Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Mission Shikhar chandrapur : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची JEE परीक्षेत उत्तुंग भरारी

    Mission Shikhar chandrapur : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची JEE परीक्षेत उत्तुंग भरारी

    Mission Shikhar chandrapur एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना JEE/NEET/CET/NDA/CLAT अशा विविध परिक्षेचे मोफत मार्गदर्शन प्रशिक्षक / शिक्षक यांच्या मदतीने दिले जाते. दिनांक 24 एप्रिल 2024 ला JEE परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये मिशन शिखर मधील 5 आदिवासी विद्यार्थी पात्र झाले आहेत.

     

     यात सुनिता श्यामराव मेश्राम, रा. जिवती (69.14 टक्के),  प्रितिका जंगु करपाते, रा. भारी  (68.23 टक्के), अदिती उमेश जुमनाके, रा. मांडवा, ता. कोरपना (64.44 टक्के), अर्जुन विजु वेलादी, रा. कारगाव, ता. कोरपना  (54.46 टक्के) आणि गौरव चित्तरंजन कोवे, रा. मोहाळी, ता. बल्लारपूर (47.46 टक्के) अशी पात्र विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी चंद्रपूर जिल्हयातील असून आदिवासी समाजाचे आहेत तसेच हे विद्यार्थी एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक  स्कुल, देवाडा येथे शिकत आहेत. सर्व पात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रकल्प कार्यालयात आमंत्रित करून त्यांना भेट वस्तू देवून त्यांचा सत्कार केला. Mission Shikhar chandrapur

     

    मिशन शिखर 2023-2024 अंतर्गत जेईई/नीट/सीईटी/एनडीए/सीएलएटी चा CRASH Course प्रकल्पात राबविला जात असून त्यामध्ये यावर्षी सीईटी करीात 85, जेईई 27, नीट 54 आणि एनडीए साठी 20 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. भविष्यात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पात्र करणे हा आदिवासी विकास प्रकल्पाचा उद्देश असल्याचे प्रकल्प अधिकारी श्री. राचेलवार यांनी सांगितले. Mission Shikhar chandrapur

     

    प्रकल्पात पहिल्यांदाच ऐवढ्या संख्येने आश्रम शाळेतील विदयार्थी जेईई सारख्या परीक्षेत पात्र झालेले आहेत. आदिवासी विद्यार्थीसुद्धा कोणत्याही परिस्थितीवर मात करून घवघवीत यश संपादन करू शकतो, हे या यशाने दाखवून दिले आहे. मे 2024 ला होणा-या विविध मेडिकल / इंजिनिअरींग परीक्षेकरीता मिशन शिखर अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी पात्र होतील, असा विश्वास प्रकल्प अधिकारी यांनी व्यक्त केला आहे. Mission Shikhar chandrapur

     

     

    यावेळी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मिशन शिखर उपक्रमास भेट देणारे प्रकल्प कार्यालयातील अधिकारी,  एकलव्य मॉडेल रेसीडेंशिअल पब्लिक स्कुल, देवाडा या सर्वांचे कौतुक करण्यात आले आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांकरीता मिशन शिखर, समर कॅम्प, ताडोबा शैक्षणिक सहल, भारत दर्शन, परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ, शिक्षकांकरीता भविष्यावेधी प्रणाली नुसार प्रशिक्षण, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासपूरक प्रशिक्षण असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

  • Mul City Bus Station : मूल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल बेहाल

    Mul City Bus Station : मूल बस स्थानकावर प्रवाशांचे हाल बेहाल

    गुरू गुरनुले

    Mul City Bus Station मुल – स्वच्छ सुदंर शहर म्हणून ओळख असलेल्या मुल शहरात कोटी रुपये खर्च करुन बसस्थानक बांधण्यात आले. तरी देखील अन्य सोई सुविधा, कर्मचाऱ्यांची कर्तव्यात कुचराई मात्र अजूनही कायम असल्याने रात्रीच्या वेळेला प्रवाशी बांधव महिला व शाळेच्या विद्यार्थ्यांचे बेहाल होत असल्याचे अडून राहिलेल्या ग्रामीण प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे.

     

    दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ८-३० वाजता गोंडपीपरी मार्गाकडे जाणारी बस रात्री ८ वाजता यायला पाहिजे परंतु ती बस रात्री ९-४० नंतर आल्याने तोपर्यंत शाळेचे विद्यार्थी व लग्नकार्यालां आलेले जूनासूर्ला,व त्यामार्गावरील असंख्य प्रवासी बसस्थानकावर अडून पडल्याने बिचाऱ्या प्रवाशी बांधवांचे बेहाल झाल्याचे प्रवाशी बांधवांनी बोलून दाखविले आहे. Mul City Bus Station

    Rte – RTE चे नवे नियम पालकांना त्रासदायक

    वाहतूक नियंत्रक गायब

    मुल हे मध्यवर्ती बसस्थानक असल्याने याठिकाणी वाहतूक नियंत्रक यांची ड्युटी सकाळी ५ ते दुपारी १४ नंतर दुपारी १४ ते रात्री २२(१०) पर्यंत असल्या नंतरही ज्या कुणाची ड्युटी आहे तो वाहतूक नियंत्रक रात्री ८ वाजताच घरी निघून जात आहे. त्यामुळे बसस्थानकावर असणाऱ्या प्रवाशांनी कुणाकडून बसची चौकशी करावी असा प्रश्न प्रवाशांना पडला. Mul City Bus Station

     

    चंद्रपूर – गडचिरोली मार्गाच्या बसेस रात्री १० वाजेपर्यंत येतात तेव्हा स्थानकावर कोणीही जबाबदार व्यक्ती दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे. मग स्थांनकावरची वाहतूक व्यवस्था कोण पाहणार.? असा प्रश्न पडतो. Mul City Bus Station

     

    विभागीय नियंत्रक व आगार व्यवस्थापकांनी लक्ष द्यावे

    मुल शहरातील नगराच्या मध्यभागी असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची,ग्रामीण नागरिकांची किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांची तक्रार असतेच. मुल येथील बसस्थानकावर प्रवाशी वाहतुकीबाबत चंद्रपूर जिल्हा विभागीय नियंत्रकांना दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. तसेच आगार व्यवस्थापकांनी सुद्धा मूलच्या बसस्थानका कडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

  • Desecration of statue of Mahatma Phule : त्या समाजकंटकांना अटक करा

    Desecration of statue of Mahatma Phule : त्या समाजकंटकांना अटक करा

    गुरू गुरनुले

    Desecration of statue of Mahatma Phule मुल – ज्या महापुरुषांच्या विचारानेच देशाची लोकशाही टिकली आहे अशाच महात्म्यांच्या पुतळ्याची विटंबना केली जात आहे. तरी देखील केंद्र व राज्य सरकार गप्प आहे. २१ एप्रिल २०२४ रोजी यवतमाळ येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्यांची शाही फेकून विटंबना केली.त्याचा शोध घेऊन अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांचेकडे समाज संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

    कायदा मोफत शिक्षणाचा : RTE च्या नव्या नियमविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका

    माळी महासंघ,समता परिषद, अ.भा.मां.संघ,सावित्रीबाई फुले विकास संस्था, समजोठ्त्थाण मंडळ,महिला गट, ओबीसी व बहुजन समाजाच्या वतीने गांधी चौक मुल येथे निषेध करुन निवेदन देण्यात आले. Desecration of statue of Mahatma Phule

    Mahatma phule

    निवेदन देताना माजी.जी.प.सदस्य,प्रा.रामभाऊ महाडोरे, माजी प्राचार्य बंडू गुरनुले,माळी महासंघाचे विभागीय महासचिव व तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले, प. स.सदस्य डॉ.पद्माकर लेंनगुरे, माजी उपाध्यक्ष चंदू चटारे, भाजपा युवा अध्यक्ष राकेश ठाकरे,स.म.अध्यक्ष प्रा.सुधीर नागोशे, कार्याध्यक्ष शशिकला गावतूरे, माजी सभापती केमदेव मोहूरले, हसन वाढई, डॉ.राकेश गावतूरे ,दीपक वाढई, सरपंच नितीन गुरनूले, राकेश मोहूरले, आनंद गोंगले, अरुण ढोले,सचिन पुल्लावार, चित्तरंजन वाढई,बाळकृष्ण निकोडे, प्रवीण मोहुरले,बालाजी लेंनगूरे, रवी खोब्रागडे, मंगेश शेंडे,सचिन आंबेकर, विवेक मांदाडे, ओमदेव मोहुर्ल, निखिल वाढई, सत्यवान मोहूर्ल,सुनील कावळे, देवराव गुरनुले,राकेश पुंनावार, रेखा चौधरी, शामला बेलसरे, पापिता मंदाडे, जयश्री कावळे, सीमा लोनबले, प्रमिला शेंडे,प्रदीप वाढई, परशुराम शेंडे, रामदास गुरनुले,श्रीरंग नागोशे,नामदेव वाढई,उमेश ढोले यांचेसह अनेक ओबीसी बहुजन समाज बांधव उपस्थित होते.

  • Letter from student to CM : तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक आम्हाला आवडले नाही

    Letter from student to CM : तुम्ही दिलेले पाठ्यपुस्तक आम्हाला आवडले नाही

    Letter from student to CM चंद्रपूर –  महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आणि अति मागास असलेल्या जीवती तालुक्यातील एका चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची चर्चा सध्या राज्यभर झाली होती. तुम्ही दिलेले पाठय़पुस्तक मला आवडले नाही. कारण एका विषयासाठी चार-चार पुस्तके शोधाव लागतात. यापेक्षा आमचे जुने पुस्तकच छान होते. कारण सगळे गणित एका पुस्तकात, सगळे इंग्रजी एका पुस्तकात, सगळे विज्ञान एका पुस्तकात होते. त्यामुळे एकाच विषयाचे पुस्तक वाचायला मजा यायची,’ असे तिने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते.

    राजकीय बातमी अवश्य वाचा – 2 नगरसेवकांनी हाती बांधले शिवबंधन

    सोबतच अभ्यास सोडून तुम्हाला पत्रच लिहीत राहायचे काय? असा प्रश्न तिने उपस्थित केला होता. विद्यार्थिनीने लिहिलेले हे पत्र समाजमाध्यमात वायरल झाले होते.या मुलीचा सत्कार समाजसेवक भूषण फुसे यांनी केला. Letter from student to CM

     

    शैक्षणिक साहित्य त्यांनी भेट दिलेत.राजकारणात आपल्या कर्तुत्वाने फुसे यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. गरजवंतासाठी ते नेहमी धावून जातात. आंदोलनाच्या माध्यमातून जिवती तालुक्यातील अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत. थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न करणाऱ्या या चिमुकल्या विद्यार्थिनी दाखवलेल्या हिमतीचे फुसे यांनी कौतुक केले.

     

    महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर जिवती तालुका वसलेला आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हा तालुका आजही मागासलेला आहे. येथील अनेक गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी कायमचेच या तालुकाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले. मागास असलेल्या या तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलीची चर्चा सध्या राज्यभर झाली होती. Letter from student to CM

  • Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती निमित्याने 5 हजार भक्तांना महाप्रसादचे वाटप

    Hanuman Jayanti 2024 : हनुमान जयंती निमित्याने 5 हजार भक्तांना महाप्रसादचे वाटप

    गुरू गुरनुले

    Hanuman Jayanti 2024 मुल- मुल बसस्थानक येथे श्री. रामभक्त हनुमान मंदिराचे जीर्णोद्धार चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी जि.प. अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी आपल्या मातोश्री कमलादेवी चंदनसिंह रावत यांचे स्मृतीप्रित्यर्थ बस स्थानकावर अनेक वर्षापूर्वी हनुमान मंदिराची स्थापना केली.

     

    तेव्हा पासूनच दरवर्षी हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने थाटामाटात साजरा केल्या जात असून भाविकांचे एक जागृत श्रद्धास्थान बनले आहे. Hanuman Jayanti 2024

    Maha prasad Hanuman
    महाप्रसाद चा लाभ घेताना भक्त

    मुल बसस्थानकावर मुल, सिंदेवाही, पोभूर्णा, सावली, चंद्रपूर, गडचिरोली, ब्रम्हपुरी, चामोर्शी, गोंडपीपरी जाणारे येणारे हजारो भाविक श्री हनुमान मूर्तीचे दर्शन घेत आहेत. आज हनुमान जयंती निमित्त सकाळी ७.०० वाजता मंदिर समिती प्रमुख रुपलसिंह रावत यांचे शुभ हस्ते व संतोषसिंह रावत यांचे प्रमुख उपस्थितीत मिश्रा महाराज यांचे मंत्रोपचारने मूर्ती पूजन महा अभिषेक करण्यात आले. सकाळी ८ वाजता दहेगाव मानकापूर येथील किशोर पेंदाम व त्यांचे मंडळ आकाशवाणी पुरस्कृत प्रसिद्ध भजन मंडळ यांच्या भक्त संगीताचा व काल्याचा कार्यक्रम करण्यात आला. Hanuman Jayanti 2024

     

    सकाळ पासूनच श्री.रामभक्त हनुमान यांच्या दर्शनासाठी मुल शहरातील शेकडो भक्तजन व येणारे जाणारे हजारो प्रवाशी यांनीही हनुमानाचे दर्शन घेतले. दुपारी ११.३० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

     

    महाप्रसादाचे दाते संतोष सिंह रावत यांनी स्वतः महाप्रसादाचे वाटप हाती घेतले त्यांच्या हाताला हातभार लावण्याचे सहकार्य, रूपल रावत, मोना रावत ,दीपक रावत, सभापती राकेश रत्नावार , प्रतीक मुरकुटे, नंदू कागदेलवार , कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, चतुर मोहुरले, प्रवीण चेपूरवार, चित्तरंजन वाढई, राजू चीलके, नवाब पठान संचालक घनश्याम येनुरकर, मंदिराचे पुजारी महाराज केशव गुज्जनवार, समितीचे लोमेश नागपुरे, सुनील मंगर, किशोर गुज्जनवार, छोटू रावत, संजय टिकले, सुमितसिंह बिष्ट, राजू गावतूरे, तेजस महाडोळे, अंकुश ध्यांनबोइंवार, चेतन कावळे, कमलेश रामटेके, अजय झाडे, सोमा नागपुरे, पंकज लाडवे, निखिल पांडव, यांचेसह हनुमान मंदिर समितीचे पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते यांनीही ५००० हजार भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात सहकार्य केले. Hanuman Jayanti 2024

     

    हनुमान जयंती उत्सव दिना निमित्त आलेल्या समस्त भाविकांना व जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांना महाप्रसादाचे वाटप केल्याने आयोजकांप्रती भक्तजनानी आभार व्यक्त केले आहे.

  • The Burning Truck : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर थरार

    The Burning Truck : चंद्रपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर थरार

    The Burning Truck  कोरपना – यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना हायवाच्या टायरने पेट घेतल्याने हायवाला भीषण आग लागली. ही घटना राजुरा – कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील, कोरपना तालुक्यातील आसन खुर्द जवळ सोमवार दिनांक २२एप्रिल ला सकाळी 8 वाजताच्या सुमारास घडली. The Burning Truck

    ही बातमी अवश्य वाचा – मोफत शिक्षणाचा अधिकार हिरावला, बदलले नियम

     

    सद्यस्थितीत राजुरा – कोरपना – राज्य सीमा राष्ट्रीय महामार्ग (National Highway) क्रमांक ३५३ बी चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी महामार्ग निर्मितीचे काम असलेल्या जीआर कंपनी द्वारे मोहदा येथून गिटी आणली जात आहे. तिथून येत असताना अचानक हायवा क्रमांक एच आर ५८ सी ६२४० च्या मागील टायरने पेट घेतला.

    प्रवाश्यानो ही बातमी वाचा – चंद्रपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

    याबाबत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी ड्रायव्हरला कल्पना असता वाहनचालक तात्काळ उतरला. त्यामुळे तो ही सुदैवाने बचावला.
    मात्र कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने त्याचाही नाईलाज झाला. The Burning Truck

    अवश्य वाचा – ईको प्रो संस्थेची बदनामी

    मार्गाच्या कामाला असलेल्या पाणी टँकरमधून पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अर्धा तास नंतर गडचांदूर नगर पालिका व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन पोहोचले. त्यामुळे आग आटोक्यात आली. The burning truck

    या घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावर घटना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. घटनेचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.ओव्हरलोडमुळे टायरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.

  • Chandrapur voter list : पत्नीचे नाव मतदार यादीत मात्र पतीचे नाव गहाळ

    Chandrapur voter list : पत्नीचे नाव मतदार यादीत मात्र पतीचे नाव गहाळ

    Chandrapur voter list बल्लारपूर शहरातील श्रीराम वार्ड येथे राहणारे प्रशांत गद्दाला यांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाल्याने त्यांनी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा याना निवेदन दिले आहे.

    ही बातमी अवश्य वाचा : महायुती सरकारने केला घोळ, RTE चे नियम बदलले, शिक्षणाचा अधिकार हिरावला

    मागील 5 ते 6 निवडणुकीत गद्दाला यांनी मतदान केले आहे, मात्र वर्ष 2024 च्या मतदार यादीत माझे नाव गहाळ झाले, याबाबत मी तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात गेलो मात्र मला समाधानकारक उत्तर मिळाले नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे अशी प्रतिक्रिया गद्दाला यांनी दिली. Chandrapur voter list

    अवश्य वाचा – मतदार यादीतून नावे गहाळ, मतदान केंद्रावर झाला गोंधळ

    विशेष म्हणजे मी माझ्या पत्नीचे नाव दीड महिन्यांपूर्वी मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज केला होता, पत्नीचे नाव मतदार यादीत आले मात्र माझं नाव आले नाही, प्रशासन मार्फत झालेली ही चूक आहे पण ते मान्य करीत नाही अशी प्रतिक्रिया गद्दाला यांनी दिली. Chandrapur voter list

    मतदानापूर्वी गद्दाला यांनी जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन दिले होते, मात्र मतदानाच्या दिवशी लोकसभा क्षेत्रातील हजारो नागरिकांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाले होते, काही मतदान केंद्रावर याबाबत गोंधळ उडाला होता, मतदार जिवंत असून त्याना मृत दाखविण्यात आले, मतदार सर्व्हेक्षनात मोठी चूक झाली मात्र प्रशासन आपली बाजू मांडत नागरिकांनी आक्षेप घ्यायला हवा होता असे सांगत आहे.

  • Chandrapur Lok Sabha Total Vote : चंद्रपुर लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय मतदान किती?

    Chandrapur Lok Sabha Total Vote : चंद्रपुर लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय मतदान किती?

    Chandrapur Lok Sabha Total Vote चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57 टक्के मतदान झाले. 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

    हे ही वाचा –चंद्रपुरात उष्माघाताचा धोका, ही काळजी घ्या

    विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. Chandrapur Lok Sabha Total Vote

    हे ही वाचा – चंद्रपुरात मतदान केंद्रावर गोंधळ, बघा हा व्हिडीओ

    शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णि विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले. Chandrapur Lok Sabha Total Vote

    Total voting percentage
    चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एकूण विधानसभा मतदार निहाय यादी

    चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

     

    विधानसभा निहाय एकूण मतदान..

    चंद्रपूर विधानसभा एकूण मतदार – 3 लाख 56 हजार 736 – एकूण मतदान – 2 लाख 8 हजार 426

    राजुरा विधानसभा एकूण मतदार -3 लाख 13 हजार 611, एकूण मतदान – 2 लाख 19 हजार 800

    बल्लारपूर विधानसभा एकूण मतदार – 3 लाख 1 हजार 242, एकूण मतदान – 2 लाख 5 हजार 915, 

    वरोरा विधानसभा एकूण मतदार – 2 लाख 71 हजार 985, एकूण मतदान – 1 लाख 84 हजार 226

    वणी विधानसभा एकूण मतदार – 2 लाख 79 हजार 899, एकूण मतदान – 2 लाख 4 हजार 988

    आर्णी विधानसभा क्षेत्रात एकूण मतदार – 3 लाख 14 हजार 433, एकूण मतदान – 2 लाख 18 हजार 597

  • Vikas Purush Chandrapur : विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला – वडेट्टीवार यांचा सवाल

    Vikas Purush Chandrapur : विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला – वडेट्टीवार यांचा सवाल

    Vikas Purush Chandrapur मूल/चंद्रपूर :- देशात मोदी लाट असताना बाळू धानोरकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून आणले होते. आता लाट नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर प्रतिभाताई खासदार होत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प करत विकास पुरुषाने चंद्रपूरचा काय विकास केला, असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी विरोधकांना केला.

     

    मूल इथे इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात याची प्रचारसभा झाली. या प्रचार सभेत दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. Vikas Purush Chandrapur

    Chandrapur district congress
    इंडिया आघाडीच्या सभेत उपस्थित जनसमुदाय

    श्री. वडेट्टीवार म्हणाले कि, भाजप विरोधात लाट आहे. त्यामुळे भाजपवाले मुळासकट उखडून पडतील. फक्त एक धक्का द्या आणि मोदी मुक्त भारत करा. हे जुमलेबाज सरकार आहे. या सरकारचे मुखिया सकाळीं उठल्यापासून खोटं बोलायला सुरुवात करतात. मणिपूरमध्ये महिला शोषण झाले. महिलांची अब्रू लुटली. नग्न करून महिलांची धिंड काढली. तेव्हा देशाचे पंतप्रधान कुठे होते? आदिवासी महिलांचे शोषण होत असताना पंतप्रधानांना झोप कशी लागते? असा सवाल देखील श्री. वडेट्टीवार यांनी केला. Vikas Purush Chandrapur

     

    दोन मुख्यमंत्री तुरुंगात गेले. काल राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे हेलिकॉप्टर चेक केले. मग भाजपच्या नेत्यांची तपासणी का होत नाही, असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले,काल परवा माझ्याबद्दल पण अफवा पसरवली. पण लक्षात ठेवा बाबासाहेब म्हणाले होते १०० दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जागा. मी वाघ आहे असे श्री. वडेट्टीवार यांनी ठणकावून सांगितले. Vikas Purush Chandrapur

     

    केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून आमदार फोडले. उद्या सत्ता बदलली तर सुरुवात चंद्रपूर पासून होईल. आम्हाला कसला धाक दाखवताय. अनेकदा ऑफर येतात पण मी भीक घालत नाही. किती महिने आत ठेवलं तरी मी मी घाबरत नाही. आम्ही प्रतिभाताई धानोरकार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी प्रतिभाताई यांना तुम्ही निवडून द्या, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. Vikas Purush Chandrapur

     

    काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की,
    प्रत्येक घरात भांड्याला भांड लागते. पण घरावर वेळ येते तेव्हा कुटुंब एकत्र येत असत. संकट बाहेरून येत तेव्हा कुटुंबाला एकत्र येऊन लढायचे असते त्यामुळे विजय वडेट्टीवार आणि त्यांची टीम काम करते हे महत्वाचे आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.सगळं विसरून ते प्रतिभाताईंना निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत.

     

    दिवंगत खासदार बाळू धानोरकर काम करणारा माणूस, पण अकाली त्यांचे निधन झाले, प्रतिभा धानोरकर यांच्यावर आकाश कोसळले तरी ताई लढायला उभ्या राहिल्या, ताईचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.प्रतिभा धानोरकर आदर्श खासदार म्हणून काम करतील. ताईंना प्रचंड मतांनी निवडून द्या, असं आवाहन विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

     

    सभेत मंचावर राज्याचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे सचिव आशीष दुआ, जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे, जिल्हा प्रभारी पठाण,रा. काँ. जिल्हाध्यक्ष (शरद पवार गट) राजेंद्र वैद्य, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोष सिंह रावत, माजी आ. देवराव भांडेकर, प्रकाश पाटील मारकवार, महीला आघाडी जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, डॉ. विश्वास झाडे, राजू झोडे, राकेश रत्नावार, घनश्याम येनुरकर , व महाविकास आघाडीचे व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

  • Chandrapur Food Poisoning : विषबाधा प्रकरणी आयोजक व आचारी वर गुन्हा दाखल

    Chandrapur Food Poisoning : विषबाधा प्रकरणी आयोजक व आचारी वर गुन्हा दाखल

    Chandrapur Food Poisoning भद्रावती तालुक्यातील माजरी येथे दिनांक 13/04/2024 रोजी काली माता मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

     

    रात्री महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री लोकांना अन्नातून विषबाधा होऊन उलट्या व जुलाब याचा त्रास होऊ लागला. उपचारासाठी एरिया हॉस्पिटल माजरी येथे दाखल करण्यात आले. तसेच रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती व उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे हलविण्यात आले. Chandrapur Food Poisoning

    हे अवश्य वाचा – चंद्रपुरातील तेली समाज म्हणतो आम्हाला बदनाम करू नका, आम्ही कुणाला पाठिंबा दिला नाही

    बाधित अन्न खाल्याने 250 लोकांना त्रास जाणवू लागला. प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर काही रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे 57 रुग्ण दाखल असून एरिया हॉस्पिटल माजरी येथे 7 रुग्ण ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे 4 रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. Chandrapur Food Poisoning

    हे ही वाचा – चंद्रपूर लोकसभेत कांग्रेस व भाजपची परिस्थिती काय? वाचा ही बातमी

    विषबाधा झाल्याने 3 रुग्ण अत्यवस्थ झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे वर्ग करण्यात आले.परंतु उपचारादरम्यान गुर्फेक शिवनाथ यादव वय 80 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर अभिषेक शर्मा वय 5 वर्ष व अनया राजपूत वय 5 वर्ष यांची प्रकृती स्थिर आहे.

     

    पोलिस विभागामार्फत रुग्णांसाठी तत्काळ अँब्युलन्स ची व्यवस्था करण्यात आली. तसेच घटना स्थळी तालुका आरोग्य अधिकारी संजय असुटकर व त्यांची टीम रात्रीपासून हजर राहून बाधित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात आले. तसेच आशा वर्कर मार्फत घरोघरी तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ors वाटप करण्यात आले. व सर्वेक्षण करण्यात आले. सकाळपर्यंत 258 रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. पाणी व अन्नाचे नमुने पुढील तपासणीसाठी FDA ला पाचारण करण्यात आले आहे. Chandrapur Food Poisoning

     

    तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव इंगोले यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

     

    मा. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी रुग्णालयात भेट देऊन आढावा घेतला.

     

    सदर घटनेबाबत आयोजक बुल्लुराम दर्शनराम व आचारी छाया तिखट यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माजरी पोलिस स्टेशन चे ठाणेदार सारंग मिराशी करत आहेत.