उज्ज्वल भवितव्य आणि योग्य करिअर (Career) निवडण्यासाठी आवश्यक माहिती वाचा news34.in च्या या विशेष विभागात. स्पर्धा परीक्षांचे निकाल, नोकरीच्या ताज्या संधी (Job Opportunities), विविध अभ्यासक्रमांची माहिती आणि प्रवेश प्रक्रिया (Admission Process) याबाबत अचूक मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. तुमच्या शैक्षणिक पात्रता आणि आवडीनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी आणि यशासाठी आवश्यक टिप्स मिळवा.
Ongc jobs 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू मंडळात १०८ जागांची पदभरती निघाली आहे. यामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आपण जाणून घेऊया पदनिहाय संपूर्ण तपशील. latest jobs
chandrapur jobs : आयुध निर्माणी चांदा येथे डेंजर बिल्डींग वर्कर च्या २०७ पदाची पदभरती निघाली आहे. पदभरती मध्ये अर्ज करण्याची पद्धत हि ऑफलाईन असून उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
⇒ अर्ज प्रक्रियासुरूहोण्याचीतारीख:04 जानेवारी 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025.
⇒अर्ज सादर करण्याचा पत्ता: मुख्य (आनंद सिंग) जे.टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा (ofc chanda), ए युनिट ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा – चंद्रपूर (एमएस), पिन – 4425O1.
Legal Officer Jobs : महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयान्वये, दि. 6 एप्रिल 2011 व समक्रमांकाचे निर्णय दि. 30 जुलै 2011 मधील तरतुदीनुसार ‘विधी अधिकारी’ हे पद कंत्राटी पद्धतीने एकावेळी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरावयाचे आहे. त्याकरिता, पात्र उमेदवारांकडून 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
शैक्षणिक अहर्ता व अनुभव:
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा. विधी अधिकारी या पदासाठी वकिली (Lawyer) व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवार महसूल, सेवाविषयक तसेच प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती व विभागीय चौकशी आदीबाबत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो सक्षमतेने पार पाडू शकेल. विधी अधिकारी या पदासाठी उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे.
सदर पदाकरिता एकत्रित मानधन रु. 30 हजार असून दुरध्वनी व प्रवास खर्च रु. 5 हजार असे एकत्रित मानधन रुपये 35 हजार प्रति महिना देय राहील. या व्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही.
महसूल विभागाच्या (Revenue Department) शासन निर्णयानुसार, विधी अधिकारी यांची निवड जिल्हा निवड समितीच्या अखत्यारित राहील. विधी अधिकारी हे पद नियमित स्वरूपात 11 महिन्याकरिता कंत्राटी तत्वावर भरण्यात येईल. विधी अधिकारी (कंत्राटी) या पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांवर फौजदारी तसेच कोणताही गुन्हा नोंद नसावा.
विधी अधिकारी यांचे काम असमाधानकारक असल्याचे निष्पन्न झाल्यास किंवा त्यांचे विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची तात्पुरत्या स्वरूपातील नेमणूक रद्द करण्यात येईल. तसेच विधी अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर इतर खाजगी कामे करता येणार नाही.
पदभरतीबाबत कार्यक्रम :
सदर पदाकरिता अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2025 असून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 14 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रसिद्ध केलेल्या यादीमधील चुकीबाबत उमेदवारांनी कार्यालयामध्ये समक्ष लेखी अर्ज करण्याची 16 जानेवारी 2025 ही अंतिम तारीख असेल. तर झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पात्र-अपात्र उमेदवारांची यादी 17 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारांची प्राविण्य पडताळणीसाठी लेखी चाचणी, प्रत्यक्ष मुलाखत अथवा दोन्ही घेण्याची सूचना दि. 20 जानेवारी 2025 रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे, प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती, अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. सदर जाहिरात व विहित नमुन्यातील अर्ज, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र कार्यालयाच्या https://chandrapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर या पत्त्यावर दि. 10 जानेवारी 2025 पर्यंत सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. या प्रक्रियेमध्ये बदल करण्याचा, स्थगित, रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा निवड समिती, चंद्रपूर यांना राहील.
Tadoba jobs 2024 जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान येथे 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर 10 पदांची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांना 13 ते 50 हजार पगार मिळणार आहे.
यामध्ये संप्रेषण व्यवस्थापक 1, सीएसआर व्यवस्थापन अधिकारी 1, लेखापाल (सेवानिवृत्त) 1, डेटा एंट्री ऑपरेटर 3, कॉल सेंटर सहायक 3, मल्टी परपज स्टाफ 1 अश्या एकूण 10 पदांची पदभरती करायची आहे. Tadoba national park
जाहिरात बाबत अधिकृत माहिती www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या पदभरती मध्ये उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात 20 डिसेम्बर 2024 सायंकाळी 5 स्वीकारण्यात येणार आहे. Tadoba jobs 2024
अर्ज प्रक्रिया पार पडल्यावर अर्जाची छाननी करण्यात येईल, छाननी नंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीची वेळ, तारीख व स्थळ दूरध्वनी व ईमेल द्वारे कळविण्यात येईल. पदासाठी मुलाखत प्रक्रिया पार पडल्यावर आवश्यकतेनुसार स्किल टेस्ट घेण्यात येणार, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
संप्रेषण व्यवस्थापक – वयोमर्यादा 18 त 60 वर्षे, मानधन – 50 हजार शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी/पदव्युत्तर व जनसंचार /जाहिरात/जनसंपर्क या क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा.
सीएसआर व्यवस्थापण अधिकारी – वयोमर्यादा 18 त 40 वर्षे, मानधन – 50 हजार, शैक्षणिक पात्रता – Business Administration/social sciences/environmental studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
लेखापाल (सेवानिवृत्त) – वयोमर्यादा 58 ते 62 वर्षापेक्षा जास्त नसावे. मानधन – 20 हजार. शैक्षणिक पात्रता – वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी – 40 आणि मराठी 30, MS CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
डेटा एंट्री ऑपरेटर – वयोमर्यादा – 18 ते 40 वर्ष. मानधन – 18 हजार. शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी 40 आणि मराठी 30, MSCIT संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)
कॉल सेंटर सहायक – वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे. मानधन – 13 हजार 500 शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, MSCIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक )
मल्टी परपज स्टाफ – वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे. मानधन – 15 हजार शैक्षणिक पात्रता – 12 वी पास (hsc बोर्डाचे मार्कशीट आवश्यक)
Ordnance Factory Chanda recruitment 2024 आयुध निर्माणी चांदा येथे २० पदासाठी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ डिसेम्बर आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑफलाईन आहे. विशेष बाब म्हणजे नोकरीवर रुजू झाल्यास भक्कम पगार असणार आहे.
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत “प्रोजेक्ट इंजिनिअर केमिकल अँड मेकॅनिकल” या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीसाठी एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर 2024 आहे या तारखेपूर्वी आपला अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवावा. Ordnance Factory Chanda
उत्तर – The Chief General Managar, Ordnance Factory Chanda, A Unit Of Munitions India limited, District: Chandrapur (M.S.), Pincode – 442501
अर्ज कसा करायचा?
ans – या भरतीसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करणार आहेत त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा आणि तो संबंधित पत्त्यावर पाठवावा. या भरतीच्या अर्जाची लिंक खाली दिलेली आहे तसेच तुम्हाला अर्ज पाठविण्याचा पत्ता सुद्धा दिला आहे त्या पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी अर्जदार उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.
वयाची आत काय?
जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहे त्यांचे वय 01 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एस सी / एस टी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय आहे?
इंजीनियरिंग पदवी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक.
पदवी / डिप्लोमा अप्रेंटिस
वेतन किती?
Salary: Rs. 36,000/- to Rs. Rs. 39,338/-
Age Limit: Maximum 30 years as on O1 / O9 / 2024
Ordnance Factory Chanda has released an official notification for the recruitment of Project Engineer Chemical and Mechanical positions. There are a total of 20 vacancies to be filled, and eligible and interested candidates can apply offline. The last date to submit the offline application is December 22, 2024. For more details, refer to the original advertisement.
Sbi bank recruitment 2024 देशातील अग्रगण्य स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आता सुशिक्षित बेरोजगार वर्गाचे रोजगाराचे स्वप्न साकार होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्स पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
🔖 नोंदणी प्रक्रिया : ● २७ नोव्हेंबरपासून सुरू झाली आणि १७ डिसेंबर २०२४ रोजी संपेल. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घेऊयात.
🔖 रिक्त जागा तपशील : ● प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन): १ पद ● विभागीय प्रमुख: ४ पदे ● प्रादेशिक प्रमुख: १० पदे ● रिलेशनशिप मॅनेजर – टीम लीड: ९ पदे ● सेंट्रल रिसर्च टीम (उत्पादन लीड): १ पदे
🧑🎓 पात्रता निकष:
● प्रमुख (उत्पादन, गुंतवणूक आणि संशोधन): सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्था किंवा नामांकित महाविद्यालयातून पदवी/पदव्युत्तर. recruitment
● झोनल हेड, रिजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर: सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी.
📍 सेंट्रल रिसर्च टीम : ● सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था किंवा CA/CFA मधून अर्थशास्त्र/वाणिज्य/वित्त/अकाऊंटन्सी/व्यवसाय व्यवस्थापन/सांख्यिकी/व्यवसाय प्रशासनात पदव्युत्तर पदवी. state bank of india
📝 निवड प्रक्रिया : ● निवड प्रक्रियेमध्ये शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि CTE चा समावेश असेल. मुलाखतीला १०० गुण असतील. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेद्वारे ठरवले जातील. निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उतरत्या क्रमाने तयार केली जाईल.
💰 अर्ज फी : ● सामान्य/EWS/OBC उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आणि सूचना शुल्क ₹७५०/- आहे आणि SC/ST/PwBD उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क/सूचना शुल्क नाही. स्क्रीनवर विचारल्याप्रमाणे माहिती देऊन डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड/इंटरनेट बँकिंग इत्यादी वापरून पेमेंट केले जाऊ शकते. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
आजच करा अर्ज
SBI Bank Recruitment 2024: Turning Dreams into Reality at State Bank of India 📚 Positions Available: Zonal Head, Regional Head, Relationship Manager – Candidates must possess a degree from a recognized university or institution.
📍 Central Research Team: Candidates must hold a degree in Economics, Commerce, Finance, Accounting, Business Administration, Statistics, or related fields from a recognized university or institution or be a CA/CFA. 📝
Selection Process: The selection process includes shortlisting, interviews, and the inclusion of CTE. The interview carries a weightage of 100 marks. Eligibility criteria will be determined by the bank based on the marks obtained in the interview.
The final merit list will be prepared in descending order based on the marks obtained. 💰 Application Fee: For General/EWS/OBC candidates, the application fee and intimation charge are ₹750/-, while there is no fee/charge for SC/ST/PwBD candidates. Payment can be made using debit card/credit card/internet banking.
For more details, candidates can visit the official SBI website. Please note that the provided information is specific to SBI Bank Recruitment 2024 and may be subject to change.
Tadoba Chandrapur bharti 2024 : जगप्रसिद्ध ताडोब्यात नोकरीची सुवर्णसंधी जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्यात पदवीधारक उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत “प्रकल्प व्यवस्थापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2024 आहे. Job
प्रकल्प व्यवस्थापक पद हे कंत्राटी स्वरूपाचे असून यामध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेम्बर २०२४ आहे. अर्ज करताना उमेदवारांनी मुळ जाहिरात वाचावी. मूळ जाहिरात वाचण्याकरिता यावर क्लिक करावे.
mahagenco recruitment 2024 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड द्वारे महानिर्मिती मध्ये 800 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
mahagenco recruitment 2024 या पदांमध्ये तब्बल 800 तंत्रज्ञ 3 पदांची भरती होणार आहे. विशेष बाब म्हणजे सदर पदभरती प्रक्रियेत तांत्रिक कौशल्य म्हणजेच iti पास उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.
भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात विस्तृत माहिती मिळणार आहे. तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेम्बर 2024 आहे.
उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे, मागासवर्गीय उमेदवारासाठी 5 वर्षाची सवलत देण्यात आली आहे. अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 300 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. mahagenco recruitment 2024
लिखित परीक्षा व कौशल्य चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केल्या जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://mahagenco.in ला क्लीक करीत career सेक्शन ला क्लिक करावे.
अनुसूचीत जातीसाठी 104 जागा, अनुसूचित जनजाती करीता 56 जागा, विमुक्त जाती 24, भज (ब) 20, भज (क ) 28, भज (ड ) 16, विमाप्र 16, इतर मागास प्रवर्ग 152 व आर्थिक दुर्बल घटक 80, एसईबीसी 80, खुला प्रवर्ग 224 अश्या एकूण 800 जागा विविध प्रवर्गासाठी राखीव आहे.
वेतनश्रेणी – 34,555-845-38780-1140-50180-1265-86865 रुपये.उमेदवार हा भारतीय नागरिक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Yojana Doot मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Mukhyamantri Yojana Doot चंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
Home Guard Recruitment चंद्रपूर जिल्हा होमगार्ड अंतर्गत पुरुष व महिला उमेदवारांची नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी निवड प्रक्रिया (भरती) 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सकाळी 4 वाजतापासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांच्या अध्यक्षतेखली आयोजीत करण्यांत आली आहे.
Home Guard Recruitment होमगार्डचा पदावधी कालावधी हा 3 वर्षाचा असून ही नोकरी नाही. 22 ते 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांचाच होमगार्ड निवड प्रक्रियेकरीता विचार केला जाईल. सकाळी 10 वाजता नंतर नोंदणीकरीता येणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेकरीता प्रवेश दिला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
रहिवासी भागातील पथक/ उपपथक सोडून इतर पथकात अर्ज केलेले उमेदवार कागदपत्र पडताळणी मध्ये अपात्र ठरतील. तसेच इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. नोंदणीबाबत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/loginl.php या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 22 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 6197 पर्यंत महिला उमेदवार, 23 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 1 ते 2964 पर्यंत पुरुष उमेदवार 24 ऑगस्ट रोजी नोंदणी क्रमांक 2966 ते 6200 पर्यंत पुरुष उमेदवार घेण्यात येणार आहे. नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीचे निकष खालील प्रमाणे असतील.
आवश्यक कागदपत्रे : 1) शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत (बोनाफाईड ग्राहय धरले जाणार नाही.) 2) रहिवासी दाखला 3) तहसीलदार यांचे कडील राशन कार्ड 4) आधार कार्ड 5) 2 पासपोर्ट साईज फोटो.
उमेदवार वैद्यकीयदृष्टया पात्र असावा. पोलीस चारित्र्य अहवाल अनुकुल असावा. उमेदवार हे वेतनी सेवेत कार्यरत असतील तर कार्यालयाचे अथवा मालकांचे संमती ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. संबंधित उमेदवारांस विहित केलेल्या वेळेत धावणे व गोळाफेक शारिरीक चाचणी देणे अनिवार्य आहे. उमेदवारांस नोंदणीचे वेळी तसेच उमेदवाराची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यांत येईल. तसेच खेळ, आय.टी.आय., जडवाहन चालक ड्रायव्हिंग लाइसन्स, एन.सी.सी. प्रमाणपत्र इ. असल्यास सोबत आणावे. नोंदणीचे वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. उमेदवारांना नोंदणी करीता स्व:खर्चाने यावे लागेल, असे जिल्हा समादेशक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.