Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Rashtriya Obc Mahasangh : ओबीसींच्या महाधिवेशनात घेणार हा महत्वाचा ठराव

    Rashtriya Obc Mahasangh : ओबीसींच्या महाधिवेशनात घेणार हा महत्वाचा ठराव

    Rashtriya Obc Mahasangh दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर, पंजाब राज्यात आयोजीत करण्यात आले आहे.

    ताडोब्याची बातमी :अखेर त्या नरभक्षक वाघाला वनविभागाने पकडले

    Rashtriya Obc Mahasangh सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने चंद्रपुर येथे रविवार दिनांक १९ मे २०२४ रोजी बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपुर येथे दुपारी ३ वाजता कऱण्यात आले होते,

    कारवाई बातमी : 79 लाखांचे चोर बीटी कपाशी बियाणे जप्त

    या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या.

    अवश्य वाचा : राज्यात वेळेपूर्वी दाखल होणार मान्सून

    Rashtriya Obc Mahasangh ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षीय भाषणात बोलताना मनाले की आपल्या अधिकारासाठी महाधिवेशनात सामील व्हा असे आवाहन केले.

     

     

    बैठकीतचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आज पर्यंत झालेल्या अधिवेशन बद्दल माहिती दिली.

    बैठकीत सहसचिव शरद वानखेडे , राज्य कार्याध्यक्ष दिनेश चोखारे कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष शाम लेडे, ऍड पुरुषोत्तम सातपुते, विजय चहारे, प्रा अनिल शिंदे , माजी नगरसेवक प्रदिप देशमुख, वणीचे जिल्हाध्यक्ष विजय पिदूरकर, शाम राजूरकर , प्रा नितीन कुकडे, कवडू मांडवकर, प्रदिप पावडे,रामदास कामडी , प्रा बबनराव राजूरकर, अशोक सोनटक्के,दिनकरराव शिनगारे, अरुण चौधरी,कवडू लोहकरे तुळशीदास भुरसे, योगराज कावळे सुधाकर काकडे निखिल उपासे कालिदास येरगुडे मनोज बेले ,अक्षय येरगुडे ,अजय बलकी,मनीषा बोबडे, कुसुमताई उदार,ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे , प्रेमानंद जोगी, पांडुरंग गावतुरे ओबीसी महासंघ ,महिला महासंघ, युवा – युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ , वकील महासंघ तसेच तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्त् बैठकीला उपस्थित होते.

  • Chandrapur cha raja : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची वार्षिक कार्यकारणी गठीत

    Chandrapur cha raja : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची वार्षिक कार्यकारणी गठीत

    Chandrapur cha raja चंद्रपुरातील मानाचा गणपती म्हणून प्रख्यात असलेल्या चंद्रपूर चा राजा गणेश मंडळाची वर्ष 2024 ची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा – 3 नागरिकांची शिकार करणारा वाघ जेरबंद

    Chandrapur cha raja विशेष म्हणजे चंद्रपूर चा राजा जटपूरा युवक गणेश मंडळ यंदा 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे, मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष यंदा मोठ्या उत्साहात साजरे होणार आहे.

    महत्वाचे – चंद्रपुरातील होर्डिंग्ज चे ऑडिट करा

    वार्षिक कार्यकारिणीत यंदा संस्थेचे अध्यक्ष श्री दिपक बेले यांचा अध्यक्षतेखाली शनिवार दि.18/5/2024 रोजी झालेल्या मंडळाचा बैठकीत वार्षिक उत्सव कार्यकारिणी ची सर्वानुमते निवड करण्यात आली.

     

    Chandrapur cha raja अध्यक्षपदाचा मान यंदा अध्यक्ष: देवेंद्र बेले, उपाध्यक्ष:- श्री राहुल बेले व श्री चिराग नथवानी, सचिव:- श्री शैलेश जुमडे , सहसचिव:- श्री संकेत पुण्यप्रेड्डीवार, कोषाध्यक्ष:- श्री निश्चल बेले यांना मिळाला आहे.

    या नवीन उत्सव कार्यकारिणी च्या नेतृत्वात आणि सर्व सदस्यांचा सहकार्याने सुवर्ण महोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

  • Cmc chandrapur : चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा

    Cmc chandrapur : चंद्रपूरमधील होर्डिंग्जचे ऑडिट करा

    CMC chandrapur मुंबईत 13 मे रोजी विशाल होर्डीग्स कोसळले.,यात अनेकांची जीवित हानी झाली. अशी घटना चंद्रपूरात नाकारता येत नाही.म्हणून शहरातील सर्व होर्डिंग्जचे तात्काळ ऑडिट करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरने मनपा प्रशासनाकडे निवेदन देऊन केली आहे.

     

    यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, रामपाल सिंग,महामंत्री प्रज्वलंत कडू,मंडळ प्रमुख संदीप आगलावे,रवी लोणकर, चांद सैय्यद, रवी चाहरे, रुद्रनारायण तिवारी, पुरुषोत्तम सहारे यांची उपस्थिती होती.

     

    CMC chandrapur पावडे म्हणाले, चंद्रपूरमध्ये सुध्दा होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना होऊ शकतात, म्हणून दक्षता घेणे गरजेचे आहे. मुंबई येथील घडलेली दुर्घटना अत्यन्त दुखदायी आहे.

     

    प्रशासनाचा हलगर्जीपणा यास जवाबदार आहे. अनधिकृतपणे मुंबईत ते विशाल होर्डिंग लावण्यात आले.अशी स्थिती येथेही नाकारता येत नाही.करीता, शहरामध्ये ठिकठिकाणी लागलेल्या होर्डिंग्जचे सर्व्हे करून ऑडीट करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी केली.

  • Zilla Parishad High School : शिक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती करा – सचिन राजूरकर

    Zilla Parishad High School : शिक्षकाची कायमस्वरूपी नियुक्ती करा – सचिन राजूरकर

    Zilla Parishad High School चंद्रपूर जिल्ह्यातील चकनिंबाळा गावातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ग्रामस्थ आणि पदाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कायम शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

    अवश्य वाचा : काय म्हणता ! चंद्रपुरात 79 लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त

    Zilla Parishad High School चकनिंबाळा हायस्कूलमध्ये दोन शिक्षक निलंबित झाल्यामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण बिघडले आहे. यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत टाकण्याचा विचार करत आहेत. शाळा बंद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मजूर कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण होईल.

    अवश्य वाचा : यादिवशी होणार मान्सून चे आगमन

    Zilla Parishad High School सध्या तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असलेले शिक्षक प्रमोद बाभळीकर हे विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत आणि त्यांना कायम शिक्षक बनवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शाळेसाठी तीन अतिरिक्त शिक्षकांचीही आवश्यकता आहे.
    गावकऱ्यांनी आणि पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती केली आहे.

     

    शाळेसाठी तीन अतिरिक्त शिक्षकांची नियुक्ती केली जावी, या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही 17 मे रोजी देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, चेकनिंबाला गावातील,अंकुश कौरासे,अशोक बोबडे ,मारोती देवतळे,संजय ऊरकुडे,राम जुनघरे,सचिन आस्वले उपस्थित होते.

  • Lok Sabha Election Counting : अशी असणार चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी

    Lok Sabha Election Counting : अशी असणार चंद्रपूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी

    Lok Sabha Election Counting निवडणूक प्रक्रियेमध्ये मतमोजणी हा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा टप्पा आहे. किंचीतही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह लागू शकते. त्यामुळे मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांनी अतिशय गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता आहे, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

    अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील या शेतकऱ्यांने वाघाचे कुऱ्हाडीने तुकडे करीत जाळले

    नियोजन सभागृह येथे आज (दि.16) मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी – कर्मचा-यांचा आढावा घेतांना ते बोलत होते. मंचावर सहायक जिल्हाधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, शिवनंदा लंगडापुरे, नितीन हिंगोले आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : 17 मे पासून RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

    Lok Sabha Election Counting 19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक घेण्यात आली असून मतदानाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, 4 जून रोजी तडाळी येथील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निरीक्षक, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व इतर सर्वजणांचे अतिशय बारकाईने या प्रक्रियेवर लक्ष असते. तसेच उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींना विश्वासात घेऊन मतमोजणीची प्रक्रिया समजावून सांगणे / दाखविणे आवश्यक आहे.

     

    Lok Sabha Election Counting पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणेच आणि मॅन्युअलचा अभ्यास करून अतिशय पारदर्शक आणि अचूकपणे मतमोजणी करावयाची आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचा-याने गोपनीयता पाळणे आवश्यक असून कोणीही स्वत:चे मत व्यक्त करू नये तसेच प्रक्रियेची माहिती इतरांना देऊ नये. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान अधिकारी – कर्मचा-यांनी तटस्थ असणे गरजेचे आहे. मतमोजणी केंद्रामध्ये अधिकारी – कर्मचारी व इतरांना मोबाईल, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास परवानगी नाही. संपूर्ण प्रक्रियेसाठी तीनवेळा रँडमायझेशन होणार असून ईव्हीएम व्हीव्हीपॅट मतमोजणी बाबत सर्वांनीच तयारी करून ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

     

    यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी सादरीकरण केले. तसेच ईव्हीएम मतमोजणीकरीता प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल, पोस्टल बॅलेटकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएस मतमोजणी करीता 8 टेबल राहणार आहे. 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता पोस्टल बॅलेट च्या मतमोजणीला सुरवात होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Kishor Jorgewar : शहरातील ते होर्डिंग्ज धोकादायक – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor Jorgewar : शहरातील ते होर्डिंग्ज धोकादायक – आमदार किशोर जोरगेवार

    Kishor jorgewar चंद्रपूर जिल्हात अनेक धोकादायक आणि अवैद्य होर्डिंग्ज आहेत. यामुळे आता धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात सदर होर्डिंग्जवर कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केल्या आहे.

    अवश्य वाचा : पोलीस भरती मध्ये आला नवा नियम

    सदर निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पाठविण्यात आले आहेे.

    Kishor jorgewar चंद्रपूर जिल्हातील अनेक ठिकाणी धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज अस्तित्वात आहे. हे होर्डिंग्ज नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे, काही दिवसापासून अवकाळी पाऊस व वादळवारे सुरु असून येत्या काही दिवसात मान्सून हंगामात वादळवार्यामुळे त्या कधीही खाली पडू शकतात आणि गंभीर दुखापत किंवा जीवितहानीस कारणीभूत ठरू शकतात.

    अवश्य वाचा : शिक्षणाचा अधिकार अंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुरू

    Kishor jorgewar याव्यतिरिक्त, ते शहराचं विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत आहे. मागील काही दिवसापूर्वी मुंबई मनपा भागातील घाटकोपर येथे धोकादायक होर्डिंग कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथे सुद्धा सदर घटनेची पुनरावृत्ती होण्यापासून टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. तसेच शासनच्या परवानगी न घेता व स्ट्रक्चरल ऑडिट न करता मनमानी प्रकाराने शहरात अनेक अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आलेल्या आहे, आणि त्यापण नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

     

    ही बाब लक्षात घेता चंद्रपूर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हातील सर्व होर्डिंग्ज चे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग व अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटविण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

  • Action to remove encroachment : चंद्रपुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा जाहीर निषेध

    Action to remove encroachment : चंद्रपुरातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा जाहीर निषेध

    Action to remove encroachment चंद्रपूर शहरात मनपाद्वारे सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाई चा शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व कांग्रेस महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांनी आज 15 मे रोजी जाहीर निषेध नोंदविला.

    अवश्य वाचा : महावितरण केला AI तंत्रज्ञानाचा वापर, सुरू केली ही सेवा

    2 मे पासून शहरात मनपाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली मात्र या कारवाईचा सर्वात मोठा फटका हा लहान दुकानदारांना बसत आहे, ऊन व पावसापासून बचावासाठी बनविलेल्या शेड, चाय टपरी यावर मनपा प्रशासन कारवाई करीत आहे मात्र शहरात नियमबाह्य निर्माण करण्यात आलेल्या इमारतीवर कारवाई करायचे सोडून लहान दुकानदारांना मनपा त्रास देत आहे असा सवाल रामू तिवारी यांनी यावेळी उपस्थित केला.

    शैक्षणिक बातमी : चंद्रपूर जिल्ह्यातील वर्ग 10 वी च्या परीक्षेतील टॉपर

    Action to remove encroachment ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेचा आम्ही विरोध करीत नसून स्वागत करतो मात्र कारवाई समान व्हायला हवी चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचे काम या कारवाईतून दिसत आहे, हे थांबायला हवं मोठ्या व्यापारी वर्ग ज्यांनी नियमबाह्य अतिक्रमण केले त्यांना अभय देत छोट्या दुकांनदारांवर कारवाई बडगा उभारणे हे चुकीचे आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

    दोन्ही पक्षांना उशिरा जाग

    मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला 10 ते 12 दिवसांचा कालावधी लोटल्यावर दोन्ही पक्षांना मात्र उशिरा जाग आली, या कारवाईच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी सर्वप्रथम निषेध नोंदवीत, कारवाई मध्ये भेदभाव होत असल्याचा आरोप केला होता.

  • Amrit Yojana Chandrapur : अमृतच्या पाण्यासाठी चंद्रपुरात रस्ता रोको आंदोलन

    Amrit Yojana Chandrapur : अमृतच्या पाण्यासाठी चंद्रपुरात रस्ता रोको आंदोलन

    Amrit Yojana Chandrapur चंद्रपूर महानगरपालिकेने शहरात अमृत योजनेचे काम सुरू केले होते, मात्र कामाचा अवधी पूर्ण झाल्यावर सुद्धा आजही अनेक भागात अमृत ची पाईपलाईन पोहचली नाही, ज्या भागात पाईपलाईन गेली त्या भागात पाणी पोहचले नाही अशी दैना आज चंद्रपूर मनपाने शहरात करून ठेवली आहे, मात्र याविरोधात भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी आवाज उठवीत 15 मे ला रस्ता रोको आंदोलन केले.

    अवश्य वाचा : RTE बाबत महत्वाची माहिती

    त्यांच्या रस्ता रोको आंदोलनाला यश मिळाले असून येत्या 10 दिवसात सुमित्रा नगर या वस्तीमध्ये अमृत चे पाणी येणार असे आश्वासन आंदोलन कर्त्याना मिळाले आहे.

    अवश्य वाचा : आम्हाला नोडल अधिकारी हवा

    Amrit Yojana Chandrapur 5 वर्षांपूर्वी मनपाने अमृत योजनेच्या कामाला प्रारंभ केला, त्यानंतर 3 मे 2021 मध्ये तुकूम प्रभागातील सुमित्रा नगर भागात अमृत पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन करण्यात आले, मात्र 3 वर्षाच्या कालावधीत सुमित्रा नगर येथील अमृत च्या पाईपलाईन मध्ये पाण्याचा थेंब आला नाही, पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी याबाबत माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे तक्रारी केल्या, याबाबत त्यांनी मनपा ला वेळोवेळी निवेदने दिली मात्र निवेदनावर काही कारवाई होत नसल्याने 15 मे रोजी सुमित्रा नगर भागातील नागरिकांना सोबत घेत तुकूम मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांनी हातात घागर घेत आंदोलन केले.

     

    यावेळी मनपाचे अधिकारी आंदोलनात पोहचले त्यांनी आंदोलन कर्त्याना येत्या 10 दिवसात आपल्या भागात नियमित पाण्याचा पुरवठा सुरू होणार असे आश्वासन दिल्यावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.

     

    Amrit Yojana Chandrapur यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी प्रशासनाला इशारा देत म्हटले की 10 दिवसात जर पाणी या भागात आले नाही तर आम्ही सर्व नागरिक मनपा कार्यालयात पोहचत मनपा ला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही.

    यावेळी तुकुम प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.
    आंदोलनानंतर सुमित्रा नगर भागतील आंदोलनकर्ते नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली, आंदोलनादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.

  • District vigilance officer :भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या आढावा बैठकीत महत्वाची मागणी

    District vigilance officer :भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या आढावा बैठकीत महत्वाची मागणी

    District vigilance officer भ्रष्टाचार निर्मुलनासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात समितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता पद्माकर पाटील, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) ए.ए. तांदळे, तहसीलदार (सामान्य) प्रिया कवळे आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : मुंबईत अवैध होर्डिंग कोसळली, आणि चंद्रपुरात कारवाई चे निर्देश

          यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी प्रत्येक विभागाने व्हिजिलन्स (सतर्कता) अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. भ्रष्टाचाराशी संबंधित प्राप्त तक्रारी किती व किती तक्रारींचा निपटारा झाला, याबाबत अहवाल सादर करावा. तसेच भ्रष्टाचारासंदर्भात तक्रार करावयाची असल्यास संबंधित विभाग किंवा समितीसमोर तक्रार दाखल करावी. तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

     

    District vigilance officer भ्रष्टाचारासंदर्भातील जी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालविले जाऊ शकतात, अशा प्रकरणांची तसेच गतवर्षी दोषी ठरलेले आणि निर्दोष सुटलेल्या प्रकरणांची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर करावी. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपअधिक्षक मंजुषा भोसले यांनी पंच नेमणुकीसाठी नोडल अधिका-यांची मागणी प्रशासनाकडे केली.

  • Illegal hoardings in chandrapur : अवैध होर्डिंग धारकांवर सक्त कारवाईचे चंद्रपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

    Illegal hoardings in chandrapur : अवैध होर्डिंग धारकांवर सक्त कारवाईचे चंद्रपूर मनपा आयुक्तांचे निर्देश

    Illegal hoardings in chandrapur शहरातील जेवढेही अवैध होर्डिंगधारक आहेत त्यांनी त्यांचे अवैध होर्डिंग २४ तासाच्या आत काढले नाही तर त्यांच्यावर निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

    अवश्य वाचा : महावीतरणची AI सेवा सुरू

    Illegal hoardings in chandrapur  मुंबई येथील होर्डिंग दुर्घटना पार्श्वभुमीवर अवैध होर्डिंगसंबंधी आढावा बैठक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली मनपात आयोजीत करण्यात आली होती. शहरातील जेवढेही अवैध होर्डिंगधारक आहेत त्यांना मनपातर्फे होर्डिंग काढण्याच्या नोटीस यापुर्वी बजावण्यात आल्या आहेत. मात्र आता २४ तासाच्या आत जर होर्डिंगधारकांनी त्यांचे अवैध होर्डिंग काढले नाही तर मनपातर्फे निष्कासनाची तसेच दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

    अवश्य वाचा : RTE चा घोळ संपला, आता प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुरू

    निष्कासनाची कारवाई करतांना जो काही खर्च लागेल तो या होर्डिंगधारकांकडुन वसूल केला जाणार आहे.
    महानगरपालिका हद्दीत डिजिटल पोस्टर्स, जाहिरातीची होर्डिंग, बॅनर उभारतांना मनपाकडून रीतसर परवानगी घेऊन यासंबंधी आकारण्यात येणारा टॅक्स भरणे आवश्यक असते.

     

    मात्र अनेकदा परवानगी न घेता होर्डिंग उभारण्यात येते व आवश्यक ती काळजी न घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते.