ATM looted by using gas cutter overnight
ATM looted by using gas cutter overnight : चंद्रपूर (15 सप्टेंबर 2025) – चंद्रपूर – चंद्रपूर घुग्गुस मार्गावरील पांढरकवडा येथे बँक ऑफ महाराष्ट्र चे ATM अज्ञातांनी फोडले, सदर घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून 15 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली.
पांढरकवडा हे सतत सुरू असलेला रहदारीचा मार्ग आहे, पैसे काढण्यासाठी बँकेत न जाता नागरिक थेट या ATM मशीनचा वापर करीत पैसे काढतात.
दुचाकी-चारचाकी वाहनांच्या अपघातात युवकाचा मृत्यू
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नागरिकांची या मार्गावर वर्दळ कमी होती, याचा फायदा घेत अज्ञातांनी सदर मशीन फोडत काही रक्कन लंपास केली असल्याची माहिती आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी ATM मध्ये प्रवेश करीत गॅस कटर च्या साहाय्याने मशीन फोडली, यामध्ये किती रक्कम लंपास केली याबाबत सध्यातरी तपास सुरू असून घुग्गुस पोलीस सध्या ATM मशीनचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे, या चोरीत किती रक्कम लंपास झाली याबाबत सध्या पोलीस तपास करीत आहे.
अशीच घटना पूर्वी घडली
ATM मध्ये किती रक्कम टाकली होती, त्यानंतर किती रक्कम लंपास केली याबाबत सविस्तर कळेल. अशी माहिती घुग्गुस पोलिसांनी दिली.
काही वर्षांपूर्वी अशीच एक घटना वरोरा तालुक्यातील टेम्भुर्डा मधील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये घडली होती, त्या चोरी मध्ये आरोपींनी गॅस कटरचा उपयोग केला होता हे विशेष. सोबतच चंद्रपुरातील बंगाली कॅम्प चौकात बँकेचे ATM फोडले होते.
Leave a Reply