Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Today Acb Trap News : चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    Today Acb Trap News : चंद्रपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

    Today Acb Trap News 7 मे ला चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना 1 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

    अवश्य वाचा : मित्रांचे टोळके तलावात पोहायला गेले, दोघे जण बुडताच इतर मित्र पळाले, धक्कादायक घटना

    Today Acb Trap News फिर्यादी हे घुग्गुस येथील रहिवासी असून त्यांचं घुग्गुस येथे गोदावरी बार अँड रेस्टारेंट आहे, फिर्यादी यांनी वर्ष 2023 नोव्हेंबर मध्ये नवीन बिअर शोपीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता, मात्र त्यावेळी त्यांना अधीक्षक संजय पाटील व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी फिर्यादीला आज या उद्या या म्हणत त्यांना नाहक त्रास देत टाळाटाळ केली.

     

     

    Today Acb Trap News काही दिवसांनी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी मी तुमचा बिअर शोपीचा परवाना मंजूर करून देतो मात्र त्यासाठी अधीक्षक व स्वतःसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.
    फिर्यादी यांची पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी 25 एप्रिलला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली.

     

    Today Acb Trap News मध्यंतरी फिर्यादी यांना 1 लाख रुपयांची लाच मागितली, 7 मे रोजी उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर कार्यालयात कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांनी खारोडे यांच्या सांगण्यावरून 1 लाख रुपयांची रक्कम स्वीकारली, त्यानंतर चेतन खारोडे यांनी पैसे मिळल्याबाबत अधीक्षक पाटील यांना मोबाईल द्वारे सूचना दिली, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री पटवित, 1 लाख रुपये स्वीकारताना अभय खताळ यांना रंगेहात अटक केली.

    सदर लाच प्रकरणी अधीक्षक संजय पाटील, अभय खताळ व चेतन खारोडे यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    Today Acb Trap News सदरचा यशस्वी सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी केला.

     

     

    वर्ष 2015 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती, 6 वर्षानंतर म्हणजेच 2021 ला महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्याची दारूबंदी हटविली.

     

    Today Acb Trap News दारूबंदी हटल्यानंतर चंद्रपुरातील उत्पादन शुल्क विभागाने नियमबाह्य दारू दुकानासाठी परवाने दिले, विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे रुजू झाल्यावर सुद्धा हीच परिस्थिती कायम राहली. ज्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली त्यावेळी एकूण 350 बिअर बार होते, वर्ष 2021 मध्ये दारूबंदी उठविल्यावर जिल्ह्यात तब्बल 750 बिअर बार अस्तित्वात आले, अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात 400 नव्या बिअर बार ला परवाने देण्यात आले.

     

    अधीक्षक संजय पाटील यांच्या संपत्तीची SIT मार्फत चौकशी करा – मनोज पाल भाजप नेते

    उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील यांनी नियमबाह्य पध्दतीने बिअर बार चे परवाने वाटप केले, आणि एका परवान्यामागे लाखो रुपये यांनी मागितले होते, याबाबत संपूर्ण माहिती आम्ही काढलेली आहे, याबाबत आम्ही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन दिले आहे, लवकरच कारवाई होणार अशी अपेक्षा आहे, संजय पाटील विरोधात आम्ही लवकरच पत्रकार परिषदेमार्फत खुलासा करणार आहो.

  • Heavy rain in chandrapur : चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पाऊस

    Heavy rain in chandrapur : चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पाऊस

    Heavy rain in chandrapur मार्च महिना लागताच उन्हाळाची चाहूल लागते व एप्रिलनंतर उन्हाची दाहकता वाढून तापमानात वाढ होते.दिनांक ६ मे रोजी चंद्रपुरात ४३ अंश सेल्सिअस तापमान होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा नागरिकांवर ठोठावणार 20 हजारांचा दंड

    Heavy rain in chandrapur वाढतं तापमान बघता उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयसह ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शीतकक्ष कार्यन्वित करण्यात आले आहेत हे विशेष.

     

     

    परंतु आज ७ मे रोजी पुन्हा तापमानात बदल झाल्याने चंद्रपुरात गारपीटसह जोरदार पावसाचे आगमन झाले आहे.

    या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे काही प्रमानात नुकसान झाले, मात्र जिल्ह्यात वाढत्या उकड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मात्र नक्की मिळाला आहे.

  • why rain water harvesting is important : हे काम करा नाहीतर 20 हजार दंड भरा, चंद्रपूर मनपाचा इशारा

    why rain water harvesting is important : हे काम करा नाहीतर 20 हजार दंड भरा, चंद्रपूर मनपाचा इशारा

    why rain water harvesting is important : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत ज्या मालमत्ताधारकांच्या घरी बोअरवेल अथवा विहीर आहे मात्र त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टींग केलेले नाही अश्या मालमत्ताधारकांची प्रत्यक्ष तपासणी मनपातर्फे सुरु करण्यात आली असुन रेन वॉटर हार्वेस्टींग केले नसल्याचे आढळल्यास २० हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

    अवश्य वाचा – Right To Education न्यायालयाने शिक्षण विभागाला फटकारले

    why rain water harvesting is important :   शहरातील सर्व बोअरवेलधारक,विहीरी असणारी घरे, मोठ्या इमारतींना (अपार्टमेंट)  रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे अनिवार्य आहे, अश्या मालमत्ताधारकांना प्रसार माध्यमे,दूरध्वनी, एसएमएस, व्हॉइस मॅसेज, नोटीसद्वारे मागील वर्षी सूचित करण्यात आले होते व या वर्षीसुद्धा सूचित करण्यात येत आहे. तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास ठराविक कालावधीची मुदत सुद्धा देण्यात आली होती.मात्र अनेक मालमत्ताधारकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने मनपामार्फत सदर कारवाई करण्यात येत आहे.

     

    why rain water harvesting is important :   चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे  हद्दीत नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य असून, त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारण्यात येते. मात्र, शहरातील ज्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून, रेनवॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था केल्याचे पुरावे सादर केलेले नाही, अशा बांधकामधारकांची अनामत रक्कम यापुर्वी जप्त करण्यात आली आहे.

     

    शहरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची आवश्यकता आहे. रेन वॉटर हॉर्वेस्टिंगची अमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी घराच्या छताच्या आकारमानानुसार ५,७ व १० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान तसेच पुढील ३ वर्षांपर्यंत २ टक्के मालमत्ता करात सुट महानगरपालिकेतर्फे देण्यात येते.

  • Who killed Hemant Karkare? : शहीद हेमंत करकरे यांचा वडेट्टीवार यांनी केला अपमान – राहुल पावडे

    Who killed Hemant Karkare? : शहीद हेमंत करकरे यांचा वडेट्टीवार यांनी केला अपमान – राहुल पावडे

    Who killed Hemant Karkare? २६/११ ला मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेले एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांना त्या हल्ल्यात लागलेली गोळी अतिरेक्यांची नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडित पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याची आहे असे चुकीचे विधान करणारे राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपुरातील जटपूरा गेट येथे भाजपा तर्फे निषेध करण्यात आला.

    अवश्य वाचा : आईस्क्रीम खायला गेला आणि ट्रक खाली चिरडला

    Who killed Hemant Karkare? २६/११ च्या भ्याड हल्ल्यात हेमंत करकरे असतील किंवा सम्बंधित इतर पोलीस अधिकारी असतील यांनी आपल्या प्राणाची आहुती देत नागरिकांना त्या ठिकाणाहून सुखरूप बाहेर काढण्याचे काम केलं. मात्र विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी असे विधान करून त्यांचा अपमान केला आहे.

     

    शहीद झालेल्या अश्या अधिकाऱ्यांच्या वीरमरणाविषयी पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर शंका निर्माण करत चुकीचं आक्षेपार्ह विधान राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे करीत आहे.

     

    Who killed Hemant Karkare? निश्चितपणे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे इतके वर्ष लोटल्यानंतर अश्या पद्धतीचे विधान करणे योग्य नाही म्हणून आज भारतीय जनता पार्टीतर्फे विजय वडेट्टीवारांचा निषेध करण्यात आला. असे आक्षेपार्ह विधान करून अगदी निवडणुकीच्या तोंडावर जनतेत संभ्रम निर्माण करणे हेच वडेट्टीवारांचा आणि महविकास आघाडीचे हे कार्य आहे त्याचा भाजपतर्फे शहर अध्यक्ष राहुल पावडे यांनी निषेध केला आहे.

     

    वडेट्टीवार यांच्या विधानाचे समर्थन

    विरोधीपक्ष विजय वडेट्टीवार यांच्या या विधानावर who killed karkare या पुस्तकाचे लेखक माजी पोलीस अधिकारी मुश्रीफ यांनी समर्थन केले आहे, वडेट्टीवार यांनी जे विधान केलं ते सर्व खरं आहे.

  • Panpoi of mahila bachat gut : रणरागिनींनी सुरू केली पाणपोई

    Panpoi of mahila bachat gut : रणरागिनींनी सुरू केली पाणपोई

    Panpoi of mahila bachat gut उन्हाळ्यातील मे महिन्यात उन्हाची तीव्रता अधिक असते अश्या वेळी नागरिक जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा त्यांना थंड पाण्याची नितांत गरज भासते, यासाठी दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासणारे बाबूपेठ येथील महिला बचत गट आणि रणरागिणी महिला नागरी सह पतसंस्था यांच्या सौजन्याने नेताजी चौक बाबूपेठ येथे आज दि 5 मे 2024 रोजी पाणपोई चे उदघाटन आगलावे मॅडम, पोलीस उपनिरीक्षक शहर पोलीस स्टेशन यांचे शुभहस्ते, सौ.चंदाताई वैरागडे संस्थापक अध्यक्ष महिला बचत गट,तसेच रणरागिणी महिला पतसंस्था ,सोबतच सुरेखा कुणारपवार वंदना खेळकर तसेच सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत उदघाटन संपन्न झाले.

     

    Panpoi of mahila bachat gut यावेळी उदघाटक मा.आगलावे मॅडम यांनी क्रांतिज्याती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले व फीत कापून पाणपोई चे रीतसर उदघाटन केले,यावेळी सौ चंदाताई वैरागडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना आम्ही उन्हाळ्यातील मे महिन्यात कडक उन्ह असते अश्या वेळी रस्ताने ये जा करणाऱ्यां वाटसरूना थंड पाणी मिळावे हा सामाजिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन दरवर्षी महिला बचत गट आणि रणरागिणी महिला पतसंस्थे तर्फे दरवर्षी आम्ही या ठिकाणी पाणपोई ची व्यवस्था करीत असतो.

     

    Panpoi of mahila bachat gut आम्ही केवळ हाच एक उपक्रम राबवित नसून अश्याच प्रकारचे अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवून समाजात जनजागृती करण्याचे आणि महिलांना सक्षम करण्याचे कार्य महिला बचत गटाच्या माध्यमातून अविरत सुरू आहे ,याप्रसंगी PSI आगलावे मॅडम यांनी महिलांच्या पुढाकारातून या ठिकाणी उन्हाळ्यात मानवाला थंड पाण्याची नितांत गरज असते आणि ती व्यवस्था महिला बचत गट आणि महिला पतसंस्थेनी या ठिकाणी करून एक चांगला उपक्रम राबवित आहे.

     

    त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला महिला बचत गट चे सर्व सदस्य,रणरागिणी महिला पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व परिसरातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,कार्यक्रमाचे संचालन प्रियंका खनके यांनी तर आभार उषा तंगडपल्लीवर यांनी मानले.या कार्यक्रमाला बचतगट मधील महिला उपस्थित होत्या.

  • Amma Ki Auto Jal seva : चंद्रपुरात आजपासून अम्मा की ऑटो जलसेवेचा शुभारंभ

    Amma Ki Auto Jal seva : चंद्रपुरात आजपासून अम्मा की ऑटो जलसेवेचा शुभारंभ

    Amma Ki Auto Jal seva देशात अतिउष्ण जिल्हा म्हणून चंद्रपूरचे नाव लौकिक आहे, सध्या राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट सुरू आहे, या उष्णतेच्या लाटेत नागरिकांना थंड पाणी मिळाव यासाठी चंद्रपुरातील अम्मा ने पुढाकार घेत अम्मा की ऑटो जलसेवा उपक्रम सुरू केला आहे.

    अवश्य वाचा : right to education ला अत्यल्प प्रतिसाद

    चंद्रपुरात वाटसरूना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने आज 5 मे रोजी आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या हस्ते अम्मा की ऑटो जलसेवेचा शुभारंभ करण्यात आला.

     

    Amma Ki Auto Jal seva याप्रसंगी शहरातील ऑटोवर थंड पाण्याची कॅन बसवून ही फिरणारी जलसेवा सुरू करण्यात आली, अम्मा का टिफिन, अम्मा की दुकान व आता अम्मा की ऑटो जलसेवा हा नवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    या उपक्रमाचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.

  • Right To Education Policy : मोफत शिक्षणाचा अधिकार, पालकांचा अत्यल्प प्रतिसाद

    Right To Education Policy : मोफत शिक्षणाचा अधिकार, पालकांचा अत्यल्प प्रतिसाद

    Right To Education Policy : वर्ष 2009 पासून देशात मोफत शिक्षणाचा अधिकार कायदा अस्तित्वात आला मात्र 14 वर्षानंतर महाराष्ट्र सरकारने या कायद्यात मोठे बदल केल्याने वंचित घटकातील मुलांचा प्रवेशाचा मार्ग अवघड झाला आहे.

    अवश्य वाचा – हनुमान अडकला पोलिसांच्या जाळ्यात

    आधी या Right To Education Policy मध्ये अनुक्रमे 1, 3 व 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खासगी इंग्रजी शाळेत 25% प्रवेश गोरगरीब मुलांसाठी राखीव ठेवल्या जात होता, मात्र आता इंग्रजी शाळा या कायद्यातून जाचक अटी पुढे करून कमी करण्यात आल्या आहे.

    वाचा – शिक्षणाच्या कायद्यात बदल का?

    Right To Education Policy आता या कायद्यांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, अनुदानित शाळा यांचा समावेश करण्यात आला आहे, मात्र सदर शाळेत आधीपासून मोफत प्रवेश दिला जात असल्याने आपण या कायद्यांतर्गत प्रवेश का घ्यायचा असा प्रश्न पालकांसमोर उभा आहे.

     

    चंद्रपूर जिल्ह्यात या Right To Education Policy मध्ये जवळपास 1800 शाळांची नोंदणी करण्यात आली असून जवळपास 25 टक्के प्रवेश म्हणजेच तब्बल 14 हजार विद्यार्थी यंदा या कायद्यानुसार प्रवेश घेणार मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही, कारण आतापर्यंत केवळ 150 ऑनलाइन फॉर्म ची नोंदणी झाली असून यामध्ये एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही.

     

    यंदा सरकारच्या या निर्णयाचा हजारो वंचित घटकातील कुटुंबाना धक्का दिला आहे, मात्र शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या काही सामाजिक संस्थांनी याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने 8 मे पर्यंत शिक्षण विभागाला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

     

    Right To education मध्ये 30 एप्रिल पर्यंत प्रवेश घेण्याची अंतिम तिथी होती मात्र आता यामध्ये मुदतवाढ करीत 10 मे पर्यंत तारीख वाढविण्यात आली आहे.

  • Dinosaur Fossils destroyed : चंद्रपुरातील डायनासोर जीवाश्म नष्ट

    Dinosaur Fossils destroyed : चंद्रपुरातील डायनासोर जीवाश्म नष्ट

    Dinosaur Fossils destroyed जगात सर्वत्र पुरातत्वीय आणि वारसा स्थळे जपली जात असून पर्यटन आणि अभ्यासासाठी ती संरक्षित केली जाते परंतु भारतात मात्र राजकीय, प्रशासकीय आणि जनतेच्या उदासीनतेमुळे राज्यातील अनेक स्थळे नष्ट होत आहेत.

    अवश्य वाचा – अतिक्रमण हटाव मोहिमेवरून आयुक्त विपीन पालिवाल यांच्यावर गंभीर आरोप

    Dinosaur Fossils destroyed ह्याचेच एक उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील ६५ मिलियन वर्षापूर्वीच्या विशालकाय डायनोसोरचे एकमेव जीवाश्म स्थळ आज नष्ट झाले असून भावी अभ्यासक आणि विज्ञानांसाठी ते आता उपलब्ध राहणार नाही अशी माहिती आणि खंत येथील भूशास्त्र संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी व्यक्त केली आहे.

     

     

    Dinosaur Fossils destroyed आज जिल्ह्यात केवळ तेम्भूर्डा-पिसदुरा ह्या एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डायनोसोर चे जीवाश्म आढळतात. ह्याच परिसरात भद्रावती तालुक्यात देखील अल्प अवशेष मिळाली आहेत ,परंतु पिसदुरा येथे त्यांची हाडे, विष्ठा, शाख-शिंपले आणि वनस्पती जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळत होती .

     

    प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी १९९९ पासून आजपर्यंत ह्या परिसरात संशोधन करून काही महत्वाचे पुरावे गोळा केले होते. २७ एप्रिल २०२४ रोजी चोपंने ह्यांनी ह्या परिसराला सर्वेक्षणाच्या दृष्टीने भेट दिली असता येथील सर्व जीवाश्मे जवळ जवळ नष्ट झाली असल्याचे निदर्शनास आले.

     

    आतापर्यंत त्यांनी गोळा केलेले हे अमूल्य पुरावे संशोधक आणि विध्यार्थ्या साठी त्यांनी व्यक्तिगत अश्म संग्रहालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत . तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी मा भोगे साहेब ह्यांना एक प्रस्ताव सादर करून पिसदुरा येथे डायनॉसोर पार्क आणि भद्रावती येथे मोठे पुरातत्व संग्राहलय उभारण्याचा प्रस्ताव दिला होता आणि तो मंजूर झाला होता. परंतु तत्कालीन सरकारने मंजुरीला वेळ लावल्याने डायनोसोर स्थळ, जिल्ह्यातील पुरातत्वीय आणि ऐतिहासिक वारसा स्थळांचे संरक्षण होऊ शकले नाही.

     

    चंद्रपूर जिल्हा ऐतिहासिक दृष्ट्‍या समृद्ध असूनही आज सुद्धा पुरातत्व विभागाचे संग्रहालय होऊ नये ही खेदाची बाब आहे .त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक मुर्त्या चोरी जात असून ही स्थळे अतिक्रमित होत आहेत.
    जिवती येथील जीवाश्मस्थळ असेच काही संशोधक आणि भूशास्त्र विध्यार्थ्यांनी अभ्यासाठी जीवाश्मे गोळा करून संपवून टाकले.

     

    पिसदुरा हे स्थळ संरक्षित न केल्याने डायनोसोर चे जीवाश्मे विविध कारणाने आज गायब झाली आहेत, त्यात शेतीची कामे, शेतीसाठी अतिक्रमण, बाहेरून येणाऱ्या संशोधक आणि लोकांनी जीवाश्मे घेवून जाणे आणि विकणे अश्या गतीविधीचा समावेश आहे .प्रा सुरेश चोपणे ह्यांनी जिल्ह्यातील महत्वाच्या पुरातत्वीय पुराव्यांना गोळा करून घरी एक शैक्षणिक संग्रहालय उभारले असून विसापूर येथे नुकतेच सुरु झालेल्या बोटनिकल गार्डन येथे संग्रहालयात ,डायनोसोरची जीवाश्मे,विविध प्रकारची अश्म आणि पाषाण युगील अवजारे भेट दिली आहेत, तसेच शहरात पुरातत्वीय संग्रहालय झाल्यास इतर सर्व पुरावे सुद्धा दिली जातील असे त्यांनी सांगितले.

     

    संशोधक,नागरिक आणि शासनाने अश्या सर्व स्थळांचे जतन करावे आणि मोलाचा हा ठेवा भावी पिढीला पाहण्यासाठी आणि अभ्यासाठी संरक्षित करण्यात यावा असे आवाहन सुरेश चोपणे ह्यांनी केले आहे..

     

    Dinosaur Fossils destroyed ६५ दशलक्ष वर्षापूर्वी एका विशाल उल्केच्या पृथ्वीवर आदळल्याने आणि त्याच दरम्यान पृथ्वीवर अनेक ठिकाणी ज्वालामुखी उद्रेक होऊ लागले. हाच लावारस उत्तर-पश्चिमेकडून चंद्रपूर कडे वाहात आला. आणि त्याखाली त्यावेळेस विकसित झालेले प्रचंड आकाराचे डायनोसोर प्रजातीचे अनेक प्राणी इथे आणि महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले . एका मागोमाग एक बेसाल्ट खडकांचे थर साचल्याने पश्चिम महाराष्ट्रात ते खूप खाली गाडल्या गेले तर चंद्रपूर कडे बेसाल्ट खडकाचा थर जाड नसल्याने तो लाखो वर्षात क्षरण झाला आणि ६ कोटी वर्षापूर्वीचे डायनोसोर जीवाश्म रूपाने बाहेर येवू लागले.

     

    डायनोसोरची जीवाश्मे वर्धा,गडचिरोली आणि उमरेड परिसरात सुधा मिळाली आहेत परंतु तीथेसुधा आता अवशेष शिल्लक राहिली नाही ही गंभीर बाब आहे अशी चिंता सुरेश चोपणे यानी व्यक्त केली आहे.

  • Chandrapur City Encroachment : चंद्रपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून राजकारण तापलंय

    Chandrapur City Encroachment : चंद्रपूर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेवरून राजकारण तापलंय

    Chandrapur City Encroachment चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 2 मे पासून महानगरपालिका, पोलीस व वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे मात्र या मोहिमेवरून आता राजकारण तापलंय.

     

    ही अतिक्रमण हटाव मोहीम महानगरपालिकेच्या जिव्हारी लागत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

    अवश्य वाचा : त्या मृतकाची ओळख पटेना

    Chandrapur City Encroachment 2 मे ला मुख्य मार्गावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते बिनबा गेट पर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली, मात्र त्याठिकाणी काही विशिष्ट समाजाच्या नागरिकांचे अतिक्रमण हटविण्यात आले, असा थेट आरोप राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी लावला आहे.

     

    Chandrapur City Encroachment आयुक्त विपीन पालिवाल हे राजकीय दबावापोटी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करीत आहे, हे चुकीचे आहे, आमचा कारवाईला विरोध नाही पण त्यांनी सर्वांना समान न्याय द्यायला हवा.

    अवश्य वाचा : पशुधनाला इयर टॅगिंग करा

    Chandrapur City Encroachment 3 मे रोजी जटपूरा गेट ते रामनगर चौक पर्यंत अतिक्रमण मोहीम मनपाने राबवली मात्र या कारवाई दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले यांनी तीव्र आक्षेप घेत आयुक्त विपीन पालिवाल हे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सेवक असल्याचा आरोप करीत त्यांनी कारवाई थांबवली नाही तर आयुक्तांची गाढवावर बसून धिंड काढणार असा इशारा राजेश बेले यांनी दिला आहे.

     

    आयुक्त पालिवाल यांनी यावर आम्ही नियमाप्रमाणे अतिक्रमण काढत आहो, शहरातील रस्ते आधीच अरुंद आहे, त्यामुळे नागरिकांना पार्किंग साठी जागा मिळत नाही, म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही राबवित आहे, सदर मोहीम ही पुढील 15 दिवस चालणार असल्याची प्रतिक्रिया विपीन पालिवाल यांनी दिली आहे.

  • Appeal of administration to citizens : त्या मृतकाची ओळख पटेना, मग आता काय?

    Appeal of administration to citizens : त्या मृतकाची ओळख पटेना, मग आता काय?

    Appeal of administration to citizens दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर आवारातील गेट जवळ एक अनोळखी इसम झोपलेल्या स्थितीत दिसल्याने त्यास वॉर्डबॉयने उठवून पाहिले असता तो हालचाल करीत नव्हता. त्यामुळे सदर इसमास जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील अपघात विभागात भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात पार्किंग ची समस्या, प्रशासनाने सुरू केली ही मोहीम

    Appeal of administration to citizens याबाबत शहर पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून सदर मृतक हा अनोळखी असून त्याची अजुनपर्यंत ओळख पटलेली नाही व त्याचे कोणीही नातेवाईक समोर आलेले नाही. मृतकाची ओळख पटविण्याकरीता नातेवाईकांचा शोध घेतला असता ते सुध्दा मिळू शकले नाही, त्यामुळे सदर अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

     

    मृतकाचे वर्णन :  अनोळखी इसम वय अंदाजे 65 वर्ष, रंग काळा सावळा, चेहरा-लांबट, डोक्याचे केस बारीक पांढरे, दाढी मिशीचे केस पांढरे, उजव्या हाताला पंजापासून खांदयापंर्यंत दवाखान्याचे बॅंडेज बांधलेला, अंगात तपकिरी काळया लाईन असलेला मळकट फुल शर्ट, सिमेंट रंगाचा फुलपॅन्ट घातलेला अनोळखी पुरुष इसम. Appeal of administration to citizens