Tag: News34

  • चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

    News34 chandrapur

    प्रतिनिधी | गुरू गुरनुले

    मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे.
    यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.

     

    शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या : शेतकऱ्या वर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

     

    गेल्या दोन दिवसांपासुन मूल तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने संपुर्ण जनजिवण विस्कळीत झालेले आहे. दरम्यान मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले यांनी मौजा ताडाळा तुकुम शेतशिवारातील शेतात पाणी पाहण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम.५२२ कक्षात शेतकऱ्यांचे तुकडे करुन जागीच ठार केले. नागरीकांना सदर घटनेबद्दल माहिती होताच घटनास्थळावर गर्दी केली.

     

    सदर घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजता दरम्यान घडली असून घटनेची माहिती वनविभागाला कळताच घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे, आर. एफ .ओ. राजेश घोरुडे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सर्पमित्र पर्यावरण प्रेमी उमेश झिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार व अनेक ग्रामस्थ तसेच क्षेत्र सहाय्यक खणके, मस्के, वनरक्षक राकेश गुरनुले, एफ.डी.सी. एम.चे कर्मचारी कूमरे, गवई, कर्मचारी दाखल झाले असुन वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडुन मृत्यदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.

     

    मृतदेह हाती लागताच उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठविण्यात आले, वनविभागाने मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 30 हजार रुपयांची मदत केली. परंतु शेतशिवांरातील वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. यापूर्वी मौजा चीचाळा येथील गुऱ्हे चांरण्यासाठी नेलेल्या दोन इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

  • पहिल्यांदाच तयार होणार चंद्रपूर जिल्ह्याचे मराठी गॅझेटिअर

    News34

     

    चंद्रपूर : ‘गॅझेटिअर’ (दर्शनिका) हे कोणत्याही जिल्ह्यासाठी मौल्यवान व संदर्भमुल्य आधारीत अत्यंत उपयुक्त असा ग्रंथ असतो. ब्रिटीश काळात 1909 मध्ये जिल्ह्याच्या गॅझेटिअरची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. तर स्वातंत्र्यानंतर 1973 मध्ये याच ग्रंथाची सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली. आता मात्र पहिल्यांदाच राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रोत्साहनामुळे व प्रधान सचिव विकास खारगे यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर मराठी भाषेत प्रकाशित होणार आहे. सदर गॅझेटिअर अंतिमरीत्या प्रकाशित करण्यापूर्वी नागरिकांच्या अवलोकनार्थ तसेच योग्य सुचना व अभिप्राय नोंदविण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात एक महिना उपलब्ध असणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    Amazon वर लेटेस्ट मोबाईल खरेदी करण्याची सुवर्णसंधी

    चंद्रपूर जिल्ह्याचे मराठीतील गॅझेटिअर हे दोन खंडात आणि जवळपास 1400 पानांचे राहणार आहे. यात जिल्ह्याचे प्राकृतिक स्वरूप, भुस्वरुप, नद्या, वनसंपदा, स्थळांची भौगोलिक माहिती, लोकांच्या चालीरीती, राजघराण्यांचा इतिहास, आर्थिक व्यवस्था, महसूल प्रशासन, भूगोल, इतिहास, लोकप्रशासन, सिंचन, व्यापार, उद्योग, बँकींग सुविधा, वाहतूक व दळणवळण, प्राचीन अवशेष, ऐतिहासिक वारसा आणि पुरातत्वीय महत्वाची स्थळे आदी तपशील यात अंतर्भूत आहे. विशेष म्हणजे गॅझेटिअर ग्रंथाच्या पारंपरिक मूळ संकल्पनेव्यतिरिक्त जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नव्याने झालेल्या संशोधनाचा व त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेऊन हे गॅझेटिअर तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती गॅझेटिअर मंडळाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांनी दिली.

    जिल्हाधिकारी कार्यालयात 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन दिवस व कार्यालयीन वेळेत सदर गॅझेटिअर नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध राहील. गॅझेटिअर पाहून नागरिकांना याबाबत योग्य सुचना व अभिप्राय नोंदवायचा असेल तर रजिस्टरमध्ये तशी नोंद करावी. योग्य अभिप्राय व सुचनांचा सकारात्मक विचार करण्यात येणार आहे.

    पत्रकार परिषदेला जिल्हाधिक-यांसह गॅझेटिअर संपादक मंडळाचे सदस्य अशोक सिंह ठाकूर, कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर आणि उपसंपादक प्र.रा. गवळी उपस्थित होते.

     

  • बच्चू कडू यांचा तालुकाध्यक्ष कांग्रेस पक्षात सामील

    News34

     

    चंद्रपूर ः आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कल येथील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाशी ध्येयधोरणे, पक्षसंघटन मजबूत करण्याचे आश्वासन या युवकांनी दिले. पक्षात प्रवेश करणाऱ्या या युवकांचा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी काँग्रेसचा दुप्पटा देऊन स्वागत केले.

    वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडका सुरू केला आहे. गावागावात जाऊन तेथील गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाऊन घेत आहे. तातडीने समस्यांचा निपटारा करीत आहे. त्यांच्या या कार्याने प्रभावीत होऊन प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर डुकरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

    नुकताच पार पडलेल्या एका छोट्याखानी कार्यक्रमात किशोर डुकरे यांच्यासह टेमुर्डा सर्कलमधील शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षात प्रवेश केलेल्यांमध्ये कोसरसारचे उपसरपंच गणेश मडावी, बोरगावचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण देवतळे, गुंजाळ्याचे सरपंच भाऊराव चौधरी, बोरगाव तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष आकाश धवने, संदीप वासेकर, निखिल तिखट, अनिकेत झिले, संदीप वासेकर, ओमकार कांबळे, पवन बावणे, मुनेश्वर राऊत, विशाल कापरे, विनोद दडमल, आकाश डाखरे, आकाश डावणे, यशश्री आस्वले, प्रसाद मिलमिले, राहुल देठे, सतीश कनोजवार, अमोल डांबोली, प्रणय तिवारे, अमने, हर्षल चोपणे, देवाजी घोसरे, अजय ताजने, रितेश देवतळे, गिरीश वनकुटे यांच्यासह अन्य युवकांचा समावेश होता. या युवकांनी काँग्रेसचे पक्षसंघटन वाढविण्याचे आश्वासन दिले.