Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Nuisance Investigation Team : चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    Nuisance Investigation Team : चंद्रपूर मनपाची मोठी कारवाई

    Nuisance Investigation Team चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर धडक कारवाई सुरूच असुन उपद्रव शोध पथकाद्वारे शहरात २ जागी कारवाई करून सुमारे २ हजार ६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    Nuisance Investigation Team  बंदी असलेल्या व एकदाच वापर करता येणाऱ्या प्लास्टिकवर कारवाई करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार ८ टीम्स बनविण्यात आल्या आहेत. या सर्व चमूंनी काल शहरात एकाच वेळी कारवाई सुरु केली. यात पठाणपुरा येथील वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट तसेच बिनबा गेट येथील कुमार ट्रान्सपोर्ट या दोन्ही गोडाऊनवर संध्याकाळच्या सुमारास उपायुक्त रवींद्र भेलावे व सहायक आयुक्त अक्षय गडलिंग यांच्या वेगवेगळ्या चमुने धाड टाकत वाडी गोल्ड ट्रान्सपोर्ट येथुन २ हजार १० किलो तर कुमार ट्रान्सपोर्ट येथुन ५० किलो असे एकुण २ हजार ६० किलो बंदी असलेले प्लास्टिक जप्त केले. 

    गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेज च्या मागील झुडपात सुरू होता हा खेळ  

    यावेळेस सुद्धा या गोडाऊन संबंधी गुप्त माहिती मनपास प्राप्त झाली होती. प्लास्टीक साठा,पिशव्यांची माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येत असुन दिलेली माहीती खरी निघाल्यास ५ हजारांचे बक्षिस दिल्या जात असल्याने अनेक सुजाण व्यक्तींकडुन अवैध साठ्यासंबंधी तक्रारी मनपास प्राप्त होत आहेत. Nuisance Investigation Team

         एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया,डोमा रंगारी, बंडू चहारे, विक्रम महातव,डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

  • Confiscation of banned plastic : अवैध प्लॅस्टिक ची वाहतूक मनपाने केली कारवाई

    Confiscation of banned plastic : अवैध प्लॅस्टिक ची वाहतूक मनपाने केली कारवाई

    Confiscation of banned plastic चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास रामाळा तलावाजवळ ४०७ या वाहनाद्वारे अवैध प्लास्टीकची वाहतुक करणाऱ्या प्रवीण काशिनाथ कांबळे यांच्यावर कारवाई करून ३७४ किलो प्लास्टीक जप्त केले आहे.

    बनावट दारू आणि ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा


      Confiscation of banned plastic आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या निर्देशानुसार प्लास्टीक निर्मुलन कारवाईसाठी ८ पथक तयार करण्यात आले होते. यातील सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील पथकास ४०७ या गाडीतुन मोठ्या प्रमाणात प्लास्टीकची वाहतुक केली जात असल्याची गुप्त माहीती मिळाली. माहितीच्या आधारे पाहणी केली असता २२ किलो वजनाचे १७ पोते या गाडीत आढळुन आले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन साठा मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.


        एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.


         सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भेलावे  व उपायुक्त मंगेश खवले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, डॉ. अमोल शेळके,राहुल पंचबुद्धे,स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, जगदीश शेंद्रे,मनीष शुक्ला,अनिल खोटे, भरत बिरिया, बंडू चहरे, विक्रम महातव, डोमा विजयकर,अमरदीप साखरकर यांनी केली.

  • Chandrapur mahanagar palika : चंद्रपूर मनपाचे उत्कृष्ट नियोजन

    Chandrapur mahanagar palika : चंद्रपूर मनपाचे उत्कृष्ट नियोजन

    Chandrapur mahanagar palika जिल्हा प्रशासन,पोलीस प्रशासन व चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त नियोजनाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. चांदा क्लब वर स्टॉल उभारल्याने गर्दीचे योग्य नियोजन व सुविधा होण्यास त्याचप्रमाणे सोहळ्यादरम्यान व सोहळ्यानंतर मनपा स्वच्छता विभागाने उत्कृष्ट कार्य केल्याने परिसर सातत्याने स्वच्छ राखण्यास मदत मिळाली.  

    राजकीय : वंचित बहुजन आघाडीची यादी जाहीर, चंद्रपुर विधानसभेतून कोण?

         
     Chandrapur mahanagar palika सोहळ्यादरम्यान दीक्षाभुमी परिसर पुर्णवेळ स्वच्छ राहतील यासाठी मनपा स्वच्छता विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात आले. १५० स्वच्छता कर्मचारी २ शिफ्ट मध्ये परिसरात पुर्णवेळ कार्यरत होते. प्रत्येक कर्मचाऱ्याला परिसर विभागुन देण्यात आल्याने ठराविक वेळाने परिसर स्वच्छ केला जात होता. जागोजागी असे १०० डस्टबिन उभारण्यात आले होते तसेच हा जमा झालेला कचरा नेण्यास १० मोठे कंटेनर उभे करण्यात आले होते.तसेच रात्रीसाठी ३ ऑटो टिप्परद्वारे कचरा वाहुन नेण्याचे काम सातत्याने करण्यात आल्याने परिसरात कुठेही अस्वच्छता निर्माण होऊ शकली नाही.  


        दीक्षाभुमी  सोहळ्यास जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असल्याने वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्यात आला होता. अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग वेगळा, शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था वेगळ्या मार्गाने व दीक्षाभूमी सोळयास येणाऱ्या नागरिकांकरीता वाहन पार्किंग स्थळांची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व व्यवस्थेची दिशादर्शक फलक मनपातर्फे लावण्यात आले होते.      


         परिसरात येणार जनसागर पाहता नागरिकांचा प्रवेश हा चांदा क्लब मार्गे ठेवण्यात आला होता.कार्यक्रमाच्या २ दिवस आधीच मनपातर्फे अन्नदानाचे व इतर स्टॉल्स हे चांदा क्लब ग्राउंडवरच लावण्यात येणार असल्याची जनजागृती केल्याने सर्व स्टॉल्स हे ग्राउंडच्या आतच लागले त्यामुळे सर्व नागरिकांना शांततेत अन्नदानाचा लाभ घेता आला. Chandrapur mahanagar palika


         हायमास्ट लाईट उपलब्ध करून देण्यात आले असल्याने परिसरात अंधूक प्रकाशाचा त्रास जाणविला नाही. दीक्षाभुमी परिसरात तथा चांदा क्लब ग्राऊंडवर पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा, कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र, अग्निशमन वाहने सुद्धा मनपातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती.संपूर्ण परिसर लाकडी कठड्यांनी विभागून ठेवण्यात आला जेणेकरून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच पोलिस विभागाचे मदत केंद्र आदी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही.

  • Mahila Bachat Gat : बाबूपेठ येथे महिला बचत गटांची आढावा बैठक

    Mahila Bachat Gat : बाबूपेठ येथे महिला बचत गटांची आढावा बैठक

    Mahila Bachat Gat बाबूपेठ महिला बचत गटांची आढावा बैठक – महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सोबतच, वैचारिक पातळी उंचावणे काळाची गरज-सौ चंदाताई वैरागडे


    Mahila bachat gat बाबूपेठ प्रभागातील एकूण बारा महिला बचत गटाची आढावा बैठक बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे अध्यक्षतेखाली, सर्व बचत गटाचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

    राजकीय : चंद्रपुरात राजकीय बालिशपणा

    बैठकीत वर्षभरात बचत गटांनी राबविलेले उपक्रम,आर्थिक देवाण घेवाण,बचत गटात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान ,पुढे राबविण्यात येणार उपक्रम यावर सविस्तर मार्गदर्शन करताना अध्यक्ष चंदाताई वैरागडे यांनी बचत गटाची स्थापना केवळ आर्थिक देवाण घेवणीसाठीच केलेली नसून महिलांचे सक्षमीकरण करून महिलांना स्वावलंबी करून प्रत्येक महिलांचे इतरांविषयीचे विचार सुद्धा सकारात्मक असले पाहिजे.

    या प्रत्येक महिलांच्या विश्वासानेच हेवेदावे नसल्याने बचतगटाच्या माध्यमातून महाराष्ट्रत पहिली रणरागिणी महिला नागरी पतसंस्था स्थापन सुद्धा केली.महिलांनी एकमेकांसोबत सलोख्याचे संबंध जोपासले पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले अस म्हणता येईल,असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

    गुन्हेगारी – क्षुल्लक वादातून चंद्रपुर शहरात हत्या


    दोन सत्रात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत रणरागिणी महिला बचत गट,राजराजेश्वर, गायत्री,सखी माऊली, सहेली,महाकाली,परिवार, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, रणरागिणी, हिरकणी दामीनी इत्यादी महिला बचत गटाच्या अध्यक्षा ,वैशाली ऐसेकर, शुभांगी कंदलवार,प्रणिता हजारे स्नेहल अंबागडे, प्रियंका खणके, रजनी सातपुते, लीला बुटले, रजनी मडावी, सुवर्णा मत्ते, रेखा वैरागडे, स्नेहल बावणे,वर्षा साखरकर तसेच सर्व पदाधिकारी आणि एकूण 400 वरील महिला सदस्य उपस्थित होते.

  • Babupeth railway flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

    Babupeth railway flyover : बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

    Babupeth railway flyover 50 वर्षांपासून बाबूपेठ येथील नागरिक उड्डाणपुलाची मागणी करीत होते, मात्र उड्डाणपुलाच्या निर्माणात अनेक अडचणी आल्या मात्र पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बाबूपेठ वासीयांचे स्वप्न साकार झाले.

    Babupeth railway flyover आज 15 ऑक्टोबर या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपुरात लाखो नागरिकांना धम्म दीक्षा दिली आणि यादिवशी बाबूपेठ उड्डाणपूलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आले याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    महत्त्वाचे : टिल्लू पंप लावणार तर मनपा टाकणार काळ्या यादीत


    बाबूपेठ उड्डाणपूलाचा नामकरण सोहळा आज पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी मुनगंटीवार म्हणाले की मी अर्थमंत्री असताना या उड्डाणपूल बाबत मी दखल घेत केंद्र सरकारतर्फे मंजुरी मिळवून दिली, आणि बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम सुरू झाले मात्र महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निधी थांबला आणि काम पुन्हा थांबले नंतर महायुतीचे सरकार आल्यावर उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आणि आज हा उड्डाणपूल तयार झाला.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल


    आजचा शुभ दिवस व नागरिकांची मागणी नुसार उड्डाणपुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात आलं.
    आयोजित नामकरण कार्यक्रमाला बाबूपेठ वासीयांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • auto rickshaw stand : चंद्रपुरातील हाय-फाय ऑटो रिक्षा स्टॅन्ड

    auto rickshaw stand : चंद्रपुरातील हाय-फाय ऑटो रिक्षा स्टॅन्ड

    auto rickshaw stand राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे चंद्रपूरच्या ऑटोरिक्षाचालकांसाठी अत्यंत आकर्षक असा ऑटोस्टँड (स्थानक) साकारला आहे. या स्थानकाचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन ऑटोरिक्षाचालकांसाठी अशाप्रकारची सोय करून देणे, ही दुर्मिळ बाब असल्याची भावना ऑटोरिक्षाचालकांमधून व्यक्त होत आहे.

    अवश्य वाचा : महाकाली महोत्सवाचा शानदार समारोप

    auto rickshaw stand ‘नवरात्रीच्या शुभपर्वावर शहरातील ऑटो रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर आनंद बघताना आंतरिक समाधान लाभत आहे. अत्यंत कष्टाने आयुष्य जगणाऱ्या या ऑटोचालक बांधवांसाठी, त्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी आणण्यासाठी  लोकप्रतिनिधी म्हणून मला काही करता आले याचा अभिमान आहे,’ असे भावनिक प्रतिपादन राज्याचे ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

    चंद्रपूर बस स्थानका शेजारी अतिशय उत्तम दर्जाचे ऑटोस्टॅंड महानगरपालिकेच्या माध्यमातून पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी करून घेतले. लोकार्पण सोहळ्याला जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, मनपा आयुक्त श्री. विपीन पालीवाल, महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, प्रकाश धारणे,अनिल डोंगरे, नामदेव डाहुले, राजेंद्र खांडेकर, मधुकर राऊत, विनोद चन्ने, सुनील धंदरे यांच्यासह ऑटो रिक्षा युनियनचे पदाधिकारी व ऑटो रिक्षाचालक उपस्थित होते. Chandrapur

    महत्त्वाचे : शहरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकलचे वाटप

    ना. मुनगंटीवार म्हणाले, ‘ऑटो रिक्षाचालक हा समाजाचा प्रमुख घटक आहे. त्यांना सन्मानाने व समाधानाने जीवन जगता यावे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मला जे जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. ऑटो रिक्षा चालकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य लाभावे ही माझी मनोमन इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना व्यवस्थित घर मिळावे याचाही मी पाठपुरावा करीत आहे. (auto rickshaw stand)

    अनुदानित शाळांना महायुती सरकारचा दिलासा

    कल्याणकारी मंडळाची स्थापना
    ‘महाराष्ट्रातील लाखो ऑटो रिक्षा, मिटर्ड टॅक्सी चालकांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला; विशेष म्हणजे 9 मार्च 2018 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री असताना मी हा विषय प्रामुख्याने मांडला होता. ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळावा, कौटुंबिक सुरक्षा लाभावी या दृष्टीने पावले उचलण्याची सूचना केली होती,’ असेही ना. श्री. मुनगंटीवार यांनी नमूद केले.  Chandrapur

    ऑटोचालकांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार
    ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला मिळालेले हे  यश आणि आमच्या कल्याणासाठी त्यांच्याकडून होणारे प्रयत्न आम्ही कधीच विसरणार नाही अश्या भावना यावेळी ऑटो रिक्षाचालकांनी व्यक्त केल्या. ऑटो रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार आतिषबाजी करून व पुष्पहारासह ना. मुनगंटीवार यांचे स्वागत केले व आभार मानले.

    उत्तम दर्जाच्या व्यवस्था करा
    सन 2018-19 मध्ये ऑटो रिक्षा कल्याणकारी महामंडळ स्थापनेच्या दृष्टीने पाच कोटी रुपये इतका नियतव्यय राखून ठेवण्यात येत असल्याचेही ना. मुनगंटीवार यांनी त्यावेळी घोषित केले होते. ऑटो रिक्षा चालक, मीटर टॅक्सी चालक यांच्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांची भावना अत्यंत संवेदनशीलतेची असून चंद्रपूर येथील या अद्ययावत ऑटो रिक्षा स्टॅन्ड मध्ये उत्तम दर्जाच्या व्यवस्था असाव्या याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी उद्घाटनप्रसंगी महानगरपालिका प्रशासनाला दिल्या. या ऑटोरिक्षा स्टँड मुळे शहरातील प्रवाशांची सुद्धा चांगली सोय होणार आहे.

  • Chandrapur mahakali mahotsav : महाकाली महोत्सवाचा समारोप

    Chandrapur mahakali mahotsav : महाकाली महोत्सवाचा समारोप

    Chandrapur mahakali mahotsav चंद्रपूरच्या मातेची पालखी निघावी हा संकल्प केला होता, त्याची सुरुवातही झाली. मात्र, या महोत्सवाला इतके भव्यत्व मिळेल याची कल्पना नव्हती. हे केवळ लोकसहभागामुळेच शक्य झाले. आपण दिलेल्या साठीनेच चंद्रपूरचा हा महोत्सव देशपातळीवर पोहोचला आहे. या महोत्सवाचे नियोजन चंद्रपूरकरांनी हातात घेऊन पाच दिवस निःस्वार्थ सेवा दिली. या ऐतिहासिक भव्य महाकाली महोत्सवाचे खरे शिल्पकार चंद्रपूरकरच असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकलचे वाटप

    Chandrapur mahakali mahotsav पाच दिवस चाललेल्या श्री माता महाकाली महोत्सवाचा 9,999 कन्यापूजन आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि महोत्सवात सेवा देणाऱ्या चंद्रपूरकरांच्या सन्मान कार्यक्रमाने समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. 

    महिलांच्या आधारासाठी शक्तीसदन योजना

    यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, यंदा महोत्सवाचे तिसरे वर्ष साजरे केले. पाच दिवसांच्या महोत्सवामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. नागरिक आणि माता भक्तांनी केलेले सहकार्य कौतुकास्पद होते. हा चंद्रपूरकरांचा महोत्सव बनला आहे. पुढच्या वर्षी आपण पुन्हा या महोत्सवात याच उर्जेसह सहभागी होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मातेची नगर प्रदक्षिणा पालखी या महोत्सवाची आत्मा आहे. यंदाच्या पालखी शोभायात्रेची भव्यता आणि नियोजनबद्धता महोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारी ठरली, असेही त्यांनी सांगितले. (Chandrapur mahakali mahotsav)

    9999 कन्यांचे पुजन आणि भोजन

    श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महोत्सवात 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि कन्याभोजन कार्यक्रम पार पडला. यावेळी सर्व शक्तिरुपी कन्यांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन झाले. श्री माता महाकाली महोत्सव धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला.

    Kanya bhoj

    माता महाकाली महोत्सवात जिल्हाभरातील 9 हजार 999 कन्यांचे कन्यापूजन आणि भोजन कार्यक्रम घेण्यात आला. यात विविध शाळांतील विद्यार्थिनींनीही सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी महाकाली मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. कन्यापूजनानंतर शक्तिरुपी कन्यांना महोत्सव समितीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. या आयोजनात सहकार्य करणाऱ्या पालकांचेही समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

  • school girls : चंद्रपुरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकल वाटप

    school girls : चंद्रपुरातील 2 हजार 2 शाळकरी मुलींना सायकल वाटप

    school girls गरजू विद्यार्थिनींची शैक्षणिक वाटचाल सहज व सोपी होण्यासाठी आज २००२ शाळकरी मुलींना आज सायकल वाटप करण्यात येत असुन पुढील विजयादशमीस यापेक्षा अधिक म्हणजे ५ हजार गरजू मुलींना सायकल वाटप करणार असल्याचे मा.आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत प्रत्येक पायडल शिक्षणाच्या दिशेने सायकल वाटप सोहळ्यात ते बोलत होते.

    महत्त्वाचे : हाजी सरवर हत्याकांडातील मुख्य सूत्रधार कोण?


       school girls  ज्या समाजात महिलांचा सन्मान होतो तोच समाज खऱ्या अर्थाने संपन्न समजला जातो.माता महांकाली महोत्सवाच्या माध्यमातुन ९९९९ कन्यापुजन असो वा शाळकरी मुलींना सायकल वाटप असो, स्त्रीशक्तीचा सन्मान करण्याचे भाग्य मला लाभले आहे. शिक्षण पूर्ण न केल्याची वेदना फार मोठी असते याची जाणीव मला आहे त्यामुळेच अनेक गरजु विद्यार्थी ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांना पुढील वर्षी सायकल देऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आमदार महोदयांनी सांगितले.

       
        सर्वांच्या सह्कार्यातून शहराच्या विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजुर करून आणला आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी ११ ठिकाणी अभ्यासिका करण्याचा संकल्प आहे त्यातील ८ अभ्यासिका सुरु झाल्या आहेत याचा आनंद आहे. ज्याला कुणाचा आधार नाही त्याच्याकडे अम्माचा टिफिन जातो. आमदार निधीचा वापर हा शहराच्या विकासासाठी होईल याची सर्वांनी खात्री बाळगावी. school girls

    हाजी सरवर हत्याकांड बाबत पत्रकार परिषद

    आपले प्रत्येक पाऊल हे वंचितांच्या विकासाच्या दिशेने राहील असे प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.      
      याप्रसंगी शाळकरी मुली व त्यांच्या पालकांनी आनंद व्यक्त केला. सकाळी ८ वाजेपासुन आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नाश्ता देण्यात आला. कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सायकल वाटप सोहळा पार पडला.

    कार्यक्रमास उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त रवींद्र भेलावे, शहर अभियंता विजय बोरीकर,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,अक्षय गडलिंग, संतोष गर्गेलवार,चांदा क्लब सचिव डॉ.कीर्तीवर्धन दीक्षित,नागेश नित,चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विविध शाळांचे विद्यार्थी,शिक्षक उपस्थीत होते    

  • Yuva Sena : घर तिथं युवासैनिक अभियान, चंद्रपुरात युवासेनेची आढावा बैठक

    Yuva Sena : घर तिथं युवासैनिक अभियान, चंद्रपुरात युवासेनेची आढावा बैठक

    Yuva Sena दिनांक 11 ऑक्टोबर रोजी
    युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना -युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या आदेशाने तसेच कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे, पूर्व विदर्भ विभागीय सचिव सिनेट सदस्य निलेश बेलखेडे व चंद्रपूर युवासेना विस्तारक, संदीप रियाल (पटेल) यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आढावा बैठक जेष्ठ नागरी संघ सभागृह येथे पार पडली.

    Yuva sena चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल विचार करता सर्व पदाधिकारी कडून त्यांच्या विधानसभेचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी विधानसभेत आपला भगवा फडकवायचा असून त्यासाठी सर्व पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक जोमाने काम करून आपले कर्तव्य पार पाडावे व मशाल घरोघरी पोहोचवावी.

    महत्त्वाचे : दिक्षाभूमीसाठी चंद्रपुरात एल्गार मोर्चा

    शिक्षण, आरोग्य व रोजगार या बद्दल त्रिसूत्री कार्यक्रम राबवून युवक युवतीना सहकार्य करून युवासेनाचे कार्य करावे अशी सूचना यावेळी विभागीय सचिव सिनेट सदस्य इंजि.निलेश बेलखेडे यांनी केली. Yuva sena

    जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या कामाबद्दल विस्तारक संदीप रियाल पटेल यांनी समाधान व्यक्त करीत यापुढे संघटनात्मक बांधणी वर विशेष लक्ष दिल्या जाऊन पदाधिकारी यांनी चांगल कार्य करून युवासेना च्या माध्यमातून घर तिथे युवासैनिक राबवून पक्षाचे विचार घरोघरी पोहोचवा असे मार्गदर्शन केले.

    युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांनी जिल्ह्यातील विधानसभा पदाधिकारी यांचा परिचय करून देत आजवरच्या कार्याचा आढावा वरिष्ठ पदाधिकारी यांच्या समोर ठेवला व युवा सेनेच्या माध्यमातून यापुढे चांगल कार्य जिल्ह्यात केल्या जाणार याबद्दलचा विश्वास पदाधिकारी यांना दिला.

    यानंतर वरिष्ट पदाधिकारी यांनी युवासैनिकांसोबत चर्चा करीत त्त्यांचे मनोगत ऐकून त्त्यांचे मनोबल वाढवण्यात आले. यावेळी युवासेना मध्ये चंद्रपुर जिल्यातील अनेक युवकांनी प्रवेश घेतला.

    यावेळी उपस्थित पदाधिकारी जिल्हा चिटणीस सुमितभाऊ अग्रवाल,चंद्रपूर विधानसभा येथील उपजिल्हा प्रमुख बंटी कमटम , तालुका प्रमुख सूरज शेंडे शहर प्रमुख शहबाज शेख , वैभव काळे ,शहर समन्वयक प्रज्वल आवडे ,उपतालुका प्रमुख विवान रामटेके , उपशहर प्रमुख संघदीप रामटेके, उपशहर प्रमुख सार्थक शिर्के, बल्लारपूर विधानसभा येथील तालुका प्रमुख नीरज यादव, शहर प्रमुख अनिकेत बेलखोडे, शहर प्रमुख पोंभुर्णा महेश श्रीगिरवार , शहर प्रमुख मूल अमित अलियानी तालुका प्रमुख मूल रितिक संगमवार, राजुरा विधानसभा येथील उपजिल्हा प्रमुख राजुरा कुणाल कुडे, तालुका प्रमुख राजुरा अमित मालेकर ,शहर प्रमुख राजुरा स्वप्नील मोहुर्ले ,शहर प्रमुख विवेक राणा गोंडपिपरी, वतन मदार यांच्या सह युवा सैनीकांची प्रामुख्यानी उपस्थिती होती.

  • Mahakali mata palkhi : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपुरात निघाली माता महाकालीची पालखी

    Mahakali mata palkhi : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत चंद्रपुरात निघाली माता महाकालीची पालखी

    Mahakali mata palkhi श्री माता महाकाली महोत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरातून नगर प्रदक्षिणा पालखीचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानी रथात मातेची मूर्ती आणि चांदीच्या भव्य पालखीत महाकालीची चांदीची मूर्ती ठेवत भव्य दिव्य पालखी शोभायात्रा निघाली. या सोहळ्यात सादर केलेल्या देखाव्यांनी भक्तांचे मनोवेधन केले. चांदीच्या पालखीत चांदीच्या मूर्तीसह निघालेल्या मातेच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी चंद्रपूरकरांची अलोट गर्दी शहराच्या रस्त्यावर उसळली होती. 

    महत्त्वाचे : मिस कॉल द्या आणि मिळवा सुरक्षेची हमी

      
       Mahakali mata palkhi  दरवर्षी प्रमाणे यंदा ही माताच्या पालखी शोभायात्रेतील भव्यतेने सोहळा अभुतपुर्व बनविला. महाकाली मंदिर ते जटपूरा गेटच्या पूढे पर्यंत ही शोभायात्रा होती. त्यामुळे या पालखी शोभायात्रेला भव्यता प्राप्त झाली. दरवर्षी ही पालखी शोभायात्रा वाढत असून याला मोठा लोकसहभाग लाभत आहे. विशेष म्हणजे या पालखी शोभायात्रेत शहरातील अनेक गणेश मंडळ आणि समाजाच्या वतीने आर्कर्षक देखावे सादर करण्यात आले. हे नेत्रदिपक देखावे पाहण्यासाठी चंद्रपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. Chandrapur

        सर्वप्रथम, काशी येथील गंगा आरतीचे प्रदर्शन झाले, त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी पालखी उचलून नगर प्रदक्षिणा सोहळ्याला विधिवत प्रारंभ केला. या शोभायात्रेची सुरुवात माता महाकाली मंदिरातून झाली. यात राजस्थानी रथ, चांदीची मूर्ती, उज्जैनचे झांज-डमरू पथक, पोतराजे, हरियाणा राज्यातील महामृत्युंजय अघोरी नृत्य, पवनसुत प्रभु श्री हनुमान यांचे देखावे, उत्तर प्रदेशातील ३३ मुखी काली मातेसह अन्य देखावे, आदिवासी नृत्य, अश्वावर आरूढ नवदुर्गांचे देखावे, शस्त्र प्रात्यक्षिक, राणी हिराई वर आधारित देखावे आणि सामाजिक संदेश देणारे विविध देखावे या शोभायात्रेत सहभागी झाले होते. पालखी जटपूरा गेटला वळसा घेत पुन्हा माता महाकाली मंदिरात पोहोचली. या शोभायात्रेला पाहण्यासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. (Mahakali mata palkhi)


    शहनाज अख्तर यांच्या रोड शो ने उत्सवात भरली रंगत
    नगर प्रदक्षिणा सोहळ्याच्या आकर्षणात सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांच्या ‘‘मुझे चढ़ गया भगवा रंग‘‘ या गाण्याचा रोड शो होता. शहनाज अख्तर यांच्या गाण्यांनी उत्सवात भक्ती आणि जल्लोषाची एक विशेष उधळण केली. त्यांच्या गाण्यांसाठी आणि दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे कार्यक्रमात एक अतिरिक्त रंगत भरली. (Chandrapur)


    विविध प्रकारचे आदिवासी नृत्य
    चंद्रपूरात निघालेल्या पालखी शोभायात्रेत ढेमसा आदिवासी पारंपरिक नृत्य, ढोलशा आदिवासी पारंपरिक नृत्य, आणि रेला आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. हे पारंपरिक नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


    विविध सेवाभावी संस्थांकडून पाणी व भोजनदान
    नगर प्रदक्षिणा पालखी शोभायात्रेत अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने सेवा देण्यात आली होती. यावेळी गिरनार चौक येथे पवन सादमवार यांनी मसाला भात वाटप केला, तर शंशात बैस, हुसेन अकोलावाला, प्रवीण सारडा, पराग सब्बनवार, अन्वर अली, मनोहर उमाटे, धीरज चौधरी,  शारुक मिस्झा, संदीप बांठिया यांच्यासह एलिवेट ग्रुप, बोहरा समाज, माहेश्वरी समाज, इलेक्ट्रिकल असोसिएशन, जटपूरा यंग मुस्लिम कमिटी आणि इतर अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने शरबत, पाणी, आणि भोजनदान केले.