Tag: News34

  • ग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या – माजी नगरसेवक टहलीयानी यांची मागणी

    ग्राम पंचायतींना घाटातुन रेतीविक्री करण्याचा अधिकार द्या – माजी नगरसेवक टहलीयानी यांची मागणी

    News34 chandrapur

    गुरू गुरनुले

    मुल – महाराष्ट्रात वारंवार रेती तस्करी (चोरी) मोठया प्रमणात होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते व वारंवार मिडीया मध्ये (वृत्तपत्रात) बातम्या प्रकाशीत होत असतात. हि बाब १०० टक्के खरी असून या बाबत शासनाचे दिरंगाईचे धोरण असल्यामूळे रेतीचे घाट वेळेवर लिलाव होत नाही. सध्याच्या वाढत्या बेरोजगारीमुळे कित्येक सुशीक्षीत युवकांनी आपला व्यवसाय करण्याचे हेतूने बँकेचे कर्ज घेवून ट्रॅक्टर ट्रक टिप्पर इत्यादी वाहन कर्जा वर घेतले आहेत.

     

    अश्या परीस्थतीत त्यांना वाहतूक करण्याकरीता रेती उपलब्ध न झाल्यास त्यांचे बँकेचे कर्जाचे हप्ते सुध्दा थकीत होत आहेत. दुसरी कडे लपून छपून रात्रौच्या वेळेस रेतीची चोरी होत असते त्या मध्येच अपघाताचे प्रमाण सुध्दा वाढलेले आहेत.व सबंधीत महसूल अधिका-यांशी मारझोड, झगडे तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. व महाराष्ट्र शासनाने सुध्दा चोरीच्या गाडीवर दंडात्मक रक्कम अतिशय जास्त प्रमाणात ठरवलेली आहे.

     

    ही दंडात्मक रक्कम भरायची असल्याने रक्कम जुळवा जुळवी च्या नादात काल एका ट्रॅक्टर मालक युवकाचा अपघात होऊन मृत्यू झाला ही घटना ताजी आहे. ट्रक्टरवर १० हजार, ६ चाकी ट्रकवर २५ हजार, टिपर (डम्पर) यावर ५० हजार अश्या रकमेचे दंड ठेवल्यास सोयीचे होईल अन्यथा सर्वात उत्तम उपाय घाट ज्या ग्रामपंचायतीच्या हदीत येत असेल त्यां ग्रामपंचायतीचे ट्रक्टर ५००/- रूपये ६चाकी ट्रक २००० रूपये टीपर (डॅम्पर) ५००० हजार रूपये अश्या पध्दतीने केल्यास रेतीची तस्करी (चोरी) होणार नाही व त्या त्या ग्रामपंचायतीला उत्पन्नाचा साधन निर्माण होईल.

     

    कारण ग्रामपंचायतींना उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. आज बहूतांश ग्रामपंचायतीची अवस्था सुध्दा उत्पनाच्या बाबतीत हलाखीची आहे. पिण्याचे पाण्याचे व पथदिव्याचे बिल भरू शकत नाही अश्या परीस्थतीत ग्रामीण भागात पथदिवे बंद पिण्याचे पाणी १५,१५ दिवस पर्यंत बंद असतात म्हणून आपणास नम्र विनंती केली आहे. या अत्यंत महत्वाचे बाबीकडे त्वरीत लक्ष घालून सामान्य नागरीकांना तसेच बेरोजगार युवकांना गाडयांना काम मिळेल व महसूल विभागाच्या भ्रष्टाचारावर आळा बसेल, असे सामान्य जनतेचे मत आहे.

     

    हि विनंती देखील लेखी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व माजी नगर सेवक मोती टहलियानी यांनी महसूल मंत्री नाम.राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली असून निवेदनाच्या प्रती जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविले आहे.

  • शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    शासकीय आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत १५ दिवस पर्यंत वाढवुन द्या – सभापती राकेश रत्नावार

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – एकतर शासनाने मुल येथे देण्यात येणारे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरवातीला नवरगाव येथे देण्यात आले होते.त्यामुळे मुल तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. यासाठी सी.डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांनी शेवटी राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांचेकडून मुल येथे आधारभूत खरेदी केंद्र उशिरा मंजूर केले. त्यामुळे उशिरा सुरू झालेली नोंदणी दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी संपल्याने तालुक्यातील हजारो शेतकरी नोंदणी करण्यापासून वंचित राहण्याची पाळी आली होती. यापूर्वी आकस्मिक अवकाळी पाऊस आल्याने मुल तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांचे धान कापून असल्याने पाण्यामुळे भिजून खराब झाले आहे.

     

    करीता ओले झालेल्या धानाला अतिशय कमी भाव मिळेल किंवा व्यापारी ते धान खरेदी करणार नाही. त्यामुळे शेकऱ्यावर संकट कोसळले होते. आकस्मिक पाऊसामुळे ओले धानाचे पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येऊन नोंदणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था मुल तालुक्यातील शेतकरी बांधवांची झाली होती. एकतर उशिरा नोंदणी सुरू केल्यामुळे मुदतीच्या आत तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही.

     

    त्यातही नोंदणी मोबाईलवर आनलाईन करुन घेतांना नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून अजूनही हजार शेतकरी नोंदणी पासून वंचित आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजच्या तारखेत शेतकऱ्यांचे हजार अर्ज येऊन पडले असताना नोंदणी करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०२३ ला संपत आहे. त्यामुळे हजार शेतकरी पुन्हा नोंदणी पासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी शेकडो शेतकरी बांधवांसमोर सांगितले.

     

    यासाठी नोंदणी साठी राहून गेलेले शेतकऱ्यांसाठी परत १५ दिवसाची मुदत वाढ त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

  • संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

    संविधान दिनाला ओबीसी जनजागृती अभियान

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात 1 नोव्हेंबरला झाली असून, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा, ओबीसी विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात यावे व ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना आधार योजना लागू करण्यात यावी , न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी आणि अन्य ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मंजूर करून घेण्यासाठी “भेटीगाठी जनजागृती अभियान” रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला सायंकाळी 7 वाजता पांढरकवडा येथे कार्यक्रम होणार आहे.

     

    कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ऋषभ राऊत राहणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आहेत तर उदघाटन सुधाकर अडबाले शिक्षक आमदार, प्रमुख पाहुणे सरपंच सुरज तोतडे, बाजार समिती संचालक किशोर मत्ते, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, तसेच गावातील उपसरपंच समीर भिवापुरे, पोलीस पाटील सचिन टिपले,डॉ संजय घाटे, रणजित डवरे, अनिल डहाके, डॉ दिलीप कांबळे, ,दिनेश कष्टी ,गणेश आवारी, देवराव सोनपित्तरे,भाऊराव झाडे,देवा पाचभाई, गजानन कष्टी, ग्राम पंचायत सदस्य सदस्य कनय्या तोतडे, मोनिका वाटगुरे, अर्चना गावंडे, अर्चना रोगे, संगीता सोनटक्के,अरुण देऊलकर,एम व्ही पोटे,एस एम मालेकर, मनीषा बोबडे, उपस्थिती राहणार आहेत.

     

    कार्यक्रमला उपस्थित राहण्याचे आवाहन हितेश लोडे, किशोर लोनगाडगे, विजय मत्ते, वासुदेव गोबाले, परशुराम बरडे, वामन काकडे, रामदास काकडे, बापूराव रोगे, हनुमान रोगे, विजय बावणे, शिवाजी सोनटक्के, विजय वैरागडे, हेमराज तुराणकर, अशोक रोगे, बाबुराव कुकुडे, विजय मोहूर्ले, राजू वाटगुरे, राजू खंडाळकर, विजय काकडे , प्रकाश कुकडे विठ्ठल वाटगुरे, आशिष मंदाडे, स्वप्नील मोहूर्ले , दिलीप कावडे, विजय पाचभाई, अरविंद पाचभाई, श्रवण पिपलकर, पंढरी नक्षीने, एकनाथ पाऊनकार, निखिल तोतडे, सहदेव कोल्हे, विलास पाजारे, संदेश गावंडे, सुमित नगराळे, दिनेश मत्ते, मारोती मंदाडे, भास्कर वरारकर, सुभाष ढोले, विठ्ठल बोरपे, कवडू उपासे, गजानन मत्ते, कैलास रोगे, संतोष मोहूर्ले, आतिष टिपले,महादेव रणदिवे,अनिल रोगे, मधुकर पिपलकर, बंडू सोनटक्के, प्रवीण धोटे, सेनाजी हनुमते डोमाजी निखाडे, हरिदास टिपले, प्रकाश टिपले, गुलाब कोल्हे, वारलु मोहूर्ले, विठ्ठल नवघडे, यांनी केले आहे.

  • SNDT महिला विद्यापीठात AI तंत्रज्ञानावर व्याख्यान

    News34 chandrapur

    बल्लारपूर – “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” हे भविष्यातील प्रत्येकाचे स्किल्स राहणार आहे आणि हे स्किल्स भविष्यात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण करतील. एआय हे तंत्रज्ञान जग काबीज करेल सोबतच तरुणांना आकर्षित करेल असे मत डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी व्यक्त केले. ते एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ मुंबईचे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे आयोजित “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते.

    एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ बल्लारपूर येथे फ्युचर स्किल्स – आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, या व्याख्यानाला मुख्य वक्ता म्हणून डॉ. गजेंद्र आसुटकर, उपप्राचार्य, प्रियदर्शिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ज्ञानसंकुलचे संचालक डॉ. राजेश इंगोले, प्रमुख उपस्थिती सहायक कुलसचिव डॉ. बाळू दत्तात्रय राठोड आणि समन्वयक वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक वेदानंद अलमस्त  यांनी केले सोबतच आधुनिक काळात मानव आणि तंत्रज्ञान यांच्या संयुक्त कामगिरीने भारत जगात आपले नाव उंचावेल अशी आशा व्यक्त केली.

    कार्यक्रमाचे मुख्य वक्ता म्हणून लाभलेले डॉ. गजेंद्र आसुटकर यांनी एआय बद्दल सर्व विद्यार्थिनींना अवगत केले सोबतच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे आहे असे लक्षात ठेवले जाईल, कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे.

     

    आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात असे मत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले आणि भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून जगात अव्वल राहण्याचे काम कस करता येईल यावर भर देण्याचे आवाहन सुध्दा केले. भविष्यात असे नव-नवीन उपक्रम राबविण्याचे आश्वासन सुध्दा दिले.

     

    कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अश्विनी वाणी, प्रा. खुशबू जोसेफ, प्रा. श्रुतिका राऊत यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नेहा गिरडकर यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

  • चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठ्यासाठी सुधीर मुनगंटीवार सरसावले

    News34 chandrapur

    चंद्रपूर : चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याला कृषी पंपांना दोन महिन्यांसाठी दिवसाचे १२ तास वीज पुरवठा देण्यात यावा, या मागणीसाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार पुढे सरसावले आहेत.

     

    विदर्भातील या तीन जिल्ह्यांना दोन महिन्यांसाठी सलग वीजपुरवठा प्राप्त व्हावा यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी केली. कृषी पंपाना सध्या नियमित विजेची गरज आहे. आता शेतात धान उभा आहे आणि बाकी पिकांना ही पाण्याची गरज आहे. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांना शेतात जायला शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते. याशिवाय उत्सवाचे दिवस आहे.

     

    गडचिरोली हा नक्षल प्रभावी जिल्हा असल्याने शेतीसाठी व उत्सवाच्या काळात या जिल्ह्याला सुरळीत वीज पुरवठा होणे गरजेचे आहे ही बाब ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जा मंत्रांच्या लक्षात आणून दिली. चंद्रपूर आणि वर्धा हे दोन्ही जिल्हे विदर्भातील महत्त्वाचे जिल्हे आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पिकाच्या दृष्टीने व नागरिकांना उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा होणे, गरजेचे असल्याची बाब या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली.

     

    दोन महिने या तीनही जिल्ह्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी ना. श्री. मुनगंटीवार यांनी ऊर्जामंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या या मागणीला ऊर्जामंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विदर्भातील या तीन जिल्ह्यांना सुरळीत वीज पुरवठा कसा करता येईल, या संदर्भात लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली.

  • चंद्रपुर शहरात दारू पिऊन दुचाकीवर युवकांचा धिंगाणा, दोघांचा मृत्यू

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर शहरात मागील 4 दिवसात घडलेल्या दुचाकी वाहनांच्या अपघातात 5 जणांनी आपला जीव गमावला आहे.

     

    मृतांमध्ये 8 वर्षीय बालकाचा समावेश आहे, पहिला अपघात 20 ऑक्टोबर ला बाबूपेठ येथे घडला, यामध्ये ट्रिपल सिट वाहनांवर मस्ती करीत असलेल्या मुलांनी दुचाकी वाहनाला जबर धडक दिली, या धडकेत 8 वर्षीय विहान बोरकर या मुलाचा मृत्यू झाला.

    22 ऑक्टोबर ला शहरातील रामसेतू पुलाजवळ झालेल्या अपघातात लहुजी नगर निवासी 2 युवकांचा समोरासमोर झालेल्या धडकेत मृत्यू झाला, मृतक युवक आपले वाहन वेगात चालवीत होते, वाहनवरून नियंत्रण सुटल्याने समोरून येत असलेल्या दुचाकीला त्यांनी जबर धडक दिली.

     

    23 ऑक्टोबर ला लखमापूर येथील 3 युवक दारूच्या नशेत दुचाकी वाहनांवर ट्रिपल सिट जात असता त्यांचे वाहनवरून नियंत्रण सुटले.

    दुपारी 2 वाजता लखमापूर येथील जितू सिन्हा, 23 वर्षीय चेतन दुर्वे व 28 वर्षीय संतोष साहू हे आपल्या दुचाकी वाहनाने लखमापूर येथे जात होते.

     

    दारूच्या नशेत असलेले युवक अतिवेगात वाहन चालवीत होते, विद्या निकेतन शाळेसमोर पोहचताच काही वेळात त्यांचे वाहनावरून नियंत्रण सुटले, आणि दुचाकी डिव्हायडर ला घासत निघाली, काही क्षणात तिघेजण दुचाकीवरून फेकल्या गेले, मात्र त्यानंतर दुचाकी वाहन तब्बल 100 मीटर चालत गेले.

     

    प्रत्यक्षदर्शी यांच्या नुसार युवकांच्या वाहनाचा वेग हा 100 किलोमीटर पेक्षा जास्त होता, या अपघातात चेतन दुर्वे व संतोष साहू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर जितू सिन्हा किरकोळ जखमी झाला. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

    चंद्रपुरात मागील काही दिवसांपासून युवक धूम स्टाईल वाहने चालवीत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, यावर आता आळा घालणे गरजेचे झाले आहे, आता तर रस्त्यावर पायदळ चालणारे नागरिकही बाईक रेसर वाहन चालकापासून सुरक्षित नाही.

    सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबट करीत आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील या 30 महिलांना मिळणार मोठ्या ब्रँड सोबत काम करण्याची संधी

    News34 chandrapur

    गडचांदूर – अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर आवारपुर व कौशल्य विकास मंत्रालय यांच्या वतीने सिमेंट कंपनीच्या दत्तक गावातील महिलांना असिस्टंट ब्युटीशियन थेरपीस्ट बनण्याची संधी मिळाली आहे. Skill india program

    यात 30 महिला प्रशिक्षण घेत असून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय स्तरावरील ब्युटीशियन कंपनीमध्ये प्लेसमेंट मिळणार आहे. अथवा त्या स्वतःचा व्यवसाय उभारू शकणार आहे. हे सर्व प्रशिक्षण मोफत असणार आहे या उपक्रमामुळे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना रोजगारांची नवीन संधी निर्माण झालेली आहे. Apple iphone 13 512 Gb मोबाईल वर मिळवा 30 टक्क्यांची सूट, 99 हजार 900 रुपयांचा iphone फक्त 69 हजार 499 ला….फक्त amazon वर

     

    या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचा महिला लाभ घेत असून त्यांना आता स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे त्यांनी आभार मानले आहे.

  • अमेझॉन च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल ला सुरुवात

    News34 chandrapur

    वृत्तसेवा – Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 ची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी, ग्राहक या सेलची आतुरतेने वाट पाहतात, कारण Amazon सेलमध्ये सर्वात कमी किमतीत मोबाईल, टीव्ही आणि इतर गॅझेट खरेदी करण्याची ऑफर दिली जाते. अशा परिस्थितीत ग्राहक वर्षभर या विक्रीची प्रतीक्षा करतात.

     

    तथापि, डिस्काउंट ऑफरची अधिकृत घोषणा विक्रीच्या दिवशी केली जाईल. परंतु तुम्ही SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि EMI वर कोणतेही उत्पादन खरेदी केल्यास, तुम्हाला थेट 10 टक्के सूट मिळू शकेल.

     

    ग्राहकांना मोबाईल डिव्‍हाइसेस आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. याचा अर्थ, तुम्ही 1000 रुपयांचे उत्पादन 600 रुपयांना खरेदी करू शकाल.

    Amazon च्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2023 मध्ये, खरेदीदार काही मोहक आयफोन डीलचा लाभ घेऊ शकतात. iPhone 13 ₹45,999 च्या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे, तर iPhone 14 तुमचा ₹61,999 मध्ये असू शकतो. तुम्ही मोठा iPhone 14 Plus शोधत असल्यास, त्याची किंमत ₹70,999 आहे आणि उच्च-स्तरीय कामगिरी शोधणाऱ्यांसाठी, iPhone 14 Pro ₹1,19,990 मध्ये उपलब्ध आहे. iPhone 14 Pro Max ची ₹१,७७,९९९ मध्ये विक्री होत आहे.

    OnePlus Nord CE 3 Lite 5G (Chromatic Gray, 8GB RAM, 128GB Storage) सुपर फास्ट चार्जिंग युक्त 19 हजार 999 रुपयांचा मोबाईल फक्त 17 हजार 499 रुपयात

     

    Apple iPhone 13 (128GB) वर तब्बल 30 टक्क्यांची सूट 69 हजार 900 रुपयांचा आयफोन फक्त 48 हजार 999 रुपयात

     

    Fire TV Stick Lite with all-new Alexa Voice Remote Lite बघा ऑनलाइन चित्रपट व वेबसिरीज चा धमाका, 3 हजार 999 रुपयांचे फायर टीव्ही स्टिक केवळ 1 हजार 799 रुपयांमध्ये, 55 टक्क्यांची मिळतेय सूट, आजच खरेदी करा..

     

    Redmi 108 cm (43 inches) F Series 4K Ultra HD Smart LED Fire TV L43R8-FVIN (Black) 51 टक्क्यांची सूट, 42 हजार 999 रुपयांचा टीव्ही फक्त 20 हजार 999 रुपयात आजच खरेदी करा amazon indian festival मधून
  • तहानलेल्या गावांना मिळणार पाणी..! सरपंच संघटनेच्या मागणीला यश

    News34 chandrapur गुरू गुरनुले

    मुल – मागील काही दिवसापासून बेंबाळ, गोवर्धन, नांदगाव, घोसरी, बाबराळा, नवेगाव भुजला, चकदुगाळा या गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाणीपुरवठा बंद असल्याने या गावातील नागरिकांना पाण्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

     

    परिसरातील नागरिक दूषित पाणी पिल्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत सरपंच संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन पाणीपुरवठा सुरू करण्यासंदर्भात सतत पाठपुरावा केला होता. याबाबत शासनाच्या बैठकीमध्येही सरपंच संघटनेच्या वतीने सहभागी होऊन चर्चा करण्यात आली होती.

     

    पाण्यासाठी गावातील जनतेचे हाल होत असल्याने प्रशासनानेही याची गंभीर दखल घेऊन पाणीपुरवठा बाबतचा निधी प्रशासकीय स्तरावरून उपलब्ध करून देऊन पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला. सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे व प्रशासनाच्या सहकार्यामुळे ही योजना पुन्हा सुरू झाली त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार होऊन नागरिकांनी सरपंच संघटनेचे व प्रशासनाचे आभार मानले.

     

    या यशाबद्दल बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, नांदगावच्या सरपंच हिमानीताई वाकुडकर, बाबराळाचे सरपंच धिरज गोहणे, नवेगाव भुजला सरपंच यशवंत खोब्रागडे, गोवर्धनचे सरपंच गोपिकाताई जाधव, चकदूगाळा सरपंच प्रीती ताई भांडेकर, घोसरीच्या सरपंच रोशनी लोढे यांचेही नागरिकांनी आभार मानले.

  • चंद्रपूर जिल्ह्यात अंबुजा सिमेंट प्रकल्पग्रस्तांचं विरुगिरी आंदोलन

    News34 chandrapur

    चंद्रपूर – राज्यातील चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो, जिल्ह्यात मोठे उद्योग अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मात्र हे सर्व उद्योग कामगारांच्या हक्कावर डल्ला मारण्याचे काम करीत आहे, गडचांदूर येथील अंबुजा सिमेंट कंपनी प्रकल्पग्रस्तांनी 6 ऑक्टोबर ला सकाळपासून विरुगुरी आंदोलन सुरू केले आहे.

    3 कामगार गगनचुंबी टॉवर वर चढून आंदोलन करीत आहे, अंबुजा सिमेंट कंपनी अडाणी समूहाकडे गेल्याने त्यांनी भूसंपादन कायद्याचे उल्लंघन केले, ही सर्व बाब 4 वर्षांपूर्वी चौकशीत सिद्ध झाली मात्र त्यावर काही कारवाई केल्या गेली नाही.

     

    4 वर्षापूर्वी शासनाने कंपनीला कारवाईची नोटीस सुद्धा पाठवली मात्र कारवाई फक्त कागदोपत्री मर्यादित राहिली, सरकार सर्व नियम धाब्यावर बसवून अंबुजा सिमेंट कंपनीला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे, भूसंपादन करार रद्द करीत प्रकल्पग्रस्तांना स्थायी नोकरी च्या मागणीसाठी सकाळपासून प्रकल्पग्रस्तांनी टॉवर वर चढत विरुगिरी आंदोलन सुरू केले आहे.

     

    अंबुजा गो बॅक, अडाणी गो बॅक ची नारेबाजी कामगार करीत असून आम्हांला न्याय द्या अन्यथा आम्ही जीवाचे बरेवाईट करू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.