Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Epic Mahakali Mahotsav : 7 ऑक्टोबर पासून चंद्रपुरात महाकाली महोत्सव

    Epic Mahakali Mahotsav : 7 ऑक्टोबर पासून चंद्रपुरात महाकाली महोत्सव

    Mahakali mahotsav ७ ऑक्टोबरपासून चंद्रपूरात सुरू होत असलेल्या पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाची पहिली निमंत्रण पत्रिका श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्टच्या वतीने महाकाली मंदिरात जाऊन मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली.


     Mahakali mahotsav यावेळी महोत्सव समितीचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सचिव अजय जैस्वाल, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त सुनील महाकाले, मिलिंद गंपावार, राजेंद्र शास्त्रकार, चंद्रकांत वासाडे, श्याम धोपटे, अशोक मत्ते, राजेंद्र जोशी, वंदना हातगावकर, सविता दंडारे आदींची उपस्थिती होती.
     आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून दरवर्षी चंद्रपूरात आयोजित होत असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाला यंदा ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

    यंदाचा हा महोत्सव पाच दिवस चालणार असून या पाच दिवसांत भरगच्च विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जगप्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत.


       दरम्यान, शुक्रवारी महोत्सवाची पहिली निमंत्रण पत्रिका चंद्रपूरच्या आराध्य दैवत महाकाली मातेच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. यावेळी मातेची विधिवत पूजा करत शुभकार्याची सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या महोत्सवाचीही जय्यत तयारी सुरू आहे.

    प्रधानमंत्री सुर्यघर योजना

    महोत्सवाच्या माध्यमातून येथील पर्यटन आणि अर्थकारणाला चालना मिळावी तसेच चंद्रपूरच्या मातेची महती देशभरात पोहोचावी या दिशेने महोत्सव ट्रस्ट काम करत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
    यावेळी श्री माता महाकालीची थोरली बहीण समजल्या जाणाऱ्या एकोरी मंदिरातील एकवीरा माता आणि जगन्नाथ बाबा मठ येथेही निमंत्रण पत्रिका अर्पण करण्यात आली आहे.

  • Today National Flag : चंद्रपुरात राष्ट्रध्वजाचा अपमान

    Today National Flag : चंद्रपुरात राष्ट्रध्वजाचा अपमान

    National flag राष्ट्रध्वज तिरंग्याचा अपमान करना-या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – आम आदमी पार्टी ची मागणी

    National flag : ऑगस्ट महिन्यात देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले होते. हे अभियान राबवण्याची जबाबदारी प्रशासनातील अधिकाऱ्यांची तथा कर्मचाऱ्यांची होती. हे अभियान राबवून झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा जनु विसरच पडला की काय असे चित्र चंद्रपूर प्रशासकीय भवन मधील अन्न पुरवठा विभागात पहायला मिळाले.

    अवश्य वाचा : संविधान वाचविण्यासाठी भाजपने केलं आंदोलन

    आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे हे एका कामानिमित्त कार्यालयात गेले असतांना कार्यालयातील टेबलवर देशाचे राष्ट्रध्वज फाडून त्याचा पोछा बनवून फरशी पुसायसाठी ठेवले असे दिसले. या संदर्भात तिथे उपस्थित जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांच्याशी संवाद साधल्या नंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली.प्रत्यक्षात ही बाब त्यांच्या वारंवार निदर्शनास येऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात येत होते. यावरून या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जबाबदार जिल्हा पुरवठा अधिकारी व‌ कर्मचारी आहे.

    आम्ही विष पितो, आणि जगतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


    हे ग्रुहीत धरून या संदर्भात आज रामनगर पोलीस स्टेशन येथे संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या विरुद्ध एफ आय आर नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आली.


    यावेळी आपचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे, जिल्हध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजु कुडे, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, महिला महानगर अध्यक्ष तब्बसूम शेख, जिल्हा संघटन मंत्री योगेश मुऱ्हेकर, भिवराज सोनी, अनुप तेलतुबडे, मनीष राऊत, अमित बोरकर, प्रशांत सिदूरकर, राज नगराळे, आदित्य नंदनवार, विकास खाडे,इत्यादी उपस्थित होते.

  • Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

    Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

    Mhada House कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच चंद्रपूरच्या म्हाडामध्ये कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    Mhada house महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित विजयी जल्लोष सभेत ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी, महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भाई भालाधरे, संयोजक नचिकेत मोरे, कार्याध्यक्ष बंडू हजारे,महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा महामंत्री ब्रिजभुषण पाझारे,भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, गणेश सपकाळे, सतीश तायडे, शंकर गडाख, प्रमोद कोलारकर, अमोल मेश्राम, वामन मराठे, वामन बुटले तसेच कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. (Mhada House)

    अवश्य वाचा : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    कंत्राटी कामगारांनी आंदोलनाच्या यशानंतर मला निमंत्रित केले असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी सर्व संघटनांनी मिळून एकतेचा नारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सह्याद्री येथे बैठक पार पडली. सर्व संघटनांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संयमी भूमिका घेत योग्य पद्धतीने मांडल्या.

    70 वर्षीय नागरिकांना मिळणार आयुष्यमान योजनेचा लाभ


    Mhada house सर्व संघटनेचे नेते एक विचाराने मागण्यांच्या संदर्भात तर्कसंगतीने विचार मांडत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 19 टक्के पगारवाढीचा निर्णय घेतला.त्यामुळे आंदोलनाला यश प्राप्त झाले.कंत्राटी कामगारांच्या अद्यापही ज्या मागण्या अपूर्ण आहे. त्या सर्व मागण्या शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    महत्वाचे

    विविध प्रश्न मार्गी:
    चंद्रपूर नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि 606 कर्मचारी स्थायी झाले. विधिमंडळात वनविभागातील वनमजुरांचा आवाज बुलंद करत त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली आणि 11 हजारपेक्षा जास्त वनमजूर स्थायी झाले.
    ऑटो रिक्षावाल्यांचा व्यवसाय कराचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतःच कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांच्या मागे व्यवसाय कर रद्द करण्याची भूमिका घेतली आणि ऑटो-रिक्षावाल्यांचे व्यवसाय कर रद्द करण्याचे कार्य केले.ऑटो रिक्षावाल्यांना पहिला घरकुलाचा टप्पा देत स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून दिले.

    कामगारांना अल्पदरात घरे
    चंद्रपूरच्या म्हाडामध्ये योजनेच्या माध्यमातून अल्पदरात घरे निर्माण करण्यात येत आहे. त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नसेल अशा कंत्राटी कामगारांची यादी तयार करावी. या कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असून घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 2 लक्ष रुपये असे मिळून एकूण साडेचार लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता:-
    आरोग्याच्या संदर्भात, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.सी चा फायदा व्हावा याकरीता, केंद्र शासनाने अतिशय उत्तम तंत्रज्ञान असणारे 100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात नसेल असे उत्तम व अत्याधुनिक हॉस्पिटल ई.एस.आय.सी चे होणार आहे. या रुग्णालयाचा फायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे होईल, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Shocking Chandrapur : आई-बाबा सॉरी आणि चंद्रपूर हादरलं

    Shocking Chandrapur : आई-बाबा सॉरी आणि चंद्रपूर हादरलं

    shocking chandrapur आई बाबा सॉरी, मला अभ्यासाचे खूप टेन्शन आहे, या आशयाची चिठ्ठी लिहत 17 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली.


    Shocking chandrapur 11 सप्टेंबर रोजी सदर बाब उघडकीस आली, यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील 17 वर्षीय प्रांजली हनुमंत राजूरकर असे आत्महत्या केलेल्या मृत मुलीचे नाव आहे.


    जिल्हा क्रीडा संकुल जवळील प्रा. विजय बदखल यांचे इन्स्पायर इन्स्टिट्यूट आहे, नीट आणि mh – cet, अभियांत्रिकी शिक्षणासाठी आवश्यक पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी शेकडो विद्यार्थी या कोचिंग सेंटरमध्ये शिक्षण घेतात. या कोचिंग सेंटर मध्ये निवासी वसतिगृहाची सुद्धा व्यवस्था आहे.

    अवश्य वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू

    आत्महत्येपूर्वी काय घडलं?


    10 सप्टेंबर रोजी प्रांजली हि मामाच्या घरी गेली होती, त्यादिवशी सायंकाळी ती वसतिगृहात परतली, प्रांजली ला थकवा जाणवित असल्याने मी उद्या क्लास मध्ये येऊ शकणार नाही असे तिने मैत्रिणींना सांगितले होते. 11 सप्टेंबर रोजी ती क्लास मध्ये गेली नाही, सायंकाळ झाली तरी प्रांजली रूम च्या बाहेर आली नाही, प्रांजली च्या मैत्रिणींना याबाबत संशय येताच त्यांनी तात्काळ याची माहिती वसतिगृह कर्मचाऱ्यांना दिली, कर्मचारी वसतिगृहात आले त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र काही प्रतिसाद मिळाला नसल्यानं त्यांनी दरवाजा तोडला.

    प्रांजली गळफास लागल्याच्या अवस्थेत रूम मध्ये आढळली. मृत्यूपूर्वी प्रांजली ने आई बाबा च्या नावाने चिठ्ठी लिहली होती, ज्यामध्ये आई-बाबा सॉरी मला अभ्यासाचे खूप टेन्शन आले आहे, त्यामुळे मी या जगाचा निरोप घेत आहे.
    इन्स्पायर व्यवस्थापनाने याबाबत रामनगर पोलिसांना माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पंचनामा करीत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आला.

  • Best Badminton Hall : चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल

    Best Badminton Hall : चंद्रपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉल

    Badminton Hall सन 2036 च्या ऑलिंपिकची तयारी करण्याकरिता केंद्र आणि राज्यशासन खेळाच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत.त्याचा आगाज गतवर्षी चंद्रपूरात राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा घेऊन करण्यात आला. ऑलिंपिकमध्ये यश मिळवायचे असेल तर सुसज्ज स्टेडियम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच चंद्रपूर शहरात म्हाडाच्या 16 एकर जागेवर 135 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    Badminton hall जिल्हा क्रीडा संकूल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, क्रीडा विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभुषण पाझारे, विवेक बोढे यांच्यासह विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना, शेतकरी व शेतमजूर सह चौघांचा मृत्यू

    आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलचे अधिकृत लोकार्पण झाले, असे जाहीर करून पालकमंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले, भारताने ऑलिंपिकमध्ये सन 1900 मध्ये भाग घेतला. आज आपला देश हा 140 कोटी लोकसंख्येचा आहे. मात्र ऑलिंपिक स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपल्याला केवळ 35 पदक मिळाले आहेत. तेव्हाच आपण ठरवले की,ऑलिंपिकची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने आणि वाघाची भुमी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने केलीच पाहिजे. 2036 मध्ये चंद्रपूरचा खेळाडू जेव्हा ऑलिंपिकमध्ये पदक मिळवेल, तेव्हा खरा आनंद होईल. त्यासाठी खेळाडूंनी मेहनत करावी.आपण खेळाडूंच्या पाठीशी कायम उभे राहू, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. (Badminton Hall)

    पुढे ते म्हणाले, पूर्वीच्या काळात खेळाच्या एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या. आता मात्र जिल्ह्यात आणि शहरात जेव्हा उत्तम व्यवस्था निर्माण होते तेव्हा खूप आनंद होतो. आपल्या जिल्ह्यात क्षमतेची कमतरता नाही. सन 2017 मध्ये आठ महिन्याच्या प्रशिक्षणातून आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी 29 हजार फूट उंचीच्या एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा फडकविला. खेळाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा पुढे जावा, हाच आपला नेहमी प्रयत्न राहिला आहे. महाराष्ट्रातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. एक जिल्हा क्रीडा संकुल येथे, दुसरा बल्लारपूर क्रीडा संकुल येथे तर तिसरा स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक सैनिक शाळेत आहे.

    शेतकऱ्यांना मिळणार 24 तास मोफत वीज

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन हॉलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू येथून निर्माण होईल व आपल्या चंद्रपूरचे नाव देशात उंचावले जाईल ,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपसंचालक शेखर पाटील म्हणाले, नागपूर नंतर क्रीडा विभागात सर्वाधिक काम चंद्रपूर जिल्ह्यात झाले आहे. पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळेच दर्जेदार आणि मुलभूत सुविधा खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. Badminton hall

    प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी, आंतरराष्ट्रीय स्तराच्या बॅडमिंटन हॉलचा ( Badminton Hall) प्रस्ताव जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क्रीडा मंत्रालयाकडून मंजूर करून घेतला. क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 57 कोटींच्या प्रस्तावाला ही मान्यता मिळाली आहे. क्रीडा विभागासाठी भरीव तरतूद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळेच शक्य झाली आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन उत्तम आवळे यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे यांनी मानले.

    प्रत्येक तालुक्यात अत्याधुनिक जीम

    आरोग्याचा खर्च कमी करायचा असेल तर महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात अत्याधुनिक स्टेडियम आणि जीम करण्याच्या सूचना आपण वित्तमंत्री असताना केल्या होत्या. बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा येथे अत्याधुनिक जिमची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील 15 ही तालुक्यात अत्याधुनिक जीम तयार करण्यात येत आहे.

    जिल्ह्यात विविध खेळांसाठी स्टेडीयमची निर्मिती

    57 कोटी खर्च करून चंद्रपूरचे स्टेडिअम उभारण्यात येत आहे. बल्लारपूर येथे साडेसहा कोटीचे स्टेडियम, एफडीसीएम येथे उत्कृष्ट स्टेडियम, कबड्डी करिता आणि कुस्तीसाठी जिल्ह्यामध्ये दोन छोटे छोटे अत्याधुनिक स्टेडियम आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठात पारंपारिक खेळांसाठी नाविन्यपूर्ण स्टेडियम तयार करण्यात येत आहे. आणि भविष्यात नेमबाजी साठी अत्याधुनिक स्टेडीयम करण्याचा आपला मानस असल्याचे ना.मुनगंटीवार म्हणाले.

    देखभाल दुरुस्तीकडे विशेष लक्ष द्यावे

     जिल्हा क्रीडा संकूल येथे आज उद्घाटन झालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन हॉलचा खेळाडूंनी चांगला उपयोग घ्यावा. तसेच या हॉलची देखभाल दुरुस्तीसाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशा सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

    राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंचा सत्कार

    राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या खेळाडूंचा यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात आदर्श मास्टे, श्रेया इथापे, किंजल भगत, रुक्साना सलमाने, कृष्णा रोहणे यांच्यासह खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे यांचाही समावेश होता.

  • immersion tank : या कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन नकोचं – चंद्रपूर मनपा

    immersion tank : या कुंडात गणेश मूर्तीचे विसर्जन नकोचं – चंद्रपूर मनपा

    immersion tank चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी आता मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.  

    Also read


      immersion tank शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. उत्सवासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, पोलीस विभाग,जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत असुन १० दिवसीय सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.१० व्या दिवशी होणाऱ्या विसर्जन सोहळ्यात लाखोंच्या संख्येने भाविक शहरातील मुख्य रस्त्यांवर असतात. भाविकांसाठी विविध संस्था अथवा व्यक्तींद्वारे पाणी व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्यात येतात. ही बाब चांगली असली तरी स्टॉल्स धारकांनी स्वच्छेतेचे भान राखण्याची आवश्यकता आहे.

    अवश्य वाचा : विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना पक्षात मिळाली महत्वाची जबाबदारी


        त्यामुळे मनपा प्रशासनातर्फे विसर्जन मिरवणूकीत जे स्टॉल्स लावणार आहेत त्यांना डस्टबिन सोबत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतल्यावर भाविकांनी रिकाम्या प्लेट्स या डस्टबिन मधेच टाकाव्या याची काळजी स्टॉल्सधारकांनी घायची आहे. कारण जर या कागदी प्लेट्स रस्त्यावर फेकल्या गेल्या तर नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे या प्लेट्सवर सातत्याने पाय पडुन त्या रस्त्यावर घट्ट चिकटतात, शिवाय दुर्गंधीही पसरते. या प्लेट्स मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांना ब्लिचिंग पावडरद्वारे अथक प्रयत्न करून काढाव्या लागतात. (immersion tank)

    मी आधुनिक अभिमन्यू, विरोधकांचे चक्रव्यूह तोडणार – देवेंद्र फडणवीस

            हे लक्षात घेता गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांसाठी डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले असुन ज्या स्टॉल्स जवळ अस्वचता आढळेल त्यांचे चित्रीकरण करून त्यावर उचित कारवाई केली जाणार आहे. त्याचप्रमाणे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन हे पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांची परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. मनपातर्फे शहरात २५ कृत्रिम विसर्जन कुंड लावण्यात आले असुन दाताळा रोडवरही विसर्जन कुंड उपलब्ध आहेत. तेव्हा इरई नदीजवळील मोठ्या विसर्जन कुंडाचा वापर न करता छोट्या कुंडांचा वापर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

  • Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

    Encroachment : जिल्हाधिकारी यांना खासदार धानोरकरांनी दिला आंदोलनाचा इशारा

    Encroachment घुग्गुस येथे राजकीय पक्षाने अतिक्रमण केलेल्या जागेवरून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना समान न्याय द्या अशी विनंती केली, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा सुद्धा धानोरकर यांनी दिला आहे.

    Encroachment चंद्रपूर जिल्हîात सर्वत्र अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु असून काही राजकीय पक्षांना जाणिवपुर्वक सुट दिली जाते का? असा प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधील राजकीय पक्षाद्वारे अतिक्रमीत केलेल्या जमिनीवरुन केला आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो हॉटेल का आले चर्चेत

    चंद्रपूर शहर (chandrapur) तसेच घुग्घुस शहरात देखील प्रशासनाद्वारे न्यायालयाचा दाखला देत अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरु आहे. यामध्ये सामान्य नागरीकांचे अतिक्रमण सरसकट काढत आहेत. परंतु, घुग्घुस येथील सर्व्हे क्र. 17 मधे एका राजकीय पक्षाचे सेवा केंद्र सुरु असून त्याला शासनाचे अभय का? खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर जागेची मागणी एका राजकीय पक्षाशी संबंध असलेल्या व शिक्षकी पेशा असून शाळेत न जाणाऱ्या   पदाधिकाऱ्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या संस्थेने सदर जागेची मागणी केली. या जागेचा नोटीस 08 ऑगस्ट रोजी प्रसिध्द झाला असतांना तो जाणीवपुर्वक नोटीस बोर्डाच्या दर्शनीय भागात लावण्यात आला नाही. दि. 02 सप्टेंबर रोजी आक्षेप नोंदविण्याची अंतिम तारीख असतांना 31 ऑगस्ट व 01 सप्टेंबर रोजी सुट्टीचे औचित्य साधून कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी 30 ऑगस्ट रोजी लावण्यात आला. सदर बाब जाणीपूर्वक केली का? असा प्रश्न खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.

    चंद्रपूर शहरात आला बिबट्या

    एकीकडे सामान्य नागरिकांना जागा मिळत नसत नसुन दुसरीकडे एखाद्या संस्थेला 0.43 हे.आर. जागा भाडेपट्ट्याने देणे हा कुठला न्याय? असा प्रश्न देखील खासदार धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी महोदयांनी तात्काळ अतिक्रमण काढून वरील प्रकरणात दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग हाती घ्यावा लागेल असा ईशारा देखील खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिला आहे.

  • Visarjan Kund : याठिकाणी आहे चंद्रपूर मनपाचे विसर्जन कुंड

    Visarjan Kund : याठिकाणी आहे चंद्रपूर मनपाचे विसर्जन कुंड

    Visarjan kund चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने २५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.


    Visarjan kund शहरात मुख्यतः दीड दिवस, ५ दिवस तसेच १० दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यातील ओयो हॉटेल का आले चर्चेत


        नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. (Visarjan kund)

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा



    ३ फिरते विसर्जन कुंड –
     गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय ३  ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.

     स्पर्धा –
     पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा आयोजित करण्यात यआली आहे यात सार्वजनिक गणेश मंडळांनी मनपातर्फे देण्यात आलेल्या विषयांवर सजावट/देखावा करणे तसेच सार्वजनिक जागा सौंदर्यीकरण करणे अपेक्षित असुन यात १ लक्ष, ७१ हजार,५१ हजार रुपयांची तसेच टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु बनविणाऱ्यास २१ हजार व २१ हजार रुपयांची तसेच इतर प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा दिली जाणार आहेत. (Visarjan kund) 

    एक खिडकी योजना – मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुद्धा सुरु करण्यात आली होती. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाद्वारे संयुक्तरीत्या सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.    

    कृत्रिम तलाव स्थळ – एकूण – २५
    १) झोन क्र. १ (कार्यालय) संजय गांधी मार्केट – २
    २) साईबाबा मंदीर वडगाव – १
    ३)वडगाव पोलीस चौकी – १
    ४) दाताळा रोड,इरई नदी – २
    ५) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २
    ६) तुकुम एस टी वर्कशॉप – २
    ७) रामाळा तलाव – ४
    ८) छत्रपती शिवाजी चौक – २
    ९) गांधी चौक – १
    १०) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १  
    ११) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १
    १२) महाकाली प्रा.शाळा – १
    १३) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २
    १४) झोन क्र. ३ (कार्यालय)  – २
    १५) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती -१

    निर्माल्य कलश – एकूण – १५
    1) झोन क्र. १ (अ) – ५
    2) झोन क्र. १ (ब) –  १
    3) झोन क्र. २ (अ) – ८
    ४) झोन क्र. ३ (ब) – १
    ५) झोन क्र. ३ (अ) – ३
    ६) झोन क्र. ३ (क) – २

  • Babupeth railway : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल बाबत नवी अडचण

    Babupeth railway : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल बाबत नवी अडचण

    babupeth railway मागील अनेक वर्षांपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर काम पूर्णत्वास येत असून आता यामध्ये नवी अडचण समोर आली आहे.

    babupeth railway आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम गतीने पुढे जात आहे. आता यात रेल्वे विभाग,  महानगरपालिका,  महावितरण कंपनी, एमएमआरडी, आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व विभागांनी उत्तम काम सुरू केले आहे. मात्र आता या सर्व विभागांनी आपसात समन्वय साधून उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करावीत,” असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

    कँडल मार्च

      Babupeth railway चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी यांना सदर निर्देश दिले. बैठकीला महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, शहर अभियंता विजय बोरिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश तांडले, उपविभागीय अभियंता अंबुले, शाखा अभियंता जावडे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वसंत हेडाऊ, सहायक अभियंता साहिल टाके आदी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : महिला अत्याचार विरोधात कँडल मार्च

      आमदार किशोर जोरगेवार यांनी 5 कोटी 90 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला गती आली आहे. सर्व संबंधित विभाग उत्तम काम करत असून पुलाची रंगरंगोटी, लाईट पोलची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामेही जलद पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या.

    अडचण काय?

      बागला चौकात असलेली मनपाची एलईडी स्क्रीन, झाडे, आणि लाईन पोलमुळे अडचण निर्माण होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, सदर इलेक्ट्रिक पोल चार दिवसात हटविण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, मनपाची एलईडी स्क्रीन तात्काळ हटविण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या. पुलाच्या दोन्ही बाजूंना सुंदर सौंदर्यीकरण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. “सर्व विभागांनी समन्वय साधून काम केल्यास हे काम नियोजित वेळेत आपण पूर्ण करू,” असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.

  • Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

    Ganesh Utsav 2024 : आमदार जोरगेवार यांच्या घरी गणरायाचे आगमन

    Ganesh utsav 2024 चंद्रपुरातील स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले असून आज जोरगेवार कुटुंबाने सहपरिवार गणरायाची पूजा केली.

    Ganesh utsav 2024 दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आणि मंत्रोच्चारांच्या साथीत गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे गणेशोत्सवाचे ९४ वे वर्ष असून, जोरगेवार कुटुंबीयांची दुसरी पिढी ही परंपरा उत्साहाने पुढे नेत आहे.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

      जोरगेवार कुटुंबीयांनी गणेशोत्सवाची महती मनाच्या गाभार्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. त्यांच्या या उत्सवाला ९४ वर्षांची परंपरा असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते हा उत्सव सहकुटुंब साजरा करत आहेत.

    अवश्य वाचा : आता आपणही बनू शकता, मुख्यमंत्री योजनादुत, असा करा अर्ज

     गणेशोत्सवाच्या या मंगलमय प्रसंगी, जोरगेवार कुटुंबीयांनी गणरायाची आरती केली आणि गणेशोत्सवाची सुरुवात केली. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुटुंबाचे आणि समाजाचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. जोरगेवार कुटुंबीयांची गणेशोत्सवाची ही परंपरा श्रद्धा, भक्ती आणि समाजाभिमुखतेचा अनोखा संगम आहे. गणपतीच्या या आगमनाने त्यांच्या निवासस्थानी भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, कुटुंबीयांसह नागरिकांनी सहर्ष गणरायाचे दर्शन घेतले.

    Lord ganesha

     गणेशोत्सवाच्या या पारंपरिक सोहळ्याचे ९४ वे वर्ष साजरे करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल जोरगेवार कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. गणरायाच्या आशीर्वादाने आगामी वर्ष नागरिकांसाठी सुख, समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायापुढे केली आहे.