Shiv Sena Kunal Kamra controversy : शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या विरोधात व्यंगात्मक गाणं बनवून त्यांची अपमानास्पद भाषेचा वापर करुन खालच्या पातळीवर बदनामी करण्याचे क्रूत्य व चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न करित खिल्ली उडविणारे गाणं समाजमाध्यमावर ट्रोल करणाऱ्या कुणाल कामरा याला तात्काळ अटक करुन कायदेशीर कठोर कार्यवाही करण्याची चंद्रपुर शिवसेनेच्या वतीने गृहमंत्री देवेंद्रजी फड़णविस, पोलिस स्टेशन रामनगरचे पोलिस निरीक्षक व प्रशासनाला लेखी तक्रारीद्वारे मागणी करण्यात आली. Eknath Shinde defamatory song
यावेळी लेखी तक्रार शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी यांनी दिली तर महिला आघाडी चंद्रपुर जिल्हाप्रमुख मिनलताई आत्राम बल्लारपुर विधानसभा महिला संघटीका क्रिष्णाताई सुरमवार,युवासेना उप जिल्हाप्रमुख सुधीर राजगड कर, उप तालुकाप्रमुख विक्की महाजन, गुरुदास मेश्राम, उप महानगर प्रमुख विश्वास खैरे, विभाग प्रमुख अजय चौधरी, भद्रावती मा. नगरसेवक नाना दुर्गे, निखिल सुरमवार आदींची उपस्थिती होती. Chandrapur Shiv Sena complaint
व्यंगात्मक गीत गाणारा कुणाल कामरा यांने शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेबांच्या विरोधात व्यंगात्मक गाणं बनवून त्यांची अपमानास्पद भाषेचा वापर करुन खालच्या पातळीवर बदनामी करण्याचे क्रूत्य व चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न करित खिल्ली उडविणारे गाणं समाजमाध्यमावर ट्रोल केल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनता आणि लाडक्या बहिणी यांच्या भावना दुखावल्या गेल्या असून अशा बुद्धिहीन, निर्लल्ज, मुर्ख, अशिक्षित, कमअकली कुणाल कामरा याला तात्काळ अटक करुन कायदेशीर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा चंद्रपुर शिवसेना नाईलाजास्तव शिवसेना पद्धतिने आंदोलन करण्याचा इशारा व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल, असे लेखी तक्रारीत देण्यात आले.
TB free villages India : क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 100 दिवस क्षयरोग दूरीकरण मोहीम 7 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 मार्च रोजी या मोहिमेचा समारोप करण्यात आला. Chandrapur TB program
प्रियदर्शनी सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललीतकुमार पटले, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भास्कर सोनारकर, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. संदीप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. वैभव आगलावे आदी उपस्थित होते.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 15 ते 31 मार्च पर्यंत क्षयरोग पंधरवाडा साजरा करण्यात येत असून जिल्हा स्तरावर क्षयरोग जनजागृती करण्याकरीता विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. गावपातळीवरील लोकांच्या सहकार्याशिवाय टीबी मुक्त ग्रामपंचायत करणे शक्य झाले नसते. World TB Day 2025
100 दिवस मोहिमेदरम्यान 4 लक्ष 81 हजार 455 अतिजोखिमेच्या व्यक्तींचे क्षयरोगाबाबत पडताळणी करण्यात आली. 3241 निक्षय शिबीर घेण्यात आले व 10886 लोकांची नॅट तपासणी करण्यात आली. 25059 व्यक्तींचे छातीचे एक्स- रे करण्यात आले असून 1114 नविन क्षयरुग्ण शोधून त्यांना औषधोपचार सुरू करण्यात आला.
जनजागृती रॅलीचे आयोजन : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग केंद्र चंद्रपूर येथून क्षयरोग जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रभादेवी नर्सिंग महाविद्यालय येथील विद्यार्थी, वैद्यकीय अधिकारी, सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी व जिल्हा क्षयरोग केंद्र, येथील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. Rural TB eradication
उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार : शहरी भागात उकृष्ट टीबी नोटीफिकेशन केल्याबद्दल डॉ. सौरभ राजुरकर, डॉ. शरयू पाझारे, डॉ. आनंद बेर्डले, डॉ. प्रविण पंत, डॉ. अमरीप बुक्काबार यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ. मंगेश भरडकर यांनी संक्षयित क्षयरुग्णांची माहिती दिल्याबद्ल तसेच प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत स्टील ऑथरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, मॉउंट कारमेल कॉन्व्हेट हायस्कूल, राजीव रतन हॉस्पीटल, घुग्घस, डॉ. कोमल मुनेश्वर, अमित जयस्वाल, नदीम कुरेशी या सर्वांनी गरजू क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरीत केल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.
विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस : क्षयरोगाची जनजागृती करण्याकरीता शहरी व ग्रामीण भागात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच स्पर्धेत यशस्वी होणा-या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन व अश्विनी चांदेकर यांनी केले. आभार डॉ. माधुरी टेंभे यांनी मानले.
property tax defaulters list : 1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या थकबाकीदारांना करभरणा करण्यास मनपाद्वारे 21 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र तोपर्यंत करभरणा न करणाऱ्या सर्व थकबाकीदारांची नावे सार्वजनिकरीत्या प्रसिद्ध केली गेली असुन शहरातील वर्दळीच्या सर्व चौकांवर असे बॅनर लावण्यात आले आहे. municipal corporation banner for tax defaulters
यात विनोद बुराडे -116278,लागूबाई भुफा-153184 ,नामदेवराव पारवेकर- 150086,केवलराम गुलाणी-456082, विनस बनोत-122977,विदर्भ काँक्रीट प्रा. -198557,विठ्ठल पंदीलवार- 320515,मो. नजीर अ.करीम-177441,महंमद वसिउद्दिन-362228 ,निर्मलादेवी पंडीत- 620491, शामराव लांडगे-1180007 समृद्ध जीवन फूड्स लि.- 469093,सायराबाई गांधी-166911, रीना सरकार-203392,समृद्धी सेविंग इन्व्हेस्टमेंट-180620 असे एकुण 51 लक्ष 29 हजार थकबाकी असणाऱ्या16 थकबाकीदारांची नावे प्रकाशित करण्यात आली आहे. municipal corporation property tax recovery
शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते, परंतु सुविधांचा लाभ घेणारे अनेक जण कराचा भरणा करण्यासाठी चालढकल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठीच मनपाद्वारे थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्यास येत आहे. कर विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना समजावून सांगत असल्याने अनेक जणांनी कराचा भरणा केला आहे. property tax notice public display
1 लाखाच्या वर मालमत्ता कर थकीत असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मनपाच्या अधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आला होता. यासाठी त्यांना यासाठी 21 मार्चची मुदतसुद्धा देण्यात आली होती.मात्र याउपर करभरणा न केल्यास थकबाकीदारांची नावांचे बॅनर प्रसिद्ध करण्यात आले आहे. नावे प्रसिद्ध झाल्यानंतर जर कुणाची मानहानी झाली तर त्याला ते स्वतः जबाबदार राहणार असल्याचे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे याआधीच स्पष्ट करण्यात आले होते. या होणाऱ्या कारवाईमुळे ज्यांना या मोहिमेच्या परिणामांची कल्पना आली होती त्या थकीतदारांनी ऑनलाईन तसेच अथवा ऑफलाईन माध्यमातुन आपल्या कराचा भरणा केला आहे.
Wcl Workshop theft case : वेकोलि बल्लारपूर मधील वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडून अज्ञातांनी डबल टेंडन्ट गेअर पंप व इतर भंगार असा एकूण ५ लाख ७२ हजार रुपयांचा माल चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी २ आरोपीना अटक केली आहे.
बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेकोलिच्या वर्कशॉप मध्ये चोरांची नजर पडली आणि त्यामधील लोखंडी साहित्यांची धाडसी चोरी करण्यात आली. यासाठी आरोपींनी एखाद्या चित्रपटासारखी कामगिरी करीत वर्कशॉपच्या भिंतीला होल पाडत त्यामधील महागड्या लोखंडी वस्तू २ मग टेंडन्ट गियर पंप आणि भंगार चा माल चोरून नेला. double tandem gear pump theft
याबाबत सुरक्षा व्यवस्थापकाने बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, बल्लारपूर पोलिसांनी कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी याबाबत तपास सुरु करीत अज्ञात आरोपी व चोरी गेलेल्या मालाचा शोध सुरु केला.
पोलिसांनी या चोरी प्रकरणात २० वर्षीय श्रीराज संग्राम बहुरिया राहणार सरदार पटेल वॉर्ड बल्लारपूर व २२ वर्षीय करण इंदू निषाद राहणार रामनगर सस्ती राजुरा याला अटक केली. आरोपीसोबत इतरही साथीदार होते अशी माहिती पोलिसांना तपासात प्राप्त झाली. stolen scrap metal recovery
दोन्ही आरोपीनी चोरी केलेला मुद्देमाल वेकोलि वर्कशॉप च्या मागील भागात असलेल्या झुडपात लपून ठेवला होता. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, पोलीस कर्मचारी आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडित, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, शरदचंद्र कारुष, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, नासिर सय्यद, अनिता नायडू यांनी केली.
Ghuggus Chandrapur shocking incident : चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस येथे संतापजनक घटना घडली असून ३९ वर्षीय इसमाने शाळकरी मुलींना बघून हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी त्या विकृताला शाळकरी मुली यांच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर अटक करण्यात आली.
घुग्घूस येथे शनिवारी, दिनांक 22 मार्च रोजी, सुभाष नगर येथील बस स्टँड परिसरात शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आणि शाळेतून परत येताना चिल्ड्रन पार्क परिसरात एका विकृत ३९ वर्षीय सागर आरापेल्ली निवासी शालीकराम नगर, घुग्घूस) याने मुलींना आपल्या लाल रंगाच्या बलेनो कारमध्ये (क्रमांक MH 34 CD 8166) बसून हस्तमैथुन केले. Schoolgirls harassment case India 2025
यासह शाळकरी मुलींना आरोपीने अश्लील हातवारे केले या प्रकाराबाबत मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. संतप्त झालेल्या पालकांनी याची तक्रार पोलिसांना केली. पोलिसांनी या विकृत व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75 (2) बी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला चंद्रपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आणि त्याची गाडी जप्त करीत घुग्घूस पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहे. पुढील तपास घुग्घूस पोलीस करत आहेत.
Free mock test for students : शिवसेना, युवासेना चंद्रपूर जिल्हा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आयोजित चंद्रपूर जिल्हा व शहरातल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत महासराव सिईटीचे आयोजन चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरीता त्यांच्या उज्वल भविष्यासाठी चंद्रपूर युवासेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येत्या 29 तारखेला सकाळी 10 वाजता अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सीईटीचा ,मॉक टेस्ट आयोजन करण्यात आलेले आहे. MHT-CET mock test practice
यासंदर्भात २१ मार्चरोजी शासकीय विश्रामगृहात युवासेनेने पत्रकार परिषद घेत मॉक टेस्ट बाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हर्षल काकडे, पूर्व विभागीय सचिव युवासेना व सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ निलेश बेलखेडे, युवासेना सहसचिव व युवतीसेना जिल्हाप्रमुख रोहिणीताई पाटील, जिल्हा युवासेना विस्तारक संदीप रियाल, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे उपस्थित होते.
दरवर्षी युवासेना तर्फे शैक्षणिक हिताचे कार्य केल्या जाते या अनुषंगाने राज्यात निशुल्क मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हर्षल काकडे यांनी दिली, सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांनी माहिती दिली कि विद्यार्थ्याचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा लाभ घेत आपले उज्वल भवितव्य घडवावे हे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्रात वैद्यकीय, अभियांत्रिकी,फार्मा तसेच विधी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी NEET तसेच MHT-CET ची माॅक टेस्ट (सराव परीक्षा) चे मोफत आयोजन करण्यात येत आहे. तरी या सराव परीक्षेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा व्हावा याकरिता १२ वी (विज्ञान) शाखेतील आपल्या जवळच्या विद्यार्थ्यांना या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा. Career preparation for 12th students
चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली कि, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक होतकरू विद्यार्थी आहे, आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात भविष्य उज्वल करायचे असते मात्र त्यांना त्याबाबत ठराविक माहिती उपलब्ध नसते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आम्ही त्या होतकरू विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षेची पूर्वतयारी बाबत संपूर्ण माहिती देतो म्हणजे भविष्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी या निशुल्क मॉक टेस्ट चा लाभ घ्यावा यासाठी चंद्रपूर युवासेना प्रयत्नशील आहे. आयोजित पत्रकार परिषदेत विनय धोबे जिल्हा समन्वयक,सुमित अग्रवाल जिल्हा चिटणीस,चेतन बोबडे कॉलेज कक्ष लोकसभा संघटक, युती सेना उपजिल्हाधिकारी धनश्री हेडाऊ आदींची उपस्थिती होती. Medical entrance exam preparation free
“आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी मोफत मॉक टेस्ट – सामील व्हा!”
Chandrapur Babupeth ward problems : चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग हे समस्यांचे माहेरघर आहे, महानगर पालिकेला कित्येकदा निवेदनाद्वारे बाबूपेठ प्रभागातील समस्या निदर्शनास आणून देण्यात आल्या, मात्र पालिका प्रशासन समस्याकडे डोळेझाक करण्याचे काम करीत आहे,त्यामुळे बाबूपेठ मधील नागरिकांनी महानगर पालिकेच्या आयुक्तांची भेट घेऊन बाबूपेठ प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचला. Babupeth Chandrapur municipal corporation complaints
या समस्येत प्रामुख्याने बजरंग क्रीडा संकुल ला लागून असलेले माराई मंदिर परिसर, गोंड पुरातन मंदिर परिसरात सर्वत्र घाण पसरलेली आहे,त्याच परिसरात विहिरीची दैनावस्था, तसेच विहिरीला कठडे नसल्याने लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे,अमृत योजनेचे पाईप लाइन टाकण्याकरिता संपूर्ण रस्ते फोडलेले आहे,आणि नळाला पुरेसे पाणी सुद्धा येत नाही. Chandrapur municipal negligence Babupeth
रेल्वे उडान पुलाच्या खाली फुले चौक येथील रस्त्याचे अर्धवट काम केले आहे,दररोज अपघात होत असतो, मोकाट कुत्र्यामूळे लहान मोठयाना धोका निर्माण झालेला आहे.तसेच इतर समस्यांमुळे बाबूपेठ प्रभागातील नागरिक हैराण झालेले आहे,त्यामुळे वरील मूलभूत समस्या तात्काळ सोडवून बाबूपेठ प्रभागातील नागरिकाना न्याय द्यावा अशी आग्रही भूमिका घेऊन महानगर पालिका आयुक्त बिपीन पालिवाल यांना सामाजिक कार्यकर्ते चंदाताई वैरागडे, मुकेशभाऊ गाडगे, महेशभाऊ म्याकलवार, ज्ञानेश्वर नगराळे,उमंग हिवरे यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले.यावेळी संगीता देठे, वैशाली ऐसेकर, नीता चन्ने, कांचन बेरड, दामू मरस्कोल्हे, बाबू दंतुलवार,निखिल खनके उपस्थित होते.
Maharashtra sand policy update : राज्यात अद्याप ठोस वाळू धोरण तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाची विकासकामे ठप्प झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागासाठी काही रेती घाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर वाळूवर आधारित उद्योग आणि घरकुलांच्या बांधकामांसाठी स्वतंत्र घाट आरक्षित करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली. Free sand for housing projects
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्यात वाळू धोरण तयार न झाल्याने विकासकामे आणि नागरिकांवर होणाऱ्या परिणामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यातील अनेक महत्त्वाची सार्वजनिक विकासकामे व घरकुल प्रकल्प रखडले आहेत. रस्ते, पूल, इमारती यांसारख्या सार्वजनिक बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वाळू आवश्यक असते. मात्र, वाळूच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे ही कामे खोळंबली आहेत. परिणामी, नागरी सुविधांमध्ये दिरंगाई होत असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. Sand distribution policy
हाच मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला आहे. यावेळी ते म्हणाले की, वाळू धोरण तयार न झाल्याने रेतीवर आधारित असलेल्या अनेक उद्योगांना देखील मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम साहित्य पुरवठादार, काँक्रिट मिक्सिंग प्लांट, गट्टू कारखाने आणि इतर बांधकाम व्यवसाय वाळूच्या तुटवड्यामुळे अडचणीत आले आहेत. यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेले शेकडो कामगार बेरोजगार होण्याच्या संकटात आहेत.
घर बांधण्यासाठी वाळू ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, वाळू मिळत नसल्यामुळे अनेक घरकुल प्रकल्प रखडले आहेत. सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांमध्ये अर्ज केलेल्या नागरिकांना हक्काच्या घराची प्रतीक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले.
सरकारने लवकरात लवकर ठोस वाळू धोरण जाहीर करून या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना येत्या आठ दिवसांत वाळू धोरण जाहीर करणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
Chandrapur monsoon tourism safety : चंद्रपूर जिल्हातील अनेक पर्यटन स्थळी व धबधब्यांचे ठिकाणी विशेषतः मान्सुन कालावधीत मोठया प्रमाणात पर्यटक येत असतात. सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जिवीत व वित्तहानी होऊ नये, या करिता सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. तसेच याबाबत नागरिकांनी सुद्धा आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
1. जिल्हयातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, गड-किल्ले, जंगल या ठिकाणांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग, पुरातत्व विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था (शहरी/ग्रामीण) व इतर आवश्यक यंत्रणा, सोबत उपविभागीय अधिकारी यांनी समक्ष भेटी देऊन पाहणी करावी. धबधबे, तलाव, नदी, डोंगराच्या कड्यांवर असलेले प्रेक्षणीय पाईंटस या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करुन त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेखा आखावी. तेथे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून स्पष्ट सूचना असलेले फलक लावण्यात यावेत. Maharashtra waterfall safety guidelines
2. आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण, प्रेक्षणीय स्थळे ज्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य नाही अशा सर्व पर्यटन स्थळे डोंगरकडे, धबधबे, पाण्याची साठवण असलेले क्षेत्र, ओढे इत्यादी पर्यटकांसाठी बंद करावे.
3. पर्यटकांसाठी काय करावे आणि काय करु नये या बाबतचे सूचना फलक लावण्यात यावे. महसूल/नगरपालिका/रेल्वे/वन विभाग/सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील आपत्ती प्रवण जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीव रक्षक, लाईफ जॅकेटस्, लाईफ ब्वाईज, रेस्क्यू बोटी इत्यादी ठेवाव्यात. Chandrapur district tourist safety
4. गिर्यारोहण, जलपर्यटन इत्यादी ठिकाणी त्या त्या स्थानिक परिसरातील अशासकीय संस्था, गिर्यारोहक, जिल्हा प्रशासनव्दारा प्रशिक्षित आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवक इत्यादीची मदत घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी. त्या ठिकाणी प्रथोमपचार सुविधा असलेल्या अॅब्युलन्सची देखील व्यवस्था करावी. जेणेकरुन जिवीत हानी टाळता येऊ शकेल. उपविभागीय दंडाधिकारी हे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आहेत. त्यामुळे संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांना अशा प्रत्येक पर्यटनस्थळी, गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व आवश्यकता असल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत योग्य आदेश निर्गमित करावेत.
5. बहुतांशी पर्यटनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते व त्यामुळे वाहतूकीवर परिणाम होतो व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघाताची शक्यता असते. त्यामुळे राष्ट्रीय महमार्ग प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक इत्यादी बाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात. Monsoon safety for tourist places
6. पर्यटनाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या हॉटेल व्यवसायीक, टॅक्सी/रिक्षा चालक संघटना, गाईडस, स्वयंसेवी संस्था इत्यादी संस्थाना विश्वासात घेऊन स्थानिक पातळीवर करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करावा. या संघटनांच्या माध्यमातून देखील पर्यटकांना योग्य माहिती देणे सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे, वाहनांच्या कमीत कमी वापर, पाकींग इत्यादी बाबत सुचना द्यावेत.
7. पर्यटन हा जिल्हयाच्या विकासाचा एक महत्वाचा घटक आहे. जिल्हयामध्ये पर्यटन वाढीचा प्रयत्न करीत असतांना “सुरक्षित व जबाबदार पर्यटक” हे सूत्र अवलंबिणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी प्रामुख्याने प्रशासनाची आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये अनेक पर्यटनस्थळ जंगलामध्ये असुन मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटनासाठी तेथे जात असतात. वन विभागातील संबंधित अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असुरक्षित ठिकाणे पावसाळयामध्ये पर्यटनासाठी हवामान विभागाचे अतिवृष्टी इशारेप्रमाणे तात्पुरतो बंद करावीत. Monsoon safety for tourist places
जी ठिकाणे पर्यटनासाठी सुरु ठेवणेत येणार आहेत, त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सूचना फलक लावावेत. अतिक्रमणे काढून टाकावेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पर्यटनासाठी वेळ निश्चित करुन सूर्यास्तानंतर पर्यटक तेथे थांबणार नाहीत याबाबत उपाययोजना करावी. नियमांचे उल्लंघन करणा-या विरुध्द कायदेशीर कारवाई करावी. वर नमूद केलेल्या उपाययोजनांची सर्वसंबंधितांनी काटेकारपणे अंमलबजावणी करावी. या अंमलबजावणी मध्ये कोणत्याही निष्काळजीपणा झाल्यास संबंधित अधिकारी आणि विभाग प्रमुख हे जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमूद आहे.
Construction material distribution : महाराष्ट्र शासनातर्फे नोंदणीकृत मजुरांना सुरक्षा व आवश्यक साहित्य देण्यात येते. त्या साहित्याचे वितरण एमआयडीसी येथून होत आहे. परंतु, पोर्टल च्या तांत्रिक अडचणींमुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून बांधकाम साहित्याचे वितरण बंद आहे. अनेक बांधकाम मजुर जिल्हाभरातून साहित्य घेण्याकरीता रोजगार सोडून एमआयडीसी येथे उपस्थित झाले. परंतु पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे बंद (Labor portal technical problem)असल्याचे कारण सांगुन मजुरांना माघारी जावे लागले.
या संदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सहायक आयुक्ताशी चर्चा करुन जिल्हास्तरावरुन बांधकाम साहित्याचे वितरण न करता तालुकास्तरावर बांधकाम साहित्याचे वितरण करण्यासंदर्भात सहाय्यक कामगार आयुक्तांना सूचना दिल्या.
कामगार विभागाच्या माध्यमातून मजुरांना वितरीत करण्यात येणारे साहित्य घेऊन जाण्याकरीता जिल्हातून महिला व पुरुष मजुर मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले. काही मजुरांनी सदर साहित्य घेण्याकरीता दोन ते तीन दिवसांपासून एमआयडीसी (MIDC distribution issues)येथील साहित्य वितरण परिसरात तळ ठोकून बसले आहे. परंतु, पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे मजुरांचा भ्रमनिरास झाला.
या संदर्भात खासदार धानोरकर यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना पत्र पाठवून तसेच, त्यांच्याशी चर्चा करुन जिल्हातून कुठलाही कामगार साहित्य घेण्याकरीता चंद्रपूर ला येऊ नये. तसेच, बांधकाम साहित्याचे वाटप तालुकास्तरावरुन करावे अशा सुचना दिल्या. तसेच पोर्टल मध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यास मजुरांना त्रास होऊ नये या करीता मोबाईल वर संदेश पाठवावा अशा देखील सुचना खासदार धानोरकर (MP Pratibha Dhanorkar) यांनी केल्या. या संदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सहाय्यक कामगार आयुक्त श्री. धुर्वे यांनी सांगितले.