Category: ब्रेकिंग न्यूज मराठी

ब्रेकिंग न्यूज मराठी (Breaking News Marathi) विभागात वाचा news34.in वर सर्वात जलद आणि विश्वसनीय ताज्या बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि प्रशासकीय घडामोडींचे त्वरित कव्हरेज आम्ही देतो. कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटू नये यासाठी हा विभाग खास तयार केला आहे. क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा आणि आपल्या परिसरातील माहिती त्वरित जाणून घ्या.

  • Holiday due to heavy rain : चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना 22 जुलै रोजी सुट्टी

    Holiday due to heavy rain : चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना 22 जुलै रोजी सुट्टी

    Holiday due to heavy rain गत 48 तासांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच प्रादेशिक हवामान खात्याने सोमवार दि. 22 जुलै रोजी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालये 22 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमित केले आहे.

    अवश्य वाचा : मूल तालुक्याचा अनेक गावाशी सम्पर्क तुटला

    Holiday due to heavy rain चंद्रपूर जिल्ह्यात 19 व 20 जुलै रोजी अनेक तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तसेच गावांना पुराचा वेढा पडल्याने जनजीवन विस्कळीत होण्याच्या घटना घडल्या आहेत. हवामान खात्याने 21 व 22 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये व अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालय व महाविद्यालय यांना 22 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील या गावात मामा तलाव फुटला, कुटुंब उघड्यावर

    या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे व सदर आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 – 250077 तसेच 07172 -272480 या क्रमांकावर संपर्क करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.

  • Leopard Attacks : सिंदेवाही तालुक्यात 3 बिबट्याचा धुमाकूळ

    Leopard Attacks : सिंदेवाही तालुक्यात 3 बिबट्याचा धुमाकूळ

    19 जुलैला सकाळी 10 वाजताच्या सुमारास 3 बिबट्यानी मोहाडी गावात धुमाकूळ घातला.
    चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या मोहाडी नलेश्वर गावातिल एका घरात 3 बिबट शिरले.
    गावात बिबट्याचा शिरकाव झाल्यावर त्यांनी 6 जणांना जखमी करीत राजेश्वर दांडेकर यांच्या घरात शिरले.
    सध्या चंद्रपूरातून रेस्क्यू टीम गावी पोहचली आहे.


    Leopard attacks जखमी मध्ये 35 वर्षीय विजय देवगिरकर, 50 वर्षीय मनोहर दांडेकर , 30 वर्षीय जितेंद्र दांडेकर, 25 वर्षीय सुभाष दांडेकर, 18 वर्षीय रितिक वाघमारे व 32 वर्षीय पांडुरंग नन्नावारे यांचा समावेश आहे.

    अवश्य वाचा : खासदार धानोरकरांच्या या कृतीची होत आहे चर्चा


    रेस्क्यू पथक बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते, अथक प्रयत्नांनंतर वन विभागाच्या चमुला यश मिळाले असून सध्या 1 मादा बिबट वनविभागाने जेरबंद केली आहे.

  • chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

    chandrapur police : चंद्रपूर पोलीस दलात खळबळ उडाली आणि….

    Chandrapur police बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अजय पांडुरंग मोहूर्ले वय ४० असे पोलीस शिपाई चे नाव आहे.
    बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे वाहतूक विभागात कार्यरत पोलीस शिपाई अजय पांडुरंग मोहुर्ले हा वस्ती विभागातील पोलीस क्वार्टर मध्ये राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी सोबत वाद होत होता. मागील पाच-सहा दिवसांपासून त्याची पत्नी आपल्या नातेवाईकाकडे गेली असता त्यांनी आपल्या राहत्या क्वार्टर मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

    अवश्य वाचा : शेतकऱ्यांसाठी सरसावले शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे

    घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे, पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार, पोशी खंडेराव माने करत आहे.


    मृतक अजय मोहुर्ले याला एक सात वर्षाचा मुलगा आहे. पोलीस शिपाही अजय यांनी अगोदर सुद्धा आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे.
    विशेष बाब म्हणजे 2 दिवसांपूर्वी वरोरा पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपायाने कामाच्या तनावपायी आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.

  • Chandrapur vidhansabha candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार?

    Chandrapur vidhansabha candidate : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी कांग्रेसला मिळाला उमेदवार?

    Chandrapur vidhansabha candidate
    मुंबई: लोकसभेतील अभुतपुर्व यशानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीने विधानसभेच्या निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले असून पक्ष वाढीसाठी प्रयत्न कले जाणार आहे. काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र प्रदेश च्या टिळक भवन येथील कार्यालयात सेवा निवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे व व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश संपन्न झाला.

    अवश्य वाचा : बल्लारपूर गोळीबार प्रकरणात व्यापारी एकटवले

    लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विविध स्तरातून पक्ष प्रवेश होत असून आज दि. 08 जुलै रोजी दादर स्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी कार्यालयात सेवानिवृत्त पोलिस अधिकारी श्री. सुधाकर अंभोरे तसेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेत उल्लेखनिय कार्य करणारे व्यावसायिक श्री. राहुल तायडे यांचा पक्ष प्रवेश श्री. नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या हस्ते संपन्न झाला.

     

    Chandrapur vidhansabha candidate यावेळी चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर, राजुरा विधानसभेचे आमदार तथा चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष श्री. सुभाष धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. या पक्ष प्रवेशानंतर बोलतांना खासदार धानोरकर म्हणाल्या कि काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्व समावेशक आहे. श्री.अंभोरे यांच्या पक्ष प्रवेशाने पक्ष आणखी मजबूत होणार असून त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी आमदार सुभाष धोटे म्हणाले कि श्री. सुधाकर अंभोरे यांनी कॉग्रेस पक्षाच्या मजबूतीकरीता कार्य करावे व पक्ष प्रवेशाबद्दल सुधाकर अंभोरे व राहुल तायडे यांना शुभेच्छा दिल्या.

    अवश्य वाचा : ग्रामीण भागात अडीच कोटीच्या वाचनालयाचे लोकार्पण

    या पक्ष प्रवेशावेळी माजी आमदार वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष टिकाराम कोंगरे, यवतमाळ कॉग्रेस कमेटीचे सरचिटणीस संजय खाडे, कॉंग्रेस नेते नानाभाऊ गावंडे, चंद्रपूर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष सोहेल रजा, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, प्रविण काकडे, हेंमत कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

  • Ballarpur Shootout : बल्लारपूर शहरात गोळीबार

    Ballarpur Shootout : बल्लारपूर शहरात गोळीबार

    Ballarpur shootout 4 जुलै ला चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर 3 दिवसांनी पुन्हा बल्लारपूर येथे गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये एक जखमी झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 दिवसात दुसऱ्यादा गोळीबाराची घटना घडली आहे.

     

    बल्लारपूर शहरातील बस स्थानक परिसरात मालू कापड दुकानासमोर अज्ञात युवकाने गोळी झाडली, त्या युवकाने लागोपाठ दोन गोळ्या झाडल्याने एक गोळी दुकानात काम करणाऱ्या नोकरांच्या पायाला लागली आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपुरात भरदिवसा गोळीबार

    Ballarpur shootout काही दिवसांपूर्वी कापड दुकान मालक यांना लुटण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर आता गोळीबाराची घटना घडली आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील गोळीबाराच्या घटनेची सुरुवात बल्लारपूर शहरातून झाली होती.

    महत्त्वाचे : चंद्रपूर शहरातून 14 वर्षीय मुलगा बेपत्ता

    गुन्हेगारी जिल्ह्यात सतत वाढत आहे, जिल्ह्याची वाटचाल आता क्राईम कॅपिटल कडे होत आहे, जिल्ह्यात अवैध शस्त्रे येतात कुठून याचा पोलिसांना थांगपत्ता नसतो काय? असे प्रश्न उपस्थित होत आहे.

    या घटनेनंतर बल्लारपूर पोलिसांवर व्यापाऱ्यांचा चांगलाच रोष वाढला असून याबाबत व्यापारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करणार आहे अशी माहिती पुढे आली आहे.

    चंद्रपूर पोलीस यांनी वाढत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे.

  • Chandrapur police custody : वरोरा आरोपी आत्महत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दिले कारवाईचे संकेत

    Chandrapur police custody : वरोरा आरोपी आत्महत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांनी दिले कारवाईचे संकेत

    Chandrapur police custody चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा पोलीस स्टेशनमध्ये सकाळी 30 जून ला हत्या प्रकरणातील आरोपी समाधान कोळी यांनी गळफास घेत आत्महत्या केली, त्यानंतर चंद्रपूर पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली.

    अवश्य वाचा : वरोरा पोलीस कोठडीत नेमकं घडलं तरी काय?

    26 जून ला आरती चंद्रवंशी या मुलीची हत्या केल्यावर दुसऱ्या दिवशी आरोपी समाधान ला पोलिसांनी अटक केली होती, न्यायालयाने आरोपी समाधान ला 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली मात्र आज कुणी नसताना समाधान ने जोड्याची लेस काढत त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    Chandrapur police custody पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी याबाबत दुपारी 3.30 वाजता प्रतिक्रिया दिली की, या आत्महत्या प्रकरणात जो अधिकारी कर्मचारी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.

    महत्वाचे : 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत, आईने उचलले टोकाचे पाऊल

    Chandrapur police custody पोलीस अधीक्षक म्हणाले की आरोपी समाधान कोळी ने 26 जून ला तरुणीचा आधी बलात्कार व नंतर तिचा खून केला, त्यानंतर आरोपीला आपल्या कृत्यावर पश्चाताप झाला, तो नैराश्यात गेला होता, त्या नैराश्यातून त्याने जोड्याच्या लेस ने आत्महत्या करीत आपलं आयुष्य संपविलं.

  • Chandrapur Shocking News : चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना

    Chandrapur Shocking News : चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना

    Chandrapur shocking news वरोरा :- वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी 1. 30 वाजताच्या सुमारास शेगाव येथे घडली. मृतक मातेचे नाव पल्लवी मितेश पारोधे (27) असे तर स्मित मितेश पारोधे (9 महिने) असे मुलाचे नाव आहे. स्मित वर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

    अवश्य वाचा :आयुर्वेदिक दवाखाना विरोधात मनपा पोहचली पोलीस ठाण्यात

    Chandrapur shocking news प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव बु येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवती सोबत रितिरिवाजाने लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी 1. 30 वाजताच्या सुमारास मितेश पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध पडला होता तर पल्लवी ने गळफास लावला होता.

    राजकीय बातमी : बल्लारपूर विधानसभा निवडणूक आमचा पक्ष लढणार, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट

    Chandrapur shocking news ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवी चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला पल्लवीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहे..

    माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच…
    मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरु झाला होता. तिने याबद्दल आम्हाला सांगितले पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता.

     

    माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची व माझ्या मुलीची तिचा पती,सासू घरच्या मंडळींनी हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे.

  • Horrible accident in Chandrapur : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

    Horrible accident in Chandrapur : चंद्रपुरात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

    Horrible accident in Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना-गडचांदुर मार्गावर 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

     

    मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी, रायपुर येथील रहिवासी होते, समीर मडावी व प्रियांका झित्रु कुलसंगे असे मृतकाचे नाव आहे.

     

    Horrible accident in Chandrapur सदर अपघात हा सोनूर्ली गावाजवळ घडला, समीर व प्रियंका गडचांदूर येथे बँकेत काही कामानिमित्त आले होते, दोघे दुचाकीने परतीच्या वाटेवर असताना कोरपना गडचांदूर मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ समोरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक mh34 ab 1173 याने समोरून समीर च्या दुचाकीला धडक देत तब्बल 50 मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले.

     

    अपघात इतका भीषण होता की दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला, अपघात स्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

     

    मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्ता खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने नियंत्रित गतीमध्ये वाहन चालवितात मात्र कोळसा वाहतूक करणारे ट्रक हे बेभान होत वाहन चालवितात.

  • Chandrapur loksabha election result live : चंद्रपूर लोकसभा निवडणुक निकाल, 2 लाख 50 हजार लीड

    Chandrapur loksabha election result live : चंद्रपूर लोकसभा निवडणुक निकाल, 2 लाख 50 हजार लीड

    Chandrapur loksabha election result live आज 4 जून रोजी सकाळी 8 वाजता पासून देशातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली, यामध्ये अनेक उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    अवश्य वाचा : सुधीर मुनगंटीवार म्हणतात मी जिंकणारचं

    Chandrapur loksabha result live चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा नशीब आजमावत असलेले राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची थेट व अटीतटीची लढत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत होत आहे, तसेच वंचित बहुजन आघाडी कडून राजेश बेले हे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे.

    अवश्य वाचा : आमदार प्रतिभा धानोरकरांच्या मनात काय?

    चंद्रपूर लोकसभेच्या निवडणूकित 2 विद्यमान आमदार यांच्यात होत असलेल्या लढतीचा निकाल आपण बघणार आहो..

    निकाल अपडेट

    कांग्रेस प्रतिभा धानोरकर 7 लाख 14 हजार 476, भाजप सुधीर मुनगंटीवार 4 लाख 56 हजार 043, वंचित बहुजन आघाडी राजेश बेले 21 हजार 897,  बसपा राजेंद्र रामटेके 9 हजार 133, नोटा 10 हजार 786 कांग्रेसच्या धानोरकर ह्या 2 लाख 58 हजार 433 मतांनी पुढे.

     

  • Chandrapur police : दारूचा वाद, मित्राने मित्राला संपविले

    Chandrapur police : दारूचा वाद, मित्राने मित्राला संपविले

    Chandrapur police दीड हजार रुपये घेतल्याच्या कारणावरून वाद करून मित्राने आपल्या मित्रालाच जमिनीवर निपचित पडेपर्यंत लाथाबुक्क्याने मारहाण केली अन पसार झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना घुग्घुस येथील तलावाजवळ असलेल्या देशी दारू भट्टीसमोर शनिवारी (दि. ११) सायंकाळी ६.३० वाजेदरम्यान घडली.

     

    Chandrapur police दारूच्या नशेत बेभान होत, त्यानंतर दीड हजार रुपया वरून दोघांमध्ये वाद झाला, आणि त्या दारूच्या नशेत आपण मित्राला मारहाण करीत आहो याचे भान संतोष ला नव्हते.

    अवश्य वाचा : चंद्रपुरातील हाय प्रोफाइल लाच प्रकारणात होणार SIT ची एन्ट्री

    Chandrapur police सूरज जयस्वाल (४०, रा. घुग्घुस) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर ऊर्फ संतोष कुंडावार (३६, रा. घुग्घुस) याला अवघ्या अर्ध्या तासात बेड्या ठोकल्याची माहिती सुधाकर यादव यांनी दिली.
    सूरज व संतोष हे दोघे मित्र आहे. शनिवारी घुग्घुसमधील भट्टीसमोर ६.३० वाजताच्या दरम्यान ते दोघे एकत्र आले. यावेळी दीड हजार रुपये घेतल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी सूरजला संतोषने लाथा-बुक्क्यानी मारहाण केली. दरम्यान, सूरज जागेवर निपचित पडताच संतोष घटनास्थळावरून पसार झाला.

     

    याबाबतची माहिती घुग्घुस पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी लगेच आपल्या तपासाची चक्रे गतीने फिरवून सागर ऊर्फ संतोष कुंडावार याला अटक केली.

    अवश्य वाचा : पर्यटकांच्या वाहनांवर 5 हजारांचा दंड, ताडोबा जंगलात असं काय घडलं?

    Chandrapur police घटनेची माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांना मिळताच त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. यासोबतच चंद्रपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांनीसुद्धा घटनास्थळ गाठले. पंचनामा करून लगेच आरोपीला अटक केली. घटनेचा पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहेत.