Growing marijuana in the backyard : चंद्रपूर 10 नोव्हेंबर (News34) गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी तरुण नव्या युक्त्या वापरत आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणाने अंमली पदार्थाचा धंदा करायचा असल्याने त्याने थेट घराच्या अंगणात गांजा ची झाडे लावली. मात्र पोलिसांच्या सतर्कतेने युवकाला अटक करीत 2 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील कानपा गावातील 23 वर्षीय रक्षद प्रभाकर आत्राम ने आपल्या घराच्या अंगणात अंमली वनस्पतींचे लहान मोठे असे एकूण 47 झाडे लावली होती. पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे नागभीड पोलिसांनी तपास सुरू केला असता आत्राम यांच्या घरी धाड मारली असता घराच्या अंगणात गांजा ची झाडे आढळून आली.
पोलिसांनी 23 किलो 910 ग्राम असा एकूण 2 लाख 39 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी रक्षद आत्राम वर NDPS ACT अनव्ये गुन्हा दाखल करीत अटक केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि दिलीप पोटभरे, पोउपनी अजिंक्य गोविंदलवार, भोजराम लांजेवार, पोलीस कर्मचारी दीपक कोडापे, भरत घोळवे, दिलीप चौधरी, प्रफुल रोहनकर, विक्रम आत्राम, ज्ञानेश्वर कुंभारे, आकाश चोपकर, किरण कोकोडे व अरुणा धुर्वे यांनी केली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा महिला मेळावा उत्साहात
Ballarpur city BJP women conference : बल्लारपूर १० नोव्हेम्बर (News ३४) : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीतर्फे बल्लारपूर येथे भव्य महिला मेळावा उत्साहात पार पडला. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला बल्लारपूर शहरातील सर्व धर्मीय भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. महिलांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने महिला मेळावा ‘हाऊसफुल’ झाला. यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मेळाव्याला संबोधित करताना एकात्मतेच्या शक्तीने समृद्ध बल्लारपूर घडणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपा बल्लारपूर आयोजित महिला मेळाव्यात शहरातील विविध समाजघटकांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, रणंजय सिंग, रेणुकाताई दुधे, वैशालीताई जोशी, कांताबाई धोटे, आरतीताई आकेवार, वर्षाताई सुंचूवार, पुनमताई मोडक, जयश्रीताई मोहुर्ले, सारिकाताई कनकम, सुरेखाताई श्रीवास्तव आदिंची उपस्थिती होती. Sudhir Mungantiwar Ballarpur News
आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘समृद्ध बल्लारपूर’ हे फक्त घोषवाक्य नसून प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून पूर्ण होणारा संकल्प आहे. या शहराचा सर्वांगीण विकास, प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर, स्वच्छ रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी, या दिशेने मी सातत्याने प्रयत्नशील आहे. आतापर्यंत ६०० निवासी पट्ट्यांचे वितरण करण्यात आले असून पुढील काळात हे प्रमाण आणखी वाढवले जाईल. पंतप्रधान आवास योजनेद्वारे सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
आ.मुनगंटीवार म्हणाले, “बल्लारपूर देशातील आदर्श शहर व्हावे, आत्मनिर्भर व्हावे आणि सर्वांसाठी समान संधीचे केंद्र बनावे, हेच आमचे ध्येय आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवावा, कारण द्वेष आणि विभागणीचा मार्ग कधीच प्रगतीकडे नेत नाही.’
हा देश सबका साथ, सबका विकास या मंत्रावरच पुढे जात आहे.”
या मेळाव्यात महिलांची प्रचंड उपस्थिती पाहून आ.सुधीर मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केले. “सर्वधर्मीय बहिणींच्या उपस्थितीत आज मला छोटा भारत अनुभवायला मिळाला. प्रेम, सौहार्द आणि एकोपा यांचा सुरेख संगम इथे बघायला मिळाला,’ अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमात मुस्लिम भगिनींनी भाजपा कार्यकर्त्यांकडे पक्षाचा दुपट्टा मागितला, याचा उल्लेख करत आ. मुनगंटीवार म्हणाले की, “हा विश्वास विकासाचं प्रतीक आहे. हा देश सबका साथ, सबका विकास या मंत्रावरच पुढे जात आहे.” Ballarpur News Today BJP Rally
कार्यक्रमात महिलांच्या हक्क, सक्षमीकरण आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला. आ.मुनगंटीवार म्हणाले की, बल्लारपूरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि पुढील काही महिन्यांत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणखी मोठे प्रकल्प राबविण्यात येतील. शहरात लवकरच शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नव्या योजना सुरू होणार आहेत.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट संदेश दिला की, “प्रत्येक मतदाराशी संपर्क साधणे, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवणे हेच खरे राजकारण आहे.”त्यांनी पुढे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
या मेळाव्यात आ.मुनगंटीवार यांनी भाजपा महिला अध्यक्षा वैशालीताई जोशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कुशल संघटनक्षमतेचं कौतुक केलं. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित सर्व भगिनींना वंदे मातरमच्या घोषासह देशभक्तीचा संदेश दिला. त्याचबरोबर टेलिफोनवर ‘हॅलो’ ऐवजी वंदे मातरम्’ म्हणण्यासाठी आवाहन केले.
Chandrapur farmer killed tiger attack : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News34) – ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी लगतच्या जवराबोडी मेंढा जंगलात एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून क्रुरपणे ठार केल्याची थरारक घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. शेतकरी सिंधी तोडण्यासाठी जंगलात गेला होता. रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोध घेतला असता जंगात त्याचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत सापडले. भास्कर गोविंदा गजभिये (वय 62) रा. मेंडकी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील अल्पभूधारक शेतकरी भास्कर गोविंदा गजभिये हा काल रविवारी मेंडकीपासून जवळ असलेल्या जवराबोडी-मेंढा जंगलात सिंदी तोडण्यासाठी एकटाच गेला होता. शेतीत धानाची लागवड करण्यात आल्याने स्वत:च शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंदीची गरज होती त्यामुळे तो गेला होता. रविवारची सायंकाळ होऊनही गजभिये घरी परत आला नाही. कुटुंबीयांनी वाट पाहत राहिले, पण तो येईना. रात्री उशिरापर्यंत तो घरी न पोहोचल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. forest department negligence Tiger attack
आज सोमवारी सकाळी कुटुंबीय व गावकरी मिळून जवराबोडी मेंढा परिसरातील जंगलात शोधासाठी गेले. शोध घेत असताना एका ठिकाणी त्याची सायकल व बाजूला सिंदी पडलेली आढळून आली. थोडे पुढे गेल्यावर कुटूंबिय व गावकऱ्यांना अत्यंत भीषण दृश्य दिसले. काही अंतरावर शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेले अवस्थेत आढळले. काहींनी तत्काळ ही माहिती मेंडकी ग्रामस्थांना दिली. वनविभाग व पोलिसांनाही कळविण्यात आले. नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. वनपरिक्षेत्र अधिकारी (मेंडकी) तसेच पोलिसही घटनास्थळी पोहचले. शरीराचे अवयव एका ठिकाणी गोळा करण्यात आले त्या नंतर पंचनामा करून पार्थीक ब्रह्मपुरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
आतापर्यंत ३९ नागरिकांचा बळी
चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष २०२५ मध्ये तब्बल ३९ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून यामध्ये ३५ नागरिकांची शिकार हे वाघाच्या केली आहे, यासह बिबट्याने २, अस्वल १ तर हत्तीच्या हल्ल्यात एक नागरिकाचा बळी गेला आहे. वाघाच्या दहशतीखाली शेतकरी शेतात जात आहे. आम्ही शेती करायची कशी असा प्रश्न शेकटकरी वर्गापुढे निर्माण झाला आहे. Chandrapur farmer killed tiger attack
गेल्या पंधरा दिवसांपासून या परिसरात वाघाचे दर्शन होत असून काही जनावरे ठार केल्याच्या घटना ताज्या आहेत. तरीदेखील वनविभागाने बंदोबस्ताची कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, अखेर आज सदर शेतकररी त्याच परिसरात सिंदी आणण्याकरीता गेला असता तो वाघाच्या हल्यात बळी ठरला. वाघाने क्रुरपणे त्याचा जिव घेतल्याने परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. भास्कर गजभिये यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी पत्नीचा अपघातात मृत्यू झाला होता तर वर्षभरापूर्वी एका मुलाचे निधन झाले होते. घरातील प्रमुख कमावता हात गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. human-tiger conflict Brahmpuri taluka
नागरिकांचा संताप
या घटनेमुळे मेंडकी व जवराबोडी मेंढा परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, मृतकाच्या कुटुंबीयांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, जंगलात नियमित गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. वारंवार वाघाची दहशत निर्माण झाली असतानाही वनविभाग ठोस पाऊले उचलत नाही त्यामुळे त्याच्यावर निष्क्रियतेचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Mukhyamantri Yojana Doot मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Mukhyamantri Yojana Doot चंद्रपूर : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील.
या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
चंद्रपूर – राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चंद्रपूर येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ४०० प्रवाशांच्या तुकडीचे स्वागत केले. हे भाविक प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी पुण्यभूमी अयोध्येकडे प्रवासाला निघाले होते. बल्लारशाह-अयोध्या ही विशेष ट्रेन (क्र. ०१५९) चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून २० फेब्रुवारी रोजी निघाली. Pilgrimage
दुपारी 12:15 वाजता स्थानकावर पोहोचल्यानंतर अहिर यांनी वैयक्तिकरित्या शुभेच्छा दिल्या आणि भाविकांना आनंददायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मनपाचे माजी सभापती रवींद्र गुरनुले, चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे दामोदर मंत्री, नरेंद्र सोनी, पूनम तिवारी, श्याम शारदा, अनिश दीक्षित, संजय मंघानी, किशोर बंडवार, रितेश वर्मा आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. Punyabhumi ayodhya
चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या अधिकाऱ्यांनीही रामभक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 01:10 मिनिटांनी, “भारत माता की जय” आणि “जय श्री राम” च्या जयघोषात भाविक आणि मान्यवरांनी रेल्वे स्थानकाचा परिसर दणाणून सोडला. Hansraj ahir
अयोध्येची ही शुभ यात्रा भक्तांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण ते प्रभू श्री रामचंद्रांचे आशीर्वाद घेण्यासाठी तीर्थयात्रेला निघतात. चेअरमन हंसराज अहिर आणि उपस्थित मान्यवरांचे उत्स्फूर्त स्वागत आणि पाठिंबा या पवित्र प्रवासाभोवती एकता आणि भक्तीचा भाव वाढवतो. Prabhu shri ramchandra
चंद्रपूर – वरोरा-भद्रावतीच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी नुकतेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मद्रास-लखनौ 16093/16094 आणि अंदमान एक्सप्रेस 16031/16032 या दोन महत्त्वाच्या गाड्या वरोरा रेल्वे स्थानकावर थांबविण्याची विनंती केली आहे. त्यांच्या पत्रात, धानोरकर यांनी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे महत्त्व अधोरेखित केले, ज्यात GMR, वर्धा पॉवर, वेकोली, एमटा, अरबिंदो कोळसा खाणी, तसेच भव्य जैन मंदिरे आणि प्राचीन वास्तुशिल्पांचे प्रमुख उद्योग आहेत. Varora railway station
धानोरकर यांनी यावर भर दिला की या उद्योग आणि धार्मिक स्थळांवर प्रवास करणाऱ्यांची संख्या या भागात लक्षणीय आहे. तथापि, कोविड-19 साथीच्या आजारानंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरू होऊनही, वरोरा रेल्वे स्थानकावरील या गाड्यांचा थांबा अद्याप पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय आणि त्रास सहन करावा लागत आहे. Train stoppage
या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तातडीने कार्यवाही करून मद्रास-लखनौ आणि अंदमान एक्स्प्रेस गाड्यांना वरोरा रेल्वे स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करावा, अशी मागणी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. तसे केल्यास प्रवाशांच्या अडचणी दूर होतील, तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू होईल, वरोरा रेल्वे स्थानकावर या गाड्यांना थांबा देण्याची मागणी वरोरा-भद्रावती मतदारसंघातील रहिवासी आणि अभ्यागतांची सोय आणि कल्याण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. Transportation infrastructure
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे पत्र आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि समाजाला अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी कार्यक्षम आणि सुलभ वाहतूक पायाभूत सुविधांच्या महत्त्वाची आठवण करून देणारे आहे. passenger convenience
ब्रम्हपुरी:- तालुक्यातील पाच किमी अंतरावर असलेल्या मालडोंगरी येथे आज 12 फेब्रुवारीला सकाळी हत्येची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले. Chandrapur crime
मालडोंगरी येथे राहणारे जयदेव पिल्लेवान व त्याची पत्नी हिरकण्या यांच्यामध्ये मागील 3 दिवसापासून भांडण होत होते, 11 फेब्रुवारीला रात्री 11 वाजताच्या सुमारास पती-पत्नी मध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी मुलगा जॉकीस हा उपस्थित होता, मात्र नेहमीच होत असलेला हा प्रकार बघून त्याने लक्ष दिले नाही. Murder news
सकाळी जेव्हा जॉकीस ने आई ला हाक मारली असता ती उठली नाही, आई च्या जवळ गेला असता ती मृत अवस्थेत होती, मृतक हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर मारल्याच्या खुणा होत्या.
मृतक हिरकण्या यांनी पती जयदेव ला शिवीगाळ केल्याने त्यांनी हिरकण्या ला हाथ-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, त्या मारहाणीत हिरकण्या यांच्या चेहऱ्यावर व डोक्यावर मार लागला त्या मारहाणीत हिरकण्या यांचा मृत्यू झाला होता.
मुलगा जॉकीस याने याबाबत ब्रह्मपुरीं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असता पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत आरोपी जयदेव ला अटक केली. पुढील तपास ब्रह्मपुरीं पोलीस करीत आहे.
चंद्रपूर – दैनंदिन आर्वती ठेव, आरडी खाते उघडत नागरिक आपल्या मेहनतीचे पैसे बँक किंवा पतसंस्थेत जमा करतात मात्र त्यांच्या पैश्यावर पतसंस्थेतील संचालक, अध्यक्ष हे डल्ला मारतात, असाच एक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आला आहे. या पतसंस्थेत तब्बल 48 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. Cooperative Credit Institutions
फिर्यादी रमणकुमार निमकर, सनदी लेखापाल यांचे लेखी रिपोर्ट वरून पो.स्टे. रामनगर जिल्हा चंद्रपूर येथे अपराध क्रमांक २११/२०२३ कलम- ४०६,४०९, ४२०,३४ भा. द. वि. सहकलम ३ महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण) अधिनियम १९९९ अन्वये चंद्रपूर जिल्हा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चंद्रपूर रजिस्टर नंबर १५४ मधील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळ, कर्मचारी, अभिकर्ता / एजंट नामे १) राजाराम तुकाराम भडके, व्यवस्थापक २) गौतम केशम जीवने, अध्यक्ष ३) अजित राजाराम भडके, उपाध्यक्ष ४) विवेक आत्माराम नळे, संचालक ५) लोकचंद रेदुलील लिव्हारे, संचालक ६) देवराव राघोबा पिंपळकर, संचालक ७) सुभद्रा अनिल निरापुरे, संचालक ८) गीता वासुदेव दास, संचालिका ९) गीता विजय पालनवार, संचालिका १०) रवींद्र दामोदर बारेकर, अभिकर्ता/ लिपिक यांनी दिनांक ०१.०४.२०१९ ते दिनांक ३१.०३.२०२१ या कालावधीमध्ये ४९,४८,१७८/- रुपयांचा गैरव्यवहार तथा अफरातफर केल्याने त्यांच्याविरुद्ध सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे. Chandrapur scam
सदर संस्थेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी दैनंदिन ठेव, आवर्ती ठेव व मुदत ठेव अशा योजनेमध्ये रकमेची गुंतवणूक केलेली आहे परंतु सदर पतसंस्थेकडून गुंतवणूकदारांची रक्कम परत केलेली नाही अशा गुंतवणूकदारांच्या रकमेच्या याद्या तयार करणे सुरू आहेत.
तरी ज्या गुंतवणूकदारांनी रक्कम परत मिळाली नाही अशा गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे कागदपत्र (गुंतवणुकीचे एफ डी सर्टिफिकेट, रक्कम जमा केल्याच्या पावत्या, आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या खात्यावर पैसे पाहिजे आहेत त्या बँक खात्याचे पासबुकच्या प्रथम पाण्याची झेरॉक्स प्रत) इत्यादी माहितीसह परिशिष्ट १ प्रमाणे फार्म भरून देणे करिता आर्थिक गुन्हे शाखा पो.स्टे. दुर्गापूर परिसर पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर येथे दिनांक ०१-०२- २०२४ ते दिनांक १०-०२-२०२४ दरम्यान यावे. याकरिता अशी बातमी सर्व वर्तमानपत्र सोशल मीडियावर प्रकाशित करण्यात येत आहे.
चंद्रपूर – चंद्रपुरातील वेकोली क्षेत्रात नुकतीच भटाळी कोळसा खाणीत एक दुर्घटना घडली होती, त्यात एक कामगार जख्मी झाला होता , मात्र त्या जख्मी कामगाराला उपचाराकरीता रुग्णालयात नेण्याकरिता वेळेवर खाणं परिसरात एम्बुलेंस उपलब्ध नव्हती. यावेळी लगतच्या उपक्षेत्रातुन एका एम्बुलेंसला कॉल करण्यात आला परंतु त्या एम्बुलेंस चालकाला मार्गच माहित नसल्याने रुग्णवाहिका चालकाने घाईत लोखंडी पोल च्या मधून वाहन काढण्याचा प्रयत्न केला असता रुग्णवाहिका पोल मध्ये फसली.
त्यांनतर काही वेळाने दुसऱ्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले ,आणि शेवटी त्या जख्मी कामगाराला शहरातील एका खाजगी रुग्णालयात भर्ती करण्यात आले.
मिळालेल्या माहिती नुसार वेकोली चंद्रपुर क्षेत्रात चालणाऱ्या काही रुग्नवाहिका येथील काही डॉक्टर आणि संबंधित विभागाचे लोक खाजगी कामा साठी वापर करतात, त्यामुळे वेळेवर रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही आणि जर कधी अशी एखादी मोठी दुर्घटना झाली आणि रुग्ण वाहिका उपलब्ध नसेल तर त्याला जवाबदार कोण? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे या समस्येकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता होऊ लागली आहे.
चंद्रपूर – शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांंच्या नेतृत्वात दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. आज संपुर्ण महाराष्ट्रात कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी धरणे दिले.
चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात माजी आमदार ॲड.वामनराव चटप, निळकंठ कोरांगे, कपिल इद्दे, प्रा. सुरेश मोहितकर, सुधीर सातपुते, प्रभाकर ढवस, मारोती बोथले, रवी गोखरे, अरुण नवले, ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, सुनील बावणे, वैभव अडवे, अरुण सातपुते, किशोर दांडेकर, मधुकर चिंचोलकर, सुरेश राजूरकर, विकास दिवे, मदन खामनकर, शेेख इस्माईल, अनिल कौरासे, नरेश सातपुते, सचिन बोंडे, नरेंद्र मोहारे, सुरेश आस्वले, कृष्णदेव नांदे, रवींद्र हिरडे, केशव चिकणकर, देवेंद्र हेपट, दिलीप आसेकर, गोविंदा गेडाम, विजय मरसकोल्हे, प्रभाकर जोगी, प्रा. सतीश मोहितकर, बबन रणदिवे, गुड्डू काकडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
या आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन मा. पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठविण्यासाठी देण्यात आले.
या निवेदनाद्वारे सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतमाल व्यापारातील सरकारचा हस्तक्षेप कायमचा बंद करावा, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे म्हणून सक्तीची कर्जवसुली बंद करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा, वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारने उपाय करावेत अन्यथा नुकसान भरपाई द्यावी, इतर वन्य प्राण्यांप्रमाणे सर्पदंशाने मृत्यू धारकांचे वारसदारांना आर्थिक मदत देण्यात यावी.
पीक विम्याचा योग्य लाभ देणारी योजना अंमलात आणावी व तातडीने नुकसान भरपाई द्यावी, पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी छत्तीसगड मध्ये धानाला हमीभावापेक्षा ४०% जास्त भाव देवून तर मध्यप्रदेशात गव्हाला हमी भावापेक्षा ३०% जास्त भाव देवून खरेदी करण्याची ” मोदी गॅरंटी” ची घोषणा केली, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कापूस व सोयाबीन ला हमीभावापेक्षा ३०% जास्त दर देवून खरेदी करावी तसेच ज्यांनी विक्री केली त्यांना वाढीव रक्कम बॅक खात्यात जमा करावी, स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती तातडीने करावी, वन हक्क कायद्यात वन जमिनीवर अतिक्रमीत शेतकऱ्यांना पट्टा देतांना असलेली तीन पिढ्यांची व २५ वर्षाची एक पिढी या अटी वन हक्क कायद्यातून वगळाव्या, जीवती येथे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी तथा व्यवहार न्यायाधीश ( कनिष्ठ स्तर ) न्यायालयाची तात्काळ निर्मिती करण्यात यावी, बल्लारपूर – सुरजागड व गडचांदूर – आदीलाबाद या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, बल्लारपूर – आष्टी – आलापल्ली – सुरजागड या राज्य मार्गाचे भाग आष्टी ते आलापल्ली – सुरजागड मार्गाचे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करण्यात यावे, जबरानजोत शेतकऱ्यांना तात्काळ पट्टे वितरित करण्यात यावे इत्यादी तेरा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.