Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Guru Dakshina : सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा

    Guru Dakshina : सुधीर मुनगंटीवार यांची अशीही गुरुदक्षिणा

    Guru dakshina शिक्षण घेऊन शाळेतून बाहेर पडल्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी भरारी घेतात. नाव कमावतात. आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करतात. पण मोजकेच विद्यार्थी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची जाणीव ठेवतात. त्यातही ना. सुधीर मुनगंटीवार त्या शाळेचे माजी विद्यार्थी असतील, तर गुरुदक्षिणा म्हणून शाळेला किती अधिक देता येईल याचा विचार करतात. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील ज्युबिली हायस्कूलसाठी ज्या भावनेतून परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे, ती कुठल्याही माजी विद्यार्थ्यांसाठी आदर्श बाब ठरावी.

    Guru dakshina राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी आणि पाचवे सरसंघचालक प.पू के.सुदर्शन यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेतील बाकांवर श्री. सुधीर मुनगंटीवार यांना शैक्षणिक, सामाजिक धडे गिरवता आले. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत त्यांचे शिक्षण या शाळेत झाले. त्यानंतरचा ना. मुनगंटीवार यांचा लोकनेता म्हणून प्रवास साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करावे, अशी जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली.

    तर चंद्रपूर जिल्ह्यात जन आंदोलन होणार – अभिलाषा गावतुरे यांचा इशारा

    एका माजी विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा म्हणून ना.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषद (मा.शा) ज्युबिली हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या नुतनीकरणाचा निर्णय घेतला. ही खऱ्या अर्थाने एका माजी विद्यार्थ्याची आदर्श गुरुदक्षिणा ठरत आहे. नूतनीकरणांतर्गत इमारतीची संपूर्ण दुरुस्ती, नवीन फ्लोरिंग, नवीन छत, फॉल सीलिंग, दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती, अनेक ठिकाणी प्लास्टर, डिजिटल क्लासरूम, आधुनिक फर्निचर, प्रयोगशाळा दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे.  (Guru dakshina)

    राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार रुपये पेन्शन

    ना. श्री. मुनगंटीवार यांनी आज महाविद्यालयाच्या नुतणीकरणाच्या कामाची पाहणी केली आणि माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी वाचनालयाचा विशेष उल्लेख केला. 14 कोटी 90 लक्ष रुपये खर्च करून अत्याधुनिक वाचनालय येथे तयार करण्यात येणार आहे. ई -लायब्ररी पासून सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध होतील. या लायब्ररीमध्ये संदर्भ ग्रंथ, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेचे ज्ञान तसेच जगाच्या कोणत्याही ठिकाणावरून विद्यार्थ्यांना येथे शिकता येईल, अशा सुविधा निर्माण केल्या जातील. (Guru dakshina)

    संस्कारांचं माहेरघर


    ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्राला कळले. पण ते ज्युबिली हायस्कूलच्या बाकांवर घडले. याच बाकांवर त्यांना पर्यावरणाचे धडे मिळाले आणि इथेच त्यांच्यातील गुणी विद्यार्थी घडला. आणि आज महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य बघितले तर शाळेने दिलेल्या संस्कारांची जाणीव होते. ना. श्री. मुनगंटीवार यांच्यासाठी त्यांची शाळा खऱ्या अर्थाने संस्कारांचं माहेरघर ठरले आहे.

    गुरू दक्षिणा

  • property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

    property tax : मालमत्ता करात मिळवा 10 टक्के सूट

    Property tax चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना करात सवलत देण्यात येत असुन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा ऑफलाईन पद्धतीने केल्यास ८ टक्के तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास १० टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने ३० सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.

           
    Property tax महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

    महत्वाचे : नागरिकांनो हे काम करा मनपा देणार 1 लाख रुपये


        चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता मनपाद्वारे विविध प्रयत्न केले जातात. मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे करात  सवलत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना पुढील आर्थिक वर्षात विशेष सवलत दिली जाणार आहे त्यामुळे या कर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

    important demand : आम आदमी पक्ष युवा आघाडीची महत्वाची मागणी पूर्ण

    Important demand बायपास जवळील नागरिकांना नाल्या-अभावी होत असलेल्या त्रासाला लागणार पूर्णविराम, आम आदमी पक्ष युवा आघाडीच्या मागणीला यश

    Important demand चंद्रपूर : चंद्रपूर – बल्लारशा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्याच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरत होते तसेच शिरना-या पाण्यामुळे अनेक त्रासांना समोर जावे लागत होते. याबाबत नागरिकांची आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे
    यांच्या कार्यालयात वारंवार तक्रारी करन्यात आल्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम आदमी पार्टी तर्फे बांधकाम विभागाला अनेक निवेदन देण्यात आले, त्यानंतर जनतेला सोबत घेऊन आंदोलने करण्यात आले. या आंदोलनाची प्रशासनाला दखल घ्यावी लागली.

    7 वर्षांच्या मुलाची बिबट्याने केली शिकार

    आंदोलनामुळे नाली च्या कामाला मंजुरी मिळाली असून आज नालीच्या कामाकरिता बांधकाम विभाग यांच्या टीमने मोजणी करूण जागेची पाहणी केली ४ दिवसात कामाला सुरुवात होणार असल्याचे सुद्धा संबंधित अधिकारी यांनी म्हटले आहे. याकरिता येथील पीडीत नागरिकांनी आम आदमी पार्टीचे राजु कुडे यांचे आभार मानले. Important demand

    भाजपची निवडणूक प्रचाराला सुरुवात


    यावेळेस आपचे जिल्हाध्यक्ष राजु कुडे, युवा जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, युवा संघटनमंत्री मनीष राऊत, शहर अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद शेख, शहर वाहतूक अध्यक्ष जयदेव देवगडे, आदित्य नंदनवार, अक्षय गोवर्धन, सागर बोबडे, अजय बाथब इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

  • Chandrapur city Municipal Corporation : नागरिकांनो हे काम केल्यास मनपा देणार 1 लाख रुपयांचे बक्षिस

    Chandrapur city Municipal Corporation : नागरिकांनो हे काम केल्यास मनपा देणार 1 लाख रुपयांचे बक्षिस

    Chandrapur city municipal corporation चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा व एकच लक्ष शहर स्वच्छ मोहीमेअंतर्गत शहरातील नागरिकांचे आपल्या शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणात योगदान असावे या दृष्टीने सुंदर माझे उद्यान व सुंदर  माझी ओपन स्पेस या २ स्वतंत्र स्पर्धा १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : वनविभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा


      Chandrapur city Municipal Corporation मागील वर्ष या स्पर्धेचे प्रथम वर्ष होते, मात्र स्पर्धेत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला होता. स्पर्धेत शहरातील ५८ संघांनी नोंदणी केली होती. १९ उद्यान व २१ ओपन स्पेस असे मिळुन एकुण ४० संघांनी उद्यान व ओपन स्पेस सौंदर्यीकरण करण्याचे काम पुर्ण केले. विजेत्यांना रोख बक्षिसाबरोबरच त्यांच्या परिसरात विकासकामे सुद्धा मनपाने दिलेल्या निधीतुन करता आली.  


     Chandrapur city Municipal Corporation  स्पर्धकांनी खुल्या जागेत वापरण्यायोग्य २५ मैदाने तयार केली. अंदाजे ८२ हजार ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा – भिंती उत्कृष्टपणे रंगविण्यात आल्या.जवळपास ३६ हजार किलो टाकाऊ प्लास्टीकचा वापर करून टिकाऊ वस्तू स्पर्धेदरम्यान तयार करण्यात आल्या. २५ शिल्प व कारंजे स्पर्धकांनी बनविले,५ कंपोस्ट पीट व २८ शोष खड्डे बनविण्यात येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली होती.पर्यावरणपुरक स्पर्धा ठरल्याने यावर्षीसुद्धा ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

    आता जलद न्याय होणार – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

       
         स्पर्धेत उद्यान समिती,ओपन स्पेस विकास समिती,एनजीओ, स्वयंसेवी संस्था,सामाजीक संस्था,युवक/युवती मंडळे इत्यादी सर्वांना यात सहभागी होता येणार असुन स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यास काही स्थळ मनपातर्फे देण्यात येणार असुन याव्यतिरिक्त इतर स्थळ जसे शहरातील मोकळ्या जागा,बगीचा, सार्वजनिक ठिकाणे या जागा निवडण्याची मुभा स्पर्धक गटांना राहणार आहे.  खाजगी स्थळ,लेआऊट मधील ओपन स्पेस या जागा अपेक्षित नसुन केवळ सार्वजनिक स्थळ अथवा शासकीय जागा असें अपेक्षित आहे. स्पर्धेत नागरिकांनी आपल्या गटासह सहभागी होऊन आपल्या शहराच्या सौंदर्यीकरणात योगदान देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


    संपर्क – स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर असुन स्पर्धेत भाग घेण्यास साक्षी कार्लेकर ८३२९१६९७४३,८३२९३५२८४२,७४९८९५४९७६ या क्रमांकावर अथवा मनपा उद्यान विभागात संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. तसेच मनपाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध असलेल्या गुगल लिंक द्वारेही स्पर्धेत भाग घेता येईल. (Chandrapur city Municipal Corporation)


    बक्षिसे –  
     प्रथम पारितोषिक – १ लक्ष, ट्रॉफी व त्या वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
     द्वितीय पारितोषिक – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
     तृतीय पारितोषिक – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे
     प्रोत्साहनपर – ३ लक्ष रुपयांची ५ बक्षिसे
     गुणांसाठी निकष : स्पर्धेत गुण प्राप्त करण्यास पर्यावरण पुरक वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु बनविणे, उद्यान /ओपन स्पेस विकास समितीची स्थापना व कार्ये,सार्वजनिक स्थळ/उद्यानाचे सौंदर्यीकरण, लोकसहभाग, आरोग्यदायी उपक्रम,ओपन स्पेस/ बगिच्याची देखभाल,परिसराची स्वच्छता,केलेल्या कामाची प्रचार प्रसिद्धी,३ आर तत्वांचा वापर,जागेचे आरेखन करणे असे विविध निकष आहेत. 

  • Gandhi Giri : चंद्रपुरात आप ची गांधीगिरी

    Gandhi Giri : चंद्रपुरात आप ची गांधीगिरी

    Gandhi giri 4 दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शिवाजी कांबळे हे आपल्या कुटुंबातील व्यक्तीला चंद्रपुरातील डॉ आलूरवार सिटी स्कॅन सेंटरमध्ये mri करण्यासाठी आले होते, त्यावेळी आधी डिपॉझिट म्हणून 7 हजार 200 रुपये जमा करण्यात आले, मात्र रुग्ण स्थिर न राहिल्याने त्याचे mri करण्यात आले नाही, डिपॉझिट असलेले पैसे परत मागितले असल्यास डॉक्टरांनी 4 हजार रुपये परत केले मात्र उर्वरित 3 हजार 200 रुपये परत केले नाही, यावर कांबळे यांनी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याशी संपर्क साधला व त्यानंतर आप पक्षाने अर्धनग्न आंदोलन सुरू करीत त्या रुग्णाचे पैसे गांधीगिरीने परत करायला लावले.

    अवश्य वाचा : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि घडलं असं

    Gandhi giri 4 दिवसापासून mri करायला आलेल्या रुग्णाला डॉक्टर आलूरवार यांनी परत पाठविले मात्र त्या रुग्णाचे उर्वरित 3200 रुपये परत केले नाही, पैसे परत मिळत नसल्याने शिवाजी कांबळे यांनी आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याशी संपर्क साधला, त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली, त्यांनतर राईकवार यांनी डॉक्टर सोबत मोबाईल द्वारे संवाद साधला मात्र डॉक्टर आलूरवार यांनी तुम्हाला जे करायचे ते करा, कितीही आंदोलन करा पैसे परत मिळणार नाही अशी मुजोरी केली.


    त्यानंतर राईकवार यांनी पदाधिकारी सोबत घेत आलूरवार यांच्या दवाखाण्यासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले.
    या आंदोलनाचे फेसबुक वर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले, त्यांना सोशल मीडियावर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यामुळे डॉक्टर आलूरवार यांना आप पक्षाच्या आंदोलनासमोर झुकावे लागले व रुग्णाचे 3200 रुपये त्यांनी परत केले.
    आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या अर्धनग्न आंदोलनाची सध्या जिल्ह्यात चांगली चर्चा आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनात कसलीही तोडफोड, आक्रमक व कुणालाही काही न बोलता अहिंसेच्या माध्यमातून गांधीगिरीने गरीब रुग्णाला त्याचा हक्क मिळवून दिला. Gandhi giri

    वंदे भारत एक्स्प्रेस

    मयूर राईकवार यांचे विधान:

    “गरिबांच्या हक्कासाठी लढणे हे आमचे कर्तव्य आहे. जर अशा प्रकारे अर्धनग्न होऊन आंदोलन करावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही. आज एका गरीब रुग्णाला न्याय मिळाला, हे आमच्यासाठी मोठे यश आहे.”
    सदर अर्धनग्न आंदोलनात


    या घटनेने चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी आम आदमी पक्षाच्या या कृतीचे कौतुक केले आहे, गरीब रुग्णांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. Gandhi giri

    मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्ष), राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष), मनीष राऊत (युवा संघटन मंत्री), आदित्य नंदनवार (युवा जिल्हा सचिव), राजकुमार नगराळे जिल्हा सचिव, प्रशांत सिदुरकर जिल्हा सचिव, संगम सागोरे (वाहतूक संघटन जिल्हाध्यक्ष), कुणाल शेटे जिल्हा पदाधिकारी क्रिश कपूर, विशाल बिरमवार यांचा सहभाग होता.

    गांधीगिरी ची शैली

  • Jatpura Gate : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि…

    Jatpura Gate : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि…

    jatpura gate गणेशाची मूर्ती भव्य असल्याने ती जटपूरा गेटमध्ये अडकली होती. याची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी रात्री तीन वाजता येथे पोहोचत प्रशासनाला बाजूची बॅरिकेटींग काढायला लावून गणपतीचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर गणेश भक्तांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.

    Jatpura gate काल मोठ्या उत्साह आणि जल्लोषात लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. मात्र, गंज वॉर्ड येथील युवक गणेश मंडळाची मूर्ती अतिशय भव्य असल्यामुळे ती जटपूरा गेटच्या आतून निघण्यास अडचण निर्माण झाली. पोलिस प्रशासनाने गणेश मूर्ती बाजूला ठेवून मूर्ती परत नेण्याची विनंती मंडळाला केली. परंतु मंडळ पदाधिकाऱ्यांनी याला नकार दिला.

    अवश्य वाचा : वंदे भारत एक्सप्रेस चा शब्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी केला पूर्ण

    यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री तीन वाजता आमदार किशोर जोरगेवार यांना माहिती दिली. आमदार जोरगेवार स्वतः जटपूरा गेट येथे पोहोचले. त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेत बाजूची  बॅरिकेटींग  मोकळी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गणेशाची मूर्ती जटपुरा गेटच्या बाजूने नेण्यात आली. 

    चंद्रपुरात थांबली वंदे भारत एक्सप्रेस

    रात्री तीन वाजता उपस्थित राहून निर्माण झालेल्या समस्येचे निराकरण करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांचे गणेश मंडळ आणि भक्तांनी विशेष आभार मानले.

  • Chandrapur Cha Raja : चंद्रपूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

    Chandrapur Cha Raja : चंद्रपूर शहरात श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

    chandrapur cha raja 10 दिवस चाललेल्या गणेश उत्सवाचा आज शेवटचा दिवस, शहरातील सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश मूर्तीचे थाटामाटात विसर्जन होणार आहे, शहरातील प्रसिद्ध चंद्रपूर चा राजा जटपुरा गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

    विसर्जन मिरवणूक

    chandrapur cha raja अनंत चतुर्दशी 17 सप्टेंबर ला शहरातील गणेश विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे, शहरातील मानाचा गणपती चंद्रपूर चा राजा ची विसर्जन मिरवणुक सुरू झाली आहे, ढोल-ताशाच्या गजरात गणेश भक्त आपल्या लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहे.

    अवश्य वाचा : व्यायाम करताना हार्ट अटॅक, चंद्रपुरातील घटना

    गणेश विसर्जन सोहळा दरम्यान नागरिकांना वाहतूक संबंधी त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे, पोलीस प्रशासनाने सुचविलेल्या मार्गाचा वापर नागरिकांनी करावा असे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.

  • Heart Attack in gym : व्यायाम करताना हार्ट अटॅक, चंद्रपुरातील घटना

    Heart Attack in gym : व्यायाम करताना हार्ट अटॅक, चंद्रपुरातील घटना

    heart attack in gym चंद्रपूर: जिममध्ये व्यायाम करतांना एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास चंद्रपूरातील नागपूर मार्गांवर असलेल्या इरई मल्टीफिट जिममध्ये घडली.
    रोहीत जालान (50) असे मृतकाचे नाव आहे. ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

    अवश्य वाचा : गणेश विसर्जन, या परिसरात दुकाने लावण्यास मनाई

    heart attack in gym नागपूर महामार्गांवर चढ्ढा यांची इरई मल्टीफिट नामक जिम आहे. या जिममध्ये रोहित जालान हा व्यायामासाठी येत होता. सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जिममध्ये व्यायामासाठी आला असता, त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांनी त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून अधिक तपास पाेलिस करीत आहे.

  • Ganesh Visarjan 2024 : चंद्रपूर गणेश विसर्जन, या परिसरात दुकाने लावण्यास मनाई

    Ganesh Visarjan 2024 : चंद्रपूर गणेश विसर्जन, या परिसरात दुकाने लावण्यास मनाई

    Ganesh visarjan 2024 शहरात १७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे १०० हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनद्वारे मनाई करण्यात आली आहे.

     
     Ganesh visarjan 2024 विसर्जन सुरळीत होण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाद्वारे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जनासाठी जाण्याचा मार्गांची माहीती घेऊन पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यात आले आहेत. मार्गावरील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

     
        विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे.  जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालाय कार्यरत ठेवण्यात येणार आहे. (Ganesh visarjan 2024)

    अवश्य वाचा : हे काम न केल्यास रेशन होणार बंद


        अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात २५ कृत्रिम कुंड व १५ निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन ६१३५ घरघुती मुर्तींचे विसर्जन त्यात केले गेले आहे. मनपाद्वारे केल्या गेलेल्या जनजागृतीने यावर्षीसुद्धा एकही पीओपी मुर्तीचा वापर नागरिकांनी केला नाही.  


         स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रीम तलावातुन निघणारे पाणी,निर्माल्य यांचे पावित्र्य राखून कम्पोस्टिंगसाठी पाठविले जाते तसेच माती ही बगिच्यात वापरण्यात येईल अथवा मुर्तीकारांना वाटप करण्यात येते. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता दररोज केली जात आहे. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो. (Ganesh visarjan 2024)

     
          गणेशोत्सवात गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या आहेत. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

        त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.गणेशोत्सव प्रसंगी महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा श्री गणेशोत्सव हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Chandrapur Transport System : चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    Chandrapur Transport System : चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

    Chandrapur Transport System चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅलीमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यादरम्यान रहदारीला कोणताही अडथळा तसेच जनतेला त्रास होऊ नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी 16 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता पासून दुपारी 3 वाजेपर्यंत शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

    Chandrapur transport system या बदलानुसार कोहिनूर ग्राउंड – दस्तगीर चौक- गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक -जटपुरा गेट- कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंड पर्यंतचा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच हा रस्ता नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे.

    अवश्य वाचा : असंख्य युवकांचा शिवसेना पक्षात प्रवेश

    नागपूरकडून शहरांमध्ये जाणारी वाहने (जड वाहने वगळून) घुटकाळा, श्री टॉकीज पठाणपुरा परिसरात जायचे असल्यास जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळण घेऊन रामनगर -संत केवलराम चौक- सेंट मायकल स्कूल -सवारी बंगला चौक नगिनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करतील.

    शेतकऱ्यांना वीज मोफत

    चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशांनी नागपूर, वणी, घुग्गुस , गडचांदूर कडे जाणाऱ्या प्रवाशांनी रहमतनगर, नगीना बाग व इतर परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहमत नगर, दाताळा इत्यादी मार्गाचा अवलंब करावा तसेच बल्लारशा व मूल कडून येणारी वाहनांना शहरांमध्ये जावयाचे असल्यास बस स्टॅन्ड, एलआयसी ऑफिस, बगड खिडकी मार्गे किंवा जूनोना चौकातून शहरांमध्ये किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपकडून बाबुपेठ मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

    जुलूस व रॅली दरम्यान वरील वाहतूक व्यवस्थेचे सर्व नागरिकांनी पालन करून जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.