Tag: News34 chandrapur

  • Chandrapur National Lok Adalat case settlements । 📌 चंद्रपूर जिल्हा न्यायालयात १०६७ प्रकरणांचा निपटारा – लोकअदालतीचा यशस्वी उपक्रम

    Chandrapur National Lok Adalat case settlements

    Chandrapur National Lok Adalat case settlements : चंद्रपूर, दि. १३ सप्टेंबर २०२५ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आज दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.

    दुकानात शिरला ट्र्क एक ठार

    या लोकअदालती चे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.

    १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली

    लोकअदालतीत एकूण ९५३७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व १५६६२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५५ प्रलंबित व २१२ दाखलपूर्व अशी एकूण १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.

    १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल

    यामध्ये मोटार अपघात दाव्यांची २८ प्रकरणे निकाली काढून २ कोटी ५१ लक्ष ४५ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमधून १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल करण्यात आले. धनादेश अनादरित झालेल्या ६६ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला, तर कामगार व औद्योगिक न्यायालयातील १ प्रकरण निकाली निघाले.

    lok adalat chandrapur

    या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले, अशी माहिती  एस. एस. इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी दिली.

  • Blacklist the contractor । फक्त दोन वर्षांत पूल खचला, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका – मनसेची मागणी

    Blacklist the contractor

    Blacklist the contractor : चंद्रपूर १२ सप्टेंबर २०२५ :- दोन वर्षांपूर्वी बनलेला लहान पूल यंदाच्या पावसाळ्यात अक्षरशः वाहून गेला, विशेष म्हणजे पुलाची होत असलेली दुर्दशा बाबत मनसे तर्फे पियुष धुपे यांनी मनपाला त्याबाबत निवेदन दिले होते, मात्र कारवाई झाली नाही आणि पूल पावसात वाहून गेला, पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाका अशी मागणी करण्यात आली आहे.

    अपघातग्रस्तांना आमदार मुनगंटीवार यांची तातडीची मदत

    शहरातील हनुमान खिडकी मार्गे भिवापूर कडे जाणाऱ्या झरपट नदीवर मागील दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता, मात्र अगदी दोन वर्षातच त्या पुलाला भेगा पडायला लागल्या व या पावसाळ्यात तर त्या भेगा आणखी वाढल्या, दरम्यान हा पूल धोकादायक झाला असल्याने मनपा आयुक्ताकडे मनसेच्या जनहीत कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन यावर त्वरित बंदोबस्त करा अन्यथा हा धोकादायक पूल खचून अपघात होण्याची शकता आहे असे नमूद केले होते. contractor negligence leads to bridge failure in monsoon

    अभियंत्यावर गुन्हे दाखल करा

    मात्र तरीही मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र हा पूल मनसे च्या मागणी मंतर दहा दिवसातच कोसळला त्यामुळे हा पूल बांधणाऱ्या कंत्राटदार व त्यांचे बिल पास करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी निवेदनातून मनपा आयुक्त यांना दिला आहे, यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचेजिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    मनसे कडून दिनांक २८ ऑगस्ट ला मनपा आयुक्त यांना निवेदन देउन लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने हनुमान खिडकी जवळील झरपट नदी वरील पूल खचला तो बांधणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकां अशी मागणी सुद्धा निवेदनातून केली आहे.

  • help by sudhir mungantiwar after road accident । भद्रावतीत अपघातग्रस्तांना तातडीने मदत – आ. सुधीर मुनगंटीवारांची मानवी संवेदनशीलता चर्चेत

    help by sudhir mungantiwar after road accident

    help by sudhir mungantiwar after road accident : भद्रावती १२ सप्टेंबर २०२५ : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका कार्यक्रमासाठी जात असताना त्यांना अपघात झालेला दिसला. त्यांनी आपला ताफा थांबवून जखमींना तातडीने रुग्णालयात भरती करण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच ते पुढच्या प्रवासाला निघाले. ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ असे मानणारे आ. श्री. मुनगंटीवार यांची तत्परता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.

    चंद्रपुरात आले पेंट चोर

    आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जीवनातील प्रत्येक क्षण जनतेसाठी अर्पण केला आहे, याची प्रचिती भद्रावती येथे घडलेल्या अपघातातून पुन्हा एकदा आली. नागपूर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जात असताना भद्रावती येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन्ही व्यक्ती बल्लारपूर येथील प्रदीप डोके आणि घनश्याम मेश्राम (रा.विसापूर) जखमी झाले. त्याच वेळी नेमके त्या मार्गावरून आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा ताफा जात होता.

    मुनगंटीवार यांचा ताफा थांबला

    अपघातग्रस्तांची अवस्था पाहताच, ‘माणसाचे प्राण वाचवणे हेच सर्वोच्च कर्तव्य’ या भावनेतून क्षणाचाही विलंब न करता आ. मुनगंटीवार यांनी आपला ताफा तात्काळ थांबवला. स्वतः पुढाकार घेऊन जखमींना प्राथमिक उपचार मिळवून देत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. त्यांच्या तात्काळ पुढाकारामुळे अपघातग्रस्तांना जीवदान मिळाले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरिशजी शर्मा आणि महामंत्री डॉ मंगेशजी गुलवाडे यांनीही तत्परतेने जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी नेण्याची मदत केली. politician save accident victim

    sudhir mungantiwar help accident victim

    आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कार्य केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. आरोग्य शिबिरे, मोफत शस्त्रक्रिया शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, गरजूंसाठी मदत, ग्रामविकासासाठी सततचे प्रयत्न अशा अनेक उपक्रमांमधून त्यांनी जनतेच्या सेवेला नवी दिशा दिली आहे. त्यामुळेच “जनसेवा हीच ईश्वरसेवा” ही त्यांची जीवनव्रती भूमिका जनतेच्या मनाला स्पर्श करत राहते.जनतेच्या सुखदुःखात नेहमी धावून जाणारे, संकटात मदतीचा हात देणारे संवेदनशील नेते म्हणजे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार आहेत, हे पुन्हा एकदा यानिमित्ताने सिद्ध झाले.

  • Chandrapur teacher awards 2025 । चंद्रपूर जिल्ह्यातील या शिक्षकांचा होणार सन्मान

    Chandrapur teacher awards 2025

    Chandrapur teacher awards 2025 : चंद्रपूर, दि. 11 सप्टेंबर २०२४ : जिल्हा परिषद ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान जिल्हास्तरीय एक दिवसीय कार्यशाळा, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा, संपूर्णता अभियान सन्मान पुरस्कार वितरण सोहळा आणि जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण  सोहळा होणार आहे.

    चंद्रपुरात १५० किलो प्लॅस्टिक जप्त

    जिल्ह्यातील 15 पंचायत समितीमधून निवड समितीद्वारे जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता शिक्षकांची निवड  झाली आहे.

    प्राथमिक विभागात

    • 1. प्रदीप टिपले, जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा (ता. चंद्रपुर), 2. सविता झाडे जि. प. प्रा. शाळा गोंदेडा (चिमूर), 3. कुणाल दुधे जि. प. प्रा. शाळा बेलगाव,(देश) (वरोरा), 4. राजकुमार मुन जि. प. उ. प्रा. शाळा चिखली, (बु.) (जिवती), 5 गीता  साखरे जि. प. उ. प्रा. शाळा फिस्कूटी, (मूल), 6 कामिना  आत्राम  जि. प. उ. प्रा. शाळा बेलगाव, (सावली), 7. प्रशांत साखलवार  जि. प. उ. प्रा. शाळा आंबेधानोरा, (पोंभुर्णा), 8. अजय  मुसळे जि. प. उ. प्रा. शाळा चिरादेवी, (भद्रावती), 9. सुनिल पोटे जि. प. प्रा. शाळा कळमना, (बल्लारपुर), 10. गोवर्धन टिकले जि. प. उ. प्रा. शाळा जुगनाळा, (ब्रह्मपुरी), 11. अर्चना मरघडे जि. प. उ. प्रा. शाळा, पळसगाव ,(खुर्द) (नागभीड), 12. सुभाष  पावडे जि. प. प्रा. शाळा, परसोडी, (गोंडपिपरी), 13. धनराज  दुर्योधन जि. प. उ. प्रा. शाळा, भुरकुंडा (बु.) (राजुरा), 14. मंगला  उरकुडे  जि. प. उ. प्रा. शाळा, कढोली (खुर्द) (कोरपना), 15.अ. अजीज अ. मुजीब शेख  जि. प. उ. प्रा. शाळा, नाचनभट्टी, (सिंदेवाही).

    अपंग/विशेष/कला शिक्षक पुरस्कार राहुल वैद्य जि. प. उ. प्रा. आदर्श शाळा, चिंचाळा, (चंद्रपुर) यांना तर :- माध्यमिक विभाग पुरस्कार राजू हिवंज  जि. प. हायस्कूल तथा कनिष्ठ महा. भद्रावती यांना जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अश्विनी केळकर यांनी कळविले आहे. district teacher award primary school Chandrapur

  • how much is penalty for plastic bag use | चंद्रपूरमध्ये 150 किलो प्लास्टिक जप्त – दुकानदारावर ₹5000 दंड!

    how much is penalty for plastic bag use

    how much is penalty for plastic bag use : चंद्रपूर 11 सप्टेंबर  – बिनबा गेट परिसरातील राजनूर सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 150 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

    पहाटे जटपूरा गेट परिसर हादरला

    पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड

      चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. first offence plastic violation

    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त श्रीमती. शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली. 

       

  • Part of a dilapidated building collapsed | 🏚️ चंद्रपूर हादरलं! जटपुरा गेटसमोरील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला – महिला गंभीर जखमी

    Part of a dilapidated building collapsed

    Part of a dilapidated building collapsed : चंद्रपूर 11 सप्टेंबर 2025 – चंद्रपुरातील जटपुरा गेट समोरील इमारतीचा एक भाग कोसळला, या घटनेत दूध विक्रेता महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटे 5 वाजता घडली.

    जन सुरक्षा विधेयकविरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने

    ऐतिहासिक जटपूरा गेट समोरील विनोद मेहता यांच्या मालकीच्या इमारतीचा वरचा भाग जीर्ण अवस्थेत आला होता, आज झालेल्या घटनेत 50 वर्षीय मनीषा लोखंडे या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी आहे.

    माजी नगरसेविकेचा पाठपुरावा


    याबाबत माजी नगरसेविका छबु वैरागडे यांनी सदर इमारतीच्या झालेल्या जीर्ण इमारतीची अवस्था बघता भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेद्वारे 4 नोटीस पाठविल्या होत्या मात्र मेहता यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. घर मालकाच्या दुर्लक्षामुळे व पालिकेच्या उदासीनतेमुळे कामामुळे महिला जखमी झाली.

    सदर इमारतिच्या तळमजल्यावर छोटं हॉटेल सुद्धा आहे, या घटनेमुळे त्या हॉटेलला धोका निर्माण झाला असून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात अश्या अनेक जीर्ण इमारती असून भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडणार ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पालिकेने अश्या जीर्ण इमारती लवकरात लवकर जमीनदोस्त कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.

  • Male Leopard found dead । चंद्रपूरात नर बिबट्याचा रहस्यमय मृत्यू

    Male Leopard found dead

    Male Leopard found dead : चंद्रपूर : 9 सप्टेंबर 2025 – सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतात एक नर बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने वनविभागामध्ये खळबळ उडाली आहे. स्थानिक वनरक्षकाच्या माहितीवरून त्याला जेरबंद करण्याची सर्व तयारी करण्यात आली असताना शोध मोहिमेदरम्यान तो मृतावस्थेत आढळून आला.

    घराबाहेर भांडे घासत असताना महिलेवर वाघाचा हल्ला

    सावली वनपरिक्षेत्रांतर्गत मूल तालुक्यातील टेकाडी येथे सुनील गेडाम यांच्या पोल्ट्री फार्मलगच्या शेतातील झुडपात एक बिबट दडून असल्याची माहिती स्थानिक वनरक्षकाला मिळाली त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. त्यावरून विभागीय वनाधिकारी तलमले, सहाय्यक उपवनसंरक्षक तरसे आणि सावली वनपरिक्षेत्राधिकारी धुर्वे यांचे नेतृत्वात बिबट्याला रेस्क्यू करून जेरबंद करण्याचे नियोजन करण्यात आले. Mul taluka leopard death

    बिबट्याची शोधाशोध आणि…

    याकरीता चंद्रपूर टी.टी.सी.चे डॉक्टर, अतिशीघ्र कृती दलाचे कर्मचारी, वनकर्मचारी आणि संजीवन पर्यावरण संस्था मूल चे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे पकडण्याचे नियोजन पूर्ण झाले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरूवात झाली. वनविभागाच्या पथकाकडून बिबट्याची शोधाशोध सुरू असताना बिबट मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांना धक्काच बसला. लगेच वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर मृत बिबट्याला ताब्यात घेऊन सावली वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी डॉ. कुंदन पोडचलवार यांनी सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या समक्ष बिबट्याचे शवविच्छेदन केले आणि त्या ठिकाणीच दहन करण्यात आले.

    शवविच्छेदन वेळी डॉ. कुंदन पोडचलवार, क्षेत्र सहाय्यक एन.एस. सिडाम, वनरक्षक एस.डब्लू. बोनलवार, लंकेश आखाडे, अतिशीघ्र कृती दलाचे शूटर अविनाश फुलझेले, कीशोर डांगे, मनोज चावरे, अंकीत पडगेलवार, संजीवन पर्यावरण संस्था मूल चे उमेशसिंह झिरे, तरुण उपाध्ये, तन्मयसिंह झिरे, हौशिक मंगर, अक्षय दुम्मावार, टेकाडी पी.आर.टी. टीम व सहाय्यक वनमजूर उपस्थित होते. Chandrapur wildlife incident

    याच परिसरात चार दिवसांपूर्वी ३०० कोंबड्यांना ठार करणारी मादी बिबट जेरबंद करण्यात आली होती. सध्या मृत अवस्थेत सापडलेला बिबट नर जातीचा आहे. नर आणि मादी बिबट दोघेही या परिसरात एकत्र वावरत असावेत असा वनविभागाचा कयास आहे. टेकाडी परिसर सादागडच्या घनदाट जंगलाच्या जवळ असल्याने येथे वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्यामुळे याच परिसरात नर मादी बिबट राहत असावेत असे अशी प्रतिक्रिया वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून, परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आणि वन्यप्राण्यांची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळविण्याचे आवाहन केले आहे.

  • Rajura Voter Fraud Case । राजुरा बोगस मतदार नोंदणी, माहितीसाठी प्रशासनाची ना!, कारवाई नाही तर न्यायालयीन लढा

    Rajura Voter Fraud Case

    Rajura Voter Fraud Case : मुंबई – ९ सप्टेंबर २०२५ – भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने हातात हात घालून मतचोरी केल्याचे एकाएका मतदार संघातील घोटाळे काँग्रेस पक्ष उघड करत आहे. राहुल गांधी यांनी महादेवपुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश करून भाजपा व आयोगाच्या भ्रष्ट युती पुढे आणली आहे. महादेवपुराप्रमाणे मतचोरीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही झाला असून याप्रकरणी एफआयआरही दाखल करण्यात आला आहे पण ११ महिने झाले तरी अद्याप यावर कोणतीच कारवाई होत नाही. या मतचोरी प्रकरणी पुढील एका महिन्यात कारवाई करावी अन्यथा काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे. Rajura voter fraud exposed

    चंद्रपूर जिल्हा कांग्रेस प्रभारीपदी आमदार अभिजित वंजारी यांची निवड

    गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मतचोरीची माहिती देताना काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे पुढे म्हणाले की, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या ५ महिन्यांच्या कालावधीत राजुरा मतदारसंघात ५५ हजार मतदारांची वाढ करण्यात आली. राजुरा मतदारसंघात १ ऑक्टोबर २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ११ हजार ६६७ ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली होती.

    तक्रार दाखल मात्र कारवाई नाही

    यासंदर्भात काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केल्यानंतर ६८५३ मते डिलिट करण्यात आली. याप्रकरणी एफआयआर ही दाखल करण्यात आला आहे. पण पुढे काहीच कारवाई केलेली नाही. ही ऑनलाईन बोगस मतदार नोंदणी करण्यात आली त्याचे IP address, email id आणि मोबाईल नंबर ची माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पण आजपर्यंत ती देण्यात आलेली नाही. ही माहिती दिल्यास चोर कोण, हे उघड होईल म्हणून पोलीस व प्रशासन माहिती देत नाही. bogus voter registration Rajura

    अतुल लोंढे पुढे म्हणाले की, राजुरा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवाराकडे ६१ लाख रुपये व निवडणूक साहित्य सापडले. निवडणूक आयोगाच्या FST पथकाने ही कारवाई केली आहे, गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पण आजपर्यंत यावरही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांनी निवडणूक आयोग, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्याकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई संदर्भात काहीच हालचाल केली जात नाही. मतचोरी प्रकरणी काँग्रेस जनतेच्या न्यायालयात लढा देत आहेच पण न्यायालयातही लढा देऊ, असे अतुल लोंढे म्हणाले.

    चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राजुरा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष धोटे यांनीही यावेळी मतचोरीप्रकरणाची सविस्तर माहिती दिली.

  • Maharashtra Congress District In-charge । 🚀 चंद्रपूरमध्ये काँग्रेसला बळकटी, आमदार वंजारी यांची प्रभारीपदी नियुक्ती

    Maharashtra Congress District In-charge

    Maharashtra Congress District In-charge : चंद्रपूर ९ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष व विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांची चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र प्रदेश काँग्रेसकडून जारी करण्यात आले आहे.

    चंद्रपुरात केबल चोरी करणाऱ्या बाहेर राज्यातील टोळक्याला अटक

    प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार

    प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी नेमण्यात आले असून ब्रह्मपुरी व वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून आ. वंजारी यांच्यावरच जबाबदारी देण्यात आली आहे. राजुरा विधानसभेसाठी हैदर अली दोसानी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. मुजीब पठाण (नागपूर), बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमाकांत अग्निहोत्री, तर चिमूर विधानसभा क्षेत्रासाठी श्री. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी या नियुक्तीचे पत्र जारी केले असून, जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी यांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी तातडीने संपर्क साधून संघटनात्मक बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.
    या नियुक्तीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळेल, तसेच आगामी राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस पक्ष मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

  • BSNL copper cable thieves arrested । कंत्राटी कामगार म्हणून यायचे आणि चोरी करायचे, स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

    BSNL copper cable thieves arrested

    BSNL copper cable thieves arrested : चंद्रपूर – ९ सप्टेंबर २०२५ – चंद्रपुरात स्वतःला कंत्राटी कामगार भासवीत चोरी करणाऱ्या २ आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करीत तब्बल ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दूरसंचार विभागाचे कनिष्ठ अभियंता अभिजित अशोक जीवने यांच्या तक्रारीवरून करण्यात आली.जीवने यांनी ८ सप्टेंबर रोजी बीएसएनएल कंपनीचे कॉपर केबल चोरी गेल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

    पत्नीवर वाघाचा हल्ला, पती वाघाशी भिडला

    ८ सप्टेंबर रोजी जीवने यांनी दिलेल्या तक्रारीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरु केला, पोलिसांनी या गुन्ह्याचा तंत्रबद्ध व सखोल तपास करीत गुन्हेगाराबाबत गोपनीय माहिती काढली असता एक चारचाकी आयशर ट्र्क हा कोसारा रोडवर लपलेल्या स्थितीमध्ये होता, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी पोहचत चौकशी केली असता त्या वाहनात चोरी गेलेला बीएसएनएल कंपनीचा कॉपर केबल किंमत २४ लाख रुपये आढळून आला.

    कामगार म्हणून भासवायचे आणि डाव साधायचा

    गुन्हे शाखेच्या पथकाने आयशर वाहन क्रमांक up२४ bt ७०४६ व कॉपर केबल, हेल्मेट, रिफ्लेक्टर, जॅकेट, प्लॅस्टिक बॅरीकेट सह एकूण ४४ लाख ४८ हजार ३०० रुपयांचा माल जप्त करीत आरोपी २२ वर्षीय नरेंद्र सोरणसिंह मौर्या व २६ वर्षीय नाजीम शोख असमुद्दीन शेख दोघे राहणार कलपिया तालुका जिल्हा बदायू उत्तरप्रदेश यांना अटक करण्यात आली. सदर आरोपी हे स्वतःला कंत्राटी कामगार भासवून दुरुस्तीच्या नावाने कॉपर केबल चोरत होती. crime branch recovers stolen telecom cable

    telecom cable

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, गणेश भोयर, जयंत चुनारकर, नितेश महात्मे, सचिन गुरनुले, किशोर वैरागडे, जयसिंग, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे, चेतन गज्जलवार, गणेश मोहुर्ले, अजय बागेसर, नितीन कुरेकार, सुरेंद्र महतो, संजय वाढई, दीपक डोंगरे, मिलिंद जांभुळे, प्रदीप मडावी, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, अजित शेंडे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, दिनेश अराडे यांनी केली.