Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Verification of voters list : चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

    Verification of voters list : चंद्रपूर जिल्हा प्रशासन लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

    Verification of voters list आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याकरीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/international-yoga-day-activities-mla-kishor-jorgewar-big-announcement/

    त्यानुषंगाने सदर कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)  25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार आहे. जे मतदार 18 वर्षाचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरीत झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटया दूर करण्यात येणार आहे.

     

    Verification of voters list विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात कांग्रेसने महायुती सरकारवर फेकले चिखल

    विशेष शिबिराच्या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रावर  उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक : चंद्रपूर जिल्हयातील मतदार यादीच्या शुध्दीकरणाचे काम आगामी विधानसभा, निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी.यांनी शुक्रवारी (दि. 21) राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. तसेच जिल्हयातील सर्व मतदारांना आणि सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केले आहे.

     

    Verification of voters list ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नसेल, अशा मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

  • international yoga day activities : आमदार किशोर जोरगेवार यांची मोठी घोषणा

    international yoga day activities : आमदार किशोर जोरगेवार यांची मोठी घोषणा

    international yoga day activities योग हा केवळ व्यायाम किंवा तंदुरुस्तीचा कार्यक्रम नाही, तर तो शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील समतोल साधण्याचे एक माध्यम असून योग ही आपल्या प्राचीन संस्कृतीची अत्यंत मौल्यवान देणगी आहे. ही टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. योगचे फायदे आणि महत्त्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/congress-news-maharashtra-chandrapur-mud-movement/

    योगासाठी येणाऱ्यांना सोयी-सुविधायुक्त हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले पाहिजे. यासाठी आम्ही शहरात 2 योगा भवन आणि 10 योगा शेड तयार करणार आहोत. याकरिता 2 कोटी 20 लक्ष  रुपये देणार असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय योग दिनी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

     

    international yoga day activities आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर महानगरपालिका आणि योग नृत्य परिवार ट्रस्टच्या वतीने गांधी चौक येथील महानगरपालिकेच्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मनपा आयुक्त विपिन पालिवार, उपायुक्त मंगेश खवले, रोषण चड्डा, गोपाल मुंधडा, शिवम मुंधडा, राधिका मुंधडा, रुपेश राठी, सुरेश घोडगे, किशोरी इरुडकर, पारुल भारतध्वाज आदींची उपस्थिती होती. तर पतंजली योग समिती तथा ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ येथे आयोजित कार्यक्रमाला विजय चंदावार, अशोक संगीडवार, महादेव पिंपळकर, शिवशंकर घुगुल, प्रभाकर गट्टूवार, संभाशिव आगलावे, रवी इंगोले, रमेश ददगाल आदींची उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी खासदार प्रतिभा धानोरकर मैदानात

    परिवर्तन योगा फाउंडेशनच्या वतीने तुकुम येथे योग दिन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला डॉ. अशोक वासलवार, डॉ. अमित ढवस, डॉ. विनोद मुसळे, माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, सुरेश पचारे, शिला चौव्हाण, पूरशोत्तम सहारे, रामपाल सिंग, रवि गुरनुले, शितल गुरनुले, शशिकांत मस्के, नितेश मल्लेलवार, नाना गरमडे, नरेंद्र निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, योगच्या विविध आसनांमुळे शरीरातील प्रत्येक अवयवांची तंदुरुस्ती टिकून राहते. हे आसन शरीराला लवचिक आणि मजबूत बनवतात. तसेच, नियमित योगासने केल्यामुळे हृदय, पचन, श्वसन आणि स्नायू यांचे आरोग्य सुधारते. योगाचे ध्यान आणि प्राणायाम हे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मानसिक तणाव, चिंता कमी होते. प्राणायामामुळे श्वसन तंत्र सुधारते, ज्यामुळे मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. योगाच्या माध्यमातून आत्मस्वरूपाची ओळख होते. योग आत्मचिंतन आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी मदत करतो. योगाचे अनुयायी शांती, संतोष आणि आनंदाचा अनुभव घेतात, असेही ते यावेळी म्हणाले.
    योग समाजातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणतो. योगाच्या माध्यमातून आपल्याला एकमेकांशी जोडले जाते. त्यामुळे समाजातील एकता आणि बंधुभाव वाढतो. चंद्रपूरात विविध योग समितीच्या वतीने उत्तम काम केले जात आहे.

     

    international yoga day activities हे एक ईश्वरीय कार्य आपल्या हातून घडत आहे. योगाचे लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून देणे हाच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागचा मूळ उद्देश असून त्याची पूर्तता आपल्या माध्यमातून  होत असल्याचा आनंद असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. माता महाकाली महोत्सवातही योग ग्रुपचा सक्रीय सहभाग राहिला आहे. यंदा ही आपल्या सहकार्याची अपेक्षा असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.  यावेळी योगाचे विविध आसनांचे प्रात्यक्षिक, ध्यान आणि प्राणायामाचे तंत्र यांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Congress news maharashtra : महायुती सरकारवर कांग्रेसने चंद्रपुरात फेकले चिखल

    Congress news maharashtra : महायुती सरकारवर कांग्रेसने चंद्रपुरात फेकले चिखल

    Congress news maharashtra केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. नीट परीक्षेतील घोळ, नेटचा पेपर फुट प्रकरण तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या शेतकरी, गोरगरीब विरोधी धोरणाच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चिखल फासण्यात आले.
    यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी,  शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, सुभाषसिंग गौर, के. के. सिंग, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मुलचंदानी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन अनुसूचित जाती, महिला आघाडी, अल्पसंख्यांक आघाडी युवक काँग्रेस, कामगार आघाडी यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
     
    Congress news maharashtra यावेळी बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. राज्यातील मोठे उद्योग गुजरातला पाठवले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही औद्योगिक विकास पाहिजेतसा झालेले नाही. उलट बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप केला. 
     
    आमदार सुभाष धोटे यांनीही शासनावर कडाडून टीका केली. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत. या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागले. निट परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्याथ्र्याचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे, असेही धोटे म्हणाले. 
     
    Congress news maharashtra राज्यातील पोलीस भरती चिखलात सुरु आहे. यामुळे उमेदवारांचे नुकसान होत आहे. सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत सरकार चालढकल करत असल्याने बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. गुन्हेगारी मध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, मुलींचे दिवसाढवळया रस्त्यावर खून पाडले जात आहेत.
    राज्यातील शेतकरी भयंकर संकटात आहेत पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा,कापूस सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार एमएसपी देत नाही, असा आरोप यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.
  • Railway Over Bridge : 3 महिन्यात बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा अन्यथा – खासदार प्रतिभा धानोरकर यांचा इशारा

    Railway Over Bridge : 3 महिन्यात बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करा अन्यथा – खासदार प्रतिभा धानोरकर यांचा इशारा

    Railway over bridge चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा ईशारा खासदार धानोरकर यांनी  अधिकाऱ्यांना दिला. बाबुपेठ उड्डाण पुलाच्या संदर्भाने आज खासदार धानोरकर यांनी अधिकाऱ्यांसह या प्रलंबित उड्डाण पुलाला भेट दिली.

    अवश्य वाचा : आमदाराने घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

    खासदार धानोरकर यांनी जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठकांचे सत्र सुरु केले असून 20 जुन रोजी निर्माणाधिन असलेल्या व ८ वर्षांपासून रखडलेल्या बाबुपेठ उड्डाण पुलाची पाहणी केली. यावेळी उपस्थित  अधिकाऱ्यांना तीन महिन्यांच्या आत उड्डाण पुल जनतेच्या सेवेत सुरु न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा ईशारा उपस्थित  अधिकाऱ्यांना दिला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    Railway over bridge सदर पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरु असून या पुलाच्या अभावी अनेक नागरीकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलाची प्रतिक्षा समग्र बाबुपेठ वासीयांना असून अधिकारी मात्र या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यासंदर्भात खासदार धानोरकर यांच्या कडे तक्रारी प्राप्त झाल्या नंतर खासदार धानोरकर यांनी तातडीने पाहणी करुन उर्वरीत कामाचा आढावा घेतला.

     

    यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता श्री. टांगले, महिला कॉग्रेस च्या शहर अध्यक्ष चंदाताई वैरागडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक संतोष लहामगे, माजी नगर सेवक पितांबर कश्यप, सोहेल रजा, प्रशांत भारती यांसह बाबुपेठ मधील अनेक नागरीकांची उपस्थिती होती.

  • Babupeth railway over bridge : खासदार मॅडम आमच्या समस्यांकडे लक्ष द्या – राजू कुडे

    Babupeth railway over bridge : खासदार मॅडम आमच्या समस्यांकडे लक्ष द्या – राजू कुडे

    Babupeth railway over bridge चंद्रपूर : बहुप्रतिक्षित बाबूपेठ येथील रखडलेल्या रेल्वे ओवर ब्रिजच्या कामाची पाहणी करण्याकरिता आलेल्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टी तर्फे बाबुपेठ मधिल विविध समस्याचे निवारण करण्याकरिता निवेदन दिले.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/chandrapur-congress-throw-mud-movement/

    ज्यामध्ये मुख्यता :- परिसरातील ऐतिहासिक असणाऱ्या पुरातन विहिरीला सुरक्षा जाळी बसवणे.

    बाबूपेठ मधून बल्लारशाकडे जाणाऱ्या विद्युत वाहक ताराना अंडर ग्राउंड करणे. सिद्धार्थ नगर या ठिकाणी मनपाची जीर्ण अवस्थेत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा इमारतीचे नवीन बांधकाम काम करणे.

     

    Babupeth railway over bridge कासव गतीने सुरु असलेल्या बाबुपेठ ब्रिज चा कामासंदर्भात ठेकेदारावर कामात विलंब करण्याबाबत कायदेशीर कारवाई करणे.

    अवश्य वाचा : एकाच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4 लाचखोरांना केली अटक

    इत्यादी मागण्याना घेऊन निवेदन देण्यात आले.
    यावेळी युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, संघटन मंत्री मनीष राऊत, जिल्हा सचिव आदित्य नंदनवार, प्रशांत रामटेके, सुशांत धकाते, अक्षय गोवर्धन, हरिदासजी पिंगे, दुर्गे भाऊ इत्यादी उपस्थित होते.

  • Cleanliness campaign : शहरात स्वच्छता मोहीम राबवा – राहुल पावडे

    Cleanliness campaign : शहरात स्वच्छता मोहीम राबवा – राहुल पावडे

    Cleanliness campaign भाजपाच्या सर्व माजी नगरसेवक व नगरसेविका यांना वारंवार स्वच्छतेच्या बाबतीत प्रभागातील तक्रारी प्राप्त होत आहेत.ही बाब आरोग्यासाठी अपायकारक आहे.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/chandrapur-congress-throw-mud-movement/

    म्हणून,महानगरातील विविध प्रभागात पावसाआधी जलदगतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी,महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे व भाजपा माजी नगरसेवक व नगरसेविका शिष्ठमंडळाने यांनी आयक्तांकडे केली आहे.

     

    यावेळी माजी नगरसेविका शीला चव्हाण,छबु वैरागडे, राहुल घोटेकर, वंदना तिखे, अजय सरकार,वनिता डुकरे,शीतल आत्राम,राजेंद्र खांडेकर,सचिन कोतपल्लीवार यांची उपस्थिती होती.

    अवश्य वाचा : चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी 4 लाचखोरांना अटक

    Cleanliness campaign पावडे म्हणाले,पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी सारख्या परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होण्यापासुन बचावाकरीता महानगरात साफ सफाई होणे गरजेचे आहे. तसेच पावसाळ्यात साथीच्या रोगांनी मोठ्या प्रमाणात यापूर्वी अनेकदा थैमान घातले आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणुन मनपा क्षेत्रात स्वच्छता व डासांच्या बंदोबस्ताकरीता किटकनाशक फवारणी व नागरीकांच्या आरोग्य तथा अन्य सुविधांसाठी आपल्या स्तरावरून विविध उपाययोजना करावयाची आवश्यकता आहे.

     

    तेव्हा वेळे आधी शहरात बऱ्याच ठिकाणी छोट्या नाल्यांची साफ सफाई झालेली नाही. अशा तक्रारी सुध्दा प्राप्त होत आहे. सध्याच्या तुलनेत सफाईच्या बाबतीत यंत्रणेने कार्य करण्याकरिता सफाई कामगार वाढवण्याचे नितांत गरज आहे, त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत सफाई कामगार वाढवून नाल्यांची तातडीने सफाई करणे मोठ्या नाल्यावर सुद्धा सफाई कामगार वाढविले पाहिजे त्या ठिकाणी सफाई कामगाराच्या माध्यमातून साफसफाई करणे याकडे सुद्धा मनपा प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशा सूचना पावडे यांनी केल्या.

     

    Cleanliness campaign भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारी व सूचना लक्षात घेत , यावर योग्य त्या उपाय योजना करू असे आयुक्तांनी भारतीय जनता पार्टी माजी नगरसेवक व नगरसेविकांच्या शिष्टमंडळांला दिले.

  • Chandrapur congress : चंद्रपुरात कांग्रेस फेकणार चिखल

    Chandrapur congress : चंद्रपुरात कांग्रेस फेकणार चिखल

    Chandrapur congress चंद्रपूर : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक अन्यायकारक निर्णय घेतले आहेत. यामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे.
    त्यामुळे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी चंद्रपूर शहरातील गांधीचे उप येथे शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता  सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेस चिखल लावून, चिखल फेको आंदोलन करण्यात येणार आहे. 
    Chandrapur congress प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार आयोजित या आंदोलनाला खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांची उपस्थिती राहणार आहे.
    तरी, या आंदोलनाला काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.
  • Teacher MLA : आमदाराने घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

    Teacher MLA : आमदाराने घेतला अधिकाऱ्यांचा क्लास

    Teacher MLA नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यात शिक्षकांच्या अनेक समस्‍या प्रलंबित असल्‍याने शिक्षकांनी समस्‍या निवारण सभेत तीव्र रोष व्‍यक्‍त केला.

    https://ads.timesdiginews.com/2024/06/free-school-uniform-scheme-maharashtra-government/

    शिक्षकांची समस्‍या सोडविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर संताप व्‍यक्‍त करीत नागपूर विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांनी प्रलंबित असलेल्‍या समस्‍या तात्‍काळ निकाली न काढल्‍यास सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) कार्यालयाची चौकशी करा, असे निर्देश नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना बैठकीत दिले.

     

    Teacher MLA समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा' या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी (ता. १४) रोजी नागपूर विभागातील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित समस्‍या निवारणार्थ समस्‍या निवारण सभा शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्यासोबत धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडली. या सभेस विभागातील सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), वेतन पथक अधिक्षक (प्राथ./माध्य.), लेखाधिकारी (शिक्षण) व शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सर्व अधिकारी उपस्‍थित होते. विशेष म्‍हणजे ही समस्‍या निवारण सभा साडेसहा तास चालली.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी 4 लाचखोरांना अटक

    Teacher MLA सभेच्या सुरुवातीलाच शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी लोकप्रतिनिधींच्या सभेला उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘क्‍लास’ घेतला. भंडारा येथील वेतन पथक कार्यालयातील अनियमिततेबाबत चर्चा करण्यात आली. अधीक्षक यांनी केलेल्‍या अनियमिततेची झालेल्‍या चौकशीत दोषी आढळलेल्‍या अधीक्षकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आमदार अडबाले यांनी दिले. संचालक (प्राथ./माध्य.) पूणे यांचे १ जुलै पासून शाळा सुरु करण्याबाबतचे पत्र असताना चंद्रपूर येथील शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचे पत्र काढले. सदर पत्र रद्द करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांना दिल्‍या.

    महत्त्वाचे : पोलीस भरतीसाठी चंद्रपुरात आलेल्या उमेदवारांसाठी राहण्याची व्यवस्था

    नगरपरिषद शालेय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी पावत्‍या मिळत नसल्‍याने समस्‍या निवारण सभेचा संदर्भ देऊन शासनास पत्र देण्यात यावे. एनपीएस व जीपीएफ खाते नसलेल्‍या शालेय कर्मचाऱ्यांना सहाव्‍या व सातव्‍या वेतन आयोगाचे थकीत हप्‍ते रोखीने देण्यात यावे, याबाबत चर्चा करण्यात आली. सदर कर्मचाऱ्यांबाबत विभागातील शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.) यांची बैठक घेऊन खाते काढण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश शिक्षण उपसंचालक यांना आमदार अडबाले यांनी दिले.

    Teacher MLA सन २०२१-२२ व २०२२-२३ च्‍या जीपीएफ व एनपीएस पावत्‍याबाबत जिल्‍हानिहाय आढावा घेण्यात आला. ऑनलाईन पावत्‍या दरमहा मिळत नसल्‍याने शिक्षकांत नाराजी आहे. गडचिरोली जिल्ह्यात ऑफलाईन पावत्‍या मिळत आहे. तेव्‍हा विभागातील सर्व पे-युनिट अधीक्षकांनी पुढील सहा महिन्‍यांत ऑफलाईन पावत्‍या देण्याबाबत कार्यवाही करावी, असे सूचना आमदार अडबाले यांनी दिल्‍या.

    शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या १४ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार मयत झालेल्‍या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना पेंशन मिळण्याबाबत सर्व शिक्षणाधिकारी यांनी कार्यवाही करावी. अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ उन्नयन करण्याबाबत सर्व जिल्ह्याने कार्यवाही करण्याबाबत शिक्षण उपसंचालक यांनी पत्र निर्गमित करावे. श्रीमती कल्‍पना चव्हाण (तत्‍कालिन शिक्षणाधिकारी (माध्य.), जि.प. चंद्रपूर) यांच्या अनियमिततेबाबत झालेल्‍या चौकशीवर पुढील कार्यवाही करावी.

     

    चिमूर एज्‍यु. सोसा. चिमूर अंतर्गत शाळेतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदोन्नतीबाबत सेवाज्‍येष्ठ शिक्षकांची बैठक घेऊन तात्‍काळ पदोन्नती देण्यात याव्या यासह अन्‍य विषयांवर सविस्‍तर चर्चा करून समस्‍या निकाली काढण्याच्या सूचना आमदार अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक, सर्व शिक्षणाधिकारी (प्राथ./माध्य.), वेतन पथक अधिक्षक (प्राथ./माध्य.), लेखाधिकारी (शिक्षण) यांना दिल्‍या. शिक्षकांच्या समस्‍यांवर जे अधिकारी हयगय करतील तसेच सेवा हमी कायद्याचे उल्‍लंघन करील असतील, त्‍यांच्या कार्यालयाची तात्‍काळ चौकशी करा, अश्‍या सूचनाही त्‍यांनी दिल्‍या.

    Teacher MLA यानंतर नागपूर विभागाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या समस्‍यांवर बैठक पार पडली. या सभेत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्‍या सामूहिक व वैयक्‍तिक समस्‍यांसह चर्चा करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्‍या तात्‍काळ सोडवा, असे निर्देश आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण उपसंचालक यांना दिले.

    यावेळी माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, शिक्षण उपसंचालक उल्‍हास नरड, रवींद्र पाटील, श्री. बोदाडकर, शेखर पाटील, विज्‍युक्टा महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्‍हार, जगदीश जुनगरी, प्रा. भाऊराव गोरे, डॉ. गजानन धांडे, डॉ. अभिजित पोटके, विमाशि संघाचे नागपूर शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे, जिल्‍हा अध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, जिल्‍हा कार्यवाह संजय वारकर, वर्धा जिल्‍हा अध्यक्ष विष्णू इटनकर, जिल्‍हा कार्यवाह महेंद्र सालंकार, चंद्रपूर जिल्‍हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, भंडारा जिल्‍हा अध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्‍हा कार्यवाह राजेश धुर्वे, गडचिरोली जिल्‍हा अध्यक्ष रवींद्र नैताम, जिल्‍हा कार्यवाह अजय लोंढे, गोंदिया जिल्‍हा अध्यक्ष ओमप्रकाश गुप्‍ता व मोठ्या संख्येने नागपूर विभागातील वि.मा.शि. संघ, विज्‍युक्टाचे पदाधिकारी, समस्‍याग्रस्‍त शिक्षक उपस्थित होते.

  • Chandrapur police news : चंद्रपुरात पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

    Chandrapur police news : चंद्रपुरात पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना

    Chandrapur police news 19 जूनपासून चंद्रपूर सहित राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, ऐन पावसाळ्यात सुरू झालेल्या या पोलीस भरती मध्ये उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे.

    अवश्य वाचा : एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात 4 लाचखोरांना अटक

    पोलीस भरती साठी येणाऱ्या उमेदवारांकरीता निवासस्थानाबाबत महत्वूपर्ण सुचना

    Chandrapur police news चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया ही दिनांक 19/06/2024 जिल्हा क्रिडा संकुल, चंद्रपूर येथे सुरु झाली आहे. पावसाळा सुरु असल्याने उमेदवारांकरीता खालील ठिकाणी राहण्याची सोय करण्यात आली आहे.

    1) पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राउन्ड जवळ, तुकूम चंद्रपूर
    2) पोलीस सभागृह, तुकूम रोड, चंद्रपूर
    3) पोलीस ड्रिलशेड, पोलीस मुख्यालय चंद्रपूर
    तरी, पोलीस भरती करीता येणारे उमेदवार यांनी पावसाळयात इतरत्र न भटकता वरील नमुद पोलीस दलाकडुन उपलब्ध केलेल्या सोयीच्या ठिकाणी रहावेत.

    राजकीय बातमी : कांग्रेस खासदार निवडून येताच खासदार धानोरकर यांच्या भावाने सुरू केली दादागिरी

    Chandrapur police news चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी हजारो विद्यार्थी चंद्रपुरात दाखल होणार आहे, सदर प्रक्रिया ही महिनाभर चालणार असून यासाठी प्रशासनाने व्यवस्था केली आहे.

  • Today Acb trap news : चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचा कारवाईचा चौकार

    Today Acb trap news : चंद्रपूर जिल्ह्यात लाचलुचपत विभागाचा कारवाईचा चौकार

    Today acb trap news चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 19 जूनला कारवाईचा चौकार मारीत, दोन वेगवेगळ्या कारवाईत 4 जणांना अटक केली.

    पहिली कारवाई 
    वैद्यकीय अहवाल पाहिजे असेल तर 10 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करणारे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ सहायक व वरिष्ठ लिपिक यांना 10 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे 58 वर्षीय वरिष्ठ सहायक अशोक बाबुराव बगुलकर व वरिष्ठ लिपिक 36 वर्षीय दीपक केशव सज्जनवार यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.

    अवश्य वाचा : खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या भावाची दादागिरी

    Today acb trap news तक्रारदार हे वणी तालुक्यातील वेडाबाई जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी असून ते एसटी महामंडळ चंद्रपूर येथे वाहक या पदावर कार्यरत आहे.
    वर्ष 2022 मध्ये बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे तक्रारदार यांचा अपघात झाल्याने त्यांच्या पायात रॉड टाकण्यात आला, काही दिवसानंतर पायातील रॉड चे स्क्रू निघाल्याने त्यांच्या पायात पायजन झाले, त्यावेळी नागपूर येथील एम्स मध्ये त्यांचा उपचार करण्यात आला, या कालावधीत ते रजेवर होते.

    महत्त्वाचे : शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

    Today acb trap news उपचार झाल्यावर त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यासाठी वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र हवे होते, प्रमाणपत्रासाठी ते जून महिन्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी गेले, तपासणी झाल्यावर त्यांना फिट फॉर लाईट ड्युटी एकस्पेक्ट ड्रायव्हिंग असा शेरा नमूद करीत वैद्यकीय अहवाल कार्यालयात सादर केला, परंतु वैद्यकीय अहवालामध्ये ते चालक पदाची कामगिरी करण्याबाबत स्पष्ट नव्हते, त्यामुळे तक्रारदार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील वरिष्ठ सहायक अशोक बाबूरावजी बगुलकर यांना वारंवार भेटून वैद्यकीय अहवाल देण्याबाबत विनंती केली.परंतु बगुलकर यांनी वैद्यकीय अहवाल देण्यात टाळाटाळ केली, 18 जून रोजी तक्रारदार यांना तुला लगेच वैद्यकीय अहवाल हवा असेल तर 10 हजार रुपये लागतील नाहीतर तुझे काम होणार नाही असे म्हणत बगुलकर यांनी लाच मागितली. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

    तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी आधी तक्रारीची पडताळणी केली. बगुलकर यांनी सदर लाच रक्कम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दीपक केशवराव सज्जनवार यांच्याकडे देण्यास सांगितले होते.

     

    Today acb trap news 19 जून रोजी हॉटेल सेलिब्रेशन, दाताला रोड च्या बाजूला असलेल्या रोमा इलेक्टरीक दुकानासमोर दीपक सज्जनवार याला 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली, त्यावेळी सज्जनवार यांनी बगुलकर यांना पैसे मिळाले असल्याचे सांगत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पोलीस उपअधिक्षक मंजुषा भोसले व चमू ने अशोक बगुलकर यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

    सदरकची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी रमेश दुपारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, मेघा मोहूर्ले व रवी तायडे यांनी केली.

    कारवाई दुसरी 

    घरकुल चे उर्वरित पैसे खात्यात जमा करण्याकरिता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) याने 20 हजार रुपयांची लाच मागितली, या प्रकरणी तडजोडीअंती 10 हजार रुपये खाजगी इसमाद्वारे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे.
    27 वर्षीय मिलिंद मधुकर वाढई, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय,चिमूर व 28 वर्षीय आशिष कुशाब पेंदाम, मिस्त्रिकाम यांना अटक करण्यात आली.

    अवश्य वाचा : मुलीच्या लग्नासाठी महाराष्ट्र सरकार देणार 25 हजार रुपये

    Today acb trap news तक्रारदार हे मौजा कळमगाव पोस्ट जामगाव, तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते रोज मजुरीचे काम करतात, तक्रारदार यांच्या नावाने शबरी आवास योजनेच्या वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता घरकुल मंजूर झाले होते.

    घरकुल बांधकामकरिता चार टप्प्यात बांधकामासाठी रक्कम जमा होणार होती, त्यांना 2 किस्त 65 हजार रुपये जमा झाले होते, तर तिसरा व चौथ्या टप्प्यातील अनुक्रमे रक्कम 45 व 20 हजार असे जमा करून देण्याकरिता अभियंता मिलिंद वाढई तक्रारदाराला 20 हजार रुपयांची लाच मागितली.

     

    Today acb trap news अभियंता वाढई यांचे मित्र आशिष पेंदाम यांनी तक्रारदाराला पैसे देण्यास प्रोत्साहित केले, तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले.
    तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी सम्पर्क साधत त्यांना याबाबत तक्रार दिली, तक्रारीची पडताळणी पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी केल्यावर 19 जून ला सापळा कारवाई दरम्यान पंचायत समिती कार्यालयात 10 हजार स्वीकारताना अभियंता वाढई यांना रंगेहात अटक करण्यात आली, सोबतच आशिष पेंदाम यांना यावेळी ताब्यात घेण्यात आले.

    सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उप अधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलोस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर व सतीश सिडाम यांनी केली.