Category: ग्रामीण वार्ता

ग्रामीण वार्ता (Gramin Varta) विभागात वाचा news34.in वर चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बातम्या आणि घडामोडी. शेतकरी योजना, ग्रामपंचायत राजकारण, स्थानिक विकास प्रकल्प, कृषी आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट्स येथे उपलब्ध आहेत. चंद्रपूर ग्रामीण भागातील समस्या, यशोगाथा आणि सकारात्मक बदलांना आम्ही प्राधान्य देतो. ग्रामीण भागातील विश्वासार्ह माहितीसाठी नियमित भेट द्या.

  • Chandrapur News Today : मित्र पळाले आणि दोन मुले बुडाली

    Chandrapur News Today : मित्र पळाले आणि दोन मुले बुडाली

    Chandrapur news today चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी येथे 7 मे रोजी धक्कादायक घटना घडली, गोंडपीपरी न्यायालयाच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात 2 मुले बुडाली.

    महत्वाची बातमी – चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकानो आपण यांना पाहिलंत का?

    Chandrapur news today मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास काही मुले फिरायला गेली होती, त्यानंतर मुलांना त्या तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही, तलावात पोहत असताना दोन मुले बुडायला लागली, ते दृश्य बघून इतर मुले घराकडे गेली, मात्र त्यांनी इतरत्र त्याबाबत कुणालाही सांगितले नाही.

     

    Chandrapur news today 2 मुले सायंकाळी घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेणे सुरू केले, मुले पोहायला गेली असे कळल्यावर कुटुंबीयांनी तलावाकडे धाव घेतली असता त्याठिकाणी दोन मुलांचे कपडे आढळले, त्यावेळी रात्रीचे 8 वाजले होते.

    अवश्य वाचा – चंद्रपूर उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक व कार्यालय अधीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल, बिअर शॉपी परवान्यासाठी मागितले 1 लाख

    घटनेची माहिती मिळताच गोंडपीपरी चे ठाणेदार रमेश हत्तीगोटे आपल्या चमुसह तलावाजवळ दाखल झाले, मुलांचा शोध घेण्यासाठी पथकाला पाचारण करण्यात आले, मात्र रात्र झाल्याने शोध मोहीम थांबली.

     

    Chandrapur news today 14 वर्षीय गौरव विलास ठाकूर व 15 वर्षीय शौर्य भास्कर पिंपळशेंडे राहणार शिवाजी चौक असे तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहे.

     

    आपली मुले तलावात बुडाली असे समजताच कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला, सकाळी पुन्हा शोधमोहिमेला सुरुवात केल्यावर दोन्ही मुलांचे मृतदेह शोध पथकाच्या हाती लागले.

  • Attempt to usurp space : ओपन स्पेस मधील जागा हडपण्याचा प्रयत्न

    Attempt to usurp space : ओपन स्पेस मधील जागा हडपण्याचा प्रयत्न

    गुरू गुरनुले

    Attempt to usurp space मुल – मुल नगरातील सर्व्हे नं. ९४ (श्रमिक नगर वार्ड क्रं. ०८) मध्ये चालु असलेले ओपन स्पेस मधील जागा मंदिराच्या नावाखाली हडपून त्यावर अवैद्य बांधकाम करण्यासाठी चालविलेली धडपड त्वरित थांबवावी अशी मागणी नगर परिषद प्रशासन मुख्याधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे श्रमिक नगर मधील अधिकृत प्लॉट धारकांनी केली आहे.

     

    Attempt to usurp space श्रमिक नगर वार्ड क्रं.८, सर्वे नं. ९४ मध्ये एकूण ९० प्लॉटधारक असून त्यात २९९२ स्के. मीटर एवढा ओपन स्पेस आहे. शासकीय नियमाप्रमाणे ओपन स्पेस मध्ये फक्त १० ते १५ टक्के एवढेच बांधकाम करायचे असते. परंतु या ठिकाणी अगोदरच ओपन स्पेस मध्ये मंदिर २५०० स्के. फुट, एक सभागृह-२००० स्के. फुट, एक स्वयंपाकगृह ५०० स्के. फुट, एक शौचालय व अतिक्रमीत शाळेच बांधकाम झालेले आहे.

     

    Attempt to usurp space तरी पुन्हा उर्वरीत जागेवर मंदिराच्या नावाने सभागृह अंदाजे ५००० स्के. फुटचे अवैध बांधकाम सुरु करुन जागा हडपण्याचा गैरप्रकार राजरोसपणे सुरु केले आहे. जर असे गैरकायदेशिर बांधकाम सुरु राहिल्यास लेआऊट मधील मुळ प्लॉटधारकांना हक्काची जागा व त्यांचे मुलांना खेळण्याकरीता तसेच वयोवृध्द व्यक्तीकरीता मनमोकळे फिरण्यासाठी जागाच शिल्लक राहणार नाही. आणि सर्वांच्या हक्काच्या जागेवर स्वातंत्र्य हिसकाविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

     

    वस्तुस्थिती पाहिली असता असे लक्षात येते की, मंदिराच्या नावाने जागा हडपून, अधिकार गाजवून जागा ताब्यात घेण्याचे षडयंत्र सुरु आहे.

    illegal construction
    नागरिकांनी दिले निवेदन

    करीता मागील फेब्रुवारी महिण्यात ओपन स्पेस डेव्हलपमेंट करुन त्यात ग्रीन जिम, ट्रॅक, बगीचा संपूर्ण सौंदर्याकरण करण्यात यावे असे निवेदन यापूर्वि सुद्धा प्रशासनाला देण्यात आलेले आहे. तरी देखील नगर परिषद प्रशासन अजूनही जागे झाले नाही.

     

    त्यामुळे आम्हा प्लॉट धरकावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात पुढील पाऊल उचलण्यास प्रशासन आम्हाला जागे करीत असल्याचे दिसून येत आहे. जर का अनधिकृत मंदिराचा मुद्दा पुढे करून जागा हाडपण्याचा प्रकार होत असेल तर ते खपऊन घेतले जाणार नाही असा इशारा देण्यात येईल असे निवेदन कर्त्यानी बोलून दाखविले आहे.

  • A terrible accident : आईस्क्रीम खात असताना घडलं असं भयावह

    A terrible accident : आईस्क्रीम खात असताना घडलं असं भयावह

    गुरू गुरनुले

    A terrible accident मुल – उन्हाळयाचे दिवस असल्याने टेकाडी सिंदेवाही वरुन चंद्रपूरकडे येथुन मूल येथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेल्या युवकांवर सिंदेवाही जाणाऱ्या वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्या युवकाला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मूल येथील गांधी चौकात रविवारी रात्रौ 10 वाजताच्या दरम्यान घडली.

     

    A terrible accident प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे मूल तालुक्यातील आकापूर येथील मृत्तक युवकाचे नांव आहे.
    नर्सिंग विद्यालयात नर्सोंगचे कोर्स करीत असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगांव त. चंद्रपूर हा विद्यार्थी आपल्या काकाकडे टेकाडी येथे राहात होता.

     

    A terrible accident रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने तो अनिकेत गोंगले वय 19 वर्षे आणि मुस्ताक अल्ली सय्यद वय 21 वर्षे रा. टेकाडी या मित्रांसोबत मूल येथे आला.

     

    दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकानातुन तो आईस्क्रिम घेवुन खात असतानाच सिंदेवाही वरुन चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच 40 बि जी 8268 चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी वय 55 वर्षे रा. नागपूर याचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने प्रज्योत नरेंद्र गेडाम यांना जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला, इतर जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही.

     

    मृत्तकाचे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आले.
    आरोपीवर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अॅक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

     

    पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अमलदार यशवंत कोसनशिल्ले, रफीक शेख करीत आहे.

  • Jua Act : शासकीय कर्मचाऱ्याचा जुगार, पोलिसांनी मारली धाड

    Jua Act : शासकीय कर्मचाऱ्याचा जुगार, पोलिसांनी मारली धाड

    Jua act तळोधी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 मे ला पोलीस उपनिरीक्षक किशोर मानकर हे सहकाऱ्यांसाहित पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बाळापूर रोड येथे स्मशानभूमी समोरील शेत शिवारात झाडाखाली काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती.

    बातमी फायद्याची : वार्षिक 520 रुपये भरा आणि मिळवा 10 लाखांचा विमा

    Jua Act माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मानकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यासाहित त्याठिकानी धाड मारली असता 4 जण 52 पत्त्याचा जुगार खेळत होते.

     

    Jua act पोलिसांनी त्याठिकाणी 4 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला, मात्र ज्यावेळी जुगार बहाद्दूर यांची ओळख पटवली असता त्यामध्ये 2 शिक्षक, 1 महसूल विभागातील कर्मचारी आणि कृषी केंद्र चालकांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत भावी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात असते मात्र हे शिक्षक आपल्या हातात 52 पत्ते पिसत शिक्षणा सारख्या दानाचे उल्लंघन करताना आढळून आले.

    पोलिसांनी 4 आरोपीवर जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

  • Tiger attack on woman : तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी ती जंगलात गेली पण…..

    Tiger attack on woman : तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी ती जंगलात गेली पण…..

    Tiger attack on woman सिंदेवाही तालुक्यातील कुकुडहेटी येथे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या 33 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करीत ठार केले, मानव वन्यजीव संघर्षाची जिल्ह्यातील ही सहावी घटना आहे.

     

    ही बातमी वाचा : चंद्रपुरात डायनासोर?

    उन्हाळा सुरू झाल्याने तेंदूपत्ता चा हंगाम चालू आहे, त्याकरिता महिला व पुरुष जंगलात जाऊन तेंदूपत्ता गोळा करीत आहे.

     

    Tiger attack on woman 4 मे रोजी सकाळी 8.30 वाजता शिवानी परिक्षेत्रातील कुकुडहेटी उपक्षेत्रातील पेटगाव बिट क्रमांक 322 येथे मौजा बामणिमाल येथील निवासी 33 वर्षीय दीपा दिलीप गेडाम ह्या जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या.

     

    त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने दीपा वर हल्ला करीत तिला ठार केले, घटनास्थळ जवळ नाल्याजवळ वाघ बसून होता, त्यावेळी दीपा ह्या तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. आज तेंदूपत्ता गोळा करण्याचा दुसरा दिवस होता.

     

    Tiger attack on woman दीपा वर वाघाने हल्ला केल्याची बाब गावी पसरताच नागरिक व वनविभागाने जंगलाच्या दिशेने धाव घेतली, घटनास्थळी दीपा यांचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत होता.
    वनविभागाने घटनेचा तात्काळ पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला, मृतक दिपाच्या पतीला तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये दिले.
    यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट, ठाणेदार तुषार चव्हाण आदींची उपस्थिती होती.

  • Cattle mafia chandrapur : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    Cattle mafia chandrapur : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    Cattle mafia chandrapur चंद्रपुर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.

    अवश्य वाचा : महाराष्ट्र दिनी चंद्रपुरात पाळला काळा दिवस

    आदेशाचे अंमलबजावणी करताना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी विविध पथक तयार करीत जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासंबंधीने निर्देश दिले. Cattle mafia chandrapur

     

    1 मे महाराष्ट्र दिनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तलीकरिता तेलंगणा राज्यात जाण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहतुक होणार आहे.

    बातमी आपल्या कामाची : चंद्रपूर पोलिसांनी केला समाजमाध्यमाचा योग्य वापर आणि हरवलेला मुलगा अवघ्या 3 तासात सापडला

    माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा हिरापूर येथील शेत शिवारात धाड मारली, त्याठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तब्बल 7 वाहनात एकूण 150 गोवंश अवैधरित्या क्रूरतेने हात-पाय बांधून त्यांना कोंबले होते. Cattle mafia chandrapur

     

    7 वाहनातील 150 गोवंश ला बाहेर काढत त्यांची सुटका करीत नगरपालिका राजुरा येथील कोंडवाड्यात जमा करण्यात आले.

     

    पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल अजीज अब्दुल सहित तब्बल 15 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे, स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाईत एकूण 1 कोटी 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीना पुढील तपासकामी गडचांदूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. Cattle mafia chandrapur

     

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी धनराज, स्वामीदास, अजय, प्रकाश, नितीन, सुभाष, किशोर, रजनीकांत, दिनेश, संतोष व प्रशांत यांनी केली आहे.

  • Cannibal tiger in cage : चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

    Cannibal tiger in cage : चंद्रपूर जिल्ह्यातील नरभक्षक वाघ अखेर जेरबंद

    Cannibal tiger in cage 4 नागरिकांचा जीव घेणारा नरभक्षक वाघ अखेर वनविभागाच्या जाळ्यात सापडला असून 29 एप्रिलला वनविभागाच्या चमूने कारवा रोड जवळ वनविभागाच्या शूटरने वाघाला डार्ट करीत पकडले.

     

    7 जानेवारी ला कारवा जंगलात शामराव तिडसुरवार, 27 फेब्रुवारी ला गुराखी लालबच्ची चौहान, 14 मार्च ला नामदेव आत्राम व 14 एप्रिलला मनोहर उमाटे यांची वाघाने शिकार केली होती. Cannibal tiger in cage

     

    वाघ नरभक्षक झाल्याने वनविभागावर त्याला पकडण्यासाठी एकप्रकारचा दबाव निर्माण झाला होता, वनविभागाने वाघाची शोधमोहीम सुरू केली, बल्लारपूर वन परिक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना वनविभागाला सदर वाघ हा कारवा रोड जवळ असल्याची माहिती मिळाली. Cannibal tiger in cage

     

    29 एप्रिलला सायंकाळी कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शूटर अविनाश फुलझेले व वनरभक्षक यांनी नरभक्षक वाघाला डार्ट करीत पकडले.
    वाघाची तपासणी केल्यावर त्याला जेरबंद करीत त्याला पुढील उपचारासाठी वन्यजीव उपचार केंद्रात नेण्यात आले. Cannibal tiger in cage
    वाघ जेरबंद झाल्याची माहिती मिळताच बल्लारपूर व कारवा येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

     

    वाघाला पकडण्याच्या मोहिमेत उपवन संरक्षक श्वेता बोड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक आदेश शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, ए. एस. पठाण आदींचा समावेश होता.

  • Right To Education Policy Changes : RTE नियमात बदल का? – रवि पुप्पलवार यांचा सवाल

    Right To Education Policy Changes : RTE नियमात बदल का? – रवि पुप्पलवार यांचा सवाल

    Right To Education Policy Changes राईट टू एज्यूकेशन म्हणजेच RTE कायद्याखाली आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची तरतूद आहे. यासंदर्भातील शिक्षण हक्क कायदा ४ ऑगस्ट २००९ रोजी संसदेत मंजूर केला. या कायद्यांतर्गत महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रिया राबवली जात असते परंतु आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने RTE च्या कायद्यात बदल केल्यामुळे पालकांना मनस्ताप सहन करावे लागत आहे.

    बातमी महत्वाची : RTE चे नवे नियम पालकांच्या जिव्हारी

    नवीन नियमानुसार आता एक किलोमीटर परिसरातील शासकीय, अनुदानित किंवा विना अनुदानित शाळेत RTE अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांतील २५ % आरक्षित जागांवर प्रवेश दिला जातो. त्यात खासगी इंग्रजी शाळांचे प्रमाण अधिक असते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या बदललेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या (RTE) नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाची वाट कठीण झाली आहे. Right To Education Policy Changes

     

    बल्लारपूर शहरात देखील RTE कायद्यातील बदलांबाबत तीव्र नाराजी आहे. यावर आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी सरकारला धारेवर धरले आहे. पुप्पलवार म्हणतात की एकीकडे सरकार शासकीय शाळांतील सुधारणांकडे दुर्लक्ष करीत आहे तसेच दुसरीकडे गरीब वंचित घटकातील बालकांना खाजगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळविण्याचा हक्कही संपवत आहे. Right To Education Policy Changes

     

    एकप्रकारे येणाऱ्या पिढीच्या भविष्याशी खेळण्याचा काम सरकार करत आहे, आमच्या चीमुकल्यांचे भविष्याला लक्ष्यात घेऊन या गंभीर व महत्त्वाच्या बाबीकडे सर्व पालक, सामाजिक संस्था व राजकिय पक्षांचे नेते एकजूट होऊन लवकरात-लवकर आक्रमक भूमिका घ्यावी असे आवाहन देखील रविभाऊ पुप्पलवार यांनी केले आहे.

  • Unique Movement of Youth Congress : रस्त्यात लावले बेश्रमाचे झाड

    Unique Movement of Youth Congress : रस्त्यात लावले बेश्रमाचे झाड

    गुरू गुरनुले

    Unique Movement of Youth Congress मुल:- खेडी ते गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर मागील पाच वर्षापासून बांधकाम कासवगतीने सुरू आहे. शासनाच्या तिजोरीतून करोडो रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेला रस्ता अतिशय निकृष्ट असून बांधकाम करतानाच मोठे मोठे खड्डे पडत आहेत.

     

    कंत्राटदार, संबंधित अधिकारी व राजकीय नेत्यांनी यामध्ये मोठा नफा कमवून रस्त्याच्या दर्जाची ऐसी तैसी केलेली आहे. सदर रस्त्याच्या चुकीच्या नियोजनामुळे कित्येक प्रवाशांचे जीव या रस्त्याने घेतलेले आहेत तर कित्येकांना गंभीर अपघाताला सामोरे जावे लागले आहे. सदर रस्त्याच्या बांधकामासाठी युवक काँग्रेसने यापूर्वीही मोठे आंदोलन केले होते. Unique Movement of Youth Congress

    Potholes in road
    खेडी ते गोंडपीपरी मार्गावर खड्ड्यांचं राज्य

    तेव्हा कामाची गती वाढलेली होती परंतु पुन्हा कंत्राटदार व अधिकारी यांच्या संगनमताने कामाचे स्वरूप कासवगतीने झाले असून दर्जाहीन काम होत आहे. बेंबाळ ते नांदगाव मार्गावर नुकत्याच बांधलेल्या रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मधोमध जेसीबीने खड्डे खोदून ठेवले असून यामुळे नुकताच एक मोठा अपघात झाला व पुन्हा जीवघेणे अपघात होण्याची शक्यता आहे. Unique Movement of Youth Congress

     

    जर कंत्राटदाराच्या चुकीमुळे प्रवाशांचे जीव जात असेल तर याला जबाबदार कोण? याचा निषेध म्हणूनच युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन नीलमवार काँग्रेसचे कार्यकर्ते मल्लेश मुद्रिकवार, मारोती गद्येकार, उमाकांत मडावी, सुकलाल शिंदे, शांताराम सातरे, समीर सातरे, जालिंदर वाळके राकेश कुंभारे, मनीष सातरे,छकुल वाळके तथा अन्य कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यावर बेशरमाचे झाड लावून कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. Unique Movement of Youth Congress

     

    वरील मागणी पूर्ण न केल्यास या विरोधात संपूर्ण रस्त्यावर चक्काजाम करून उग्र आंदोलन करण्यात येईल व आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार संबंधित कंत्राटदार व प्रशासन राहील असा गंभीर इशारा युवक काँग्रेसने दिलेला आहे.

  • Who guarantees good health facilities? : जिवती तालुक्यात मलेरियाचे थैमान

    Who guarantees good health facilities? : जिवती तालुक्यात मलेरियाचे थैमान

    Who guarantees good health facilities चंद्रपूर :- जिवती तालुक्यात मलेरिया आजाराने थैमान घातले असतांना जिवती येथे रुग्णालय उपलब्ध नसल्याने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृती समाधानकारक आहे, सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी रुग्णालयात रुग्णांना भेट दिली असता, गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात मुख्य सोयीं सुविधांचा अभाव लक्षात आला, रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, शौचालयात पाणी नाही आणि अस्वच्छ शौचालय आदी बाबींचा फुसे यांनी यावेळी निषेध केला.

     

    जिवती तालुक्यातील काकबन, नगराळा, मारोतीगुडा, नानकपठार, कलीगुड्यात मागील आठवडाभरापासून मलेरियाने थैमान घातले आहे. आतापर्यंत रुग्णसंख्या 42 च्या वर पोहोचली असून यात सर्वाधिक रुग्ण ब्रेन मलेरियाचे आढळले. सर्व रुग्णांवर गडचांदूरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे, तरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. Who guarantees good health facilities?

     

    ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला, बांधकाम पूर्ण झाले असूनही शासनाला उद्घाटनाचा मुहूर्त सापडेना,
    परिणामी जिवती तालुक्यातील रुग्णांना जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावे लागत आहे, औषधसाठा व इतर उपचारा अभावी रुग्णांना गडचांदूर ग्रामीण रुग्णालय गाठावे लागत असल्याने नाहक आर्थिक व मानसिक त्रास भोगावा लागत आहे. Who guarantees good health facilities?

     

    गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छ शौचालय व इतर सुविधा तात्काळ सुधाराव्यात तसेच जिवती ग्रामीण रुग्णालयाचे त्वरित उद्घाटन करून रुग्णांना आरोग्य सेवा पुरवावी अन्यथा जिवती वासीयांना घेऊन राज्य शासन व प्रशासना विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी दिला आहे.