Tag: News34 chandrapur

  • fire proximity suit । चंद्रपूरमध्ये अग्निशमन दलाला नव्या कवचाचे वरदान – फायर प्रॉक्सिमिटी सूटचे वाटप

    fire proximity suit

    fire proximity suit : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत येथे कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील जवानांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते फायर प्रॉक्झिमिटी सूट ( fire proximity suit ) चे वितरण करण्यात आले.

    उपरवाही येथील जिल्हा परिषद शाळेला जिल्हाधिकारी गौडा यांची भेट

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, नगर प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख, तसेच ब्रम्हपूरी, वरोरा, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती, चिमूर येथील नगर परिषदांचे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या कामाचे कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    काय आहे फायर प्रॉक्झिमिटी सूट : हे अग्निशामक आणि इतर धोक्याच्या परिस्थितीत काम करणाऱ्या व्यक्तींना उच्च तापमानापासून आणि ज्वालांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले विशेष सुरक्षा उपकरण आहे, ज्याला चांदीचा बंकर सूट असेही म्हणतात.

    फायर प्रॉक्सिमिटी सूटचे उपयोग

    अग्निशामकांना संरक्षण : अग्निशामक (firefighter) आग विझवण्याच्या कामात थेट ज्वालांच्या संपर्कात येतात, अशा स्थितीत त्यांना या सूटमुळे उष्णतेपासून आणि जाळणाऱ्या पदार्थांपासून संरक्षण मिळते. firefighter protective suit

    धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्यांना संरक्षण : ज्वालामुखीशास्त्रज्ञ, औद्योगिक कामगार आणि इतर धोक्याच्या परिस्थितीत काम करणाऱ्यांना या सूटमुळे उष्णता आणि ज्वालांपासून संरक्षण मिळते.

    विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) मध्ये वापर : विमान बचाव आणि अग्निशमन (ARFF) मध्ये, ≈500 °F (260 °C) पर्यंत वातावरणीय उष्णता संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रॉक्सिमिटी सूट वापरले जातात.

    आगीत अडकलेल्या लोकांना मदत : अग्निशामक या सूटचा वापर करून आगीत अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकतात.

    हा सूट अग्निशमन जवानांना कोणत्याही फ्लेशओव्हरपासून अर्थात आगीच्या ज्वालांपासून वाचवेल. या सूटचे सर्व भाग युरोपीयन मानकांनुसार प्रमाणित करण्यात आले आहेत. सूटमध्ये जॅकेट, पॅन्ट हुड, हातमोजे, हेल्मेट आणि बूट यांचा समावेश आहे.

  • Majhi Shala Sundar Shala । शाळांमध्ये शिक्षणासोबत कौशल्यविकासावर भर – जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने वाढला आत्मविश्वास!

    Majhi Shala Sundar Shala

    Majhi Shala Sundar Shala : 100 दिवस कृती आराखडयाअंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी  आठवडयातून किमान दोन दिवस  क्षेत्रीय भेटी दरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या प्रकल्पांना भेटी देऊन कामाच्या प्रगतीची पाहणी करावी, अशा राज्य शासनाच्या सुचना आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी कोरपना तालुक्यातील उपरवाही येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

    चंद्रपूर वन अकादमी मध्ये अंतर्गत भ्रष्टाचार

     ‘मुख्यमंत्री माझी, शाळा सुंदर शाळा’ टप्पा-2 सन 2024-25  अंतर्गत जिल्हयात दुसरा क्रमांक मिळाला आहे. या शाळेत नाविन्यपूर्ण ‍विज्ञान व गणित प्रयोगशाळेतुन शिक्षण, इकोक्लब सदस्यामार्फत पर्यावरण जागृती व संरक्षण, मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचे पथकाद्वारे सादरीकरण, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत उपक्रम, बाल  वाचनालय नियमित वापर, सावित्रीबाई फुले बचत बँकेच्या माध्यमातुन आर्थिक देवाण घेवाण, विपुल भारत अंतर्गत माता-पालक गटाची स्थापना व गट कार्यरत, आशा व अंगणवाडी सेविका मार्फत किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन,  निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम राबविण्यात येतात. government education schemes for rural schools

    यावेळी जिल्हाधिका-यांनी शाळेत सुरु असलेल्या  प्रशंसनीय उपक्रमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांचे कौतुकसुध्दा केले. भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी रविंद्र माने, तहसीलदार पल्लवी आखाडे, संवर्ग विकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी  आदी उपस्थित होते.

  • cockfight betting police action । कोंबडा लढतीवर पोलिसांचा छापा! लाखोंचा जुगार उघड, चार आरोपी अटकेत

    cockfight betting police action

    cockfight betting police action : कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोंबडा लढतीवर हारजीत चा जुगार खेळणाऱ्या कोंबडा बाजारावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारत एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, या प्रकरणी ४ आरोपींवर जुगार प्रतिबंधित कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोंबड्याची झुंज लावत त्यावर पैसे लावत जुगार खेळल्या जातो, काही पोलीस पथक कारवाई करण्यात यशस्वी होतात तर काही यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. cockfight gambling raid Maharashtra

    वन अकादमीमध्ये भ्रष्टाचार, आपने मुख्य वनसंरक्षकांवर लावला आरोप

    कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी गावात कोंबडा झुंजीवर पैसे लावत जुगार खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने कोंबडा बाजारावर धाड मारली.

    अचानक पडलेल्या धाडीने जुगार खेळणारे सैरावैरा पळू लागले मात्र यामधील ४० वर्षीय अमोल साधूजी खरवडे, २९ वर्षीय संजय शालिक क्षीरसागर राहणार कोरपना, ५४ वर्षीय अनिल किसन बेलेकर राहणार यवतमाळ, ४६ वर्षीय राजेंद्र नानाजी खिरटकर राहणार यवतमाळ हे पोलिसांच्या हाती लागले.

    आरोपींजवळून रोख रक्कम, ४ जिवंत कोंबडे, ४ मोटारसायकल सह एकूण २ लाख ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कलम १२ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतुर्त्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकर, संतोष निंभोरकर, पोलीस पथकातील कर्मचारी किशोर वैरागडे, अजय बागेसर, जय सिंग, संतोष येलपुलवार, प्रमोद कोटनाके, मिलिंद जांभुळे व दिनेश अराडे यांनी केली.

  • Chandrapur forest academy corruption probe । वन अकादमीत भ्रष्टाचाराचा डोंगर! ‘आप’चा मुख्य वनसंरक्षकांवर गंभीर आरोप

    Chandrapur forest academy corruption probe

    Chandrapur forest academy corruption probe : चंद्रपूर: येथील वन अकादमीतील सरकारी निधीतून खरेदी केलेल्या लाखो रुपयांच्या उपकरणांची नासाडी झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने (आप) मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रेड्डी यांनी हा भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे.

    शिवद्रोही प्रशांत कोरटकर ला सहकार्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कूडे, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे आणि युवा संघटन मंत्री मनीष राऊत यांनी मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना याबाबत तक्रार अर्ज दिला आहे. वन अकादमीतील सरकारी क्वार्टर्समध्ये निष्काळजीपणे टाकून दिलेल्या लाखो रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषध किट्स आणि इतर साहित्याची तत्काळ चौकशी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. Srinivas Reddy forest officer allegations

    चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    वन अकादमीतील एका बंद खोलीत सापडलेल्या साहित्यात स्नेक बाईट उपचार किट्स, प्रथमोपचार किट्स, हार्ड डिस्क, माईक्स, कॅटरेज आणि इतर महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे अनेक बॉक्स होते. ही सर्व उत्पादने नवीन पॅकिंगमध्ये असूनही त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ लागल्यामुळे त्यांची नासाडी झाली आहे. सरकारी निधीतून खरेदी केलेली ही लाखो रुपयांची उत्पादने अशा स्थितीत सापडणे हे निष्काळजीपणाचे आणि भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण आहे, असा आरोप ‘आप’ने केला आहे. Maharashtra forest equipment wastage case

    या प्रकरणी घटनास्थळी जाण्यास रेड्डी यांनी नकार दिल्याने ‘आप’चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार आणि रेड्डी यांच्यात जोरदार वाद झाला. राईकवार यांनी या भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली, मात्र रेड्डी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. वाद वाढल्याने रेड्डी यांनी पोलिसांना पाचारण करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आल्यावरही ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेत घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण चौकशीची मागणी केली.

    maharashtra forest equipment wastage case

    राईकवार यांनी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि नंतर त्यांना निलंबितही करण्यात आले होते. अमरावतीतील भाजप नेत्यांनीही रेड्डी यांच्याविरोधात सबळ पुरावे असल्याचे आयपीएस अधिकाऱ्यांसमोर मांडले होते. Forest academy government funds misuse

    चंद्रपूर जिल्ह्यात अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची नियुक्ती करून प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराची उधळी लावली आहे, असा आरोप राईकवार यांनी केला आहे. रेड्डी यांच्या अमरावतीतील कार्यकाळात झालेल्या गंभीर भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा चंद्रपूरमध्ये नियुक्त करणे हे स्थानिक प्रशासन आणि राजकीय दबावाचा परिणाम आहे, असा आरोपही त्यांनी केला. Chandrapur forest officer suspension demand

    forest academy government funds misuse

    या प्रकरणी रेड्डी यांची चौकशी करून निलंबन करावे, वन अकादमीतील सर्व खरेदीसंबंधी संपूर्ण ऑडिट करून भ्रष्टाचार बाहेर काढावा, या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि सरकारी निधीची वाया गेलेली रक्कम जबाबदार अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी आणि कारवाई न झाल्यास ‘आप’ मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • Chandrapur festival safety guidelines । चंद्रपूर सणांच्या रंगात: शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक!

    Chandrapur festival safety guidelines

    Chandrapur festival safety guidelines :  चंद्रपूर हा शांतताप्रिय जिल्हा आहे. जिल्ह्याचा हा लौकिक कायम ठेवणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आगामी काळात गुढीपाडवा, रमजान ईद, श्रीराम नवमी, महाकाली यात्रा, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे आदी सण साजरे होणार आहे. हे सर्व सण अतिशय आनंदाने आणि शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

    महावितरणची मोहीम, वीज बिल भरले नाहीतर वीज पुरवठा खंडित

    जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,  महानगरपालिका आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, सहाय्यक पोलिस अधीक्षक नियोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते. Chandrapur peace committee meeting

    चंद्रपुरात वाहतुकीचा खेळखंडोबा

    सर्वधर्मीय सण साजरे करताना प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, प्रत्येकाला आपले धार्मिक सण साजरे करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे. मात्र सण साजरे करताना इतरांना त्रास होऊ नये, याची काळजी सुद्धा घ्यावी. नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना होणार नाही, यासाठी सर्वांनी सतर्क रहावे. गल्ली, मोहल्ला, सोसायटी येथील सर्वांना शांततेचे महत्व समजून सांगावे. सोशल मीडियाचा वापर हा चांगला आणि वाईटसुद्धा होऊ शकतो. Chandrapur social media awareness

    प्रत्येकाने जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा हा कदाचित जिल्हा, राज्य किंवा देशाबाहेरचा सुद्धा राहू शकतो. मात्र अशा पोस्टमुळे आपल्या जिल्ह्यात काही दुष्परिणाम होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. आपापल्या ग्रुपमध्ये सर्वांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

    जिल्हा प्रशासनाचे नियम पाळा – पोलीस अधीक्षक सुदर्शन

    पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांततेसाठी ओळखला जातो. सर्वधर्मीय सण साजरे करताना येथील गुन्ह्यांची संख्या नगण्य आहे. नागपूरच्या घटनेवर जिल्हा पोलिस प्रशासन अतिशय अलर्ट असून जागोजागी बैठकांचे सत्र सुरू आहे. आपल्या परिसरात युवकांना सोशल मीडियाचे दुष्परिणाम समजून सांगावे. बऱ्याचशा पालकांना आपली मुलं सोशल मीडियावर काय करतात, याची कल्पना नसते. त्यामुळेच जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध जनजागृती  उपक्रम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाचे नियम सर्वांनी पाळावेत  व प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. सुदर्शन यांनी केले. Chandrapur festival rumor control

    मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, सदस्यांच्या सूचनेनुसार सर्वधर्मीय सणांमध्ये पाणीपुरवठा नियमित होणार आहे. रामनवमीच्या दिवशी शहरातील संडे मार्केट बंद राहील. तसेच महाकाली यात्रेपूर्वी शहरातील  रस्ते चांगले होणार असून रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

    chandrapur Peace committee meeting

    अशा आहेत नागरिकांच्या सूचना –  सणानिमित्त शहरातील पाणीपुरवठा नियमित व्हावा, सण साजरे करताना इतर धर्मीयांच्या भावना दुखावू नये याची सर्वांनी काळजी घ्यावी, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, आक्षेपार्ह पोस्टवर नियंत्रण ठेवावे, शहरातील रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करावी, अवैध धंद्यांना आळा घालावा, मिरवणुकीचे आयोजन करणाऱ्या प्रमुख प्रतिनिधींची जिल्हा प्रशासनाने बैठक घ्यावी. Chandrapur community group meeting

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी केले. आभार पोलिस निरीक्षक योगेश पारधी यांनी मानले. बैठकीला उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, पोलिस पाटील, दक्षता समितीचे सदस्य व जिल्हास्तरीय शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

  • Traffic congestion due to road work । चंद्रपूर शहरात रस्ते आहेत की खड्ड्यांचा सापळा? प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव!

    Traffic congestion due to road work

    Traffic congestion due to road work : चंद्रपूर शहरात मागील २ महिन्यापासून अमृत २.० व मलनिःस्सारण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली मात्र कसलेही नियोजन न करता रस्त्याचे खोदकाम सुरु केले, मात्र या खोदकामामुळे शहरात सर्वत्र धुळीचे वातावरण निर्माण झाले. वाहतूक व्यवस्था अक्षरक्षा खोळंबली. Chandrapur Traffic

    बिहारची बंदूक, चंद्रपूरचे तीन गुन्हेगार

    आधीच प्रदूषणाची झळ सोसणाऱ्या चंद्रपूरकरांना रस्त्यावरील धुळीचे प्रदूषण सोसावे लागत आहे. शहरातील मुख्य मार्ग कस्तुरबा व महात्मा गांधी मार्ग खोदण्यात आला आहे, नागरिकांना शहरातून जात असताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

    सदर काम सुरु होण्यापूर्वी वाहतुकीचे व प्रदूषणाचे काय होणार याच कसलेही नियोजन मनपाने केलं नसल्याचं चित्र शहरातील वातावरण बघून निदर्शनास येते. जिल्हा परिषद मार्ग ते गिरनार चौक या मार्गावरून जाताना नागरिकांचे चेहरे लाल होत आहे. गिरनार चौकातून महात्मा गांधी मार्गावर गेल्यास थेट प्रियदर्शिनी चौकापर्यंत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहे. Dust pollution from road construction

    या कारणामुळे चंद्रपुरातील संडे मार्केट बंद

    सदर कामापूर्वी चंद्रपूर वाहतूक विभागाने वाहतुकीचा खोळंबा होणार नाही याच नियोजन का केलं नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. चंद्रपूर शहरातील मार्ग हे अरुंद आहे, विशेष म्हणजे विविध ठिकाणी अतिक्रमण सुद्धा आहे, कामापूर्वी मनपाने अतिक्रमण काढले असते तर नागरिकांना या मार्गावरून जाताना त्रास झाला नसता.

    शहरातील जटपुरा गेट ते जिल्हा परिषद मुख्यालयाच्या रस्त्यावर वारंवार ट्रॅफिक जॅम होत असून वाहतूकदारांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या जॅम मध्ये ४ ते ५ रुग्णवाहिका अडकत आहे, नागरिक वाहतुकीच्या नियमन न जुमानता आपली वाट काढतात मात्र याना नियम सांगणार वाहतूक विभाग यावर काही उपाययोजना करताना कुठेही दिसत नाही आहे.

  • Chandrapur Collector Vinay Gowda । “तहसीलदार ते जिल्हाधिकारी: कार्यक्षमतेसाठी नवे नियम, समितीची सुरुवात!”

    Chandrapur Collector Vinay Gowda

    Chandrapur Collector Vinay Gowda : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या कार्याविषयक नियमपुस्तिका तयार करण्याकरिता विभागीय आयुक्त कोकण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा समावेश करण्यात आला आहे. Maharashtra Land Revenue Code 1966

    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची लागणार एसआयटी चौकशी

    यापूर्वी 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गठीत समितीमध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी ऐवजी अहिल्यानगर जिल्हाधिकारी असा बदल करण्यात आला असून चंद्रपूर आणि नांदेड जिल्हाधिका-यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. याबाबतचे सुधारीत शुध्दीपत्रक आज 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले. Land Revenue Policy Maharashtra

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांची कार्यविषयक नियमपुस्तिका तयार करण्याबाबत गठीत समितीचे अध्यक्ष हे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त असून सदस्य सचिव म्हणून कोकण विभागाचे उप आयुक्त (महसूल) हे आहेत. इतर सदस्यांमध्ये जिल्हाधिकारी चंद्रपूर, अहिल्यानगर, जालना, जळगाव, नांदेड यांचा समावेश आहे.

    गठीत करण्यात आलेल्या समितीने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्या अनुषंगिक महसूल विषयक योजना / धोरणे इत्यादींचा अभ्यास करून शासनास तीन महिन्यात शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • PM Internship Scheme 2025 । टॉप 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप! 31 मार्चपर्यंत नोंदणी करा, भविष्य घडवा!

    PM Internship Scheme 2025

    PM Internship Scheme 2025 : पंतप्रधान रोजगार आणि कौशल्य विकास पॅकेज अंतर्गत पंतप्रधान इंटर्नशिप योजना केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. या योजनेची उमेदवारांनी नोंदणी करण्याचा कालावधी 31 मार्च 2025 पर्यंत आहे. नोंदणीसाठी pminternship.mca.gov.in.  या वेबपोर्टलवर उमेदवारांनी नोंदणी करावी. या योजनेअंतर्गत देशातील टॉप 500 कंपन्यामध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय अंतर्गत पाच वर्षात एक कोटी तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक इंटर्नसाठी वार्षिक 66 हजार रुपये देण्यात येणार आहे. दरमहा 5हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार असून कंपनी त्यांच्या सीएसआर निधीतून 500 रुपये व केंद्र सरकार 4500 रुपये देणार आहे. नियुक्तीच्या वेळी उमेदवारांना एकरकमी 6 हजार रुपये अनुदान दिले जाईल. Prime Minister Internship India

    चंद्रपुरात भव्य रोजगार मेळावा, ९०० च्या वर नोकऱ्या उपलब्ध

    भारत सरकार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत या शिक्षणार्थीसाठी विमा कवच देखील दिले जाणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 21  ते 24 वर्ष असून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी, पुर्णवेळ शिक्षण किंवा रोजगार नसलेले बेरोजगार तरुणांसाठी ही संधी आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.

  • Chandrapur CDCC bank SIT inquiry । चंद्रपूर जिल्हा बँकेत ‘एसआयटी’ चौकशी! भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणार

    Chandrapur CDCC bank SIT inquiry

    Chandrapur CDCC bank SIT inquiry : चंद्रपूर २५ मार्च (News३४) – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करण्यात येणार आहे. सोमवारी (२५ मार्च) विधासभेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षवेधीवर गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी माहिती दिली.

    लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी सदर भ्रष्टाचार प्रकरणाबाबत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीसोबत राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली होती. bank employee recruitment scams

    चंद्रपूर जिल्ह्यातील क्रिकेट बुकींची पळवाट, धंदा मात्र कायम

    लक्षवेधी मांडताना आज आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की त्याची कल्पनाही न केलेली बरी. ग्राहकांच्या खात्यातून पैसे गायब होतात. नोकरभरतीमध्ये पैसे खाल्ले जातात. आरक्षण हद्दपार केले जाते. तरीही कारवाई होत नाही. customer account hacking recovery

    १७ मार्च २०२५ ला सुप्रीम कोर्टानेने जो निकाल दिला, त्यानुसार ज्या खातेधारकांची चूक नसताना पैसे काढले जात असतील तर त्यावेळी बॅंकेने त्वरीत त्यांचे पैसे भरून द्यायचे असतात. यामध्ये पैसे खाता आले नाही, म्हणून फायर वॉल करण्यात आली नाही. सर्वस्वी चूक ही बॅंकेचे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी व संचालकांची आहे. भ्रष्टाचार किती खालपर्यंत पोहोचला आहे, याची कल्पना यावरून यावी की, यांचे रक्त जर पॅथॉलॉजीमध्ये तपासायला गेले तर रक्ताच्या थेंबातून हिमोग्लोबीन सापडणार नाही. तर फक्त भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच सापडेल, असे आ.सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

    मालमत्ता कराची कर चुकवेगिरी करणाऱ्यांचे नावे चंद्रपूर मनपाने केले जाहीर

    पुढे म्हणाले, आज संविधानावर आपण चर्चा करणार आहोत. संविधानाने, न्यायालयाने आणि शासनानेही सांगितले आहे की आरक्षण असले पाहिजे. पण चंद्रपूर जिल्हा बॅंकेमध्ये आरक्षण धुडकावून लावण्याचा महाप्रताप संचालक मंडळाने केला आहे. दिव्यांग, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींचे आरक्षण असले पाहिजे. पण यांपैकी कुणालाही आरक्षण दिले गेले नाही. जी नोकरभरती केली, त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाला अशी माहिती मिळाली. परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. पैसे खाऊन नोकरभरती केल्यामुळे काही संघटनांनी उपोषण केले. त्यानंतरही भ्रष्ट लोकांना पाझर फुटला नाही. या प्रकरणात एसआयटीची चौकशी लावणार का, असा प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी केला. district cooperative bank corruption

    एसआयटी लावताना त्याची कार्यकक्षा ठरवली गेली पाहिजे. यामध्ये आमच्या सर्व सदस्यांसोबत चर्चा झाली पाहिजे. तेव्हा कुठे ‘दूध का दूध, पानी का पानी’, होईल.ही चौकशी लावताना मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने लावा, असेही आ . मुनगंटीवार म्हणाले. customer fund transfer fraud

    गृहराज्यमंत्री म्हणाले एसआयटी लावणार
    आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे खाते हॅक करून ३३ ग्राहकांचे ३ कोटी ७० लाख ६४ हजार रुपये एका अज्ञान व्यक्तीने हरियाणाच्या खात्यात वळते केले. यासाठी आणि नोकरभरतीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी एसआयटी लावण्यात येईल. आमदार मुनगंटीवार यांच्या सुचनेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने ही चौकशी लावण्यात येईल.

  • Chandrapur cricket betting । चंद्रपूरात क्रिकेट बुकींचा राज: पोलिसांच्या कारवाईनंतरही धंदा चालूच

    Chandrapur cricket betting

    Chandrapur cricket betting : चंद्रपूर जिल्ह्यात मागील ५ वर्षांपासून गुन्हेगारीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढ्लेला आहे,ऑफलाईन गुन्हेगारी सह आता ऑनलाईन गुन्हेगारीने सुद्धा यामध्ये भर घातली आहे. सायबर फ्रॉड आणि ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याने सध्या तरुणाईला प्रचंड वेड लावले आहे. चंद्रपुरात अनेक क्रिकेट बुकी राहतात त्यांना कायद्याचा मुळीच धाक नाही, हे क्रिकेट बुकी मुजोरीने आपलं काम करतात. वर्ष २०२५ मध्ये पोलिसांनी आयपीएल सुरु होण्यापूर्वीच क्रिकेट बुकी वर कारवाईची मोहीम राबवली आहे. online betting police action

    कुणाल कामरा वर कारवाई करा, शिवसेनेची मागणी

    पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे क्रिकेट बुकींच्या मनात धडकी भरली आणि यामधील काही बुकींनी जिल्ह्यातून ऑफलाईन पळ काढला मात्र अजूनही सर्व बुकी आयपीएल च्या माध्यमातून सट्टेबाज सोबत ऑनलाईन संपर्कात आहे.

    मागील वर्षी पोलिसांच्या कारवाईमुळे काही बुकी गोव्याला पळाले तर काही नागपुरात जात तिथून आपल्या व्यवसाय सुरु ठेवला होता. यंदा तेच चित्र आहे, काहींनी पळ काढला तर काही जिल्ह्यातील फार्महाउस व रिसॉर्ट मध्ये आपलं बस्तान मांडल्याची माहिती आहे. क्रिकेट बुकी ऑफलाईन बाहेर पळाले असले तरी त्यांचं काम मात्र बेधडकपणे सुरूच आहे. IPL illegal betting news

    याचाच अर्थ या बुकींना कुणीतरी सहकार्य करीत आहे. धंदा करण्याची बोलणी फिस्कटली असली तरी अदृश्य हात या क्रिकेट बुकींच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. सध्या नीरज चा बंटी याच्या खांद्यावर धंदा चालविण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. राकेश सुद्धा आपलं स्थान बदलवित इकडे तिकडे फिरत आहे.

    दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असते नेमकं त्याचवेळी यांच्यावर कारवाई करण्यात येते, विशेष म्हणजे क्रिकेट व्यतिरिक्त हा सट्टा फुटबॉल स्पर्धा, कबड्डी वर पण लावण्यात येतो आणि त्याचे म्होरके हे चंद्रपुरातील आहे. पोलीस विभागाने या क्रिकेट बुकींवर प्रतिबंधात्मक कारवाई सहित एमपीडीए या कलम अंतर्गत थेट कारागृहात यांची रवानगी करावी अशी मागणी आता नागरिकांतर्फे होताना बघायला मिळत आहे. MPDA act against bookies