Sale of mephedrone in Chandrapur city । चंद्रपूरच्या रस्त्यावर ‘पावडरचा’ व्यापार! पोलिसांच्या सापळ्यात टोळी अडकली

Sale of mephedrone in Chandrapur city

Sale of mephedrone in Chandrapur city : चंद्रपूर – चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी आता हायटेक झाली आहे, पूर्वी गांजा, इलेक्ट्रॉनिक सिगारेट, सुगंधित तंबाखू व आता मेफेड्रोन या अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या अंमली पदार्थाचे व्यसन युवा वर्गाला लावण्यासाठी तस्कर नवनवीन युक्त्या शोधत असतात. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच टोळक्याला अटक केली आहे, या टोळक्याजवळून पोलिसांनी मेफेड्रोन पावडर सह ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांची गस्त फसली, चंद्रपूर शहरात चोरीचे वाढते प्रमाण

२६ जुलै रोजी शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेफेड्रोन ड्रग्ज ची विक्री करण्याकरिता वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचत २८ वर्षीय राहुल अनिल पवार राहणार एमईएल, १८ वर्षीय चिनू महेश गुप्ता राहणार महाकाली कॉलरी चंद्रपूर यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ५ ग्राम मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले. NDPS case mephedrone Chandrapur arrest

एक आरोपी पसार

सदर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन सह एकूण ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या गुन्ह्यात तिसरा आरोपी आकाश गुप्ता राहणार महाकाली कॉलोरी हा सध्या पसार आहे. या आरोपींवर कलम ८(क), २२ (ब), २९ NDPS अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

Somayya institute of technology

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दीपक डोंगरे, मिलिंद जांभुळे, शशांक बदामवार व सुमित बरडे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *