Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • pratibha dhanorkar on setu worker : खासदार धानोरकरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना लिहलं पत्र

    pratibha dhanorkar on setu worker

    pratibha dhanorkar on setu worker : महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयात अनेक बेरोजगारानां अत्यल्प मानधनावर कामकरावे लागत असल्याने त्यांना शासनाने कंत्राटी सेवेत सामावून किमान वेतन देण्याची मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेद्र फडणविस (devendra fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

    चंद्रपुरातील बुलेट राजांवर होणार कठोर कारवाई


    प्रत्येक तहसिल कार्यालयात सेतुची कामे बेरोजगार तरुण तरुणी मार्फत अत्यल्प मानधनावर केली जात आहे. सेतु केंद्रामार्फत दिले जाणारे दाखले व प्रमाणपत्र देण्याचे काम या सबंधीत कर्मचाऱ्याकडे आहे.

    पंरतु या कर्मचाऱ्याना अत्यल्प मानधन मिळत असल्याने या संदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांची भेट घेवुन आपल्या मागण्या मांडल्या या संदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पत्र लिहुन सेतु कार्यालयातील अत्यल्प मानधन असलेल्या कर्मचाऱ्याना शासकीय कंत्राटी सेवेत सामावुन घेवून किमान वेतन देण्याची मागणी केली आहे.

    या संदर्भात मा. खा. प्रतिभा धानोरकर या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार असल्याचे देखिल सांगितले. 

  • old pension | जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा तीव्र करणार – आमदार अडबाले

    old pension

    old pension : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर टप्प्याटप्प्याने १०० टक्के अनुदानावर आलेल्या तसेच २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.

    पेन्शन मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना (old pension scheme) लागू करण्यासाठी लढा अधिक तीव्र केला जाईल. लाखो कर्मचाऱ्यांच्या न्यायिक हक्कासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा सरकार्यवाह म्हणून सभागृहात आवाज उठवेल, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

    चंद्रपुरातील बुलेट राजांवर होणार कारवाई

    विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर महानगरतर्फे भवानजीभाई चव्हाण हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर महानगर अधिवेशन पार पडले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार सुधाकर अडबाले बोलत होते.

    अधिवेशनाच्या अध्यक्षस्‍थानी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे होते. याप्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव धोबे होते. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे, जगदीश जुनगरी, विज्युक्ता महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, डॉ. अनिल शिंदे,  विजय भोगेकर, विमाशि संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे, वर्धा जिल्हाध्यक्ष विष्णू इटनकर, नागपूर महानगर कार्यवाह अविनाश बडे, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, चंद्रपूर महानगर अध्यक्ष जयंत टोंगे सह

    कार्यवाह सुरेंद्र अडबाले, दिगांबर कुरेकर, भोंगळे सर, भाऊ गोरे, घोडसे सर, सौ. सीमा अडबाले, प्रमोद साळवे, मनोज आत्राम यांची उपस्थिती होती. प्रारंभी मान्‍यवरांचे लेझीम पथकाने स्‍वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार डायगव्हाणे, लक्ष्मणराव धोबे, वीतेश खांडेकर, जगदीश जुनगरी, डॉ. अशोक गव्हाणकर, रमेश काकडे, विजय भोगेकर आदींनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर प्रकाश टाकला.

    विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व शालेय कार्याबद्दल महानगरातील कॉन्व्हेन्टमधील प्राचार्य, शिक्षकांचा शाल, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्‍कार करण्यात आला.

    प्रास्‍ताविक विमाशि संघ महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले यांनी केले. संचालन प्रा. प्रमोद उरकुडे, रंजना कन्नाके तर आभार जयंत टोंगे यांनी मानले. या अधिवेशनाला चंद्रपूर महानगरातील शिक्षकांची मोठी उपस्थिती होती. अधिवेशनानंतर चंद्रपूर महानगर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात महानगर अध्यक्षपदी दिगांबर कुरेकर, कार्यवाहपदी सुरेंद्र अडबाले, उपाध्यक्ष म्हणून मनोज पुलगमकर, दादाराव श्रीरामे, शकील शेख, वनश्री मेश्राम, सहकार्यवाह म्हणून प्रविण आबोजवार, चरणदास राठोड, रूपाली मुंगल, प्रमोद पेद्दीलवार तर कोषाध्यक्ष म्हणून राजू वाढई यांची अविरोध निवड करण्यात आली.

    निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. विजय हेलवटे यांनी जबाबदारी पार पाडली.

  • Sudhir mungantiwar on ministry | आपलं विमान पुन्हा उतरणार – सुधीर मुनगंटीवार

    Sudhir mungantiwar on ministry

    Sudhir mungantiwar on ministry : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मी २६ हजार मतांनी विजयी झालो. विधानसभा निवडणूक जिंकण्याची ही माझी सातवी वेळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्या २८८ आमदारांपैकी चार आमदार असे आहेत जे आठवेळा निवडून आले आहेत. आणि तीन आमदार असे आहेत जे सातवेळा विजयी झाले आहेत. त्यातला मी देखील एक आहे. पण हे यश माझे नाही, माझ्या कार्यकर्त्यांचे आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचाने केली कमाल

    कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो. ते आमच्यापेक्षा जास्त काम करतात. घरावर तुळशीपत्र ठेवून काम करतात. त्यामुळे ‘बाजीगर’ होऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करताना आनंद होत आहे, या शब्दांत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar mla) यांनी सत्काराला उत्तर दिले.

    घुग्घुस येथे आ. श्री. सुधीर मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे आणि आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. त्यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी सत्काराला उत्तर दिले. आठवडी बाजार घुग्घुस येथील स्व. प्रमोद महाजन रंगमंचावर आयोजित या सोहळ्याला आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, महानगराचे अध्यक्ष राहूल पावडे, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, महीला प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम आदि नागरीक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

    विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना काही ठिकाणी संघर्ष बघायला मिळाला. पण कार्यकर्त्यांच्या मनात विजयाचा आत्मविश्वास असेल तर जगातील कुठलीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.  

    महायुतीला या निवडणुकीत जनतेने व लाडक्या बहिणींनी भरभरून आशीर्वाद दिला. या यशात सर्वांत मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे. आम्हाला बहिणींनी भाऊबिजेचे रिटर्न गिफ्ट दिले, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तर घुग्घुसच्या जनतेने प्रेम दिलेच याचा उल्लेख आ. श्री. मुनगंटीवार यांनी केला. सत्कार सोहळ्याच्या नियोजनबद्ध आयोजनासाठी विवेक बोढे व त्यांच्या टीमचेही श्री. मुनगंटीवार यांनी कौतुक केले.

    देवराव भोंगळे व किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) हे त्यांच्या मतदारसंघाचा चेहरा बदलण्यासाठी काम करतील, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदेच्या निवडणुका आपण जिंकणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

    १६ मार्च १९९५ मध्ये घुग्घुसने माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून दिली. याच गावातील जनतेने मला निवडून दिलं नसतं तर देशामध्ये आपल्या जिल्ह्याचा गौरव वाढविणारी कामे करू शकलो नसतो. पक्षाने संधी दिली, पण लोकांनीही संधी दिली, याचा आ. श्री. मुनगंटीवार यांनी उल्लेख केला.  घुग्घुसच्या विकासासाठी मी कायम सोबत आहे. आमच्यावर लोकांनी प्रेम केले आहे. त्याचे ऋण विकासकामे करूनच फेडण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे आज आमचा सत्कार नसून भविष्याच्या झंझावाती विकासकामांची ऊर्जा आहे, या शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

    sudhir mungantiwar satkar

    धुकं कायमस्वरुपी नसतात
    आम्हाला सत्तेची भूक नाही, आम्हाला विकासाची भूक आहे. पदाचीही भूक नाही. मी पदाची चिंताही केली नाही, याचाही त्यांनी उल्लेख केला. आज मुंबईहून नागपूरला विमानाने निघालो, पण विमान नागपुरात उतरलेच नाही. कारण नागपूरच्या आकाशात धुकं होते. शेवटी विमान हैदराबादला उतरले. एक तासाने वातावरण चांगले झाले आणि आम्ही नागपूरच्या विमानतळावर उतरू शकलो. आयुष्याचे असेच असते. काही क्षण धुकं येतात, पण ते कायमस्वरुपी नसतात. पुन्हा आपले विमान उतरणार, हे निश्चित असते.  (Sudhir mungantiwar mla)

    भाग्यवान चंद्रपूर जिल्हा
    अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जगातील कोणत्याही भक्ताला माझ्या जिल्ह्यातील सागवनाने तयार झालेल्या दरवाज्यातूनच जावे लागते. देशातील कोणत्याही खासदाराला आम्ही तयार केलेल्या दरवाज्यातूनच संसदेत प्रवेश करावा लागतो. पीएमओमधील पंतप्रधानांची खूर्ची देखील आम्हीच तयार केली आहे. असा भाग्यवान आमचा जिल्हा आहे,असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • Pratibha Dhanorkar | चंद्रपूर जिल्ह्यातील विकासाबाबत खासदार धानोरकरांचा आक्रमकपणा

    Pratibha Dhanorkar

    Pratibha Dhanorkar : लोकसभेचे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत पार पडले. हे अधिवेशन विविध कारणांनी चर्चेत राहिले. विरोधकांनी विविध आयुधांच्या माध्यमातून संसदेत सरकार ला घेरण्याचा प्रयत्न केला.

    चंद्रपूर-वणी-आर्णी लोसकभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विविध प्रश्न व चर्चेच्या माध्यमातून सरकार ला धारेवर धरले होते. यामध्ये प्रामुख्याने उर्जा विभागाद्वारे सौर ऊर्जेच्या संदर्भात सरकार कडे विचारणा केली. त्यासोबतच, कृषी मंत्री यांना शेतकऱ्यांना तात्काळ कृषी पंपाकरीता विज देण्याकरीता काय उपाययोजना केल्या या संदर्भाने विचारणा केली.

    महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचारासंदर्भात सरकार कडे विविध प्रश्न विचारले. वित्त मंत्रालयाअंतर्गत खासदार धानोरकर यांनी मजुरांचा आर्थिक परिस्थितीसंदर्भात सरकार कडे विचारणा करुन देशातील मजुरांच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात चर्चा केली. विद्युत मंत्रालयाअंतर्गत जल विद्युत, पवन उर्जा यासंदर्भात देखील चर्चा केली. श्रम व रोजगार मंत्रालय अंतर्गत अनुसूचित जाती, जनजातीतील बेरोजगार युवकांचा प्रश्न संसदेत मांडला.

    राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

    विधी व न्याय विभागाअंतर्गत न्यायालयीन शुल्क वृध्दी संदर्भात चर्चा करुन सरकार कडे विचारणा केली. त्यासोबच कृषी व कल्याण विभागाअंतर्गत किटकनाशकाद्वारे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यु संदर्भात सरकार चे लक्ष वेधले. ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याकरिता सरकार चे लक्ष वेधले. स्टील, कोळसा व खदान समिती अंतर्गत विविध प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात सरकार चे लक्ष वेधले.

    शून्य प्रहरात देखील बी.एस.एन.एल. च्या महसुल वाढी संदर्भात विविध उपाययोजना करण्याच्या सुचना करीत या कंपनीच्या घसरलेल्या आर्थिक परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली.तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील 2023 च्या पिकविम्याचे हजारो शेतकऱ्यांचे पैसे थकीत असून ते तात्काळ मिळावे अशी आग्रही मागणी लोकसभेत केली.

    खासदार धानोरकर यांनी हिवाळी अधिवेशनात (lok sabha winter session 2024) अनेक प्रश्न व चर्चेत सहभाग नोंदवून जिल्ह्यातील विकासाच्या संदर्भात आक्रमकपणा दाखवून दिला.

  • Amit shah controversy : चंद्रपुरात अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा

    Amit shah controversy

    Amit shah controversy : आंबेडकर, आंबेडकर हे नाव घेणं आता फॅशन झाली आहे, देवाचे नाव घेतलं असत तर तुम्हाला स्वर्ग भेटला असता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या विधानाने देशात वादंग सुरू झालं.


    अमित शाह यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, (amit shah on ambedkar) यासाठी शाह यांनी देशातील जनतेची माफी मागत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आजच्या निषेध मोर्च्यात केली.

    चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (२४ डिसेंबर) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. (Chandrapur congress morcha)

    या मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मोर्चा पार पडला. सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

    चंद्रपूर पोलिसांना मिळाला जल्लाद

    मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सहभाग घेतला.
    मोर्चादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

    काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाह यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत देशातील लोकशाही व घटनात्मक मुल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • yuva sena on amit shah | अमित शाह माफी मांगो

    yuva sena on amit shah

    yuva sena on amit shah : चंद्रपूर – लोकसभा हिवाळी अधिवेशनदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले, यानंतर त्या वक्तव्याचे देशात पडसाद उमटले.

    विरोधकांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निषेध करीत त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत सभात्याग केला.

    जिल्हा बँकेची पदभरती, अधिवेशनात आमदार जोरगेवार संतापले

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान अमित शाह (amit shah controversy) यांनी आपल्या वक्तव्यातून केल्याने आज 21 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर चंद्रपूर जिल्हा युवासेनेतर्फे जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात अमित शाह यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आले.

    संविधानाचे जनक महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान देशवासी खपवून घेणार नाही, बाबासाहेब यांच्या संविधानामुळे आज नागरिकांना समान अधिकार मिळाला आहे, आज देशातील सर्वोच्च सभागृहात जाण्याचा मान बाबासाहेब यांच्यामुळे मिळाला आणि तुम्ही जगाच्या महामानवाचा आपण अश्या शब्दात अपमान करता हे अतिशय निंदनीय बाब आहे.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तात्काळ देशातील जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा या आंदोलनाचे पडसाद भविष्यात बघायला मिळणार असा इशारा व प्रतिक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दिली.

    निदर्शने आंदोलनात.माजी जिल्हा महिला संघटिका कुसुम उदार, जिल्हा समन्वयक विनय धोबे,बाळू भगत, प्रदीप गेडाम, सुजित पेंदोर, तालुका प्रमुख सूरज शेंडे,शहरप्रमुख शहबाज शेख, उप तालुकाप्रमुख विवान रामटेके, उपशहरप्रमुख स्वप्निल पाटील, तालुका समन्वयक प्रज्वल आवळे,शहर प्रमुख  महेश श्रीगिरवार ,सागर धनसकार, सागर गभाणे,सागर रायपुरे, विशाल पाटील, अभिजित वाघाडे,पृथ्वी ठाकूर, धम्मादीप खोब्रागडे, सलमान शेख, राहुल पाटील, शाहरुख शेख यांची उपस्थिती होती.

  • marotrao kannamwar ex cm maharashtra | चंद्रपुरात माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा 125 वा रौप्य महोत्सव कार्यक्रम

    marotrao kannamwar ex cm maharashtra

    marotrao kannamwar ex cm maharashtra : राज्याचे माजी मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपूत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळा आयोजित केला आहे.

    या सोहळ्यानिमित्त १० जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद भूषविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ द्यावा, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेत त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

    चंद्रपुरात महिला व मुलींवर हल्ला


       कर्मवीर मा. सा. कन्नमवार १२५ वी शतकोत्तर रौप्य महोत्सव समिती चंद्रपूरच्या वतीने मा. सा. कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत.

    त्यामुळे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविण्यात यावे, अशी विनंती आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी सूर्यकांत खनके, डॉ. सुरेश महाकुलकर, संदीप गड्डमवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. या सोहळ्यात स्मरणिकेचेही प्रकाशन केले जाणार आहे.

  • Nagpur winter session | शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : आमदार सुधाकर अडबाले

    Nagpur winter session

    Nagpur winter session : शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सभागृहात मांडून सोडविण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असून, प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले (mla sudhakar adbale) यांनी आंदोलनाप्रसंगी दिली.

    मुलांना लागलं मोबाईलचं व्यसन, असं सोडवा

    राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खाजगी अनुदानित विजाभज / आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्‍या शासनदरबारी प्रलंबित आहेत. Nagpur winter session

    प्रलंबित समस्या सोडविण्याकरीता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने माजी आमदार श्री. व्‍ही. यू. डायगव्‍हाणे यांच्या मार्गदर्शनात व विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले, (mla sudhakar sabale) अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख यांच्या नेतृत्‍वात (nagpur winter session) हिवाळी अधिवेशनादरम्यान यशवंत स्टेडियम, नागपूर येथे १९ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले.

    या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेंशन योजना लागू करावी, विना अनुदानित/अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार १००% अनुदान मंजूर करण्यात यावे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय, दि. १५ मार्च २०२४ यातील संचमान्‍यतेबाबत जाचक अटी रद्द करण्यात याव्या, राज्यातील अघोषित शाळा व नैसर्गिक वाढीव तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करून आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी.

    न्यायालयीन आदेशाप्रमाणे नागपूर विभागातील आदिवासी / नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करणाऱ्या विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतनश्रेणी योजनेचे लाभ पूर्ववत सुरू करण्यात यावे, न्यायालयीन आदेशाप्रमानुसार आदिवासी विकास विभागाअंतर्गत आश्रमशाळेतील शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आलेल्या ११५५ शिक्षकांना मानधन वेतनाची थकबाकी अदा करण्यात यावी, दत्तक शाळा योजना राबविण्याबाबतचा शासन निर्णय रद्द करावा, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचा शासन निर्णय दिनांक २३ ऑगष्ट २०२४ नुसार शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून मुक्तता करण्यात यावी. तसेच सदर शासन निर्णयाची अमंलबजावणी करण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात यावे यासह अन्‍य मागण्यांचा समावेश आहे.

    या धरणे आंदोलनात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय पदाधिकारी, जिल्हा, तालुका पदाधिकारी व विदर्भातील विविध विभागाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येेने सहभागी झाले होते.

    सदर आंदोलनातील मागण्यांचे निवेदन मंत्री नाम. अतुल सावे यांना प्रांतीय अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख, प्रांतीय उपाध्यक्ष श्री. रमेश काकडे यांनी विधानभवनात दिले.

  • Ministry of OBC | ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा : खासदार प्रतिभा धानोरकर

    Ministry of OBC

    Ministry of OBC : इतर मागासवर्गीय कल्याण समितीची बैठक दि. 17 डिसेंबर 2024 रोजी दिल्ली येथे आयोजित आली होती. या सभेत ओबीसी कल्याण समितीच्या सदस्या तथा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी संदर्भात अनेक मागण्या लावून धरल्या.

    या बैठकीत प्रामुख्याने देशात संख्येने सर्वात जास्त असणाऱ्या ओबीसी समाजाचे प्रश्न कायमस्वरूपी सुटावे याकरिता त्यांनी केंद्रात ओबीसी मंत्रालयाची (Ministry of OBC) स्थापना करावी, हि मागणी खासदार धानोरकर यांनी लावून धरली.

    चंद्रपूर जिल्ह्यात 11 महिन्यात 194 नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू

    त्यासोबतच देशात जातनिहाय जनगणना होण्याकरीता इतर मागासवर्ग कल्याण समिती (obc kalyan samiti) द्वारा सरकार कडे प्रस्ताव पाठविण्यात यावा अशी देखील मागणी केली. तसेच क्रिमीलेअर च्या उत्पन्नाची मर्यादा दि. 13 सप्टेंबर  2017 पासून अद्यापही वाढविण्यात आलेली नाही, त्यामुळे ओबीसींचा नौकरीतील अनुषेश बघण्यास अडचण निर्माण होत आहे.

    तरी क्रिमीलेअर च्या उत्पन्नाची मर्यादा वाढवावी अशी मागणी देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी कल्याण समितीच्या अध्यक्षांकडे केली. त्यासोबतच, ओबीसी (obc) प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना पुर्ण व जलद गतीने शिष्यवृत्ती मिळावी याकरिता सरकार ने पुढाकार घेण्याकरीता समितीने प्रस्ताव पाठवावा अशी देखील खासदार धानोरकर यांनी मागणी केली.

    यावेळी समितीच्या बैठकीत इतर मागासवर्गीय कल्याण समितीचे संचालक श्री महेश्वर यांच्यासह इतर मागासवर्गीय कल्याण समितीच्या सदस्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  • congress on amit shah | केंद्रीय गृहमंत्र्यांचे विधान देशासाठी वेदनादायी – खा. प्रतिभा धानोरकर

    congress on amit shah

    congress on amit shah : दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या विधानाचे पडसाद देशभर उमटू लागले आहे. इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा वक्तव्याचा संसदेबाहेर निर्दशने करुन निषेध केला.

    केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना संविधानावरील चर्चे दरम्यान आपण आंबेडकर-आंबेडकर करता हि फॅशन झाली आहे. त्या ऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्गात जागा मिळेल असे विधान करुन संपुर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या असल्याची खंत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली.

    पीक विम्याच्या मुद्द्यावर खासदार धानोरकर आक्रमक

    कॉग्रेस सहीत सर्व विरोधी पक्षाच्या खासदारांनी भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (amit shah news) यांच्या विधानाचा निषेध केला.

    या संदर्भात या वक्तव्याप्रती केंद्रिय गृहमंत्री यांनी देशवासीयांची माफी मागावी व संविधान निर्माण करणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक व्हावे अशी भावना देखील खासदार धानोरकर यांनी व्यक्त केली.