Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Forest Department Chandrapur : वनविभागाचा तो खड्डा जीवघेणा ठरला

    Forest Department Chandrapur : वनविभागाचा तो खड्डा जीवघेणा ठरला

    Forest Department Chandrapur चंद्रपूर शहरातील लालपेठ भागात 15 वर्षीय मुलाचा वनविभागाच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 2 जून ला घडली. मृतक मुलाचे नाव 15 वर्षीय तनविर शेख रहमान असे असून तो मेजर गेट दुर्गापूर येथे राहणारा होता.

    अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर योजना काय आहे?

    Forest Department Chandrapur आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास मृतक तनविर शेख हा आपल्या मित्रांसोबत 16 वर्षीय आर्यन साईनाथ यलगमवार रा. दादमहल, 16 वर्षीय कृष्णा जितेंद्रकुमार साहू रा.भिवापूर व 20 वर्षीय सकलेन हमीद खान पठाण, भिवापूर हे चौघे आपल्या 2 दुचाकीने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय समोरील लालपेठ जाणाऱ्या मार्गावरील असलेल्या बंकर जवळ गाडी धुण्यासाठी गेले.

     

    त्यानंतर जवळ असलेल्या वनविभागाच्या खड्ड्यात तनविर पोहण्यासाठी गेला, तनविर सोबत आर्यन व कृष्णा हे दोघे त्या खड्ड्यात उतरले, मात्र सकलेन ने त्यांना खड्ड्यात जाऊ नका असे सांगितले होते.

     

    मात्र तिघांनी सकलेन चे म्हणणे ऐकले नाही, काही वेळात आर्यन व कृष्णा दोघे परत आले मात्र तनविर बाहेर आला नसल्याने तिघांची घाबरगुंडी उडाली, त्यांनी मदतीसाठी अनेकांना बोलाविले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा एक्जिट पोल

    Forest Department Chandrapur लालपेठ परिसरातील नागरिक काही वेळात त्याठिकाणी जमा झाले, पोलिसांना याबाबत सूचना देण्यात आली असता शहर पोलीस त्याठिकाणी दाखल झाले, तनविर चा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या बचाव पथकाला पाचारण करण्यात आले, पथक प्रमुख अशोक गरगेलवार यांनी बोटीच्या साहाय्याने तनविर चा शोध केला, तब्बल 2 तासांनी पोलिसांच्या बचाव पथकाला यश मिळाले. तनविर चा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

     

    मृतदेह बाहेर काढल्यावर तनविर च्या कुटुंबाने टाहो फोडला, तनविर हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

     

    Forest Department Chandrapur याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगामकर यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी त्या खड्ड्याबाबत माहिती दिली की त्याठिकाणी गवत विकास केंद्र सुरू होणार होते मात्र काही दिवसांपूर्वी तो प्रकल्प रखडला, त्या प्रकल्पासाठी वनविभागाच्या जागेवर आम्ही काम केले, आता त्याच ठिकाणी भारत माता प्रकल्प सुरू होत आहे, ज्या खड्ड्यात तनविर चा मृत्यू झाला, त्यामध्ये वेकोलीच्या खाणी चे पाणी आम्ही खड्ड्यात सोडले.

     

    जंगलाला तो भाग लागून असल्याने पाण्याच्या शोधात असलेले जनावरे त्याठिकाणी पाणी प्यायला यायचे, मात्र काही दिवसांपासून काही टवाळखोर वनविभागाच्या त्या खड्ड्याजवळ पोहण्यासाठी येत होते, आम्ही अनेकदा त्यांना हाकलून लावले, नंतर सुरक्षिततेसाठी आम्ही त्या परिसरात फेंसिंग लावली, मात्र 2 दिवसात फेंसिंग चोरीला गेली.

     

    आता भारत माता हा प्रकल्प त्याठिकाणी सुरू होत आहे, खड्ड्यात साचलेलं पाणी आम्ही तिथे लावण्यात येणाऱ्या वृक्षांना देणार होतो.
    सदर घडलेली घटना ही दुःखद आहे, त्या ठिकाणी बाहेरचे कुणी यायला नको यासाठी ठोस उपाययोजना काही दिवसात करण्यात येईल. अशी प्रतिक्रिया वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी दिली.

  • Young chanda brigade : चंद्रपुरात सत्कार गुणवंतांचा

    Young chanda brigade : चंद्रपुरात सत्कार गुणवंतांचा

    Young chanda brigade सीबीएससी व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत इयत्ता १० वी आणि १२ वी चा  निकाल नुकताच जाहीर झाला असून यात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने 9 जुन २०२4 रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे सायंकाळी 5 वाजता सत्कार कार्यक्रमाचे आयोजन आले आहे.

    अवश्य वाचा : आता तुमचे वीज मीटर होणार स्मार्ट

    सदर कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

    Young chanda brigade दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सत्कार कार्यक्रमात 12 वी च्या परीक्षेत 75 टक्के च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या आणि 10 वी च्या परिक्षेत 80 टक्के च्या वर गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात या मृतदेहाची ओळख पटेना

    यासाठी सदर गुणवंत विद्यार्थ्यांना जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. 8 जून २०२4 पर्यंत गुणपत्रिकेची प्रत जमा करावी किंव्हा  https://bit.ly/4bF3655 या संकेत स्थळावर नोंदणी करून घ्यावी असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

    Janta college chandrapur
    जनता करिअर लॉन्चर आजच प्रवेश घ्या….

    Young chanda brigade सदर कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद, शाळा संस्थापक अध्यक्ष तसेच महानगरातील विविध क्षेत्रातील नागरिक व शिक्षण क्षेत्राशी निगडीत मान्यवर व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Chandrapur city police : मृतदेहाची ओळख पटेना

    Chandrapur city police : मृतदेहाची ओळख पटेना

    Chandrapur city police चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात 25 मे ला रात्री 9 वाजेदरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला होता.

    अवश्य वाचा : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत हा उमेदवार आघाडीवर, एक्जिट पोल आला समोर

    मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी त्याची ओळख पटविणे सुरू केले मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

    6 दिवस लोटल्यावर सुद्धा त्या मृतदेहाची ओळख अजूनही पटलेली नाही.

     

    Chandrapur city police मृतदेहाचे वर्णन – उंची 5 फूट, रंग – सावळा, अंगात गुलाबी कलरची टी-शर्ट त्यावर काळा पट्टा, दोरीने बांधलेला काळा पॅन्ट परिधान करून असलेला.

    महत्त्वाचे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी साठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

    याबाबत शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश मोहोड पुढील तपास करीत आहे.

     

    सदर मृतदेहाबाबत कुणाला काही माहिती असल्यास शहर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • Dangerous trees in chandrapur city : शहरातील धोकादायक झाडं

    Dangerous trees in chandrapur city : शहरातील धोकादायक झाडं

    Dangerous trees in chandrapur city चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे शहरात मान्सुनपूर्व स्वच्छता अभियान राबविले जात असुन अभियानानंतर्गत १३ मोठे व संभाव्य धोकादायक झाडे तसेच १० धोकादायक झाडांच्या फांद्या आतापर्यंत तोडण्यात आल्या आहेत.

    अवश्य वाचा : फुटपाथवर अतिक्रमण तर दुकान होणार सील

    धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणी हा मान्सुनपूर्व कामांमधील एक महत्वाचा विषय असून सार्वजनिक ठिकाणच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम पावसाळा सुरु होण्याच्या आत संपविण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

    अवश्य वाचा : महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात पदभरती

    Dangerous trees in chandrapur city सदर अभियानास २९ मे पासून सुरवात करण्यात आली असुन उद्यान विभागाने पावसाळ्यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या आणि धोकादायक झाडांच्या फांद्यांची पद्धतशीर आणि शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी सुरू केली आहे. शहरातील नागपूर रोड,साई मंदिर परिसर,तुकूम ट्रॅफीक ऑफीस ते मेजर गेट,तुकूम गुरुद्वारा ते बंगाली कॅम्प ते बस स्टॅन्ड या मुख्य रस्त्यांवरील धोकादायक वृक्ष छाटणीचे काम पूर्ण करण्यात आले असुन इतर परिसरात काम सुरू आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात उष्णतेची लाट

    याकरीता ६ कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असुन झाडाच्या फांद्या कापण्यासाठी कामगाराला झाडावर चढवण्यातही दुर्घटना होण्याचा संभव असल्यामुळे आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करण्यासाठी यांत्रिक पद्धतीचा वापर करण्यात येत आहे.

     

    Dangerous trees in chandrapur city पाऊस पडल्यावर झाडाच्या खोडाला ओत येते, झाडावर चढता येत नाही त्यामुळे पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण करण्यात येणार आहे.

    झाडांच्या फांद्या तोडतांना पुर्ण झाड उध्वस्त होणार नाही याची काळजी घेतली जात असुन वृक्ष छाटणी केल्यावर निर्माण होणारा कंपोस्ट डेपोला जमा करण्यात येतो व ती जागा स्वच्छता विभागामार्फत स्वच्छ करण्यात येते.

     

    Dangerous trees in chandrapur city झाडांच्या फांद्या छाटणी कामांचे विभागनिहाय नियोजन करून दररोज कोणत्या क्षेत्रात, किती काम झाले याचा तपशील नियमित आयुक्तांना सादर केला जात असुन त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी असलेल्या रहदारीला अडथळा करणा-या अथवा पथदिव्यांचा प्रकाश रोखणा-या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.

  • Action in case of encroachment : फुटपाथवर अतिक्रमण करणार तर दुकान होणार सील :

    Action in case of encroachment : फुटपाथवर अतिक्रमण करणार तर दुकान होणार सील :

    Action in case of encroachment पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर अनेकदा दुकानदार हे आपले दुकानाचे साहित्य ठेऊन रहदारीस अडथळा निर्माण करतात त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे अश्या दुकानांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असुन साहित्य जप्तीची कारवाई करून दंड आकारण्यात येणार आहे.

    अवश्य वाचा : इरई नदीच्या जलपात्राची सफाई सुरू

    फेरीवाले फुटपाथवर साहित्य विक्रीस बसतात,जो फुटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य व बोर्ड मांडून ठेवतात. रस्त्यावरील दुकानांसमोर त्यांचे साहित्य व वाहनांचे पार्किंग यामुळे पादचाऱ्यांना जागा मिळेल तेथून रस्ता शोधावा लागतो. दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांना बाजारपेठेत पार्किंगसाठी जागा शोधण्याची कसरत करावी लागते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा करणार मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई

    Action in case of encroachment  यावर मार्ग काढण्यासाठी मनपातर्फे ४ अतिक्रमण निर्मूलन पथक गठीत करण्यात आले असुन या पथकांद्वारे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात आहे. सदर पथकांना पथक निहाय गाडी देण्यात आली असुन बाजारात फिरतांना प्रत्येक दुकानाचे व्हिडीओ चित्रीकरण त्यांच्याद्वारे केले जाणार आहे.

     

    Action in case of encroachment साहित्य बाहेर असलेल्या दुकानांवर साहित्य जप्तीची कारवाई करून दंड व पुन्हा सदर प्रकार घडल्यास दुकान सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर बांधकाम साहीत्य टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात असुन जोपर्यंत बांधकाम साहित्य रस्त्यावर असेल तोपर्यंत त्यांच्यावर दंड ठोठावला जाणार आहे.

  • Irai River Watershed : इरई नदी पात्राची स्वच्छता सुरु

    Irai River Watershed : इरई नदी पात्राची स्वच्छता सुरु

    Irai River Watershed पुढील महिन्यात पावसाळा सुरु होणार असुन यंदा सरासरीपेक्षा ज्यास्त पावसाची शक्यता हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात आली आहे.या अधिक पावसामुळे पूरपरिस्थिती उद्भवू नये यादृष्टीने जिल्हा प्रशासन,जलसंपदा विभाग व चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे इरई नदी जलपात्राची स्वच्छता सुरु करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपा हद्दीतील मांस विक्रेत्यांवर होणार कारवाई 

    Irai River Watershed पावसाळ्यात इरई नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदी पात्रात असलेल्या गाळामुळे ते पाणी आपल्या नैसर्गिक प्रवाहाने न वाहता शहराच्या उतार भागात पसरते व पूरसदृश परिस्थीती निर्माण होते. नदी पात्र उथळ होतो कारण त्यात झाडे – झुडपे,जमा असलेला कचरा,गाळ,वाळुची बेटे तयार होतात व ते पाण्याला अवरोध निर्माण करतात.

     

    Irai River Watershed यंदा इरई नदीचा पाणी प्रवाह सुरळीत राहावा यासाठी २३ मे पासुन नदी पात्र स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.स्वच्छतेचे कार्य ९ किलोमीटर लांबीच्या नदीपात्रात सुरु असुन यासाठी ११ जेसीबी – पोकलेन कार्यरत आहेत.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात उष्णतेची लाट

    ठिकठिकाणी वाळुची बेटे निर्माण झाली आहेत ती काढण्याचे काम सुरु आहे,शिवाय अनेक झाडे – झुडपे व मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने पोकलेनद्वारे स्वच्छ केल्या जात आहे. काम वेगाने सुरु झाले असुन १८ दिवसात काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दररोज ५०० मीटर या वेगाने काम सुरु असुन पावसाळ्यापुर्वी इरई नदी पात्र स्वच्छ होऊन पूरपरिस्थितीस आळा बसणार आहे.

  • Vinay Gowda Ias : तर सुरजागड येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    Vinay Gowda Ias : तर सुरजागड येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

    Vinay gowda ias जिल्ह्यात खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक तसेच करण्यात येणारी भेसळ, या बाबींना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली खनीकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज (दि.30) पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, जिल्हा खनीकर्म अधिकारी सुरेश नैताम, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आदी उपस्थित होते.

     

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या कोल माईन्सच्या आत आणि बाहेर जाणा-या दोन्ही प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही असणे आवश्यक आहे. याबाबत खनीकर्म विभागाने तात्काळ तपासणी करावी. तसेच या सीसीटीव्ही चा बॅकअप 90 दिवसांपर्यंत जतन असला पाहिजे. वाहतूक करणा-या वाहनांची नंबर प्लेट सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.

    महत्त्वाचे : पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात पाणी टंचाई, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांचा मदतीचा हात

    Vinay gowda ias प्रत्येक माईन्सचा वाहतूक आराखडा सुनिश्चित केला असतो. या आराखड्याप्रमाणेच वाहनांची वाहतूक होते काय, ते तपासावे. वाहतूक करणा-या वाहनांवर ताडपत्री घट्ट स्वरुपात बांधावी. सुरजागड माईन्समधून वाहतूक करणारी वाहनांची रस्त्यावर किंवा रस्त्याच्या बाजुला पार्किंग होत असेल तर कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील मांस विक्रेत्यांवर होणार कारवाई, आयुक्त पालिवाल यांचे आदेश

    तसेच खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतुकीबाबत तक्रारी असल्यास खनीकर्म विभागाच्या जिल्हास्तरीय समितीकडे सादर कराव्यात, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

  • Chandrapur mahanagar palika : मांसविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

    Chandrapur mahanagar palika : मांसविक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

    Chandrapur mahanagar palika चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील उघड्यावर मांस विक्री करणार्‍यांवर कारवाई केली जाणार असुन त्यांचे साहीत्य जप्त करण्याबरोबर गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहेत. याकरीता मनपातर्फे झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथके गठीत करण्यात आली असुन शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.

    अवश्य वाचा : भाजपच्या क्षेत्रात ठाकरे गटाची एन्ट्री

    Chandrapur mahanagar palika  शहरात उघड्यावर मांस विक्री होत असल्याने दुर्गंधी निर्माण होते व धुळ,माश्या बसुन नागरिकांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होऊ शकतो.मांसविक्री केल्यानंतर घाण तेथेच टाकली जाते. यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे आता शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असुन त्यांचे साहित्य जप्त करण्यासोबतच गुन्हे सुद्धा दाखल केले जाणार आहेत.रस्त्यावर भाजी,फळेविक्रेते सुद्धा अनेक ठिकाणी अतिक्रमण करून वाहतुकीला बाधा निर्माण करतात त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात उष्णतेची लाट, अशी घ्या काळजी

    मागील अनेक दिवसांपासुन मनपातर्फे अतिक्रमण निर्मूलन मोहीम सातत्याने राबविली जात असुन फुटपाथवर केलेली पक्की बांधकामे,दुकानांसमोरील असलेले  रॅम्प,कच्चे – पक्के शेड,नाल्यांवरील अतिक्रमण तोडुन नाले, फुटपाथ,रस्ते मोकळे करण्यात येत आहे. याकरीता ४ अतिक्रमण निर्मूलन पथके गठीत करण्यात आली असुन सहायक आयुक्तांच्या माध्यमातुन झोननिहाय कारवाई केली जात आहे.

  • Maharani Ahilyabai Holkar Jayanti : चंद्रपुरात त्रिशताब्दी जयंती महोत्सव होणार साजरा

    Maharani Ahilyabai Holkar Jayanti : चंद्रपुरात त्रिशताब्दी जयंती महोत्सव होणार साजरा

    Maharani Ahilyabai Holkar Jayanti यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आहे. या शुभपर्वाचे औचित्य साधून त्यांच्या महत्कार्याची जाणीव जागृती व्हावी यासाठी चंद्रपूर येथील त्रिशताब्दीय जयंती समारोह नागरी समितीच्या वतीने यंदा वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    थोडक्यात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी जाहीर केली ही इच्छा

    Maharani Ahilyabai Holkar Jayanti या महोत्सवाचा शुभारंभ येत्या 31 मे रोजी शोभायात्रेने होणार असून, त्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते, तर शिवशंभू विचार मंचाचे संयोजक सुधीर थोरात यांच्या विशेष उपस्थितीत होईल, अशी माहिती मार्गदर्शक तुषारजी देवपूजारी, समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. अंजली हस्तक, घनश्याम दरबार यांनी पत्रपरिषदेत देण्यात आली.

    अवश्य वाचा : मतमोजणी साठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

    शुक्रवार, 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता येथील गांधी चौकातून भव्य शोभायात्रा निघेल. यात्रेत पारंपारिक नृत्य, ढोल ताशे आणि लेझिम पथकासह विविध देखावे राहतील. या भव्य शोभायात्रेचा समारोप येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या परिसरात होईल. सायंकाळी 7 वाजता याच सभागृहात महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार असून, डॉ. प्रशांत बोकारे, सुधीर थोरात यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे व अन्य मान्यवर उपस्थितीत राहतील.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात उष्णतेची लाट

    Maharani Ahilyabai Holkar Jayanti आपल्या दैदीप्यमान जीवनकार्याने स्त्री जन्माची महानता सिध्द करणार्‍या, भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या प्रजाहितदक्ष न्यायप्रिय राज्यकर्त्या, राजमाता, लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाची सार्थकता या महोत्सवातून विशद होणार आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव साजरा करण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले असून, त्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला सुनील पोराटे, संगीता पोतले, प्रतिभा काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    2 जून रोजी भव्य रक्तदान शिबीर

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने येत्या 2 जून रोजी येथील आयएमए सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. हा त्रिशताब्दी महोत्सव असल्याने 300 जणांचे रक्तदान यावेळी होणार असल्याचेही सांगण्यात आले.

  • Letter to Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांना पत्र, मुनगंटीवार यांनी जाहीर केली ही इच्छा

    Letter to Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान मोदी यांना पत्र, मुनगंटीवार यांनी जाहीर केली ही इच्छा

    Letter to Prime Minister Narendra Modi चंद्रपूर येथे आकाराला येत असलेल्या अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन देशगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते व्हावे, यासाठी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन आपल्या हस्ते व्हावे अशी इच्छा ना.श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

    मतगणना : मतगणनेसाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन सज्ज

    Letter to Prime Minister Narendra Modi
    चंद्रपूर कॅन्सर केअर फाउंडेशनद्वारा संचालित तसेच टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने चंद्रपूर येथे अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभे होत आहे. या हॉस्पिटलचे काम लवकरच पूर्णत्वास येणार असून त्याचे उद्घाटन १५ ऑगस्ट २०२४ च्या दरम्यान करण्याचा मानस पालकमंत्री ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. ‘केवळ चंद्रपूरच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यांमधील आणि तेलंगाणा, एकूणच मध्य भारतातील रुग्णांसाठी हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे. त्यामुळे अशा प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात आपली उपस्थिती एका उत्तम प्रयत्नांचा गौरव करणारी ठरेल. तसेच निरोगी व समृद्ध राष्ट्राच्या दृढ संकल्पाला अधिक बळ मिळेल,’ असे ना. मुनगंटीवार यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्याचवेळी १५ अॉगस्ट किंवा त्याच्या आसपासचा कुठलाही दिवस आपण उद्घाटनासाठी दिल्यास आम्हाला आनंद होईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

    दारूविक्रेते : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने पाजले कायद्याचे डोज

    ‘चंद्रपूर तसेच मध्य भारतातील कॅन्सरच्या रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांसह उपचार देण्यात येणार आहे. १४० खाटांनी सुसज्ज असे हे हॉस्पिटल गुणवत्तापूर्ण उपचारासाठी कटिबद्ध असणार आहे. कॅन्सरचा सामना करणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या जीवनात एक नवी आशा निर्माण करण्याचे काम या माध्यमातून होणार आहे,’ याचाही ना.सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात आवर्जून उल्लेख केला आहे.

     

    पंतप्रधानांच्या उद्दिष्टांवर कार्य
    आपल्या नेतृत्वात भारतातील आरोग्य सेवेमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवणारी यंत्रणा आपण निर्माण केली आहे. कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या पावलांवर पाऊल टाकण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे, असेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. Letter to Prime Minister Narendra Modi

    उष्णतेची लाट : चंद्रपुरात उष्णतेची लाट, काळजी घ्या

    पंतप्रधानांच्या नेतृत्वात आरोग्य सेवेचा कायापालट
    आयुष्मान भारत योजना, पीएम-जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून आपण देशातील १० कोटी पेक्षा अधिक कुटुंबांना आरोग्य विम्याचा लाभ मिळवून दिला आहे. आपल्या नेतृत्वात हेल्थ आणि वेलनेस सेंटर्सचा विस्तार, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेद्वारा जेनेरिक ड्रग प्रमोशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान, टेलिमेडिसीन व डिजीटल आरोग्य, कोविड -१९ लसीकरण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदन योजना आदी क्षेत्रात प्रभावी कार्य झाले आहे. याशिवाय २२ नव्या एम्स संस्थानांना मंजुरी आणि ६९२ पेक्षा अधिक मेडिकल कॉलेजेसचे निर्माण आपल्या नेतृत्वात झाले आहे, याचाही ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख केला आहे