Tag: आम आदमी पार्टी चंद्रपूर

  • Jhopa Kadha Andolan । मजुरांची रोजी हजार तर शिक्षकांची २६०? आप चे झोपा काढा आंदोलन

    Jhopa Kadha Andolan

    Jhopa Kadha Andolan : चंद्रपूर – २१ ऑगस्ट रोजी आम आदमी पक्षातर्फे संपूर्ण राज्यात शासकीय शाळांची दयनीय अवस्था व शिक्षण क्षेत्राबाबत उदासीन असलेल्या सरकार विरोधात झोपा काढा आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरात महानगरपालिका समोर आप ने हे अभिनव आंदोलन करीत मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा शिक्षण क्षेत्राकडे असलेल्या दुर्लक्षाबाबत निषेध केला.

    चंद्रपुरात डीजे च्या लेझर लाईटवर बंदी, पोलीस अधीक्षकांचा आदेश

    या अभिनव आंदोलनात आप चे पदाधिकारी स्थानिक आमदार जोरगेवार यांचे मुखवटे घालून सामील झाले होते, चंद्रपूर शहरात मनपाच्या शासकीय शाळांची दुरावस्था होत आहे मात्र याकडे मनपा लक्ष देत नसून इतर कामांकडे जास्त लक्ष देत असल्याचा आरोप केला आहे.

    २६० रु रोजीचे शिक्षक?

    शहरातील ६० ते ७० वर्षे जुन्या शाळा बंद करण्याचा फर्मान मनपा काढत आहे तर दुसरीकडे आयुक्तांनी अजब ठराव पास केला कि २६० रुपये रोजी ने चंद्रपुरातील मनपा शाळेत शिक्षकांची नियुक्ती केल्या जाणार आहे, यावर आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले कि मजुरी करणाऱ्यांची रोजी हि ८०० रुपये ते हजार रुपये आहे मग शिक्षक इतक्या कमी पैश्यात मुलांचे भविष्य कसे घडविणार. AAP Jhopa protest against municipal neglect of schools

    इतर इव्हेन्ट मध्ये मनपा हजार रुपये रोजीने कामगारांना काम करायला लावतात मात्र मुलांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना इतक्या कमी पैश्यात ठेवणे म्हणजे हा मुलांच्या भवितव्याशी चाललेला खेळ आहे. पालिकेने आपल्या वार्षिक बजेटमधून २५ टक्के शिक्षणावर खर्च करायला हवा, त्यानंतर शिक्षण प्रणाली चांगलीच सुधारेल, मात्र सरकार व मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, म्हणून आम्ही या झोपलेल्या प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करीत आहो.

    आयोजित आंदोलनात आप चे प्रदेश सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, महिला अध्यक्ष तबस्सुम शेख व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

  • smart electricity meter । चंद्रपूरकरांना स्मार्ट मीटरचा ‘करंट’, “स्मार्ट मीटर थांबवा, आमचे जुने मीटर लावा!”

    smart electricity meter

    smart electricity meter : चंद्रपूर – १२ हजार रुपये दंड बसणार, दंड चुकवायचा असेल तर आताच स्मार्ट मीटर लावून घ्या, हे वाक्य स्मार्ट मीटर लावण्याकरिता आलेल्या खासगी कर्मचाऱ्यांचे आहे, या भीतीपायी अनेकांनी स्मार्ट मीटर लावले मात्र महिना भरात वीज बिलात भरीव वाढ झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली आहे. वाढीव वीज बिल पासून सुटका मिळावी व आमचे जुने वीजमीटर लावून देण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी आम आदमी पक्षाचे युवा अध्यक्ष राजू कुडे यांच्याकडे केली.

    स्मार्ट मीटर विरोधात आप मैदानात

    राजू कुडे यांनी आप च्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत स्मार्ट मीटर लावणे बंद करीत वाढीव वीज बिल थांबविण्याची मागणी महावितरणकडे केली. मात्र सदर निर्णय हा वरिष्ठ पातळीवरुन झाला असल्याने याबाबत ऊर्जामंत्री स्वतः निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राजू कुडे यांनी राज्याचे आदिवासी मंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडे स्मार्ट मीटर बाबत तक्रार करीत मीटर लावणे थांबवा व याबाबत आपण ऊर्जामंत्री यांच्याकडे सदर बाब पोहोचवा असे निवेदन कुडे यांनी पालकमंत्री उईके यांच्याजवळ दिले. smart meter installation

    जनतेची लूट

    शहरात जोरजबरदस्तीने सुरु असलेले स्मार्ट मीटर लावण्याचे काम तातडीने थांबविण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. अनेक नागरिकांना नव्याने बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिल हे कुठे दुप्पट तर कुठे तीनपट वाढले असून गरीब जनतेची सरळसरळ लूट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    नागरिकांच्या तक्रारींनुसार, बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरची सखोल चौकशी व ऑडिट करून वाढीव बिल कमी करण्यात यावे, तसेच चौकशी अहवाल येईपर्यंत नवीन मीटर बसविण्याचे काम थांबवावे, अशी विनंती आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी बाबूपेठ येथे तिरंगा यात्रेत आलेले पालकमंत्री अशोक उईके यांच्याकडे केली.

    या प्रसंगी आम आदमी पार्टीचे जयदेव देवगडे, मनीष राऊत, तसेच अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • smart prepaid electricity meter audit demand । ⚡ बाबूपेठमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर वाद! आप ने केली ऑडिटची मागणी

    smart prepaid electricity meter audit demand

    smart prepaid electricity meter audit demand : चंद्रपूर : बाबुपेठ परिसरामध्ये अलीकडेच बसविण्यात आलेल्या स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे अनेक नागरिकांना वाढीव व अनियमित बिल येत असून परिसरात संभ्रम आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात अनेक तक्रारी आम आदमी पार्टीकडे प्राप्त झाल्या आहेत.

    चंद्रपूर पाण्यात, जनजीवन विस्कळीत

    आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महावितरण विभागाला निवेदन देऊन बापूपेठमधील सर्व स्मार्ट प्रीपेड मीटरचे तात्काळ ऑडिट व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, ऑडिट पूर्ण होईपर्यंत नवीन स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तातडीने थांबविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

    तर आंदोलन करणार

    पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.

    यावेळेस आपचे राज्य संघटन सचिव सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संघटन मंत्री संतोष बोपचे, सोशल मीडिया प्रमुख राजेश चेडगुलवार, बाबुपेठ अध्यक्ष राजू तोंडासे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जावेद सय्यद, हर्षल नेवलकर, जयदेव देवगडे, मनीष राऊत, अनुप तेलतुंबडे, इत्यादी उपस्थित होते.

  • AAP open letter to mla kishor jorgewar । 💥 “अम्मा की पढ़ाई” वरून AAP चं आमदार जोरगेवार यांना खुले पत्र

    AAP open letter to mla kishor jorgewar

    AAP open letter to mla kishor jorgewar : आदरणीय आमदार किशोरजी,

    आपण आपल्या पत्रात “अम्मा की पढ़ाई” हे केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय एका आत्मपरीक्षणात्मक, भावनिक शैलीत जनतेसमोर मांडला. आपण लिहिता की, “ही धम्मसेवा आहे” आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंना आपण ‘अस्वस्थता’ म्हणून मांडता. पण हा मुद्दा भावनांचा नाही हा इतिहास, समाजप्रबोधन, आणि संविधानाच्या मूल्यांचा विषय आहे. Amma ki padhai controversy

    अम्मा कि पढाई वाद, आमदार जोरगेवार यांचं भावनिक पत्र

    आमच्या आरोपांचा गाभा काय होता?

    1. दीक्षाभूमीच्या परिसरात तिसऱ्या ओळखीची जाणीवपूर्वक निर्मिती “अम्मा की पढ़ाई” हे नाव देऊन.
    2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मुद्दाम टाळले गेले.
    3. शासकीय रचनेत कोणताही स्पष्ट ठराव न करता, एका विशिष्ट ओळखीचा प्रचार सुरू केला गेला.
    4. स्मारकाच्या किंवा सौंदर्यीकरणाच्या नावाखाली “आयडेंटिटी शिफ्ट” सुरू करण्याचा भाजपाचा देशव्यापी पॅटर्न इथेही दिसून आला. Chandrapur Diksha Bhumi identity politics

    आपण काय म्हणता आणि आम्ही का असहमत आहोत?

    १. “हा उपक्रम धम्मसेवा आहे”
    धम्मसेवा व्यक्तिगत भावना नसते — ती सामूहिक असते.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा दीक्षा दिली, तेव्हा ती वैयक्तिक नव्हती — ती क्रांती होती. आपण जर या कार्याला “धम्मसेवा” म्हणत असाल, तर ती पवित्र सेवा एका विशिष्ट ओळखीच्या किंवा नात्याच्या नावाखाली चालवणे म्हणजे त्या क्रांतीचा अवमूल्यन आहे. मग तो तुमच्या मातोश्रींचा आदर असला तरीही. Amma ki padhai vs Ambedkar values

    २. “गैरसमज निर्माण झाले”
    गैरसमज नव्हते. लोकांनी स्पष्टपणे पाहिले की, बाबासाहेबांचं नाव बाजूला ठेऊन, एका भावनिक नात्याच्या आधारे दीक्षाभूमीच्या परिसरात नवीन ब्रँडिंग सुरू होत होतं. तुम्ही हे केंद्र एखाद्या वस्तीमध्ये सुरू केलं असतं, तर कोणी विरोध केला नसता. पण तुम्ही नेमकं *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि दीक्षाभूमी परिसर निवडला — हे निवडणूकपूर्व मनोवैज्ञानिक रणनितीचे पाऊल होते.

    ३. “विद्यार्थ्यांचा विकास झाला, 27 उत्तीर्ण झाले”

    हे खूप चांगले आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो. पण शिक्षण देताना त्यावर तुमचं “ब्रँडिंग” लावणं — हेच प्रश्न निर्माण करतं.
    विचार करा — जर दुसऱ्या कुणी ‘हेडगेवार की पढाई’ सुरू केलं असतं, तर ते ही धम्मसेवा मानली गेली असती का?

    मुख्य मुद्दा : “ज्योत विझली नाही — पण तुमचा हात जर त्या ज्योतीच्या सावलीतच राजकारण करत असेल, तर ती विझवणंच योग्य!”

    तुम्ही लिहिता की, “ज्योत विझलेली नाही – ती पुन्हा पेटणार आहे”* पण प्रश्न ‘ज्योती’चा नाही आहे.
    प्रश्न त्या ज्योतीच्या नावाखाली कोणते झेंडे फडकवले जातात, हाच आहे!
    तुम्ही सांगत आहात की केंद्र बंद केलं — परंतु बाबासाहेबाचे नाव ठेऊन हे केंद्र सुरू ठेवता आले असते परंतु तुम्ही तसें केले नाही नावासाठी एवढा अट्टहास का ? हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. AAP open letter to mla kishor jorgewar

    तुमचं पत्र — एक रणनीती, आत्मपरीक्षण नव्हे.

    आपण तुमच्या पत्रात विद्यार्थ्यांच्या अश्रूंना, आईच्या आठवणींना, आणि धम्मसेवेच्या शब्दसामर्थ्याला कवटाळून लोकभावना तयार करण्याचा प्रयत्न करता.
    हे आम आदमी पक्षाचा कार्यकर्ते म्हणून चुकीचे वाटते , बाबासाहेबांच्या विचारांचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो

    भावना बाजूला ठेवा, सत्य ऐका — “बाबासाहेबांची जागा कोणत्याही नावाने बदलता येणार नाही.”

    म्हणून शेवटी आमचं उत्तर स्पष्ट आहे:

    तुमचं हे पत्र स्वतःला क्लीन चिट देण्याचा एक प्रयत्न आहे.
    पण चंद्रपूरच्या जनतेने डोळे उघडले आहेत.
    हा लढा “अम्मा की पढ़ाई” विरोधात नाही — तर बाबासाहेबांविरुद्ध सुरू असलेल्या हळूहळू चालणाऱ्या ओळख-हेरफेरी विरोधात आहे.

    बाबासाहेबांचे नाव, कार्य आणि जागा कोणत्याही प्रकारे, कोणत्याही भावनिक संज्ञेतून झाकली जाणार नाही हीच आम्ही मागणी पुन्हा मांडतो. आपणाला माहित असेल आम आदमी पार्टी ने दिल्ली पंजाब मध्ये शिक्षा क्रांती सुरू केली ती केवळ नावासाठी नाही तर गरीब, वंचित ,दुर्बल घटकातील मुलगा शिकला पाहिजे कुठलेही जाती पातीचे राजकारण न करता मुलगा सक्षम झाला पाहिजे हीच आम आदमी पार्टीची भूमिका आहे. शिक्षण आणी आरोग्य या विषयावर कुणी राजकारण करत असेल तर आम आदमी पार्टी भविष्यात ही विरोध करणार.
    हम राजनीती करणे नही इसे बदलणे आये हैं !

    जय संविधान

    आम आदमी पक्ष,
    चंद्रपुर

  • sanitation workers rights violation Chandrapur । कामगार रडतायत… व्यवस्था मौन!, घंटागाडी कामगारांचा आक्रोश, आप’ उतरली मैदानात!

    sanitation workers rights violation Chandrapur

    sanitation workers rights violation Chandrapur : १० जुलै चंद्रपूर – चंद्रपूर : शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने कचरा संकलनाचे काम अर्बन एन्व्हायरो मॅनेजमेंट या खाजगी संस्थेला सोपविण्यात आले आहे. या अंतर्गत अनेक वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या घंटागाडी कामगारांना अलीकडे कोणतीही पूर्वसूचना न देता आणि कोणतेही स्पष्ट कारण न देता कामावरून कमी करण्यात आले आहे. ही बाब केवळ अन्यायकारकच नव्हे, तर मानवी हक्कांच्या विरोधात आहे.

    पाणी कराची वसुली करण्यासाठी चंद्रपुरात येणार वॉर्ड सखी

    असे असताना कंपनी व्यवस्थापकांकडून कामगारांशी सातत्याने गैरवर्तन, मेडिकल सुट्टी नाकारणे, कामाच्या सुरक्षिततेची कोणतीही हमी न देणे यासारख्या गंभीर तक्रारी समोर येत आहेत. यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता, असुरक्षितता आणि असंतोष वाढत चालला आहे. Chandrapur municipal contract worker dispute

    या अन्यायाविरोधात आज आम आदमी पार्टी चंद्रपूरच्या वतीने मा. महानगरपालिका आयुक्त व कामगार सहायक आयुक्त चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.

    या निवेदनात खालील ठाम मागण्या करण्यात आल्या:

    🔹 अन्यायाने कामावरून कमी केलेल्या कामगारांची तात्काळ चौकशी करण्यात यावी.

    🔹 पीडित कामगारांना १५ दिवसांच्या आत पुन्हा सेवेत बहाल करण्यात यावे.

    🔹 कंपनीच्या मनमानी कारभारावर महानगरपालिकेने लक्ष घालावे.

    🔹 कामगारांना त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळावे.

    जर वरील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आम आदमी पार्टीच्या वतीने घंटागाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

  • poor drainage system problems in urban । अनोखं आंदोलन, चंद्रपुरात खड्ड्यांना श्रद्धांजली

    poor drainage system problems in urban

    poor drainage system problems in urban : चंद्रपूर ४ जुलै – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बाबूपेठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग, जो की दलित वस्ती म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी मलनिसारण योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत हलक्या दर्जाचे व निष्कृष्ट पद्धतीने केले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    काम आहे मात्र नोंद नाही, सुरक्षारक्षकांच्या समस्येबाबत आमदार जोरगेवार यांनी वेधले सरकारचे लक्ष

    या योजनेमुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी भरले असून नागरिकांना अत्यंत गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. पावसाळ्याच्या काळात हे खड्डे पाण्याखाली जाऊन अधिक धोकादायक ठरत आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. civic negligence and pothole accidents

    खड्ड्यांना श्रद्धांजली

    आज या अन्यायकारक आणि बेजबाबदार वागणुकीविरोधात आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. राजू कुडे यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेऊन खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला. खड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.” pothole protest by citizens against municipal corporation

    या आंदोलनामध्ये आपचे प्रदेश सहसचिव सुनील भाऊ मुसळे, जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, शहराध्यक्ष योगेश गोखकरे, संघटन मंत्री संतोष बोपचे, बाबूपेठ अध्यक्ष राजू भाऊ तोडासे, अनुप तेलतुंबडे, मनीष राऊत, अजय बाथव, रजनीताई गड्डेवार, किरण ताई कुमरवार, रावलकर ताई इत्यादी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते व त्यांनी महानगरपालिकेच्या कामकाजाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

  • AAP exposes corruption । 💣 M-20 म्हणलं, M-13 निघालं! आम आदमी पक्षाने उघड केली रस्ते घोटाळ्याची पोलखोल!

    AAP exposes corruption

    AAP exposes corruption : चंद्रपूर – शहरात सध्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विकासकामांचा धडाका सुरु आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करत विविध प्रभागांत सीसी रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम आदमी पक्षाने महापालिकेवर आणि ठेकेदारांवर गंभीर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप केला आहे. Chandrapur Road Work Scam

    चंद्रपुरात या कारणामुळे झाला वाघिणीचा मृत्यू

    🕵️‍♂️ आम आदमी पक्षाची थेट पाहणी – M-20 ऐवजी M-13 गुणवत्ता

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वडगाव प्रभागातील रस्त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी रस्त्यांची स्ट्रेंथ तपासली असता, महापालिकेने M-20 दर्जा असल्याचा दावा केला होता, परंतु प्रत्यक्ष मापनात केवळ M-13 स्तराचीच नोंद झाली.

    हेच चित्र तुकुम प्रभागातही पाहायला मिळाले. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांसमोर हे सारे सत्य मांडण्यात आले.

    💬 “आमदारांच्या छत्रछायेखाली ठेकेदारांना संरक्षण”

    आम आदमी पक्षाच्या मते, हे सर्व काम एका विशिष्ट ठेकेदारामार्फत केले जात आहे, जो स्थानिक आमदारांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, अधिकारी मौन बाळगतात आणि ठेकेदाराला पूर्ण मोकळीक मिळते.

    📉 “रस्ते पूर्ण झाले” दाखवून निधी वसूल; करदात्यांची फसवणूक

    हे संपूर्ण प्रकरण निवडणुकीपूर्वी निधीच्या लुटीचा ठोस नमुना असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब असूनही कामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांची सरळसरळ फसवणूक होत आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

    💡 मागील प्रकरणांतही महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप

    यापूर्वीही चंद्रपूर महापालिकेवर:

    • बनावट फाउंटन खर्च,
    • अपूर्ण ड्रेनेज लाईनसाठी पेमेंट,
    • अमृत कलश योजनेंतर्गत अनियमित पाणीपुरवठा,

    या प्रकरणांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते.

    📹 फेसबुक लाईव्हद्वारे जनजागृती

    आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव व तुकुम प्रभागातील कामांचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रसारण केले. लवकरच शहरातील इतर प्रभागांतील रस्त्यांचीही पाहणी करून सच्चाई जनतेसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती आप ने दिली.

    यावेळी आपचे मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, योगेश गोखरे – शहराध्यक्ष, राजकुमार नगराडे – जिल्हा सचिव, संतोष बोपचे – संघटन मंत्री, विशाल विरंमवार, क्रिश कपूर, आदित्य नंदनवार, अ‍ॅड. तबस्सुम शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
  • illegal liquor license Maharashtra । “दारू दुकानांच्या नावाखाली भ्रष्टाचार! आम आदमी पार्टीची SIT कडे कारवाईची मागणी”

    illegal liquor license Maharashtra

    illegal liquor license Maharashtra : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य देशी दारू व बिअर विक्री परवाने वितरित करण्यात आले. या परवान्यांचे वाटप करताना नियमानुसार आवश्यक असलेली कागदपत्रे, जागेची वैधता, पार्किंग व्यवस्था, धार्मिक स्थळांपासूनचे अंतर आदी बाबींकडे दुर्लक्ष करून केवळ आर्थिक व्यवहारांवर आधारित परवाने मंजूर करण्यात आले. illegal alcohol permits in Chandrapur

    भद्रावती तालुक्यात वाळू तस्करीला अभय

    बाबुपेठ परिसरात अशाच प्रकारे चार नवीन परवाने नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहेत. अनेक बार चालकांकडे वाहन पार्कींगची कोणतीही व्यवस्था नसतानाही खोटे कागद तयार करून परवाने मिळविण्यात आले आहेत. काही मध्यविक्री दुकाने धार्मिक स्थळांच्या अगदी जवळ असूनही त्यांना नियम झुगारून परवाने देण्यात आले. ही गंभीर बाब असून त्यास जबाबदार असलेल्या तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.

    राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) याची गंभीर दखल घेऊन अशा सर्व नियमबाह्य परवाने रद्द करावेत, आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आम आदमी पार्टीची जोरदार मागणी आहे.

    यावेळी आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा सचिव प्रशांत सिदूरकर, शहर संघटनमंत्री संतोष बोपचे, महिला शहराध्यक्षा ऍड. तब्बसूम शेख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

  • Gandhi Giri : चंद्रपुरात आप ची गांधीगिरी

    Gandhi Giri : चंद्रपुरात आप ची गांधीगिरी

    Gandhi giri 4 दिवसांपूर्वी राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील शिवाजी कांबळे हे आपल्या कुटुंबातील व्यक्तीला चंद्रपुरातील डॉ आलूरवार सिटी स्कॅन सेंटरमध्ये mri करण्यासाठी आले होते, त्यावेळी आधी डिपॉझिट म्हणून 7 हजार 200 रुपये जमा करण्यात आले, मात्र रुग्ण स्थिर न राहिल्याने त्याचे mri करण्यात आले नाही, डिपॉझिट असलेले पैसे परत मागितले असल्यास डॉक्टरांनी 4 हजार रुपये परत केले मात्र उर्वरित 3 हजार 200 रुपये परत केले नाही, यावर कांबळे यांनी आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याशी संपर्क साधला व त्यानंतर आप पक्षाने अर्धनग्न आंदोलन सुरू करीत त्या रुग्णाचे पैसे गांधीगिरीने परत करायला लावले.

    अवश्य वाचा : जटपुरा गेट परिसरात अडकली गणरायाची मूर्ती आणि घडलं असं

    Gandhi giri 4 दिवसापासून mri करायला आलेल्या रुग्णाला डॉक्टर आलूरवार यांनी परत पाठविले मात्र त्या रुग्णाचे उर्वरित 3200 रुपये परत केले नाही, पैसे परत मिळत नसल्याने शिवाजी कांबळे यांनी आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्याशी संपर्क साधला, त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली, त्यांनतर राईकवार यांनी डॉक्टर सोबत मोबाईल द्वारे संवाद साधला मात्र डॉक्टर आलूरवार यांनी तुम्हाला जे करायचे ते करा, कितीही आंदोलन करा पैसे परत मिळणार नाही अशी मुजोरी केली.


    त्यानंतर राईकवार यांनी पदाधिकारी सोबत घेत आलूरवार यांच्या दवाखाण्यासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले.
    या आंदोलनाचे फेसबुक वर लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले, त्यांना सोशल मीडियावर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यामुळे डॉक्टर आलूरवार यांना आप पक्षाच्या आंदोलनासमोर झुकावे लागले व रुग्णाचे 3200 रुपये त्यांनी परत केले.
    आप पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या अर्धनग्न आंदोलनाची सध्या जिल्ह्यात चांगली चर्चा आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनात कसलीही तोडफोड, आक्रमक व कुणालाही काही न बोलता अहिंसेच्या माध्यमातून गांधीगिरीने गरीब रुग्णाला त्याचा हक्क मिळवून दिला. Gandhi giri

    वंदे भारत एक्स्प्रेस

    मयूर राईकवार यांचे विधान:

    “गरिबांच्या हक्कासाठी लढणे हे आमचे कर्तव्य आहे. जर अशा प्रकारे अर्धनग्न होऊन आंदोलन करावे लागले, तरी आम्ही मागे हटणार नाही. आज एका गरीब रुग्णाला न्याय मिळाला, हे आमच्यासाठी मोठे यश आहे.”
    सदर अर्धनग्न आंदोलनात


    या घटनेने चंद्रपूर शहरात मोठी खळबळ उडवून दिली आहे. अनेकांनी आम आदमी पक्षाच्या या कृतीचे कौतुक केले आहे, गरीब रुग्णांच्या हक्कांसाठी लढा देण्याच्या पक्षाच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे. Gandhi giri

    मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आम आदमी पक्ष), राजू कूडे (युवा जिल्हाध्यक्ष), मनीष राऊत (युवा संघटन मंत्री), आदित्य नंदनवार (युवा जिल्हा सचिव), राजकुमार नगराळे जिल्हा सचिव, प्रशांत सिदुरकर जिल्हा सचिव, संगम सागोरे (वाहतूक संघटन जिल्हाध्यक्ष), कुणाल शेटे जिल्हा पदाधिकारी क्रिश कपूर, विशाल बिरमवार यांचा सहभाग होता.

    गांधीगिरी ची शैली

  • Aam Aadmi Party : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केल्या जाणार नाही – मयूर राईकवार

    Aam Aadmi Party : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केल्या जाणार नाही – मयूर राईकवार

    Aam Aadmi Party मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कोसळण्याच्या घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे तीव्र आंदोलन

    मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कोसळण्याच्या अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेविरोधात आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर राईकवार यांच्या नेतृत्वात जटपुरा गेट येथे एक प्रभावी आंदोलन आयोजित करण्यात आले. या घटनेने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखावल्या आहेत.

    आंदोलनाचे प्रमुख मुद्दे:

    1. पुतळ्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी
    2. या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
    3. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची मागणी
    4. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी विशेष निधीची मागणी

    Aam aadmi party आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री मयूर राईकवार यांनी या प्रसंगी भाष्य करताना म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे अभिमान आहेत. त्यांच्या स्मृतीचा असा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. आम्ही शासनाला आवाहन करतो की या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी. जोपर्यंत योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील.”

    ज्येष्ठ नेते श्री सुनील मुसळे यांनी या घटनेचा ऐतिहासिक संदर्भ देत म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याने महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा सन्मान करणे हे प्रत्येक महाराष्ट्रीयनाचे कर्तव्य आहे. या घटनेमुळे आमच्या भावना अत्यंत दुखावल्या गेल्या आहेत.”

    अवश्य वाचा : महायुती सरकारचा कोथळा जनता काढल्याशिवाय राहणार नाही – रामू तिवारी

    महानगर अध्यक्ष श्री योगेश गोखरे यांनी या प्रसंगी आपले विचार मांडताना म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व नाहीत, तर ते आमच्यासाठी जीवनमूल्यांचे प्रतीक आहेत. त्यांच्या पुतळ्याची दुरवस्था म्हणजे आमच्या संस्कृतीचा आणि मूल्यांचा अपमान आहे. आम्ही मागणी करतो की शासनाने न केवळ या पुतळ्याची दुरुस्ती करावी, तर राज्यभरातील सर्व ऐतिहासिक वास्तूंचे आणि पुतळ्यांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी एक विशेष कृती आराखडा तयार करावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आदर्श नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. आम्ही या विषयावर तडजोड करणार नाही आणि आमचे आंदोलन सुरूच ठेवू.”

    Aam aadmi party युवा जिल्हाध्यक्ष श्री राजू कुडे यांनी तरुणांच्या भूमिकेवर भर देत सांगितले, “आजची तरुण पिढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे. आम्ही त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि अशा घटनांमुळे आमचा संकल्प अधिकच दृढ होतो.”

    महानगर महिला अध्यक्ष ऍड. तबसुंम शेख यांनी महिलांच्या सहभागावर भर देत म्हटले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. आजच्या या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या आहेत, जे दर्शवते की महाराजांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत.”

    Aam aadmi party आंदोलनात सहभागी झालेल्या प्रमुख नेत्यांमध्ये श्री राजकुमार नगराळे (जिल्हा सचिव), श्री प्रशांत सिदुरकर, श्री कुणाल शेटे, श्री योगेश मुरेकर (जिल्हा संगठन मंत्री), श्री संगम सागोरे (वाहतूक जिल्हाध्यक्ष), श्री संतोष बोपचे (महानगर संगठन मंत्री), श्री जावेद सय्यद (अल्पसंख्याक अध्यक्ष), श्री संतोष दोरखंदे (जिल्हा महासचिव), श्री आदित्य नंदनवार (युवा सचिव), श्री सुनील सद्भय्या (महानगर उपाध्यक्ष), श्री सिकंदर सागोरे, श्री विकास मंडल, श्री शुभम साखरकर, श्री जितेंद्र कुमार भाटिया, श्री कार्तिक सीडाम, श्री चेतन आगळे, श्री माधव मामीडवार, श्री अशीष सिंग, श्री ईश्वर सहारे यांचा सह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांचा समावेश होता.

    आंदोलनादरम्यान आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते अत्यंत तीव्र भावनिक अवस्थेत होते. त्यांनी आपल्या मागण्यांबाबत कडक भूमिका घेतली आणि न्यायासाठी ठामपणे उभे राहिले. शासनाच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या संतापाची पराकाष्ठा झाली होती. त्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला की जर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर येत्या काळात अधिक उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विरोधात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत.

    आम आदमी पक्ष या प्रकरणाचा कडक पाठपुरावा करत राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीचा योग्य तो सन्मान राखला जाईल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.

    संपर्क:
    श्री राजेश चेटगुलवार
    जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, आम आदमी पक्ष
    मोबाईल: