Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Karnataka Power Corporation Limited : निवडून येताच खासदार धानोरकर यांच्या भावाची “दादागिरी”

    Karnataka Power Corporation Limited : निवडून येताच खासदार धानोरकर यांच्या भावाची “दादागिरी”

    Karnataka Power Corporation Limited चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरालगतच्या कर्नाटक -एमटा कोळसा खाण व्यवस्थापकाला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत त्यांचे भाऊ प्रवीण काकडे यांनी शिवीगाळ केली.

     

    त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आंदोलनादरम्यान खाण व्यवस्थापकाला मारहाण केली. खाण प्रकल्पग्रस्त स्थानिकांच्या 16 मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त व काँग्रेस कार्यकर्त्यांनी खाण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आंदोलनस्थळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी भेट दिली.

     

    Karnataka Power Corporation Limited चर्चेरम्यान आंदोलक व प्रवीण काकडे यांची व्यवस्थापक सोबत मागण्याच्या पुर्ततेवरून आधी शाब्दिक चकमक व नंतर व्यवस्थापक शिवप्रसाद यांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी जमावाला पांगविले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद पाडले आहे.

     

    विशेष म्हणजे अजूनही प्रतिभा धानोरकर यांनी खासदार पदाची शपथ घेतलेली नाही, मात्र त्यापूर्वी त्यांच्या भावाची मुजोरी मात्र सुरू झाली आहे, काही दिवसांपासून बामणी प्रोटिन्स उद्योगाचे कामगार व cmpl चे कामगार अन्यायाविरूद्ध लढत आहे त्यांच्याकडे सपेशल दुर्लक्ष खासदार धानोरकर यांनी केले आहे.

    काही महिन्यांपूर्वी बरांज मोकासा येथे महिलांनी कर्नाटक एमटा विरोधात लढा उभारला मात्र त्या आंदोलनाची साधी दखल आताच्या खासदार यांनी घेतली नव्हती हे विशेष.

    अवश्य वाचा : पोलीस भरती, 1 फुल लाखो माली

    Karnataka Power Corporation Limited कांग्रेस पक्ष हा कधीही अहिंसेला समर्थन करीत नाही मात्र आज कांग्रेस पक्षाच्या खासदार समोर ही घटना घडली, निवडुन येताच त्यांच्या पदाचा बंधू प्रवीण काकडे यांनी मुजोरी उपयोग सुरू केला आहे.

  • Janata Career Launcher : जनता करीअर लॉंचर ने पुन्हा इतिहास रचला

    Janata Career Launcher : जनता करीअर लॉंचर ने पुन्हा इतिहास रचला

    Janata Career Launcher चंद्रपूर : दि.17 जून ला सायंकाळी महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणार MH-CET निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये जनता करीअर लाँचर मधील बहुतांश विद्यार्थी अग्रस्थानी आहेत. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जनता करीअर लाँचरने इतिहास घडविला आहे. या विद्यार्थ्यांचा वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेशित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    अवश्य वाचा : जिल्ह्यातील या कामगारांचा वाली कोण?

    यामध्ये अनुश्री घोडमारे, तुषार महाकुलकर, राशिक उरकुडे, ईशा राऊत, रोशन आवारी, तीलक बुरे, हर्षल पिंपलकर, हर्षाली काळे, कुणाल ठेंगणे, रोहन एकरे, प्रज्वल कुकडे, रोहन पोलेलवार, संकेत कुनघाटकर, सुशांत ढोढरे, कार्तिक निमजे, प्रणय दांडेकर, प्रतीक गेडाम, सानिका विधाते, दर्शन मोहितकर, प्रिया काकडे व इतर अनेक विद्यार्थी अव्वल आले आहेत.

    महत्त्वाचे : नीट परीक्षा घोटाळा, चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

    Janata Career Launcher या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेतर्फे डॉ. अशोक जीवतोडे, अनुभवी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.

    Janata Career Launcher
    तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा….
  • Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj Ahir : हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना भरीव यश

    Hansraj ahir चंद्रपूरः- वेकोलिच्या विविध क्षेत्राशी निगडीत प्रकल्पग्रस्त शेतकन्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न, समस्यांच्या निवारणार्थ सुनावणी, बैठक व बृहत पत्रव्यवहार व सतत पाठपुराव्याने अखेर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर याना यश मिळाले असून दि. 17 जून 2024 रोजी हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेत नागपुरातील वेकोलि विश्रामगृहात वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक (सीएमडी) व अन्य वरिष्ठांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विविध महत्वपुर्ण प्रलंबित समस्यांचे निराकरण झाल्याने प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने ही बैठक फलदायी ठरली आहे.

    अवश्य वाचा : नीट परीक्षा घोटाळा, चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा मोर्चा

    सदर बैठकीस वेकोलि मुख्यमहाप्रबंधक (भूमि) व (औ.स.) मांजी आमदार सुदर्शन निमकर, विनोद शेरकी, अॅड. इंजी. प्रशांत घरोटे, धनंजय पिंपळशेंडे, मधुकर नरड, पवन एकरे, माजी सरपंच बंडु रायपुरे, कोलगांवचे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडसकर, लक्ष्मण बोढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    वेकोलि प्रबंधनाने सास्ती एक्सपॉन्शन प्रकल्पातील नोकरीचे प्रस्ताव या महिनाभरात स्वीकारण्यास अनुमती दिली.

    महत्त्वाचे : 19 जूनपासून चंद्रपुरात पोलीस भरतीचा प्रारंभ, 137 जागेसाठी 22 हजार अर्ज

    Hansraj ahir गोवरी पोवनी प्रकल्पातील आर्थिक मोबदला देयकास अंतिम मंजूरीही जून महिन्यातच देण्याचे मुख्यालयाने मान्य केले. गोवरी सेंट्रल प्रकल्प सेक्शन 4 करीता लवकरच प्रस्तावित करण्याचे तसेच भूमि अधिग्रहण प्रकल्पातील ग्रैंड डॉटर (नात) मुलीचा मुलगा/मुलगी व सुनेच्या नोकरीविषयी लवकरच निर्णय होवून अनुकंपा नोकरीत विवाहीत मुलीच्या तसेच मृतक नामनिर्देशीताचा भाऊ, बहीण यांना नोकरी देण्याविषयी मुख्यालयीन स्तरावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याची माहिती सीएमडी यांनी हंसराज अहीर यांना या बैठकीत दिली.

     

    न्यायालयीन प्रकरणातील प्रलंबित नोकऱ्या मार्गी लावण्यास गुणवत्ता प्राधान्य प्रकरणामध्ये निर्णय घेण्याबाबत ठोस धोरण स्वीकारले जाईल, भूमिगत खाणीतून सुरक्षा प्रहरीकरीता आवेदन केलेल्या कामगारांची कॅडर बदल विषयक सुची प्रकीयाधीन असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असेही बैठकीत आश्वस्त करण्यात आले.

    Hansraj ahir या व्यतिरिक्त पोवनी, सास्ती, सोनुर्ली गावातील उर्वरीत जमिनीचे अधिग्रहण, सीएमपीडीआयएल द्वारा सव्र्व्हेक्षण करुन तातडीने अंमल करण्याच्या सुचना एनसीबीसी अध्यक्षांनी केल्या. यावेळी भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक सातबारा व 2 एकर पेक्षा अधिक तसेच दोन आराजी असल्यास फेरफार प्रक्रियेनंतर 2 नोकऱ्या देण्यास अडचण नसल्याचे ही प्रबंधनाने या बैठकीत स्पष्ट केले. तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात प्रलंबित नोकरी प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा अशा सुचना देण्यात आल्या. सदर बैठकीत या व्यतिरिक्त अनेक महत्वपुर्ण विषयांवर शिक्कामोर्तब झाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये संतोष व्यक्त होत आहे.

  • Neet exam 2024 : चंद्रपुरात हजारो विद्यार्थी NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर

    Neet exam 2024 : चंद्रपुरात हजारो विद्यार्थी NEET परीक्षेत झालेल्या घोटाळ्याविरोधात रस्त्यावर

    Neet exam 2024 देशात नीट परिक्षे दरम्यान झालेला घोटाळा उघड झाल्यावर विद्यार्थ्यांनी जागोजागी निदर्शने केली, लाखो रुपये खर्च करीत नीट चा पेपर फुटला, निकाल लागल्यावर 67 विद्यार्थ्यांना पैकी च्या पैकी गुण मिळाले शिक्षणाचा हा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचे मत चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनने लावत चंद्रपूर शहरात भव्य मोर्चा 18 जून रोजी काढला.

    अवश्य वाचा : चंद्रपूर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान आमिषाला बळी पडू नका, तक्रार करा – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्च्यात हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते, नीट परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी व्हावी, आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अश्या घोषणा विद्यार्थी मोर्च्यादरम्यान देत होते.

     

    Neet exam 2024 जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मोर्चा पोहचल्यावर चंद्रपूर कोचिंग क्लासेस चे विजय बदखल व नाहीद हुसेन यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की देशात विद्यार्थ्यांचा शिक्षण क्षेत्रावरून विश्वास उडायला लागला आहे, कारण परीक्षेत असे घोळ होऊ लागले तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान यामुळे झाले आहे.या सर्व प्रकरणाची सीबीआय व ईडी द्वारे चौकशी व्हायला हवी अशी मागणी यावेळी केली.

    महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    मोर्च्यात सहभागी विद्यार्थ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली की जर पैसे देऊन परीक्षा पास करायची तर अभ्यास करण्याची गरज काय आहे? असे प्रकार देशात होऊ लागले तर अश्या परीक्षेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे यामुळे मोठे नुकसान होईल, त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई व्हायला हवी.
    चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
    आयोजित मोर्च्यात हजारो विद्यार्थी सामील झाले होते.

  • Chandrapur police bharti : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आमिष दिले तर कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    Chandrapur police bharti : पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना आमिष दिले तर कारवाई अटळ – पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन

    Chandrapur police bharti चंद्रपूर पोलीस दलातील 137 पोलीस शिपाई व 9 बॅण्ड मॅन च्या पदासाठी 19 जून पासून उमेदवारांच्या शारीरिक चाचणी ची प्रक्रिया सुरु होणार आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ममुमक्का सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

    महत्त्वाचे : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    विशेष बाब म्हणजे यंदा पोलीस भरतीची प्रक्रिया जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे.
    137 पोलीस शिपाई पदाकरिता तब्बल 22 हजार 583 अर्ज प्राप्त झाले आहे, त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे 13 हजार 443 अर्ज, महिला उमेदवारांचे 6 हजार 315 अर्ज तर 2 तृतीयपंथीयांचे अर्ज प्राप्त झाले आहे. तर 9 बँड्समॅन च्या पदासाठी 2 हजार 176 पुरुष उमेदवारांचे अर्ज, 646 महिला उमेदवार तर 1 तृतीयपंथी उमेदवाराचा अर्ज प्राप्त झाला आहे.

    अवश्य वाचा : रेशनकार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

    Chandrapur police bharti पावसाची शक्यता बघता उमेदवारांची शारीरिक चाचणी जिल्हा क्रीडा संकुलात होणार असून त्याठिकाणी उमेदवाराने हजर व्हायच्या आधी उंची व छातीचे मोजमाप करीत त्यांचे कागदपत्रे तपासल्यांनंतर त्यांना आत प्रवेश दिल्या जाणार आहे.

    त्यांनतर शारीरिक चाचणीमध्ये पुरुषाच्या 100, 1600 मीटर व महिलांची 100, 800 मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक वर उमेदवारांना स्पोर्ट शूज वापरण्यास मुभा देण्यात येईल.

    अवश्य वाचा : 12 वी पास झाला तर हे अभ्यासक्रम निवडा, आणि मिळवा लाखोंचे पॅकेज

    Chandrapur police bharti सदर पोलीस भरती प्रक्रिया हि पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी RFID पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
    सदर भरती प्रक्रिया हि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार असून उमेदवाराने बाहेरील व्यक्तीच्या आमिषाला बळी न पडत स्वतः गुणवत्ता सिद्ध करीत या भरती प्रक्रियेत सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.

    शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रियेत उमेदवाराने उत्तेजनार्थ पदार्थाचे सेवन करणार नाही याचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतल्या जाणार आहे, जर या आदेशाचे पालन न केल्यास उमेदवाराला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

     

    Chandrapur police bharti 19 जून ला सुरु होणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी काही उमेदवार 1 किंवा 2 दिवसापूर्वी दाखल होतात, यंदा उमेदवार उघड्यावर कुठेही राहू नये यासाठी चंद्रपूर पोलिसांनी त्यांची व्यवस्था पोलीस मुख्यालय येथील ड्रिल शेड मध्ये केली आहे.

    बाहेरील किंवा इतर कर्मचारी उमेदवारांना पोलीस दलात लावून देत असल्याचे आमिष देत असेल तर त्यांच्या आमिषाला बळी पडू नका त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.
    महिनाभर चालणाऱ्या या भरती प्रक्रियेदरम्यान पावसामुळे व्यत्यय आल्यास उमेदवारांना पुढची सुयोग्य तारीख कळविण्यात येईल.
    आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपस्थित होत्या.

  • Inspection of dams : चंद्रपूर विधासनभेतील या भागात सिंचनाचा प्रश्न सुटणार

    Inspection of dams : चंद्रपूर विधासनभेतील या भागात सिंचनाचा प्रश्न सुटणार

    Inspection of dams आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर जलसंधारण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या १२ कोटी रुपयांच्या निधीतून विचोडा रयतवारी, जूनी पडोली, अंतुर्ला येथे बंधा-र्याचे काम करण्यात आले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी विचोडा रय्यतवारी आणि जुनी पडोली येथील बंधा-र्याच्या कामाची पाहणी केली आहे. सदर काम पुर्ण झाले आहे. या बंध-यामुळे येथील शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनणाचा प्रश्न सुटणार आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात भावी सैनिकांचा सत्कार

      यावेळी जुनी पडोलीचे उपसरपंच सुनिता नागरकर, भास्कर नागरकर, देवानंद नागरकर, दादाजी वाढई, नथ्थु वाडगुरे, विकास वाढई, ग्रामपंचायत सदस्य सुभाष आवळे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, छोटा नागपूर उपसरपंच रिषभ दुपारे, प्रतिक्षा ठावरी, रंजुदेवी विश्वर्कमा, कुंटा वाघमारे, मुद्रीका कस्तुरे, गीता मासिरकर, संजय बोबडे, गणेश दिवसे, शोभा दिवसे, सविता बोबडे,  ज्ञाणेश्वर पिंगे, पिंटु देवगडे, संदेश साव आदींची उपस्थिती होती.

       Inspection of dams  आरोग्य, शिक्षण आणि शेती या तिनही विषयांवर आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष लक्ष राहिले आहे. या क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी मोठा निधी खेचून आणला आहे. या अगोदर आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर तालुक्याला कापूस उत्पादक तालुका घोषीत केला आहे. तसेच सिएसटीपीएस च्या राखेमुळे शेतपिकांचे नुकसान होत होते. सदर राख नाल्यात जमा झाल्याने. सदर दुषीत राख शेतक-यांच्या शेतात जात होती. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर नाल्याचे खोलीकरण करण्याचे काम हाती घेतले होते.

    अवश्य वाचा : 300 आपदा मित्र जिल्हा प्रशासनाच्या मदतीला

    Inspection of dams परिणामी हा प्रश्न सुटला. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. मोठा निधी या भागात आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विकासकामांसाठी खर्च केला आहे. विचोडा रयतवारी, जूनी पडोली, अंतुर्ला लगत असलेल्या गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सदर तिन्हीही गावात गेटेड बंधारे तयार करण्यात यावेत अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. अखेर या कामासाठी जलसंधारण विभागाने १२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला होता. या निधीतून या तीनही गावात बंधा-र्यांचे काम करण्यात आले आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी विचोडा रय्यतवारी आणि छोटी पडोली येथे भेट देत येथील बंधाऱ्यांची पाहणी केली. या बंधा-याचे काम पुर्ण झाले असून येथील शेकडो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटला आहे.

     

    तसेच या बंधा-यांमुळे विचोडा, जुनी पडोली, छोट नागपूर, अंबोरा खैरगाव, चांद सुर्ला, लखमापूर आदि गावे जुळल्या गेली आहे.  बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबदल विचोडा ग्रामपंचायत येथे आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करत गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

      सदर काम उत्तम दर्जाचे झाले आहे. या बंधा-यामुळे गावक-यांना मोठा फायदा होणार आहे. सोबत येथे आणखी काम आपण करणार आहोत. असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हलले आहे.

  • National Military School Rajasthan : राष्ट्रीय मिलिटरी स्कुल मध्ये निवड झालेल्या सुनिधी चा सत्कार

    National Military School Rajasthan : राष्ट्रीय मिलिटरी स्कुल मध्ये निवड झालेल्या सुनिधी चा सत्कार

    National Military School Rajasthan सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवणे हे तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तुमच्या मेहनतीने तुम्ही आज इथे उभे असून सैनिक स्कूल आणि मिलिटरी स्कूलमध्ये निवड होणे हे तुमच्या कठोर परिश्रम आणि निष्ठेचे फळ असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    अवश्य वाचा : महिलांना उद्योगासाठी मिळणार 50 हजार, अफवेने खासदार त्रस्त

    यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभाग आघाडीच्या वतीने कार्यालयात राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि सैनिक स्कूलमध्ये निवड झालेल्या चंद्रपूरातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त सैनिक रोषण अलोने, सेवानिवृत्त सैनिक अश्विन दुर्गे, ज्ञानोबा नरोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    हे ही वाचा : 300 आपदा मित्र प्रशासनाच्या सोबतीला

      National Military School Rajasthan यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, सैनिक स्कूलमधील शिक्षण तुमच्यासाठी जीवनातील एक नवा अध्याय असून यात तुम्ही अनुशासन, नेतृत्वगुण आणि सेवा भावनेत परिपूर्ण होणार आहात. शिक्षकांच्या कष्ट आणि समर्पणामुळेच हे विद्यार्थी आज इथे उभे आहेत. तुमच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना योग्य दिशा मिळाली आणि त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता आला. तुमच्या अथक प्रयत्नांमुळेच आज हे विद्यार्थी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सक्षम झाले आहेत.

     

    National Military School Rajasthan पालकांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि त्यागामुळे मुलांनी हे यश मिळवले आहे. हे यश तुमच्यासाठी फक्त एक प्रारंभ आहे. सैनिक स्कूलमध्ये तुम्हाला उत्कृष्ट शिक्षण, शारीरिक प्रशिक्षण आणि मानसिक बळ मिळणार आहे. या संधीचा पूर्ण वापर करून, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने देशाची सेवा करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन ज्ञान मिळवा, नवीन गोष्टी शिका आणि आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करा. तुमची मेहनत आणि समर्पणच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

    राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये निवड झालेल्या सुनिधी निर्वाण हिचा विशेष सत्कार

    राजस्थान येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये देशातील 10 मुलांची निवड करण्यात आली आहे. यात सुनिधी निर्वाण हिचा समावेश असून सुनिधी ही या शाळेत प्रवेश मिळवणारी राज्यातील एकमेव मुलगी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

  • Smart prepaid meter : लोकप्रतिनिधी यांच्या नावाने बांबूचे दहन करणार – हरविंदर सिंग धुन्ना

    Smart prepaid meter : लोकप्रतिनिधी यांच्या नावाने बांबूचे दहन करणार – हरविंदर सिंग धुन्ना

    Smart prepaid meter महाराष्ट्रात शासनाने प्रीपेड स्मार्ट मीटर प्रत्येक घरावर दरोडा टाकणारी योजना अमलात आणली असून या योजनेसह प्रकार रूप देण्याच्या जबाबदारी पासून महाराष्ट्राचे सर्व आमदार नामदार मुक्त होऊ शकत नाही तूर्तास काही आमदारांनी जनतेचा आक्रोश पाहता मंत्र्यांना निवेदन देऊन छायाचित्र प्रसारित करण्याचा सपाटा लावला आहे.

    अवश्य वाचा : स्मार्ट वीज मीटर चा निर्णय तात्पुरता रद्द, चंद्रपुरात सुरू झाली श्रेयवादाची लढाई

    कोरोना काळात विद्युत दर वाढले तेव्हा सुद्धा व आता पुन्हा एप्रिलमध्ये दरवाढ झाली असताना या मान्यवरांनी विरोध न करता फक्त निवडणुकीच्या काळात २०० युनिट मोफत मिळवून देण्याचे स्वप्न दाखविण्यापलीकडे त्यांना संपत असलेल्या या पाच वर्षात काही साध्य करता आले नाही.

    चंद्रपूर

    Smart prepaid meter चंद्रपूर जिल्ह्यात सी टी पी एस सह विविध उद्योगांचे प्रदूषण रोगराई बेरोजगारीनंतर महावितरण कंपनीकडून जबरन प्रीपेड स्मार्ट मीटर्स लावण्याचा संग बांधण्यामागील मुख्य बाबी समोर नमूद करण्यापूर्वी या महाभागाने हा उपक्रम राबवण्यापूर्वी राज्य विद्युत नियमक मंडळाकडून रीतसर परवानगी घेण्याचे सौजन्य सुद्धा पूर्णत्वे पार पाडले नाही यामागे अधिक चौकशी केली असता समोर आलेली माहिती विद्युत ग्राहकांकरिता धक्कादायक राहणार आहे गेल्या दोन वर्षात दोन वेळा विद्युत दरात मोठी वाढ करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील गोरगरीब जनतेला जोराचा शॉक दिला असताना आता महाराष्ट्र शासन नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर घराघरात बसवून रिचार्ज मारूनच व्हेज वापर करण्यास भाग पाडत आहे.

    हे ही वाचा : बल्लारपूर रेलवे स्टेशनवरील त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ देऊ नका – डॉ.अभिलाषा गावतुरे

    वीज दरात होत असलेली वाढ व वीज निर्मितीस येणारा खर्च याचे गुणोत्तर केल्यास निश्चितच लक्षात येईल की कशाप्रकारे राज्य करते जनसामान्यांचे हाल करीत आहे विशेष म्हणजे या कंपन्यांना या भागात स्मार्ट मीटर पुरविण्याचे काम दिले आहे त्या कंपन्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी मीटर बसविणार असून भांडुप कल्याण कोकण या ठिकाणी 63 लक्ष 24 हजार 66 मीटर बसविण्याकरिता गौतम अदानी यांच्या कंपनीस सात हजार 594 कोटी 45 लाखांचे टेंडर देण्यात आले आहे तसेच बारामती पुणे येथे 52 लाख 44 हजार 917 प्रीपेड मीटर्स लावण्याचे कंत्राटही गौतम अदानी यांच्याच कंपनीस दिल्याचे समोर आले आहे ज्याची किंमत 6294 कोटी 48 लक्ष इतकी आहे तर नाशिक आणि जळगावचे टेंडर एनसीसी ट्रेडर्स यांना एकूण 28 लाख 86 हजार 622 मीटर बसविण्याकरिता 34001 कोटी 6 लाख रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे विशेष म्हणजे एनसीसी कंपनी अर्थात नागार्जुन कंट्रक्शन कंपनी लिमिटेड जी हैदराबादची असून ही कंपनी बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे.

    Smart prepaid meter लातूर, नांदेड, औरंगाबाद येथे मांटे कारलो या नावाची कंपनी 27 लाख 77 हजार 760 स्मार्ट मीटर बसविणार असून त्याकरिता 330 कोटी 53 लाख रुपयांचे कंत्राट मोंटी कार्लो देण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी

    चंद्रपूर गोंदिया नागपूर करिता तीस लाख तीस हजार 346 मीटर लावण्याचा ठेका मेसर्स जीनस या कंपनीस एकूण 3635 कोटी 53 लाखांचा कंत्राट बहाल करण्यात आलेला आहे अकोला व अमरावती करिता 21 लाख 76 हजार 636 स्मार्ट प्रीपेड मीटरचा ठेका 267 कोटी 61 लाख रुपयांना दिला असून विशेष म्हणजे महाराष्ट्रात घरोघरी दोन कोटी 24 लाख 61 हजार 346 मीटर बसविण्यात येणार असून त्याकरिता वीज कंपनी 26000923 कोटी वीज कंपनी अदा करणार आहे.

     

    Smart prepaid meter महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने एका स्मार्ट मीटरचा खर्च साधारणतः 12000 रुपये आकारला असून मीटर आधी रिचार्ज करावा लागतो तेव्हाच वीज वापर करता येतो ज्या वेळेला रिचार्ज संपला तर दुसऱ्या दिवशी दहा वाजे पावे तो रिचार्ज करावा लागेल नाहीतर वीज पुरवठा बंद करण्यात येईल.

    गमतीची बाब म्हणजे घरोघरी मीटर लावण्याचे काम ज्यांना दिले आहे त्यापैकी फक्त जीनस या कंपनीलाच मीटर निर्मितीचा अनुभव आहे बाकी सगळ्या कंपन्या इतरांकडून वेळ पडल्यास बाहेरून मीटर खरेदी करून ग्राहकांच्या घरी लावणार आहेत.

    महत्त्वाचे
    महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व कंपन्या वीज निर्माण करणार नाही वीज कंपनीकडून वीज घेऊन ती ग्राहकांच्या घरोघरी पोहोचविणार ग्राहक वापरापूर्वीच आधी विजेचे रिचार्ज करून या कंपन्यांच्या मार्फत वीज विकत घेणार ग्राहकांकडून जमा केलेले पैसे ही कंपनी तीन महिने वापरून बिना व्याजाने नंतर विज कंपनीला देणार म्हणजे वीज आमची पाणी आमची कोळसा आमचा खनिज साधन संपत्ती आमची व त्यावर संपूर्ण नियंत्रण मीटर पुरवठादार कंपन्यांचे असणार.
    आजच्या घटकेला वीज ग्राहक असलेला व्यक्ती हा ग्राहक राहणार नाही तर तो उपभोक्ता ठरेल म्हणजे कंज्यूमर ऍक्टचे संरक्षणाचा लाभ संपुष्टात येईल.

    Smart prepaid meter या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता विद्युत ग्राहक अन्याय अधिकार व रक्षा संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष सरदार हरविंदर सिंह धून नाजी यशवंत दाचेवर डॉक्टर एस वाय साखरकर डॉक्टर मनोज खोब्रागडे श्री दीपक खाडीलकर श्री योगेश उपरे श्री पंकज गुप्ता यांनी तीव्र भावना व्यक्त करून जर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसेच विविध पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी तात्काळ दखल न घेतल्यास निषेध म्हणून प्रतीकात्मक बांबू जाळून या उपक्रमाचा विरोध न करणाऱ्या तसेच ही प्रक्रिया होत पावे तो गप्प राहणाऱ्यांचा निषेध करण्यात येईल असेही जाहीर केले आहे.

  • Smart Electricity Prepaid Meter scheme : स्मार्ट वीज मीटर सक्ती रद्द, श्रेय कुणाचे?

    Smart Electricity Prepaid Meter scheme : स्मार्ट वीज मीटर सक्ती रद्द, श्रेय कुणाचे?

    Smart Electricity Prepaid Meter scheme राज्यात स्मार्ट वीज प्रीपेड मीटर ची सक्ती मोहीम शासनातर्फे राबविणे सुरू होते, 6 हजार 300 रुपयांचा वीज मीटर शासन 12 हजार रुपयांना घेत असल्याची माहिती पुढे आली, विशेष म्हणजे या संपूर्ण बाबी ला वीज नियामक मंडळाचा विरोध होता, मात्र वीज नियामक मंडळाला अंधारात ठेवत शासनाने वीज ग्राहकांवर हा नियम थोपविण्याचे काम केले.

    महत्त्वाचे : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी

    आता जन आंदोलन व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारला स्मार्ट वीज मीटर सक्ती चा निर्णय मागे घ्यावा लागणार, फक्त नागरिकांनी असे समजू नये की हा मीटर लागणार नाही, सध्या औद्योगिक व शासकीय कार्यालयात हा स्मार्ट मीटर लागणार आहे, निवडणुकीनंतर पुन्हा ही मोहीम सुरू होणार.

     

    Smart Electricity Prepaid Meter scheme या मोहीम विरुद्ध चंद्रपुरातून विरोध करण्यात आला, सर्वप्रथम आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याविरोधात आंदोलन केले, बल्लारपूर येथे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी आंदोलन केले, तर कांग्रेसचे महेश मेंढे यांनी महावितरण ला याबाबत निवेदन दिले.

    अवश्य वाचा : आमदार सुभाष धोटे ऍक्शन मोड वर

    विधानसभा अधिवेशन पूर्वी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले, 15 जून रोजी थेट राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठपुरावा करीत शासनाला हा निर्णय मागे घ्यायला लावले, असे वृत्त झळकले.

    स्मार्ट वीज मीटर बाबत संपूर्ण राज्यात आंदोलन झाले मात्र श्रेयवाद चंद्रपुरात सुरू झाला, हे न समजण्यासारखे आहे.

    सर्वप्रथम आपण याबाबत मुनगंटीवार यांचा दावा काय हे जाणून घेऊया…..

    राज्यातील सर्वसामान्य विजग्राहकांची कुठल्याही प्रकारची गौरसोय होऊ नये, ही गोष्ट ध्यानात ठेवूनच राज्य सरकारने प्रत्येक निर्णय घेतला आहे आणि प्रीपेड वीज मीटरच्या संदर्भातही त्याच दृष्टीकोनातून स्मार्ट निर्णय घेण्यात आला आहे, अशी भूमिका राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात घरगुती वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे, असेही ते म्हणाले.

    Smart Electricity Prepaid Meter scheme सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील निर्णयासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार देखील मानले आहेत. घरगुती विजग्राहकांच्या भावना लक्षात घेत ना. मुनगंटीवार यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत स्मार्ट प्रीपेड मीटर संदर्भात चर्चा केली होती. या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या सकारात्मक निर्णयानंतर सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील कामगाराने दिला आत्मदहनाचा इशारा

    यासंदर्भात माहिती देताना ना. मुनगंटीवार म्हणाले, वीज वितरणाच्या दरम्यान संभावित तोटा (डिस्ट्रिब्युशन लॉस) कमी व्हावा किंवा रोखता यावा या उद्देशाने तसेच वीज वितरण कंपन्यांचे गुणवत्ता व विश्वासार्हतेचे निर्देशांक वाढावे, मानवी चुका कमी व्हाव्यात, जलद ग्राहक सेवा मिळावी तसेच उत्तम सुविधा ग्राहकांना मिळाव्यात या उद्देशाने स्मार्ट मीटरची योजना जुलै २०२० मध्ये केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाकडून तयार करण्यात आली होती. परंतु, स्मार्ट मीटर बसाविण्यासंदर्भात घरगुती ग्राहकांमध्ये असलेला रोष व अस्वस्थता बघून उपमुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केल्याचे केल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

     

    Smart Electricity Prepaid Meter scheme ‘आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाराष्ट्र शासनासह ना. सुधीर मुनगंटीवार यांचेही आभार मानले आहेत.

    अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा काय?

    चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी या आश्वासनाची पुर्तता करत स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीचा निर्णय रद्द केला आहे. त्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

    Smart Electricity Prepaid Meter scheme     स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बाबत जनतेमध्ये रोष होता. त्यामुळे जनतेला मान्य नसलेल्या या मीटर जोडणीचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेत केली होती. मुंबई मंत्रालय येथे झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली होती. त्याचा परिणाम आज दिसून आला असून सदर मिटर लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.  

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील 24 जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार

    वीज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात असताना, महाराष्ट्रात वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत.  शासनाच्या नवीन वीज कर धोरणानुसार सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडण्याची सक्ती करण्यात येत होती. ग्राहकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्री-पेड वीज मीटर लावले जात होते. जुने वीज मीटर पोस्ट-पेड असल्याने ग्राहकांना थकीत बिल भरण्याची मुभा होती, त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार वीज देयक भरण्यास सक्षम होते. मात्र, स्मार्ट प्री-पेड वीज मीटरमुळे पुरेशा रिचार्ज अभावी वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला होता. यामुळे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार होता.

    Smart Electricity Prepaid Meter scheme    रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास  वाढणार होता. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता होती. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या या नव्या मिटरमुळे निर्माण झाली असती. आदी बाबी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री यांची भेट घेत त्यांच्या लक्षात आणून दिल्या होत्या. त्यानंतर आता सदर प्री-पेड मिटर लावण्याचा निर्णय सरकारने रद्द करत विज ग्राहकांना दिलासा दिला आहे.

     

    कांग्रेसचे महेश मेंढे यांचा दावा काय?

    चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात वीज ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन तर कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुकूम परिसरातील मीटरची पाहणी केली होती. त्यानंतर जनआंदोलन उभारण्याचे ठरवले असता शासनाने सादर योजनेला स्थगिती दिल्याने वीजग्राहक आणि कंत्राटी कामगारांसाठी दिलासादायक असल्याने सरकारचे व आंदोलनात साथ देणाऱ्याचे मानले मेंढेनी आभार मानले.

    रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास वाढणार आहे. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सरकारने नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिचार्ज मीटरच्या फायदे आणि तोटे यांचे निष्पक्ष मूल्यांकन करत, वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणी सक्ती रद्द करावी
    यासाठी मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांना निवेदन तर कंत्राटी कामगार संघटनेच्या माध्यमातून तुकूम परिसरातील मीटरची पाहणी केली होती.

     

    Smart Electricity Prepaid Meter scheme
    सदर योजना ‘आता राज्यात ही योजना सरकारी कार्यालयासाठी राबविण्यात येणार आहे. घरगुती वीज वापरासाठी मात्र स्मार्ट मीटर राहणार नाही, यावर स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे घरगुती वीज ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण असून  सरकारचे आभार मेंढे यांनी मानले असून ४ दिवसापासून सुरु केलेल्या जनआंदोलनास इथेच थांबवत असून नागरिकांचा हक्कासाठी सैदव तत्पर राहील असे मानत सर्वांचे आभार महेश मेंढे यांनी मानले आहे.

     

    या दाव्यावर आम आदमी पार्टीने अजूनही श्रेय घेतले नाही कारण त्यांचे आंदोलन हे जिल्हाभर गाजले होते, व नागरिकांनी त्यांनी केलेला विरोध बघितला, सोबत शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलनाची अनेकांनी दखल घेतलेली आहे, ज्यांनी याबाबत काही केलं नाही त्यांनी याबाबत श्रेय घेण्याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात पुढे आलेला आहे.

  • Mla Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीवर मोठा निर्णय होणार

    Mla Kishor Jorgewar : आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीवर मोठा निर्णय होणार

    Mla Kishor Jorgewar चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, या अधिवेशनात सरकारकडून याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात ऊर्जामंत्री फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन

    आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बाबत जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे जनतेला मान्य नसलेल्या या मीटर जोडणीची सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. आज मुंबई मंत्रालय येथे झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.

     

    Mla Kishor Jorgewar वीज ही सामान्य नागरिकांची प्राथमिक गरज आहे आणि सरकारने ती माफक दरात पुरवणे आवश्यक आहे. अनेक राज्यांमध्ये 200 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जात असताना, महाराष्ट्रात वीज दर इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. वीज बिलात समाविष्ट असलेल्या विविध कर आणि शुल्क हे दरवाढीचे प्रमुख घटक आहेत.

    महत्त्वाचे : जिल्हा परिषद शाळेत आता सेमी इंग्रजी अभ्यासक्रम

    शासनाच्या नवीन वीज कर धोरणानुसार सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडण्याची सक्ती करण्यात येत आहे. ग्राहकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्मार्ट प्री-पेड वीज मीटर लावले जात आहेत. जुने वीज मीटर पोस्ट-पेड असल्याने ग्राहकांना थकीत बिल भरण्याची मुभा होती, त्यामुळे ते आपल्या सोयीनुसार वीज देयक भरण्यास सक्षम होते. मात्र, स्मार्ट प्री-पेड वीज मीटरमुळे पुरेशा रिचार्ज अभावी वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण होतो. यामुळे विशेषतः सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे.

     

    Mla Kishor Jorgewar रिचार्ज मीटरमुळे वीज कंपन्यांना फायदा होणार असला तरी ग्राहकांवर निश्चित बोझ्या व त्रास वाढणार आहे. अनेक नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा असतील याची शाश्वती नसते, त्यामुळे त्यांना रिचार्ज प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. तसेच ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.

    या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी सरकारने नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रिचार्ज मीटरच्या फायदे आणि तोटे यांचे निष्पक्ष मूल्यांकन करत, वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणी सक्ती रद्द करावी आणि लोकभावना लक्षात घेऊन पूर्ववत जुने वीज मीटर देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.