Integrated Child Development Services Vacancies । चंद्रपूर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा मध्ये रिक्त पदांचा डोंगर

Integrated Child Development Services Vacancies

Integrated Child Development Services Vacancies : चंद्रपूर ९ ऑगस्ट (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांनी दिलेल्या उत्तरातून या वस्तुस्थितीला दुजोरा मिळाला आहे. ICDS vacancies impact on administration

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण, रामू तिवारी यांचे आमदार जोरगेवार याना खुलं आवाहन

अनेक पदे रिक्त

मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा परिषदेत बाल विकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) च्या 15 मंजूर पदांपैकी 14 पदे रिक्त आहेत. तसेच, अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या 89 मंजूर पदांपैकी 30 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या 15 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमध्ये, 2,447 अंगणवाडी सेविकांच्या मंजूर पदांपैकी 69 पदे आणि 2,447 अंगणवाडी मदतनिसांच्या मंजूर पदांपैकी 154 पदे रिक्त आहेत. मंत्रालयानेच दिलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांमुळे सेवांची गुणवत्ता आणि व्यापकता टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे.

या संदर्भात, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0’ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये, केंद्र सरकार धोरण आणि नियोजनासाठी जबाबदार असले, तरी दैनंदिन कार्यक्रम अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची आहे.

त्यामुळे विविध स्तरांवरील रिक्त पदे भरण्याचे प्रकरण संबंधित राज्यांच्या अधिकारक्षेत्रात येते. या प्रश्नावर केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत नियमितपणे संवाद, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि बैठकांद्वारे चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *