Tag: अंमली पदार्थ

  • Mephedrone trafficking case in Chandrapur । १८ वर्षीय मुलगा करतोय मेफेड्रोन ची वाहतूक, चंद्रपूर पोलिसांची कारवाई

    Mephedrone trafficking case in Chandrapur

    Mephedrone trafficking case in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपुरात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे सर्वत्र पसरले आहे, आधी गांजा तर आता मेफेड्रोन म्हणजेच एमडी पॉवडर ची विक्री जोमात सुरु आहे, विशेष म्हणजे या विक्री गॅंग मध्ये अनेक महिला, मुली व अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शहरातील बाबुपेठ मध्ये नुकतेच शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री प्रकरणी धाडसत्र मोहीम राबवली आता लगेच एमडी पावडर ची वाहतूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

    चंद्रपुरात मतांची चोरी

    एमडी पावडर ची वाहतूक बाबुपेठ भागातून होणार असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली होतो माहितीच्या आधारे १० ऑगस्ट रोजी शहर पोलिसांनी नेताजी चौक मध्ये नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ बीडब्लू ८६८९ हि दुचाकी येताना दिसली असता पोलिसांनी वाहन थांबवित झडती घेतली असता चालकांकडून तब्बल ०६.८५ ग्राम एमडी पावडर आढळून आले.

    १८ वर्षीय मुलाने केली वाहतूक

    पोलिसांनी दुचाकी चालक १८ वर्षीय अविनाश अनुप कुंडू अटक करीत एकूण ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी कुंडू विरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. Chandrapur MD powder drug bust

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, कपूरचंद खरवार, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकर व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Sale of mephedrone in Chandrapur city । चंद्रपूरच्या रस्त्यावर ‘पावडरचा’ व्यापार! पोलिसांच्या सापळ्यात टोळी अडकली

    Sale of mephedrone in Chandrapur city

    Sale of mephedrone in Chandrapur city : चंद्रपूर – चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी आता हायटेक झाली आहे, पूर्वी गांजा, इलेक्ट्रॉनिक सिगारेट, सुगंधित तंबाखू व आता मेफेड्रोन या अंमली पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या अंमली पदार्थाचे व्यसन युवा वर्गाला लावण्यासाठी तस्कर नवनवीन युक्त्या शोधत असतात. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच टोळक्याला अटक केली आहे, या टोळक्याजवळून पोलिसांनी मेफेड्रोन पावडर सह ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

    पोलिसांची गस्त फसली, चंद्रपूर शहरात चोरीचे वाढते प्रमाण

    २६ जुलै रोजी शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मेफेड्रोन ड्रग्ज ची विक्री करण्याकरिता वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचत २८ वर्षीय राहुल अनिल पवार राहणार एमईएल, १८ वर्षीय चिनू महेश गुप्ता राहणार महाकाली कॉलरी चंद्रपूर यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ५ ग्राम मेफेड्रोन ड्रग्स जप्त करण्यात आले. NDPS case mephedrone Chandrapur arrest

    एक आरोपी पसार

    सदर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन सह एकूण ६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या गुन्ह्यात तिसरा आरोपी आकाश गुप्ता राहणार महाकाली कॉलोरी हा सध्या पसार आहे. या आरोपींवर कलम ८(क), २२ (ब), २९ NDPS अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

    Somayya institute of technology

    सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, नितीन रायपुरे, सचिन गुरनुले, गणेश मोहुर्ले, दीपक डोंगरे, मिलिंद जांभुळे, शशांक बदामवार व सुमित बरडे यांनी केली.

  • district level narcotics coordination meeting । चंद्रपुरात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र!, व्यसनमुक्तीचा नवा आराखडा

    district level narcotics coordination meeting

    district level narcotics coordination meeting : चंद्रपूर, दि. 7 जुलै :  जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापर, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे कठोर आणि योजनाबद्ध उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

    जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या नार्को-कोऑर्डिनेशन समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत श्री गौडा बोलत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे तसेच रेल्वे पोलिस व इतर विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    सीमावर्ती भागात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    जिल्हाधिकारी गौडा यांनी युवा पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी समाजात व्यापक जनजागृती करणे गरजेचे असल्याचे सांगितले. (anti drug awareness programs in schools) शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करावी, तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी शिक्षण विभागाने विविध उपक्रम राबविण्याचे सांगितले.

    प्रतिबंधक औषधांची विक्री

    अन्न व औषध प्रशासन विभागाने पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध मेडीकल स्टोअर्सवर अचानक भेटी देऊन प्रतिबंधित औषधांची (how to check banned drugs in pharmacies) विक्री होत आहे की नाही याची तपासणी करणे, सीसीटीव्ही कार्यरत आहेत की नाही याचीही खातरजमा करणे, रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ तयार होणार नाहीत याची खबरदारी घेणे, एमआयडीसीमधील चालू व बंद कारखान्यांची तपासणी करणे.

     तसेच आंतरराज्य सीमेवरील शेती क्षेत्रांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडून नियमित पाहणी करून शेतकऱ्यांना जागरूक करणे, खाजगी वाहनाद्वारे येणाऱ्या टपाल, पार्सल, कुरीअर यांची आकस्मिक तपासणी करणे अशा विविध सूचना देत जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यासोबतच व्यसनमुक्ती संदर्भात महिलांसाठी स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र उभारण्याचे निर्देश देत, यासाठीही जनजागृतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    बैठकीचे सादरीकरण पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी केले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर नियमित पाठपुरावा करण्याचेही सूचित केले.

  • ndps act chandrapur arrest । चंद्रपुरात ओसाड कॉलेजचं मैदान की ड्रग्सचा अड्डा? शहर पोलिसांची कारवाई!

    ndps act chandrapur arrest

    ndps act chandrapur arrest : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागामध्ये ओसाड पडलेले डीएड कॉलेजच्या मैदानात अंमली पदार्थाची विक्री काळोखात सुरु आहे, यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई सत्र राबवित २४ वर्षीय युवकाला एमडी ड्रग्स पावडर सहित अटक करीत तब्बल १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 24 year old arrested with md drugs

    वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही

    चंद्रपूर जिल्हा दारूबंदी व दारूबंदी उठल्यानंतर च्या काळात जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते मात्र आजही अंमली पदार्थाची तस्करी पोलीस प्रशासन थांबवू शकलेले नाही.

    तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शहर व जिल्ह्यातील ओसाड पडलेल्या ठिकाणावर सर्च मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होती, त्यावेळी पोलिसांनी अनेक अवैध धंदे उघडकीस आणले. मात्र पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यावर हि कारवाई थंडबस्त्यात गेली, त्यामुळे ओसाड पडलेल्या ठिकाणी पुन्हा अवैध धंद्याची वर्णी लागली.

    गुन्हेगारीचा अड्डा

    चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून बाबुपेठ च नाव आहे, या प्रभागात शासकीय अध्यापक विद्यालयाचे मैदान आहे, कालांतराने शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलणे शासकीय अध्यापक विद्यालयात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने प्राध्यापक आपली वसाहत सोडून गेले, आणि हीच वसाहत पुढे चालून गुन्हेगारीचा अड्डा बनली.

    १५ मे रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना या एमडी ड्रग्स विक्री बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली असता त्याठिकाणी संशयास्पद तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळ एमडी पावडर आढळले.

    २४ वर्षीय तरुणाला झटपट पैसे कमविण्याचा चस्का

    आरोपी २४ वर्षीय महेश सुबोध बाला राहणार जुनोना चौक, बाबुपेठ याच्याजवळून ९.०४० ग्राम एमडी पावडर किंमत ४५ हजार व दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीई ७१९५ असा एकूण १ लक्ष १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बाला वर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. md drugs in chandrapur

    Powered by myUpchar

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय धोटे, कापूरचंद खरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे करीत आहे.