Category: करिअर

उज्ज्वल भवितव्य आणि योग्य करिअर (Career) निवडण्यासाठी आवश्यक माहिती वाचा news34.in च्या या विशेष विभागात. स्पर्धा परीक्षांचे निकाल, नोकरीच्या ताज्या संधी (Job Opportunities), विविध अभ्यासक्रमांची माहिती आणि प्रवेश प्रक्रिया (Admission Process) याबाबत अचूक मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. तुमच्या शैक्षणिक पात्रता आणि आवडीनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी आणि यशासाठी आवश्यक टिप्स मिळवा.

  • PM Shikau Umedwari Rojgar Mela Chandrapur | चंद्रपुरात 10 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री शिकावू उमेदवारी व रोजगार मेळावा

    PM Shikau Umedwari Rojgar Mela Chandrapur

    PM Shikau Umedwari Rojgar Mela Chandrapur : चंद्रपूर, दि. 06 (News३४) : ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच बीटीआरआय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, चंद्रपूर येथे 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळावा तसेच रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास, शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी येणार आहे.

    Also Read : जानेवारी महिन्यात चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे होणार लोकार्पण

    प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत येते. याद्वारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होण्याची व रोजगाराची संधी उपलब्ध होते. सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धड़े मिळतात.

    रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

    प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी तसेच रोजगार मेळावा अंर्तगत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील तसेच  जिल्ह्याबाहेरील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बीटीआरआय कार्यालयाचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार व संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर यानी केले.

    शिकाऊ उमेदवारीकरिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. मेळाव्यायाकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी गटनिदेशक श्री. टोंगे व योगेश धवणे (9405912096) यांच्याशी संपर्क साधावा.

  • Israel 5000 vacancies salary 130k INR । इस्त्रायलमध्ये तब्बल 5000 नोकऱ्या – महिन्याला मिळणार थेट ₹1.30 लाख वेतन 💼🌍

    Israel 5000 vacancies salary 130k INR

    Israel 5000 vacancies salary 130k INR : चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट २०२५ :  कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्त्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली आहे. या विभागाच्या https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर Latest Jobs या विकल्पाद्वारे उमेदवारांना अर्ज करता येईल.

    चंद्रपुरात लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरु

     990 तासांचा कोर्स पुर्ण करणे आवश्यक

    इस्त्रायलमध्ये होम हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासांठी सुमारे 5 हजार नोकरीच्या संधी, दीड लाखापर्यंत मासिक वेतनाची संधी व या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय 25 ते 45 वयोगटाचे उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुन/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. Israel home caregiver jobs

    भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायझरी मधील प्रशिक्षण संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरेपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच  जीडीए /एएनएम/जीएनएम/बीएससी नर्सीग / पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी वरिल लिंकवर जाऊन आपली माहिती भरावी व या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

  • special adoption agency job openings । 🎓 Counsellor व Caretaker पदांसाठी Special Adoption Agency मध्ये जागा

    special adoption agency job openings

    special adoption agency job openings : गडचिरोली (२९ ऑगस्ट २०२५) : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त (अनुदानित) अनुज्ञाप्ती क्रमांक : GAD-2/SAA/2024/486 असलेल्या लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरी संचालित लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली येथे तात्काळ काही रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे.

    मेरी डिग्री मेरा अभियान, कांग्रेसचे अनोखे आंदोलन

    या भरतीअंतर्गत खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत –

    🔹 उपलब्ध रिक्त पदे

    1️⃣ समुपदेशक (Counsellor)

    • शैक्षणिक पात्रता : BSW किंवा मानसशास्त्र विषयातील पदवीधर
    • पदसंख्या : 1

    2️⃣ आया (Care Taker)

    • शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
    • अनुभव : किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक
    • पदसंख्या : 1

    📞 संपर्कासाठी माहिती

    इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा :
    अधीक्षक, लड्डू विशेष दत्तक संस्था, गडचिरोली
    मोबाईल : 8879699138 / 9422181114

    या भरतीमुळे समाजसेवेची आवड असलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना गडचिरोलीत थेट कामाची संधी उपलब्ध होणार आहे.

  • Rishi August ITI Chandrapur job fair । 🎯 2025 ची सुवर्णसंधी! Rishi August ITI चंद्रपूरमध्ये भव्य रोजगार मेळावा!

    Rishi August ITI Chandrapur job fair

    Rishi August ITI Chandrapur job fair : चंद्रपूर, दि. 8 ऑगस्ट (News३४) : ऋषी अगस्त शासकीय औ्द्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे 11 ऑगस्ट 2025  रोजी सकाळी 10 वाजता प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून  जिल्ह्यातील जी.एम. आर. इन्फ्रा, साई वर्धा पॉवर, मल्टी ऑरगॅनिक, मल्टी व्ह्यू फायबर, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर तसेच इतर नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे. PM Apprenticeship Mela Chandrapur 2025

    चंद्रपुरातील एमडीआर मॉल मध्ये बांबू वस्तू विक्री स्टॉल सुरु

             प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी योजना ही केंद्र शासन पुरस्कृत असून कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या मार्फत राबविण्यात येत आहे. या व्दारे औद्योगिक आस्थापनेत आपले कौशल्य विकसित करून आत्मनिर्भर होण्यांची व रोजगाराची संधी उपलब्ध होते. 

    विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

    सदर योजनेमुळे प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार तसेच स्वयंरोजगाराचे धडे मिळतात. प्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याअंतर्गत विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून सदर संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे प्राचार्य वैभव बोंगिरवार तसेच बीटीआरआय कार्यालयाच्या सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले आहे.

              शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन  ऋषी अगस्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर तसेच बीटीआरआय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित  होत असुन याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी आयटीआयचे गटनिदेशक श्री. टोंगे व बीटीआरआयचे योगेश धवणे यांच्याशी संपर्क साधावा.

  • Pandit Deendayal Upadhyay Employment Fair । 📢 मोबाईलपेक्षा करिअर महत्वाचं! चंद्रपूरातील रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांचा सहभाग

    Pandit Deendayal Upadhyay Employment Fair

    Pandit Deendayal Upadhyay Employment Fair : चंद्रपूर, दि. 22 : चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. औष्णिक विद्युत केंद्र, पेपर मील, कोळसा खाणी, सिमेंट, बांबु  व इतर उद्योग येथे मोठ्या प्रमाणात आहे. वैशिष्ट्य म्हणजे येथील युवा वर्गाला रोजगार देण्याचा संकल्प उद्योगांनी केला आहे. त्यामुळे युवक – युवतींनीसुध्दा आपल्या गुणवत्तेच्या आधारावर रोजगार मिळवून देशाच्या प्रगतीत हातभार लावावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले. Chandrapur youth job fair 2025

    कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, सरदार पटेल महाविद्यालय आणि मॉडेल करीअर सेंटरच्या संयुक्त विद्यमाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सरदार पटेल महाविद्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटन करतांना डॉ. व्यवहारे बोलत होते. मंचावर प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, डॉ. जयेश चक्रवर्ती, उपप्राचार्य स्वप्नील माधवशेट्टीवार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वैभव बोंगिरवार, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाले उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवशी अनोखे आंदोलन

    आजच्या युवा वर्गाला रोजगार देणे, हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य आहे, असे सांगून प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा व इतर सोयीसुविधा प्राप्त करायच्या असेल आणि चांगले जीवन जगायचे असेल तर रोजगाराची आवश्यकता आहे. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. येथील कंपन्यानी युवकांना रोजगार देण्याचा केलेला संकल्प हा अभिनंदनीय आहे. उद्योगांनी आपली निवड केली पाहिजे, ही जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी उत्कृष्ट सादरीकरण करा, जेणेकरून कंपन्यांना वाटले पाहिजे की, या तरुण-तरुणीची आपल्या कंपनीला गरज आहे. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपली प्रगती झाली तर, आपले कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीत आपलेही योगदान राहील, असेही डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले. First stage selection 637 candidates job fair Chandrapur

    प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणाले, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. मोबाईलचा उपयोग केवळ वेळ वाया घालविण्यासाठी करू नये तर करीअर घडविण्यासाठी करा. प्रत्येकच आई-वडीलांना मुलांकडून चांगल्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. तर प्राचार्य डॉ. काटकर म्हणाले, महाविद्यालयात अनेक उपक्रम सुरू असतात. मात्र पदवी मिळाल्यानंतर रोजगाराचा प्रश्न आजच्या पिढीसमोर उभा आहे. त्यासाठीच  या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व तरुण – तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. Career fair collaboration with Sardar Patel College Chandrapur

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाळे यांनी केले. संचालन डॉ. अनिता मत्ते यांनी तर आभार डॉ. स्वप्नील माधवशेट्टीवार यांनी मानले. कार्यक्रमाला विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, रोजगार इच्छुक तरुण – तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    637 उमेदवारांची प्राथमिक निवड :

     पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात एकूण 1107 उमेदवारांनी सहभाग नोंदविला. तसेच सहभागी कंपन्यांनी 1030 रिक्त पदे कळविली होती. यापैकी 637 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

  • government ITI job mela Chandrapur 2025 । 🔧 चंद्रपुरात आयटीआय जॉब मेळावा; संधी दारात!

    government ITI job mela Chandrapur 2025

    government ITI job mela Chandrapur 2025 : चंद्रपूर २४ जून (News३४) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चंद्रपूर येथे गुरुवार दि. 26 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय ” शिकाऊ उमेदवार मेळावा तसेच रोजगार मेळावा”आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्या आजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे.

    रेल्वे भूखंड संपादनात गोंधळ, हंसराज अहिर यांनी सांभाळली बाजू

    उपस्थित राहा

    शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

    अधिक माहितीसाठी योगेश धवणे (9405912096) लोखंडे मॅडम (9423690138) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. वानखेडे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले.

  • teaching jobs in residential schools । 🔔 शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षक भरती – 1 जुलै रोजी मुलाखती!

    teaching jobs in residential schools

    teaching jobs in residential schools : चंद्रपूर – बल्लारपूर तालुक्यातील (विसापूर) भिवकुंड येथील तसेच चिमूर येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, या दोन्ही शाळेकरीता इयत्ता 6 वी ते 10 वी मध्ये असलेल्या इंग्रजी व मराठी माध्यमातून सर्व विषय शिकविण्याकरीता शैक्षणिक सत्र सन 2025-26 या वर्षासाठी 11 महिन्यांकरीता घड्याळी तासिका तत्वावर भरती करण्यात येणार आहे.

    सरपंच पदाची सोडत पुन्हा काढा

    अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा भिवकुंड (विसापूर) येथे 9 वी ते 10 वी साठी सहायक शिक्षक एम.ए. बी.एङ (मराठी, सामाजिक शास्त्र), 6 वी ते 8 वी करीता बी.ए. डी.एङ (मराठी व इंग्रजी माध्यम प्रत्येकी 1) तसेच अनुसूचित जाती नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा चिमूर येथे 9 वी ते 10 वी करीता सहायक शिक्षक बी.ए.बी.एङ (मराठी / हिंदी), बी.ए.बी.एङ (सामाजिक शास्त्र) तसेच 6 वी ते 8 वी करीता बी.ए.डी.एङ (इंग्रजी) बी.ए.डी.एङ (मराठी) अशी एकूण 7 पदे भरावयाची आहेत.

    गुणवत्तेच्या आधारावर होणार निवड

    आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या इच्छुक उमेदवारांनी 1 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती व नवबौध्द मुलामुलींची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर येथे सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्षरित्या उपस्थित राहावे. उमेदवरांची निवड ही गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.

    निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक दिल्यानंतर शासन नियमानुसार मानधन अदा करण्यात येईल. तसेच मुलाखतीकरीता येण्याकरीता कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही, असे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

  • registration and stamp department bharti 2025 । 284 सरकारी पदांसाठी सुवर्णसंधी!, हॉलतिकीट मिळणार ई-मेलवर! पण सावध

    registration and stamp department bharti 2025

    registration and stamp department bharti 2025 : चंद्रपूर – नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई ‘गट-ड’ संवर्गातील 284 पदभरती करीता 22 एप्रिल 2025 रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

    सदर भरती प्रक्रिया पूण करणे, ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारणे तसेच ऑनलाईन पध्दतीने परिक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे. त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात आले आहेत.

    शेतकऱ्याचे अश्रू बघून खासदार धानोरकर हेलावल्या

    आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा 1 ते 8 जुलै 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.

    तर सावध रहा

    सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्त्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र विनवडे यांनी केले आहे.

  • woman attacked for mangalsutra in Maharashtra । वृद्धेवर क्रूर हल्ला! सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं; चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    woman attacked for mangalsutra in Maharashtra

    woman attacked for mangalsutra in Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मोरवाही मध्ये वृद्ध महिलेला मारहाण करीत ४० हजारांचा माल अज्ञातांनी चोरून नेला होता, याबाबत पोलिसात तक्रार झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने तपास करीत दोन आरोपीना अटक केली आहे.

    राजू रेड्डी गोळीबार प्रकरणी पोलिसांचा अहवाल

    घटना काय?

    २० मे रोजी ६५ वर्षीय वृद्ध महिला धृपताबाई प्रल्हाद रायपुरे या घरी झोपेत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजता दोघांनी घरात प्रवेश करीत महिलेच्या तोंडावर हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण करीत जखमी केले व त्या महिलेच्या गळ्यातील ४ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले. youth arrested for gold chain robbery

    सदर प्रकरणी धृपताबाई यांनी मूल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेने कौशल्यपूर्ण व तांत्रिक तपास करीत २२ वर्षीय प्रनिकेत दिलीप शेंडे व १९ वर्षीय तनिष्क ओम मंडलेकर दोघे राहणार ताडाळा रोड वॉर्ड क्रमांक ११ यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता दोघांनी सदर गुन्हयाची कबुली दिली.

    मध्यप्रदेशात केली मंगळसूत्राची विक्री

    या गुन्ह्यात दोघांचा साथीदार नयन रामटेके यांच्यासह मिळून हा गुन्हा केला असे दोघांनी सांगितले, चोरीचे मंगळसूत्र मध्यप्रदेश राज्यातील नयनपूर येथे विकल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपीना अटक करीत मूल पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे. नयन रामटेके याचा पोलीस शोध घेत आहे. Chandrapur local crime update

    सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, चेतन गज्जलवार, प्रशांत नागोसे, प्रफुल गारघाटे, किशोर वाकाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • Amma Ki Padhai initiative । 3,000 विद्यार्थ्यांचा सहभाग! Amma Ki Padhai च्या चाचणी परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

    Amma Ki Padhai initiative

    “Education is not a luxury – it’s a right! आणि हाच अधिकार मिळवून देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला ‘Amma Ki Padhai’ उपक्रम गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक नवा आशेचा किरण ठरतोय. या उपक्रमांतर्गत आयोजित चाचणी परीक्षेत चंद्रपूर शहरातील जवळपास 3,000 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, जे मोफत कोचिंग, मार्गदर्शन, आणि शिक्षण साहित्याच्या संधीसाठी उत्सुक आहेत!”

    Amma Ki Padhai initiative : शहरातील गरजू, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या अम्मा की पढाई या शैक्षणिक उपक्रमांतर्गत चाचणी परीक्षा रविवारी उत्साहात पार पडली. चंद्रपूर शहरातील चार परीक्षा केंद्रांवर एकूण ३ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

    अम्मा की पढाई या उपक्रमाची चाचणी परीक्षा जनता महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, एफ.ई.एस. गर्ल्स महाविद्यालय आणि आंबेडकर महाविद्यालय या चार परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेला जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाची गरज असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना मोफत कोचिंग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षण साहित्य आणि वेळोवेळी करिअर मार्गदर्शन पुरविले जाणार आहे. free coaching classes in Chandrapur

    मोहफूल वेचायला गेला आणि जीव गमावला

    अम्मा की पढाई हा उपक्रम आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केला असून, गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम चंद्रपूर शहरातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष समिती नियुक्त करण्यात आली. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व इतर सर्व व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. परीक्षेनंतर लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असून, त्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन वर्गात प्रवेश दिला जाईल. free coaching for competitive exams

    free coaching classes in Chandrapur

    शहरातील विविध भागांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. शिक्षणाच्या संधी आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या हातून निसटतात, हे जाणूनच आमदार किशोर जोरगेवार यांनी समाजातील शेवटच्या घटकासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील शैक्षणिक वातावरण उन्नत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘अम्मा की पढाई’ उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे.

    या परीक्षेच्या आयोजनात परिक्षा प्रमुख म्हणून आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य संजय बेले यांनी जबाबदारी सांभाळली. परीक्षेचे नियोजन व समन्वयक म्हणून सुमित बेले यांनी काम पाहिले. उपकेंद्र प्रमुख म्हणून सरदार पटेल महाविद्यालयात राज्यकर निरीक्षक निलेश मालेकर, आंबेडकर कॉलेजमध्ये पोलीस उपनिरीक्षक अनिल देरकर, जनता कॉलेजमध्ये नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, तर एफ.ई.एस. गर्ल्स कॉलेजमध्ये तृपाल कोल्हे यांनी काम पाहिले. परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रमोद कातकर, प्राचार्य राजेश दहेगावकर, प्राचार्य आशिष महाताले, प्राचार्य राजेश चिमनकर यांनी मोलाचे सहकार्य केले.