Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Winter Session of Parliament 2024 : मणिपूर घटनेवर पंतप्रधान मोदी गप्प का? – खासदार धानोरकर

    Winter Session of Parliament 2024

    Winter Session of Parliament 2024 संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकार ला कोंडीत पकडले. विरोधी पक्षाने मणिपूर च्या घटनेवर चर्चा करावी अशी मागणी केली होती. परंतु, सरकार ने या विषयी आपली भुमीका स्पष्ट केली नाही.

    बांग्लादेशातील हिंदुं वर होण्याऱ्या अत्याचारा संदर्भात आपली भुमिका स्पष्ट करणारे हे सरकार मणिपूर च्या घटनेवर एकही शब्द बोलत नाही. या संदर्भात इंडिया आघाडी ने आज दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर आंदोलन करुन आपली भुमिका स्पष्ट केली. Mp pratibha dhanorkar

    काय आहे अपार आयडी? फायदे काय?

    खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना भेटून संबल, मणिपूर या प्रकरणावर संसदेत चर्चा करण्याकरीता वेळ मागितली. परंतु विरोधकांचे हे विषय सरकार ला गंभीर वाटत नसल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनात व्यक्त केली.

    हे सरकार विरोधकांचे आवाज दाबण्याचे काम करीत असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. मणिपूरात महिलेची नग्न धिंड काढली जाते यावर एकही शब्द बोलायला हे सरकार तयार नाही. Loksabha adhiveshan live

    Mp pratibha dhanorkar
    निषेध आंदोलनात सामील चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर

    देश सेवा करणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचे अवमान होऊन देखील हे सरकार संसदेत चर्चा करीत नसेल तर या सरकार चा जेवढा निषेध व्हावा तेवढा कमीच असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केले.

    सरकार ने विरोधकांना डावलून लोकशाही चा अंत करु नये व हुकुमशाही कडे आणू नये, असे मत देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

  • Encroachment on government land : त्या 84 कुटुंबाच्या मदतीला धावले आमदार जोरगेवार

    Encroachment on government land

    Encroachment on government land नकोडा येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या ८४ कुटुंबांना न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या संदर्भात ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात विशेष बैठक झाली.

    या बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात आक्षेप नोंदवला. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्वरित कारवाई न करता त्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. Encroachment

    महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहात धडाडली चंद्रपूरची तोफ

      आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चे दरम्यान नकोडा येथील ८४ कुटुंबांना सवलतीची मागणी त्यांनी केली.

    या बैठकीत माझी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, गणपत गेडाम यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नकोडा येथील नागरिक उपस्थित होते.

    चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी बातमी

      नकोडा येथील सर्वे क्र. ५८ आराजी ५.२९ पैकी ६१६ चौ. मी. शासकीय जागेवर निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे तहसील प्रशासनाने या कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत.

    नोटिसांमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिक्रमण न हटविल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही होईल, असे नमूद आहे.

      आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, नकोडा येथील ८४ कुटुंबे आर्थिक दृष्ट्या अतिशय गरीब असून त्यांच्याकडे इतरत्र घरे बांधण्यासाठी जागा नाही.

    या कारणास्तव, या कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत सवलत देऊन त्यांची इतरत्र योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

  • Jay Chandrapur : महाराष्ट्र विधानसभेत धडाडली चंद्रपूरची तोफ

    Jay Chandrapur

    Jay chandrapur चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी मुंबई येथील विधानभवनात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी “जय चंद्रपूर” म्हणत आपल्या नावाबरोबर आईचे नाव घेऊन शपथ ग्रहण केली.

      नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले.

    चंद्रपूर बसपा जिल्हाध्यक्ष यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश

      आज विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, “मी किशोर प्रभाताई, गंगूबाई, गजानन जोरगेवार” असे म्हणत शपथ घेतली. त्यांनी “जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय माता महाकाली, जय चंद्रपूर” असे उद्गार काढत सर्व धर्मीय मतदारांचे आभार मानले. Maharashtra vidhansabha

      ते म्हणाले, “चंद्रपूरच्या जनतेने दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मागील पाच वर्षांत सुरू केलेले समाजोपयोगी उपक्रम गतीने पुढे न्यायचे आहेत. अभ्यासिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती विद्यार्थ्यांसाठी खुली करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”

    रामनगर पोलिसांची मोठी कारवाई

    ते पुढे म्हणाले, “मंजूर दीक्षाभूमी विकासकाम, वढा आणि धानोरा बॅरेज यांसारखी प्रकल्पे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. किशोर जोरगेवार यांच्या शपथविधीने चंद्रपूरच्या जनतेला नवीन आशा दिल्या आहेत.

  • Chandrapur On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री, चंद्रपुरात जल्लोष

    Chandrapur On Devendra Fadnavis

    Chandrapur on devendra fadnavis देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. याचे थेट प्रक्षेपण गांधी चौकातील महानगरपालिकेच्या पटांगणावर करण्यात आले.

    भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने हे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला.

    दुरसंचार कंपनी बीएसएनएल तोट्यात – खासदार धानोरकर

    यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, विजय राऊत, प्रमोद कडू, संजय कंचर्लावार, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुडवाडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, रवी आस्वानी, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, माजी नगरसेविका छबू वैरागडे, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, वंदना जांभुळकर, शीला चव्हाण, अनिल फुलझेले, युवा नेते मनोज पाल, चंद्रकला सोयाम,  आत्राम, तुकुम मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम सहारे, बंगाली मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, सिव्हिल लाईन मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, सिव्हिल लाईन महिला मंडळ अध्यक्ष शीतल इटनकर

    यांच्यासह दशरथसिंग ठाकूर, भाजप महामंत्री किरण बुटले, माजी नगरसेवक रवी गुरनुले, प्रकाश धारणे, युवती प्रमुख मुग्धा खाडे, वंदना हातगावकर, सायली येरणे, सविता दंढारे, वैशाली मद्दीवार, विमल कातकर,  भाग्यश्री हांडे, निलीमा वनकर, वंदना हजारे,  कल्पना शिंदे, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार,  करणसिंग बैस, प्रतीक शिवणकर, जितेश कुळमेथे, मंगेश अहिरकर, श्याम हेडाऊ, देवानंद साखरकर, अस्मिता डोनारकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती. Chandrapur on devendra fadnavis

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील आजाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

    यावेळी  महामहिम राज्यपाल सि.पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भव्य अश्या या शपथविधी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर जय्यत तयारी करण्यात आली होती. Chandrapur bjp

    चंद्रपुरात वाढलंय भाईगिरी चे ट्रेंड

    यावेळी शपथविधी कार्यक्रम सुरू होताच भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी सुरू करत जल्लोष साजरा केला. तसेच लाडू वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. या सोहळ्यास भाजप कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Devendra fadnavis

    ३५ फूट उंच मुख्यमंत्री फडणवीसांचे बॅनर ठरले आकर्षण

    devendra fadanvis banner
    चंद्रपुरात 35 फूट उंच बॅनर

    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छांसाठी ३५ फूट उंच बॅनर लावले होते. हे बॅनर विशेष आकर्षण ठरले. 

    ३५ फूट उंच बॅनरला चारही बाजूंनी लावण्यात आलेली लायटिंग यामुळे हे बॅनर उठून दिसत होते. त्यामुळे गांधी चौकातील उपस्थितांनी हे बॅनर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

  • telecom companies : BSNL दूरसंचार कंपनी तोट्यात – खासदार प्रतिभा धानोरकर

    telecom companies

    telecom companies संसदेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे सुरु असून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकार चे लक्ष वेधत आहे.

    एकीकडे सरकारी दुरसंचार कंपनी बीएसएनएल ही घाट्यात असून इतर खाजगी कंपन्या कसा फायदा कमवतात असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र सरकार विचारला आहे. telecom companies

    चंद्रपुरात भाईगिरी चा वाढता क्रेज

    एकीकडे दूरसंचार क्षेत्रातील जीओ, एअरटेल, व्ही.आय. या खाजगी कंपन्या अमाप पैसा कमवत असून दुसरीकडे देशभर इन्फ्रास्ट्रक्चर तयार असलेली दुरसंचार क्षेत्रातील सर्वात जुनी कंपनी बीएसएनएल हि तोट्यात असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकार कडे केला आहे.

    BSNL मधील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील निघण्याइतपत फायदा सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएल ला होतो का असा प्रश्न त्यांनी दुरसंचार मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांना संसदेत विचारला. त्यासोबतच इतर कंपन्या कसा फायदा मिळवतात, ते बीएसएनएल ला का शक्य होत नाही असा प्रतिप्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी मंत्री महोदयांना विचारला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी बेपत्ता

    यावर ज्योतिरादित्य सिंधीया यांनी मागील काही महिन्यांत बीएसएनएल चे ग्राहक वाढले असल्याचे सांगितले व सेवा उत्तम देत असल्याचे सांगुन भविष्यात फायदा कमावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही मंत्री महोदयांनी दिली.

    यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दुरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करुन बीएसएनएल ला फायदा मिळेल यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी विनंती देखील खासदार धानोरकर यांनी यावेळी मंत्री महोदयांकडे केली.

  • maharashtra Cm swearing ceremony : ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा

    maharashtra Cm swearing ceremony

    maharashtra Cm swearing ceremony भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांच्या सौजन्याने भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महापालिकेच्या पटांगणावर एलईडी स्क्रीनवर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला जाणार आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात घटलं कांग्रेसचे मताधिक्य

      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या ते गोपनीयतेची शपथ घेतील, असे चित्र आहे. या शपथविधी कार्यक्रमासाठी चंद्रपूरातही तयारी सुरू करण्यात आली असून शहरातील गांधी चौक येथे एलईडी स्क्रीनवर सदर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. Devendra fadanvis

    चंद्रपुरात भूकंप, सकाळी हादरे

    यावेळी भारतीय जनता पक्ष आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच लाडू वाटप करून भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे.

    संध्याकाळी ४ वाजतापासून सदर कार्यक्रमाला सुरुवात होणार असून नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Matdarancha Kaul : चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे मताधिक्य का घटले?

    Matdarancha Kaul

    Matdarancha kaul चंद्रपूर – दर 5 वर्षांनी देशातील नागरिक लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात आपला अधिकार वापरीत देश व राज्यातील शासन निवडतात, मात्र वर्ष 2024 मध्ये तब्बल 2 वेळा मतदारांनी आपला कौल बदलला आहे.

    आपण नजर टाकूया चंद्रपूर लोकसभा व जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीवर लोकसभेत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी घवघवीत यश मिळविले मात्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला, लोकसभेत मतदारांनी कांग्रेसला पाठबळ दिलं तर विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी पाठिंबा देत भरघोस मतदान केलं. Matdarancha Kaul

    लोकसभा निवडणूकित भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव झाला, लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी पराभवाची हॅट्रिक मारली.

    मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीत पराभवाचा वचपा काढत विजय मिळविला, जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी 5 जागेवर भाजपने विजय मिळविला.

    चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी भूकंपाचे हादरे

    लोकसभा निवडणुकीत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातून 1 लाख 30 हजार 554 मते, चंद्रपूर मधून 1 लाख 19 हजार 811, बल्लारपूर – 1 लाख 21 हजार 652, वरोरा – 1 लाख 4 हजार 752 मते मिळाली मात्र ही मते विधानसभा निवडणुकीत कांग्रेसच्या वाट्याला आली नाही. Voting 2024

    विधानसभा निवडणुकीत काय स्थिती?

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवार यांना 1 लाख 6 हजार 841 मते तर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते, भाजपचे जोरगेवार यांचा 22 हजार 804 मतांनी विजय झाला, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला 38 हजार 927 मतांचे मताधिक्य होते.

    राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपचे देवराव भोंगळे यांना 72 हजार 882 तर कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली, कांग्रेसचा 3 हजार 54 मतांनी पराभव झाला, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला 58 हजार 903 मतांचे मताधिक्य होते. Matdarancha Kaul

    सॉरी शब्दाचा अर्थ काय?

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते मिळाली तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली, या निवडणुकीत कांग्रेसचा 25 हजार 985 मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला बल्लारपूर मधून 48 हजार 200 मतांचं मताधिक्य होत.

    वरोरा विधानसभा क्षेत्रातून कांग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला, भाजपचे करण देवतळे यांना 65 हजार 170 मते तर कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मते मिळाली, कांग्रेसचा 40 हजार 122 मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला वरोरा विधानसभा मतदारसंघातुन 37 हजार 50 मतांचे मताधिक्य होते.

    लोकसभा निवडणुकीत कांग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची दाणादाण केली मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कांग्रेस पक्षाची दाणादाण केली, अवघ्या 6 महिन्यात असं काय घडलं की मतदारांनी कांग्रेस पक्षाला नाकारत भाजपला साथ दिली.

    कांग्रेस हवेत

    कांग्रेस पक्षाला चंद्रपूर जिल्ह्यात अच्छे दिन असताना विधानसभा निवडणुकीत बुरे दिन चा सामना करावा लागला कारण लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाने कांग्रेस पक्ष हवेत होता, कुठलाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला तर विजय आपलाच असा अतिआत्मविश्वास कांग्रेसला जडला होता, मात्र मतदारांनी कांग्रेस पक्षाला आस्मान दाखविले.

  • Workers safety : ओमॅट वेस्‍ट लिमिटेड कंपनीविरोधात आमदार अडबाले आक्रमक

    workers safety

    Workers safety : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्‍ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये १३ ऑक्‍टोंबर २०२४ रोजी अजय रवींद्र राम (रा. बिहार) या कामगाराचा २०० किलो स्‍टील स्‍क्रॅप अंगावर पडल्‍याने मृत्‍यू झाला होता. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्‍यवस्‍थापनाने मृतदेह त्‍याच्या मूळगावी पाठवून दिला.

    तसेच पाच महिन्‍यांपूर्वी याच कंपनीत श्‍यामसुंदर ठेंगणे या कामगाराचा मृत्‍यू झाला होता. त्‍याला सुध्दा ठरल्‍याप्रमाणे पूर्ण मदत देण्यात आली नाही. याची दखल घेत आमदार सुधाकर अडबाले यांनी सहायक कामगार आयुक्‍त यांच्या दालनात कंपनी व्‍यवस्‍थापनासोबत बैठक घेऊन दोन्‍ही मृत कामगारांच्या कुटूंबियांना तात्‍काळ आर्थिक मदत द्यावी, असे निर्देश दिले. Workers safety

    आमदार जोरगेवार यांच्या मनपा आयुक्तांना कानपिचक्या

    ओमॅट वेस्‍ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) कंपनीमध्ये मागील महिन्‍यात झालेल्‍या घटनेनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी कंपनीला भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी दिसून आल्‍या. मृत्यू झालेल्‍या कामगारास तात्‍काळ आर्थिक मदत देण्यात यावी व कंपनी व्‍यवस्‍थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्‍यानंतर सहायक कामगार आयुक्‍त चंद्रपूर यांनी आमदार सुधाकर अडबाले यांच्या उपस्‍थितीत कंपनी व्‍यवस्‍थापनासोबत बैठक लावली.

    कंपनीतील मृत अजय रवींद्र राम या कामगारास आर्थिक मदत देण्याबाबत काय कार्यवाही केली, अशी विचारणा आमदार अडबाले यांनी केली. यावर सध्या २ लाख रूपये कामगाराचे वारसदाराला दिलेले असून उर्वरित नुकसानभरपाईची रक्‍कम नियमानुसार देण्यात येणार असल्‍याचे सांगितले. Mla sudhakar adbale

    आयुध निर्माणी चांदा येथे नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज

    तसेच जून महिन्‍यात सदर कंपनीत श्‍यामसुंदर ठेंगणे या कामगाराचा मृत्‍यू झाला होता. त्‍यास ४५ लक्ष वारसदारांना देण्यात येईल, असे कंपनी व्‍यवस्‍थापनाने मान्‍य केले होते. त्‍यातील ३० लक्ष देण्यात आले असून १५ लक्ष रुपये आतापर्यंत कंपनीने का दिले नाही, याची विचारणा केली. याबाबत उर्वरित रक्‍कम नियमानुसार देण्यात येईल, असे कंपनी व्‍यवस्‍थापकांनी सांगितले. Mla sudhakar adbale

    सोबतच सदर कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट, कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, प्रदूषण नियंत्रणार्थ उपाययोजना, शेतपिकांचे होणारे नुकसान, परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन, कामगारांना नियमानुसार वेतन व इतर बाबींवर चर्चा करण्यात आली असून या सर्व बाबींची सविस्‍तर माहिती सहायक कामगार आयुुक्‍तांनी द्यावी, अश्‍या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी केल्‍या. तसेच याच विषयांवर जिल्‍हाधिकारी, फॅक्टरी निरीक्षक, सहायक कामगार आयुक्‍त यांच्यासोबत कंपनी व्‍यवस्‍थापनाची बैठक लावणार असल्‍याचे आमदार अडबाले यांनी सांगितले.

    बैठकीला सहायक कामगार आयुक्‍त श्री. धुर्वे, ताडाळी उपसरपंच निखीलेश चामरे, प्रा. रवी झाडे व कंपनी अधिकारी उपस्‍थित होते.

  • Special train : महापरिनिर्वाण दिनाला चंद्रपुरातून विशेष रेल्वे सुरू करा – खासदार धानोरकर

    Special train

    Special train भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायी 06 डिसेंबर रोजी मुंबई ला जाणार आहेत.

    त्याकरीता बल्लारपूर येथून मुंबई करीता अप-डाऊन विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड व मध्य रेल्वेच्या मुख्य महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.

    चंद्रपुरात 30 दिवस प्रदूषणाचे

    भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 06 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असल्याने जिल्ह्यातून लाखो अनुयायी अभिवादनाकरीता मुंबई ला जाणार आहेत. परंतु, जिल्ह्यातून मुंबई ला जाण्याकरीता नियमित रेल्वे सेवा नसल्याने अनुयायांची अडचण निर्माण होत आहे. Special train

    महानिर्मिती मध्ये 86 हजाराची नोकरी हवी, तर आजच अर्ज करा

    याकरीता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी  मध्य रेल्वेचे मुख्य महाप्रबंधक तसेच चेअरमन रेल्वे बोर्ड यांना पत्र लिहून दि. 04 डिसेंबर ला मुंबई जाणारी व 07 डिसेंबर ला बल्लारपूर ला येणारी विशेष रेल्वे सेवा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात बौध्द अनुयायांची संख्या मोठी असल्याने महामानवास अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांना जाता येणार आहे. वरील मागणी ची तात्काळ दखल घेण्याची विनंती देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

  • sudhir mungantiwar on evm machine : ईव्हीएम मशिनबाबत काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

    sudhir mungantiwar on evm machine

    sudhir mungantiwar on evm machine महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची दाणादाण उडवली. आता त्यांचे नेते ईव्हीएममध्ये गोंधळ केला असल्याचे कारण पुढे करत आहेत. जो तो कॅमेऱ्यासमोर येईन ईव्हीएमवर आणि निवडणूक आयोगावर आगपाखड करत आहे.

    अशा विरोधकांच्या बाबतीत बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार कडाडले. विरोधकांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती त्यांनी विरोधकांवर केली.

    सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांची गंभीर दखल, गोंडवाना विद्यापीठाचे वेळापत्रक बदलले

    एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुनगंटीवार म्हणाले, विरोधकांचे जे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचीही वर्तणूक संशयास्पद आहे. ते काय आमच्यासोबत मॅच फिक्सींग करून निवडून आलेत का? ‘ये अंदर की बात है और काँग्रेस के प्रदेशाध्यक्ष हमारे साथ है’, असं काही आहे का, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कसे निवडून आले, लोकसभेमध्ये त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळाल्या, तेव्हा ईव्हीएमवर कुणीच का नाही बोललं नाही, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी विरोधकांवर केली. sudhir mungantiwar on evm machine

    काय म्हणता पगार 86 हजार, नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    कायदे करणारे काँग्रसचे ‘ते’ कोण नेते होते ?


    1951 आणि 1961 मध्ये दोन्ही कायदे कुणी बदलवले. ते काँग्रेसचे कोण नेते होते, ज्यांनी संसदेत लांबलचक भाषण दिलं होतं की, ‘कागदी मतपत्रिका छापल्यानं गोंधळ निर्माण होतो, बिहार राज्यासारखं बुथ कॅप्चरींग होतं..’ हे कोण बोललं होतं? 2010 मध्ये मनमोहन सिंह यांनी समिती नेमली होती. त्या समिताचा अहवाल कुणाच्या राज्यात आला? तो कुणी स्विकारला, असे म्हणत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर पुन्हा प्रश्नांची बरसात केली. कर्नाटकमध्ये विजय होतो, तेव्हा काँग्रेस जिंकते आणि हारते तेव्हा ईव्हीएम मशीन हारवते, हा काँग्रेसचा बालिशपणा आहे.असे मुनगंटीवार म्हणाले. sudhir mungantiwar on evm machine

    ..तर कर्नाटकने त्यांना निवडून देऊ नये


    तेलंगणामध्ये ते जिंकले तर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे जिंकले. अन् महाराष्ट्रात हारले तर ईव्हीएममुळे हारले, अशी दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. ईव्हीएमवर जर आक्षेप असेल तर निवडून आलेल्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे. कारण त्यांच्यावर हा आरोप नसला पाहिजे की, आम्हाला महायुतीच्या नेत्यांनी निवडून आणलं. छोट्या राज्यामध्ये आम्ही त्यांना निवडून आणतो, हा त्यांचा दुसरा हास्यास्पद आरोप आहे. कारण हा आरोप करून ते कर्नाटकचा अपमान करत आहेत. कारण कर्नाटक हे छोटे राज्य नाही. तर पर कॅपिटा इनकममध्ये पहिल्या पाच राज्यात कर्नाटक पुढे आहे. कर्नाटकबद्दल हे लोक असं बोलत असतील तर कर्नाटकच्या जनतेने त्यांना पुढचे 100 वर्ष निवडून देऊ नये, असे आवाहनही सुधीर मुनगंटीवार यांनी कर्नाटकच्या जनतेला केले.