Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    2036 च्या ऑलम्पिक ची तयारी चंद्रपूर जिल्ह्यातून – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – वर्ष 2036 ला भारतात ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याचा मानस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला होता, त्याअनुषंगाने चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन 26 ते 31 डिसेंबर ला करण्यात येणार आहे. ही स्पर्धा म्हणजे वर्ष 2036 च्या ऑलम्पिक ची तयारी आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.

     

    स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नियमानुसार दरवर्षी राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते, यंदा 14 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धा आयोजनाचा मान उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर जिल्हा, 17 वर्षाखालील मुले/मुली पटना बिहार व 19 वर्षाच्या आतील मुले/मुली क्रीडा स्पर्धेचा आयोजनाचा मान चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ला मिळाला आहे.

     

    याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेत आयोजनाबाबत माहिती दिली.

    पालकमंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले की ही स्पर्धा देशातील खेळाडू ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयार व्हावे आमचा मानस आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना आगामी स्पर्धेबाबत प्रेरणा मिळेल.

     

    4 दिवस चालणाऱ्या स्पर्धेची सुरुवात 26 डिसेंम्बर ला नोंदणी च्या माध्यमातून होणार असून 27 डिसेंम्बर ला क्रीडा स्पर्धेचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे उपस्थित राहणार असून उदघाटन कार्यक्रमात देशाचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश मिळून एकूण 3 हजार खेळाडू, 200 तांत्रिक अधिकारी, पंच, 500 स्पोर्टींग स्टाफ, स्वयंसेवक व जवळपास 500 पालकांचा सहभाग असणार आहे.

     

    आयोजित ऐथलीट खेळांमध्ये हॅमर थ्रो, हाय जम्प, लॉंग जम्प, जेव्हलीन थ्रो असे विविध खेळ होणार आहे.

    आयोजित स्पर्धेचे थेट प्रक्षेपण चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील विविध भागात एलईडी टीव्ही द्वारे होणार आहे.

     

    राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेची मशाल प्रज्वलित करीत रायगड किल्ल्यापासून ते मंत्रालय पर्यंत व दुसऱ्या टप्प्यात गेट वे ऑफ इंडिया पासून ते चंद्रपूर जिल्ह्यात या मशालीचे आगमन होणार आहे, यादरम्यान रायगड, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातून मशालीचे आगमन होत असताना भव्य स्वागत व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

     

     

    आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत 20 मैदानी बाबीचा समावेश आहे, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची जनजागृती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी जिल्ह्यातील क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, सामाजिक संघटना, समाजसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड यांच्या माध्यमातून विविध स्कुटर रॅली, टॉर्च रॅली व शोभायात्रा काढत क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूंचा समावेश करून जिल्ह्यात क्रीडा वातावरण तयार करणार आहे.

     

     

    विशेष म्हणजे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, पालक व प्रशिक्षक व बाहेरून येणाऱ्या सर्व मान्यवरांसाठी मोफत ताडोबा जंगल सफारीचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

     

    ही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे आपल्या राज्य व देशातील खेळाडूंची मिशन ऑलम्पिक ची तयारी आहे अशी माहिती पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

    चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना आयोजनाबाबत समस्या उदभवू नये यासाठी नागपूर एअरपोर्ट, चंद्रपूर रेल्वे स्टेशन व बस स्थानक वरून बसेसची व्यवस्था, डिजिटल बुक, चॅट बॉट व टोल फ्री क्रमांकची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

    आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची प्रशासनाकडून थट्टा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं.या राजाला सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.आत्महत्याग्रस्त कुटुंबाला साधं राशन कार्ड काढण्यासाठी कार्यालयाचा शंभर चकरा माराव्या लागल्यात. हा प्रकार चंद्रपूर जिल्हात घडला. हा प्रकार लक्ष्यात येताच बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी कुटुंबाची भेट घेतली. त्यांना राशन कार्ड मिळवून दिले. घरच्या कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबाची वाताहात होते. ही वाताहत येथील लोकप्रतिनिधीना दिसू नये ही मोठी शोकांतिका आहे.

     

    जिल्ह्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या परिवारास आर्थिक मदत द्यावी, सर्व शासकीय योजना व पीक नुकसानीचे अनुदान देण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, अशी मागणी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांनी केली होती.तसे त्यांनी निवेदन जिल्हाधिकारी दिले आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाकडे सरकार आणि प्रशासनाचे अक्षरश दुर्लक्ष झाले आहे.

     

    राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या चिंचोली येथील महादेव लोंढे यांनी कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. या कुटुंबाकडे सादर राशन कार्डही नव्हतं. राशन कार्ड काढण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्राची पूर्तता त्यांच्या कुटुंबांनी केली. मात्र तरीही कार्ड मिळवण्यासाठी त्यांनी मोठी पायापिट केली. तरीही त्यांना कार्ड मिळालं नव्हतं. त्यांनी बीआरएसचे नेते भूषण फुसे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली. फुसे यांनी पाठपुरावा करून त्यांना राशन कार्ड मिळवून दिल.

     

    जिल्ह्यात मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे, यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतातील पीक हातात न आल्याने बँकेच्या व इतर सावकारांच्या कर्जाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागत आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर त्यांचा परिवार उघड्यावर पडला आहे. तालुकास्तरावरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आवश्यक मदत पुरविण्यात दिरंगाई करण्यात येत आहे. दप्तर दिरंगाईमुळे यांची कागदपत्रे पुढे पाठविली जात नाही. यामुळे त्या परिवाराला असंख्य हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.

     

    दरम्यान शेतकऱ्यानी आत्महत्या केल्यानंतर त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब निराधार होते. त्यामुळे निराधार योजना आणि इतर उपजीविकेच्या व मदतीच्या योजना तत्काळ राबवायला पाहिजे. जिल्ह्यात कुठेही शेतकरी आत्महत्या प्रकरण घडले, त्याची त्वरित चौकशी करून त्या कुटुंबाला तत्काळ शासकीय मदत पुरवावी. त्यावर असलेले कर्ज व त्याची कारवाई करावी आणि त्या कुटुंबाला शासकीय योजनांचा लाभ त्वरित देण्यात यावा, अशी मागणी फुसे यांनी यावेळी केली.

  • आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    News34 chandrapur

    मुल – मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु कापणी होऊन चार – पाच दिवस झाले आहेत.

     

    तसेच अनेक शेतकऱ्यांची कापणी अजूनही सुरू आहे. असे असताना आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता आकस्मिक पाऊस आल्याने मुल चीमढा, बोरचांदली, राजगड, फिस्कुटी, विरई, खेडी, टेकाडी, गडीसुर्ला, जूनासूर्ला, नवेगाव (भू) बेंबाळ, नांदगाव, भेजगावं,हळदी, चीचाला, टाडाळा, जा,चीरोली, कांतापेठ, मारोडा, भादूर्णी, राजोली, चिखली, डोंगरगाव, यांचेसह मुल व सावली तालुक्यातील अनेक गावातील कापलेले धानाच्या सरड्या पूर्ण ओल्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न पाऊसामुळे खराब झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

     

    मुल- सावली तालुक्यातील काही शेतकरी मजुरांच्या हाताने धानाची कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी खर्चाचा बजेट लक्षात घेता हार्वेस्टर मशीन लाऊन धान कापणी व चुरणी एकसाथ केली असून शेकडो क्विनटल धान वाळत ठेवले असून पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आकस्मिक येत असलेल्या पाऊसामुळे एकही पोता धान घरी आणते की काय ? असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला असून गेल्या दोन वर्षापूरवी अशीच परिस्थिती आली होती. त्यावेळेला महावीकास आघाडीचे शासन असताना कृषी मंत्री श्री. दादा भुसे, आमदार तथा पालक मंत्री श्री. विजय वडेट्टीवार, सी.डी.सी.सी. बँकेचे अध्यक्ष संतोष शिंह रावत, चंद्रपूर जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी प्रत्यक्ष मुल – सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली होती. तेव्हा शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट पसरले होते तशीच परिस्थिती यावषी सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधव हैराण झाले आहेत.

     

    दरवर्षीच काही ना काही संकट शेतकऱ्यांवर येतच असतात. यावर्षी सुरवातीलाच धांनाला २८०० रुपये पर्यंतचा भाव मिळत आहे. परंतु आता आलेल्या पाण्यामुळे धानाची पोत ओली झाली तर मात्र कोणताही व्यापारी ओले झालेले धान घेणार नाही. कारण तांदूळ लाल होतात. म्हणजे आजच्या स्थितीत शेतकऱ्यांची स्थिती हाती उत्पन्न येऊनही कपाळावर हात ठेऊन रडत बसण्याची पाळी शेतकरी बांधवावर येऊन पडली आहे. हीच परिस्थिती कापूस लावलेल्या शेतकऱ्यांची आहे.

     

    कापसाचे बोंड वेचण्यााठी आली असताना अचानक आकस्मिक पाऊसाने कापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे. अशा प्रसंगी शासनाने, मा. पालक मंत्र्याने, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्काळ मुल सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर येऊन पाहणी करावी व शासनाकडे तसा अहवाल त्वरित सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी चालू वर्षाचा खरीप पिकाचे विमा काढला असून शासनानेच विमा कंपनीला तसे आदेश देऊन शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करायला लावावी आणि शेतकरी बांधवांना त्वरित नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मुल – सावली तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे.

  • वर्ष 2018 नंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

    वर्ष 2018 नंतर पुन्हा रेल्वेच्या धडकेत वाघाच्या बछड्याचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चांदा फोर्ट गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ रेल्वेच्या धडकेत एका पट्टेदार वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

     

    चंद्रपूर गोंदिया मार्गावरील नागभीड तालुक्यातील किटाळी मेंढा गावाजवळ आज सोमवारी सकाळी रेल्वे लाईनवर कामगार काम करण्यासाठी गेले असता त्यांना रेल्वे रुळाच्या बाजूला पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती जवळील गावातील नागरिकांना होताच नागरिकांनी बघण्यासाठी एकच गर्दी केली. कामगारांनी सदर घटनेची माहिती नागभीड वनविभागाला दिली.

     

    वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होवून मृतदेह ताब्यात घेतला आहे. प्राथमिक पाहणीत रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रेल्वे मार्ग ओलांडताना त्याला धडक लागली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे. रेल्वेच्या धडकेत वन्यप्राणी मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. वन्पाण्यांचे जीव वाचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्या अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.

    याआधी सुद्धा घडल्या घटना

    15 नोव्हेंबर 2018 ला बल्लारपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत 3 वाघांच्या बछड्यांचा मृत्यू झाला होता, या घटनेनंतर वनविभागाने रेल्वे प्रशासनाला जंगल परिसरातून रेल्वेचा वेग कमी करण्यास सांगितले होते, मात्र ऑक्टोबर 2019 मध्ये पुन्हा बल्लारपूर-गोंदिया रेल्वेच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता.

     

    27 नोव्हेम्बरला उघडकीस आलेली घटना कशी घडली?

    1 डिसेंबर ला दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गोंदिया-चांदा फोर्ट रेल्वे मार्गाचा दौरा करणार आहे, या संदर्भात आढावा घेण्यासाठी DRRM नमिता त्रिपाठी यांचा सोमवारी दौरा होता, त्रिपाठी यांना घेण्यासाठी गोंदियावरून पहाटे चांदा फोर्ट साठी स्पेशल गाडी निघाली होती, या विशेष रेल्वेने पहाटे 3 वाजताच्या सुमारास किटाळी-मेंढा जवळ वाघाच्या बछड्याला धडक दिली. या धडकेत बछड्याचा जागीच मृत्यू झाला.

     

  • चंद्रपुरातील दुर्लभ रक्तगटदात्याची गडचिरोली जिल्ह्यात धाव आणि…

    चंद्रपुरातील दुर्लभ रक्तगटदात्याची गडचिरोली जिल्ह्यात धाव आणि…

    News34 chandrapur

    चंद्रपूर – रक्तदान म्हणजे महादान, या दानाने अनेक नागरिकांचा जीव वाचविण्यात येतो, असेच एक महान कार्य चंद्रपुरातील रक्तमित्र रिंकू कुमरे यांच्या माध्यमातून झाले आहे.

     

    गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात राहणारी गर्भवती 30 वर्षीय सौ. नविता दुर्गे यांना डिलिव्हरी च्या वेळी रक्ताची गरज भासली मात्र त्यांचा रक्तगट दुर्लभ AB negative असल्याने वेळेवर कुठे मिळाला नाही.

    एकाचवेळी 2 जीवांचा प्रश्न डॉक्टरांच्या समक्ष उभा होता, आता पुढे काय करायचं असा विचार सर्वांच्या मनात आला, ही बाब चंद्रपुरातील रक्तमित्र रिंकू कुमरे यांच्या कानी आली, त्यांनी तात्काळ दुर्लभ AB निगेटिव्ह रक्त गट असलेल्या पडोली येथील विपीन कोंगरे यांच्याशी संपर्क साधला, रिंकू यांनी तात्काळ विपीन ला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले, आणि रक्तदान करीत विपीन यांनी दोघांचा जीव वाचविला.

     

    रिंकू कुमरे व विपीन कोंगरे यांच्या संवेदनशिलपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • चंद्रपूर मनपात भारतीय संविधान दिन साजरा

    चंद्रपूर मनपात भारतीय संविधान दिन साजरा

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेत २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला,याप्रसंगी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर व डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

     

    २६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे, २६ नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली.

     

    राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.

     

    याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त मंगेश खवले, उपअभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,सचिन माकोडे, विधी अधिकारी अनिलकुमार घुले,अनिल बाकरवाले, डॉ.अमोल शेळके,संतोष गर्गेलवार,प्रगती भुरे, सारिका शिरभाते,वैष्णवी रिठे,सारंग निर्मळे,विजय भुरकुंडे, विकास दानव, प्रदीप पाटील,नरेंद्र जनबंधू, गुरुदास नवले तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

  • अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

    अल्ट्राटेक-माणिकगड सिमेंट कंपनीची ग्रामीण भागात आरोग्यक्रांती सुरू

    News34 chandrapur

    कोरपना – 23-24 नोव्हेंबर 2023 रोजी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड , युनिट – माणिकगढ सिमेंट वर्क्स तर्फे नंदाप्पा आणि मरकागोंडी ग्रामपंचायत मधील नंदाप्पा, मरकागोंडी, माताडी आणि गोंडगुडा गावात मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 270 पुरुष, महिला आणि लहान मुलांची तपासणी करीत त्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते.

     

    विविध आरोग्य विकार तपासले गेले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माणिकगड तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माणिकगड युनिट हॉस्पिटलच्या प्रभारी डॉ.सौ.रुपाली यादव व त्यांच्या संघाने शिबीर यशस्वी केले. यासोबतच चंद्रपूर येथील टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील डॉ. सूरज, डॉ. ट्विंकल आणि त्यांच्या संपूर्ण संघाने कर्करोग, रक्तदाब आदी आजारांवर निदान केले.

     

    रोगांचे निदान करून ग्रामस्थांना सल्ला देण्यात आला. शिबिरादरम्यान सर्व ग्रामस्थांची विविध प्रकारे चाचणी करण्यात आली तसेच गरोदर महिलांचीही तपासणी करून त्यांना योग्य ते समुपदेशनही करण्यात आले. विविध सहाय्यक कर्मचारी आणि माणिकगढच्या डॉक्टरांच्या पथकाद्वारे तपासणी केल्यानंतर औषधांचे मोफत वाटप करण्यात आले आणि पुढील उपचार आवश्यक असलेल्या आजारांसाठी रुग्णांना योग्य सल्लाही देण्यात आला.

     

     

    या मोफत वैद्यकीय शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. डॉ.रुपाली यादव यांनीही महिलांमध्ये निरोगी शरीर आणि पौष्टिक आहाराचे महत्त्व याविषयी ग्रामस्थांचे ज्ञान वाढवले. या कार्यक्रमात पंचायतीचे नागरिक, आघाडीच्या कार्यकरत्यांनी सहभाग घेतला तरया शिबिराला यशस्वी करण्याकरिता माणिकगड सी. एस.आर. च्या संघाने अथक प्रयास केलेत.

  • चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी भूमिपुत्र करणार धरणे आंदोलन

    चंद्रपूर शहरातील प्रलंबित बायपाससाठी भूमिपुत्र करणार धरणे आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेने केली आहे.

     

    या मागणीला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र संघटनेने १ डिसेंबर २०२३ रोजी जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ ते ३ एकदिवशीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे करणार आहेत.

     

    काँग्रेस नेते व भूमिपुत्र संघटनेचे संयोजक दिनेश दादापाटील चोखारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चंद्रपूर शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग जातो. या महामार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. यामुळे शहराच्या मध्यभागी वाहतूक कोंडी होत असते. या कोंडीमुळे वाहनचालकांना अनेक तास थांबावे लागतात. यामुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे.

     

    चंद्रपूर शहराच्या बाहेरून बायपास काढण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. परंतु, अद्यापही या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. बायपास रस्ता झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही. तसेच, शहराची वाहतूक व्यवस्था सुव्यवस्थित होईल.

     

    या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री शिंदे यांनी चंद्रपूर शहराच्या बायपास प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासंदर्भात आवश्यक निर्देश द्यावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
    चंद्रपूर शहरातील वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी झाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होईल.

  • चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात भीषण अपघात

    News34 chandrapur

    चंद्रपूर – शहरातील अति वर्दळीचा भाग व अपघात प्रवण स्थळ वरोरा नाका चौकात आज मोठी दुर्घटना घडली, या घटनेत ट्रक ने तब्बल 4 वाहनांना चक्काचुर केल्याची माहिती आहे.

    ट्रायस्टार हॉटेल ते वरोरा नाका चौकात अतिक्रमण झपाट्याने वाढत आहे, या मार्गावर होणाऱ्या अपघाताला हे अतिक्रमण सुद्धा कारणीभूत ठरले आहे.

     

    25 नोव्हेम्बरला शहरातील वरोरा नाका चौकातून ट्रक क्रमांक Mh04 DK 6344 हा मूल रोडच्या दिशेने निघाला मात्र बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावरून जाताना अचानक ट्रक चा रिव्हर्स गियर लागल्याने ट्रक अतिवेगात मागच्या बाजूने यायला लागला, मागे असलेल्या चारचाकी वाहन व दुचाकीला धडक देत तब्बल 100 मीटर अंतर ट्रक मागच्या दिशेने गेला, यामध्ये 3 चारचाकी वाहन व 1 दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वाहनात कुणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

     

    ट्रक चालकाने समयसूचकता दाखवीत ट्रक मागच्या बाजूने सरळ नेला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

    मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत आहे, याला जबाबदार काही वाहतुकीचे नियम मोडणारे बेजबाबदार नागरिक तर मोठ्या प्रमाणात वाढत असलेले अतिक्रमण आहे.

  • मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

    मूल शहरात पहिले राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे आयोजन

    News34 chandrapur

    मूल – साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून प्रसिद्ध झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्या विद्यमाने ३ डिसेंबर२०२३ ला बालविकास प्राथमिक शाळा मूल येथे पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे.

     

    या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची सावित्री ज्योतीची सावली , बालकाव्य कुंज व क्रांतीपर्व अशी ग्रंथसंपदा असून अनेक लेख व वैचारिक स्फुटलेखन प्रसिध्द आहेत . त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल २००६ ला भाग्यश्री महिला नागरी पतसंस्था यांचा पुरस्कार, २००८ ला अखिल भारतीय सदधर्मसेवा संघ अमरावतीचा मानवता पुरस्कार २०१० ला आदिवासी विकास मंडळाचा समाजसेवा पुरस्कार, २०१८ ला नगर परिषद मूल तर्फे पुरस्कार २०१९ ला योग समितीच्या वतीने जाहीर सत्कार २०१९ ला नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणेचा राज्यस्तरीय काव्यगौरव पुरस्कार, २०२० ला राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचा रा. ज. बोढेकर साहित्य लेखन पुरस्कार यांसारख्या अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले आहे.

     

    साहित्य क्षेत्रातील करण्याबरोबरच ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांचे सामाजिक कार्य अपूर्व आहे . २००२ पासून त्या बालसंस्कार केंद्र चालवतात . ग्रामगीतेच्या प्रचारासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ स्थापन केले. १९९६ पासून निशुल्क वाचनालय , योग प्राणायम वर्ग व शिबिरे चालवतात . शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःचे घर वसतिगृह म्हणून खुले करून दिले . व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अहोरात्र कार्य करतात.

     

    पहिले राज्यस्तरीय महिला झाडीबोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक शशिकलाताई गावतुरे यांची निवड झाल्याबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर, झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूरचे अध्यक्ष अरुण झगडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, सचिव लक्ष्मण खोब्रागडे, मूल शाखेचे अध्यक्ष सुखदेव चौथाले, वृंदा पगडपल्लीवार, सुनील बावणे, प्रभा चौथाले, नागेंद्र नेवारे, वर्षा भांडारवार, गणेश मांडवकर, विजय लाडेकर, नामदेव पीजदूरकर, परमानंद जेंगठे, पंडित लोंढे, प्रशांत भंडारे, रामकृष्ण चनकापुरे, सुनील पोटे, सुरेश डांगे, संतोष मेश्राम, मंगला गोंगले यांनी सभेचे आयोजन करून अभिनंदनाचा ठराव घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.