Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • make a home from plastic waste : चंद्रपुरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो  हाऊस’

    make a home from plastic waste : चंद्रपुरात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पर्यावरण मुक्त ‘डेमो हाऊस’

    make a home from plastic waste प्लास्टिक कचरापासून एखादे घर बनू शकते, यावर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही. मात्र खरच सिंगल युज प्लास्टीक पासून आपण आपल्या भविष्यातील घर बनवू शकतो, हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने अभिनव उपक्रमातून दाखवून दिले आहे. विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पर्यावरणमुक्त डेमो हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mukhyamantri-ladki-bahin-yojana-maharashtra-government/

    आपल्या दैनंदिन जीवनात, आपल्या सभोवतालच्या प्रदूषणाची चर्चा करतांना प्लास्टीक कचरा व्यवस्थापन ही एक प्रमुख समस्या आहे. विविध संशोधन अभ्यासानुसार, प्लास्टीकचे विघटन हेाण्यासाठी 20 ते 500 वर्षे लागतात व ते दीर्घ काळापर्यंत वातावरणात राहते. ज्यामुळे केवळ मानवांसाठीच नाही तर पर्यावरणालाही धोका आहे. या संपूर्ण बाबीचा विचार करतांना जिल्हा परिषद चंद्रपूर व रॅग आय अपसायकलिंग कंपनी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण डेमो हाऊस बांधकाम अंतर्गत भविष्यातील घर बांधले गेले आहे.

    अवश्य वाचा : बल्लारपूर विधानसभेत माळी समाजाचा उमेदवार हवा

    make a home from plastic waste पर्यावरणयुक्त असे डेमो हाऊसची संकल्पना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांचे वतीने करण्यात आली आहे. त्याकरिता वन विभागाकडून बॉटनिकल गार्डन मध्ये 625 चौरस फुट जागा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर व डॉ. बालमुकुंद पालीवाल यांचे रॅग आय अपसायकलिंग कंपनी  यांचे संयुक्त विद्यमाने डेमो हाऊस तयार करणात आले आहे.

     

    make a home from plastic waste 19 फुट उंच व 10 फुट बाजुच्या भिंतीसह 625 चौरस फुट क्षेत्रफळावर बांधकाम करण्यात आले असून, १३ टन सिंगल – युज फेकून दिलेले प्लास्टिक अपसायकल करून सदरचे बांधकाम करण्यात आले आहे. भिंतीपासून छतापर्यंतची संपूर्ण रचना सर्व प्रकारच्या अपसायकल प्लास्टिक सामग्रीचा वापर करून तयार केली आहे. अपसायकलींग केलेल्या प्लास्टिक तंतुपासुन बनविलेले उच्च- गुणवत्तेचे इन्सुलेशन साहित्य इष्टतम तापमान नियमन राखते, घरातील वातावरण गरम –थंड करण्यासाठी ऊर्जेचा वापर कमी करते. अपसायकलींग केलेल्या प्लास्टिकचा वापर करून, मोठया प्रमाणात प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये जाण्यापासून किंवा नैसर्गिक वातावरणास प्रदूषित करण्यापासून प्रतिबंधित करते.

    महत्त्वाचे : मी कुणालाही धमकी दिली नाही – प्रकाश पाटील मारकवार

    make a home from plastic waste ग्रामीण भागामध्ये बांधकाम करण्यात येणारे घरकुले, वरील नमुद केल्यानुसार सिंगल –युल- प्लास्टिक पासून केल्यास ग्रामीण भागात प्रदुषण होणार नाही व गांव पर्यावरणयुक्त राहण्यास मदत होईल. ग्रामीण भागात गोळा होणारा वेस्ट प्लास्टिक, बचत गटामार्फत संकलित  करून संस्थेला आणून दिल्यास, या वेस्ट प्लास्टिक पासून  विविध प्रकारच्या वस्तु तयार करून देण्यात  येईल, असे डॉ. पालीवाल सांगितले आहे.

    यासर्व बाबीचा विचार करतांना आपणास पर्यावरण संतुलन ठेवणे आवश्यक असल्याने, भविष्यात घरे बांधकाम करतांना सिंगल- युज -प्लास्टिक पासून घरे बांधकाम करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुभाष पवार यांनी केले आहे.

  • Pratibha dhanorkar : खासदार धानोरकर मुळे त्या मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखांची आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar : खासदार धानोरकर मुळे त्या मृत कामगारांच्या कुटुंबाला मिळाली 45 लाखांची आर्थिक मदत

    Pratibha dhanorkar ताडाळी येथील सिद्धबली कंपनीत काल दुपारी 4.00 वा. अपघात होऊन अपघातात श्री. श्यामराव बबन ठेंगणे हे मृत्युमुखी पडले. सदर घटनेची माहिती खासदार धानोरकर यांना होताच त्यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क करुन या प्रकरणी कंपनी दोषी असून मृताच्या पत्नीस मोबदला देण्याची मागणी केली. सदर मागणी आज पुर्ण होऊन मृताच्या पत्नीस 45 लाखांचा मोबदला देण्यात आला.

    अवश्य वाचा | काय आहे पेपरफुटी कायदा?

    सिद्धबली येथे दि. 23 जुन रोजी दुपारी 4.00 वा. झालेल्या अपघाता श्री. श्यामराव बबन ठेंगणे यांचा मृत्यू झाला. सदर मृत्यूस कंपनीतील प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप खासदार धानोरकर यांनी केला. कंपनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची कुठलही काळजी न घेत असल्याने सदर अपघात घडला असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितल. या अपघाताची तात्काळ माहिती होताच खासदार धानोरकर यांनी कंपनीतील अधिकाऱ्यांशी बोलणी करुन आपल्या पदाधिकारी व स्वीय सहायक ला दवाखान्यात पाठविले. जोवर मृत्याच्या कुटूंबीयांना आर्थिक मोबदला मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही व कुटूंबीया सोबत राहू अशी भुमिका घेतली.

     

    Pratibha dhanorkar आज सकाळी कुटूंब व कंपनी चे अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या समवेत बैठक घडवून आणून मृताच्या पत्नीस 45 लाख रुपये कंपनी तर्फे आर्थिक मोबदला मिळवून दिला. या प्रसंगी कुटुंबीयाशी संवाद साधून तुमच्या दुःखात सहभागी असल्याचे खासदार धानोरकर यांनी सांगितले. तसेच सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षेची काळजी घ्यावी याकरीता लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक कामगार आयुक्त व कंपनीतील विविध अधिकाऱ्यांशी बैठकीचे आयोजन करणार असल्याचे सांगितले.

  • Sunday market chandrapur : कांग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम

    Sunday market chandrapur : कांग्रेसचा जनसंवाद कार्यक्रम

    Sunday market chandrapur जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून संडे मार्केटच्या फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या आणि त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येईल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/drugs-in-chandrapur-aaps-statement-to-the-police-administration/

    फुटपाथवर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकांना ज्या समस्या येतात त्या समस्या संबंधी प्रश्नांना घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून निश्चितच लढा देण्यात येईल तसेच  गोरगरीब जनतेच्या पाठीशी सदैव राहणार असे आश्वासन काँग्रेस नेते महेश मेंढे यांनी दिले.

     

    Sunday market chandrapur कार्यक्रमादरम्यान फूटपाथ वर व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यवसायिकाच्या पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून काँग्रेस नेते महेश मेंढे यांच्या माध्यमातून छत्र्या वाटप करण्यात आले.

    अवश्य वाचा : टायगर अभि जिंदा है – सुधीर मुनगंटीवार

    जनसंवाद कार्यक्रमामध्ये मंचावर सामाजिक कार्यकर्ते सय्यद हाजी,  अधिवक्ता मोहम्मद रफीक शेख, काँग्रेस युथ महासाचिव कादर शेख,  संडे मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हमीद रजा राजा भाई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.  मोठ्या संख्येने संडे मार्केट असोसिएशन चे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मोहम्मद इरफान शेख यांनी केले.

  • Drugs in Chandrapur : शहरातील बाबूपेठ भागात अंमली पदार्थ? आपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

    Drugs in Chandrapur : शहरातील बाबूपेठ भागात अंमली पदार्थ? आपचे पोलीस प्रशासनाला निवेदन

    Drugs in Chandrapur चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजेच बाबूपेठ मात्र या भागात सध्या गुन्हेगारी फोफावत आहे, याला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे. मात्र तसे काही होताना दिसत नसल्याने आप ने याविरोधात आवाज उठविला आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/bamboo-research-and-training-centre-chandrapur/

    या भागात दिवसाढवळ्या रेती चोरी होत आहे इतकेच नाही तर अंमली पदार्थ सेवन करणारे अल्पवयीन मुले घरफोड्या करत आहे. घरासमोरील वाहने चोरीला जात आहेत. सध्या शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतांना कोणाचेही याकडे लक्ष नाही. पोलिसांनी याकडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. याबाबत आपचे युवा नेते राजू कुडे यांनी स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनला एक निवेदन सादर केले आहे.

    बाबूपेठ परिसरातील काही भागात चोरी, अंमली पदार्थांची तस्करी असे अनेक अवैध उद्योग फोफावत आहे, मात्र त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही, जर आज यावर आवाज उचलला नाही तर येणाऱ्या काळात परिस्थिती हाताबाहेर निघून जाणार.

    मात्र आप युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी सदर प्रकरणाची गांभिर्यता लक्षात घेत त्याबाबत सखोल माहिती जाणून घेत पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती व्हावी व प्रशासनाने काहीतरी कारवाई यावर करावी असे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे.

    पोलीस प्रशासन हा विषय कसा हाताळणार यावर बाबूपेठ येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    अवश्य वाचा – PM विश्वकर्मा मार्गदर्शन कार्यक्रम

    Drugs in Chandrapur शहरातील गुन्हेगारीला तातडीने आळा घालण्याची मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे. निवेदन देते वेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक महानगरचे अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष जावेद सय्यद, व प्रशांत रामटेके उपस्थित होते.

  • Bamboo Research and Training Centre : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशातील अग्रगण्य संस्था बनविणार – सुधीर मुनगंटीवार

    Bamboo Research and Training Centre : बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला देशातील अग्रगण्य संस्था बनविणार – सुधीर मुनगंटीवार

    Bamboo Research and Training Centre बांबू क्षेत्रात संशोधन प्रशिक्षण आणि कौशल्य विकासासाठी असलेली चिचपल्ली (जि.चंद्रपुर) येथील बीआरटीसी ही देशात एकमेव संस्था आहे. संशोधनासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बांबू तसेच उद्योग क्षेत्रात चालना देणारी देशातील ही एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास नक्की येईल, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    अवश्य वाचा : टायगर अभि जिंदा है, सुधीर मुनगंटीवार असं का म्हणाले?

    वन अकादमी येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बीआरटीसी) आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक अशोक खडसे, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मुकेश टांगले, भूषण येरगुडे, अपर संचालक मनिषा भिंगे, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे आदी उपस्थित होते.

    Bamboo Research and Training Centre 4 डिसेंबर 2014 रोजी बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती झाली असून राज्याच्या वनविभागाची ही एक स्वायत्त संस्था आहे, असे सांगून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, जिल्ह्यात ताडोबा – अंधारी हा जगप्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबातील बफर झोनमधील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या अर्ध्या क्षेत्रात अनुदानावर बांबू लागवडीसाठी प्रवृत्त करावे. सोबतच भाजीपाला क्लस्टर सुद्धा देता येईल का, याचा विचार करावा.

    या संस्थेतील फायर फायटिंग व्यवस्था अतिशय अत्याधुनिक, तंत्रशुद्ध व अचूक असावी. सादरीकरणांमध्ये ज्या बाबी ठरविण्यात आल्या आहेत, त्याचे प्रमुख उद्दिष्ट ठरविणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत सविस्तर आराखडा तयार करून टाटा ग्रुप, अदानी ग्रुप, दालमिया यांच्याशी सुद्धा बांबू उत्पादनाबाबत चर्चा करावी. सोबतच बांबू लागवड आणि उत्पादनासाठी लघु व सूक्ष्म उद्योग (एम. एस. एम. ई.)अंतर्गत काही नियोजन करता येते, का त्याचा सुद्धा अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा. बांबू लागवड, उत्पादन व त्यातून कौशल्य विकास या संदर्भात पीएम विश्वकर्मा योजनेत या बाबींचा समावेश करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    Bamboo Research and Training Centre यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा व वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर म्हणाले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने देशात बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्था (बीआरटीसी) ही भारतात एकमेव संस्था उभी राहिली आहे. प्रशिक्षणासोबतच शिक्षण, त्याचे सादरीकरण त्यातून रोजगार याबाबतीत ही संस्था देशपातळीवर नावारूपास येणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या संस्थेमध्ये बांबू विषयक प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

     

    सादरीकरणात बीआरटीसी चे संचालक अशोक खडसे म्हणाले, समाज, नागरिक आणि उद्योगांच्या प्रगतीसाठी बांबूक्षेत्रात स्वयंरोजगार निर्माण करणे, हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बीआरटीसी अंतर्गत बांबू टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा, शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि बांबू व्होकेशनल ट्रेनिंग देण्यात येत आहे. सोबतच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) च्या सहकार्याने सहा ठिकाणी सुविधा केंद्र (सीएफसी) सुरू करण्यात आले आहे. तसेच पोंभूर्णा येथे बांबूपासून अगरबत्ती निर्मिती युनिट सुद्धा कार्यान्वित करण्यात आले आहे. बांबू पासून निर्माण करण्यात आल्या वस्तूंची विक्री चंद्रपूर, मोहर्ली, कोलारा आणि बल्लारपूर येथे होत आहे.

     

    भविष्यात येथे विविध प्रशिक्षण आयोजित होणार असल्यामुळे वसतिगृहाची निर्मिती, इंडक्शन किचनसाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, आग प्रतिबंधक व्यवस्था व त्याची देखभाल दुरुस्ती, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, इंटरनेट आणि वायफाय सुविधा, डिजिटल लॅब, टिशू कल्चर लॅब, ऑडिटोरियम, सौर ऊर्जा व्यवस्था, वाहतुकीसाठी 30 आसन व्यवस्थेची बस, परिसरात सादरीकरणासाठी डिस्प्ले युनिट्स, एक्जीबिशन हॉल, आरोग्य केंद्र, क्रीडा सुविधा, कंप्यूटर लॅब, लायब्ररी, आदींचा विस्तार करण्यात येणार आहे.

    Bamboo Research and Training Centre सन 2017 पासून डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून जून 2024 पासून विद्यार्थी क्षमता 30 करण्यात आली आहे. सन 2023 – 24 मध्ये बांबू निर्मिती, हॅंडीक्राफ्ट आणि कौशल्य विकास, फर्निचर बनविणे, निवासी व अनिवासी शेतकरी प्रशिक्षण, बांबूपासून ज्वेलरी, बास्केट, आदी संदर्भातील 17 प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले असून यात 516 नागरिक सहभागी झाले होते. आगामी काळात नवीन फॉरेस्ट गार्ड साठी बांबूबाबत मूलभूत प्रशिक्षण, विदर्भ आणि राज्यस्तरावरची कार्यशाळा, बांबू क्षेत्रातील उत्कृष्ट कारागीर आणि तज्ञांद्वारे कॉन्फरन्स, व्होकेशनल ट्रेनिंग, शेतकरी ट्रेनिंग आदी घेण्याचे नियोजन आहे, असे अशोक खडसे यांनी सांगितले.

     

    बॉटनिकल गार्डनच्या नियामक मंडळाची सभा : विसापूर येथे असलेल्या श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनच्या नियामक मंडळाची सभा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी प्रस्तावित बाबींना मान्यता देऊन उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. बॉटनिकल गार्डनबाबत क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी सादरीकरण केले.

  • PM Vishwakarma Yojana 2024 :  कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल – आमदार किशोर जोरगेवार

    PM Vishwakarma Yojana 2024 : कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल – आमदार किशोर जोरगेवार

    PM Vishwakarma Yojana 2024 शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र त्या शेवटच्या गरजू घटकापर्यंत पोहोचविण्याचे मोठे आव्हान राहिले आहे. परिणामी अनेक पात्र लाभार्थी अशा समाजउपयोगी योजनांपासून वंचित राहत आहेत. मात्र सुतार (झाडे) समाजाने आज पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करत सदर योजनेचे फायदे समाजाला पटवून दिले आहेत. हे आयोजन नक्कीच समाजातील कुशल कामगारांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल ठरेल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/minister-sudhir-mungantiwar-ballarpur-victory-meeting/

        सुतार (झाडे) समाज महासंघ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती तसेच महासंघांतर्गत महासंघ सखी व युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या सभागृहात सुतार (झाडे) समाज आर्थिक महामंडळ तसेच पीएम विश्वकर्मा योजना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आ. जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला सेवा निवृत्त को-ऑपरेटिव्ह अधिकारी माणिकराव गहोकर, माजी प्रादेशिक व्यवस्थापक राजेंद्र राजुरकर, मेहकर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, विद्यानंद मानकर,  नारायण क्षीरसागर, मुकेश मुंजनकर, प्रदीप जानवे,  ज्योती राखुंडे, सतीश माणुसमारे, यांच्यासह इतर मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू केली ही महत्त्वाची योजना

                   यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, सुतार समाज हा कष्टकरी समाज आहे. या समाजाच्या हाताला कला-कौशल्य आहे. मात्र आता नवी पिढी रोजगाराकडे वळल्याने ही अमूल्य संपत्ती नष्ट होत आहे. आपण उच्च शिक्षण घेतले पाहिजे. मात्र त्याचबरोबर आपला पारंपरिक व्यवसायही आपण केला पाहिजे. या व्यवसायाला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत एका वेगळ्या पद्धतीने आपण आपल्यातील हस्तकलेचे कौशल्य जगासमोर नेले पाहिजे असे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले.

    PM Vishwakarma Yojana 2024 प्रत्येक समाजाच्या विकासात आणि प्रगतीत कामगार, कारीगर आणि छोटे उद्योजक यांचे योगदान अनमोल असते. आपल्या देशातील विविध क्षेत्रातील कुशल कामगारांनी आपल्या कौशल्यांनी देशाची अर्थव्यवस्था बलशाली केली आहे. पीएम विश्वकर्मा योजना या सर्व कुशल कामगारांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आपल्या कारीगरांना आणि कुशल कामगारांना त्यांचे कौशल्य अधिकाधिक विकसित करण्याची संधी देणे आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. आपल्या देशात विश्वकर्मा समाजाच्या पारंपारिक कौशल्यांचा विकास करण्यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण आहे.

     

    या योजनेद्वारे आपल्या उत्पादनांचे ब्रँडिंग, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आणि जागतिक बाजारपेठेत त्यांना स्थान मिळवून देण्याचे काम केले जाते. ही योजना आपण समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविल्यास समाजातील कारीगर आणि कुशल कामगारांना एक नवीन दिशा मिळेल. त्यांना त्यांचे काम अधिक प्रभावीपणे करण्याची संधी मिळेल. आजचा हा मार्गदर्शन कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे.

    PM Vishwakarma Yojana 2024 या कार्यक्रमातून आपण या योजनेची माहिती आपल्या गावांमध्ये,  शहरांमध्ये आणि आपल्या परिवारांमध्ये पोहोचावी, त्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Karnataka emta Coal Mines : कर्नाटक एमटा प्रशासन खासदार धानोरकर यांच्या आंदोलनानंतर नरमले

    Karnataka emta Coal Mines : कर्नाटक एमटा प्रशासन खासदार धानोरकर यांच्या आंदोलनानंतर नरमले

    Karnataka emta Coal Mines भद्रावती स्थित कर्नाटक एम्टामधील संचालक मंडळ व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात मा. खासदार प्रतिभा धानोरकर, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थित आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य करीत असल्याचे कर्नाटक एम्टातील संचालक मंडळाने व अधिकाऱ्यांनी मान्य केले.

     

    Karnataka emta Coal Mines कर्नाटक एम्टा व बंराज मोकासा येथील प्रकल्पग्रस्तांच्या अनेक मागण्यांसाठी मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु होते. या आंदोलना दरम्यान प्रकल्पग्रस्तांवर व पदाधिकाऱ्यावर गुन्हे देखील दाखल झाले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याकडून कोळसा खान देखील बंद पाडण्यात आली.

     

    या सर्व आंदोलनाच्या अनुषंगाने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांची बाजु घेत मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एम्टातील संचालक मंडळ, अधिकारी व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात नियोजन भवन येथे आज दि. 22 जुन रोजी बैठक घडवून आणली. सदर बैठकीत 2006 पासून प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली.

     

    Karnataka emta Coal Mines यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पग्रस्तांना नौकरी,  पुर्नवसन, शेतकऱ्याची नुकसान भरपाई या सर्व विषयाच्या अनुषंगाने मार्ग काढण्यात आला. यावेळी एम्टा मधील अधिकाऱ्यानी तात्काळ नोकरी व शेतकऱ्यांचे उर्वरित पैसे देण्याचे मान्य केले. त्यासोबतच अनुकंपातील नौकरीचा प्रश्न देखील प्राधान्याने सोडविण्याचे मान्य केले. मा. जिल्हाधिकारी यांनी कंपनीतील अधिकारी यांना जुलै महिन्यापर्यंत सर्व मागण्या मान्य करुन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याना न्याय देण्यात यावा असे तोंडी आदेश दिले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/mp-pratibha-dhanorkar-great-honor-in-chandrapur/

    मा.खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्याना प्रकल्पग्रस्तांना न्याय देतांना कंपनीने गावकऱ्याना विश्वासात घेऊन संपुर्ण मागण्या पुर्ण कराव्या असे देखील सांगितले. यावेळी प्रकल्पग्रस्त गावातील सरपंचांनी मा. जिल्हाधिकारी यांच्या समक्ष गावकऱ्याच्या मागण्या मांडल्या. भविष्यात या मागण्या पुर्ण न झाल्यास अधिकाऱ्यानी संबंधीत कंपनीची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी देखील उपस्थितांपैकी करण्यात आली.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरात हवी 20 फूट उंच भिंत -aimim

    यावेळी कर्नाटक एम्टा संचालक मंडळाकडून आजवर अनेक आश्वासने चुकीचे दिले हे मान्य करुन भविष्यात प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पुर्ण करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरीक जो निर्णय घेतील त्यांच्या सोबत आपण राहणार असल्याचे सांगितले. यावेळी मा. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधिक्षक, मा. पोलिस विभागीय अधिकारी, मा. तहसिलदार भद्रावती, कंपनीचे संचालक मंडळ व अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्त गावातील सरपंच व शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • MP Pratibha Dhanorkar : ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांनी…खासदार प्रतिभा धानोरकर

    MP Pratibha Dhanorkar : ज्यांनी मला मतदान केलं नाही त्यांनी…खासदार प्रतिभा धानोरकर

    Mp pratibha dhanorkar राष्ट्रीय ओबीसी महासंघ, विमुक्त भटक्या जाती, जमाती व अनुसूचित जाती समाजाच्या वतीने 22 जून ला चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात करण्यात आले होते.

    अवश्य वाचा : आता विधानसभा निवडणुकीची तयारी, चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले कामाला

    आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, आमदार सुधाकर अडबाले, जयदीप रोडे यांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व सर्व जाती जमतीतर्फे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/congress-news-maharashtra-chandrapur-mud-movement/

    Mp pratibha dhanorkar यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की लोकसभा निवडणुकीत ओबीसी, एससी, एसटी सहित सर्व समाजाने मला भरभरून मदत केली, आज मी आपल्यासमोर एक गोष्ट सांगू इच्छिते की मी 18 लाख मतदारांची प्रतिनिधी आहे, ज्यांनी मला मतदान केलं व ज्यांनी मतदान केलं नाही त्यांनी आपल्या मनात कसलीही शंका न बाळगता माझ्याकडे काहीही काम असल्यास आवर्जून व हक्काने यावे.

     

    Mp pratibha dhanorkar आपल्या मनात असा विचार आणू नका की आपण मला मतदान केलं नाही तर मी आपलं काम करणार नाही, मी आपल्या सर्वांची प्रतिनिधी आहे, प्रत्येक नागरिकांचे काम करण्याचा अधिकार आपण मला दिला आहे. असे प्रतिपादन सत्कारमूर्ती खासदार धानोरकर यांनी यावेळी केले.

    आयोजित कार्यक्रमात असंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

  • Amrit Water Supply Scheme : चंद्रपुरातील नागरिकांना अमृत कधी मिळणार? – शिरीजकुमार गोगुलवार

    Amrit Water Supply Scheme : चंद्रपुरातील नागरिकांना अमृत कधी मिळणार? – शिरीजकुमार गोगुलवार

    Amrit Water Supply Scheme कोट्यवधी रुपये खर्च करून महानगरपालिका प्रशासनाने चंद्रपूर शहरात अमृत जल योजना सुरू केली. योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहरात पाण्याची पाईप लाईन टाकण्याची व्यवस्था करण्यात आली. तरीसुद्धा शहराच्या अनेक भागात अमृत जल योजनेची पाईप लाईन पोहोचलीच नाही. आणि ज्या भागात पाईप लाईन पोहोचली त्या भागात कनेक्शन सुरू करण्यात आले नाही.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    विशेषता: चंद्रपूर शहराच्या महाकाली कॉलरी ,बाबुपेठ व पठाणपूरा या प्रभागात अजूनही अमृत जल योजनेचे कनेक्शन् सुरू केले नाही. या प्रभागातील लोकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावं लागत आहे. इतर कोणतेही पर्याय पाण्यासाठी या प्रभागात उपलब्ध नसल्यामुळे  बहुजन समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार यांच्या नेतृत्वात तिन्ही प्रभागाच्या महिला मोठया संख्येने उपस्थित राहत चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांना अमृतजल योजनेचे कनेक्शन महाकाली कॉलरी, बाबुपेठ व पठानपुरा या भागात लवकरात लवकर सुरू करण्याबबत चर्चा करण्यात आली , सकारात्मक चर्चे नंतर या समस्येसंबंधीचे निवेदन आयुक्त यांना देण्यात आले.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहराला पुरा पासून वाचवायचे असेल तर 20 फूट उंच भिंतिचे निर्माणकार्य करावे लागेल

    Amrit Water Supply Scheme यावेळी बहुजन समाज पक्षाचे चंद्रपूर शहराचे अध्यक्ष अमोल राहुलगडे, घुगुस शहराचे अध्यक्ष सिद्धांत कोंडागुर्ला, प्रशांत रामटेके, अखिल निमगडे इतर बसपा कार्यकर्ता व महाकाली कॉलरी, पठानपूरा व बाबुपेठ परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

  • elements of flood risk : चंद्रपुरात 20 फूट उंच दगडाच्या भिंतीचे निर्माण करा – AIMIM ची मागणी

    elements of flood risk : चंद्रपुरात 20 फूट उंच दगडाच्या भिंतीचे निर्माण करा – AIMIM ची मागणी

    Elements of flood risk पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील काही भागात भयावह पुरजन्य स्थिती निर्माण होते, मात्र त्यावर आजपर्यंत काही उपाययोजना करण्यात आल्या नाही, दरवर्षी आलेल्या कृत्रिम पुराने नागरिकांचे नुकसान होते, त्यामुळे या कृत्रिम पुरापासून शहरातील काही भाग वाचवायचे असेल तर AIMIM ने प्रशासनाला 20 फूट उंच भिंत बांधण्याचा उपाय सुचविला आहे. याबाबत AIMIM ने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना निवेदन सुद्धा दिले आहे.

    अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले चंद्रपूर जिल्हा प्रशासन

    Elements of flood risk शहरातील पठाणपुरा, सिस्टर कॉलोनी व रहमत नगर भागात पावसाच्या पाण्याने पूर येतो, त्यासाठी पठाणपुरा ते नदी पात्र पर्यंत गोंड कालीन किल्ल्यासारखी दगडाची तब्बल 20 फूट उंच भिंत बांधावी, जेणेकरून सदर भिंत पुराच्या पाण्याचा प्रवाह थांबविणार, कारण चंद्रपूर शहर हे गोंड कालीन किल्ल्याच्या आत वसलेलं आहे, किल्ल्याच्या भिंतीमुळे शहरात पुराचे पाणी शिरकाव करू शकत नाही.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/railway-over-bridge-babupeth-mp-pratibha-dhanorkar/

    त्याप्रमाणे चंद्रपूर प्रशासनाने 20 फूट उंच ऐतिहासिक भिंतीचे बांधकाम करून नागरिकांना पुरापासून संरक्षण देण्याचे काम करावे अशी मागणी AIMIM जिल्हाध्यक्ष अमान अहमद व शहर अध्यक्ष अजहर शेख यांनी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना केली आहे.