Tag: खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर

  • Integrated Child Development Services Vacancies । चंद्रपूर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा मध्ये रिक्त पदांचा डोंगर

    Integrated Child Development Services Vacancies

    Integrated Child Development Services Vacancies : चंद्रपूर ९ ऑगस्ट (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेतील रिक्त पदांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येत असल्याचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला होता. महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या राज्यमंत्री सावित्री ठाकुर यांनी दिलेल्या उत्तरातून या वस्तुस्थितीला दुजोरा मिळाला आहे. ICDS vacancies impact on administration

    विद्यार्थ्यांच्या भविष्यावर राजकारण, रामू तिवारी यांचे आमदार जोरगेवार याना खुलं आवाहन

    अनेक पदे रिक्त

    मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हा परिषदेत बाल विकास प्रकल्प अधिकारी (गट-ब) च्या 15 मंजूर पदांपैकी 14 पदे रिक्त आहेत. तसेच, अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या 89 मंजूर पदांपैकी 30 पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या 15 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांमध्ये, 2,447 अंगणवाडी सेविकांच्या मंजूर पदांपैकी 69 पदे आणि 2,447 अंगणवाडी मदतनिसांच्या मंजूर पदांपैकी 154 पदे रिक्त आहेत. मंत्रालयानेच दिलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांमुळे सेवांची गुणवत्ता आणि व्यापकता टिकवून ठेवण्यासाठी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे.

    या संदर्भात, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0’ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये, केंद्र सरकार धोरण आणि नियोजनासाठी जबाबदार असले, तरी दैनंदिन कार्यक्रम अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची आहे.

    त्यामुळे विविध स्तरांवरील रिक्त पदे भरण्याचे प्रकरण संबंधित राज्यांच्या अधिकारक्षेत्रात येते. या प्रश्नावर केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत नियमितपणे संवाद, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि बैठकांद्वारे चर्चा करत असल्याचे सांगितले आहे.

  • Chandrapur MP demands road repair potholes । खड्ड्यांनी घेतले प्राण, खासदारांचा संताप अनावर – गडकरींना केली ही तातडीची मागणी!

    Chandrapur MP demands road repair potholes

    Chandrapur MP demands road repair potholes : चंद्रपूर: खासदार प्रतिभा सुरेश धानोरकर यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. चंद्रपूर महामार्गावर खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे होणारी जीवितहानी थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

    रक्तरंजित चंद्रपूर, लहान भावाने मोठ्या भावावर झाडली गोळी

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या निवेदनात चंद्रपूर महामार्गावरील गंभीर परिस्थितीकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले. जानाळा फाट्याजवळ खड्ड्यांमुळे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आणि त्याला मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले, तर चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील साखरवाही फाट्याजवळ रस्त्याच्या खराब स्थितीमुळे भरधाव वेगाने येणाऱ्या कारच्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना त्यांनी नमूद केली. याव्यतिरिक्त, बामणी-राजुरा महामार्गावरील वर्धा नदीच्या पुलाजवळ एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. या घटना आपल्या विभागाच्या घोर निष्काळजीपणाची आणि बेफिकीर कार्यपद्धतीची भयावह परिणाम दर्शवितात असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे. Chandrapur pothole road safety demand action

    वारंवार तक्रारी पण परिस्थिती जैसे थे

    चंद्रपूर महामार्गावरील खड्ड्यांची समस्या नवी नाही, या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती “जैसे थे” असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी निदर्शनास आणून दिले. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून , ही केवळ प्रशासकीय चूक नसून, नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेशी केलेला गंभीर खेळ आहे, असेही त्या म्हणाल्या.

    याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या अपघातांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करावी. तसेच, चंद्रपूर महामार्गावरील सर्व खड्डे आणि खराब रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी आणि भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना त्वरित लागू कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. Chandrapur potholes accidents government negligence

    याव्यतिरिक्त, अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तातडीने आणि पुरेशी आर्थिक मदत देऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, रस्त्यांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या प्रक्रियेवर कठोर आणि नियमित देखरेख ठेवण्यासाठी एक पारदर्शक व्यवस्था तातडीने स्थापित करावी असेही त्यांनी सुचवले.

    चंद्रपूर महामार्गावर खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांवर अंकुश लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची विनंती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.