Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • obstructing traffic : तर चंद्रपूर मनपा करणार फौजदारी कारवाई

    obstructing traffic : तर चंद्रपूर मनपा करणार फौजदारी कारवाई

    obstructing traffic चंद्रपूर मनपाने यापूर्वी रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावरे यावर मालकांना आवर घालण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यानंतर सुद्धा जनावरे शहरात अनेक ठिकाणी रहदारीला अडथळा निर्माण करताना दिसून येत असल्याने मनपाने पुन्हा कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

    चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असुन जनावरांना मोकाट सोडुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांवर सरळ फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

    obstructing traffic शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर मोकाट जनावरे ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येते असे निदर्शनास आले आहे.

    महत्त्वाचे : आमच्या शाळेला शिक्षक द्या, विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद येथे आंदोलन

    त्यामुळे आयुक्त विपीन पालीवाल यांनी यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जनावरांच्या मालकांनी आपल्या जनावरांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा सरळ फौजदारी कारवाई केली जाणार आहे. याकरीता मनपाच्या उपद्रव शोध पथकांची यावर नजर राहणार असुन सातत्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या जनावरांच्या मालकांची नोंद घेऊन त्यावर कारवाई केली जाणार आहे.

    रेल्वे विभागाने दाखवली तत्परता

    मोकाट जनावरांमुळे रहदारीला अडथळा तर होतो मात्र त्यामुळे लहान मोठे अपघात सुद्धा होत असतात, ही एक गंभीर बाब असून जनावर मालकांनी सदर जनावरे गोठयात बांधून ठेवावे, 3 जुलै ला 4 मोकाट जनावरे मालगाडीच्या अपघातात ठार झाली होती, इतकेच नव्हे तर जनावरांचा मृतदेह रेल्वे इंजिनमध्ये फसल्याने मालगाडी तब्बल 1 तास आपल्या गंतव्याकडे जाण्यासाठी उशिरा पोहचली.

     

    obstructing traffic त्यानंतर रेल्वे विभागाने रेल्वे रुळावर येणाऱ्या मोकाट जनावर मालकांवर ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्याच दिवशी दुपारी रेल्वे पोलिसांनी मोकाट जनावर मालकांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करीत अटक केली.

     

    रेल्वे विभागाने कारवाई करण्यास जी तत्परता दाखवली तशी कारवाई चंद्रपूर महानगरपालिकेने करायला हवी, अन्यथा जनावर मालक आपले जनावर असेच रस्त्यावर सोडून जातील, मनपाने आता थेट फौजदारी कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहे.

  • Chandrapur ganesh festival : चंद्रपुरातील गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

    Chandrapur ganesh festival : चंद्रपुरातील गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी

    Chandrapur ganesh festival आगामी गणेशोत्सव व इतर उत्सवांचा काळ पाहता विसर्जन व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने ईरई नदी पात्रालगत मोठे विसर्जन कुंड तयार केले जात असुन गणपती आणि दुर्गादेवीच्या मोठ्या मुर्तींची विसर्जन व्यवस्था येथे होणार आहे.जुलै महिन्याअखेरीस विसर्जन कुंडाचे काम पुर्ण होणार असुन आज चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी या बांधकामाची पाहणी केली.

    अवश्य वाचा : शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचे चंद्रपुरात आंदोलन 

    मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यापासुन दाताळा रोडवरील रामसेतु पुलालगतच्या जागेत विसर्जन स्थळी मोठे विसर्जन कुंड तयार करण्याच्या कामाची सुरवात करण्यात आली होती. तयार होणाऱ्या या विसर्जन कुंडाची क्षमता अंदाजे ३० लाख लिटर पाण्याची असुन ८१३७ स्केयर फुट क्षेत्रफळ आहे. १० फुट पर्यंत उंची असलेल्या मूर्तींचे यात विसर्जन करता येणार आहे. एकावेळेस २ मोठी वाहने उभी राहण्यास २ वेगवेगळे प्लॅटफॉर्म बनविण्यात आले असुन क्रेनच्या साहाय्याने मोठ्या मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य होणार आहे. या विसर्जन कुंडांद्वारे अधिकाधिक मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे कुंडात करण्यात येणार आहे. नदीतील विसर्जन बंद झाल्याने मोठ्या मूर्तींच्या विसर्जनास अडथळा निर्माण होणार नसुन नदी प्रदूषणासही चाप बसणार आहे.

    Chandrapur ganesh festival शहरात गणेशोत्सव व दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. विशेषतः गणेशोत्सव काळात अनेक मंडळांद्वारे मोठ्या मुर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती मोठी असल्याने जिथे पाणी अधिक प्रमाणात उपलब्ध असेल तिथे विसर्जन करण्याकडे कल असतो. पुर्वी रामाळा तलावात मोठया प्रमाणात मूर्तींचे विसर्जन केले जायचे मात्र तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने श्रीगणेश व दुर्गादेवी मूर्ती विसर्जन रामाळा तलावात न करता विसर्जनाची व्यवस्था ईरई नदी पात्रालगत करण्यात येते.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/chandrapur-journalist-entries-invited-for-shramik-journalists-association-awards/

    मागील वर्षी सर्व मोठ्या मूर्तींचे विसर्जन हे ईरई नदीत करण्यात आले होते.विसर्जन स्थळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती,परंतु नदीतील पाणी नैसर्गिकरीत्या कमी झाल्याने विसर्जनास अडथळा निर्माण झाला होता.नदीवर बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडविण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता, परंतु त्यास यश प्राप्त झाले नव्हते.यावर उपाययोजना म्हणुन विसर्जन स्थळी मोठ्या मूर्तींसाठी विसर्जन कुंड तयार करण्यात येत आहे.

  • Chandrapur Journalist : श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

    Chandrapur Journalist : श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी प्रवेशिका आमंत्रित

    Chandrapur journalist श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी प्रतिष्ठित अशा विविध स्पर्धा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरुची वृत्तकथा वृत्तछायाचित्र, दुरचित्रवाणीसाठी उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी २० जुलै २०२४ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. तसेच यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या स्पर्धकांनाही स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे हे विशेष.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात 15 किलो प्लॅस्टिक जप्त, उपद्रव शोध पथकाची कारवाई

    ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी परिणामकारक वृत्त, वार्तापत्र, वृत्तमालीका ग्राह्य धरण्यात येतील. स्पर्धेसाठी प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोख पुरस्कार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
    शुभवार्ता पुरस्कार केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल, तसेच मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार देण्यात येणार असून, रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

     

    Chandrapur journalist ही स्पर्धा चंद्रपूर जिल्हयातील शहरी व ग्रामीण पत्रकारांसाठी खुली राहील. हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. उत्कृष्ठ वृत्तांकन (टी. व्ही.) पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीवर चंद्रपूर जिल्हयातील प्रसारीत बातमी ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धेसाठी आपल्या बातमीचा पेनड्राईव आपल्या अर्जासह सादर कराव्यात स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिके बाबत ‘उत्कृष्ट वृतांकन पुरस्कार’ (टेलोव्हीजन) असा ठळक उल्लेख करावा.

    तसेच पत्रकार संघाने डिजिटल मीडिया (पोर्टल)अंतर्गत सुरू केला आहे. त्यात शोध पत्रकारिता साठी पुरस्कार देण्यात येणार आहे. रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/chandrapur-police-minor-boy-missing/

    Chandrapur journalist पुरस्कारासाठी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरीत नसावे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मूळ प्रतीसह चार छायांकित प्रतित असावे. मूळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोबत आपली, बातमी कोणत्या स्पर्धेसाठी आहे.

     

    याचा स्पष्ट उल्लेख तपशीलवार करावा. सर्व प्रवेशिका २० जुलै २०२४ पर्यंत स्पर्धा संयोजक, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघ जूना वरोरा नाका, चंद्रपूर या पत्त्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक प्रविण बतकी (९८८१७५०६५५) पंकज मोहरील, सुनील बोकडे, सुरेश वर्मा,  प्रकाश देवगडे , कमलेश सातपुते, गौरव पराते यांनी केले आहे.

  • Chandrapur mahanagar palika : चंद्रपुरात 15 किलो खर्रा पन्नी जप्त

    Chandrapur mahanagar palika : चंद्रपुरात 15 किलो खर्रा पन्नी जप्त

    Chandrapur mahanagar palika चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे श्याम नगर परिसरातील उगेमुगे पान सेंटर या दुकानावर धाड टाकुन १५ किलो खर्रा पन्नी प्लास्टीक जप्त करण्यात आले असुन ३ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर शहरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता

    सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ.अमोल शेळके यांच्या उपस्थितीत उपद्रव शोध पथकाद्वारे करण्यात असुन सदर दुकानदारास पुन्हा प्लास्टीक आढळल्यास पोलीस तक्रार करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत ” उपद्रव शोध पथक ” ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व प्रतिष्ठाने, दुकानांवर कारवाई सुरु आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये तब्बल 2 वेळा गोळीबार

    Chandrapur mahanagar palika  एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

    Chandrapur mahanagar palika चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिलेले असुन प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमाअंतर्गत मनपाच्या तीनही झोननिहाय कारवाईत संयुक्तपणे मोहीम राबवून शहरातील व्यवसाय प्रतिष्ठाने, दुकाने यांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

  • Chandrapur Police : चंद्रपुरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता

    Chandrapur Police : चंद्रपुरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता

    Chandrapur news चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट येथे राहणारा 14 वर्षीय प्रियांशु बंडू देठे हा मुलगा 29 जून रोजी न सांगता घरून निघून गेला, प्रियांशु ची आई-वडिलांनी 3 दिवस वाट बघितली मात्र तो आला नाही.

    महत्त्वाचे: रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये पुन्हा गोळीबार, चंद्रपूर हादरले

    नातेवाईक, मुलाचे मित्र यांच्याकडे विचारणा केली मात्र प्रियांशु चा शोध लागला नाही, तसेच रेल्वे स्टेशन, बस स्टॉप याठिकाणी सुद्धा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळून आला नाही, प्रियांशु ची आई विशाखा देठे यांनी याबाबत शहर पोलिसात तक्रार दिली की त्यांच्या मुलाला कुणीतरी फुस लावून पळविले आहे.
    पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे, परंतु अद्यापही प्रियांशु चा पत्ता लागला नाही.

     

    Chandrapur news प्रियांशु चे वर्णन – उंची 4 फूट 5 इंच, सडपातळ बांधा, वर्ण सावळा, केस काळे, दोन्ही ओठावर पांढरे डाग, मराठी हिंदी भाषा बोलता येते, अंगात हाफ पॅन्ट निळ्या रंगाचा बरमुडा, गोल गळ्याचा हाफ टी-शर्ट, आकाशी रंगांची पायात साधी चप्पल.

    अवश्य वाचा : औषध विक्रेत्याने नैराश्यातून केली आत्महत्या

    चंद्रपूर शहर पोलिसांनी याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे की सदर वर्णनाचा मुलगा कुणालाही आढळल्यास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके – 9767103829 व पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर 9527347443 वर सम्पर्क करावे.

  • Shootout at chandrapur : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, 3 वर्षांपूर्वीच्या गोळीबाराची पुनरावृत्ती

    Shootout at chandrapur : चंद्रपुरात पुन्हा गोळीबार, 3 वर्षांपूर्वीच्या गोळीबाराची पुनरावृत्ती

    Shootout at chandrapur चंद्रपुरात भर दुपारी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांने रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार केला. यामध्ये अमन अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली आहे, त्यांना उपचारासाठी पोलिसांनी नागपूर येथे रेफर केले आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/chandrapur-railway-police-action-in-city/

    4 जुलै रोजी गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दोघांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर गोळी झाडली, सदर गोळी अन्देवार यांच्या पाठीला लागली, अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती पुढे येत आहे.

     

    Shootout at chandrapur 8 ऑगस्ट 2020 मध्ये अवैध दारु व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर शहरात सूरज बहुरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, पोलिसांनी त्या प्रकरणात अमन अन्देवार व आकाश अन्देवार याला अटक केली होती.

    तर सेतू केंद्र रद्द करणार, लाडकी बहीण योजनेवरून देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

    वर्ष 2021 मध्ये आकाश अन्देवार याची जामिनावर सुटका झाली होती, त्यानंतर 12 जुलै 2021 मध्ये आकाश अन्देवार यांच्यावर रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये बहुरिया समर्थकांनी गोळीबार केला. आकाश ला त्यावेळी 3 गोळ्या लागल्या तो सुदैवाने तो बचावला होता मात्र त्यानंतर पुन्हा असा हल्ला अन्देवार बंधूंवर होऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

     

    Shootout at chandrapur आज 4 जुलै ला दुपारी अमन अन्देवार हे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधील मनसे जनसंपर्क कार्यालयात येत होते, कार्यालयात जाण्यासाठी अंदेवार लिफ्ट जवळ आले, ते मोबाईल वर बोलत असताना अचानक 2 युवक रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये आले त्याठिकाणी एक युवक हा वाहनाजवळ थांबला होता तर दुसरा युवक बॅग घेऊन अंदेवार यांच्या मागून आला त्याने बंदूक काढत अन्देवार यांच्यावर गोळी झाडली. गोळी अंदेवार यांच्या पाठीला लागली, अंदेवार तिथून पळाले व हातात दांडू घेत पुन्हा जखमी अवस्थेत बाहेर येत मारेकऱ्याच्या मागावर गेले तोपर्यंत मारेकरी तिथून पळाला होता.

     

    सदर प्राणघातक हल्ला हा जुन्या वादातून झाला की नव्या कोणत्या वादातून याबाबत पोलीस तपास करीत आहे, जर हा हल्ला जुन्या वादातून झाला असेल तर भविष्यात पुन्हा अशा घटना नक्की घडणार.

  • Chandrapur Railway Police : एका चुकीने ट्रेन 1 तास उशिरा, चंद्रपुरात रेल्वे पोलिसांची दोघांवर कारवाई

    Chandrapur Railway Police : एका चुकीने ट्रेन 1 तास उशिरा, चंद्रपुरात रेल्वे पोलिसांची दोघांवर कारवाई

    Chandrapur railway police 3 जुलै ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास मालगाडी पुढे 4 म्हैस आल्याने त्यांचा मृत्यू झाला इतकेच नाही तर काही म्हैस रेल्वे इंजिन मध्ये फसल्याने मालगाडी ही तब्बल 1 तास उशिरा गेली. त्यानंतर नागपूर रेल्वे पोलीस विभागाने रेल्वे रुळाजवळ पालतु जनावरांना चरायला आणणाऱ्या गुराखी व मालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

    महत्त्वाचे : माझी लाडकी बहीण योजनेच्या नावावर पैसे उकळले तर सेतू केंद्र कायम रद्द करणार

    त्या अनुषंगाने चंद्रपूर रेल्वे पोलीस निरीक्षक के.एन. रॉय यांच्या निर्देशावरून याविरुद्ध कारवाई अभियान मोहीम राबविण्यात आली, ASI सचिन नागपूरे व ASI एन. पी.वासनिक सदर प्रकरणाचा तपास करीत गुराखी इलियास खान पठाण रा.पडोली व जनावर मालक घुटकाला तलाव निवासी नसिरुद्दीन काजी यांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध रेल्वे अधिनियम कलम 154, 174 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

     

    Chandrapur railway police सध्या स्थितीत नागपूर मंडळातील चंद्रपूर ते हिंगणघाट, घुग्गुस, वणी एरिया मार्गावरील रेल्वे पटरी जवळ जनावरांना चारण्यासाठी आलेल्या गुराख्यांवर आता कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे, त्याकरिता कुणीही रेल्वे पटरी जवळ जनावरांना चरायला घेऊन जाऊ नये असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/female-feticide-act-chandrapur-municipal-corporation-reward-scheme/

    वरीष्ठ अधिकारी रेल्वे पोलीस मनोज कुमार यांच्या आदेशावर पोलीस निरीक्षक यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहे, यानंतर सूचनांचे पालन न झाल्यास गुराखी व मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा रेल्वे पोलिसांनी दिला आहे.

  • Female feticide act : चंद्रपूर मनपा देणार 1 लाख व 25 हजारांचे बक्षिस, करावे लागणारं हे काम

    Female feticide act : चंद्रपूर मनपा देणार 1 लाख व 25 हजारांचे बक्षिस, करावे लागणारं हे काम

    Female feticide act गर्भपात व सोनोग्राफी केंद्रांवर अवैधरित्या गर्भलिंगपरिक्षण करणे व स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्यान्वये गुन्हा असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस १ लाख रुपयांचे बक्षीस चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर महानगरपालिका देणार 5 हजारांचे बक्षिस वाचा सविस्तर

    गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायदा २००३ कायद्यान्वये गरोदरपणापूर्वी लिंग निवड करणे किंवा गरोदरपणात गर्भलिंग जाणून घेणे गुन्हा आहे. ज्या दांपत्यास एक किंवा दोन मुली आहेत व मुलगा नाही, त्या दांपत्याचा गरोदरपणी गर्भलिंग जाणून घेण्याकडे कल असतो व मुलीचा गर्भ असल्यास गर्भपात केला जातो, यास कायद्याने बंदी आहे.

    Female feticide act कोणत्याही जोडप्यास गर्भलिंग चाचणीसाठी प्रवृत्त करु नये किंवा गर्भवती महिलेने गर्भलिंग निदान करुन घेऊ नये. गर्भलिंग निवडीशी निगडीत सेवा पुरविणाऱ्या डॉक्टर, दवाखाना किंवा प्रयोगशाळा यांच्या विषयी माहिती मिळाली, तर त्या विषयीच्या पुराव्यांसहित मनपा आरोग्य विभागास संपर्क करून तक्रार दाखल करावी. तक्रारकर्त्यास १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची नियमात तरतूद असुन अशी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.

    महत्त्वाचे : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या मागणीला यश

    Female feticide act गर्भलिंग जाणून घेणाऱ्या व्यक्तीस दंड व कारावासाची शिक्षा होऊ शकते. गर्भलिंग कोणत्याही पध्दतीने सांगणाऱ्या संबंधित डॉक्टरवर या गुन्ह्याचा आरोप सिध्द झाल्यास डॉक्टरला कैद व दंड तसेच वैद्यकिय परीषदेमधील नोंदणी 5 वर्षापर्यत रद्द करण्याची तरतुद आहे. गर्भलिंग सांगणे किंवा जाणून घेणे हा दखलपात्र गुन्हा आहे. तसेच हा अजामिनपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात आपसात संमतीने खटला मागे घेता येत नाही.

    खबरी बक्षीस योजना : गर्भधारणा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध अधिनियम २००३ चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तशी माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. यासंदर्भात संबंधित डॉक्टरविरोधात न्यायालयात दावा दाखल झाल्यानंतरच बक्षिसाची रक्कम दिली जाते

    स्टिंग ऑपरेशनसाठी बक्षिस योजना :

    स्टिंग ऑपरेशनसाठी तयार होणाऱ्या गर्भवती महिलेस चंद्रपूर मनपातर्फे न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर २५ हजार रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.

    येथे नोंदवा तक्रार –
    १. टोल फ्री क्र. १०४
    २. हेल्पलाईन क्र. १८००२३३४४७५
    ३. www.amchimulgimaha.in
    ४. मनपा टोल फ्री क्रमांक १८००२५७४०१०
    ५. व्हाट्सअप क्रमांक ८५३०००६०६३

  • Maharashtra Plastics and Thermocol Notification : गोपनीय माहिती द्या आणि मिळवा 5 हजार – चंद्रपूर महानगरपालिका

    Maharashtra Plastics and Thermocol Notification : गोपनीय माहिती द्या आणि मिळवा 5 हजार – चंद्रपूर महानगरपालिका

    Maharashtra Plastics and Thermocol Notification चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपायुक्त मंगेश खवले यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीला यश…वाचा सविस्तर

    प्लास्टीक बंदीसाठी मनपा मार्फत " उपद्रव शोध पथक " ( NDS ) तयार करण्यात आले असुन सदर पथकाद्वारे पालिका क्षेत्रातील सर्व दुकानदार, हॉकर्स, हातठेलेधारक, फेरीवाले, सर्व व्यावसायिक,वितरक,हार फुले विक्रेते यांच्याकडील प्लास्टिकचे आवरण असलेले बुके व खर्रा विक्री केंद्रांवरील पन्नी यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान प्लास्टीक पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जाणार आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/new-indian-law-public-awareness-of-chandrapur-police-regarding-the-new-law/

    Maharashtra Plastics and Thermocol Notification  बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या की आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत आहे. प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

    बैठकीस सहायक आयुक्त नरेंद्र बोभाटे,सचिन माकोडे,संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके, उपद्रव शोध पथक कर्मचारी उपस्थीत होते.

  • Agricultural pump connection : पोलीस अधिक्षक साहेब या चोरांना आवरा – पालकमंत्री मुनगंटीवार

    Agricultural pump connection : पोलीस अधिक्षक साहेब या चोरांना आवरा – पालकमंत्री मुनगंटीवार

    Agricultural pump connection मूल तालुक्यामध्ये कृषीपंप जोडणीसाठी असलेल्या विद्युत तारा चोरी होण्याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याची तातडीने दखल घेऊन तारा चोरी करणाऱ्यांना ताब्यात घ्यावे आणि त्यांच्या कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस विभागाला दिले आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना पत्र लिहिले आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/07/education-system-in-maharashtra-ncp-sharad-pawar/

     मूल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या आठ महिन्यांपासून कृषीपंप वाहिनीच्या लघुदाब व उच्चदाब वाहिनीचे तार वारंवार चोरी होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहिनीचे खांब खाली पडत असून महावितरण कंपनीचे तर नुकसान होतच आहे, शिवाय शेतकरीसुध्दा कृषीपंप जोडणीपासून वंचित राहात आहे. महावितरणद्वारे नवीन वाहिनी पुन्हा उभी करण्यास फार कालावधी लागत असल्याने सिंचनाअभावी शेतक-यांचे नुकसान होत आहे, याकडे श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले आहे.

    अवश्य वाचा : ही तर महिलांचा छळ करणारी योजना – डॉ.अभिलाषा गावतुरे

    Agricultural pump connection विद्युत तारा चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे पोलिस विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन चोरांवर कठोर कारवाई करावी व चोरांचा बंदोबस्त करावा, असे निर्देश पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.