Category: करिअर

उज्ज्वल भवितव्य आणि योग्य करिअर (Career) निवडण्यासाठी आवश्यक माहिती वाचा news34.in च्या या विशेष विभागात. स्पर्धा परीक्षांचे निकाल, नोकरीच्या ताज्या संधी (Job Opportunities), विविध अभ्यासक्रमांची माहिती आणि प्रवेश प्रक्रिया (Admission Process) याबाबत अचूक मार्गदर्शन येथे उपलब्ध आहे. तुमच्या शैक्षणिक पात्रता आणि आवडीनुसार योग्य करिअर मार्ग निवडण्यासाठी आणि यशासाठी आवश्यक टिप्स मिळवा.

  • सामी हॉटेल्सचा आयपीओ आजपासून उघडला

    News34 chandrapur

    मुंबई  – सामी हॉटेल्स लिमिटेडची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सदस्यत्वासाठी गुरुवार, 14 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तीन दिवसांची बोली प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी संपेल. कंपनीने तिच्या समभागासाठी प्रति इक्विटी शेअर 119-126 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे.

     

    पहिली सार्वजनिक ऑफर

    गुंतवणूकदार 119 इक्विटी शेअर्ससाठी एका लॉटमध्ये आणि त्यानंतर अनेकांमध्ये बोली लावू शकतात. SAMHI हॉटेल्सचे शेअर्स आज ग्रे मार्केटमध्ये 35 रुपयांच्या प्रीमियमवर होते. ग्रे मार्केट हे एक अनधिकृत बाजार आहे ज्यामध्ये IPO शेअर्सची सूची होईपर्यंत खरेदी आणि विक्री केली जाऊ शकते.

     

    कंपनी बाबत सविस्तर माहिती

     

    सामी हॉटेल्स हे भारतातील एक प्रसिद्ध हॉटेल मालकी आणि मालमत्ता व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे, जे 31 मार्च 2023 पर्यंत देशातील तिसर्‍या क्रमांकाच्या ऑपरेशनल कीजच्या यादीत आहे. स्थापनेपासून केवळ 12 वर्षांमध्ये, कंपनीने 3,839 की चा पोर्टफोलिओ स्थापित केला आहे.

     

    भारतातील 12 प्रमुख शहरी केंद्रांमध्ये 25 कार्यरत हॉटेल्स. बेंगळुरू, हैदराबाद, NCR, पुणे, चेन्नई, अहमदाबाद आणि इतर प्रमुख शहरांमधील मालमत्तांसह, SAMHI हॉटेल्सने या प्रदेशांमधील दर्जेदार निवासाच्या वाढत्या मागणीचा यशस्वीपणे उपयोग केला आहे. हॉटेल्सचे मोक्याचे स्थान व्यवसाय जिल्हे, पर्यटन स्थळे आणि वाहतूक केंद्रांमध्ये सहज प्रवेश सुनिश्चित करते, ज्यामुळे ते व्यवसाय आणि विश्रांती प्रवास करणाऱ्यांसाठी एक पसंतीचे पर्याय बनतात.

    10 ऑगस्ट, 2023 रोजी, कंपनीने ACIC अधिग्रहण पूर्ण केले, 31 ऑपरेटिंग हॉटेल्समध्ये 4,801 की पर्यंत पोर्टफोलिओचा विस्तार केला. हे संपादन SAMHI हॉटेल्सची सतत वाढीसाठी बांधिलकी आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगाच्या वाढत्या मागण्यांशी जुळवून घेण्याची क्षमता दर्शवते.

  • चंद्रपुरातील रोजगार मेळाव्यातून 95 महिला उमेदवारांची निवड

    News34

     

    चंद्रपूर : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार पटेल महाविद्यालयात महिलांसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

    या रोजगार मेळाव्यात जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्व्हिसेस चंद्रपूर, व्हि-1 क्लिक सोलुशन, स्वातंत्र्य फायनान्स बल्लारपूर, एस.बी.आय. लाइफ इन्शुरन्स, एल.आय.सी. वरोरा, एलिव्हेट फायनान्स लिमि., व्हि.व्हि.आर. फायनान्स आदी कंपन्या सहभागी होत्या. या रोजगार मेळाव्यात 379 महिला उमेदवारांची उपस्थिती होती, त्यापैकी 95 महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

    याप्रसंगी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सुधा पोटदुखे, सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, अॅड. प्रिया पाटील आदींची उपस्थिती होती.

    पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, कौशल्याचा वापर रोजगार व स्वयंरोजगार मिळवण्यासाठी करावा, उमेदवारांनी नवउद्योजक बनावे तसेच या ठिकाणी आलेल्या उद्योजकांनी जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी. यासोबतच महिला उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

    अॅड. प्रिया पाटील म्हणाल्या, स्त्रियांनी चुल व मूल या संकल्पनेत गुंतून न राहता उच्च शिक्षण घेऊन स्वावलंबी बनावे, रोजगार मेळाव्यातून संधीचा लाभ घ्यावा व महिला उद्योजक म्हणून नावारुपास यावे.

    रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे म्हणाले, या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या माध्यमातून उमेदवारांना रोजगाराची संधी चालून आली आहे.

    या संधीचा लाभ घ्यावा तसेच उमेदवारांनी आपल्या कौशल्याचा वापर रोजगार मिळवण्यासाठी करावा व नोकरीसाठी बाहेर जाण्याची मानसिकता ठेवावी असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका कविता रायपूरकर तर आभार मुकेश मुजंनकर यांनी मानले.

  • भद्रावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 सप्टेंबर रोजी उमेदवारांची मुलाखत

    News34

     

    चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आयटीआय शिल्प निदेशकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल (टेक्निकल स्कूल), मॅथ्स ड्रॉईंग आणि एप्लॉयबिलीटी स्कील याकरता तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

    डिप्लोमा, डिग्री, आयटीआय अधिक सीटीआयधारक व संलग्न ट्रेडचे उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. शैक्षणिक पात्रतेच्या माहितीकरीता www.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह नमुद स्थळी व वेळी उपस्थित राहावे, असे भद्रावती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य,श्रीमती. प्रणाली दहाटे यांनी कळविले आहे.

     

  • 6 ऑगस्टला नितेश कराळे वरोरा शहरात

    News34

     

    वरोरा – महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा तसेच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.६ ऑगस्ट २०२३ स.११ वाजता राधा मिलन सभागृह बोर्डा वरोरा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची भरती

    कार्यक्रमात प्रामुख्याने वऱ्हाडी भाषेतील महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते खद खद आपले मास्तर प्रा.नितेश कराळे सर वर्धा यांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सह इयत्ता १० व १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ctv वरोरा लोकल चॅनेलचे भव्य उदघाटन आणि उन्माद विषमतेचा या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

    सदर कार्यक्रमाचे उदघाटन आयुष नोपानी (भापोसे) सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेशजी सोलापण जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर हे राहणार आहेत.

    कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून डॉ. अभिलाषा गावतुरे, परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर, ॲड पुरुषोत्तम सातपुते ज्येष्ठ अधिवक्ता चंद्रपूर, प्रकाश बाबू मुथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माढेळी, धनराज पाटील आस्वले कार्यकारी अध्यक्ष, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, सुषमाताई श्री शिंदे, विश्वस्त स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल टेबल ट्रस्ट चंद्रपूर, शोभाताई वेले ज्येष्ठ कवयित्री नागपूर, सुधाकर कडू गुरुजी विश्वस्त ,महारोगी सेवा समिती आनंदवन, वरोरा यांची उपस्थिती राहणार आहे.

    आयोजित कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अशफाक शेख अध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा सुनिल शिरसाट सचिव, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा संजय तोगट्टीवार सचिव स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर, हितेश राजनहिरे ,संघटक , महाराष्ट्र राज्य ग्रामीण मतदार संघ वरोरा अमर गोंडाने, सदस्य, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा मुजाहिद कुरेशी ,फैज पटेल, विश्वदीप गोंडाने ,अजीम शेख, अहेफाज शेख यांनी केले आहे.

  • चंद्रपूर जिल्हा परिषदेत 519 पदांची पदभरती

    News 34 jobs

     

    चंद्रपूर : शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत विविध विभागातील व विविध संवर्गातील गट – क ची एकूण 519 रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. याबाबत शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार व वेळापत्रकानुसार जिल्हा परिषद चंद्रपूरच्या वतीने सविस्तर जाहिरात www.zpchandrapur.co.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

     

    सदर रिक्त पदांकरीता इच्छुक उमेदवारांना https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या लिंकवर 4 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023 च्या रात्री 23.59 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदन सादर करता येणार आहे. तसेच जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जि.प. चंद्रपूरच्या www.zpchandrapur.co.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

     

    तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 या संकेतस्थळावर ठराविक दिनांकापर्यंत अर्ज सादर करावे. अर्ज सादर करतांना काही अडचणी उद्भवल्यास उमेदवारांनी हेल्पलाईन क्रमांक 07172-255592 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा निवड मंडळ निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि सदस्य तथा मुख्य कार्यकारी अधिकारी व सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) यांनी केले असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.