद जोगी, महिला कार्यध्यक्ष चारूशीलाताई बारसागडे, नगरसेवक महेंद्रसिह चंदेल, युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, रौनक ठाकूर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुल्ला, भद्रावती तालुका अध्यक्ष राजू बोरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष गितेश सातपुते, वरोरा तालुका अध्यक्ष रवि भोयर, शहर अध्यक्ष चंद्रकांत कुंभारे, चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठूने, सचिव रमेश कऱ्हाडे, ब्रम्हपुरी तालुका अध्यक्ष नोगेश बघमारे, नागभीड तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, शहर अध्यक्ष रियाज शेख, मुल तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, बल्लारपूर तालुका अध्यक्ष महादेव देवतळे, कार्याध्यक्ष तणवीर शेख, गोंडपीपरी तालुका अध्यक्ष मनोज धानोरकर, राजुरा तालुकाध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष रकीब शेख, सावली तालुकाध्यक्ष घनश्याम राऊत, घुग्गुस शहर अध्यक्ष रवी डिकोंडा, जिल्हा सचिव हर्षवर्धन पिपरे, पंचायत समिती सदस्य पंकज ढेंगारे, माजी नगरसेवक सरफराज शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष नौशाद सिद्धिकी, ओबीसी शहर अध्यक्ष विपिन झाडे, अश्विन उपासे, प्रविण काकडे, प्रशांत झामरे, अकबर खान, दामोधर नंनावरे, मनोज सैनी, अर्चनाताई बुटले, सलीम शेख, गोलू डोहने उपस्थित होते.

     

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमोल ठाकरे, केतन जोरगेवार, रोशन फुलझेले, तिमोती बंडावार, अनुकूल खन्नाडे, राहुल आवळे, आकाश निरथवार, दिपक गोरडवार, संजय सेजूळ, अमर गोमासे, पियुष चांदेकर, समीर शेख, अमर धोंगडे, गणेश बावणे, नितीन घुबडे, सौरभ घोरपडे, राजू रेड्डी, राकेश रेप्पेलीवार, सचिन मांडाळे, भोजराज शर्मा, राहुल वाघ, पवन जाधव, प्रतीक भांडवलकर, सनी शर्मा, ऋतिक मडावी, संदीप बिसेन, निशांत लिंगमपल्लीवार, अंकित ढेंगारे, पवन बंडीवार, चेतन अनंतवार यांनी अथक परिश्रम घेतले.

  • चंद्रपुर शहरात 9 हजार बेवारस श्वान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशन द्वारे श्वान लसीकरण व निर्बीजीकरणाची मोहीम सुरु असुन आपल्या परिसरातील मोकाट श्वानांचे लसीकरण व निर्बीजीकरण करावयाचे असल्यास मनपाद्वारे दिल्या गेलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

     

    मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्या आहे. गाडीच्या मागे धावणे,चावा घेणे,रात्रीच्या वेळेस अंगावर धाऊन जाणे त्यामुळे अपघात होणे इत्यादी प्रकारचे त्रास या बेवारस कुत्र्यांमुळे होतात. पिसाळलेल्या श्वानांच्या चाव्यामुळं,अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० व ॲनिमल बर्थ कंट्रोल २००१ नुसार श्वानांना मारण्यास बंदी आहे. मात्र मोकाट, भटके  श्वान यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी चंद्रपूर मनपाद्वारे सदर मोहीम राबविली जात आहे.

     

    शहरातील मोकाट श्वानांची नसबंदी करण्याची जबाबदारी पेटानिटी अँड ॲनिमल रिहॅबिलिटेटर्स (प्यार ) फाऊंडेशनकडे सोपविण्यात आली आहे. शहरात अंदाजे ८ ते ९ हजार बेवारस श्वान असुन त्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.  मनपातर्फे आतापर्यंत १८०० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे.

     

    आपल्या परीसरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरण तसेच लसीकरण करावयाचे असल्यास सदर माहीती ७०२८८८२८८९ या मोबाईल क्रमांकावर देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले महसूल मंत्री विखे पाटील

    News34 chandrapur

    चंद्रपूर : गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीन आणि कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतमालाची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (दि.8) चिमूर तालुक्यातील वाहनगाव, बोथली, रेंगाबोडी गावांचा दौरा केला. शेतक-यांच्या बांधावर जावून त्यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तसेच शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या.

     

    यावेळी महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 67 हजार हेक्टर पैकी 55 हजार हेक्टरवर सोयाबीनचे नुकसान झाले आहे. कपाशीलासुध्दा मोठ्या प्रमाणात मार बसला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच पिकांवर खोडकिडीचाही प्रादुर्भाव आढळला असून कृषी शास्त्रज्ञांकडून त्याचे निरीक्षण केले जाईल. पंचनामे पूर्ण होताच राज्य सरकारकडून शेतक-यांना भरीव मदत दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी चिमूर तालुक्यातील वाहनगाव येथील नथ्थुजी रणदिवे यांच्या शेतातील नुकसानग्रस्त सोयाबीनची, बोथली येथील सुधाकर बरडे यांच्या शेतातील कपाशी आणि रेंगाबोडी येथील गजानन ठोंबरे यांच्या शेतातील सोयाबीनची पाहणी केली.

     

    महसूल विभागाचा आढावा :

    चिमूर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा घेतांना ना. विखे पाटील म्हणाले, घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना जवळचे रेती डेपो उपलब्ध झाले पाहिजे. त्यादृष्टीने महसूल प्रशासनाने नियोजन करावे. विनाकारण वाळूसाठी घरकुलच्या लाभार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडायला नको. चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत तसेच चिमूरच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आणि निवासी वसाहतींकरीता निधीमागणीचा प्रस्ताव पाठवावा. भुमी अभिलेख अंतर्गत जमीन मोजणीकरीता ड्र्रोन / रोव्हर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे जमिनीची मोजणी गतीने करून द्यावी. अर्ज आल्यानंतर 12 ते 15 दिवसांत संबंधित लाभार्थ्यांची जमीन मोजणी झाली पाहिजे.

     

    पाणंद रस्ते हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. जास्तीत जास्त लोकांचा पाणंद रस्त्यांचा उपयोग होण्यासाठी जिल्ह्यातील पाणंद रस्ते मोकळे करा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात चांगले काम झाले आहे. तरीसुध्दा पंचायत समिती स्तरावर किंवा मंडळनिहाय कार्यशाळा घेऊन या योजनेची माहिती शेतक-यांपर्यंत पोहचवा. जेणकरून जास्तीत जास्त शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होऊ शकतील, अशा सुचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. यावेळी वीज पडून बैल मृत्युमुखी पडल्यामुळे रतिराम गायकवाड आणि गणेश देवतळे यांना महसूलमंत्र्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.

     

    आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी घरकुलच्या लाभार्थ्यांना जवळच्या घाटावरून वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच चिमूर येथे आज संपूर्ण प्रशासन आले आहे. येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयसुध्दा कार्यान्वित झाले असून लवकरच स्वतंत्र चिमूर जिल्ह्याची निर्मिती करावी, अशीही मागणी त्यांनी केली.

    जिल्हाधिकारी यांनी केले सादरीकरण

     

    सादरीकरण करतांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, जिल्ह्यात 57 टक्के हेक्टरवर ई –पीक पाहणी प्रयोग झाले असून लवकरच 100 टक्के ई-पीक पाहणी करण्यात येईल. तसेच ई- फेरफार आणि ई- चावडी उपक्रम राबविण्यात येत आहे. गत दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 61430 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. बाधित झालेल्या शेतक-यांची संख्या 68 हजार असून यापैकी 58 हजार शेतक-यांचे पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

     

    जिल्ह्यात 40 पैकी 38 वाळू घाटांचे लिलाव करण्यात आले आहे. यातून 28 कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात 30 वाळू डेपोचे नियोजन करण्यात आले आहे. गौण खनीज मधून 64 टक्के वसूली करण्यात आली असून अवैध उत्खनन व वाहतुकीतून 2 कोटी 1 लक्ष रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. शासन आपल्या दारी अंतर्गत जिल्ह्यातील 3 लक्ष 80 हजार 950 लाभार्थ्यांना लाभ आला आहे. तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गतवर्षीपेक्षा 500 पट शेतक-यांचा सहभाग वाढला आहे. गतवर्षी या योजनेत 67 हजार शेतकरी सहभागी झाले होते तर यावर्षी सहभागी शेतक-यांची संख्या 3 लक्ष 50 हजार 976 आहे. यातून 3 लक्ष 27 हजार हेक्टर क्षेत्राला संरक्षित विम्याचे कवच प्राप्त झाले असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

     

    बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खासदार अशोक नेते, आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

     

  • ऑक्टोबर महिन्यात चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाची खगोलीय घटना

    News34 chandrapur

    चंद्रपूर – १४ ऑक्टोबर रोजी जगातील उत्तर-मध्य आणि दक्षिण अमेरिका, अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया आणि ब्राझील येथून हे ग्रहण कुठे कांकनाकृती किंवा खग्रास दिसणार आहे, परंतु हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण सकाळी ८.३३ वा सुरू होऊन २.२६ वाजता संपेल.हे ह्या वर्षीचे शेवटचे सूर्यग्रहण असेल. ह्या पूर्वी २० अप्रिल रोजी आंशिक सूर्यग्रहण घडले होते आणि ह्या वर्षीचे २८ ऑक्टोबर चे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल. पती-पत्नीची अमानुष हत्या

     

    २८ ऑक्टोबर रोजी रात्री घडणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारत, महाराष्ट्रातून दिसेल. ह्या पूर्वी ५ मे रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले होते.२८ऑक्टोबर चे ग्रहण वर्षातील शेवटचे ग्रहण असेल.हे ग्रहण जगातील युरोप, आशिया, आष्ट्रेलिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतुन दिसेल. ग्रहणाची सुरवात रात्री ०१.०५ मिनिटाने सुरुवात होईल,ग्रहण मध्य ०१.४४ तर ग्रहण २.२२ वाजता संपेल. आंशिक ग्रहणाचा चंद्र केवळ १०%झाकला जाइल.

    ऑक्टोबर चे उल्कावर्षाव

    ९ ऑक्टोबर ला ड्राकोनिड उल्कावर्षाव
    १८ ऑक्टोबर ला जेमिनिड उल्कावर्षाव
    २२ ऑक्टोबर ला ओरिओनीड उल्कावर्षाव
    २५ ऑक्टोबर ला लिओनीड उल्कावर्षाव पहावयास मिळणार आहे.

    ऑक्टोबर महिन्यात इतक्या खगोलीय घटना पाहण्याची ही संधी अनेक वर्षांनंतर आली आहे. खगोल अभ्यासकांनी ह्या संधिचा लाभ घ्यावा असे आवाहन खगोल अभ्यासक आणि स्काय वॉच गृप चे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे ह्यानी केले आहे.

  • चंद्रपुरात वाहतुकीस अडथळा, मनपाने 10 जणांविरुद्ध केले गुन्हे दाखल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील विविध भागातील वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या व प्रसंगी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध चंद्रपूर महानगरपालिकेने तक्रार करून गुन्हे दाखल केले आहेत.

     

    शहरातील मुख्य रस्त्यावर मोकाट जनावरे तासन्‌तास ठिय्या मांडून बसतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातीही घडतात. महापालिकेकडून अनेकदा कारवाईही केली जाते. परंतु तरीही सदर समस्या वाहतुकीला डोकेदुखी ठरत असल्याने मोकाट जनावरांविषयीचा प्रश्न आयुक्त विपीन पालीवाल यांनी गांभीर्याने घेतला असुन सध्या १० मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

     

    शहर व लगत परिसरात मोठ्या प्रमाणात जनावरांचे गोठे आहेत. जनावरांचे काही मालक हे जनावरे सकाळी मोकाट सोडून देतात. सोडून दिलेली ही मोकाट जनावरे रस्त्यावर ठाण मांडतात. बहुतांशी मुख्य रस्ते,चौक येथे मोकाट जनावरांनी रस्ता अडविलेला असतो. यातून अनेकदा गंभीर अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडीची समस्या देखील उद्भवते.

     

    याबाबत प्राप्त तक्रारीनुसार मनपाकडून कारवाईही केली जाते. मात्र, अलीकडे जनावरांचे कोंडवाडा राहिलेले नाहीत. गोशाळांमध्ये ही जनावरे जमा केल्यानंतर मालक तेथून ती सोडवून आणतात आणि पुन्हा ती जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात. त्यामुळे मनपाने आता या पशुपालकांनाच चाप लावण्याच्या दृष्टीने कारवाई सुरु केली आहे.

     

    मोकाट जनावरे पकडुन पोलीस तक्रार करण्याची  मोहीम यापुढेही सुरु राहणार असुन ती अधिक तीव्र करण्यात येणार असुन पशुपालन करणाऱ्या संबंधितांनी आपली जनावरे रस्त्यावर मोकळे न सोडण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात किमान वेतनासाठी घंटागाडी कामगारांची लढाई

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत घंटागाडी कामगार किमान वेतनासाठी रस्त्यावर उतरले आहे, मागील 2 दिवसापासून पालिकेसमोर घंटागाडी कामगार आंदोलन करीत आहे, त्यांच्या आंदोलनाची दखल मंत्री, आमदार व स्वतः मनपाने घेतलेली नाही.

     

    संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेतर्फे सदर कामबंद आंदोलन करण्यात येत आहे, वर्ष 2021 पासून कामगारांना किमान वेतन नुसार पगार देण्यात येत होता, त्यानंतर सफाई चे कंत्राट दुसऱ्या कंत्राटदारा कडे गेल्याने किमान वेतनात मोठी तफावत निर्माण झाली.

     

    एका कामगारांच्या मागे तब्बल 200 ते 300 रुपये म्हणजेच महिन्याला 6 हजार रुपये कमी मिळायला लागले, याबाबत काही महिन्यांपूर्वी कामगार संघटनेतर्फे आंदोलन पुकारत कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला होता, त्यावेळी आश्वासन देत आंदोलन मिटले.

     

    मात्र कामगारांच्या किमान वेतनावर कंत्राटदार काहीही बोलायला तयार नाही, जितका पगार मिळत आहे घ्या अन्यथा कामावरून कमी व्हा अशी धमकी त्यांना देत आहे, कंत्राटदारांच्या अन्यायाला कंटाळून संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष रतन गायकवाड यांनी सर्व बाबी समजून घेत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

     

    6 ऑक्टोम्बर पासून कामगार संघटनेमार्फत कामबंद आंदोलन सुरू आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. या आंदोलनात 300 कामगार सामील झाले आहे.

  • आदिवासी तरुणीची शिक्षणासाठी लंडनवारी

    News34 chandrapur

    चंद्रपूर : मोठ्या शहरात शिक्षण घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यातच परदेशातील शिक्षण म्हणजे दिवास्वप्नच. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपणही उंच भरारी घेऊ शकतो, असा आत्मविश्वास असणाऱ्यांपुढे आकाश ठेंगणे असते. असाच अनुभव सावली तालुक्यातील भानापूर येथील आदिवासी लेकीला आला. परदेशात उच्च शिक्षण घेण्याच्या तिच्या जिद्दीला बळ देण्याचे काम राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. त्यामुळे आता एक आदिवासी लेक शिक्षणासाठी लंडनवारी करण्यासाठी सज्ज झाली आहे. One Plus Nord CE 3 5G धमाकेदार ऑफर, अवश्य खरेदी करा आपल्या फायद्याचा फोन

     

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे या तरुणीचा शिष्यवृत्तीचा रखडलेला प्रस्ताव मार्गी लागला आणि तिला लंडन येथे उच्च शिक्षणासाठी ३७ लक्ष ६१ हजार १८३ रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती मंजूर झाली. ही कहाणी आहे सावली तालुक्यातील भानापूर (पो. पाथरी) या गावातील प्रिया यशवंत ताडाम या तरुणीची. एकतर पूर्णपणे जंगलव्याप्त आणि १०० टक्के आदिवासी गाव. जेमतेम ४० कुटुंबांची लोकवस्ती. अशा या गावातील प्रिया आता एल.एल.एम. करण्यासाठी लंडनच्या क्वीन मेरी युनिर्व्हसिटीमध्ये जाणार आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रियाच्या शिक्षणासाठी ३७ लक्ष ६१ हजार १८३ रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रियाच्या शिष्यवृत्तीचा प्रस्ताव अनेक दिवस रेंगाळत होता. ही बाब भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर ना. मुनगंटीवार यांनी याबाबत पाठपुरावा केला व प्रियाचा परदेशातील उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.

     

    असा आहे आदिवासी लेकीचा प्रवास

    प्रिया ताडामचे प्राथमिक शिक्षण आसोलामेंढा (ता. सावली) येथे झाले असून इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत तिने जि.प.शाळा पाथरी येथे शिक्षण घेतले. त्यानंतर इयत्ता आठवी ते बारावीपर्यंत सावली येथील विश्वशांती ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षण घेतल्यानंतर बी.ए.एल.एल.बी. ची पदवी तिने शासकीय विधी महाविद्यालय नागपूर येथे ७१ टक्के गुणांसह प्राप्त केली.

     

    ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार

    इंटरनॅशनल बिझनेस लॉमध्ये एल.एल.एम. करण्यासाठी प्रिया ताडाम आता लंडनला जाणार आहे. पण, तिच्या घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. तिचे वडील यशवंत ताडाम हे शेतमजूर असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित तीन एकर शेती आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर प्रिया आणि तिच्या कुटुंबियांनी ना. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

  • चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

    News34 chandrapur

    चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.
    यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. Realme चा 5G मोबाईल फक्त 11 हजार 999 रुपयात, आजच खरेदी करा amazon वर

     

    तिरडी वर औषधांचा हार चढवत प्रशासनाच लक्ष वेधण्यात आले, तसेच यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शासनाकडे अनूपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक शासन करावे, औषधांचा पुरवठा रुग्णांची वाढती संख्या पाहून करावा, गेली दोन वर्षापासून होत असलेली औषध पुरवठ्याची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची, कामगारांची शेकडो रिक्त पदे त्वरित भरावी, ऑपरेटिंग एक्स-रे मशीन सुरू करावी, रखडलेल्या यंत्रांची खरेदी अती तातडीने करण्यात यावी, सोनुग्राफी करीता महिने महिन्याची तारीख रुग्णांना न देता, त्यावर त्वरित उपययोजना करावी, कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून अधिष्ठाता यांचे कार्यालयात रखडलेले उपचाराचे बिल त्वरित अदा करण्यात यावे, खाटांची संख्या वाढविण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या, विविध फलक दाखवीत निद्रावस्थेत असलेल्या शासनाच्या व सरकारच्या ढिम्म कारभाराचा यावेळी निषेध केला.

     

    यावेळी उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठत खाली असलेल्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली. यावेळी शासनाकडून खरेदीत, भरीत प्रक्रियेत, व औषधी पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई यामुळे अनेक अडचणींना स्थानिक अधिकाऱ्यांना व डॉक्टर यांना समोर जावे लागत आहे हे स्पष्ट झाले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अवगत करून आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिले.

     

    सदर आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार,विधीसेना जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जनहित सेना जिल्हाध्यक्ष सुनील गुडे,तालुअक अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, अक्षय चौधरी, राज वर्मा,वर्षा भोमले, युगल ठेंगे, नितेश जुमडे, करण नायर, मयुर मदनकर, कार्तिक खंगार,सुयोग धनवलकर, राकेश पराडकर, तुषार येरमे,पियुष धुपे,असलम शेख, अभी उमरे, विनोद रेब्बावार,ऋषि बालमवार, कार्तिक खंगार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

  • 15 तासांनी प्रकल्पग्रस्तांचे विरुगिरी आंदोलन मागे

    News34 chandrapur

    चंद्रपूर – अदानी समूहाने घेतलेल्या कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनीच्या प्रकल्पगस्त शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्याने रात्री आठच्या सुमारास विरूगिरी आंदोलन मागे घेण्यात आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजतापासून कंपनी परिसरातील टॉवरवर चढून सहा तरूणांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला होता.

    आंदोलकांमध्ये आकाश लोडे, अविनाश विधाते, तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर, सचिन पिंपळशेंडे यांचा समावेश आहे. भूसंपादन कराराचे उल्लंघन करणाऱ्या अंबुजा कंपनीचे भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांना जमीनी परत द्याव्या नाहीतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंपनीमध्ये स्थायी नोकरी द्यावी आदी मागण्यां आंदोलनादरम्यान करण्यात आल्या होत्या.

     

    कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कंपनी म्हणजेच पूर्वीच्या मराठा सिमेंट कंपनीने शासनासोबत केलेल्या भूसंपादन करारातील तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स्थायी नोकरीमध्ये प्राधान्य न देता प्रकल्पग्रस्त आदिवासी व गैर-आदिवासी शेतकऱ्यांना नोकरीपासून वंचित ठेवले. त्याऐवजी स्थानिक रहिवासी असल्याचे खोटे दाखले तयार करून बाहेरच्या लोकांना रोजगार देण्यात आला. प्रकल्पग्रस्तांना डावलल्याने स्थानिक तरूण व प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.

     

    कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वंचीत ठेवल्याने संतापलेले सहा प्रकल्पग्रस्त शेतकरी पिंपळगाव येथील आकाश लोडे, अविनाश विधाते, उपरवाहीचे तुषार निखाडे ,संजय मोरे,संदीप वरारकर व लखमापूर येथील सचिन पिंपळशेंडे यांनी शुक्रवारी पहाटे पाच वाजता कंपनी परिसरातील मोबाईलच्या उंच टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले.

     

    पहाटे पाच ते सायंकाळी 8 वाजतापर्यंत सहा युवक विरूगिरी स्टाईलने टॉवरवर आंदोलन करीत होते. उपविभागीय अधिकारी यांन या आंदेालनाची दखल घेत घटनास्थळी दाखल झाले. प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्यांच्या मागण्यांना प्राधान्याने घेऊन नागपूरात या विषयी आठवडाभरात बैठक लावून न्याय देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.