Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेचे 30 नोव्हेम्बरला आयोजन

    मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषदेचे 30 नोव्हेम्बरला आयोजन

    News34 chandrapur

    मुंबई – अप्रतिम मीडिया फाउंडेशन’च्या वतीने ‘पहिली महाराष्ट्र शाश्वत विकास ध्येय परिषद’ येत्या गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न होत आहे.

    आगामी १० वर्षांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण व शहरी पत्रकारांच्या माध्यमातून राबवायच्या ‘अप्रतिम महावक्ता – पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज – २०३२ शाश्वत विकास देण्याच्या दिशेने’ या भव्य कार्यक्रम मालिकेची माहिती दिली जाणार आहे.

     

    या परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून त्यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्था व सेवाभावी व्यक्तींचा अप्रतिम गौरव देऊन सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड, राजेश क्षीरसागर कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ; खासदार हेमंत पाटील,आमदार श्री संजय शिरसाट प्रवक्ते शिवसेना, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार यामिनी जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

     

    सकाळी उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवतजी कराड, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर, श्री अतुल सावे इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण मंत्री श्री संदिपान भुमरे रोहयो मंत्री, श्री विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधानसभा श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधानपरिषद, मुख्य सचिव श्री मनोज सौनिक, अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी नेते; सर्वश्री आमदार रोहित पवार,आशिष जयस्वाल,सत्यजित तांबे, प्रशांत बंब; मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, श्री. विनय सहस्रबुद्धे माजी खासदार आधी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

     

    या परिषदेमध्ये खालील प्रमाणे तीन चर्चासत्रे होणार आहेत. पहिले सत्र – शासकीय योजना लोकसहभाग आणि एस डी जी सिद्धी(सहभाग : श्री प्रवीण परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र, श्री सौरभ विजय प्रधान सचिव नियोजन विभाग, राज्य शासन, श्री राधेश्याम मोपलवार उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक एम एस आर डी सी, जे इ चौधरी अप्पर संचालक सांख्यिकी व नियोजन विभाग; डॉ. विजय आहेर, संचालक सांख्यिकी विभाग.

     

    दुसरे सत्र – एस डी जी साठी स्थानिक स्वराज्य संस्था नागरिक संघटनांची भूमिका उदाहरण छत्रपती संभाजीनगर (सहभाग : डॉक्टर भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री संदिपान भुमरे, पालकमंत्री, छत्रपती संभाजी नगर, श्री अतुल सावे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विधान परिषद, खासदार इम्तियाज जलील, आमदार संजय शिरसाट, प्रवक्ते शिवसेना, श्री मुकुंद भोगले, अध्यक्ष संभाजीनगर फर्स्ट, आमदार प्रदीप जयस्वाल श्री विवेक देशपांडे उद्योजक, श्री बी एस खोसे संस्थापक, अध्यक्ष मराठवाडा एन्व्हायरमेंटल क्लस्टर, आस्तिक कुमार पांडे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, श्री रणजीत कक्कड माजी अध्यक्ष संभाजीनगर फर्स्ट), विकास नवाळे, मुख्याधिकारी, एरंडोल नगर परिषद जिल्हा जळगाव; आणि तिसरे सत्र – शाश्वत विकास ध्येयांसाठी विकास पत्रकारितेचे महत्त्व : स्थानिक वार्ताहर व विशेष तज्ञ पत्रकारांचे योगदान(श्री विनायक पात्रुडकर, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, श्री अनिरुद्ध अष्टपुत्रे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी, श्री प्रमोद डोईफोडे, अध्यक्ष मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ; वसंत भोसले, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ; श्री अभय देशपांडे, राजकीय विश्लेषक, श्री एस एम देशमुख किरण नाईक राजा आदाटे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती; संदीप काळे संस्थापक अध्यक्ष व्हाईस ऑफ मेडिया; कुमार कदम, ज्येष्ठ पत्रकार; यमाजी मालकर संपादक, थिंक पॉझिटिव्ह; यदु जोशी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधीस्वीकृती समिती; डॉ.माधव सावरगावे, साम टीव्ही मराठवाडा प्रतिनिधी; बालाजी सूर्यवंशी विभागीय अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद) यांचा विशेष सहभाग असणार आहे.

  • बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखेतर्फे विवेक जॉन्सन यांचं अभिनंदन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बाल विकास विभाग सीसीडीटी आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा बालस्नेही पुरस्कार 2023 चे मानकरी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना मुंबई येथील भव्य अशा कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

     

    महाराष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास व बालहक्क संरक्षण तसेच त्यांची सुरक्षा, आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण विषयावर अनेक प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था सकारात्मक पद्धतीने मुलाचे कार्य पार पाडत आहेत.

     

    हे काम यशस्वीरित्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. यन्दा पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विवेक जॉन्सन यांची उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.

    त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर शाखा च्या वतीने डॉ अभिलाषा गावतुरे, डॉ वैंकट पंगा तसेच डॉ सीमा शर्मा, डॉक्टर अश्विनी भारत, डॉ सरताज शेख, डॉ देवेंद्र लाडे यांनी स्मृतिचिन्ह देऊन विवेक जॉन्सन यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. बालरोग तज्ञ संघटना चंद्रपूर नेहमीच आपल्या चांगल्या कामात आपल्या सोबत राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही सुद्धा डॉ गावतुरे यानीं यावेळी दिली.

  • वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

    वरोरा – चिमूर रस्त्याचे काम पूर्ण करून विकासाची साडेसाती दूर करा – आमदार प्रतिभा धानोरकर

    News34 chandrapur

    चंद्रपूर : जिल्ह्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात चंद्रपूर जिल्हा यावा असे स्वप्न होते. मात्र, याच विकासाला मागील साडेसहा वर्षांपासून साडेसाती लागली आहे. वरोरा – चिमूर रस्ता अर्धवट असल्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून विकासाला ब्रेक लागला आहे. त्यामुळे तात्काळ या मार्गाचे काम पूर्ण करण्याकरिता स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देऊन हा प्रश्न पूर्ण करण्याची विनंती आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

     

    वरोरा – चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ E मध्ये ४२.७५ किमीच्या २८४ करोड रुपयांच्या विकास कामाला दि. ४ मार्च २०१७ ला सुरवात झाली. हे काम ३ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.त्यानंतर सुधारित वाढीव मुदत देऊन ३० जून २०२३ करण्यात आली. सद्यस्थितीत संबंधित विभागाकडे चौकशी केली असता हे काम ९० टक्के पूर्णत्वास असून येत्या ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

     

    मात्र अजूनही ४-५ किमी चार पदरी रोडचे काम बाकी असून रोड साईड ड्रेनेज १ किमी, १ पाईप कल्व्हर्ट, २ मायनर ब्रिजेस, ८ निवारा शेड व पार्किंग, ४.५ किमी स्ट्रीटलाईट व हायमास्ट बाकी असून गत २-३ महिन्यात लहान मोठ्या अपघातात अनेकांनी जीव गमावले तर काहींना कायम अपंगत्व आले. या जीवघेण्या अपूर्ण कामास त्वरित पूर्णत्वास न नेल्यास ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिला आहे.

  • मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    मुंबई येथील कलावंतांचा संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम चंद्रपुरात मोठ्या उत्साहात संपन्न

    News34 chandrapur

    चंद्रपूर: ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष केल्यानंतर आपल्यामध्ये ऊर्जा संचारते. पण हा जयघोष केवळ एका सणापुरता मर्यादित नसून त्यामध्ये जात-पात-धर्म विरहित समाजाचे वर्णन आपल्याला बघायला मिळते. लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेतून घरातील गणेशपुजा सार्वजनिक स्वरुपात सुरू केली, त्या राष्ट्रभक्तीच्या भावनेनेही जात-पात-धर्माची बंधने मोडून काढली होती. आपणही याच भावनेतून हा उत्सव दरवर्षी साजरा करावा आणि याचे स्वरुप अधिक मोठे करावे, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याच पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

     

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी आयोजित गणेशोत्सव स्पर्धेचा पुरस्कार वितरण व संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम सोहळा क्लब ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आला. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, गुरूदेव सेवा मंडळाचे लक्ष्मणराव गमे, ब्रिजभूषण पाझारे, सुभाष कासनगोट्टुवार, काशी सिंग, समीर केने, प्रविण मोहुर्ले, नंदू रणदिवे, किशोर कापगते, प्रभाकर भोयर, चंदू आष्‍टनकर, चंदू मारगोनवार, सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू आदी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     

    पुरस्कार विजेत्या गणेश मंडळांचे त्यांनी अभिनंदन केले. याशिवाय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजन स्पर्धेतील विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमात ‘बेबस’ चित्रपटाच्या जाहिरात फलकाचे अनावरणही ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. गणराज रंगी नाचतो’ या मुंबई येथील ५० कलावंतांच्‍या भव्‍य संगीतमय सांस्‍कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून गेल्यावर्षी मी पहिल्यांदा गणेश उत्सवाची राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली. यावर्षीही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर, मुल, बल्‍लारपूर इथे भाजपच्या वतीने हे आयोजन करण्याचे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव हा आनंदाचा सण आहे. या सणाला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अनमोल भाव बघायला मिळतात. एक सूर, एक गीत प्रत्येकाच्या ओठांवर असते. त्यावेळी जात-पात-धर्म बघितला जात नाही. चंद्रपूरमध्ये याच भावनेतून हा उत्सव साजरा होत असतो. इथे गणेशोत्सव साजरा होतो तेव्हा सगळ्या धर्मांचे लोक सहभागी होतात, याचा मला अभिमान आहे.’ चंद्रपूरचा नागरिक म्हणून देशासाठी आपण या जिल्ह्याचे योगदान देऊ शकलो, याचा अभिमान असल्याचेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    ‘भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाकिस्तानच्या दिशेने तलवार घेऊन उभा असलेल्या पुतळ्याचे अनावरण करण्याचे भाग्य मला लाभले. त्या क्षणाला माझे उर अभिमानाने भरून आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांसाठी लंडनमध्ये जाऊन करार केला तेव्हा चंद्रपूरचा आवाज जगात गौरवाने पोहोचविल्याचा अभिमान वाटला. आता २२ जानेवारीला देशगौरव, युगपुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराची पुजा करतील तेव्हा त्या मंदिराच्या प्रत्येक दाराचे लाकूड चंद्रपूरचे असेल, याचा प्रत्येक चंद्रपूरकराला अभिमान वाटेल. एवढेच नव्हे तर लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात प्रवेश करताना देशातील प्रत्येक खासदाराला चंद्रपूरच्या लाकडाने तयार झालेल्या मंदिरातून जावे लागेल, ही बाब देखील तेवढीच अभिमानाची आहे,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

     

    राक्षसीवृत्तीचा विरोध

    ‘५ नोव्हेंबर २०२२ ला माझ्याकडे एक फाईल आली. त्यामध्ये अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण सुरू आहे आणि त्याठिकाणी अतिक्रमण झाले आहे, असे नमूद होते. दोन हजार पोलिसांच्या सुरक्षेत महाशिवप्रताप दिनाला हे अतिक्रमण आम्ही हटवले. हा धर्माचा विरोध नव्हता तर विचारांचा, राक्षसीवृत्तीचा विरोध होता. कारण भारताचा जवान अब्दूल हमीद, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांना आम्ही कधीही धर्माच्या नजरेतून बघितले नाही. आम्ही कबरीचे अतिक्रमण हटवले. आम्ही अफजलखानाचा विरोध करतो म्हणजे धर्माचा विरोध करतो असे नाही,’ असे ना. श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले.

     

    रत्नजडित छत्र, पालखी अन् पुतळा

     

    ‘राज्याभिषेक होण्यापूर्वी प्रतापगडच्या भवानी मातेच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथे त्यांनी एक रत्नजडीत छत्र भवानी मातेला चढवले. नंतर त्याची लूट झाली. पण पुन्हा चांदीचे छत्र बसविण्याचे भाग्य आपल्याला लाभले. महाराजांच्या राज्याभिषेकाची शोभायात्रा निघते तेव्हा पालखीही निघते. ही पालखी सुद्धा जीर्ण झाली होती. ती आपण चंद्रपूरच्या वतीने साठ किलो चांदीची पालखी दिली. पुढील दोनशे वर्षे राज्याभिषेकाची शोभायात्रा त्याच पालखीतूनच निघणार आहे याचा अभिमान आहे,’ असे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. पोंभूर्णा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले आणि महाराणा प्रताप यांच्या वंशजांना आमंत्रित केले जाणार आहे, अशी माहितीही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचा प्रयोगही चंद्रपुरात होणार असल्याचे ते म्हणाले.

     

    क्रीडा स्पर्धा आणि कृषी प्रदर्शन

    २७ डिसेंबरला ५ वाजता विसापूरच्या स्टेडियमवर पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा होत आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यावेळी उपस्थित राहणार आहेत. २८ राज्य आणि ८ केंद्र शासित प्रदेशातील ३ हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.

     

    या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम चंद्रपूरकरांनी करावे, असे आवाहन ना. श्री. मुनगंटीवार यांनी केले. त्याचवेळी ३ ते ७ जानेवारी या कालावधीत चांदा क्लब ग्राउंडवर विदर्भातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन, पशू व मत्स्यसंवर्धन प्रदर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. चंद्रपूरमधील पुरातन मंदिरांसाठी निधी देण्याची घोषणा आपण अलीकडेच केल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूरमध्ये आकाराला येत असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन, मोरवा येथे तयार सुरू होत असलेला फ्लाईंग क्लब याचाही ना. श्री. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

  • राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

    राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

    News34 chandrapur

    चंद्रपूर – मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात कार्य करणारे चंद्रपूर महानगर अध्यक्ष राजीव कक्कड यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटात नुकतेच सामील झालेले राजीव कक्कड हे अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रियपणे काम करीत आहे.

     

    शहरातील विविध समस्यांना वाचा फोडत ते शासन दरबारी मांडण्याचे काम कक्कड यांनी केले आहे, जिल्हा असो की शहरातील विविध नियोजनात्मक कामाचा त्यांना चांगला अनुभव असून आता ते जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाची धुरा सांभाळणार आहे.

     

    राजीव कक्कड यांच्या नियुक्तीमुळे मित्र परिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करीत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

  • विदर्भात उच्चशिक्षणाचा होणार जागर, चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणयात्रेचा शुभारंभ

    विदर्भात उच्चशिक्षणाचा होणार जागर, चंद्रपूर जिल्ह्यातून शिक्षणयात्रेचा शुभारंभ

    News34 chandrapur

    चंद्रपूर : आदिवासीबहुल व मागास समजला जाणाऱ्या चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात देश-विदेशातील नामांकित विद्यापिठे, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती तसेच फेलोशीप याबाबत पुरेसी माहीती नाही. दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी पुरेसे मार्गदर्शन मिळावे, या हेतूने चंद्रपूर जिल्ह्यातून विदर्भात उच्चशिक्षणाचा जागर करणारी शिक्षणयात्रा सुरु केली आहे.

     

    शिक्षण विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर, जागृत बहुद्देशीय संस्था व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ब्रिटीश सरकारची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती प्राप्त तरुण वकिल, नुकतेच ब्रिटीश सरकारने चेव्हनिंग गोल्ड पुरस्काराने सन्मानित केलेले ॲड.दीपक चटप यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या शिक्षणयात्रेची सुरुवात नुकतीच संविधान दिनी जिल्हा परिषद चंद्रपूर येथून मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या उपस्थितीतीत करण्यात आली. यावेळी समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, महिला व बालविकास अधिकारी संग्राम शिंदे, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या शिक्षण यात्रेचे समन्वयक म्हणून मुख्यमंत्री फेलो राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोईनकर हे भूमिका पार पाडत आहे.

     

    लंडनमध्ये कायद्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशात अनेक संधी दीपकला उपलब्ध झाल्या आहेत. या संधीतून वैयक्तिक आर्थिक संपन्नता येईल मात्र शिक्षणाचा उपयोग तळागाळातील घटकांना व्हावा म्हणून त्यांनी विधी, शिक्षण व धोरणनिर्मिती क्षेत्रात रचनात्मक काम करण्याचे ठरविले आहे.

     

    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तयार करण्याचा संकल्प या यात्रेतून असल्याचे मत समन्वयक अविनाश पोईनकर यांनी व्यक्त केले. २६ नोव्हेंबर २०२३ संविधान दिन ते २६ जानेवारी २०२४ गणतंत्र दिन या दोन महिन्याच्या काळात चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळसह विदर्भातील १२ वी पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहोचून देश-विदेशात पदव्युत्तर शिक्षणातील संधी, शिष्यवृत्ती, फेलोशीप बाबतची माहिती आणि आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ‘शिक्षण यात्रा : एज्युकेशन टू इम्पावरमेंट’ या कृतीयुक्त कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाबाबत देश विदेशात उपलब्ध शिष्यवृत्ती, कोर्सेस, प्रवेश प्रक्रिया, आवश्यक क्षमता व कौशल्ये आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

     

    या शिक्षणयात्रेतून येणाऱ्या काळात महाविद्यालयीन विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी सज्ज होतील व शैक्षणिक चळवळ तयार होईल, असे मत प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी व्यक्त केले. सुमती फाऊंडेशन, जागृत संस्था यांचे विशेष सहकार्य या यात्रेला लाभले आहे. त्यासोबतच पाथ फाऊंडेशन, पाॅलीलाॅ नेटवर्क फाऊंडेशन, सत्यशोधक कलेक्टीव, संकल्प फाऊंडेशन, युवाशक्ती फाऊंडेशन या सामाजिक संस्थांच्या विशेष सहकार्याने शिक्षणयात्रेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे येणाऱ्या काळात उच्चशिक्षणाची चळवळ चंद्रपूर-गडचिरोलीसह विदर्भातील विद्यार्थी-युवकात निर्माण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

     

    मी लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेवून नुकताच भारतात परतलो आहे. विदर्भातील विद्यार्थी क्षमतावान आहे. मात्र माहितीचा अभाव, पुरेसे मार्गदर्शन न मिळणे, आर्थिक अडचणी आणि शिक्षणाबाबतची निरुत्साहता विद्यार्थ्यांत वाढताना दिसते. शिक्षण संधीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी हा कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेणे मला महत्वाचे वाटले.

    – ॲड.दीपक चटप
    आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर, यु.के

  • विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा – सहसचिव आनंद पाटील

    विकसीत भारत संकल्प यात्रे’च्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहचा – सहसचिव आनंद पाटील

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात 23 नोव्हेंबर 2023 पासून ‘विकसीत भारत संकल्प यात्रेचा’ शुभारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायतीमध्ये सदर यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. ज्यांना आतापर्यंत शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने प्रत्येक यंत्रणेने यात गांभिर्याने काम करावे, अशा सुचना केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाचे सहसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे चंद्रपूर जिल्ह्याचे नोडल अधिकारी आनंद पाटील यांनी दिल्या. तत्पुर्वी विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान त्यांनी तीन गावांना भेटी दिल्या व गावक-यांशी संवाद साधला.

     

    जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकार विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपायुक्त चंदन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

     

    या यात्रेच्या माध्यमातून विविध विभागांनी स्वत:हून लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, असे सांगून सहसचिव आनंद पाटील म्हणाले, आपल्यापर्यंत लाभार्थी येण्याची वाट पाहू नका. जिल्ह्यात ज्या ठिकाणी या यात्रेचा चित्ररथ जाईल, तेथे संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी भेटी द्याव्यात. प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर योजनेचा लाभ मिळालेल्या किमान तीन लाभार्थ्यांचे मनोगत घ्यावे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा यात समावेश करावा तसेच योजनेचे व्हीडीओ क्लिप करून ते यात्रेदरम्यान दाखवावे. यात्रा सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात किती लाभार्थी होते, आणि उपक्रम झाल्यानंतर किती लाभार्थ्यांना लाभ दिला, त्याचीही आकडेवारी आतापासून गोळा करा.

     

    पुढे ते म्हणाले, केंद्र सरकारकडून विकसीत भारत संकल्प यात्रा हा महत्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात 17 महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्यात येत आहे. ज्यांना आतापर्यंत कोणत्याच योजनांचा लाभ मिळाला नाही, अशा नागरिकांपर्यंत पोहचण्याचा हा प्रयत्न आहे.

     

    सदर योजनेत काय – काय लाभ मिळू शकतात, कोण लाभार्थी होऊ शकतात, यासदंर्भात एकत्रित माहिती देण्यात येत असून केंद्र सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात 7 ते 10 चित्ररथ पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात पी.एम. विश्वकर्मा योजनेचे उद्दिष्ट ठरवावे. गावस्तरावरील लोकांना बँकांच्या विविध योजनांची माहिती तसेच बँकेच्या व्यवहाराबाबत माहिती द्यावी, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

     

    यावेळी सादरीकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्ह्यात 825 ग्रामपंचायती असून 1836 गावे आहेत. विकसीत भारत संकल्प यात्रेच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता नोडल अधिका-यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावर त्याचा नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे श्री. गौडा यांनी सांगितले.

     

    सहसचिवांच्या तीन गावांना भेटी : विकसीत भारत संकल्प यात्रेचे नियोजन, गावागावात होणारी अंमलबजावणी पाहण्यासाठी सहसचिव आनंद पाटील यांनी टेमुर्डा (ता. वरोरा), नंदोरी (ता. भद्रावती) आणि सोनेगाव (ता. चंद्रपूर) या तीन गावांना भेटी देऊन गावक-यांशी संवाद साधला.

     

    यात्रेत समाविष्ट असलेल्या योजना : पी.एम. स्वनिधी योजना, पी.एम. विश्वकर्मा, पी.एम. उज्वला, पी.एम. मुद्रा लोन, स्टार्टअप इंडिया – स्टँड अप इंडिया, आयुष्मान भारत, पी.एम. आवास (शहरी), स्वच्छ भारत अभियान (शहरी), पी.एम. ई-बस सेवा, अमृत योजना, पी.एम. जनऔषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर योजना, खेलो इंडिया, आर.सी.एस. उडाण आणि वंदे भारत ट्रेन्स व अमृत भारत स्टेशन स्कीम.

  • चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

    चंद्रपूर शहरातील अपघाताला कारणीभूत अतिक्रमण हटणार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील बेलगाम वाहतूक व वाढत असलेल्या अतिक्रमनावर चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेने आता कंबर कसली आहे, शहरातील ट्रायस्टार हॉटेल चौक ते वरोरा नाका चौकातील अतिक्रमण धारकांना नोटीस दिल्या असून येत्या काही दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

     

    मागील काही महिन्यांपासून चंद्रपूर शहरात अपघातांची संख्या वाढत असून आतापर्यंत अनेकांनी अपघातात जीव गमावला आहे, सतत वाढणारे अपघाताबाबत News34 ने बातमी प्रकाशित केली होती, त्या बातमीची दखल घेत वाहतूक नियंत्रण विभागाने अतिक्रमण हटविण्यासाठी पाऊल उचलले आहे.

     

    वाहतूक नियंत्रण शाखा, चंद्रपूर महानगरपालिका व उप प्रादेशिक परिवहन विभाग आता या वाढत असलेल्या अतिक्रमनावर संयुक्त रित्या कारवाई करणार आहे.

     

     

    चंद्रपूर वरोरा नाका चौक ते ट्रायस्टार हॉटेल मार्गावर शोरूम धारकांचे दुचाकी वाहन, फास्टफूड सेंटर, पार्किंग नसलेले जिम अश्या अनेक प्रतिष्ठान मुळे शहरात अपघात घडत आहे, त्यामुळे वाहतूक विभागाने अतिक्रमण करीत असलेल्या प्रतिष्ठानाला नोटीस बजावले आहे, अतिक्रमण काढा अन्यथा कारवाईला तयार रहा अश्या सूचना वाहतूक विभागाने दिल्या आहे.

  • कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

    कायद्याची बाजू घेणाऱ्या ठाणेदारावर ही कसली तक्रार?

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी/चंद्रपूर – जिल्ह्यात सध्या वाहतूक व्यवस्था बेलगाम झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे, त्यावर आता ट्रॅव्हल्स धारकांची मुजोरी कायम आहे, चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आम्ही कायद्याला न भिणारे अशी स्वतःची ओळख ट्रॅव्हल्स धारक निर्माण करीत आहे, बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्याचा प्रयत्न ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांनी केला असता उलट त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे.

     

    रविवारी गडचिरोलीवरून नागपूर कडे जाणारी ट्रॅव्हल्स MH49 AT 3625 ही रेल्वे फाटक बंद असल्याने थांबली होती, रेल्वे फाटक उघडले मात्र ट्रॅव्हल्स धारकाने वाहन एक साईड दाबल्याने इतर वाहनांना जाण्यासाठी मार्ग नव्हता, त्यामुळे रेल्वे फाटक येथे जाम झाला, तितक्यात ब्रह्मपुरी चे ठाणेदार सुधाकर अंभोरे हे आपल्या कुटुंबासहित ब्रह्मपुरी च्या दिशेने येत होते.

     

    अंभोरे यांना वाहतूक खोळंम्बली असल्याचे निदर्शनास आल्यावर ते वाहनाच्या खाली उतरले, त्यांनी तात्काळ ट्रॅव्हल्स चालकाला वाहन पुढे नेण्यास सांगितले मात्र चालकाने त्यांना अश्लील शब्दात शिवीगाळी केली, ठाणेदार अंभोरे हे साध्या गणवेशात होते, तरीसुद्धा त्यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र उलट मुजोर चालकाने त्यांना शिवीगाळ केली.

     

    ठाणेदार अंभोरे यांनी ट्रॅव्हल्स पुढे थांबविण्यास सांगितली मात्र चालक त्यांचं ऐकायला तयार नव्हता, अंभोरे यांनी वाहतूक पोलिसाला याबाबत सूचना केल्या, ट्रॅव्हल्स ख्रिस्तानंद चौकात थांबली, आणि ठाणेदारांनी चालकाला शिस्त घडवली.

     

    चौकात नेमकं काय घडलं? ठाणेदार अंभोरे काय म्हणाले?

    वाहतूक व्यवस्था खोळंम्बली होती, मी त्या चालकाला ट्रॅव्हल्स पुढे नेण्यास सांगितली मात्र मलाच त्याने उलट शिवीगाळी करणे सुरू केले, मी सामान्य नागरिक प्रमाणे त्याच्याशी बोललो मात्र त्याने शिवीगाळी देत उलट उत्तर दिले, मी पोलीस आहे हे त्यांना कळले नाही, पण सामान्य नागरिकांसोबत हे ट्रॅव्हल्स धारक असेच वागत असतील.

     

    मी त्यांचं वाहन पुढच्या चौकात थांबविले, तितक्यात वाहनातून खाली उतरताना चालकाला लागले, त्याला वाहतुकीच्या नियमाबद्दल सांगितले. मात्र तो मुजोरी करीत असल्याने त्याला खाकीचा दम दाखवीत कानशिलात लगावली असे प्रत्यक्षदर्शी ने सांगितले.

     

    कोण आहे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे?

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पदी असताना त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घातला होता, अनेक आव्हानात्मक गुन्ह्याचा त्यांनी छडा लावला, शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी असताना सुधाकर अंभोरे यांच्या शिस्तीची चर्चा चहूबाजूने होते, त्यांच्या हद्दीत गुन्हेगार गुन्हा करताना घाबरत होता.

     

    गुन्हा कुणी केला तर तो कोणत्या पक्षाचा? किंवा प्रतिष्ठित व्यक्ती नसून तो फक्त गुन्हेगार आहे, अशी कायद्याची बाजू नेहमीच अंभोरे घेत होते, कायद्यापुढे सर्व समान हे वक्तव्य ते नेहमी करायचे.

     

    ब्रह्मपुरी मध्ये घडलेला हा प्रसंग अनेकांनी त्यांची चूक दर्शविली मात्र विशेष बाब म्हणजे पोलीस जेव्हा फायबर लाठी ने मारतात तर ते कधी डोक्यावर मारत नाही, अनेकांनी अंभोरे यांनी चालकाला दांडूक्याने मारहाण केली असा उल्लेख बातमीमध्ये आला आहे, दांडू पोलीस विभागातून अनेक वर्षापूर्वी हद्दपार झाला, आता फायबर लाठी ने त्याची जागा घेतली आहे.

     

    अंभोरे हे वर्दीत नसतानाही आपलं कर्तव्य पार पाडत होते, जिथे चुकते तिथेचं कायदा खुपते, हेच या प्रकरणात घडलं आहे. ट्रॅव्हल्स चालकाने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिली आहे, आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध गुन्हेगारी नावापुरती उरली आहे, पोलीस निरीक्षक अंभोरे यांची उचलबांगडी लवकर व्हावी या हेतूने ही तक्रार केली अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार गाजविणार दिंडोरा बॅरेजचा मुद्दा

    हिवाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील महिला आमदार गाजविणार दिंडोरा बॅरेजचा मुद्दा

    News34 chandrapur

    चंद्रपूर : वरोरा विधानसभेतील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. येथील शेती ओलिताखाली आली पाहिजे. याकरिता या भागात दिंडोरा प्रकल्पाची सुरुवात केली होती. त्याकाळात या प्रकल्पाकरिता शेतजमिनी देखील अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. परंतु शासनाच्या लालफितीत हा प्रकल्प अडकला आहे. त्यामुळे तात्काळ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यास भाग पाडू असे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले आहे.

     

    वरोरा तालुक्यातील दिंडोरा प्रकल्पाकरिता 100 कोटी रुपयांची पुरक मागणी चंद्रपूर पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेली होती. यासंदर्भात दिवंगत खासदार बाळू धानोरकर व विद्यमान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सत्तातरानंतर हा प्रश्न थंड बस्त्यात पडला. परंतु या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून हा विषय मार्गी लावणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.

     

    चंद्रपूर जिल्हîाच्या वरोरा तालुक्यातील सोईट दिंडोरा या गावाजवळ 14193 हेक्टर सिंचन क्षमतेचा दिंडोरा बॅरेज या प्रकल्पासाठी स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी पत्र क्र. ३०४९/२०२२ दि- २९-११-२०२२ अन्वेय 100 कोटींची पुरक मागणी केली होती. तसेच पत्र क्र. ३१३५/२२ दि. १५-१२-२०२३ अन्वेय वरोरा, वाणी व हिंगणघाट येथील आमदारांसह उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठकीची मागणी केली होती. परंतु शेतजमीन अधिग्रहित करून देखील हा प्रकल्प पूर्ण न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याकरिता या अधिवेशनात हा प्रश्न लावून शासनाला करण्यास बाध्य करणार असल्याचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले.