Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Chandrapur Lok Sabha Election Counting : जिल्हा प्रशासन सज्ज

    Chandrapur Lok Sabha Election Counting : जिल्हा प्रशासन सज्ज

    Chandrapur Lok Sabha Election Counting चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एम.आय.डी.सी. परिसर, पडोली येथे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेतील हा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा टप्पा आहे. कोणतीही चूक झाली तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकपणे व अचूक करा, अशा सुचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

    अवश्य वाचा : दारू विक्रेत्यांना प्रशासनाने पाजले कायद्याचे डोज

    chandrapur Lok Sabha Election Counting प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे मतमोजणीकरीता नियुक्त अधिकारी, कर्मचारी, सुपरवायझर, सहायक, सुक्ष्म निरीक्षकांच्या प्रशिक्षण दरम्यान ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, सहायक निवडणूक अधिकारी डॉ. सुहास गाडे (आर्णि), नितीनकुमार हिंगोले (वणी), विशालकुमार मेश्राम (बल्लारपूर), संजय पवार (चंद्रपूर), रविंद्र माने (राजुरा) आणि शिवनंदा लंगडापुरे (वरोरा) उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात उष्णतेची लाट

    Chandrapur Lok Sabha Election Counting केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच मतमोजणीची प्रक्रिया राबवावी, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जलदगतीने मतमोजणी पेक्षा अचूकपणे मतमोजणी करा. संबंधित सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी मतमोजणी केंद्रात गोपनीयता व नि:स्पक्षता राखणे आवश्यक आहे. कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. आपल्याकडून थोडी जरी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याची सर्वांनी जाणीव ठेवावी. त्यामुळे आपले वर्तन हे अत्यंत जबाबदारीचे असावे. सहायक निवडणूक अधिकारी स्तरावर सुद्धा प्रशिक्षणाची माहिती द्यावी. मतमोजणी करतांना उमेदवार, त्यांचे निवडणूक प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधींना प्रक्रियेबाबत अवगत करा व त्यांना प्रक्रिया दाखवा.

    अवश्य वाचा : वरोरा नाका चौकात होणार बदल

    Chandrapur Lok Sabha Election Counting नियुक्त अधिकारी – कर्मचा-यांनी मतमोजणी केंद्रावर ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा आधीच पोहचावे. प्रवेशासाठी दिलेले ओळखपत्र सोबत ठेवा. कोणत्याही स्टाफला मोबाईल, कॅमेरा, आयपॅड, लॅपटॉप किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तु मतमोजणी केंद्राच्या आतमध्ये नेण्यास मनाई आहे, याची प्रत्येकाने नोंद घ्यावी. यापूर्वीसुध्दा मतमोजणी प्रकियेत भाग घेतला असला तरी अतिआत्मविश्वास बाळगू नका. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी उजळणी करून घ्यावी. यानंतरचे शेवटचे प्रशिक्षण 3 जून रोजी मतमोजणी केंद्रावर होणार आहे, याचीसुध्दा सर्वांनी नोंद घ्यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

     

    यावेळी मतमोजणी संदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि ईव्हीएम मतमोजणीबाबत उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी तर पोस्टल बॅलेट आणि सर्व्हिस मतपत्रिका मोजणीबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. तत्पूर्वी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष पवार यांनी प्रास्ताविक केले.

  • Collector chanda : चंद्रपुरात दारू विक्रेत्यांना प्रशासनाने पाजले कायद्याचे डोज

    Collector chanda : चंद्रपुरात दारू विक्रेत्यांना प्रशासनाने पाजले कायद्याचे डोज

    Collector chanda अनुज्ञप्तीचा परवाना देतांनाच शासनाने अटी व शर्तीसुध्दा घालून दिल्या आहेत. आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होईल, अशी कृती न करता परवानाधारकांनी नियमानुसारच वागणे अपेक्षित आहे. त्यामुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा, नियमांचे उल्लंघन किंवा अवैध व्यवसाय करणा-यांविरुध्द सक्त कारवाई करण्यात येईल, असे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.

    अवश्य वाचा : वरोरा नाका चौकात पुन्हा अपघात

    Collector chanda जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अनुज्ञप्ती परवानाधारकांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक सुरजकुमार रामोड उपस्थित होते.

    सविस्तर वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट

    अनुज्ञप्ती विक्री, वाहतूक व साठवणूक संदर्भात कायद्याचे पालन होणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, कुठेही नियमांचे उल्लंघन आढळले तर कारवाईसाठी तुम्हीच जबाबदार रहाल. नियमांचे गांभिर्य समजावून सांगण्यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुकानदारांनी दर्शनी भागात कमाल, किरकोळ विक्री व वेळेबाबतचा फलक लावावा.

     

    तसेच नोकरनामा, आवश्यक अभिलेख, स्टॉक रजिस्टर अपडेट ठेवा. ज्या दिवशीचे रजिस्टर त्याच दिवशी भरून पूर्ण करा. जेणेकरून कोणत्याही वेळेस प्रशासनाकडून पडताळणी झाली तर अडचण होणार नाही.

    अवश्य वाचा : वरोरा नाका चौकात होणार हा महत्वाचा बदल

    Collector chanda अनुज्ञप्ती विक्री संदर्भात नियमानुसार दिलेल्या वेळा गांभिर्याने पाळा. ज्या परवानाधारकांकडे सीसीटीव्ही नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. महाराष्ट्रात 21 वर्षांखालील नागरिकांना मद्यविक्री करता येत नाही. 21 ते 25 वयोगटातील नागरिकांना सौम्य मद्यविक्री तर 25 वर्षांवरील नागरिकांना सर्व प्रकारची मद्यविक्री करता येते. त्यामुळे खरेदीदाराच्या ओळखपत्रावरुन वयाची पडताळणी करूनच मद्य विक्री करा. अन्यथा विनाकारण एखादी घटना घडली तर त्यात तुम्हीसुध्दा अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे गांभिर्याने लक्ष द्या. दुकानावर असलेल्या इतर कामगारांनासुध्दा सर्व नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. अवैध व्यवसाय करणा-यांची माहिती प्रशासनाकडे द्या व स्वत:चा व्यवसाय नियमानुसार करा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी केले.

     

    पैसे कमाविण्याच्या नादात कायद्याच्या कचाट्यात अडकू नका : एसपी सुदर्शन

    अटी व शर्तीनुसारच अनुज्ञप्ती परवानाधारकांनी व्यवसाय करावा. अवैध व्यवसाय करणा-यांवर प्रशासनातर्फे नियमित कारवाई सुरूच आहे. याव्यतिरिक्त अवैध विक्रीबाबत काही माहिती असल्यास पोलिस प्रशासनाला त्वरीत कळवा. नियमांचे उल्लंघन करून पैसे कमावण्याच्या नादात विनाकारण कायद्याच्या कचाट्यात अडकू नका, असे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले.

     

    Collector chanda ठरवून दिलेल्या नियमानुसार आपली दुकाने वेळेवर सुरु करा व वेळेवर बंद करा. ‘दारू पिऊन गाडी चालवू नये’ अशा आशयाचे फलक आपल्या दुकानांसमोर लावा. राज्यातील इतर घटनांची चंद्रपूरमध्ये पुनरावृत्ती होऊ नये म्हणून नियमांचे पालन करण्यासंदर्भात ही बैठक बोलाविण्यात आली आहे. असामाजिक तत्वांकडून त्रास होत असे, दारूकरीता कोणी जबरदस्ती करीत असेल तर पोलिस विभागाला कळवा किंवा 112 क्रमांकावर थेट कॉल करा, पोलिसांकडून नक्कीच कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. सुदर्शन यांनी दिली.

     

    यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. रामोड यांनी प्रास्ताविकातून नियमांबद्दल माहिती दिली. तसेच याप्रसंगी अनुज्ञप्ती परवानाधारकांनी सुध्दा आपले म्हणणे / सूचना प्रशासनाला सांगितल्या. बैठकीला जिल्ह्यातील परवानाधारक अनुज्ञप्ती व्यवसाय करणारे उपस्थित होते.

  • Chandrapur Warora naka accident : वरोरा नाका चौकात पुन्हा अपघात

    Chandrapur Warora naka accident : वरोरा नाका चौकात पुन्हा अपघात

    Chandrapur Warora naka accident चंद्रपूर शहरातील खुनी पुलिया म्हणून ओळखल्या वरोरा नाका चौकातील उड्डाणपूलावर अपघाताची मालिका सुरूच आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील 2 दिवस उष्णतेचे, उष्णतेची यलो अलर्ट

    Chandrapur Warora naka accident महिन्याभरात या पुल परीसरात तब्बल 4 ते 5 अपघात झाले आहे, आज 28 मे ला रात्री 8.30 वाजता गिट्टी भरलेला मालवाहू ट्रक पुलावरून मूल मार्गाकडे जात असताना पलटी झाला, यामुळे नागपूर वरून चंद्रपूर च्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

     

    Chandrapur Warora naka accident वरोरा नाका उड्डाणपूल हा वादग्रस्त पूल म्हणून ओळखला जातो या पुलावर तब्बल 51 नागरिकांनी अपघातात आपला जीव गमावला आहे, पुलिया दुरुस्ती झाल्यावर आता वाहन पलटण्याचे प्रमाण आता वाढत आहे, याच महिन्यात वाहन पलटण्याची ही चौथी घटना आहे.

    अत्यंत महत्त्वाचे : अपघाताच्या पार्श्वभूमीवर वरोरा नाका चौकात होणार हे बदल

    या पुलपरीसरात सिग्नल लावण्यात आले मात्र ते अजूनही उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहे, अपघाताची मालिका वाढल्यावर प्रशासनाला जाग आली मात्र अजूनही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.

  • Chandrapur heatwave alert : पुढील 2 दिवसात चंद्रपुरात उष्णतेची लाट

    Chandrapur heatwave alert : पुढील 2 दिवसात चंद्रपुरात उष्णतेची लाट

    Chandrapur heatwave alert चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मालाटेच्या अनुषंगाने 29 आणि 30 मे रोजी जिल्ह्याकरीता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    Also read : 15 ऑगस्ट पूर्वी चंद्रपुरात कॅन्सर हॉस्पिटलचे होणार उदघाटन

    घुग्गुस शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेची सुरुवात

    Chandrapur heatwave alert जे नागरीक घराबाहेर बराच वेळ घालवतात त्यांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु शकते. जेव्हा शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा ही स्थिती उद्भवू शकते.

    अवश्य वाचा : ती वसुलीची यादी कुणाकडे?

    उष्माघाताची लक्षणे : शरीराचे उच्च तापमान, अनेकदा १०४°F (४०°C) पेक्षा जास्त असते. यामुळे गोंधळ, चक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते. नाडीचे ठोके वाढणे आणि डोकेदुखी ही देखील सामान्य लक्षणे आहेत. त्वचा उष्ण आणि कोरडी किंवा ओलसर आणि घाम वाटू शकते. गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध पडणे किंवा झटके येऊ शकतात. स्वतःला किंवा इतर कोणाला ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

    महत्त्वाचे : वरोरा नाका चौकात महत्वाचे बदल होणार

    उष्माघात टाळण्यासाठी काय करावे : उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहणे टाळावे. घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा. भरपूर पाणी प्यावे, सोबतच ओआरएसचा वापर करावा. पाणीयुक्त फळे खावीत. नागरीकांनी सुरक्षित राहण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे असून वृद्ध, लहान मुले तसेच पूर्व- अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती ज्यांची चांगली नाही त्यांनी अतिरिक्त काळजी घेणे गरजेचे आहे. Chandrapur heatwave alert

     

    काय करु नये : उन्हात अतिकष्टाची कामे करु नये. दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये. दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्या. चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.

  • Tata cancer hospital in chandrapur : 15 ऑगस्ट पूर्वी कॅन्सर हॉस्पिटलचे होणार उदघाटन – पालकमंत्री मुनगंटीवार

    Tata cancer hospital in chandrapur : 15 ऑगस्ट पूर्वी कॅन्सर हॉस्पिटलचे होणार उदघाटन – पालकमंत्री मुनगंटीवार

    Tata cancer hospital in chandrapur चंद्रपूर : चंद्रपूर येथे पूर्णत्वास येत असलेल्या अत्याधुनिक टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (दि.२७) पाहणी केली. अद्ययावत सोयी सुविधांनी सज्ज असे १४० खाटांच्या हॉस्पीटलचे 90 टक्के कार्य पूर्ण झालेले असून उर्वरित वीस टक्के काम १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

    अवश्य वाचा : नियमबाह्य दुकानाच्या वसुलीची यादी जिल्ह्यातील कोणता आमदार वाचणार?

     

    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हॉस्पीटलमधील बांधकामाचा आढावा घेतला तसेच काही सूचना देखील केल्या. या सूचनांवर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात एक समिती देखील नेमण्याचे त्यांनी निर्देश दिले. बांधकामाचा पाठपुरावा करून येत्या १५ ऑगस्टपर्यंत हॉस्पीटलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन व्हावे यादृष्टीने देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी समितीकडे असणार आहे. १५ ऑगस्ट अथवा त्या लगतच्या तारखेला देशगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि श्री. रतनजी टाटा यांच्या विशेष उपस्थितीत टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याचा मानस ना.श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

    नक्की वाचा : वरोरा नाका चौकात होणार हा बदल

    Tata cancer hospital in chandrapur याप्रसंगी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, संजय कंचर्लावार, भाजपा नेते नामदेव डाहुले, डॉ.मंगेश गुलवाडे, धनराज कोवे, कमिशनिंग अँड इम्प्लिमेंटेशन प्रमुख डॉ. राकेश कपुरिया, प्रकल्प व्यवस्थापक श्री. वैभव गौतम, प्रकल्प समन्वयक श्रवण येगिनवार, वित्त आणि लेखा व्यवस्थापक मयूर नंधा, एमईपी व्यवस्थापक राकेश नायक, पीएमसी प्रमुख हाफीज शेख आदींची उपस्थिती होती.

     

     

    टाटा समुहाचे सर्वेसर्वा श्री. रतन टाटा यांच्याद्वारे २०१६ मध्ये बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरकरिता सहकार्य लाभले यादरम्यान पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे मतदारसंघ वाराणसी येथे टाटा कॅन्सर हॉस्पीटल बांधण्याची घोषणा झाली होती. यानंतर ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. रतन टाटांना चंद्रपुरमध्येही टाटा कॅन्सर हॉस्पीटल तयार व्हावे, यासाठी विनंती केली होती. श्री. टाटा यांनी त्यासाठी देखील पुढाकार घेत कॅन्सर हॉस्पीटलकरिता १०० कोटी रुपयांचा सीएसआर निधी देण्याचे कबूल केले होते. त्यांच्या पुढाकारामुळे आता चंद्रपूरमध्ये १४० खाटांचे टाटा कॅन्सर हॉस्पीटल तयार होत आहे.

    अवश्य वाचा : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

    Tata cancer hospital in chandrapur याकरिता राज्य शासन आणि टाटा कॅन्सर हॉस्पीटल असे संयुक्त ट्रस्ट निर्माण करण्यात आले आहे. हॉस्पीटलचे ८० टक्के काम पूर्णत्वास आले आहे. कोवीड काळात २ वर्षे ८ महिने भारतीय जनता पार्टीचे सरकार नसल्यामुळे या कामाची गती अतिशय मंद झाली होती. पण आता कामाला गती मिळालेली असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होणार आहे. कॅन्सर हॉस्पिटल २लाख ३४ हजार १४ स्केअर फुटात वसलेले आहे.चंद्रपूरचे १४० खाटांची क्षमता असलेले टाटा कॅन्सर हॉस्पीटल अतिशय अत्याधुनिक असून यामध्ये उत्तम सेवा उपलब्ध आहेत. या हॉस्पीटलचा उपयोग हा तेलंगाणा, छत्तीसगढ व महाराष्ट्राच्या मध्य भागातील कॅन्सर रुग्णांना निश्चितपणे वरदाण ठरणार आहे, असा विश्वास ना.श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

    Tata cancer hospital in chandrapur सुधीर मुनगंटीवार यांनी टाटा कॅन्सर हॉस्पीटलच्या यावेळी संपूर्ण कामासंदर्भात आढावा घेतला .हॉस्पीटलमधील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या बांधकामासंदर्भात यंत्रणेची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश यावेळी ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. याशिवाय हॉस्पीटलच्या पोच मार्गावरील अतिक्रमण काढणे, पथदिव्यांची व्यवस्था अद्ययावत करणे, नवे पथदिवे लावणे, सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने रस्ता साफ करणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि टाटा कॅन्सर हॉस्पीटलकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठे दिशादर्शक फलक लावणे, हॉस्पीटलच्या आवारात अद्ययावत कॅन्टीन,सोलर,मेडिकल, पार्कींग, एटीएम आदींची सर्व सुविधा करणे, परिसरात नेहमी स्वच्छता, पिण्याचे पाणी यादृष्टीने नियोजन करणे, परिसरात पर्यावरणाच्या दृष्टीने वड, पिंपळ, कडूनिंब, औदुंबर,देशी आंबा,गुलमोहर आदी झाडांचे वृक्षलागवड करणे आदींबाबत देखील ना.श्री. मुनगंटीवार यांनी निर्देश दिले.

  • Warora naka square : वरोरा नाका चौकात होणार हा मोठा बदल

    Warora naka square : वरोरा नाका चौकात होणार हा मोठा बदल

    Warora naka square रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच इतर संबंधित विभागाला सुचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला मनपा आयुक्त विपीन पालीवाल, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अभियंता श्री. बोबडे उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार कधी वाचणार त्या वसुलीची यादी?

    Warora naka square शहरातील वरोरा नाका येथे चारही बाजूंनी येणा-या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गतीरोधक लावून त्याला वारंवार पेंटींग करणे. तसेच सोलर ब्लिंकर आणि प्लॅस्टिकचे डेलीनेटर्स लावणे. शहरातून जाणा-या मार्गावर वेग नियंत्रण, गतीरोधक, चालकांसाठी सूचना आदी बाबींचे माहितीचे फलक स्पष्टपणे निदर्शनास येईल, अशा जागांवर लावावे. शहरातील अनेक चौकात हिरवा सिग्नल संपण्यापूर्वीच दुस-या बाजूचे वाहनचालक गाड्या चालवितांना दिसतात.

    अवश्य वाचा : ताडोब्यातील वाघांची सुरक्षा धोक्यात, वाचा ही बातमी

    हे अतिशय धोकादायक असून अपघाताची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच वाहतूक नियंत्रण व अपघात कमी करण्याबाबत नागरिकांच्या काही सुचना असल्यास त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

  • Chandrapur Pattern : चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार हिम्मत कधी दाखविणार?

    Chandrapur Pattern : चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार हिम्मत कधी दाखविणार?

    Chandrapur Pattern पुणे येथील कल्याणीनगर परिसरात बांधकाम व्यावसायिकांच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पोर्श कार ने दोघांना जोरदार धडक दिली, या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, मात्र सदर प्रकरण लवकर मिटावे यासाठी जनप्रतिनिधीने अथक प्रयत्न केले, त्याला साथ मिळाली प्रशासनाची, मात्र कसबा पेठ येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी सदर प्रकरण उचलत दोषींवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

    अवश्य वाचा : पर्यटकांच्या गराड्यात अडकला वाघ

    Chandrapur Pattern आणि त्यानंतर प्रशासनाची एक बाजू उजेडात आली, त्या अल्पवयीन मुलाला न्यायालयाने 300 शब्दांचा निबंध व 15 दिवस वाहतूक पोलिसासोबत वाहतूक नियमाबाबत जनजागृती करावी अशी शिक्षा ठोठावली, मात्र पुणेकर जनता व आमदार धंगेकर यांनी याविरोधात आवाज उचलला व त्या अल्पवयीन मुलाचा जामीन रद्द करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले.

     

    Chandrapur Pattern आज आमदार रवींद्र धंगेकर व शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात धडक देत पुणे येथील पब, बार व वाईन शॉप मधून दरमहिना कोट्यवधी रुपयांची वसुली करण्याबाबत यादी वाचली, सुषमा अंधारे यांनी यादी वाचत उत्पादन शुल्क विभाग अधिकाऱ्यांची पोलपट्टी समोर आणली.

    Also read : मुलींना उच्चशिक्षण मिळणार मोफत

    जनप्रतिनिधी आपल्यावर आला व त्यांनी प्रकरण उचललं तर सर्व काही शक्य आहे, पुणे येथील आमदार धंगेकर यांनी चांगलं काम केलं, मात्र असे आमदार व जनप्रतिनिधी प्रत्येक क्षेत्रात नसतात, त्यांनी आवाज उचलत प्रकरण लावून धरले, लोकांची साथ आमदाराला मिळाली, मात्र चंद्रपुरात हे सर्व उलट आहे.

     

    Chandrapur Pattern काही दिवसांपूर्वी चंद्रपूर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील, कार्यालय अधीक्षक अभय खताळ व दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली होती. आज हे तीन अधिकारी निलंबित करण्यात आले आहे, मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक नियमबाह्य दारू दुकानांना परवाने वितरित करण्यात आले होते, आणि त्यांच्याकडून लाखोंची वसुली दरमहिन्याला हे विभाग करीत होते, यावर एकही जनप्रतिनिधी बोलला नाही, इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील एकाही आमदाराने त्या विभागात काय गौडबंगाल चालते यावर साधं भाष्य केलेले नाही.

    अवश्य वाचा : विज्ञान शाखेतील मुलांनी लक्ष द्यावे, हे कोर्स कराल तर नक्की यशस्वी व्हाल

    चंद्रपूर जिल्ह्यात दारू परवाना देण्यात अनेक नियमबाह्य कामे करण्यात आली, जागेचे कागदपत्रे नसलेल्याना बार चे लायसन्स, नियमबाह्य जागेवर वाईन शॉप असे प्रकार चंद्रपुरात घडले आहे, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या लाच प्रकरणात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली होती, मात्र ती मागणी सध्या थंड बसत्यात आहे.

     

    Chandrapur Pattern उलट जिल्हाधिकारी गौडा यांनी पुणे अपघाताच्या पार्श्वभूमीवर 28 मे ला दारू विक्रेत्यांना प्रबोधनाचे डोज पाजण्यासाठी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात मेळावा आयोजित केला आहे, सध्या राज्य उत्पादन शुल्क हे आरोपांच्या छायेत आहे, आणि प्रशासन जे नियम दारू विक्रेत्यांना माहीत असल्यावर त्यांना पुन्हा त्या नियमांचे डोज पाजण्याचा प्रकार प्रशासन करीत आहे, ही वेळ कारवाईची आहे. समजविण्याची नाही, एकही दारू विक्रेता नियमाचे पालन करीत नाही.

     

    जिल्हाधिकारी गौडा यांनी सरळ राज्य उत्पादन शुल्क विभागातून किती नागरिकांना दारू परवाने नियमाप्रमाणे वितरित केले त्याची यादी मागवायला हवी होती, कारण नागरिकांना दारू पिण्यासाठी व बाळगण्यासाठी परवाना देण्याचे काम उत्पादन शुल्क विभाग करतो, किती दारू विक्रेते नागरिकांचे परवाने तपासतात, यावर माहिती जिल्हाधिकारी यांनी घ्यावी.

     

    Chandrapur Pattern पाटील यांच्या कार्यकाळात अनेक दुकाने नियमबाह्य पध्दतीने परवाने देण्यात त्याची साधी चौकशी नाही, कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दारू परवाना बाबत शेवटची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयातून होते, यावर जिल्हाधिकारी यांनी आपली भूमिका मांडायला हवी होती, रमाई आवास योजनेच्या घरात बिअर बार सुरू आहे, त्यावर साधी कारवाई करण्यात आली नाही, प्रशासन तर गप्प आहे मात्र जिल्ह्यातील एकाही आमदाराने प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत दाखवली नाही.

     

    चंद्रपुरात सुद्धा असे अपघात घडले आहे, बाबूपेठ येथे एका अल्पवयीन मुलाने दुचाकीला धडक दिल्याने त्या अपघातात 8 वर्षीय मुलगा व त्याचे वडील ठार झाले होते, त्यानंतर चंद्रपुरात अपघाताची मालिका सुरू झाली होती, अनेक प्रकरणात धडक देणारा हा अल्पवयीन होता? तेव्हा प्रशासनाला जाग आली नाही, मुंबई येथे विशाल काय होर्डिंग्ज कोसळले, अनेक नागरिक त्या घटनेत मृत्युमुखी पडले, त्यानंतर चंद्रपुरात होर्डिंग्ज चे ऑडिट करण्यात आले असता जिल्ह्यात तब्बल 40 होर्डिंग्ज अवैध होते, सर्वात जास्त होर्डिंग्ज म्हणजे 26 चंद्रपूर शहरातील होते.

     

    Chandrapur Pattern होर्डिंग्ज लावताना मनपा परवानगी देत नव्हती काय? मुंबई मध्ये घटना घडल्यावर प्रशासनाला हे शहाणपण सुचले, चंद्रपुरात प्रशासनाचे सर्व काम रामभरोसे सुरू असंल्यासारखे आहे. अष्टभुजा येथील दुसऱ्या बाजूचा ओवरब्रिज बनलेला नाही मात्र त्याचा टोल वसूल केल्या जात आहे हे विशेष.

     

    चंद्रपुरात प्रशासनाला काही चांगलं काम करायचं असल्यास इतर जिल्ह्यात किंवा राज्यात मोठी दुर्घटना झाली त्यानंतर प्रशासन इथं हालचाल सुरू करत.

     

    Chandrapur Pattern वर्धा जिल्ह्यात एका युवतीला सकाळी जाळून मारण्यात आले होते, आरोपीने पेट्रोल पंप वरून बोटल मध्ये पेट्रोल आणले होते. त्यावेळी आमदार धानोरकर यांनी शहरात आंदोलन करीत कुणालाही पेट्रोल बॉटल मध्ये द्यायचं नाही अशी मागणी केली, प्रशासनाने ती मागणी मान्य केली होती, काही काळ कुणालाही बॉटल मध्ये पेट्रोल मिळतं नव्हते मात्र आज सर्वांना मिळायला लागले आहे, कायद्याचे तीनतेरा वाजल्यावर यावर आमदार धानोरकर यांनी दुर्लक्ष केलं का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो.

  • Employees Provident Fund act 1952 : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांच्या EPF चे काय? – सुरेश पाईकराव

    Employees Provident Fund act 1952 : पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांच्या EPF चे काय? – सुरेश पाईकराव

    Employees Provident Fund act 1952 आज दिनांक 27 मे 2024 रोजी सफेद झंडा कामगार संघटनेचा माध्यमातून जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

    Also Read : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

    चंद्रपूर जिल्ह्य़ातील भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, व इतर सर्व पेट्रोल पंपवरील कार्यरत असलेले कर्मचारी यांना पेट्रोल पंप मालक थातूर मातुर पगार देऊन त्या गोरगरीब कर्मचाऱ्यांवरती अन्याय अत्याचार करत आहे.

     

    Employees Provident Fund act 1952 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) ही १९५२ मध्ये नोकरदारांसाठी भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याचा मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. जेणेकरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ मिळावा.

     

    Employees Provident Fund act 1952 परंतु पेट्रोल पंप मालक या कर्मचाऱ्यांचा देण्यात येणार्‍या मासिक वेतनातून भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ) कपात करत नाही आणि भरत सुध्दा नाही. म्हणून आज सफेद झंडा कामगार संघटना अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की लवकरात लवकर या सर्व पेट्रोल पंप कर्मचार्‍यांचा EPF कपात करून त्यांचा PF खात्यात जमा करावा.

    अवश्य वाचा : पाण्याच्या शोधात रानगवा शहरात

    चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व पेट्रोल व डिझेल वितरण कंपनी, अस्थापना यांना कामगार भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात यावा. असे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.

  • Maharashtra tourism tadoba : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

    Maharashtra tourism tadoba : पर्यटकांच्या गराड्यात अडकला ताडोब्याचा वाघ

    Maharashtra tourism tadoba राज्यात सर्वात जास्त वाघांची संख्या असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटन दरम्यान पर्यटक व जिप्सी चालकांचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे, सकाळी सफारी दरम्यान पर्यटकांच्या गराड्यात वाघ फसलेला दिसला, यावर ताडोबा दंडात्मक कारवाई करीत वाहन चालकांना कायमची बंदी करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणी गणना

    Maharashtra tourism tadoba 26 मे रोजी वृत्तपत्रात सदर वाघाचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला होता, त्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाणे दखल घेतली, सदर फोटो हा 17 मे रोजी ताडोबा कोअर क्षेत्रातील खातोडा ते ताडोबा मार्गावरील सकाळ फेरी दरम्यानचा होता, ताडोबा प्रशासनाने 10 जिप्सी वाहन व जिप्सी चालक यांच्यावर 3 हजार दंड ठोठावीत त्यांना 1 महिन्याच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे, काही पर्यटन चालक हे हंगामी असल्याने त्यांना कायमचे बंद करीत मार्गदर्शक यांच्यावर 1 महिण्याकरिता निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात 1 कोटीचे चोर बीटी बियाणे जप्त

    भविष्यात अश्या घटना जिप्सी वाहन चालकांकडून होणार नाही यासाठी त्यांना सूचना देण्यात आल्या असून पावसाळ्याच्या सुट्टीत त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य वनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली.

  • Jagrut Muslim vikas manch : निराधारांना आधार ठरलं जागृत मुस्लिम विकास मंचाचा उपक्रम

    Jagrut Muslim vikas manch : निराधारांना आधार ठरलं जागृत मुस्लिम विकास मंचाचा उपक्रम

    Jagrut Muslim vikas manch चंद्रपूर – हाजी सैय्यद हरून संस्थापक अध्यक्ष जागृत मुस्लिम विकास मंच द्वारे 26 शिलाई मशीन गरीब निराधार महिलांना वाटप करण्यात आले. जागृत विकास मंच द्वारे मागील अनेक वर्षापासून समाजातील निराधार अधिकारी लोकांना आधार देण्याचे चे काम केले जात आहे.

    अवश्य वाचा : रेमल चक्रीवादळ कोसळणार

    याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 25 मे 2024 ला स्थानिक केजीएन लॉन या ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मुस्लिम समाजातील निराधार विधवा परितक्त्या घटकातील महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात आले.

    प्राणी गणना : ताडोबा अभयारण्यात प्राणी गणना संपन्न

    Jagrut Muslim vikas manch तसेच यावेळी मुस्लिम समाजातील खतना धार्मिक परंपरा सुद्धा पार पाडण्यात आली जवळपास 50 मुलांचे खतना निशुल्क संस्थेच्या मार्फत करण्यात आली.

     

    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सय्यद हाजी हारून व प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ता हैदर सेठ यांची उपस्थिती होती एवढी मंचावर अधिवक्ता मोहम्मद रफी शेख सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद इरफान शेख एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमान भाई खवातिने इस्लाम संस्थापक अध्यक्ष शाही बाजी शेख शिरेन कुरेशी मॅडम रफी अहमद की दवाई शाळेचे मुख्याध्यापिका नियाज खान शिफा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौसर खान यांची यांची प्रमुखतेने उपस्थिती होती.

    महत्वाचे : घरबसल्या एका क्लिकवर मिळणार विवाह नोंदणी प्रमाणपत्र

    Jagrut Muslim vikas manch कार्यक्रमाची सुरुवात अतिथी सत्कार करून करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता हैदर शेठ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रीय उसकी महत्त्व संघर्ष समितीचे प्रवक्ते रफिक शेख यांनी सुद्धा मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना केले.

     

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खान यांनी यशस्वीरित्या पार पाडले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आमिर खान अयुब भाई शरीफ खान सलीम खान जाकिरभाई जाफरभाई आदींनी अथक परिश्रम घेतले.