चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.
bus stand chandrapur पावसाच्या पाण्याच्या गळतीने नुकतेच प्रकाश झोतात आलेले चंद्रपुरातील मुख्य बस स्थानकाचे आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
Bus stand chandrapur दोन दिवसांपूर्वी पावसाने मुख्य बस स्थानकाला गळती लागल्याचा प्रकार जनविकास सेनेने उघडकीस आणला होता, विशेष म्हणजे बस स्थानक अजूनही पूर्णपणे तयार झालेले नाही.
उदघाटन कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले, गडचिरोलीखासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार किर्तीकुमार भांगडीया, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, संचालक माधव कुसेकर व मनपा आयुक्त विपीन पालिवाल उपस्थित राहणार आहे. Sudhir mungantiwar
आयोजित उदघाटन कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीकांत गभने, प्रादेशिक व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता शीतल गोंड व विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे यांनी केले आहे.
राम भक्तांसाठी आनंदाची बातमी
अजूनही मुख्य बस स्थानकाचे काम काही प्रमाणात बाकी आहे, बस स्थानकातील गाळे सुद्धा हस्तांतरित करण्यात आले नाही, मात्र एका राजकीय पदाधिकाऱ्याला एक गाळ देण्यात आले आहे.
Industrial Estate चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. देशाच्या विकासात चंद्रपूरची भूमिका महत्त्त्वाची आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. जिल्हा औद्योगिकदृष्ट्या पुढे जावा या दृष्टीने मार्च महिन्यामध्ये ॲडव्हान्टेज चंद्रपूरचे आयोजन केले गेले. या ॲडव्हान्टेज चंद्रपूर मध्ये विविध कंपन्यांनी सामंजस्य करार (MOU) केलेत. त्याचा लाभ स्थानिक परिसराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीतून होईल. यातून देशाच्या विकासात हातभार लागणार असून चंद्रपूर औद्योगिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Industrial Estate चंद्रपूर इंडस्ट्रियल इस्टेट येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, इंडस्ट्रियल इस्टेटच्या अध्यक्षा कल्पना पलीकुंडवार, उपाध्यक्ष पदमकुमार नायर, राहुल पावडे, मनोज सिंघवी, सुभाष कासनगोट्टूवार तसेच इंडस्ट्रियल इस्टेटचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील विकासासाठी योगदान देण्याची इच्छा मनात होती, असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘पोंभुर्ण्यामध्ये 5 हजार एकरवर एमआयडीसी स्थापन करण्यात येत आहे. लक्ष्मी मित्तल ग्रुप 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातला नव्हे तर आशियातला सर्वात मोठा स्टील प्लांट टाकू इच्छितात. त्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, त्यादृष्टीने प्रवास सुरू झाला आहे. या माध्यमातून हा जिल्हा महाराष्ट्रात निश्चितपणे पुढे जाईल, असा विश्वास मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. (Industrial Estate)
या जिल्ह्यातील महामार्ग, समृद्धी महामार्ग पोंभुर्णा ते गडचांदूरपर्यंत जोडण्यात येत आहे. कमी कालावधीमध्ये मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल यादृष्टीने कार्य केले जात आहे. तेलंगणा राज्याशी व्यावसायिक, व्यापारी आणि औद्योगिक संबंध प्रस्थापित करता यावे यासाठी नागपूर-हैदराबाद ही वंदे भारत ट्रेन जोडण्याचे कार्य केले. वंदे भारत ट्रेनला नागपूर-सिकंदराबादच्या मध्ये चंद्रपूर व बल्लारशा येथे थांबा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कौशल्य विकास उद्योगांमध्ये यावे या दृष्टीने एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे 600 कोटी रुपयांचे उपकेंद्र तयार होत आहे. ज्यामध्ये महिलांना 62 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील आय.टी.आय. मधून उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ प्राप्त व्हावे यासाठी आय.टी.आय. अत्याधुनिक करण्यात येत आहे. बल्लारपूरचे आय.टी.आय. मॉडेल करण्यासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचेही ते म्हणाले. (Industrial Estate)
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कुशल मनुष्यबळ उद्योगधंद्यांना पुरविण्यात येत आहे, औद्योगिक आस्थापनांनी त्यांच्या ज्ञानाचा, परिश्रमाचा आणि कष्टाचा उपयोग उद्योग वाढीसाठी करू शकतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये अनेक शैक्षणिक संस्था आणल्या. सर्वप्रथम अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, कृषी महाविद्यालय, एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र, स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. चंद्रपूरमध्ये होणारे कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, सैनिक शाळा बघितल्यास अभिमान वाटेल. अशी सर्वोत्तम कामे करण्यात आली आहे. (Industrial Estate)
60 हजार सौर कृषी पंपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्याकरिता गौरवाची बाब
चंद्रपूरमध्ये दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आले असून आता चंद्रपूरचे नाव देखील देशाच्या बाहेर जात आहे. ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या गर्भगृहापासून तर प्रत्येक द्वार बल्लारपूरच्या काष्ठापासून तर संसदेचा प्रत्येक दरवाजा बल्लारपूरच्या काष्ठापासून तयार झाले आहे. पुन्हा एक पाऊल पुढे टाकत पीएमओचे संपूर्ण कार्यालय बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होत आहे. पंतप्रधानांची सर्वोच्च खुर्ची देखील बल्लारपूरच्या लाकडापासून निर्मित असेल ही गौरवाची बाब असल्याचे श्री. मुनगंटीवार म्हणाले. (Industrial Estate)
12 कोटीचे बस स्थानक आणि लागली गळती
एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी
जोधपूर हे देशातील सर्वात जास्त फर्निचर एक्सपोर्ट करणारे केंद्र आहे. येथून साधारणत: वर्षाला 300 कोटी रुपयांचे फर्निचर एक्सपोर्ट केल्या जाते. त्यामुळे एम.आय.डी.सी.च्या धर्तीवर फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफ.आय.डी.सी.) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एम.आय.डी.सी.तील 10 एकर जागेमध्ये जगातील सर्वात उत्तम फर्निचरचे काम सुरू करण्यात येत असून चंद्रपूरच्या एफ.आय.डी.सी.मधून फर्निचर एक्सपोर्ट मध्ये चंद्रपूर जोधपुरलाही मागे टाकेल, या दृष्टीने काम करण्यात येत असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ex corporator joins congress चंद्रपूर जिल्हा हा कॉग्रेस चा बालेकिल्ला असून काही चुकांमूळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर विधानसभेत आमदार निवडून येत नव्हता. परंतू यावेळी चंद्रपूर विधानसभेसह लोकसभा क्षेत्रातील सर्वच आमदार निवडून आणणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुधाकर अंभोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले.
ex corporator joins congress येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणूका होणार असून प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त करीत प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षा शी प्रामाणिक राहून काम केल्यास विजय सोपा होतो, असे प्रतिपादन केले. तसेच पक्षश्रेष्ठी ज्याला कोणाला संधी देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे मत देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
श्री. सुधाकर अंभोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दि. 07 ऑक्टोंबर रोजी पार पडला. यावेळी भाजपा च्या माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला.
चंद्रपूर मुख्य बस स्थानक
यावेळी सुभाष धोटे म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष असून येथे सर्वांना न्याय मिळत असतो. यावेळी मंचावर कॉग्रेस शहर अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, महिला कॉग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे यांच्या सह अनेक पदधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
mahakali mahotsav shobha yatra आज जैन मंदिर येथून निघालेल्या शोभायात्रेने माता महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. सराफा असोसिएशनच्या वतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. जैन मंदिर येथून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रा आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवास्थानी पोहल्यानंतर आ. जोरगेवार यांनी सपत्निक दर्शन घेतले.
mahakali mahotsav shobha yatra पाच दिवस चालणार असलेल्या श्री माता महाकाली महोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. सकाळी 9 वाजता सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथुन शोभायात्रा काढली होती. या शोभायात्रेत माता महाकालीची चांदीची उत्सव मुर्ती ठेवण्यात आली होती. सदर शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दाखल झाली.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहपत्नीक मातेची पूजा करुन शोभायात्रेत सहभाग घेतला. सदर शोभायात्रा महाकाली महोत्सव पेंडालात पोहचल्या नंतर मुर्तीची विधीवत प्राणप्रतिस्थापना करण्यात आली. आज सायंकाळी प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा यांच्या भक्तिमय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
200 unit free आमदार किशोर जोरगेवार यांनी वर्ष 2019 च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेतील जनतेला निवडून आलो तर 200 युनिट आपल्याला कसे मोफत मिळणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचा प्रचार त्यांनी केला होता. निवडणूक जिंकल्यावर विरोधी पक्षाने 200 युनिट चे काय झालं याबाबत त्यांना उत्तर विचारू लागले, काय झालं 200 युनिट चे याबाबत स्वतः आमदार जोरगेवार यांनी खुलासा केला आहे.
200 unit free निवडणुकीत विरोधकांचा दारुण पराभव केल्यावर किशोर जोरगेवार यांचं नाव राज्यातील प्रत्येक पुढाऱ्यांच्या तोंडी आलं, एका अपक्ष उमेदवाराने मोदी लाटेत भाजप च्या दोनवेळा आमदार राहिलेल्या उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला, त्याकाळी जोरगेवार यांना हरविण्यासाठी मंत्र्यांना रस्त्यावर उतरायला लागले होते, मात्र त्यावेळी जोरगेवार यांच्या त्सुनामी मध्ये विरोधक अक्षरशः वाहून गेले होते.
निवडणुकीत विजयी झाल्यावर त्यांनी जनतेला सर्वात आधी 200 युनिट मोफत मिळावे यासाठी प्रयत्न करू अशी घोषणा केली, त्यांनी विधानसभा अधिवेशनात अनेकदा 200 युनिट चंद्रपुरातील जनतेला मोफत मिळायला हवे यासाठी आवाज बुलंद केला, आम्ही वीज उत्पादक जिल्ह्यातील रहिवासी आहो, वीज निर्मिती करताना आम्ही मोठी किंमत मोजत आहो.
औष्णिक वीज प्रकल्पाने चंद्रपुरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, इतकं असताना सुद्धा सरकारने जोरगेवार यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. 200 unit free
महाविकास आघाडी व त्यानंतर महायुती सरकार या दोन्ही सरकारमध्ये जोरगेवार सामील होते, महाविकास आघाडी सरकारमध्ये तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 200 नाहीतर 100 युनिट वीज मोफत देऊ असे ठरले होते मात्र कालांतराने राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याने महाविकास आघाडी सरकार पायउतार झाली आणि महायुती सरकार स्थापन झाले.
महायुती सरकारच्या कार्यकाळात नागपूर अधिवेशनात 200 युनिट साठी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर ते नागपूर पर्यंत मोर्चा काढला त्यावेळी त्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय होणार असे आश्वासन त्यांना मिळाले मग नंतर काय झालं? यावर स्वतः जोरगेवार यांनी खुलासा केला आहे. Free electricity
आमदार जोरगेवार म्हणाले की चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे, त्याकरिता 200 युनिट वीज मोफत मिळावी असे सर्व निकष आपल्या बाजूने आहे, मात्र राज्यातील 288 आमदार पैकी फक्त एकट्याने आवाज उठविला, त्यांनतर आम्ही इतर वीज उत्पादक क्षेत्रातील आमदारांना याबाबत आवाज उचलायला सांगितले त्यांनी आवाज बुलंद केला, व आमच्या मागणीला हिरवी झेंडी मिळणार होती पण त्यावेळी काही मंत्र्यांनी या पाठपुराव्याचे श्रेय अपक्ष आमदाराला मिळणार म्हणून संपूर्ण ताकदीने विरोध दर्शविला आणि आमच्या तोंडाजवळील घास हिसकविण्यात आला.
आम्हीच आता गप्प बसणार नाही आमची मागणी रास्त आहे भविष्यात आम्ही यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया जोरगेवार यांनी दिली.
Shri mata mahakali mahotsav श्री महाकाली माता महोत्सव ट्रस्ट तर्फे 5 दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन 7 ते 11 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Shri mata mahakali mahotsav यंदा महाकाली महोत्सवाचे 3 रे वर्ष असून यंदा विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध भजन गायक अनुप जलोटा उपस्थित राहणार आहे. मागील 3 वर्षांपासून नवरात्रला आराध्य दैवत महाकाली माता मंदिराच्या प्रांगणात महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
7 ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता जैन मंदिर संस्था व सराफा असोसिएशनच्या वतीने श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा शहरात काढण्यात येणार आहे. Shri mata mahakali mahotsav
शोभायात्रा नंतर 51 फूट उंचीच्या महाकाली महोत्सव ध्वजाचे ध्वजारोहण झाल्यावर महाकाली मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यावर महोत्सवाचे उदघाटन होणार आहे.
यावेळी आयोजित महोत्सवात आरोग्य शिबिराचे उदघाटन, चित्र प्रदर्शीनी, गायत्री कोतपल्लीवार तर्फे देवीचे नव स्वरूप यावर संगीतमय प्रवचन असे विविध कार्यक्रमानंतर सायंकाळी 6 वाजता भजन गायक अनुप जलोटा यांचे भजन. Shri mata mahakali mahotsav
8 ऑक्टोबर रोजी 999 जेष्ठ माय-माऊलींचा सन्मान सोहळा, नृत्य जल्लोष, जागर कवितेचा, राम आयेंगे राम आयेंगे या गाण्याची प्रसिद्ध गायिका स्वाती मिश्रा यांचे भक्तिमय संगीत कार्यक्रम, 9 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम यामध्ये सायबर सेल तर्फे महिलांना मार्गदर्शन, महाकाली आरती, मेरा भोला है भंडारी या गाण्याचे गायक हंसराज रघुवंशी यांचा भक्तिमय कार्यक्रम. 10 ऑक्टोबर रोजी महाकाली महोत्सवातील स्वयंसेवकांचा सन्मान सोहळा, सायंकाळी श्री माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखीला प्रारंभ.
विशेष बाब म्हणजे महाकाली महोत्सव काळात जन्म घेणाऱ्या मुलींना आयोजकांतर्फे चांदीचे नाणं देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन, नागपूर येथील रिम्पू चंचल आणि पवन ग्रुपच्या वतीने भक्तिमय संगीत कार्यक्रम. 5 दिवसीय महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन व भोजन, लेणं सौभाग्याचं, महिलांना हिरव्या बांगड्यांची भेट, आत्मनिर्भर दुर्गा यांचा सत्कार असे विविध भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन या महोत्सवात होणार असल्याची माहिती आमदार जोरगेवार यांनी यावेळी दिली.
bjp protest चंद्रपूर जिल्हयातील कोरपना तालुका येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेत शिकणा-या १२ वर्षीय विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष शिक्षक अमोल लोडे याने माणुसकीला काळीमा फासणारे निच कृत्य केले. या विरोधात विद्यार्थीनीला न्याय मिळावा याकरिता भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर द्वारे जाहीर निषेध करत तिव्र आंदोलन करण्यात आले.
bjp protest दिनांक ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर व वर्धा जिल्हा यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर द्वारे जाहीर निषेध करीत तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष शिक्षक अमोल लोडे याच्या पुतळयाला काळे फासुन चप्पल जोडे मारून पुतळयाचे दहन करण्यात आले.
चंद्रपुरात बदलापूर
देशातील मुली व महिला सुरक्षीत राहाव्यात याकरिता कायमच भारतीय जनता पार्टी कार्यरत असून अश्या प्रकारचे निच कृत्य करणा-यांविरोधात कायमच पुढे आहे. या आंदोलनामध्ये चंद्रपूर महानगर भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी बदलापूर घटनेतील आरोपीला ज्या पध्दतीने शिक्षा देण्यात आली त्याचप्रमाणे अमोल लोडे याला देखील शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. Bjp protest
यावेळी आंदोलनात चंद्रपूर महानगर भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्यासह महामंत्री गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, यश बांगडे, पप्पू बोपचे, सुनील डोंगरे, आदिवासी आघाडी युवती प्रमुख तृष्णा गेडाम, राकेश बोमनवार, अमित निरंजने, कुणाल गुंडावार, पराग मलोडे, पवन ढवळे, मनीष पिपरे, पार्थ कंचर्लावार, प्रवीण उरकुडे, स्नेहीत लांजेवार, दर्शन बेले, राहुल पाल, रोशन खोब्रागडे, मयूर चहारे, हर्ष पोपट, राहुल कांबळे, गजानन भोयर, रघु गुंडला, आकाश लकाकुल्ला, योगेश अंड्रस्कर, गणेश बानकर, आतिश हटवाल, स्वप्नील भोपये, अमन मुंदडा, तेजस अलवलवार, यश ठाकरे, शुभम निंबाळकर, हेमंत सिंघवी, मोहन मंचलवार, ऐश्वर्य बांगडे, हिमांशू पन्नासे, दीपक हूड, मनोज उगेमुगे, कुणाल आंबेकर, सौरभ मेश्राम, सागर गटलेवार, मुकेश देशपांडे, स्वप्नील निंबाळकर, आकाश मालेकर युवा मोर्चाचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. Bjp protest
mata mahakali festival श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच असलेल्या महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्री माता महाकाली ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
mata mahakali festival श्री माता महाकाली महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात सुंदर रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर सजविण्यात आला आहे. नुकतेच राज्यपालांच्या हस्ते राजस्थान येथे तयार करण्यात आलेल्या माता महाकाली महोत्सवाच्या रथाचे विधिवत पूजन महामहिम सि. पी. राधाकृष्णन यांनी केले.
पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात स्थानिक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. तसेच महाकाली महोत्सवावर आधारित चित्रकला स्पर्धेचेही आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.
दरम्यान, महाकाली मंदिरासमोर 51 फूट उंच ध्वज तयार करण्यात आला आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात भरणाऱ्या यात्रेत व महाकाली महोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी येथे ध्वजारोहण केले जाते. यंदाही श्री माता महाकाली महोत्सव समितीची संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तत्पूर्वी, याचे विधिवत पूजन पार पडले. यावेळी माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली महोत्सवाची चर्चा राज्यभरात होत असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने यंदाचे महोत्सवही अभूतपूर्व होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
Mahakali mahotsav श्री माता महाकाली महोत्सवाच्या दरम्यान 10 ऑक्टोबर रोजी श्री माता महाकालीची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. यात राजस्थान येथील जयपूर येथे तयार झालेल्या रथातून माता महाकालीची मूर्ती नगर प्रदक्षिणेत सहभागी होणार आहे. या रथाचे राज्याचे राज्यपाल सि. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर रथ श्री महाकाली माता ट्रस्टतर्फे महाकाली मंदिराला सुपूर्त करण्यात आला.
Mahakali mahotsav यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, श्री माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार, सचिव अजय जयस्वाल, विश्वस्त सुनील महाकाले, कोषाध्यक्ष पवन सराफ, श्यामसुंदर धोपटे, राजेंद्र शास्त्रकार, मिलिंद गंपावार, जयश्री कापसे गावंडे, मनीषा पडगीलवार, वंदना हातगावकर, सविता दंढारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
चंद्रपूरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 ऑक्टोबरपासून सदर महोत्सवाला सुरुवात होणार असून, याची जय्यत तयारी चंद्रपूरात सुरू झाली आहे. यंदा प्रथमच नगर प्रदक्षिणेत मातेची मूर्ती रथामधून नेण्यात येणार आहे, आणि हा भव्य आणि सुंदर रथ राजस्थान येथे तयार करण्यात आला आहे. काल राज्याचे राज्यपाल महामहिम सि. पी. राधाकृष्णन चंद्रपूर दौऱ्यावर असताना त्यांनी माता महाकाली मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते माता महाकाली महोत्सवासाठी राजस्थान येथे तयार करून आणलेल्या रथाचे विधिवत पूजन करण्यात आले. Mahakali mahotsav
हा रथ तयार करण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला असून, सदर रथ 17 फूट उंचीचा आहे, तर या रथाची लांबी 22 फूट आहे. रथावर माता लक्ष्मी आणि माता महाकालीच्या शक्तीचे प्रतीक असलेली सिंहाची मूर्ती साकारण्यात आली आहे. तसेच यावर पोतराजे आणि मातेचे सिंहासन आहे. हा रथ दोन मजली असून, महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.
यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, “माता महाकाली ही शक्तीचे केंद्र आहे. येथे आल्यावर सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला. असे महोत्सव धार्मिक एकतेसाठी आवश्यक आहेत. यातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होणार आहे.” यावेळी श्री महाकाली माता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह माता भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ai technology in education चंद्रपूर जिल्हा विकासासाठी AAP ची राज्यपालांशी महत्त्वपूर्ण भेट
ai technology in education – चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय राज्यपाल महोदयांनी आज एका महत्त्वपूर्ण दौऱ्यात भेट दिली. या भेटीदरम्यान आम आदमी पक्षाच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील गंभीर समस्या मांडल्या आणि त्यांच्या निराकरणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी केली.
इराई नदी खोलीकरण व ब्लू लाईन समस्या: ब्ल्यू लाईन परिसरातील महानगरपालिकेची कार्यवाही तात्काळ थांबवणे नागरिकांना बांधकामाची परवानगी देणे आणि नदीचे खोलीकरण आणि ब्लू लाईन परिसरातील दीर्घकालीन उपाययोजना आखण्याची मागणी करण्यात आली. या उपायांमुळे पुराचा धोका कमी होणे, नागरिकांचे जीवन व मालमत्ता सुरक्षित राहणे आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होणे अपेक्षित आहे.
शिक्षण क्षेत्रात AI तंत्रज्ञान: सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढण्याकरिता AI तंत्रज्ञान, अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा, शिक्षक प्रशिक्षण आणि रिक्त पदे भरण्याची मागणी करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी शाळा कडे आकर्षण वाढेल आणि आधुनिक शिक्षण मिळणे, डिजिटल दरी कमी होणे आणि रोजगारक्षमता वाढणे अपेक्षित आहे. (ai technology in education)
आरोग्य व्यवस्था सुधारणा: रुग्णालयांमधील औषधांचा तुटवडा दूर करणे, सिटीस्कॅन एमआरआय मशीन सारख्या अत्याधुनिक मशनरी चा त्वरित पुरवठा करणे,कर्मचारी कमतरता निवारण आणि प्रत्येक तालुक्यात सुसज्ज रुग्णालय उभारण्याची मागणी करण्यात आली. यामुळे सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणे, आरोग्य निर्देशांक सुधारणे आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवा मजबूत होणे अपेक्षित आहे.
चंद्रपूर शहर बायपास: बायपास रस्त्याच्या बांधकामाला तात्काळ मंजुरी व निधीची मागणी करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी कमी होणे, अपघातांचे प्रमाण घटणे अपेक्षित आहे.
पर्यावरण संरक्षण: सूर्जागढ खदान व घुगुस येथील लॉयड्स मेटल प्रस्तावित प्रकल्पांना विरोध दर्शवण्यात आला. यामुळे नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि स्थानिक पर्यावरण आणि नागरिकांचे आरोग्य संतुलन राखले जाणे अपेक्षित आहे.
स्थानिक उद्योग विकास: स्थानिक उद्योगांसाठी विशेष आर्थिक पॅकेज, कर सवलती आणि नवीन विशेष औद्योगिक क्षेत्र विकसनाची मागणी करण्यात आली. यामुळे रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्था बळकटीकरण आणि युवकांना स्थानिक पातळीवर संधी मिळणे अपेक्षित आहे.
कोळसा क्षेत्रातील भ्रष्टाचार निर्मूलन: WCL, कोल वॉशरी, रेल्वे साईडिंग आणि CSTPS मधील कथित चूरी मिक्स कोळसा घोटाळ्याची CBI चौकशीची मागणी करण्यात आली. यामुळे पारदर्शकता वाढणे, सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण होणे आणि विज दर कमी होतील.
राज्यपाल महोदयांनी या सर्व समस्यांचे गांभीर्य ओळखून त्यांच्या निराकरणासाठी जिल्हाधिकारी यांना तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. (ai technology in education)
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मयूर राईकवार यांनी सांगितले, “चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या उपाययोजनांमुळे जिल्ह्याचा आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकास होणे अपेक्षित आहे. आम्ही या प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवून असू आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.”
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते सुनिल मूसले, जिल्हा सचिव राजकुमार नगराले आणि जिल्हा सचिव प्रशांत सिदुरकर देखील उपस्थित होते.