Category: ब्रेकिंग न्यूज मराठी

ब्रेकिंग न्यूज मराठी (Breaking News Marathi) विभागात वाचा news34.in वर सर्वात जलद आणि विश्वसनीय ताज्या बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि प्रशासकीय घडामोडींचे त्वरित कव्हरेज आम्ही देतो. कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटू नये यासाठी हा विभाग खास तयार केला आहे. क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा आणि आपल्या परिसरातील माहिती त्वरित जाणून घ्या.

  • AAP exposing engineers daru party | राष्ट्रीय अभियंता दिनी चंद्रपुरात अभियंत्यांची ओली पार्टी, आपची धडक

    AAP exposing engineers daru party

    AAP exposing engineers daru party : चंद्रपूर 15 सप्टेंबर – राष्ट्रीय अभियंता दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील बांधकाम विभागात कार्यरत अभियंता वसंत भवनातील खोली क्रमांक 107 मध्ये ओली पार्टी करताना आढळले. यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी धडक देत जिल्हा परिषदेचे विश्रामगृह वसंत भवनात अभियंत्यांना दारू पार्टी करताना रंगेहात पकडले.

    घुग्गुस मध्ये ATM फोडले

    बाथरूम मध्ये लपले अभियंता


    यावेळी 7 अभियंता रूम नंबर 107 मध्ये ओली पार्टी करीत होते, आम आदमी पक्षाने यावेळी वसंत भवनात धाड मारली असता सर्व अभियंते सैरावैरा पळत बाथरूम मध्ये लपले, यावेळी कुणीही आपलं नाव सांगायला तयार नव्हते.


    त्याठिकाणी बांधकाम विभागातील अभियंता यांचे ओळखपत्र सापडल्याने त्यांची ओळख पटली. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता पुलकित सिंह यांना आप पक्षाने संपर्क करीत माहिती दिली.

    पुलकित सिंग यांना सदर ओल्या पार्टीबद्दल काय कारवाई करणार असे विचारले असता ते म्हणाले आम्ही या प्रकरणी चौकशी करीत कारवाई करणार.

  • highway accident auto truck Marathi news | चंद्रपुरात मोठा अपघात, 6 ठार

    highway accident auto truck Marathi news

    highway accident auto truck Marathi news : राजुरा: (28 ऑगस्ट 2025) राजुरा – गडचांदूर – मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रक ने जबर धडक दिली. या घटनेत ६ प्रवाशी ठार झाले असून एका गंभीर प्रवाश्याला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

    छोटा मटका जेरबंद

    तर एकावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता ही दुर्देवी दुर्घटना घडली.

    ऑटो चालक संभ्रमात आणि

    राजुरा येथुन पाचगाव कडे ॲटो चालक व सात प्रवाशी ॲटो ने जात होते. राजुरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. आज एकाएकी येथे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीत बदल करण्यात आला. मात्र याविषयी कसलेही फलक लावले नव्हते. यामुळे ॲटो चालक संभ्रमात पडला आणि हायवे वर ॲटो घेतल्यानंतर हायवा ट्रक ने ॲटोला भिषण धडक दिली. truck collision Rajura Maharashtra

    ही टक्कर एवढी भिषण होती की संपुर्ण ॲटोचा चुराडा झाला. यावेळी तिन प्रवाशी जागीच ठार झाले. तिन जखमींना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर केल्यानंतर रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

    या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे, वय ४८, राहणार पाचगाव, शंकर कारू पिपरे, वय ५०, राहणार कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, वय ४१, राहणार खामोना, तनु सुभाष पिंपळकर, वय १८, राहणार पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार, वय 60 वर्ष, राहणार पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम, वय ५० वर्ष, राहणार पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात निर्मला रावजी झाडे, वय ५० वर्षे, पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे, वय ४० वर्षे, भुुरकुंडा यांचे वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Rajura accident service road auto truck collision

    राजुरा पोलिसांनी याची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रकचालक अद्याप फरार आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे . ठाणेदार सुमित परतेकी पुढील तपास करीत आहेत.

  • Virugiri andolan of project affected workers । 💥 “८ कामगारांचे १६५ मीटर उंचावर आंदोलन – प्रकल्पग्रस्तांचा न्यायासाठी लढा”

    Virugiri andolan of project affected workers

    Virugiri andolan of project affected workers : घुग्गुस – २३ ऑगस्ट रोजी थकीत वेतन व कामावर परत रुजू करण्यासाठी ८ प्रकल्पग्रस्त कामगारांनी विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी कंपनीच्या आवारातील चिमणी वर चढून वीरुगिरी आंदोलन सुरु केले, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीतर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार सामूहिक या चिमणीवरून उडी मारत आत्महत्या करणार व याची सर्वस्वी जबाबदारी कामगार आयुक्त व कंपनी व्यवस्थापनाची राहणार असा इशारा कामगारांनी दिला आहे.

    स्पेलिंग न आल्याने शिक्षकाने विद्यार्थ्यांना केली अमानुष मारहाण

    घुग्गुस मधील उसेगाव मध्ये वर्ष २००८ रोजी गुप्ता एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरु झाली होती, त्यापूर्वी कंपनीने प्रकल्प उभा करण्यासाठी परिसरातील गावातील जमिनीचे संपादन केले होते, यासाठी १०३ शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात गेल्याने त्यांना गुप्ता एनर्जी कंपनीमध्ये स्थायी रोजगार देण्यात आला होता. वर्ष २०१५ ते १६ दरम्यान कंपनीने कामगारांना विश्वासात न घेता कंपनी बंद केली, वर्ष २०१७ ला कंपनी दिवाळखोर घोषित झाली. कंपनी बंद झाल्याने अनेकांचे वेतन थकीत राहिले, प्रकल्पग्रस्तानी नोकरीसाठी आमरण उपोषण सुद्धा केले मात्र कामगारांना न्याय मिळाला नाही.

    कंपनीने आश्वासन पाळले नाही

    NCLT न्यायालयाच्या निर्देशानुसार गुप्ता एनर्जी व्यवस्थापनाचे परिचलनाचे सर्व अधिकार आता विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी कंपनीला देण्यात आले. कामगारांनी प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी याकरिता पत्रव्यव्हार केला होता, त्यावेळी कंपनीने कामगारांना रोजगार मिळेल असे आश्वासित केले होते, मात्र २ महिन्यापूर्वी सुरु झालेल्या कंपनीने कामगारांना दिलेल्या आश्वासनाला डावलून नवीन कामगार रुजू करण्यास सुरुवात केली. १०३ प्रकल्पग्रस्त कामगारांपैकी ६० ते ६५ कामगारांना व्यवस्थापनाने स्थायी कामगार म्हणून रुजू करणे गरजेचे असताना त्यांनी असे केले नाही, याकरिता विजयक्रांती कामगार संघटनेद्वारे प्रकल्पग्रस्तांनी विदर्भ मिनरल्स कंपनी गेटसमोर धरणे आंदोलन सुरु केले. Vidarbha Minerals & Energy

    १७ ऑगस्ट पर्यंत प्रकल्पग्रस्तांना विदर्भ मिनरल्स एन्ड एनर्जी मध्ये स्थायी रोजगार द्यावा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा कामगारांनी दिला होता, मात्र न्याय न मिळाल्याने प्रकल्पग्रस्त महेंद्र वडस्कर, भारत खनके, सुधाकर काळे, सुरेंद्र विके, रमेश सोनेकर, अनिल निखाडे, सुनील जोगी व उमाकांत देठे यांनी २३ ऑगस्ट ला मध्यरात्री २ वाजता कंपनी आवारातील १६५ मीटर उंच चिमणीवर चढत वीरुगिरी आंदोलन सुरु केले, सध्या कामगार ४५ मीटर उंचावर आहे. कामगारांनी प्रशासनाने आम्हाला आता तरी न्याय द्यावा अशी विनंती केली आहे, आम्ही भूमिपुत्र आपल्या रोजगारासाठी लढत आहो, खासदार व आमदार सह नागरिकांनी आम्हाला आमच्या आंदोलनाला सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. Ghuggus project affected workers protest

    प्रकल्पग्रस्त कामगारांनी यावेळी कामगार आयुक्तांवर आरोप केला कि आयुक्त यांनी नेहमी कंपनीची बाजू घेतली मात्र कामगारांना न्याय मिळावा अशी कधी भूमिका घेतली नाही, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त कामगार या चिमणीवरून उद्या मारत सामूहिक आत्महत्या करू. प्रकल्पग्रस्तांच्या वीरुगिरी आंदोलनस्थळी अद्यापही पोलीस प्रशासन शिवाय कुणीही भेट दिली नाही.

  • schoolboys drowned playing football in river । चंद्रपूर हादरलं, खेळाचा शेवट मृत्यूने! बोकडोह नदीत बुडून दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

    schoolboys drowned playing football in river

    schoolboys drowned playing football in river : सिन्देवाही शहरातील महालक्ष्मी नगरातील दोन शाळकरी मुलांचा बोकडोह नदीत फुटबॉल खेळत असताना बुडून मृत्यू झाला. दुर्दैवी घटना घटना शनिवारी (दि.16 ऑगस्ट) दुपारी साडेबाराच्या सुमारास टेकरी गावाजवळील पुलाजवळ घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    बाबुपेठ बनलं मेफेड्रोन अंमली पदार्थाचं हब?


    जीत टिकाराम वाकडे (वय १६ ) आणि आयुष दिपक गोपाले (वय १५ ) रा . महालक्ष्मी नगर, सिन्देवाही अशी मृतांची नावे आहेत.

    फुटबॉल खेळणे जीवावर बेतले

    मिळालेल्या माहितीनुसार, सिन्देवाही येथे आज शनिवारी फुटबॉल ची मॅच होती. मॅच खेळल्यानंतर दुपारी bबाराच्या सुमारास 10 ते 12 मुले तालुक्यातील टेकरी गावाजवडील बोकड नदीत पोहण्याच्या उद्देशाने गेलेत.
    त्यांनी फुटबॉलसह नदीत उतरून पाण्यात खेळण्यास सुरुवात केली. पाण्यात एकमेकांकडे फुटबॉल फेकून खेळत असतानाच ही दुर्घटना घडली. खेळताना अचानक जीत व आयुष यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडू लागले. मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला.


    घटनेची माहिती मिळताच सिन्देवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर गोताखोरांच्या सहाय्याने दोन्ही मुलांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेने सिन्देवाही शहरात शोककळा पसरली आहे.

  • Chandrapur schools closed due to red alert rain । “चंद्रपूर रेड अलर्ट ब्रेकिंग: शाळा, कॉलेजेस, क्लासेस पूर्णपणे बंद!”

    Chandrapur schools closed due to red alert rain

    Chandrapur schools closed due to red alert rain : चंद्रपूर, दि. 24 : भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार 25 जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यात “रेड अलर्ट” दिला असून काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविलेली आहे.

    पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काढले बाहेर

    त्यामुळे चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये, याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये व खाजगी कोचिंग क्लासेस यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार 25 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

    Somayya institute of technology

    उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी.

    तसेच नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर संपर्क क्र. 07172 – 250077 येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले आहे.

  • Chandrapur red alert rainfall । चंद्रपूरमध्ये रेड अलर्ट! पावसामुळे निर्माण होणार पूरस्थिती?

    Chandrapur red alert rainfall

    Chandrapur red alert rainfall : चंद्रपूर – बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात (प्रामुख्याने पूर्व विदर्भात) 25-26 जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार शुक्रवार,  दिनांक 25 जुलै 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरिता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. monsoon flood alert

    २६ जुलै रोजी मुसळधार पाऊस

    पूर्व आणि उत्तर विदर्भात सर्वात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, आणि यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश आहे.  सध्याच्या अंदाजानुसार 26 तारखेला पावसाचे प्रमाण सर्वात अधिक असण्याची शक्यता आहे. Chandrapur heavy rain

    नोकरीसाठी मंगळसूत्र विकले आणि झाली फसवणूक

    Somayya institute of technology

    25-26 जुलै दरम्यान पूर्व विदर्भात धरण साठ्यात वाढ होऊन नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सखोल भागांमध्ये पुराची स्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.

  • Ravindra Shinde BJP cdcc bank chairman । 🎯 फडणवीसांना वाढदिवसाचं खास गिफ्ट – CDCC बँकेत भाजपचा अध्यक्ष

    Ravindra Shinde BJP cdcc bank chairman

    काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला – CDCC बँकेवर भाजपचा झेंडा

    Ravindra Shinde BJP cdcc bank chairman : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे तर उपाध्यक्ष पदावर संजय डोंगरे यांची निवड झाली आहे. बँकेवर भाजपचा अध्यक्ष हे मुख्यमंत्री फडणवीस यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी दिली.

    ताडोबा जंगलात सफारीला येताय, आता महिलांसाठी सुविधा केंद्र

    २२ जुलै रोजी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती, २१ संचालक असलेल्या बँकेत अध्यक्ष रवींद्र शिंदे व उपाध्यक्ष संजय डोंगरे हे निर्विरोध निवडून आले. यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करन देवतळे आदींची यावेळी उपस्थिती होती. Devendra Fadnavis birthday political gift BJP

    भ्रष्टाचाराच्या वेढ्यात अडकलेल्या मध्यवर्ती बँकेत काही महिन्यापूर्वी भरती प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप करण्यात आले होते, सदर प्रकरण आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनात लावून धरले होते, अखेर भरती प्रक्रियेची एसआयटी चौकशी ची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. तब्बल १३ वर्षांनी मध्यवर्ती बँकेत पार पडलेल्या निवडणुकीत २१ संचालक कांग्रेस व भाजप प्रणित निवडून आले मात्र दोन्ही पक्षांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता.

    एकावेळी भाजपात प्रवेशाने कांग्रेस गारद

    पण ऐनवेळी उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी भाजपात प्रवेश घेत कांग्रेसचे सत्तेचे गणित बिघडवून टाकले आणि स्वतः अध्यक्षपदी विराजमान झाले, शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने कांग्रेस पक्षाला मोठा धक्का हादरा बसला, विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर या संचालक पदी निवडून आल्या होत्या. अनेक वर्षे कांग्रेसच्या ताब्यात असलेल्या मध्यवर्ती बँकेत प्रथमच भाजपने बाजी मारली. यावेळी आमदार भांगडिया यांनी मध्यवर्ती बँकेत भाजपचा अध्यक्ष हे आमचं त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली. Congress loses Chandrapur bank to BJP

    आज निर्विरोध निवडून आलेले अध्यक्ष शिंदे व उपाध्यक्ष डोंगरे यांच्या सत्कार कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे हे अनुपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीची जबाबदारी जिल्ह्यातील ५ भाजप आमदार यांच्याकडे होती मात्र २ आमदारांनी यामध्ये सहभाग नोंदविला नाही अशी चर्चा भाजपात रंगली आहे. आमदार भांगडिया, आमदार जोरगेवार व आमदार देवतळे यांनी किल्ला लढवीत मध्यवर्ती बँकेत भाजपची सत्ता खेचून आणली. बँकेच्या यशामागील भाजपचे खरे किंगमेकर आमदार भांगडिया व जोरगेवार ठरले.

  • ravindra shinde joins bjp । सहकार क्षेत्राचे चाणक्य भाजपमध्ये, ठाकरे गटाला चंद्रपुरात जबर धक्का

    ravindra shinde joins bjp

    ravindra shinde joins bjp : चंद्रपूर – शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांनी आज मुंबई मध्ये भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षात प्रवेश घेतला, हा प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. नुकतीच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडली, रविंद्र शिंदे हे पुन्हा संचालक मंडळात निवडून गेले आहे. मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष असलेले शिंदे यांना सहकार क्षेत्रातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाते.

    चंद्रपूर जिल्हा परिषद निवडणूक, प्रभाग रचना जाहीर

    अनेक वर्षे मध्यवर्ती बँकेत कांग्रेस ची सत्ता होती मात्र यंदा या निवडणुकीत भाजपचे आमदार बंटी भांगडिया व किशोर जोरगेवार यांनी शक्ती पणाला लावत सत्ता स्थापनेसाठी मजबूत स्थिती निर्माण केली. एकीकडे कांग्रेस अध्यक्षपदासाठी दावा करीत असली तरी त्यांचा दावा हा फुसका बार ठरला आहे, रविंद्र शिंदे यांच्या भाजप पक्ष प्रवेशाने भाजपचा अध्यक्ष होणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. chandrapur politics latest news

    शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या कडे राजुरा, वरोरा व चिमूर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी होती, या काळात त्यांनी संघटना वाढीस अनेक प्रयत्न केले व असंख्य कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली, त्यांच्या भाजप प्रवेशाने अनेक कार्यकर्ते नाराज झाले असून आधीच मोडकडीस आलेल्या शिवसेना ठाकरे गटाची अवस्था आता बिकट झाली आहे. शिंदे यांच्या बंटी भांगडिया व आमदार किशोर जोरगेवार हे आग्रही होते, शिंदे यांच्या प्रवेशाने भाजप जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्षपदाची निवडणूक सहज जिंकणार अशी चिन्हे निर्माण झाली असून अध्यक्ष पदासाठी भाजपकडून रवींद्र शिंदे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. shiv sena district head joins bjp

    ठाकरे गटाला खिंडार

    पक्ष प्रवेश कार्यक्रमात चंद्रपूर येथील उबाठाचे जिल्हाप्रमुख व चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रविंद्र शिंदे आणि उबाठाचे वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वासुदेव ठाकरे तसेच निफाड तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी ही भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी आ. बंटी भांगडिया, किशोर जोरगेवार, करण देवतळे आदी उपस्थित होते.

  • two elephants kill 60 year old in Sindewahi । 🆘 थरारक! हत्तींच्या हल्ल्याने सिंदेवाही परिसरात खळबळ – वृद्धाला उचलून फेकलं, चिरडून मारलं

    two elephants kill 60 year old in Sindewahi

    two elephants kill 60 year old in Sindewahi : चंद्रपूर / सिंदेवाही – चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सैरावैरा फिरणाऱ्या दोन हत्तींनी अखेर एका वृद्धाचा बळी घेतला आहे. सिंदेवाही तालुक्यातील जाटलापूर गावालगत रविवारी (१५ जून) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मारोती कवडू मसराम (वय ६०, रा. जाटलापूर) असे मृतकाचे नाव असून, पॅरालिसिसमुळे मसराम यांना पळता न आल्यामुळे हत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.

    चंद्रपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

    मिळून हल्ला चढविला

    एकाने त्यांना पायाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेने उचलून जमिनीवर आदळले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    आज रविवारी जाटलापूर गावातील काही शेतकरी धान पेरणीसाठी शेताकडे जात असताना गावालगतच्या जंगलातून अचानक हे दोन्ही हत्ती बाहेर आले. त्यांनी शेतकऱ्यांचा पाठलाग करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी पळून गेले आणि त्यांचा जीव वाचला. याच दरम्यान मारोती मसराम हे शौचासाठी घराबाहेर पडले होते. अपंगत्वामुळे ते पळू शकले नाहीत. हत्तींनी त्यांच्याकडे धाव घेत एकाने चिरडले, तर दुसऱ्याने सोंडेत उचलून आदळले. ही दुर्दैवी घटना पाहून शेतकरी हादरले. wild elephant attack on disabled man Maharashtra

    हत्तीचा शोध सुरु

    घटनेनंतर काही शेतकऱ्यांनी गावात धाव घेत ही माहिती दिली. गावकरी घटनास्थळी पोहोचले. पोलिस पाटलांनी तत्काळ सिंदेवाही पोलिसांना कळवले. पोलीस निरीक्षक राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वनविभागाचे अधिकारीही दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाही येथे पाठवण्यात आला. मसराम यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुलांचा परिवार आहे. घटनेनंतर वन विभागाने दोन्ही हत्तींचा शोध घेणे सुरू केले आहे. हत्ती घटनास्थळावरून इतरत्र पळाले आहेत. वन विभागाचे अधिकारी त्यांच्या मागावर आहेत. वृत्तलिहीपर्यंत हत्तींच्या शोध लागलेला नव्हता. elephant herd enters farmland Chandrapur rural


    सदर दोन हत्ती गडचिरोली जिल्ह्यातून उमा नदी पार करत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात आले आहेत. तेव्हापासून सिंदेवाही व सावली तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांची सतत हालचाल सुरू आहे. काही गावांत ते शिरले असून,नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे जाटलापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


    या घटनेनंतर ग्रामस्थांत तीव्र संताप आणि भीती आहे. गावकऱ्यांनी वनविभागाकडून तत्काळ हत्ती नियंत्रणात घेण्याची आणि मानवहानी थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे..

  • Air India 787 crash Ahmedabad । अहमदाबादमध्ये एअर इंडिया 787 कोसळले! उड्डाणाच्या क्षणीच स्फोट – 242 प्रवाशांचा मृत्यू?

    Air India 787 crash Ahmedabad

    Air India 787 crash Ahmedabad : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका विमानाला अपघात झाला आहे. लंडनला जाणारे हे विमान विमानतळ परिसरातच कोसळले, त्यामुळे मोठा स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट चहुबाजूने पसरले.

    गुरुवारी (१२ जून) दुपारी गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान बोईंग ड्रीमलायनर ७८७ कोसळले, ज्याचे भयानक फोटो समोर येत आहेत. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात आगीच्या प्रचंड ज्वाळा दिसल्या. त्याच वेळी दूरवरून काळ्या धुराचे लोट दिसत होते. या विमानात २४२ प्रवासी होते. सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. Ahmedabad plane crash London flight

    सोनम बेवफा है

    हे ड्रीमलायनर बोईंग ७८७ लंडनला जात होते. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करताना जवळच्या इमारतीला किंवा भिंतीला धडकल्याने विमान कोसळले.

    सुरुवातीच्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. विमानतळाच्या सीमेजवळ विमान कोसळल्याचे मानले जात आहे. समोर आलेल्या सुरुवातीच्या छायाचित्रांमध्ये विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. Air India plane crash residential area Ahmedabad

    विमानाचा पंख तुटला

    चित्रात दिसत आहे की विमानाचा एक पंख तुटून पडला आहे. अग्निशमन दलाचे जवान पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या आग काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा विमान विमानतळावरून उड्डाण घेत होते.

    सर्वत्र गोंधळाचे वातावरण आहे, हा भीषण अपघात पाहून लोक घाबरले आहेत आणि इकडे तिकडे धावत आहेत. विमान पूर्णपणे खराब झाले आहे. विमानाचा बहुतांश भाग जळून राख झाला आहे. ज्या इमारतीवरून विमान पडले त्या इमारतीचेही नुकसान झाले आहे.

    विमानतळाजवळ एक सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार, अहमदाबादहून उड्डाण केलेले हे विमान लंडनच्या दिशेने जात होते.