Tag: News34 chandrapur

  • Ganesh visarjan chandrapur preparations । चंद्रपुरातील गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका सज्ज

    Ganesh visarjan chandrapur preparations

    Ganesh visarjan chandrapur preparations चंद्रपूर 03 सप्टेंबर – शहरात 06 सप्टेंबर अनंत चतुर्दशी रोजी होणारा श्रीगणेश विसर्जन सोहळा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेचे 100 हुन अधिकारी कर्मचारी आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात कार्यरत आहेत. विसर्जनाच्या दिवशी गर्दी नियंत्रणाच्या दृष्टीने प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट,जिल्हा परिषदेच्या एका बाजुस विसर्जनाच्या दिवशी दुकाने लावण्यास प्रशासनद्वारे मनाई करण्यात आली आहे.  

    दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा, अखेर बल्लारपूर पोलिसांनी केली अटक

        विसर्जन स्थळाची आयुक्त विपीन पालीवाल यांनी पाहणी केली व सर्व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रशासनाद्वारे विसर्जन सुरळीत होण्याच्या दृष्टीने शहरातील विसर्जन मार्गावरील पावसामुळे निर्माण झालेले खड्डे भरून काढण्यात येत आहेत. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग तसेच वाहतुक व्यवस्थेची माहिती नागरीकांपर्यंत पोहचविली जात आहे. मिरवणुकी दरम्यान अनुचित घटना घडु नये याकरीता विसर्जन मार्गांवर विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. Ganesh festival immersion preparations

    मनपा सज्ज

        विद्युत विभागामार्फत सर्व कृत्रिम तलाव, जटपुरा गेट, मुख्य मार्ग, विसर्जन मार्ग, विसर्जन स्थळ तसेच संपूर्ण शहरात आवश्यक त्या ठिकाणी पुरेशी लाईट व्यवस्था तसेच जनरेटरची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागामार्फत आरोग्य पथकाच्या चमु वैद्यकीय सेवा देण्यास पूर्ण वेळ विसर्जनस्थळी राहणार असुन गांधी चौक, जटपुरा गेट व दाताळा रोडवरील मुख्य विसर्जन स्थळी अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात येत आहे.

    जटपुरा गेट येथे गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप व स्टेज उभारणी करण्यात येणार आहे. यांत्रिकी विभागामार्फत वाहन व्यवस्था सांभाळण्यात येत असुन विसर्जन स्थळी लागणारे पिण्याचे पाणी, फिरते शौचालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे. Ganesh immersion security measures

    निर्माल्य कलश व कुंडात 4481 घरघुती मुर्तींचे विसर्जन

      अग्निशमन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन चमु पुर्ण वेळ तैनात राहणार असुन मोठे सर्च लाईट, फिरे अँड रेस्क्यु व्हेइकल, पावर बोट,लाईफ जॅकेट लाईफ सेव्हींग ट्युब्ज , क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात 25 कृत्रिम कुंड व 25 निर्माल्य कलश उभारण्यात आले असुन 4481 घरघुती मुर्तींचे विसर्जन त्यात केले गेले आहे. मनपाद्वारे केल्या गेलेल्या जनजागृतीने यावर्षीसुद्धा एकही पीओपी मुर्तीचा वापर नागरिकांनी केला नाही.

         स्वच्छता विभागाद्वारे रस्त्यांची नियमित सफाई करण्यात येत असुन रस्त्यावर व विसर्जन स्थळी कचरा जमा राहु नये यादृष्टीने घनकचरा संकलनाचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रीम तलावातुन निघणारे पाणी,निर्माल्य यांचे पावित्र्य राखून कम्पोस्टिंगसाठी पाठविले जाते तसेच माती ही बगिच्यात वापरण्यात येईल अथवा मुर्तीकारांना वाटप करण्यात येते. ईरई नदी या मुख्य विसर्जन स्थळाची स्वच्छता दररोज केली जात आहे. विसर्जनानंतर त्याच रात्री सर्व रस्ते स्वच्छ करून सकाळी सर्वांना स्वच्छ रस्त्याचा वापर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनी मिळतो.  

    ganesh festival immersion

      गणेशोत्सवात गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या या मनपाने सुरु केलेल्या एक खिडकी योजनेद्वारे देण्यात आल्या होत्या. विसर्जन स्थळी गर्दी होऊ नये व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणुन बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावणाऱ्यांनी मनपाची परवानगी घेऊनच स्टॉल लावावा लागणार असुन त्यांना व्यवस्थेकरिता स्वयंसेवक आणि स्टॉल जवळ पुरेसे डस्टबिन ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. Ganesh idol immersion CCTV monitoring Chandrapur

    त्याचप्रमाणे शहरातील घरगुती मूर्तींचे विसर्जन पूर्णपणे घरी अथवा कृत्रिम कुंडातच केले जाणार असुन इरई नदीजवळील विसर्जन कुंडात केवळ मोठ्या सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन करणाऱ्यांनाच परवानगी असल्याचे मनपाद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे.गणेशोत्सव प्रसंगी महानगरपालिकेद्वारे ही सर्व कार्ये दरवर्षी पार पाडली जातात. यावर्षीसुद्धा श्री गणेशोत्सव हा शांततेत व आनंदात पार पाडण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.


     

     


       
       

  • revenge killing after prison release |दीड वर्ष पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला अटक, बल्लारपूर पोलिसांची शिताफी

    revenge killing after prison release

    revenge killing after prison release : बल्लारपूर ३ सप्टेंबर २०२५ – पोलिसात तक्रार करीत कारागृहात पाठविले म्हणून १९ वर्षीय मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला बल्लारपूर पोलिसांनी दीड वर्षांनी अटक केली आहे. घटना घडल्यापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र पोलिसांनी हार न मानता आरोपीला अटक केली.

    अवैध मोबाईल टॉवर विरोधात शिवसेनेच्या आंदोलनाला यश

    वर्ष २०२१ रोजी १९ वर्षीय अनामिका उर्फ रक्षा भालचंद्र कांबळे च्या तक्रारीवरून २९ वर्षीय सिनु उर्फ आकाश लक्ष्मण दहागावकर राहणार महाराणा प्रताप वार्ड बल्लारपूर याला अटक करीत पोलिसांनी कारागृहात पाठविले होते. वर्ष २०२४ मध्ये कारागृहातून बाहेर आल्यावर सिनु च्या मनात अनामिका बाबत राग होता, त्याने त्याचा बदला घेण्याचे ठरवीत, सिनु ने अनामिकाला आपल्या घरी बोलावीत तिच्या डोक्यावर अवजड वस्तूने प्रहार करीत तिची हत्या करीत घटनास्थळावरुन पसार झाला होता.

    बल्लारपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीचा शोध घेतला मात्र सिनु पोलिसांच्या हाती लागला नाही, घटनेपासून आजपर्यंत आरोपी विविध राज्यात ठिकाण बदलवित लपून राहत होता, आरोपी वारंवार पोलिसांना गुंगारा देत असल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करणे बंद केले नव्हते. arrest of accused in revenge killing after prison release

    नातेवाईकाकडे आला आणि अडकला

    बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून बिपीन इंगळे यांनी पदभार स्विकारत, अनामिका कांबळे हत्याकांडातील आरोपीला तात्काळ अटक व्हावी यासाठी सूचना व मार्गदर्शन केले. वर्ष २०२४ मध्ये पसार झालेल्या सिनु च्या अटकेचा दिवस २०२५ मध्ये उजाडला. आरोपी हा तेलंगणा मधील आपल्या नातेवाईकाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली, सापळा रचत अत्यंत शिताफीने पोलिसांनी आरोपी सिनु ला अटक करीत त्याला न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने ८ सप्टेंबर पर्यंत आरोपीची पोलीस कोठडी मंजूर केली. police track down fugitive after years on the run

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक बल्लारपूर बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात सपोनि मदन दिवटे, सपोनी शब्बीर खान पठाण, पोलीस कर्मचारी रणविजय ठाकूर, आनंद परचाके, संतोष पंडित, सुनील कामटकर, पुरुषोत्तम चिकाटे, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, भास्कर चिंचवलकर, सचिन अल्लेवार, शरदचंद्र कारुष, खंडेराव माने, सचिन राठोड, मिलिंद आत्राम, लखन चव्हाण व शालिनी नैताम यांनी केली.

  • farmer death due to fallen power line । कोरपना तालुक्यात दुःखद घटना, वीज खांबाचे तार तुटून शेतकऱ्याचा मृत्यू

    farmer death due to fallen power line

    farmer death due to fallen power line : कोरपना ३ सप्टेंबर २०२५ – विद्युत खांबाचे तार तुटून शेताच्या तार कुंपणावर पडल्याने विद्युत करंट लागून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची घटना कोरपना तालुक्यातील रायपूर येथील शेत शिवारात मंगळवार दिनांक २ रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.

    पेंडाल वरून चंद्रपुरात वाद, मुनगंटीवार-जोरगेवार समर्थक आमनेसामने

    तुकाराम रामचंद्र आत्राम (५५) रा. रायपूर असे मृतकाचे तर गीता अनिल आत्राम (४७) , प्रकाश रामचंद्र आत्राम (४५) , अशोक आत्राम (४७) रा. रायपूर अशी जखमींची नावे आहे. सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने विद्युत खांबाच्या विद्युत तारा शेताच्या तार कंपाउंड वर तुटून पडल्या होत्या.

    कामासाठी शेतात गेले आणि..

    सकाळी शेतात शेतकामासाठी गेले असता स्पर्श झाल्याने तुकाराम यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघा जखमींना बांबूच्या साह्याने जवळ असलेल्या नागरिकांनी विद्युत ताराच्या अलग केले. त्यामुळे सुदैवाने त्यांचे प्राण वाचवले. याबाबतची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच मृतदेह उर्वरत तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे पाठवण्यात आला. rural power line accident farmer killed

    जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन,नैताम , पोलीस कर्मचारी राठोड , आडे , नामदेव पवार करीत आहे. यावेळी मृतकाच्या परिवारांना खासदार प्रतिभा धानोरकर , माजी आमदार सुभाष धोटे , माजी आमदार वामनराव चटप यांनी भेट कुटुंबीयाचे सात्वन केले.

  • chota matka health update । Chota Matka Health Update: आरोग्यात मोठी सुधारणा, उपचार सुरूच

    chota matka health update

    chota matka health update : चंद्रपूर ३ सप्टेंबर २०२५ : १३ मे रोजी वाघ T-158 सोबत झालेल्या संघर्षात गंभीर जखमी झालेल्या T-126 या अंदाजे १० वर्षीय वाघाला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (TTC) मध्ये हलवण्यात आले आहे. या झटापटीत T-158 वाघ मृत्युमुखी पडला होता.

    चंद्रपूर भाजपात पेंडाल वाद, अनंतचतुर्दशीला भाजपचे २ पेंडाल

    या घटनेनंतर, T-126 हा वाघ वारंवार मानवी वस्तीच्या जवळ दिसू लागला, ज्यामुळे त्याच्या आणि स्थानिक गावकऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वन विभागाने २७ ऑगस्ट रोजी बफर क्षेत्रातील खडसंगी परिक्षेत्रातून त्याला पकडून जेरबंद केले.

    छोटा मटका वाघाच्या हाडाला फ्रॅक्चर

    TTC येथे दाखल केल्यानंतर, वाघाच्या आरोग्याची सखोल तपासणी करण्यात आली. यामध्ये पॅथॉलॉजिकल, हिस्टॉलॉजिकल, आणि रेडिओलॉजिकल चाचण्यांचा समावेश होता. या तपासण्यांमध्ये कोणताही संसर्ग, पू किंवा फोड आढळले नाहीत. मात्र, एक्स-रे अहवालानुसार, त्याच्या डाव्या पुढील पायाच्या मनगटापासून कोपरापर्यंतच्या लांब हाडाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्या सुळ्यांनाही दुखापत झाली आहे. Chandrapur TTC tiger fracture rehabilitation case

    वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकांच्या मते, या गंभीर दुखापतीमुळे T-126 ला तात्काळ जंगलात सोडणे शक्य नाही. त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी दीर्घकालीन उपचार आणि पुनर्वसनाची आवश्यकता आहे. सध्या, टीटीसी, चंद्रपूर येथे पशुवैद्यकांची टीम त्याच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याच्या उपचारासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे.

  • MNS expansion in Chandrapur slum area । जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे एकमेव पर्याय, अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा धडाका

    MNS expansion in Chandrapur slum area

    MNS expansion in Chandrapur slum area : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ :- जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखूरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवीत आहे, दरम्यान चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथे विकास कामे झाली नसल्याने दुर्लक्षित या परिसरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे हा एकमेव राजकीय पक्ष कामं करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे कामं करतील हा विश्वास ठेऊन काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला.

    नागरिकांनो सतर्क रहा, इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

    कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचं नेतृत्व

    या वार्डातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवक व महिलांचा मनसेत पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, महिला सेना अध्यक्षा वर्षा बोंभले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते. MNS Expansion Chandrapur

    येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाश नगर येथे मनसेची शाखा धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आली, यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवासी यांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश घेतला,

    mns chandrapur

    यावेळी मनसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यामध्ये शाखाध्यक्ष साहिल खान, शाखा संघटक ज्ञानेश्वर बांसोड़, सचिव सिद्धार्थ नायक, उपाध्यक्ष भीमराव वनकर, कोषाध्यक्ष सुरेश सिंहठाकुर, सदस्य अंकित मालाकार कन्हैया, आकाश मालाकार, छाया ठाकुर, राजश्री सिद्धार्थ नायक, तृप्ति भीमराव, सरोज यादव, देव कुमार, सोहेल शेख, आसिफ शेख, फैजान शेख, ईरफान शेख, अशफाक खान इत्यादीनी महाराष्ट्र सैनिक म्हणून पदभार स्वीकारला.

  • Erai dam gates opened alert villages Chandrapur । मुसळधार पावसाने चंद्रपूर जिल्हा बेहाल, अनेक मार्ग बंद

    Erai dam gates opened alert villages Chandrapur

    Erai dam gates opened alert villages Chandrapur : चंद्रपूर (२ सप्टेंबर २०२५) – मागील २४ तासात चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे, जिल्ह्यातील अनेक मार्ग पावसामुळे बंद करण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण सरासरी ५० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. इरई धरणाचे सातही दरवाजे उघडल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    राजुरा विधानसभा क्षेत्रातील बोगस मतदार व ६१ लाख रुपयांचा वाली कोण?

    १ सप्टेंबर रोजी सायंकाळपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, या पावसामुळे इरई धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने २ सप्टेंबर ला सकाळी ७ वाजता धरणाचे ३ दरवाजे १ मीटर ने तर ४ दरवाजे ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहे.

    इरई धरणाचे दरवाजे उघडल्याने या गावांना सतर्कतेचा इशारा

    पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर इरई नदीच्या काठावर राहणाऱ्या सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. असे आवाहन चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    अनेक मार्ग बंद, प्रशासनाची बचाव मोहीम

    कारवा-बल्लारपूर रोड वरील नाल्याला आलेल्या पुरामुळे १२ नागरिक अडकले होते, याबाबत बल्लारपूर प्रशासनाला माहिती मिळताच रात्री १२ वाजता तहसील कार्यालय बल्लारपूर मध्ये उपलब्ध असलेले बचाव साहित्य सोबत घेत कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूपपणे कारवा मधील सोमाजी नाईक आश्रम शाळा मध्ये थांबण्याची व्यवस्था केली त्यांनतर तहसील कार्यालयाच्या वाहनाने नागरिकांना बल्लारपूर मध्ये पोहचविण्यात आले. Chandrapur heavy rain rescue operation update

    road close

    मार्ग बंद

    चंद्रपूर, धानोरा ते भोयेगाव मार्गावरील पुलावर पाणी आल्याने सदर मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे, मूल तालुका – फिस्कुटी ते चिचाळा नदी पुलावरून पाणी जात असल्याने सदर मार्ग बंद, चिरोली केळझर मार्ग बंद, चिंचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी असल्यामुळे काटवन ते मूल मार्ग बंद, काटवन ते मुल येण्याकरिता मारोडा हा पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंब करावा. वरोरा तालुका – कोसरसार ते बोडखा रस्ता बंद, अर्जुनी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चारगाव ते खुर्द अर्जुनी मार्ग बंद, मौजा सुर्ला ते जामगाव बु मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद. भद्रावती तालुका – मौजा गुंजाला नाल्यावर पाणी जास्त वाढलेले असून नाल्या शेजारील काही घरात पाणी शिरलेलं आहे, मौजा गुंजाला कचराळा वाहतूक रस्ता बंद. Chandrapur musaldhaar rain impact villages

    flood alert

    कोरपना तालुका – इरई भारोसा मार्ग बंद, भोयेगाव धानोरा मार्ग पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद करण्यात आला आहे. बल्लारपूर तालुका – पळसगाव-कवडजी मार्गावरील रंगीत यांच्या शेताजवळील पूल तीन फूट उंच पाण्याने डुबून असल्याने रहदारी बंद करण्यात आली आहे. इरई नदीवरील पुलावर पाणी आल्यामुळे मौजा चारवट माना चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. काटवली ते बामणी मार्ग बंद.

  • Ashram school administrative mismanagement । शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

    Ashram school administrative mismanagement

    Ashram school administrative mismanagement : चंद्रपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा “समस्या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमाअंतर्गत संघटनेचे प्रांतीय सरकार्यवाह तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विजाभज आश्रमशाळा शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची समस्या निवारण सभा दि. २९ ऑगष्ट २०२५ रोजी डॉ. सचिन मडावी‚ सहा. संचालक चंद्रपूर यांचे कार्यालयात पार पडली. सभेदरम्यान या कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळून आल्यामुळे आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

    स्व. वसंतराव नाईक प्राथ. आश्रमशाळा दमपुर मौदा शाळेतील गैरकारभार-

    आश्रमशाळा दमपुर मोहदा ता. जिवती शाळेतील निवृत्त कर्मचारी सरूबाई राठोड यांचे सेवाकालावधीत संस्थेने आयुष्यभर आर्थिक व मानसिक शोषण केले. निवृत्त होऊन दीड वर्ष झाले, तरी त्यांचा पेन्शन प्रस्ताव टाकला नाही. महत्वाची बाब म्हणजे या शाळेला मागील तीन वर्षापासून नियमित किंवा प्रभारी मुख्याध्यापकच नाही. शाळेत पुर्णपणे अनागोंदी कारभार सुरू आहे. प्रत्यक्ष हजर राहून सरूबाईंनी ही माहिती दिली. आमदार सुधाकर अडबाले यांनी या गलथान कारभारासाठी संस्थाचालकांसह अधिकार्‍यांना दोषी ठरवून झालेल्या अनियमिततेबाबत शासनाकडे तक्रार करून शाळेवर प्रशासक लावण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. Salary delays in tribal schools

    समायोजन प्रक्रियेतील अनियमितता-

    जिल्ह्यातील समायोजन प्रक्रियेत फार मोठा घोळ असून १८ अतिरिक्त शिक्षकांपैकी ५ शिक्षक हे समायोजित शाळेत रुजू झालेच नाही तर २ शिक्षकांना संस्थांनी रुजू करून घेतले नाही. शासन परिपत्रक दिनांक ८ मार्च २०१८ नुसार समायोजित शिक्षकांनी १५ दिवसात समायोजित शाळेत रुजू न झाल्यास सेवेतील हक्क संपुष्टात येतो. ३ महीने कालावधी झाला तरी हे शिक्षक रुजू झाले नाही. मात्र, या शिक्षकांवर कोणतीही कारवाई न करता अधिकार्‍यांनी त्यांना पाठीशी घातले असून त्यांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे.

    शिक्षक रुजू न झाल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे व शासनास या अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आदेशाचे पालन न करणार्‍या शिक्षकांना तात्काळ समायोजित शाळेत रुजू होण्याच्या सूचना आमदार महोदयांनी केल्या असून जिल्ह्यात कोणतीही अनियमितता खपवून घेणार नाही, असे खडे बोल आमदार सुधाकर अडबाले यांनी सहा. संचालकांना सुनावले. Vidarbha tribal ashram school pension backlog

    अम्मा कि पढाई उपक्रम पुन्हा सुरु

    आरक्षित जागेवर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन-

    रविंद्र ठमके या शिक्षकाचे २०२३ मध्ये आरक्षित जागेवर केलेल्या कायम समायोजनामुळे आरक्षण कायदा २००४ कलम ४ चे उल्लंघन झाले असून हा नियमाप्रमाणे दंडनीय अपराध आहे. हे नियमबाह्य समायोजन रद्द करण्याचा आदेश प्रधान सचिवांनी दिनांक २०/०८/२०२४ ला दिला असून आजतागायत यावर कार्यवाही झाली नाही, त्यामुळे आमदारांनी सहा. संचालकांना धारेवर धरले असून हे नियमबाह्य समायोजन चोवीस तासात रद्द करण्याचे आश्वासन सहा. संचालकांनी सभेत दिले. Compassionate appointment guideline

    या व्यतिरिक्त विभागाचा शासननिर्णय दिनांक ४ जून २०२५ नुसार विजाभज आश्रमशाळेतील पात्र शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एकस्तर पदोन्नती लाभ व प्रोत्साहन भत्ता प्रलंबित थकबाकी तात्काळ अदा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करून अकारण वेतनवाढ गोठवणार्‍या संस्था/मुख्याध्यापकांवर कारवाई अग्रेसित करणे, जिल्ह्याबाहेर झालेले प्राथमिक शिक्षकांचे समायोजन रद्द करून शासन परिपत्रकानुसार जिल्ह्यातच इयत्ता ६ ते ८ वी मध्ये रिक्त जागांवर करणे, प्रलंबित भ.नि.नि. / डिसीपीएस हिशोबचिठ्या तात्काळ वितरित करणे, कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती, वरिष्ठ/निवड श्रेणी, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव, अनुकंपा व निवृत्ती वेतन प्रस्ताव सेवा हमी कायद्यानुसार ४५ दिवसाच्या आत मार्गी लावणे, जिल्ह्यातील सर्व कर्मचार्‍यांची सेवापुस्तस्के अद्ययावत करून पडताळणी करून घेणे, माहे जुलै २०२४ पासून प्रलंबित १% घरभाडे भत्ता फरक तात्काळ अदा करणे, या प्रमुख मागण्यांसह अनेक विषयांवर चर्चा झाली.

    सदर समस्या निवारण सभेकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे आश्रमशाळा विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिनेश चौधरी, कार्यवाह किशोर नगराळे, वि.मा.शि. संघाचे जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष दिगंबर कुरेकर, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, संघटनेचे पदाधिकारी श्रीहरी शेंडे, केशव ठाकरे, डॉ. विजय हेलवटे, पद्माकर वनकर, राज्यपाल बोरकर, वसंत कोंडेकर इतर आश्रमशाळा पदाधिकारी व समस्याग्रस्त शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. Ashram school administrative mismanagement

  • corruption in ration shop Pombhurna । गरीबांच्या अन्नावर डाका – पोंभुर्णा धान्य घोटाळा प्रकरणात युवासेनेची कारवाईची मागणी

    corruption in ration shop Pombhurna

    corruption in ration shop Pombhurna : पोंभुर्णा – पोंभुर्णा शहर व तालुक्यातील शासनमान्य धान्य दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात धान्याचा काळाबाजार सुरू असून, सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य सर्रासपणे खासगी व्यापाऱ्यांना व ट्रकमधून बाहेर जिल्ह्यात विकले जात असल्याची गंभीर तक्रार युवा सेना शहरप्रमुख महेश प्रकाश श्रीगिरीवार यांनी पोंभूर्णा तहसीलदार यांचेकडे केली आहे.

    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची चंद्रपुरात पडताळणी सुरु

    सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे स्वस्त धान्य गरीब व गरजू जनते च्या घरी न पोहोचता दलाल व व्यापाऱ्यांच्या खिशात जात असल्याने हजारो कुटुंबे स्वस्त धान्यापासून वंचित राहत आहेत. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला हा उघडपणे लुटण्याचा प्रकार ठरत असून, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पोंभूर्णा युवा सेनेकडून करण्यात आला आहे. black marketing of subsidised food grain

    महत्वाच्या मागण्या :-

    • १) धान्य घोटाळ्यातील सर्व संबंधित दोषी दुकानदार, लाभार्थी व व्यापाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी.
      २) गोडावून व दुकानांची चौकशी करून साठवलेले धान्य तात्काळ जप्त करावे.
      ३) धान्य वाहून नेणारे ट्रक व इतर वाहनांवर कारवाई करून त्यातील माल जप्त करावा.
      ४) हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.

    युवा सेनेचा इशारा :-

    जर ७ दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस कारवाई केली नाही, तर युवा सेना पोंभुर्णा तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. ” गरीब आणि सामान्य जनतेच्या हक्काचे धान्य लुटणाऱ्या भ्रष्ट यंत्रणेचा आम्ही कडाडून विरोध करू. पोटभर अन्न मिळावे हा जनतेचा हक्क असून, त्या हक्कासाठी युवा सेना रस्त्यावर लढा देईल.” yuvasena ubt

    निवेदन देतांना युवासेना शहरप्रमुख महेश श्रीगिरीवार यांचेसोबत कृषभ बुरांडे, सुरज कावळे व युवासेना कार्यकर्ते उपस्थित होते.

  • dengue household inspection results । मनपाची डेंग्यू तपासणी मोहीम, चंद्रपुरात किती घरे डेंग्यूने दूषित? जाणून घ्या

    dengue household inspection results

    dengue household inspection results : चंद्रपूर 29 ऑगस्ट २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली,पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे.

     मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार रुग्णांचा दैनंदिन अहवाल मनपाकडे पाठविला जात असुन,त्यानुसार जुलै महिन्यापासुन शहरात आतापर्यंत टायफाईडचे 12,चिकनगुनियाचे 2 तर डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत.मागील काही वर्षांच्या तुलनेत कीटकजन्य आजार रुग्णांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट असुन हे सर्व रुग्ण आता रोगमुक्त आहेत.  

    गडचिरोली मधील लड्डू दत्तक संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी

     कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे. dengue cases drop after intensified inspection drive

     पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.  

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.

  • hair patch service । टक्कल पडलं, हेअर पॅच लावताय? थांबा आधी माहिती जाणून घ्या

    hair patch service

    hair patch service (29 ऑगस्ट 2025) मराठी पोस्ट – आजकाल, केसांची समस्या, विशेषतः टक्कल पडणे ही अनेक लोकांसाठी एक मोठी चिंता बनली आहे. या समस्येवर विविध उपचार उपलब्ध असले, तरी हेअर पॅच हा एक लोकप्रिय आणि त्वरित उपाय म्हणून समोर आला आहे. परंतु, हेअर पॅच म्हणजे नेमके काय, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत, आणि तो कोणासाठी योग्य आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

    गृहकर्ज हवं? पण घायचं कसं? जाणून घ्या सोपी पद्धत

    हेअर पॅच म्हणजे काय?

    हेअर पॅच किंवा नॉन-सर्जिकल हेअर रिप्लेसमेंट म्हणजे डोक्याच्या ज्या भागावर केस नाहीत, तिथे नैसर्गिक किंवा कृत्रिम केसांची एक पातळ जाळी (mesh) चिकटवली जाते. ही जाळी खास डिझाइन केलेली असते आणि ती त्वचेला कोणताही त्रास होणार नाही अशा खास ॲडहेसिव्ह (adhesive) किंवा क्लिप्सचा वापर करून बसवली जाते. हे पॅच केसांच्या नैसर्गिक रंगाशी आणि संरचनेशी जुळणारे असतात, ज्यामुळे ते ओळखणे कठीण होते. best hair patch for sudden baldness solution


    हेअर पॅच कसे तयार होतात?

    हेअर पॅच मुख्यत्वे दोन प्रकारच्या केसांपासून तयार होतात:

    1. मानवी केस (Human Hair): हे पॅच दान केलेल्या मानवी केसांपासून बनवलेले असतात. हे केस अनेकदा भारतातील तिरुपतीसारख्या मंदिरांमधून किंवा इतर देशांमधून मिळवले जातात. या केसांची गुणवत्ता खूप चांगली असते आणि ते नैसर्गिक केसांसारखेच दिसतात. या केसांना स्वच्छ करून, प्रक्रिया करून आणि रंगाच्या शेड्समध्ये विभागून पॅचसाठी तयार केले जाते. नैसर्गिक केसांचे पॅच वापरकर्त्याच्या मूळ केसांशी उत्तम प्रकारे जुळतात आणि त्यामुळे ते सहज ओळखता येत नाहीत. non-surgical hair loss solution
    2. सिंथेटिक फायबर (Synthetic Fiber): हे कृत्रिम केस पॉलीमर किंवा प्लास्टिकसारख्या पदार्थांपासून बनवलेले असतात. हे सिंथेटिक फायबर वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि पोतांमध्ये उपलब्ध असतात, ज्यामुळे ते नैसर्गिक केसांसारखे दिसतील. मात्र, नैसर्गिक केसांच्या तुलनेत यांचा पोत थोडा वेगळा असतो. सिंथेटिक केसांचे पॅच तुलनेने स्वस्त असतात आणि ते विविध रंगांमध्ये सहज उपलब्ध होतात.

    हेअर पॅच तयार करताना, निवडलेले केस अतिशय पातळ आणि हलक्या जाळीवर (mesh base) हाताने किंवा मशीनच्या मदतीने एक-एक करून बसवले जातात. ही जाळी अशा प्रकारे डिझाइन केलेली असते की ती डोक्यावर नैसर्गिकरित्या बसते आणि हवेला आत येऊ देते, ज्यामुळे त्वचेला श्वास घेता येतो. temporary hair patch vs permanent transplant


    हेअर पॅचचे फायदे

    1. झटपट परिणाम: हेअर पॅच लावल्यावर लगेचच टक्कल झाकले जाते आणि व्यक्तीला केसांनी भरलेले डोके मिळते. यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरज नसते.
    2. वेळेची बचत: हेअर ट्रान्सप्लांटसारख्या उपायांसाठी बराच वेळ लागतो, तर हेअर पॅचसाठी फक्त काही तास लागतात.
    3. कमी खर्चिक: हेअर ट्रान्सप्लांटच्या तुलनेत हेअर पॅचचा खर्च खूपच कमी असतो.
    4. नॉन-सर्जिकल प्रक्रिया: यात कोणतीही शस्त्रक्रिया, वेदना किंवा गुंतागुंत नसते. ही एक सुरक्षित आणि सोपी प्रक्रिया आहे.
    5. देखरेख आणि शैली: हेअर पॅचला नैसर्गिक केसांप्रमाणेच धुता येते, कंघी करता येते आणि विविध हेअरस्टाईलमध्ये सेट करता येते.

    हेअर पॅचचे तोटे आणि आव्हाने

    1. नियमित देखरेख: हेअर पॅचला नियमितपणे स्वच्छ आणि मेन्टेन करणे आवश्यक असते. यात पॅच काढणे, साफ करणे आणि पुन्हा लावणे इत्यादी गोष्टी येतात.
    2. अस्थिर उपाय: हा एक कायमस्वरूपी उपाय नाही. पॅचचा वापर काही महिन्यांसाठी किंवा वर्षांसाठीच असतो. त्यानंतर तो बदलावा लागतो.
    3. संभाव्य ॲलर्जी: काही लोकांना पॅच चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोंदामुळे त्वचेवर ॲलर्जी किंवा खाज येऊ शकते.
    4. अनैसर्गिक वाटू शकते: उच्च दर्जाचे पॅच नैसर्गिक वाटत असले, तरी काही वेळा ते अयोग्यरित्या बसवल्यास किंवा वापरल्यास अनैसर्गिक दिसू शकतात.
    5. जीवनशैलीवर परिणाम: हेअर पॅच लावल्यावर पोहणे, व्यायाम करणे किंवा इतर शारीरिक हालचाली करताना काळजी घ्यावी लागते. hair patch service

    हेअर पॅच कोणासाठी योग्य आहे?

    हेअर पॅच खालील व्यक्तींसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो:

    • ज्यांच्या डोक्यावर टक्कल पडले आहे, पण हेअर ट्रान्सप्लांट करण्यासाठी पुरेसे केस नाहीत.
    • ज्या लोकांना शस्त्रक्रियेची भीती आहे किंवा ज्यांच्यासाठी शस्त्रक्रिया शक्य नाही.
    • ज्या लोकांना त्वरित आणि तात्काळ परिणाम हवा आहे.
    • जे लोक कमी खर्चात केस वाढवण्याचा पर्याय शोधत आहेत.

    निष्कर्ष

    हेअर पॅच हा केसांच्या समस्येवर एक चांगला आणि व्यावहारिक उपाय आहे. तो त्वरित परिणाम देतो आणि शस्त्रक्रियेची गरज टाळतो. तथापि, हा एक तात्पुरता उपाय आहे आणि त्याला नियमित देखभालीची आवश्यकता असते. हेअर पॅच घेण्यापूर्वी, त्याच्याशी संबंधित सर्व फायदे आणि तोटे काळजीपूर्वक विचारात घेणे आणि एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. योग्य काळजी घेतल्यास, हेअर पॅच तुमच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो.