Category: ब्रेकिंग न्यूज मराठी

ब्रेकिंग न्यूज मराठी (Breaking News Marathi) विभागात वाचा news34.in वर सर्वात जलद आणि विश्वसनीय ताज्या बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि प्रशासकीय घडामोडींचे त्वरित कव्हरेज आम्ही देतो. कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटू नये यासाठी हा विभाग खास तयार केला आहे. क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा आणि आपल्या परिसरातील माहिती त्वरित जाणून घ्या.

  • दालमिया सिमेंट कंपनीमधील कन्व्हेअर बेल्ट ला भीषण आग

    News34

    चंद्रपूर – जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातल्या नारंडा येथील डालमीया सिमेंट उद्योगात कनवेयर बेल्टला आग लागली. आग वेगाने पसरत असल्यामुळे कंपनीत गोंधळाचे वातावरण पसरले. या कन्व्हेअर बेल्टने सिमेंटसाठी लागणाऱ्या दगडाची आवक केली जाते. मात्र तो बेल्ट अधिक गरम झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच लागलीच अग्निशमन दलाच्या वाहनाने पाचारण केल्याने आग आटोक्यात आली. यात मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

    [web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”5″ order=”DESC” orderby=”post_title” view=”carousel” /]

    11 ऑगस्ट ला सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास दालमिया सिमेंट कंपनीमधील कनव्हेर बेल्ट जळायला लागल्याने कंपनी मध्ये येणारे सर्व वाहन थांबविण्यात आले होते.

     

    कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख अभिषेक मिश्रा यांनी सांगितले की आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यास आम्हाला यश आले, कंपनी व्यवस्थापनाने समय सुचकता दाखवीत कर्मचाऱ्यांना आधीच कन्व्हेर बेल्ट पासून दूर करण्यात आले होते.
    या आगीत मोठे नुकसान झाले नाही.

  • बातमी का प्रकाशित केली म्हणून पत्रकाराला भर चौकात मारहाण

    News34

    जळगाव – जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.

    त्यांनतर सदर प्रकरण राज्यभर गाजले, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र सुमित पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत व्हिडीओ कॉल द्वारे मुख्यमंत्री शिंदे सोबत कुटुंबांचा संवाद घडवून आणला, त्यावेळी सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी पीडित कुटुंबाने केली होती, मात्र त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी काही न म्हणता मी पोलिसांसोबत बोलतो असे म्हणत फोन ठेवला.

    सदर बाब पत्रकार संदीप महाजन यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी या आशयाची बातमी चालविली.

    त्या बातमीने शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील संतप्त झाले, त्यांनी संदीप महाजन यांना कॉल करीत कुठे राहतो, तुझे हात-पाय तोडतो असे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली.

    पत्रकाराला शिवीगाळ करणारी क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली असता तो आवाज माझाच असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले, त्यानंतर पत्रकार संदीप महाजन यांना भर चौकात मारहाण करण्यात आली.

    क्या चौकात संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आली त्या चौकाचे नाव पत्रकार महाजन यांचे वडील स्वातंत्र्य सैनिकांच्या नावावर आहे.

    बातमीमधील सत्यता प्रकाशित केली म्हणून गुंडांनी पत्रकाराला भर चौकात मारहाण केली, आमदार पाटील यांच्या गुंडांनी मला मारहाण केली असा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे.

  • सिंदेवाही येथे दुचाकी वाहनाचा अपघात

    News34

    Accident in sindewahi

    प्रशांत गेडाम

    सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावाजवळ बुधवारी 9 ऑगस्ट सकाळी 9-30 वाजताच्या दरम्यान एका दुचाकी चालकाची स्वतःच्या ताब्यात असलेल्या दुचाकी वाहना वरुन नियंत्रण सुटल्याने रसत्याचा कडेला असलेल्या खांबाला मोटरसायकल ची जोरदार धडक बसली.

    दुचाकी चालक या धडकेत गंभीर जखमी होत जागीच ठार झाला, सदरची माहिती प्राप्त होताच सिंदवाही पोलीस घटनास्थळी पोहोचले आहे. वृत्तलीहे पर्यंत दुचाकी चालकाचे नाव कळु शकले नाही.

  • वरोरा पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत

    News34

    चंद्रपूर /वरोरा – 7 ऑगस्ट ला अत्याचारग्रस्त महिलेने वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करीत खळबळ माजवून टाकली होती, त्या घटनेनंतर 8 ऑगस्ट ला पुन्हा एका महिलेने पोलीस स्टेशनच्या आवारात विष प्राशन केल्याची घटना घडली मात्र त्या महिलेने बनाव केल्याचे उघडकीस आले.

    वरोरा तालुक्यातील 48 वर्षीय अर्चना दिवाकर दिवटे ही महिला सायंकाळच्या सुमारास वरोरा पोलीस स्टेशनमध्ये पोहचली, आमच्या शेतात चाफले नामक व्यक्तीने खांब लावले त्यांच्यावर कारवाई करावी याबाबत 4 दिवस आधी तक्रार दिली होती, मात्र त्याच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने ती महिला आज विष सोबत घेत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली, शौचाच्या बहाण्याने त्या महिलेने पिशवीतून बॉटल काढत तिने विष प्राशन केले.
    अचानक झालेली ही घटना बघून पोलीस विभाग सतर्क झाले.

    तात्काळ त्या महिलेला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्या महिलेने तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरला रोखले, पोलिसांना संशय आला असता त्यांनी त्या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना विचारणा केली असता आम्ही कालच्या घटनेला प्रेरित होऊन हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.

    सदर माहिती मिळाल्यावर पोलिसही अवाक झाले, याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांनी माहिती दिली की सदर महिलेच्या प्रकरणात पोलिसांची कसलीही भूमिका नव्हती, रुग्णालयात गेल्यावर जेव्हा त्या महिलेने डॉक्टरला तपासणी करू दिली नाही तेव्हा आम्हाला संशय आला होता, विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे.

    पिशवीत जी बॉटल त्या महिलेने आणली होती त्यामध्ये काही नव्हते, सध्या त्या महिलेला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
    त्या महिलेने हा बनाव का केला याबाबत तपास करीत रीतसर कायदेशीर प्रक्रियेने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नोपाणी यांनी दिली

    वरोरा पोलीस उपविभागात भापोसे sdpo म्हणून आयुष नोपाणी हे रुजू झाल्यावर त्यांनी अनेकांवर कारवाईचा धडाका लावला होता, सध्या वरोरा येथील सर्व अवैध धंद्यावर नोपाणी यांनी चाप बसविला आहे.

    त्यांच्या प्रामाणिक भूमिकेला काहीजण विरोध करीत पोलीस विभागाला बदनाम तर करीत नाही ना अशी चर्चा सध्या जनमानसांत सुरू आहे.

     

  • देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा

    News34

    नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 7 विधानसभा जागेवर पोटनिवडणूकी ची घोषणा केली आहे.

    यामध्ये झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तराखंड या जागेचा समावेश आहे.

    मात्र चंद्रपूर व पुणे लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूक बाबत निवडणूक आयोगाने काही एक घोषणा केली नाही, ज्यामुळे राज्यातील 2 लोकसभा जागेची निवडणूक होणार नाही याबाबत सध्यातरी संभ्रम आहे.

    देशातील 7 जागेवर 5 सप्टेंबर ला विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे, सध्या वर्षांपेक्षा कमी कालावधी लोकसभा निवडणुकीला बाकी आहे.

    भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांचं 29 मार्च 2023 ला निधन झाले होते, ते पुणे लोकसभा क्षेत्राचे खासदार होते, चंद्रपूर लोकसभा व राज्यातील कांग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचं 30 मे 2023 ला निधन झाले होते.

    पोटनिवडणूक होणार की नाही यावर संभ्रम होता मात्र आज निवडणूक आयोगाने 7 विधानसभा पोटनिवडणूकीची घोषणा केल्यावर चंद्रपूर व पुणे लोकसभा पोटनिवडणूक त्यामधून वगळली आहे.

  • वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात हाय व्होल्टेज ड्रामा

    News34 breaking

    वरोरा/ छेडछाडी प्रकरणी सातत्याने चार आरोपींना अटक करण्याची मागणी करणाऱ्या महिलेने सोमवारी दुपारी चारच्या सुमारास पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याने वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारात खळबळ उडाली.

    वरोरा तालुक्यातील गावात राहणाऱ्या पीडित महिलेने 5 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत आरोप केला की, वरोरा तालुक्यातील इरफान शेख याने तिच्यावर अत्याचार केला, मारहाण केली आणि संबंध प्रस्थापित केले. आता त्याचे नातेवाईक मला आणखी एका प्रकरणात धमकावतात. पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत तक्रार नोंदवली मात्र त्यांना अटक करण्यात अपयश आले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा सोमवार 7 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या कार्यालयात विष प्राशन करू, असा इशारा पीडितेने दिला.

    पत्रकार परिषदेला संबोधित करताना पीडितेने पुढे सांगितले की, इरफान शेखने गेल्या ऑक्टोबर महिन्यात लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर आयपीसी कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

    आता इरफानचे नातेवाईक आपला पाठलाग करत असून पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून आपली बदनामी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. 22 जून 2023 रोजी खांबाडा गावातील एका हॉटेलमध्ये आरोपीच्या नातेवाईकांनी मला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक होत नसल्याने आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपी शेख रिजवान, शेख मोहसीन, शेख दानिश आणि शेख मोहम्मद यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महिलेने केली आहे. तपास अधिकारी पीएसआय नीलेश चवरे यांची बदली करावी, अशी मागणीही तिने केली.

    वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी व प्रभारी पोलीस निरीक्षक रांजणकर यांनीही त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना नोपानी म्हणाले की, या प्रकरणात आरोपी इरफान शेख याच्यावर आयपीसी कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटकही झाली असून खटला न्यायप्रविष्ट आहे. आणखी चार आरोपींविरुद्ध अॅट्रॉसिटी कायदा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठोस पुरावे असल्याशिवाय पोलीस त्यांना अटक करू शकत नाहीत. इरफान आणि त्याच्या नातेवाइकांनीही महिलेविरुद्ध वारंवार तक्रार केली आणि तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सोमवारी पोलिसांनी महिलेला वरोरा पोलिस ठाण्यात आणले. एसडीपीओ आयुष नोपानी आणि इतर अधिकार्‍यांनी तिला प्रकरणातील तथ्यांबद्दल माहिती दिली. मात्र त्या महिलेने पोलिसांचे काही ही न ऐकून घेता संधी साधून लगेचच पाण्याच्या बाटलीत भरलेले विष प्राशन केले.

    प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ महिलेला उपजिल्हा रुग्णालयाचे पत्र देऊन पुढील उपचारासाठी चंद्रपूरला रेफर केले. एसडीपीओ नोपानी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की आम्ही महिलेच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. वरोरा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रफुल्ल खुजे यांनी सांगितले की, महिलेची प्रकृती स्थिर आहे. तथापि, हे सांगणे कठीण आहे की तिने जे विष प्राशन केले ते अज्ञात आहे.

  • चंद्रपुरात जळाला अवैध सुगंधित तंबाखू

    News34

    चंद्रपूर – शहरातील प्रशासकीय भवनात असलेले अन्न व औषध प्रशासन कार्यालयाला सकाळी आग लागली, या आगीत कागदपत्रे व जप्त केलेले अवैध सुगंधित तंबाखू जळाले असल्याची माहिती आहे.

    सकाळी प्रशासकीय भवन परिसरातून फेरफटका मारताना काही नागरिकांना वरच्या मजल्यावरून धूर निघताना दिसला याबाबत अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.

    तात्काळ अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व लवकर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

    सदर आग कशामुळे लागली याबाबत कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र जप्त असलेला सुगंधित तंबाखूचा काही साठा जळाला अशी माहिती पुढे आली आहे.

    शहरातील हवेत काही वेळ तंबाखू मिश्रित धूर मिसळण्याचे काम काही वेळ सुरू होते.

  • या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरला

    News34 crime

    चंद्रपूर/ वरोरा – राज्यात मागील काही वर्षात हजारो मुली बेपत्ता असल्याची बाब काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती, बेपत्ता मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे, अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली बेपत्ता व्यक्तीचा शोध घेत असताना देह व्यापार व सामूहिक बलात्कार प्रकरण उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी तब्बल 11 आरोपीना अटक केली यामधील 1 आरोपी आधीच बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

    शुक्रवारी सायंकाळी वरोरा पोलिसांना एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद वर्तन करताना आढळली, पोलिसांनी तिची विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले असता मी कस्टमर कडे जात आहे अशी माहिती त्या मुलीने पोलिसांना दिली.
    वरोरा शहरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती पटल्यावर पोलिसांनी या प्रकरणात 2 एजंट ला ताब्यात घेतले यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

    पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि तिच्यासोबत देहव्यापार करणाऱ्या २२ वर्षीय महिलेला तसेच एका पुरुष एजंटला ताब्यात घेतले. या दोघांनी काही ग्राहकांची नावे दिली. पोलिसांनी 9 जणांना अटक केली असून त्यापैकी एक बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

    याबाबत अधिक माहिती देताना उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी सांगितले की, सर्व आरोपी आणि ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर बलात्कार, बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि Pita या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे, असेही नोपानी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवले असून आरोपी महिला, एजंट आणि ग्राहकांची चौकशी करण्यासाठी आठ पोलिस अधिकाऱ्यांची विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे.

     

    पोलिसांनी ज्या आरोपीना ताब्यात घेतले आहे हे सर्व त्या एजंट च्या ओळखीचे ग्राहक होते, मुलगी अल्पवयीन असल्याने 9 आरोपीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपी हे वरोरा तालुक्यातील असल्याची माहिती आहे.

    सध्या आरोपींची चौकशी सुरू आहे, विशेष म्हणजे यामध्ये पुन्हा 5 ते 10 आरोपींची संख्या वाढणार अशी माहिती नोपाणी यांनी दिली आहे.