Category: क्रीडा

क्रीडा (Sports) जगतातील प्रत्येक ब्रेकिंग न्यूज आणि सविस्तर अपडेट्स वाचा news34.in वर. क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, आणि स्थानिक स्तरावरील सर्व खेळांचे निकाल, सामन्यांचे विश्लेषण आणि खेळाडूंच्या मुलाखती येथे त्वरित उपलब्ध होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील महत्त्वाच्या घडामोडींचे कव्हरेज आम्ही देतो. क्रीडा बातम्या (Krida Batmya) आणि रोमांचक माहितीसाठी नियमितपणे भेट द्या.

  • ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प झाले हाऊसफुल्ल

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यात सर्वात जास्त वाघ, आणि वाघाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे सध्या देशी-विदेशी पर्यटकांची हाऊसफुल्ल गर्दी होत आहे.

     

    ख्रिसमस आणि न्यू इयर निमित्त आलेल्या सलग सुट्यांमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या प्रवेश प्रक्रियेत उत्तम सुसूत्रता आली आहे. याचा थेट परिणाम म्हणजे पर्यटकांना त्यांची सर्व बुकिंगस घरी बसल्या ऑन-लाईन करता येतात आणि त्यामुळे ताडोबाला पोचणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.

     

    जवळपास २ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेलं जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पट्टेदार वाघाच्या दर्शनासाठी प्रसिध्द असलं तरी शेकडो प्रकारचे पशु-पक्षी, फुलपाखरं, झाडं-वेली पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. हिवाळ्यात तर ताडोबाच्या या सौंदर्याला आणखीनच साज चढलाय. त्यामुळे अनेक पर्यटक इथला निवांत पणा अनुभवण्यासाठी ताडोबाला भेट देतात.

  • विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    News34 chandrapur

    चंद्रपूर : राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या पुढाकाराने बल्लारपूर तालुका क्रीडा संकूल येथे राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून जवळपास 3 हजार खेळाडू जिल्ह्यात दाखल होत आहे. वाघांच्या भुमीत येणा-या विविध राज्यातील खेळाडूंना जगप्रसिध्द ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची मोफत टायगर सफारी करण्याच्या सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार पहिल्याच दिवशी विविध राज्यातील 336 खेळाडूंनी मोफत टायगर सफारीचा मनसोक्त आनंद लुटला.

     

    राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटन समिती स्थापन करण्यात आली असून वनविभागाच्या वतीने खेळाडूंना मोफत टायगर सफारीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोमवारी सकाळच्या सत्रात 169 खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक तर दुपारच्या सत्रात 167 खेळाडू अशा एकूण 336 जणांना मोफत सफारी घडविण्यात आली.

     

    सकाळच्या सत्रात केंद्रीय विद्यालय संघटनचे 55 खेळाडू, महाराष्ट्राचे 63 आणि पश्चिम बंगालचे 51 तर दुपारच्या सत्रात हिमाचल प्रदेशचे 46 खेळाडू, पंजाब 65, जम्मू काश्मिर 41 आणि ओडीसाचे 15 अशा एकूण 336 खेळाडूंनी मोफत ताडोबा सफारीचा आनंद लुटला. यावेळी सर्व खेळाडूंना वनविभागाच्या वतीने वेलकम किट देण्यात आली. यात टी-शर्ट, कॅप, किचन, ताडोबा डायरी मॅगझीन व ताडोबाची माहिती पुस्तिकेचा समावेश होता. तसेच सर्वांना सकाळी उत्तम नाश्ता व दुपारी जेवण देण्यात आल्याचे वनविभागाने कळविले आहे.

     

  • चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    चंद्रपुरात पुन्हा वाघाचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – सावली वनपरीक्षेत्रातर्गत येणाऱ्या व्याहाड (खुर्द) उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वन बीटात कंपार्टमेंट नंबर २०१ मधील रामदास देवतळे सामदा बुज यांच्या अतिक्रमित शेतात सोमवार २५ रोजी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. मागील दीड महिन्यात वाघाचा हा 7 वा मृत्यू आहे.

     

    घटनेची माहिती वनविभागाला मिळताच सावली वनपरीक्षेत्राचे प्रभारी वनपरीक्षेत्र अधिकारी राजूरकर आणि व्याहाड खुर्द उपवन क्षेत्राचे अतिरिक्त क्षेत्र सहाय्यक आर.जी. कोडापे व त्यांच्या चमुने घटनास्थळ गाठून वाघाच्या मृतदेहास ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रवाना केले. सदर वाघ ही मादी असून 1 वर्षाची आहे, शवविच्छेदन केल्यावर नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत स्पष्टपणे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया वनविभागाच्या वतीने देण्यात आली असून उत्तरीय तपासणी नंतर सर्व स्पष्ट होणार.

     

    मृतावस्थेत आढळून आलेले वाघाचे शवसडलेल्या अवस्थेत आहे. कदाचित या वाघाचा मृत्यू तीनचार दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

     

    दीड महिन्यात सात वाघांचा मृत्यू – पहिली घटना चिमूर वनपरिक्षेत्रात 14 नोव्हेम्बरला 2 वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला होता त्यानंतर 18 नोव्हेम्बरला ताडोबा नैसर्गिकरित्या मृत्यू, 10 डिसेंबर ला वरोरा वनपरिक्षेत्रात अपघातात वाघाचा मृत्यू, 14 डिसेंबर पळसगाव येथे नैसर्गिकरित्या मृत्यू, 21 डिसेंम्बरला विजेचा धक्का लागून सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाचा मृत्यू झाला, 24 डिसेंबर ला शिकारीच्या शोधात असलेला वाघ विहिरीत पडला ही घटना तळोधी वनपरिक्षेत्रात घडली आज 25 डिसेंम्बरला सावली वनपरिक्षेत्रात कुजलेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळला.

  • अजून किती जीवतोडुन सांगणार?

    अजून किती जीवतोडुन सांगणार?

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपुरात नुकतीच ओबीसी परिषद पार पडली मात्र या परिषदेतून एका स्वयंघोषित व स्वतःला ओबीसी नेता म्हणणाऱ्याच्या अस्तित्वाची धडपड दिसून आली.

     

    मराठा समाजासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती, त्यानंतर ओबीसी समाज जागृत झाला, अनेकांनी विरोधही केला, यामध्ये जरांगे पाटील यांचा विरोध करणाऱ्यात अग्रेसर राष्ट्रीय ओबीसी महासंघ राहिला.

     

    जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करण्यासाठी ओबीसी संघटनांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले, चंद्रपुरात सुद्धा अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाच्या पहिल्या व शेवटच्या दिवशी स्वतःला ओबीसी नेते म्हणजेच स्वयंघोषित असलेल्यांनी हजेरी लावली, आंदोलनाच्या मध्ये हे ओबीसी नेते मंडपाजवळ सुद्धा भटकले नाही.

     

    यामुळे अनेक ओबीसी समाजातील नेत्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली होती, फक्त चमकोगिरी साठी ओबीसी चा वापर करायचा आता हेच काम या नेत्याला उरले आहे.

     

    ओबीसी परिषदेनंतर विविध ठराव घेण्यात आले होते, मात्र ते ठराव कुणी मांडले? कुणाचं कुणी अभिनंदन केले? ओबीसी प्रवर्गातील विविध प्रतिनिधी आले मात्र त्यांचं नाव कुठेही आले नाही, म्हणजेच ते नाव नसलेले प्रतिनिधी होते काय? कारण ओबीसी परिषदेच्या प्रेसनोट मध्ये फक्त एकंच नाव होतं, बाकी कोण आलं कोण गेलं याचा काही एक उल्लेख त्यामध्ये नव्हता हे विशेष.

     

    एकीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ शासनजवळ आपली मागणी विविध माध्यमातून पोहचविताना दिसतो मात्र दुसरीकडे आपल्या प्रांगणाच्या आतून हे स्वयंघोषित ओबीसी नेते आपला आवाज चार भिंतीच्या आत वाजविण्याचे काम करीत असतात.

     

    चंद्रपुरातील या स्वयंघोषित ओबीसी नेत्याची वाहवा काही निवडक लोक करताना दिसून येतात, मात्र खरे ओबीसी आपल्या समाजासाठी धडपडत आहे, आज मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र होत आपली ताकद दाखवीत आहे मात्र ओबीसी मधील काही अपवाद वगळता आपण आपल्या समाजात कसे श्रेष्ठ आहो हे सिद्ध करण्यासाठी हे स्वयंघोषित धडपडत आहे.

     

    ओबीसी परिषद झाली, ठराव मांडले, त्याची प्रत उपमुख्यमंत्री यांना दिली त्यावेळी फक्त एकच नेता ही परत देताना दिसला, म्हणजेच फक्त नावासाठी ओबीसी समाजाचा वापर करायचे अशी पद्धत सध्या सुरू आहे, मात्र तुम्ही कितीही जीव तोडून सांगितले तरीही खरे ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

     

     

  • 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर सज्ज

    67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपूर सज्ज

    News34 chandrapur

    चंद्रपूर : बल्लारपूर (विसापूर) तालुका क्रीडा संकूल येथे होणा-या 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.23) घेतला. विसापूर येथील क्रीडा संकुलाला भेट देऊन त्यांनी व्यवस्थेची पाहणी केली व संबंधितांना सुचना दिल्या.

     

    यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, सहायक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम., विशेष कार्य अधिकारी डॉ. विजय इंगोले, मनपा आयुक्त विपील पालीवाल, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, उपविभागीय अधिकारी स्नेहल राहाटे, तहसीलदार डॉ. कांचन जगताप, हरीश शर्मा, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. सर्व समित्यांनी एकमेकांत समन्वय ठेवावा. तसेच शासकीय, अशासकीय सदस्य आणि स्वयंसेवकांनी चर्चा करून सुक्ष्म नियोजन करावे.

     

    जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी, क्रीडा संघटना, त्यांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या स्पर्धेच्या यशस्वीकरीता दिवसरात्र काम करीत आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूरचे नाव देशपातळीवर पोहचून जिल्ह्याचा नावलौकिक होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने या स्पर्धेकरीता उत्स्फुर्तपणे आपले योगदान द्यावे. बाहेरून येणा-या खेळाडूंना निवास, वाहतूक, भोजन आदी व्यवस्थेसंदर्भात माहिती उपलब्ध करून द्यावी. खेळाडूंना काही अडचणी आल्या तर त्याचे निराकरण करण्यासाठी मदत कक्ष, संपर्क क्रमांक, चॅटबॉट आदी व्यवस्था सज्ज ठेवाव्यात. खेळाडूंना घेऊन येणा-या प्रतिनिधींसोबत समित्यांनी समन्वय ठेवून त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

    यावेळी जिल्हाधिका-यांनी संपूर्ण टीमसह, नोंदणी कक्ष, स्वागत कक्ष, भोजन व्यवस्था कक्ष, पार्किंगची व्यवस्था, क्रीडा मैदान, सांडपाणी व्यवस्था आदींची पाहणी केली.

  • काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    News34 chandrapur

    काँग्रेस नेते दिनेश चोखारे यांच्या दिनदर्शिकाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रकाशन

    चंद्रपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, काँग्रेसचे नेते दिनेश चोखारे यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नागपूर येथील विधिमंडळ परिसरात झाले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, गोंदियाचे आमदार करोटे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा समन्वयक डॉ. नामदेवराव किरसान, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र भ्राह्मणवाडे, पवन अगदारी आदींची उपस्थिती होती.

     

    दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना नानाभाऊ पटोले म्हणाले की, दिनदर्शिका ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती आपल्याला दिवस, महिने, वर्ष यांची माहिती देते. दिनदर्शिकेमुळे आपले वेळेचे नियोजन चांगले होते. दिनदर्शिका प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी दिनेश चोखारे यांचे अभिनंदन केले.

     

    दिनेश चोखारे म्हणाले की, ही दिनदर्शिका २०२४ पर्यंतची आहे. यात प्रत्येक महिन्याची माहिती तसेच महत्त्वाच्या घटनांची नोंद आहे. दिनदर्शिका ही एक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण साधन आहे. या दिनदर्शिकेमुळे लोकांना वेळेचे नियोजन करण्यात मदत होईल.

     

    यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांनीही दिनदर्शिकेचे कौतुक केले.

     

    दिनदर्शिकेमध्ये दरवर्षीचा शुभेच्छा संदेश, ज्योतिष टिप्स, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दिनदर्शिका, कृषी संबंधित माहिती, शालेय अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या घटना, कला, साहित्य, संगीत, क्रीडा या विषयांवरील माहिती यांचा समावेश आहे.

     

    यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

    विदर्भाच्‍या विकासावर आमदार अडबाले यांनी वेधले लक्ष

    News34 chandrapur

    चंद्रपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार सुधाकर अडबाले यांनी विदर्भातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. वन्यप्राण्यांचा धोका, दुष्काळी परिस्थिती, उद्योगामुळे होत असलेले प्रदूषण, बेरोजगारी आणि सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी त्यांनी सभागृहात केली.

     

    आमदार अडबाले म्हणाले की, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी व शेतमजुरांचा वन्यप्राण्यांमुळे बळी जात आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये हत्तींचा हैदोस सुरू आहे. जंगली प्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप पुरेशा प्रमाणात देण्याची गरज आहे. जंगली प्राण्यांमुळे शेतीचे नुकसान होत असेल तर पिक कव्हर इन्शुरन्स देण्याची व्यवस्था करावी.

     

    विदर्भामध्ये विशेष करून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिमेंट उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगांमुळे प्रदूषण होत आहे. प्रदूषणामुळे पिकांचे आणि नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक आजारांनी चंद्रपुरकरांना ग्रासले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड या ठिकाणी खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणीही प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी असल्यामुळे जलसाठा खोली वाढली आहे. विहिरी किंवा बोरिंगचे पाणी खाेलवर गेले आहे. वर्धा नदीवर शेतकऱ्यांच्या सिंचन दृष्टीने बॅरेजेस बांधण्याची गरज आहे.

     

    विदर्भात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगार पूणे-मुंबईला जातात. विदर्भातील उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कापूस आणि सोयाबीन हे विदर्भाचे मुख्य पीक आहेत. या पिकांच्या भावात स्थिरता आणण्याची गरज आहे.

     

    गडचिरोली जिल्ह्यामध्ये रेल्वे नाही. रेल्वे कशी पोहोचेल, यादृष्टीने शासनाने पाऊले उचलावीत. चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्‍या सैनिकी शाळेमध्ये विदर्भातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी विशेष आरक्षण द्यावे. जेणेकरून होतकरू विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण घेता येईल व इतर विदर्भ विकासाच्या बाबींकडे आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्ष वेधले.

  • राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या नेत्याने पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    चंद्रपूर –  गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.

     

    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी पत्रकार गणेश यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    जोगी यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन यांनी शिष्टमंडळासहित पोलीस अधिक्षकांची भेट घेतली, यावेळी घडलेला सर्व प्रकार लोंढे यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितला, कारवाई होणार असे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पोलीस अधीक्षकांनी दिले.

     

    जर जोगी यांच्यावर कारवाई झाली नाही तर सत्तेचा माज असलेल्या नेत्याविरोधात ग्रामीण पत्रकार संघटना आक्रमक होत एकजुटतेने याविरोधात आंदोलन करणार असा इशारा सोलापन यांनी यावेळी दिला.

  • चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्याला आला सत्तेचा माज, पत्रकाराला केली मारहाण

    चंद्रपुरात राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्याला आला सत्तेचा माज, पत्रकाराला केली मारहाण

    News34 chandrapur

    गडचांदूर :- गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस{AP}चे नेते ‘शरद सुरेश जोगी’ यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या ‘J-पॅलेस’ नामक बार & रेस्टॉरंट,लॉजचे प्रकरण सध्या सर्वत्र गाजत असून जोगी यांनी खोटे शिक्के व खोट्या सह्यांच्या आधारे शासनाची दिशाभूल करत सदर बारचा परवाना मिळवल्याची तक्रार संबंधित विभागाकडे करून परवाना रद्द करावा आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.

     

    यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यापुर्वी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी एका वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी, कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार ‘गणेश लोंढे’ यांनी जोगी यांना संपर्क केला असता फोनवर प्रतिक्रिया देत नाही,प्रत्यक्ष भेट मग देतो.!असे बोलून ‘J-पॅलेस’ बार मध्ये बोलवले.
    दुरध्वनीवर प्रतिक्रिया देत नसल्याने साध्या मनाने गणेश लोंढे सदर बारमध्ये गेले असता त्याठिकाणी अगोदरच राजुरा येथील काही पत्रकार बसून होते.

     

    पत्रकार गणेश, यांनी प्रतिक्रिया विचारताच जोगी यांनी अश्लील शिवीगाळ करत ‘तु भला मोठा पत्रकार झाला का ? माझी सत्ता आहे,पाहून घेतो तुमच्या सारख्या पत्रकारांना, असे म्हणत पत्रकार गणेश यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जोरात जमिनीवर आपटला,खुर्ची उचलून मारली आणि उद्या जर बातमी आली तर तुला मारून टाकतो’, अशाप्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली.यात पत्रकार गणेश यांना गुप्त मार बसला आहे.

     

    मोबाईल फुटल्यामुळे जवळपास 20 हजाराचे नुकसान सुद्धा झाले.!प्रतिक्रिया देण्याच्या बहाण्याने बोलावून अशाप्रकारे मारहाण करतील याची पूसटशीही कल्पना गणेश यांना नव्हती. यासंदर्भात गडचांदूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली असून पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत शरद जोगीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.शरद जोगीवर यापुर्वी सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे कळते? त्याच्या विरोधात कोणी जर बातमी टाकली तर तो,त्याने महिनेवारी पद्धतीने पोसलेल्या काही तथाकथित पत्रकारांना बोलावून आपल्या मनाप्रमाणे उलट बातम्या लावायला सांगतो,हे मात्र विशेष.!

     

    शरद जोगीवर गुन्हे दाखल होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, सत्तेच्या जोरावर पत्रकारांना मारहाण म्हणजे ही लोकशाही च्या चौथ्या स्तंभाची एकप्रकारे केलेली हत्या आहे, आणि या वृत्तीला समर्थन करणारे सुद्धा दोषी आहे, गरज पडली तर आम्ही जोगी विरोधात आंदोलन करीत पत्रकारांची ताकद दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया ग्रामीण पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन यांनी दिली आहे.

  • सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    सर्वांगीण विकासात चंद्रपूर जिल्हा राज्यात आदर्श ठरावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

    News34 chandrapur

    चंद्रपूर – जिल्ह्याच्या सर्वंकष विकासामध्ये जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण सुविधा, पर्यावरण, अंगणवाडी, रस्ते आणि स्मशानभूमी यासह विविध बाबींचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा राज्यात मॉडेल ठरावा, यासाठी उत्कृष्ट आराखडा तयार करता येईल, अशा सूचना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (दि.21) दिले.

     

    जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना नियामक परिषदेची सभा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री. मुनगंटीवार बोलत होते.  बैठकीला विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सर्वश्री कीर्तीकुमार भांगडीया, सुभाष धोटे, रामदास आंबटकर, श्री. शिंदे, किशोर जोरगेवार, प्रतिभा धानोरकर, डॉ. मनीषा कायंदे, सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासह विविध विभागांच्या प्रमुखांची उपस्थिती होती.

     

    जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य, शिक्षण सुविधा, अंगणवाडी, रस्ते, पाणीपुरवठा  व पायाभुत सुविधा या बाबींना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘नियमानुसार वार्षिक आराखडा तयार करून आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पाणी पुरवठा आणि रोजगार या विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे.

     

    पिण्याच्या पाण्याच्या 1302 योजना कार्यान्वित केल्या आहेत. पण आता जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधा उदा. वॉल कंपाऊंड, वर्गखोली, सोलर सुविधा, खेळासाठी मैदाने, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह यासाठी दोन वर्षाचा वार्षिक आराखडा तयार करावा. मनपा व 17 नगरपरिषदेच्या शाळा व अंगणवाड्या उत्तम कराव्यात. गावातील स्मशानभूमी पूर्णत्वास नेता येईल. प्रदूषण व वैद्यकीय सोयी सुविधांमध्ये भेदभाव होता कामा नये. सूक्ष्म नियोजन करून दोन वर्षाचा  आराखडा तयार करण्यात येईल. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, रुग्णालय, रस्ते स्मशानभूमी आदी कामे करता येतील. तसेच “मिशन जय किसान” अंतर्गत शेतीशी निगडित कामे देखील करण्यात येणार आहेत.

     

    पालकमंत्री श्री .मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘आपला जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे जावा यासाठी जिल्ह्यामध्ये 5001 किलोमीटरचे पाणंद रस्ते करण्यात येत असून देशात जिल्हा पाणंद रस्त्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर राहील, असेही ते म्हणाले. पर्यावरणासाठी योजना आखण्यात येत असून तेलंगणा राज्याने ग्रामपंचायतीमध्ये लोकसंख्येनुसार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यात देखील ग्रामपंचायतच्या माध्यमातून अमृत वृक्ष योजना राबविण्यात येईल. यासाठी जिल्हा परिषदेने जागा तपासाव्यात.

     

    जिल्ह्यातील प्रत्येक मतदार संघाच्या विकासासाठी नियमाच्या चौकटीत व शास्त्रशुद्ध पद्धतीने निधी वितरित केला जाईल. यासाठी विधानसभा सदस्यांना प्रत्येकी  15 कोटी तर विधानपरिषद सदस्यांना प्रत्येकी 5 कोटी असे एकूण 130 कोटी निधीचे वितरण करण्यात येईल. त्यासोबतच, 80 कोटी रुपये कॅन्सर हॉस्पिटल व  प्रादेशिक पाणीपुरवठयाच्या सोलरकरिता 20 कोटी रुपयाची तरतूद करण्यात येईल असेही ते म्हणाले.