Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Padyatra | सुधीर मुनगंटीवार मंत्री होणार? कार्यकर्त्यांची पदयात्रा

    Padyatra

    Padyatra : राज्याचे हेविवेट नेते आणि भाजपाची मुलुख मैदानी तोफ सुधीर मुनगंटीवार यावेळी मंत्रिमंडळात नाहीत. भाजपची सत्ता आली आणि मुनगंटीवार मंत्रिमंडळात (cabinet expansion) नाहीत, असे आजवर कधी घडलेच नव्हते. पण यावेळी हे विपरीत घडले. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मुनगंटीवार स्वतः नाराज नाहीत. पण त्यांच्या समर्थकांनी नाराजी स्पष्ट बोलून दाखवली आहे. अनेक कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले आहेत.

    चंद्रपुरातील अनेक लाडक्या बहिणींचे ऊर आपल्या भावाचं नाव नसल्यानं भरून आलं आहे. ज्यांच्यासाठी मुनगंटीवार धावून गेले असे अनेक रुग्ण, त्यांचे नातेवाईक, निराधार माता-भगिनी, विद्यार्थी, शेतकरी यांचा कंठ दाटून आला आहे. मुनगंटीवार यांनी ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ अशी भूमिका घेतली असली तर आम्ही गप्प राहणार नाही, असं या सगळ्यांची ठरवलं आहे. त्यातूनच मुनगंटीवार यांचे चाहते चंद्रपुरातून पायीच निघाले,पुढे ते नागपूर नंतर दिल्लीकडे कूच करणारं आहे.

    चंद्रपूरपासून दिल्ली गाठेपर्यंत आमचे पाय रक्तबंबाळ झाले तरी चालेल पण सुधीरभाऊंना मंत्रिपद मिळायलाच हवं, अशी भूमिका या सगळ्यांनी घेतली आहे. मुनगंटीवार यांचे चाहते एक एक करीत या अनोख्या पदयात्रा (padyatra) सत्याग्रहात सहभागी होत आहेत. त्यांना एकच उत्तर हवं आहे. का सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना मंत्रिमंडळातून ऐनवेळी का वगळण्यात आलं. सुरुवातीला हे सगळे कार्यकर्ते नागपूर येथे पायी पोहोचणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीकडे कूच करणार आहेत.

    मागणी रास्तच

    ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे राज्यगित ज्यांनी दिलं त्या सुधीर मुनगंटीवार यांनाच दिल्ली मंत्रिपदापासून कशी काय वंचित ठेऊ शकते असा प्रश्न या सगळ्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपूर अशी पदयात्रा (padyatra) मंगळवारी दुपारी (17 डिसेंबर) सुरू झाली आहे. नागपूरमध्ये या कार्यकर्त्यांचं समाधान झालं तर ठिक अन्यथा त्यांनी पुढचा प्रवास दिल्लीच्या दिशेने करण्याचा पक्का निर्धार केला आहे.

    पिकविम्याच्या मुद्द्यावर लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार धानोरकर आक्रमक

    चंद्रपूरमधून निघालेले हे कार्यकर्ते या थंडीत तहान-भूक विसरून पायपीट करीत राहणार आहेत. पडोली, भद्रावती, वरोरा, खांबाळा या भागातून कार्यकर्ते या पदयात्रेत जुळले जाणार आहेत. नागपुरात पोहोचेपर्यंत या सत्याग्रह पदयात्रेतील कार्यकर्त्यांची संख्या मोठी होईल, असा विश्वास मुनगंटीवार यांच्या समर्थकांचा आहे.

    कारवां बढता रहे..

    ‘मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर
    लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया’, अशी मुनगंटीवार यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. आपल्या 30 वर्षाच्या आमदारकीच्या कार्यकाळात त्यांनी माणसं जोडली. त्यामुळं त्यांच्यासाठीही आता चाहत्यांचा ‘कारवाँ’ तयार होत आहे. सद्य:स्थितीत फारुख शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तामटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्ते चंद्रपुरातून निघाले आहेत. मात्र ही संख्या आता वाढत जाणार आहे. वाटेत लागणाऱ्या प्रत्येक गावातून सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते या सत्याग्रह पदयात्रेत जुळत जाणार आहेत.

    मी नाराज नाही. नाराज होणारा मी माणूस नाही. पण मंत्रिमंडळात माझा समावेश आहे, हे निश्चित झाले होते. शपथविधीचा दिवस आल्यावरही मला फोन आला नाही. यामागचे कारण मला कळले नाही. मला ते कारण जाणून घ्यायचे आहे. बाकी मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडेल. पूर्ण शक्तीने जबाबदारी पार पाडणे, हे माझे कर्तव्य आहे. हे कर्तव्य मी आजपर्यंत निभावत आलो. यापुढेही निभावत राहणार आहे, असे मुनगंटीवार यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे. त्यामुळं कधीही न हरणाऱ्या मुनगंटीवार यांच्यासाठी लढवय्ये कार्यकर्तेही सज्ज झाले आहे.

    सातव्यांदा आमदार

    चंद्रपूर जिल्ह्यातून सुधीर मुनगंटीवार सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. या जिल्ह्यात आतापर्यंत जी काही कामे दिसत आहेत, ती त्यांच्यामुळेच झालेली आहेत. सुधीर मुनगंटीवार नसते, तर चंद्रपूर जिल्हा 20 वर्ष मागे असता. त्यामुळे त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही चांगलेच नाराज आहोत. आम्ही येथून पदयात्रेने नागपूरला जाणार आहोत. तेथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ. येथे आमचे काम झाले तर ठीक. नाहीतर तेथूनच पुढे पदयात्रेने दिल्लीला जाऊ. दिल्लीत आमचं म्हणणं मांडू. जोपर्यंत सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळत नाही, तोपर्यंत आमची पावलं थांबणार नाहीत. पायांतून रक्ताच्या धारा निघाल्या तरी ही पावलं थांबणार नाही, अशा भावना चंद्रपूर येथून पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

  • Social activities | आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध सामाजिक कार्यक्रम संपन्न

    Social activities

    Social activities : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    याप्रसंगी शेकडो विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत पाच हजार विद्यार्थ्यांना एकूण 27 हजार नोटबुक वाटण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. तसेच दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

    चंद्रपुरात प्रसारमाध्यम कार्यशाळा संपन्न

      सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकाली मंदिरात महाआरती केली आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देत प्रार्थना केली. त्यानंतर सामाजिक उपक्रमांची सुरुवात झाली. भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने जनसंपर्क कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात 200 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करत “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान” हा संदेश दिला.

    Blood donation

      दुपारी 11 वाजता बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले शाळेत आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप करण्यात आले. पुढील सहा दिवसांत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील पाच हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा नोटबुक देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

     पडोली येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला. बाबुपेठ छोटा बाजार येथे लाडू तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

    दीक्षाभूमी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात उपस्थित राहून आमदार जोरगेवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

      तुकुम येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटनही आमदार जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. जोड देऊळ येथे आयोजित दिव्यांग साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार जोरगेवार यांनी दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप केले. योग नृत्य परिवार यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला.

    भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरातील विविध धार्मिक स्थळांवर महाआरतीआणि यज्ञ आयोजित करण्यात आले होते. शहरातील अनेक भागांमध्ये आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, लाडू तुला, साहित्य वाटप यांसारखे विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आले.

      आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस समाजहिताची भावना व्यक्त करणाऱ्या या उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र आणि मित्रपरिवाराच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

  • Crop insurance scheme | पीक विम्याच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर आक्रमक

    Crop insurance scheme

    Crop insurance scheme : दिल्ली येथे लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असून विविध प्रश्नांच्या माध्यमातून खासदार प्रतिभा धानोरकर ह्या सरकार चे लक्ष वेधून घेत आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान सन 2023 ची प्रधानमंत्री पिक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचे सरकार च्या लक्षात आणून दिले.

    आमदार जोरगेवार यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन

    खासदार प्रतिभा धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी दिल्ली येथे लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात विविध विषयाच्या अनुषंगाने सरकार ला धारेवर धरले असून कृषी व शेतकरी विषयाच्या संदर्भात त्यांनी आक्रमकपणे आपले प्रश्न मांडले आहेत.

    किटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे व त्यांच्या पाल्यांचे मृत्यु होत असल्याचे सरकार च्या निर्दशनास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आणून दिले. तसेच किटकनाशकामुळे होणारे दुष्परीणामांसाठी सरकार ने उपाययोजना कराव्यात. त्यासोबतच अशा प्रकरणात दवाखान्यांना देखील आवश्यक सूचना द्याव्यात या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

    मी नाराज नाही – सुधीर मुनगंटीवार

    त्यासोबतच 2023 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे सभागृहात खासदार धानोरकर यांनी सांगितले. संबंधीत पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्यात यावे व संबंधीत कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी देखील खासदार धानोरकर यांनी सभागृहात केली. संबंधीत कंपनीची मुजोरी या सरकार ने बंद करावी व शेतकाऱ्यांना न्याय द्याव, अशी देखील विनंती सरकार कडे केली.

  • Kishor jorgewar birthday | वाढदिवस लोकनेत्याचा

    Kishor jorgewar birthday

    Kishor jorgewar birthday : सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक चंद्रपूरच्या आराध्य दैवत माता महाकालीची महाआरती करत आजच्या दिवसाची सुरुवात केली. त्यानंतर योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

    आता मी पुस्तकांचा अभ्यास करणार – सुधीर मुनगंटीवार


    भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्ष आणि आमदार किशोर जोरगेवार मित्र परिवाराच्या वतीने शहरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

    Kishor jorgewar birthday

    सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीचे दर्शन घेत पूजा-अर्चना केली. त्यानंतर आझाद बाग येथे योग नृत्य परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली. दिवसभर आयोजित विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना त्यांनी भेटी देत शुभेच्छुकांचे शुभेच्छा स्वीकारल्या. Kishor jorgewar


    आज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी या शिबिरांना भेट देऊन रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिरांमध्ये शेकडो रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यासोबतच हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.

    Birthday program


    नागपूर रोडवरील दर्गा येथे आयोजित कार्यक्रमातही आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग घेतला. त्यानंतर एमआयडीसी येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी जैन गुरूंचे आशीर्वाद घेतले.


    वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक व धार्मिक उपक्रमांमुळे चंद्रपूर शहरात एक सामाजिक एकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या कार्यक्रमांचे नागरिकांनीही भरभरून स्वागत केले.

  • sudhir mungantiwar on cabinet expansion : मी नाराज नाही, आता पुस्तकांचा अभ्यास करणार – सुधीर मुनगंटीवार

    sudhir mungantiwar on cabinet expansion

    sudhir mungantiwar on cabinet expansion : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (16 डिसेंबर) नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुनगंटीवार यांचे नाव नव्हते. त्यानंतर त्यांनी सोमवारी यासंदर्भात नितीन गडकरी यांची भेट घेऊन सुमारे दीड तास त्यांच्याशी चर्चा केली.

    आपण नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन घेतले. नितीन गडकरी हे सुरुवातीपासून आपले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेतली असे मुनगंटीवार म्हणाले.

    आपण कोणत्याही प्रकारे नाराज नाही. आपण कधीही नाराज असू शकत नाही. अनेक वर्ष आपण विरोधी पक्षांमध्ये होतो. त्यावेळी देखील आपण जनतेच्या हिताची कामे केली. आता आपण मंत्री नसलो तरी आमदार म्हणून जनतेच्या हितासाठी संसदीय आयुधांचा वापर करणार आहे. जनतेच्या सेवेचे व्रत आपण घेतले आहे, ते कायम सुरू राहणार असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी ठामपणे नमूद केले.

    पक्ष मोठा

    भारतीय जनता पार्टीचे आपण एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. याच जन्मात नव्हे तर पुढील अनेक जन्मातही आपण भाजपमध्ये असू. राष्ट्रसेवा करण्याची संधी आपल्याला भाजपनेच दिली. त्यामुळे पुढील रणनीती ही भाजपचा आमदार म्हणून जनसेवेची असेल.

    44 नागरिकांवर नळ कपातीची कारवाई

    मंत्री म्हणून आपण यापूर्वीही जनतेचीच कामे करीत होतो. आता आमदार म्हणूनही जनतेची कामे करताना आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    पक्षाने आपल्याला वेगळी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे आपल्याकडून कळले आहे. त्यामुळे पक्ष देईल ती नवी जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. विधिमंडळाशी संबंधित सर्व पुस्तकांचा पुन्हा आपण अभ्यास करणार आहे.

    संसदीय आयुधांचा वापर करीत आपण जनतेच्या सेवेचे कामे करणार असल्याचेही सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून अशा प्रकारे वागणूक भाजपमध्ये दिली जात नाही. पक्षाने योग्य विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाव यादीत असल्याचे सांगितले होते. पण नंतर नाव नव्हते. असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

    अधिवेशनाच्या (Winter Session) पहिल्या दिवशी सुधीर मुनगंटीवार हे कामकाजामध्ये उपस्थित नव्हते. त्यावर बोलताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी फार काही महत्त्वाचे कामकाज नव्हते. मंत्री म्हणून अनेक फाइल्स हाताळाव्या लागतात. अधिकाऱ्यांकडून चर्चेतील मुद्द्यांवर ब्रीफिंग केले जाते.

    आजचा कोणताही मुद्दा नव्हता. त्यामुळे आपण विधिमंडळात आलो नाही. आपण कोणत्याही परिस्थितीत नाराज नाही. आपण नाराज राहणारे व्यक्ती नाही असे मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा नमूद केले.

  • cabinet expansion : पंतप्रधान मोदी यांनी घेतली कार्याची दखल पण….

    cabinet expansion

    cabinet expansion : महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्मला आता सुरुवात झाली आहे. 33 वर्षानंतर नागपूर येथे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यामध्ये सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाकडे. 30 वर्ष सलग आमदार असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळी मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा मंत्री पदाला पोरका झाल्याचा संताप जिल्हावासियांकडून व्यक्त होत आहे.

    राजकीय कारकीर्द सुरू केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदारसंघासह चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतरचे पहिले ‘सरप्लस’ बजेट महाराष्ट्राला दिले. याशिवाय 50 कोटी वृक्षारोपण करीत त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. Maharashtra cabinet

    चंद्रपुरात गांजा व सुरा जप्त

    चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालटच सुधीर मुनगंटीवार यांनी करून टाकला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘मन की बात’मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल घेतली होती.

    हा तर अन्याय आहे

    महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा आवर्जून समावेश असेल, असे चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेलाही वाटत होते. त्यामुळे सलग सात टर्म विधानसभा जिंकणारे सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांना काय मिळणार? याची उत्सुकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होती.

    मात्र सुधीर मुनगंटीवार यांचे नाव मंत्री पदाच्या यादीत न आल्यामुळे बल्लारपूरसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

    विधानसभा निवडणुकीमध्ये बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवला. चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले आहेत, हे विशेष.

    मंत्रिपद मिळणे होते गरजेचे

    2019 मधील विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजारांवर मतं मिळाली होती. त्यावेळी मुनगंटीवार यांनी 33 हजार 440 मतांनी विजय मिळवला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना मिळालेली आघाडी मोठी आहे.

    25 हजार 985 मतांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या आघाडीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपमधील त्यांची ज्येष्ठता आणि जनसंपर्क पाहता त्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी मंत्रिपद मिळणे गरजेचे होते. मात्र असे न झाल्याने चंद्रपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक कमालीचे नाराज झाले आहेत.

    जिल्ह्याच्या प्रगतीत मुनगंटीवारांचे योगदान

    सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपचं रोपटं आता वटवृक्ष झालं आहे. भारतीय जनता पार्टीला चंद्रपूरमध्ये अभेद्य किल्ला बांधण्यामध्ये मुनगंटीवार यांचे अमूल्य योगदान आहे. त्यामुळे देखील चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना यंदा भाजपकडून मोठी अपेक्षा होती.

    मात्र मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. भारतीय जनता पार्टी आता सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कोणती जबाबदारी देणार, याची उत्सुकता सर्वांना आहे.

  • Devendra Fadnavis Cabinet Expansion : कोण होणार मंत्री?

    Devendra Fadnavis Cabinet Expansion

    Devendra Fadnavis Cabinet Expansion महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवीत महायुतीने 200 च्या वर जागा जिंकल्या, बहुमतचे सरकार आल्यावर आता मंत्रिमंडळात कुणाला सामील करायचे व कुणाला डच्चू द्यायचा याबाबत महायुती पुढे मोठा पेच उभा आहे.

    आज नागपुरातील राज भवनात दुपारनंतर मंत्री मंडळाचा विस्तार करीत मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे, अनेक आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आला असला तरी अनेक जेष्ठ आमदारांना फोन न आल्याने धाकधूक वाढली आहे.

    ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात रोजगाराची संधी, मिळेल 50 हजार पगार

    भाजपने आधीच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याची माहिती दिली होती, तसेचं महायुती मधील घटकपक्षांनी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला असल्याची माहिती आहे.

    ज्यांना मंत्रीपदासाठी कॉल आला नाही त्यामध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार (sudhir mungantiwar), रवींद्र चव्हाण तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनाही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. ज्यांना मंत्री पदासाठी फोन आले त्यांची संभाव्य यादी सुद्धा पुढे आली आहे.

    मंत्रिमंडळात या नावांची शक्यता


    भाजप – देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फंडकर, अशोक उईके जयकुमार गोरे

    शिवसेना – एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल

    राष्ट्रवादी – अजित पवार, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, सना मलिक – राज्य, इंद्रनील नाईक – राज्य

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 7 वेळा जिंकणारे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अजूनही फोन आला नसल्याची माहिती आहे.

    चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया (bunty bhangdiya) यांनी विजयाची हॅट्रिक मारली असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.


  • Nyay Mandir | बल्लारपूर मध्ये होणार न्यायाची नवीन इमारत

    Nyay Mandir

    Nyay mandir : चंद्रपूर -‘दिला शब्द केला पूर्ण’ यासाठी सुपरिचित असलेले आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे बल्लारपूरच्या नवीन न्यायालयीन इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपये निधीची राज्यसरकारने मान्यता दिली आहे.

    एखादा विषय हाती घेतला की तो पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करण्यात आ.सुधीर मुनगंटीवार (sudhir Mungantiwar) यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या खास कार्यशैलीची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.

    रोजगार ही गार्ड बोर्ड ची जबाबदारी – आमदार जोरगेवार

    बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत बांधण्यासाठी ३६ कोटी ७० लक्ष ७३ हजार रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.

    ही नवीन न्यायालयीन इमारत बल्लारपूरच्या वैभवात भर पाडणारी असेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. या इमारतीमध्ये तळमजला, त्यावर तीन मजले, पाच कोर्ट हॉलचा समावेश असेल. याशिवाय अग्नीशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, वातानुकुलित व्यवस्था, लिफ्ट, पाणीपुरवठा, जलसंचय आदींचा समावेश असणार आहे.

    बल्लारपूर येथे नवीन न्यायालयीन इमारत व्हावी, येथे अद्ययावत सोयीसुविधा निर्माण व्हाव्यात, सुसज्ज अशा कोर्टरुम असाव्यात, यासाठी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर त्यांनी नियमित पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून इमारतीच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. Nyay Mandir

    न्यायदान करणारी यंत्रणा आणि न्याय मागण्यासाठी येणारा सर्वसामान्य माणूस यांची मुलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत गैरसोय होणार नाही, याची पूर्ण काळजी बांधकामादरम्यान घेतली जाईल, असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

  • security guard board | ही गार्ड बोर्ड ची जबाबदारी – आमदार किशोर जोरगेवार

    security guard board

    Security guard board चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे उद्योगांमध्ये कामगारांची आणि सुरक्षारक्षकांची नेहमी मागणी असते. मात्र, या जागा भरताना गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगार देण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

    यामुळे शासन स्तरावरील अडचणी आमच्या माध्यमातून सोडवून घेत रोजगार प्रक्रियेची गती वाढवावी आणि ती योग्य पद्धतीने राबवावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी सहाय्यक कामगार आयुक्त राजदीप धुर्वे यांना दिले आहेत.

      आ. किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी गार्ड बोर्डच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपल्या कार्यालयात कामगार संघटनांचे नेते, कामगार प्रतिनिधी आणि संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षारक्षकांच्या भरती प्रक्रियेसह इतर कामगारांच्या रोजगार समस्यांवर चर्चा करण्यात आली.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

      बैठकीत बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, ‘‘गार्ड बोर्डमध्ये नोंदणीकृत असलेल्या कामगारांना रोजगार मिळवून देणे ही गार्ड बोर्डची जबाबदारी आहे. कामगारांच्या अडचणींना समजून घेत त्यांना न्याय देण्यासाठी आपण  प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणी नंतर सिएटीपीएस येथील सुरक्षारक्षकांच्या भरती (employment) प्रक्रियेबाबत कामगार मंत्री हसन मुशरिफ यांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी गतीने व्हावी, यासाठी आमदार जोरगेवार यांनी पुढाकार घेत बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी गार्ड बोर्डकडून होणार्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आणि ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

    सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक असलेल्या नोंदणी प्रक्रियेसाठी दोन ते तीन दिवसांत संबंधित कंत्राटदारांशी संपर्क साधून नोंदणी लिंक सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. लिंक सुरू झाल्यानंतर कामगारांनी त्वरित नोंदणी करून आपली शारीरिक चाचणी पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

    बैठकीदरम्यान, आ. जोरगेवार यांनी स्पष्ट केले की, गार्ड बोर्डच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये. शासन पातळीवरील अडचणी दूर करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, पण कामगारांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले.

  • mla kishor jorgewar birthday | सेवा सप्ताहाने होणार वाढदिवस साजरा

    mla kishor jorgewar birthday

    Mla kishor jorgewar birthday भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यासाठी पुढील सहा दिवस तुकूम प्रभागात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

    शुक्रवार पासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन कार्यक्रमाने या सेवा सप्ताहाला सुरवात करण्यात आली आहे.

    आमदार जोरगेवार यांचा अनोखा सत्कार

      १७ डिसेंबरला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार mla kishor jorgewar यांचा वाढदिवस मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम घेत साजरा केला जाणार आहे.

    या निमित्ताने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तर माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आठवडाभर तुकूम परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

     यात १३ तारखेला सुमित्रा नगर येथील अमृत पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन, १४ डिसेंबरला शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, १५ डिसेंबरला योग शिबिर, १६ डिसेंबरला राष्ट्रवादी नगर येथील जगन्नाथ महाराज यांचा महाप्रसाद, १७ डिसेंबरला रक्तदान, रोगनिदान, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वाटप, लाडकी बहीण योजनेचा मेळावा, तर १८ डिसेंबरला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले आहे.