Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Wamanrao Chatap public meeting : पराभवानंतर वामनराव चटप म्हणतात…आता थेट रस्त्यावर

    Wamanrao Chatap public meeting

    Wamanrao Chatap public meeting जिवती: तालुक्यातील पट्ट्याचा प्रश्न, वादग्रस्त गावांच्या समस्या, शेतमालाचे रास्त भाव आणि बेरोजगारी असे अनेक प्रश्न जिवती तालुक्यात प्रलंबित आहे.

    हातात तलवार घेऊन चंद्रपुरात दोघांचा उच्छाद

    मतदारांनी सभागृहात पाठविले नसले तरी रस्त्यावरचा संघर्ष करत राहू आणि पराभवाची मरगळ झटकून पुन्हा जोमाने कामाला लागू असे प्रतिपादन ॲड. वामनराव चटप यांनी केले.भाजपचा पैशाचा आलेला महापूर निवडणुकीत रोखता आला नाही.

    नाटक बघण्यासाठी तीन मित्र निघाले मात्र वाटेत काळाचा घाला, तिघांचा मृत्यू

    गैरमार्गाने विजय खेचून आणला असला तरी ताठरपणे विरोध करून जनतेची लढाई समोर नेऊ. रचनात्मक पध्दतीने पुढे जाऊन आक्रमक आंदोलनात जनतेचे प्रश्न तडीस नेऊ असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी उपस्थित ॲड. दीपक चटप म्हणाले की, आता नव्या जोमाने संघटनात्मक बांधणी करु. सातत्य ठेवल्यास संधी मिळेल आणि उभारी घेऊ. Wamanrao Chatap public meeting

    Address to the workers
    कार्यकर्त्यांना संबोधित करताना वामनराव चटप

    शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरुण नवले यांनी निवडून आलेल्या उमेदवाराने जिवती तालुक्यातील जनतेला खोटी प्रलोभन भुलथापा देऊन मत हिरावले असे मत व्यक्त केले. स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे यांनी संघटनात्मक बांधणी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करू. चुकांचे आत्मचिंतन करू.

    86 हजार पगाराची नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    जिवती तालुक्यातील प्रश्न सोडविण्याचे सामर्थ्य ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वात आहे. आगामी काळात कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करु असे मांडले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. Wamanrao Chatap public meeting

    ॲड. वामनराव चटप यांची साथ सोडणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी मांडले. यावेळी सुदाम राठोड, दत्ता राठोड, नरसिंग हामने, शब्बीर जहागीरदार, सयासराव कुंडगिर, देवीदास वारे, श्रीनिवास वाघमारे, विनोद पवार, जैतू कोडापे, बालाजी कांबळे, गणेश कदम, मारोती कांगने, रामेश्वर नामपल्ले आदींची उपस्थिती होती.

    आता लढाई रस्त्यावर

  • Sudhir Mungantiwar started work : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar started work

    sudhir mungantiwar in Field
    कैलास गायकवाड यांच्यासोबत चर्चा करताना सुधीर मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar started work चंद्रपूर जिल्ह्यात धान पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने काढणीच्या वेळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या अनुषंगाने, पुढे सर्वेक्षण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी विभाग प्रधान सचिव जयश्री भोज तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव कैलास गायकवाड यांच्या सोबत बैठक घेत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. धान उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले.

    86 हजारांची नोकरी हवी, तर आजच करा अर्ज

    जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी लष्करी अळी तसेच इतर किडींच्या प्रादुर्भावामुळे हवालदिल झाला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. Sudhir Mungantiwar started work

    अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असून सदर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी. शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता तातडीने आर्थिक मदत करण्याबाबत उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देखील ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालय येथे बैठकीत संबधित अधिकारी यांना दिले.

    प्रचाराच्या रणधुमाळीतही पाठपुरावा

    नुकतीच विधानसभा निवडणूक आटोपली. ना. सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. प्रचार, जाहिरसभा, प्रत्यक्ष भेटीमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी प्रधान सचिव यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अवगत केली होती. आता या संदर्भात आढावा घेत ताबडतोब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासंदर्भात निर्देश दिले. Sudhir Mungantiwar started work

    शेतकऱ्यांप्रती संवेदनशील

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची विक्रमी 202 कोटीची रक्कम मिळू शकली. शेतकऱ्याच्या धानाला 20 हजार रुपये हेक्टरी बोनस देऊन भात उत्पादक शेतकऱ्याला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. सदैव शेतकऱ्यांप्रती ना. मुनगंटीवार संवेदनशील असतात, हे विशेष.

  • Downfall of BSP party : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बसपाची पडझड

    Downfall of BSP party 14 एप्रिल 1984 मध्ये कांशीराम यांनी बहुजन पक्षाची स्थापना केली, बसपाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे, राजकीय क्षेत्रातील निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला.

    Downfall of BSP party उत्तरप्रदेश राज्यात बसपाची सत्ता स्थापन झाली होती, देशाच्या राजकारणात बसपाने चांगलीच मुसंडी मारली मात्र कालांतराने आज बसपाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला लागला आहे, कारण बसपा नेतृत्व राजकारणात फारसे रस नसल्याचे चित्र दाखवीत आहे.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात बहुजन समाज पक्षाची पूर्वीची व आताची स्थिती काय? विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत बसपाची भूमिका काय होती? यावर आपण चर्चा व उमेदवारांच्या मतांवर एक नजर टाकूया. Downfall of BSP party

    अपक्ष उमेदवार यांनी लावला ईव्हीएम मशीन घोटाळ्याचा आरोप

    वर्ष 1990 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत बसपाने आपला उमेदवार उभा केला होता, त्यावेळी कांग्रेसचे श्याम वानखेडे विजयी झाले होते, त्यांना एकूण 57 हजार 622 मते मिळाली होती.

    दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष गयाचरण त्रिवेदी उर्फ धन्नू महाराज यांना 24 हजार 947 मते मिळाली, तिसऱ्या क्रमांकावर खोब्रागडे रिपब्लिकन पक्षाचे जयंतराव पडवेकर यांना 22 हजार 486 मते मिळाली.

    बहुजन समाज पक्षाचे उमेदवार देवराव कोल्हे यांना केवळ 1 हजार 148 मते मिळाली, त्यांना पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

    वर्ष 1995 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे विजयी झाले होते त्यांना एकूण 94 हजार 379 मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे श्याम वानखेडे यांना 29 हजार 915 मते, तिसऱ्या क्रमांकावर जनता दलाचे महेबूब राजाखान यांना 29 हजार 167 मते मिळाली होती. या निवडणुकीत सुद्धा बसपाने सहभाग घेतला, बसपाने राजकुमार तिरकुटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले, त्यांनी थेट चौथ्या क्रमांकावर मजल मारीत 6 हजार 832 मते मिळवली होती. Downfall of BSP party

    वर्ष 1999 मध्ये चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला नाही, वर्ष 2004 च्या निवडणुकीत बसपाने सहभाग घेतला, त्यावेळी भाजपचे सुधीर मुनगंटीवार विजयी झाले त्यांना एकूण 94 हजार 3 मते मिळाली होती.

    दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे गजानन गावंडे गुरुजी यांना 67 हजार 102 मते मिळाली, तर तिसऱ्या क्रमांकावर बसपाचे नंदकिशोर मंडलिक यांना 11 हजार 311 मते मिळाली. Downfall of BSP party

    वर्ष 2009 मध्ये भाजपचे नाना श्यामकुळे निवडणुकीत विजयी झाले, 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जाती करीता राखीव होते. श्यामकुळे यांना एकूण 67 हजार 255 मते मिळाली होती, दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेस पक्षाच्या बिता रामटेके यांना 51 हजार 845 मते मिळाली यावेळी तिसऱ्या क्रमांकावर बसपाने मजल मारली. बसपाच्या उमेदवार तनुजा खोब्रागडे यांना 14 हजार 35 मते मिळाली.

    वर्ष 2014 मध्ये चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे नाना श्यामकुळे हे दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले त्यांना एकूण 81 हजार 483 मते मिळाली, दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांना 50 हजार 711 मते तिसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 25 हजार 140 मते चौथ्या क्रमांकावर भारिप बहुजन महासंघाचे अनिरुद्ध वनकर यांना 14 हजार 683 मते मिळाली. Downfall of BSP party

    बसपाचे उमेदवार थेट पाचव्या क्रमांकावर आले, अंकलेश नथुजी खैरे यांना 8 हजार 357 मते मिळाली. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर बसपातून लढलेले उमेदवार पक्ष बांधणी मध्ये दिसून येत नाही.

    वर्ष 2019 च्या चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांचा विजय झाला त्यांना एकूण 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली, दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे नाना श्यामकुळे यांना 44 हजार 909 मते मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अनिरुद्ध वनकर यांना 15 हजार 403 मते तर चौथ्या क्रमांकावर कांग्रेसचे महेश मेंढे यांना 14 हजार 284 मते मिळाली होती. Downfall of BSP party

    पाचव्या क्रमांकावर पीपीआयडी चे नामदेव गेडाम यांना एकूण 3 हजार 956 मते मिळाली तर बसपाने 6 व्या क्रमांकावर मजल मारीत भिखु बुद्धशरण यांना 1 हजार 772 मते मिळाली.

    वर्ष 2024 च्या निवडणुकीत भाजपचे किशोर जोरगेवार हे दुसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले त्यांना एकूण 1 लाख 6 हजार 841 मते, दुसऱ्या क्रमांकावर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते, तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष ब्रिजभूषण पाझारे यांना 14 हजार 598 मते, चौथ्या क्रमांकावर अपक्ष राजू झोडे यांना 5 हजार 711 मते तर पाचव्या क्रमांकावर बसपाचे मनोज लाडे यांना 1 हजार 891 मतांवर समाधान मानावे लागले. Downfall of BSP party

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या एकूण सात वेळा बसपाने उमेदवार उभा केला होता वर्ष 2009 मध्ये तनुजा खोब्रागडे यांना 14 हजारांच्या वर मते मिळाली होती, त्यानंतर बसपा पक्षाला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात उतरती कळा लागली.

    आता बसपाची चंद्रपूर जिल्ह्याची सूत्रे युवा नेते शिरीष गोगुलवार यांच्या हाती गेली, लोकसभा व आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली मात्र त्याना फारसे यश मिळाले नाही. वर्ष 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे, यामध्ये बसपाला किती यश व अपयश येत ही आगामी वेळ सांगणार.

  • Evm scam in elections : लोकशाही धोक्यात, निवडणुकीत ईव्हीएम चा घोळ

    Evm scam in elections चंद्रपूर – राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वच विरोधी पक्षांना पराभवाची धूळ चारली मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून निवडणूक जिंकल्याचा आरोप बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार प्रकाश पाटील मारकवार यांनी केला.

    Evm scam in elections नूकतेच विधानसभा 2024 च्या निवडणुकीचा चा निकाल घोषित झाला. निवडणुकीत 6 विधान क्षेत्रा पैकी 5 विधानसभा क्षेत्रात भाजपा उम्मीद्वार तर 1 विधानसभा क्षेत्रात कांग्रेस उम्मीद्वार विजयी झाले. परंतु या निवडणूकीत काही क्षेत्रातील अनपेक्षित निकाल बघता मतमोजणी मध्ये 100 टक्के ईव्हीएम चा घोळ झाल्याचा आणि अपक्ष उम्मेद्वारांचे मत भाजपा आणि कांग्रेस यांचेकडे वळविल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रकाश पाटील मारकवार यांनी पत्रपरीषदेत केला.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रवीण पडवेकर यांच्या उमेदवारीने कांग्रेसला आले अच्छे दिन

    यासंदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असुन ईव्हीएम मशीन विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला. Evm scam in elections

    मारकवार म्हणाले की, ते 30 वर्षापासून राजकारणात कार्यरत आहे. वर्ष 1990 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यांवेळी बैलेट पेपर वर मतदान घेण्यात येत होते. त्यावेळी मुल सावली विधानसभा क्षेत्रातुन 6000 मत घेतली होती. वर्ष 1992_97 मध्ये जिल्हा परीषद अध्यक्ष झाले.

    वर्ष 2009_14 दरम्यान जिला परीषद सदस्य राहीले. संपूर्ण कारकिर्द राजकारण आणि समाजकारणात घालविली आहे. आता विधानसभा 2024 मध्ये ही बल्लारपुर_मूल मतदारसंघातुन अपक्ष उम्मेद्वार म्हणून उभा होता. यावेळी मतगणना मध्ये फक्त 322 मते दाखविण्यात आली. परंतु पैतृक गांव राजगड 1000 च्या वर लोकवस्तीचे गांव आहे. Evm scam in elections

    गांवात विचारणा केली असता राजगड गांवातच 300 मत मिळाल्याची दाट शक्यता यावेळी त्यांनी वर्तविली. 1000 च्या वर कार्यकर्ता निवडणूकीच्या कामाला लागले होते. या निवडणूकीत घेतलेली मेहनत आणि लोकांसोबत केले संपर्क व त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद बघता 30 हजार च्या वर मत मिळण्याची शक्यता त्यांनी यावेळी वर्तविली.

    अंतिम निकाल शीट वर फक्त राजगड गांवामध्ये 25 मत मिळाले आहे. बाकि अन्य ठीकाणी 0_1_1_0 असेच मत मिळाले आहे. यावेळी मारकवार यांनी अपक्षांचे मत भाजपा व कांग्रेस कडे वळविल्याचा आरोप ही यावेळी केला आहे. काही विधानसभा क्षेत्रा मध्ये मतमोजणी नंतरचा अनपेक्षित निकाल बघता 100 टक्के ईव्हीएम मशीन चा घोळ झाल्याचा आरोप मारकवार यांनी पत्रपरीषदेत केला आहे.

    याप्रकारच्या मतदानाने लोकशाही ध्योक्यात येत आहे. अन्य अपक्ष उम्मेद्वार सोबतच नागरीकांनी समोर येऊन ईव्हीएम मशीन विरोधात जोरदार आवाज बुलंद करून बैलेट पेपर वर मतदान घेण्याची मागणी करायला हवी. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहीती प्रकाश मारकवार यांनी दिली.

  • The tiger of Chandrapur : चंद्रपूरचा वाघ आला

    The tiger of Chandrapur चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात मोठ्या मताधिक्याने निवडून येत आमदार किशोर जोरगेवार यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा चंद्रपूरचा गड मिळवून दिला आहे.

    The tiger of Chandrapur आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाल घालून आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत व सत्कार केला.

    चंद्रपुरात पुन्हा देशी कट्टा जप्त

      नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा २२,००० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.

    आमदार जोरगेवार सलग दुसऱ्यांदा चंद्रपूर विधानसभेचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले आहेत. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून भाजप उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत त्यांनी मोठ्या विजयाची नोंद केली. त्यामुळे चंद्रपूर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे बळ पुन्हा वाढले आहे. The tiger of Chandrapur

      दरम्यान, आज मुंबईत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी आमदार जोरगेवार यांचा शाल घालून त्यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, “पक्षाने दाखविलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.

    विशेष म्हणजे ज्यावेळी जोरगेवार उपमुख्यमंत्री फडणवीस भेटण्यासाठी गेले असता त्यांना बघून चंद्रपूरचा वाघ आला असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. The tiger of Chandrapur

    पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकेल, यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच, चंद्रपूरातील विकासकामे मार्गी लावणार असल्याचे यावेळी ते म्हणाले आहे. 

  • congress pravin padvekar : पडवेकर यांनी इतिहास रचला

    congress pravin padvekar वर्ष 1995 पासून चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत सतत पराभव झेलणाऱ्या कांग्रेस पक्षाला प्रवीण पडवेकर यांनी मताधिक्य मिळवून दिले.

    congress pravin padvekar वर्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा पराभव झाला असला तरी कांग्रेस पक्षाने शेवटपर्यंत लढत देत 84 हजार 37 मते घेतली मागील 30 वर्षात कांग्रेस पक्षाला विधानसभा निवडणुकीत मिळालेले हे मोठे मताधिक्य आहे.

    पडवेकर यांचा 22 हजार 804 मतांनी पराभव झाला, या निवडणुकीत पडवेकर यांना कांग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी साथ दिली नाही, त्यांना प्रचारात सुद्धा एकटे पाडण्यात आले.

    जिल्ह्यातील धानोरकर-वडेट्टीवार यांच्या वादात पडवेकर यांची चांगलीच कोंडी झाली, जर धानोरकर गटाने पडवेकर यांना सहकार्य केले असते तर आज निकाल काही वेगळाच लागला असता कांग्रेस पक्ष्याचा या अडेलट्टूपणामुळे आज कांग्रेस पक्षाचा जिल्ह्यात लाजिरवाणा पराभव झाला. congress pravin padvekar

    पडवेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर 23 इच्छुक उमेदवार नाराज झाले, यापैकी काही मोजक्या इच्छुकांनी पडवेकर यांना साथ दिली तर काहींनी धानोरकर गटाला सहकार्य केले.

    वर्ष 1995 मध्ये कांग्रेस पक्षाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर विधानसभा जागा हिसकावली त्यानंतर सतत 30 वर्षे चंद्रपूर विधानसभा भाजपच्या ताब्यात आहे,). (वर्ष 2019 वगळता)

    मुनगंटीवार व श्यामकुळे यांच्या समोर एकही सक्षम नेता कांग्रेस 30 वर्षाच्या काळात तयार करू शकली नाही, यंदा विधानसभा क्षेत्रातील वातावरण भाजप विरोधी होतं, मात्र उमेदवारी वडेट्टीवार यांच्या गटाला मिळाली त्यामुळे धानोरकर गटाने पडवेकर यांना सहकार्य करणे टाळले.

    पडवेकर हे एकला चलो च्या भूमिकेत दिसले, त्यांनी भाजप उमेदवार जोरगेवार यांना शेवटपर्यंत लढत दिली, चंद्रपुरात कांग्रेसचा दुष्काळ संपणार अशी स्थिती होती मात्र तसे काही झालं नाही. congress pravin padvekar

    अपक्ष उमेदवार यांनी गाजविले निवडणुकीचे मैदान

    1995 ते वर्ष 2009 पर्यंत चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी केले तर वर्ष 2009 पासून नागपूरचे नाना श्यामकुळे यांनी 2019 पर्यंत भाजपचा झेंडा विधानसभेत रोवला, 19 मध्ये अपक्ष उमेदवार जोरगेवार यांनी श्यामकुळे यांचा 72 हजार मतांनी पराभव केला.

    वर्ष 2014 मध्ये कांग्रेस उमेदवार महेश मेंढे यांना केवळ 25 हजार 140 मते मिळाली, कांग्रेस तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेली, 2019 मध्ये कांग्रेसची स्थिती विदारक झाली, उमेदवार महेश मेंढे यांना केवळ 14 हजार 284 मते मिळाली यावेळी कांग्रेस चौथ्या स्थानावर फेकल्या गेली.

    चौथ्या स्थानावर असलेल्या कांग्रेस पक्षाला क्रमांक 1 वर कसे आणायचे असा पेच निर्माण झाला होता, वर्ष 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांची लाट आली या लाटेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाला मोठं मताधिक्य मिळालं. Congress

    हे मताधिक्य विधानसभा निवडणुकीत असेच राहील हा आत्मविश्वास कांग्रेस पक्षाला नडला, आपण निवडणूक जिंकू या अंधारात संपूर्ण पक्ष राहिला, मात्र ऐनवेळी धानोरकर यांनी आपल्या भावाच्या उमेदवारी साठी चंद्रपूर ची जागा वडेट्टीवार गटाला सोडली आणि कांग्रेस पक्ष पुन्हा गटबाजी च्या घेऱ्यात सापडला.

    चंद्रपूर जिल्ह्याचा नवीन पालकमंत्री कोण?

    या संधीचा भाजपने चांगला वापर केला व पुन्हा भाजपने चंद्रपूर विधानसभा जिंकली, मात्र 2019 मध्ये चौथ्या स्थानावर असलेल्या कांग्रेसने भरारी घेत दुसऱ्या स्थानावर झेप घेत मोठं मताधिक्य मिळविले. Congress

    धानोरकर गटाचा पाठिंबा पडवेकर यांना मिळाला असता तर आज निकाल काही वेगळा असता अशी चर्चा कांग्रेस पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे. विशेष बाब म्हणजे दर निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा उमेदवार हा निवडणूक हरल्यावर जनतेशी सम्पर्क तोंडात अज्ञातवासात जातो आणि निवडणूक जाहीर झाली की परत येतो. Congress

    यामुळे कांग्रेस पक्ष एकही सक्षम उमेदवार तयार करू शकली नाही, आणि उमेदवार मिळाला तर त्याला सहकार्य करण्याचे कौशल्य स्थानिक नेते दाखवीत नाही.

  • Guardian Minister chandrapur : कोण होणार चंद्रपूर जिल्ह्याचा पालकमंत्री?

    Guardian Minister chandrapur महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप पक्ष वरचढ ठरला असून महायुती यंदा 200 पार झाल्याने दोन दिवसात राज्यात नवं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली वाढल्या आहे.

    Guardian Minister chandrapur मंत्रिपदासाठी अनेकांनी बाशिंग बांधले असून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात या बंडखोरांची चर्चा

    चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा निवडणुकीत सलग सात वेळा विजय मिळविला आहे, त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे निश्चित आहे.

    सरकार स्थापणने नंतर सुधीर मुनगंटीवार यांचा शपथविधी होणार हे नक्की आहे, पण जिल्ह्याच्या राजकारणात भाजपातून विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक मारलेले किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार अशी चर्चा आहे.

    मंत्रिपद मिळाल्यावर चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री पदी कुणाची वर्णी लागणार? कोण होणार जिल्ह्याचा पालकमंत्री याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, भांगडीया सुद्धा पालकमंत्री पदासाठी आग्रही असू शकतात.

    पक्ष श्रेष्ठीने ठरविल्यास जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार, मात्र सध्यातरी मुनगंटीवार हे जेष्ठ नेते असल्याने त्यांना पुन्हा ही जबाबदारी दिल्या जाऊ शकते. असे झाल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील 2 नेते मंत्रिमंडळात आपले स्थान पक्के करणार.

    2 मंत्री असल्यावर जिल्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर असणार हे विशेष.

  • Kishor Jorgewar live : हा विजय जनतेचा – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar live आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणदणीत विजयानंतर तहसील कार्यालयातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांना अभिवादन करत आमदार जोरगेवार गांधी चौकात पोहोचले.

    Kishor Jorgewar live यावेळी जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्या वरती फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर क्रेनच्या माध्यमातून भव्य हार घालून कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

    Winning rally
    रॅलीत उसळला जनसागर

    चंद्रपूर जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांनी गाजवलं निवडणुकीचे मैदान

    आमदार जोरगेवार यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी वॉर्डागणिक फटाके फोडून जल्लोष केला. संध्याकाळी सात वाजता तहसील कार्यालयातून सजवलेल्या खुल्या गाडीतून भव्य रॅली काढण्यात आली.

    जटपूरा गेट मार्गे गांधी चौकापर्यंत गेलेल्या या रॅलीत नागरिक, विविध संघटना, संस्था व मंडळांच्या वतीने पुष्पहार घालून आमदार किशोर जोरगेवार यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक ठिकाणी जेसीबीने फुलांचा वर्षाव करत आमदार किशोर जोरगेवार यांचे स्वागत करण्यात आले. Kishor Jorgewar live

    50 वर्षांत न झालेली कामे पाच वर्षांत पूर्ण केली; हा विकासपर्व असाच सुरू राहील

    रॅली गांधी चौकात पोहोचताच तिचे रूपांतर भव्य सभेत झाले. सभेला संबोधित करताना आमदार जोरगेवार म्हणाले की, “मागील पाच वर्षांत मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासावर भर दिला.

    Vijayi sabha
    गांधी चौकात ऐतिहासिक सभा

    अपक्ष असतानाही चार उड्डाणपूल, धानोरा बॅरेजसारखी पाण्याच्या प्रश्नावर उपाययोजना, महाकाली मंदिर परिसरासाठी कोट्यवधींचा निधी, वढा तीर्थक्षेत्रासाठी २५ कोटी रुपये, दीक्षाभूमीसाठी ५७ कोटी रुपये, टायगर सफारीसारखी महत्त्वाची कामे आपण पाच वर्षात केली.

    चंद्रपुरात सुरू झालेला विकासपर्व पक्षाच्या साथीत आणखी गतीशील करणार करू असे ते यावेळी म्हणाले.
    आमदार जोरगेवार पुढे म्हणाले की, “मागील ३० दिवस संघर्षमय होते. मातोश्री अम्मा यांचे निधन झाले, मात्र चंद्रपूरकरांच्या स्नेहाने मला धीर दिला. Kishor Jorgewar live

    भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्याला चंद्रपूरच्या जनतेने पाठिंबा दिला. सलग दुसऱ्यांदा निवडून देऊन सर्वसामान्य कुटुंबातील एका मुलाला मोठं केलं आहे. या उपकारांची परतफेड होणार नाही, पण तुमच्या प्रत्येक दु:खात मी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहीन.”


    चंद्रपूरच्या विकासाबाबत नागरिकांच्या सूचनांचा सन्मान राखत समान न्याय व सर्वसमावेशक विकासाचे धोरण राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, “पर्यटन विकास हे चंद्रपूरच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे.

    ताडोबासोबतच चंद्रपूरच्या ऐतिहासिक, धार्मिक वारशाचा प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे,” असे सांगून त्यांनी पर्यटन वाढीच्या दृष्टीने प्रयत्नांची ग्वाही दिली. सभा मंचावरून जनसमुदाया पुढे नतमस्तक आमदार जोरगेवार यांनी नागरिकांचे आभार मानले. या प्रसंगी हजारो नागरिकांची उपस्थिती होती.

  • Rebel candidates : चंद्रपूर जिल्ह्यात बंडखोरांनी गाजविले निवडणुकीचे मैदान

    Rebel candidates राज्यात संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट आली, भाजपने विरोधकांना चारही मुंड्या चित केले, मात्र काही जागांवर भाजप उमेदवारांना नाकी नऊ आणणारे अपक्ष उमेदवार यांनी चांगलेच मैदान गाजविले.

    Rebel candidates चंद्रपूर जिल्ह्यातील काही जागांवर पक्षातून बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढली काहींनी दिग्गजांना आवाहन दिले तर काही घराणेशाही विरोधात लढले, निवडणूक हरली तरी अपक्षांचं नाव मात्र मतदारांच्या चर्चेत राहिलं.

    चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 5 जागेवर महायुती तर 1 जागा कांग्रेसच्या वाट्याला

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे कांग्रेसचे संतोष रावत व कांग्रेस पक्षातून बंडखोरी करीत निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना आवाहन देण्यासाठी उभे राहिलेल्या डॉ.अभिलाषा गावतुरे यांनी शेवटपर्यंत लढत दिली. Rebel candidates

    सातव्यांदा विधानसभा निवडणुकीत उतरलेले सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते मिळाली तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते तर अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मतांवर समाधान मानावे लागले. मुनगंटीवार यांनी 25 हजार 985 मतांनी विरोधकांचा पराभव केला. Rebel candidates

    अभिलाषा गावतुरे

    अभिलाषा गावतुरे यांनी कांग्रेस पक्षाची तिकीट मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र पक्ष श्रेष्ठीने त्यांना उमेदवारी नाकारली, मात्र लढण्याची तयारी केल्यावर गावतुरे यांनी माघार न घेता उमेदवारी अर्ज दाखल केला. Rebel candidates

    अनेक गावात प्रचार सभा घेतल्या नागरिकांचा प्रतिसाद त्यांना मिळाला, इतकेच नव्हे तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काही गावातील नागरिकांनी गावतुरे यांना मतदान करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर डॉली चायवाला सुद्धा आला, केटली निवडणुकीत जिंकणार असा निर्धार मनात ठेवत गावतुरे लढल्या. Rebel candidates

    मात्र भाजपच्या सुनामीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, जर कांग्रेस पक्षातून गावतुरे यांना तिकीट मिळालं असत तर परिस्थिती काही और असती. इतरांप्रमाणे त्यांनी निवडणुकीतून माघार न घेता त्या खंबीरपणे लढल्या याची चर्चा सध्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात रंगली आहे.

    वरोरा भद्रावती मतदार संघातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी उमेदवारी आपल्या पक्षाच्या वाट्याला मिळावी यासाठी अनेक प्रयत्न केले, विशेष म्हणजे त्यांना उबाठा गटाने AB फॉर्म सुद्धा दिला. पण ऐनवेळी कांग्रेस खासदार धानोरकर यांच्या हट्टापुढे वरोरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी त्यांच्या भावाला मिळाली.

    मुकेश जीवतोडे

    मुकेश जीवतोडे यांच्याकडून पक्षाने उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगितले मात्र आता माघार नाही असा मनात निर्धार करीत जीवतोडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला, भाजपचे करण देवतळे व कांग्रेसचे प्रवीण काकडे यांच्या पुढे मुकेश जीवतोडे निवडणुकीच्या रिंगणात उभा झाला.

    करण देवतळे यांचे वडील आमदार व मंत्री होते त्यांचा वारसा घेत करण निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाला, तर दुसरीकडे खासदार धानोरकर यांचे सख्खे भाऊ प्रवीण काकडे यांची काडीमात्र क्षमता नसताना उमेदवारी आपल्या घरी रहावी यासाठी त्यांना निवडणुकीत उभे करण्यात आले.

    दोघांच्या घराणेशाही विरुद्ध कसलाही राजकीय लेबल नसताना मुकेश जीवतोडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली, वरोरा विधानसभा क्षेत्रात डोअर तो डोअर त्यांनी प्रचार सुरू केला.

    मतदारांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत होता, 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी सुरू झाली, यामध्ये कांग्रेस उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकल्या गेले तर जीवतोडे जिंकण्यासाठी धडपड करताना दिसत होते.

    मतमोजणी पूर्ण झाल्यावर भाजप उमेदवार करन देवतळे यांना एकूण 65 हजार 170 मते तर अपक्ष मुकेश जीवतोडे यांना 49 हजार 720 मते मिळाली तर कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मतांवर समाधान मानावे लागले. देवतळे यांनी विरोधी उमेदवारांचा 15 हजार 450 मतांनी पराभव केला.

    जीवतोडे शेवटपर्यंत घराणेशाही विरुद्ध निवडणुकीत लढले याची चर्चा वरोरा विधानसभा क्षेत्रात चांगलीच रंगली आहे.

  • Pravin Kakade defeated : प्रवीण काकडे यांचा पराभव, खासदार धानोरकर यांची पहिली प्रतिक्रिया

    Pravin Kakade defeated 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, या निकालात महायुती ने जोरदार मुसंडी मारली, तर महाविकास आघाडीचे सत्तेचे स्वप्न भंगले.

    Pravin Kakade defeated चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांनी कांग्रेस पक्षाची लाज राखली, तर आपल्या भावाला वरोरा विधानसभा क्षेत्रातून कांग्रेस पक्षाचे तिकीट खासदार बहीण प्रतिभा धानोरकर यांनी अनेकांचा विरोध पत्कारीत खेचून आणले मात्र प्रवीण काकडे यांचा पराभव झाला, इतकेच नव्हे निकालात काकडे हे तिसऱ्या स्थानी गेले.

    चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व

    जय पराजय हा राजकारणाचा एक भाग असून विधानसभा निवडणूकीत लोकसभा क्षेत्रातील जनतेने दिलेला कौल मान्य करीत असल्याच्या भावना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

    राजकारणात अनेकदा काही चुका न कळत होत असतात. त्या चुका आमच्या हातुनही झाल्या आहेत. परंतु जय झाला तर माजयचं नाही आणि पराजय झाला तर लाजायचं नाही ही आमची वृत्ती असून मी एक खासदार म्हणून येणाऱ्या  साडेचार वर्षांच्या काळात जनेतच्या पाठीशी सदैव उभी राहील. Pravin Kakade defeated

    लवकरच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून परभवाची समिक्षा करणार असून भविष्यात गाव, तालुका व जिल्हा पातळीवरील संघटन मजबुतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

    जनतेतून निवडून आलेल्या सर्व आमदारांना शुभेच्छा देऊन जात, धर्म, पंत या पलिकडे जाऊन आपण आपल्या क्षेत्रातील विकासाचा पाया मजबुत करावा, अशी आशा बाळगून पुनःश्च एकदा मी माझ्या मतदारुपी माय-बापांचा धन्यवाद व्यक्त करत असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.