Tag: News34 chandrapur

  • Chandrapur Babupeth Women Meeting News । महिला बचत गट बैठक दरम्यान रेलिंग कोसळले, ३ महिला जखमी

    Chandrapur Babupeth Women Meeting News

    Chandrapur Babupeth Women Meeting News : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – चंद्रपुर शहरातील विविध भागात सध्या महिला बचत गटांची संख्या जोमाने वाढत आहे, महिला आत्मनिर्भर व्हाव्या असा बचत गटाचा उद्देश्य असतो मात्र काही वेळा गटाच्या माध्यमातून राजकारणाचा डाव साधण्याचे काम होत असते, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ भागातील महिला कांग्रेस अध्यक्ष चंदा वैरागडे यांच्या निवासस्थानी २१ सप्टेंबर रोजी बचत गटाची मिटिंग आयोजित केल्या गेली होती, सदर मिटिंग ची वेळ हि रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान वैरागडे यांच्या घरावरील छतावर सदर मिटिंग आयोजित केली मात्र काही वेळातच सिमेंट रेलिंग कोसळल्याने ३ महिला खाली कोसळल्या. यामुळे एकच खळबळ उडाली होती. Chandrapur Women SHG Political Discussion

    घरबसल्या पैसे कमवायचे आहे? तर वाचा हि बातमी

    महिला कांग्रेस अध्यक्ष व बचत गटाच्या अध्यक्षा चंदा वैरागडे ह्या मागील काही वर्षांपासून बचत गट चालवितात, त्या निमित्ताने त्या महिलांच्या मिटिंग आयोजित करीत असतात. २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी त्यांनी महिलांची बैठक आयोजित केली होती, या बैठकीत १५० ते २०० महिला उपस्थित झाल्या होत्या. वैरागडे यांच्या छतावर जागा होत नसल्याने त्यांनी शेजारी असलेले वैरागडे यांच्या घरावरील छताचा वापर महिलांना बसण्यासाठी केला होता, त्या छतावर सिमेंटच्या रेलिंग होत्या, काही वेळातच ती रेलिंग कोसळली आणि त्यासोबत ३ महिलाही खाली पडल्या. Roof Collapse Incident

    अचानक घडलेल्या या घटनेमुळे बैठकीत उपस्थित महिला घाबरल्या, आणि तात्काळ त्या महिलांना रुग्णालयात पाठविण्याचे प्रयत्न करण्यात आले, महिलांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्या बचावल्या मात्र इतक्या रात्री बैठक आयोजित केल्याने उपस्थित महिला संतापल्या होत्या, परिसरातील महिलानुसार जर बैठकीत उपस्थित झाले नाही तर गटातून काढून टाकणार त्यामुळे त्या महिला बैठकीत आल्या होत्या.

    विशेष बाब म्हणजे सध्या या बचत गटाच्या बैठकीत कांग्रेस पदाधिकारी यांची उपस्थिती लाभत असल्याने आता हा महिलांचा बचत गट कि राजकीय गट या चर्चाना उधाण आले आहे, आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि बैठक आयोजित करण्यात आली होती का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

    महिलांचे रक्षण करणे माजी जबाबदारी – चंदा वैरागडे

    आमच्या बचत गटाची मासिक सभा आयोजित करण्यात आली होती, पावसाचे दिवस असल्याने पायऱ्या ह्या सैल झाल्या होत्या, त्यामुळे महिलांचा पाय घसरला, त्यांना किरकोळ जखमा झाल्या, मात्र या घटनेमुळे माझी बदनामी करण्याचे षडयंत्र काहींनी चालविले, आम्ही चांगलं काम करीत आहो हे कुणाला पाहवत नाही आहे. आम्ही इतक्या वर्षात महिलांचे मोठे संघटन उभे केले त्यामुळे हि विरोधकांना खुपणारी बाब आहे. सर्व महिला सुरक्षित असून त्यांची रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही जागरूक असून त्यांचे रक्षण करणे माझी जबाबदारी आहे.

  • how to start online earning from home । घरबसल्या Online Earning – ब्लॉगिंगपासून यूट्यूबपर्यंतची संपूर्ण माहिती

    how to start online earning from home

    how to start online earning from home : ऑनलाइन – आपल्या देशात पैसे कमविण्याचे अनेक मार्ग आहेत, यामध्ये काही कठीण तर काही सोपे मार्ग सुद्धा आहे, आपण या माध्यमातून ऑनलाइन पैसे सुद्धा कमवू शकता, आज आपणास याबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे, आपण या सोप्या पद्धतीचा अवलंब करून चांगले पैसे कमविण्याची तयारी ठेवा.

    कसा आहे आयफोन १७? जाणून घ्या सोप्या भाषेत

    ब्लॉगिंगद्वारे ऑनलाइन पैसे कसे कमवायचे?

    ब्लॉगिंग हा एक शक्तिशाली माध्यम आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या विचारांना आणि ज्ञानाला जगासमोर मांडू शकता. ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्यासाठी खालील काही प्रमुख मार्ग आहेत:

    १. Google AdSense: Google AdSense हा ब्लॉग आणि वेबसाइटद्वारे पैसे कमवण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. यामध्ये, तुमच्या ब्लॉगवर Google कडून जाहिराती दाखवल्या जातात. जेव्हा कोणी तुमच्या ब्लॉगवरील जाहिरातींवर क्लिक करतो किंवा त्या पाहतो, तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.

    • ते कसे काम करते?
      • तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर योग्य प्रमाणात व्हिजिटर्स (ट्रॅफिक) असणे आवश्यक आहे.
      • तुम्ही Google AdSense साठी अर्ज करू शकता.
      • एकदा मंजुरी मिळाल्यावर, तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दिसायला लागतात.
    • टीप: तुमच्या ब्लॉगवरील मजकूर (कंटेंट) उच्च दर्जाचा आणि वाचकांसाठी उपयुक्त असावा. यामुळे तुमच्या ब्लॉगचे व्हिजिटर्स वाढतात. step by step online earning guide for beginners

    २. संलग्न मार्केटिंग (Affiliate Marketing): यामध्ये तुम्ही दुसऱ्या कंपन्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची जाहिरात तुमच्या ब्लॉगवर करता. जेव्हा कोणी तुमच्या दिलेल्या लिंकवर क्लिक करून ती वस्तू खरेदी करतो, तेव्हा तुम्हाला कमिशन मिळते.

    • उदाहरण: तुम्ही एखाद्या पुस्तकाचे पुनरावलोकन (review) लिहिले आहे आणि त्यासोबत Amazon ची संलग्न लिंक दिली आहे. जर वाचकाने त्या लिंकवरून पुस्तक विकत घेतले, तर तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल.

    ३. प्रायोजकत्व (Sponsorships): जर तुमचा ब्लॉग लोकप्रिय असेल आणि त्याला चांगले व्हिजिटर्स मिळत असतील, तर कंपन्या त्यांच्या उत्पादनांची जाहिरात तुमच्या ब्लॉगवर करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात.

    ४. डिजिटल उत्पादने (Digital Products): तुम्ही स्वतःची ई-पुस्तके, ऑनलाइन कोर्स किंवा इतर डिजिटल उत्पादने तयार करून तुमच्या ब्लॉगवरून विकू शकता. online earning through affiliate marketing

    YouTube चॅनलद्वारे ऑनलाइन पैसे कसे कमवायचे?

    आज, YouTube हे एक मोठे व्यासपीठ बनले आहे. इथे व्हिडिओंच्या माध्यमातून माहिती, मनोरंजन आणि शिक्षण दिले जाते. YouTube मधून पैसे कमवण्यासाठी खालील मार्ग आहेत:

    १. YouTube Partner Program आणि Google AdSense: YouTube वरून पैसे कमवण्याचा हा मुख्य मार्ग आहे. तुमच्या चॅनलला काही अटी पूर्ण कराव्या लागतात, जसे की:

    • गेल्या १२ महिन्यांत ४००० तासांचा व्ह्यू टाइम.
    • १००० पेक्षा जास्त सबस्क्रायबर्स. एकदा या अटी पूर्ण झाल्यावर, तुम्ही YouTube Partner Program साठी अर्ज करू शकता. यानंतर तुमच्या व्हिडिओवर जाहिराती दिसायला लागतात आणि तुम्हाला कमाई सुरू होते. nline earning using YouTube channel

    २. प्रायोजकत्व आणि ब्रँड प्रमोशन्स: जर तुमचा चॅनल लोकप्रिय झाला आणि त्याचे चांगले व्ह्यूअरशिप असेल, तर अनेक कंपन्या त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात. तुम्ही त्यांच्या उत्पादनांचे व्हिडिओमध्ये पुनरावलोकन (review) करू शकता किंवा त्यांच्याबद्दल माहिती देऊ शकता. how to start online earning from home

    ३. संलग्न मार्केटिंग (Affiliate Marketing): तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या वर्णनामध्ये (description) उत्पादनांच्या संलग्न लिंक्स देऊ शकता. जेव्हा कोणी त्या लिंकवरून खरेदी करतो, तेव्हा तुम्हाला कमिशन मिळते.

    ४. चॅनल सदस्यत्व (Channel Memberships): YouTube वर तुमच्या चाहत्यांसाठी ‘चॅनल मेंबरशिप’ सुरू करू शकता. यामध्ये, सदस्य मासिक शुल्क भरून विशेष सुविधा, जसे की विशेष इमोजी, बॅजेस, किंवा फक्त सदस्यांसाठी व्हिडिओ, यांचा लाभ घेऊ शकतात.

    इंस्टाग्राम आणि फेसबुकद्वारे पैसे कमविणे

    ब्लॉगिंग आणि YouTube सोबतच, तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करूनही कमाई करू शकता.

    १. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग (Influencer Marketing): जर तुमचे इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर चांगले फॉलोअर्स असतील, तर तुम्ही ‘इन्फ्लुएन्सर’ म्हणून काम करू शकता. कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीसाठी तुम्हाला पैसे देतात. तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये किंवा स्टोरीमध्ये त्या उत्पादनांची जाहिरात करू शकता.

    २. थेट विक्री (Direct Selling): तुम्ही तुमच्या स्वतःच्या उत्पादनांची किंवा सेवांची विक्री करण्यासाठी फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा वापर करू शकता. फेसबुक शॉप आणि इंस्टाग्राम शॉपिंग यासारखी वैशिष्ट्ये यासाठी खूप उपयुक्त आहेत.

    ३. संलग्न मार्केटिंग (Affiliate Marketing): तुम्ही तुमच्या बायोमध्ये किंवा पोस्टमध्ये संलग्न लिंक्स (affiliate links) जोडून पैसे कमवू शकता. how to start online earning from home

    वेबसाईट व youtube वर काम करताना आपल्याला ज्या विषयाची सखोल माहिती आहे, तो विषय निवड करावा आणि त्याबाबत आर्टिकल्स व व्हिडिओं तयार करावे, हे काम आपण सतत ३ महिने करत राहिल्याने आपल्याला गुगल ऍडसेन्स ची मंजुरी लगेच मिळणार.

    इंस्टाग्राम मध्ये आपण काही कन्टेन्ट तयार केले असेल तर ते पोस्ट करा पण त्याआधी इंस्टाग्राम चे अल्गोरिदम समजणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पोस्ट करण्याचा काही उपयोग होणार नाही.

  • Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 । अश्विन नवरात्रीची सुरुवात, महाकाली मंदिरात हजारो भाविकांची गर्दी

    Chandrapur Mahakali Temple Navratri 2025

    Chandrapur Mahakali Temple Navratri 2025 : चंद्रपूर – आजपासून अश्विन नवरात्रीची सुरुवात झाली, चंद्रपुरातील ऐतिहासिक महाकाली मंदिरात घटस्थापना करण्यात आली, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिर परिसरात उपस्थिती दर्शविली होती. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजताच मंदिर परिसरातील दालन उघडण्यात आले, गाभाऱ्यात जाऊन थेट दर्शन मिळणार यासाठी हजारो भाविक सकाळपासून रांगेत लागले होते.

    मनसे तालुकाध्यक्षावर शिस्तभंगाची कारवाई करीत पदमुक्त

     ऐतिहासिक काळातील गोंडराजा विरशाहची पत्नी राणी हिराईने सुमारे इ.स.१७०४ पुर्वी असलेल्या लहान मंदिराच्या मुळ बांधणीच्या चार खांबावर, पुर्वेस व पश्चिमेस जोडले. खांब तयार केल्यावर सध्याचे कमानयुक्त असणारे मंदिराचे बांधकाम करण्यात आले. राजा विरशाहाच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून राणी हिराईने चैत्रपोर्णिमेला महाकाली देवी उत्सवाची सुरवात केली. नांदेड येथील देवी उपासक राजाबाई देवकरिनस याने १८८० साली चैत्रपोर्णिमेला भक्तासोबत १५ दिवस उत्सवरूपी उपासना केली.  Ashwin Navratri 2025 Chandrapur Updates

    नवरात्रीमधील नियोजन काय?

    महाकाली मातेच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. मातेवर पारंपरिक दागदागिने चढवले जातात. यानंतर घटस्थापना केली जाते. नंतर दररोज देवीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. दुपारी नैवेद्य दाखवला जातो. तर, रात्री आरती केली जाते. अष्टमीला हवन केला जातो. हे अनुष्ठान नवमीपर्यंत सुरू असते. 

    यावेळी मंदिर व्यवस्थापनेतील मुख्य पुजारी यांनी माहिती दिली कि आजपासून सुरु झालेल्या अश्विन नवरात्रीमध्ये मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा केल्या आहे. दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना कसलीही समस्या उदभवणार नाही याची आम्ही काळजी घेत असल्याचे सांगितले. सोबतच नवरात्री दरम्यान आंध्रप्रदेश, मराठवाडा व इतर राज्यातून भाविक मोठ्या संख्येतून दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

  • Rahul Balamwar MNS Chandrapur । मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवारांचा मोठा निर्णय! ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे पदमुक्त

    Rahul Balamwar MNS Chandrapur

    Rahul Balamwar MNS Chandrapur : चंद्रपूर/ब्रह्मपुरी – चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात संघटना वाढीचे काम जोमात सुरु आहे, मात्र संघटन वाढीमध्ये अडथळा व पक्षाच्या हितास बाधा आणणारे विरुद्ध बालमवार यांनी शिस्तभंगाची कारवाई करीत पदावरून हकालपट्टी केली आहे.

    चंद्रपूर भाजपात गटबाजीचे ग्रहण

    मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्याकडे वरोरा, चिमूर व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी आहे, या भागात मनसेचे काम व संघटन वाढी चांगली सुरु आहे, ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांनी पक्षविरोधी काम केल्याने बालमवार यांनी शेंडे याना पदमुक्त केले आहे. तसे पत्र आज २१ नोव्हेम्बर रोजी बालमवार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे.

    तात्काळ पदमुक्त

    पक्षविरोधी काम करण्याच्या कृतीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमी आक्रमक असतात, जर कुणी पक्षाच्या हिताला बाधा पोहचेल असे काम केल्यास त्याला सरळ घरचा रस्ता दाखवा असे आदेश आहे. त्या आदेशाला अनुसरून मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी ब्रह्मपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांना तात्काळ पदमुक्त केले आहे. पक्षासोबत प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनसे नेहमी न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र विरोधात काम केल्याने तात्काळ कारवाईचा बडगा शेंडे यांच्यावर पक्षाच्या वतीने बालमवार यांनी उगारला आहे.

  • Chandrapur BJP news । महाराष्ट्रात विकासाचे सरकार; भाजप कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ – चंद्रशेखर बावनकुळे

    घरपट्ट्यांपासून वीजदर कपात पर्यंत सर्व वचने पूर्ण करू – ना. चंद्रशेखर बावणकुळे

    Chandrapur BJP news

    Chandrapur BJP news : चंद्रपूर २१ सप्टेंबर २०२५ – कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रम आणि जनतेच्या विश्वासामुळेच महाराष्ट्रात विकासाचे सरकार स्थापन झाले. आपल्या एका मताने विकसित भारताचा संकल्प पूर्ण होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने आगामी सर्व निवडणुकांत विजय मिळवून कमळ फुलवावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार घरपट्ट्यांपासून वीजदर कपातीपर्यंत सर्व वचने पूर्ण करणार असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावणकुळे यांनी केले.

    गटबाजीमुळे चंद्रपूर भाजपची डोकेदुखी वाढणार

    भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे जैन भवन येथे कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार सुधाकर कोहळे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा मध्य वर्ती बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, ज्येष्ठ नेते विजय राऊत, माजी महापौर राखी कंचर्लावार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, नामदेव डाहुले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, महामंत्री रवी गुरुनुळे, श्याम कनकम, मनोज पाल, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, महिला अध्यक्ष वंदना हजारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, विनोद खेवले, सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, अरुण तिखे यांच्यासह माजी नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. Chandrapur BJP news

    बावणकुळे म्हणाले की, तीन कोटी सतर लाख मतांची ताकद घेऊन आणि ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. हे यश इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनाही शक्य झाले नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण ते घडवून आणले.”

    ५० हजार नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार

    ते पुढे म्हणाले की,  या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे शेतकऱ्यांकडून वीजबिल न घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेता आला. घरपट्ट्यांसह ३६ महत्त्वाच्या विषयांवर निर्णय झाले असून ५० हजार नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात येणार आहेत. विजेचे दर कमी करून साडे पाच रुपये प्रति युनिट एवढीच वसुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. महाराष्ट्राला देशातील सर्वात विकसित राज्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे. Maharashtra electricity tariff reduction 2025

    chandrapur bjp

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाबत बावणकुळे म्हणाले की, “नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका आपण जिंकल्या पाहिजेत. आपले सरकार हे वचनपूर्ती करणारे, विकासाच्या माध्यमातून काम करणारे सरकार आहे. ओबीसींवर अन्याय होणार नाही, त्यांच्या हक्काच्या एका टक्यालाही कुणाचा हात लागणार नाही. प्रत्येक समाजाला समान न्याय देणे हीच आमची भूमिका आहे. चंद्रपूरातील प्रत्येक घराला आखीव प्रपत्रिका देण्यात येणार असून गरिबांना घरासाठी अडीच लाख रुपयांची मदत मिळणार आहे. या सर्व योजना कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराघरात पोहोचवल्या पाहिजेत. chandrapur house patta scheme 2025

    पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यक्षम

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरात उत्तम कार्यकारिणी तयार झाली आहे. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा कार्यक्षम आहे. जोरगेवार यांचे नेतृत्व आणि हंसराज अहिर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे. मतदारसंघातील कामे करण्यासाठी जोरगेवार यांची धडपड आम्ही पाहिली आहे. उत्तम काम करणाऱ्या दहा आमदारांमध्ये त्यांचे नाव आहे. त्यांच्या कामामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असून मुख्यमंत्री त्यांना कधीच खाली हाताने पाठवत नाहीत. त्यामुळे आपल्या प्रभागातील परिसरातील कामे आपण करून घ्यावीत, नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असे ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

    या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ मंत्रीमंडळ कार्यरत आहे. नागरिकांना घरे देण्याचा घेतलेला निर्णय हा मोठा असून यामुळे नागरिकांची जुनी मागणी पूर्ण होणार आहे. या सरकारमुळे राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. bjp karykarta sanman

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, घरपट्ट्याच्या मागणीसंदर्भात मंत्री बावणकुळे यांनी तात्काळ मुंबईत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावला. सत्तेचा लाभ शेवटच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.चंद्रपूरमध्ये आयोजित माता महाकाली महोत्सवादरम्यान निघणारी पालखी ही विदर्भातील सर्वात मोठी पालखी असून या मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगती करत असून चंद्रपूर मतदारसंघाचाही विकास होत आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका भारतीय जनता पक्ष जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. Chandrapur BJP news

    या वेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ना. चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यकर्ता मेळाव्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकांत विजयाची पताका फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

  • Chandrapur tribal loan fraud । चंद्रपुरात 50 लाखांचा घोटाळा : कोलाम आदिवासी शेतकऱ्यांच्या नावाने बनावट कर्ज उचल

    Chandrapur tribal loan fraud

    Chandrapur tribal loan fraud : चंद्रपूर, दिनांक 21 : जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी शेतमजुरांच्या नावे बनावट सातबारा तयार करून पीक कर्जाची उचल व फसवणूक करणा-यांना कदापी सोडणार नाही. याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहे, असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सांगितले. 

    चंद्रपूर भाजपमध्ये गटबाजी, मनपा निवडणुकीत डोकेदुखी वाढणार

    चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, जिवती, गडचांदूर या तालुक्यातील 32 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी कोलाम शेतमजुरांच्या अज्ञानाचा फायदा घेत तसेच त्यांना सरकारी अनुदानाचे आमिष दाखवून आरोपी विनायक राठोड याने या शेतमजुरांकडून त्यांचे पासपोर्ट फोटो व आधारकार्ड गोळा केले. सरकारकडून अनुदान मिळण्याची नवीन योजना आली आहे. मी तुम्हाला योजनेचे पैसे मिळवुन देतो, असे सांगुन कोलाम आदिवासी शेतमजुरांच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा फायदा घेतला.

    लाखोंच्या वर कर्जाची उचल

    गोळा केलेल्या पासपोर्ट व आधारकार्डच्या आधारे बनावट सातबारा तयार केला. तसेच  पीक कर्जासाठी आवश्यक असणारे इतर कागदपत्रेसुध्दा तयार केली. गडचांदूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत आदिवासी शेतमजुरांना बोलावून राठोड याने त्यांची स्वाक्षरी आणि अंगठे फाईलवर घेतले. या आधारावर राठोड याने प्रत्येक शेतमजुरांच्या नावे किमान 1 लक्ष 60 हजार ते 1 लक्ष 70 हजार रुपयांपर्यंत पीक कर्ज मंजूर करून घेतले. crop loan fraud

    मारोतीगुडा (ता. जिवती) येथील बालाजी सुरेश सिडाम यांना बँकेत बोलावून पीक कर्जाचे 1 लक्ष 60 हजार रुपये काढण्यास सांगून त्यापैकी केवळ 10 हजार रुपये सिडाम यांना दिले व उर्वरीत रक्कम स्वत:जवळ ठेवून घेतली. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे कर्मचारी थकीत कर्जवसुलीकरीता सिडाम यांच्याकडे आले असता, आपण अशा प्रकारचे कोणतेही कर्ज घेतले नाही, असे त्यांनी सांगितले. बँकेत चौकशी केल्यावर त्यांना समजले की जुलै 2021 मध्ये विनायक राठोड याने आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारावर बनावट सातबारा तयार केला आणि पीक कर्जाची रक्कम लंपास केली. विशेष म्हणजे आरोपी विनायक राठोड याने आजुबाजुच्या गावातील 32 किंवा त्यापेक्षा जास्त आदिवासी कोलाम शेतमजुरांच्या नावे बनावट सातबारा करून अंदाचे 50 ते 55 लक्ष रुपयांची फसवणूक केली आहे. fake satbara forgery Chandrapur   

    याप्रकरणी बालाजी सिडाम यांच्या तक्रारीवरून, विनायक राठोड विरुध्द 15 सप्टेंबर 2025 रोजी गडचांदूर पोलिस ठाण्यात कलम 420, 465, 468 आणि 471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आदिवासींच्या नावे बोगस कागदपत्रे तयार करणा-यांविरुध्द कठोर कारवाई करावी, असे निर्देश  पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.

  • Chandrapur BJP internal conflict । चंद्रपूर मनपा निवडणूक 2026 : भाजपच्या गटबाजीमुळे डोकेदुखी वाढणार

    Chandrapur BJP internal conflict

    Chandrapur BJP internal conflict : चंद्रपूर – २१ सप्टेंबर २०२५ – वर्ष २०२६ मध्ये महानगरपालिका निवडणुका घ्या असे आदेश धडकल्यावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे, चंद्रपूर भाजपने २० सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती कार्यकर्ता सन्मान मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या ६६ जागा जिंकण्यासाठी तयारीला लागले असे आदेश दिले. आपल्याला आता जिंकायचं आहे, यासाठी प्रत्येक नागरिकांच्या घरी जा, त्यांच्या भेटीगाठी घ्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. मात्र आगामी मनपा निवडणुकीत भाजपला अनेक आव्हानाच्या सामोरे जावे लागणार आहे.

    राजुरा विधानसभा क्षेत्रातील माजी आमदाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट

    वर्ष २०१७ च्या मनपा निवडणुकीत ६६ जागेपैकी भाजपने ३६ जागा जिंकल्या होत्या, त्यावेळी कांग्रेस १२, शिवसेना २, राष्ट्रवादी कांग्रेस २, बहुजन समाज पार्टी ८, मनसे २, अपक्ष ४ यांनी बाजी मारली त्यावेळी भाजपला बहुमत मिळाले होते. २०२२ नंतर मनपा वर प्रशासकाची नियुक्ती झाल्याने अनेक कामे रखडले होते. आणि विशेष बाब म्हणजे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षात ताटातूट झाल्याने २ शिवसेना व २ राष्ट्रवादी पक्ष अस्तित्वात आले. पक्ष ताटातुटीनंतर मनपाची हि पहिली निवडणूक आहे.

    भाजपात गटबाजी

    चंद्रपूर शहरातील २८ हजार नागरिकांना पट्टे मिळणार अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली असून बूथ कार्यकर्ता यांना सदर पट्टा वाटप बाबत माहिती द्यावी जेणेकरून आपली सत्ता आल्यास सर्वाना पट्टे वाटप होणार अशी माहिती द्यावी. राज्यात जसे २ पक्षात गट निर्माण झाले त्याप्रकारे चंद्रपुरात भाजपचे २ गट तयार झाले आहे. भाजपचे आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार हे मनपा निवडणुकीत एकत्र येत निवडणूक लढणार कि वेगवेगळे असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. भावी नगरसेवक सध्या संभ्रमात असून कुणाच्या मागे गेल्याने मनपाची तिकीट मिळेल असा प्रश्न त्यांच्या मनात उपस्थित झाला आहे. त्याकरिता कार्यकर्ते सुद्धा आपले पाऊल जपून टाकत आहे. विशेष बाब म्हणजे भाजपच्या कार्यकर्ता सन्मान मेळाव्यात मुनगंटीवार समर्थकांनी पाठ दाखवली. Chandrapur municipal election 2026

    मागील ५ वर्षात आप चर्चेत

    भाजप चंद्रपुरात मजबूत स्थिती मध्ये आहे असं शहर नेतृत्वाला वाटत असे तर ते चुकीचे आहे कारण यावेळी भाजपचे २ गट एकमेकांविरुद्ध काम करेल, कांग्रेस पक्ष सुद्धा यावेळी तयारीने उतरणार असून आप यावेळी प्रस्थापित पक्षांना आवाहन देण्याच्या तयारीत आहे. सोबतच उबाठा, राष्ट्रवादी व मनसे यांची स्थिती आजच्या परिस्थितीत कमकुवत आहे. सत्ताधारी पक्षविरोधात फक्त आप पक्षाने अनेक आंदोलने केली आहे.

    चंद्रपूर शहराची स्थिती सध्या अत्यंत वाईट आहे, मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे, ३ महिन्यापूर्वी नव्याने निर्माण करण्यात आलेले रस्ते शेवटच्या घटका मोजताना दिसत आहे. चंद्रपूर शहरात नागरिक अनेक समस्याने त्रस्त झाले असून प्रशासन व आमदार मुकदर्शक बनले आहे. येणाऱ्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप समोर तिकीट वाटपाची डोकेदुखी उभी राहणार असून ६६ जागा निवडणून येणार हे स्वप्न भाजप सध्या बघत आहे. Chandrapur BJP internal conflict

    विशेष बाब म्हणजे भाजपच्या महानगर कार्यकारणीत ज्यांच्यावर संघटना वाढविण्याची जबाबदारी महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांनी दिली आहे, त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची फळी हि शून्य आहे, पद मिळाल्याने पदाधिकारी सुद्धा फक्त भाजपच्या नावावर संघटना वाढविणार काय? असा प्रश्न सामान्य कार्यकर्त्यांना पडला आहे.

  • FIR against defamatory Facebook post । शेतकरी नेते वामनराव चटपांविरुद्ध बदनामी पोस्ट, युवकांनी केली तक्रार

    FIR against defamatory Facebook post

    FIR against defamatory Facebook post : राजुरा २० सप्टेंबर २०२५ – शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर बदनामीकारक भाषा वापरल्याच्या प्रकाराने शेतकरी संघटना आणि युवकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. या प्रकरणी राजुरा आणि विरूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून, तात्काळ गुन्हा नोंदवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

    चांदा महसूल मित्र चॅटबोट चे उदघाटन

    शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. दीपक चटप यांनी राजुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत,अतुल वरवडे (रा. विसर स्टे.) याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानकारक मजकूर पोस्ट केल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर गजानन ढवस, जीवन आमने, जयराज दोरखंडे, विशाल जिवतोडे यांसह विरूर येथील युवकांनीही विरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. farmer leader defamation Chandrapur

    खोटी आणि द्वेषपूर्ण पोस्ट

    ॲड. वामनराव चटप हे तीन वेळा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिले आहेत. शेतकरी हक्कासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या या नेत्याविरोधात सोशल मीडियावरून केलेली खोटी आणि द्वेषपूर्ण पोस्ट ही केवळ त्यांच्या वैचारिक प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न नसून संपूर्ण शेतकरी चळवळीवर घाव घालणारी आहे. शेतकरी संघटना आणि युवकांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने या प्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून दोषींना अटक केली नाही तर आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल.

    शेतकऱ्यांच्या नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही. समाजात वैमनस्य आणि गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान विरूर येथे २१ सप्टेंबरला निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या अश्लिल पोस्टमागील मास्टरमाईंड शोधावा, असे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते ॲड. मुरलीधर देवाळकर, माजी जि.प. समाजकल्याण सभापती निळकंठ कोरांगे, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, ॲड. श्रीनिवास मुसळे, दिलीप देठे, कपिल इद्दे, सय्यद शब्बीर, मदन सातपुते, आबाजी धानोरकर, मधूकर चिंचोलकर, नरेंद्र काकडे आदींनी व्यक्त केले आहे.

  • overburden royalty waiver Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय लवकरच?, खासदार प्रतिभा धानोरकरांचा पुढाकार

    overburden royalty waiver Chandrapur

    overburden royalty waiver Chandrapur : चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे असलेले पांदण रस्ते दुरुस्त करण्यासाठी, कोळसा खाणींमधून निघणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ (माती आणि दगड) वरील रॉयल्टी माफ करून ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या भेटीत त्यांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर  बावनकुळे यांना एक पत्र दिले. या गंभीर प्रश्नावर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले आहे.

    लाईव्ह संगीतावर होणार दांडियाची धूम, सोमवारपासून भाऊंचा दांडिया

    तर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार

    जिल्ह्यात कोळसा खाणींमुळे मोठ्या प्रमाणात ‘ओव्हर बर्डन’चे ढिगारे तयार झाले आहेत. यामुळे नद्यांचा नैसर्गिक प्रवाह बदलला असून, पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. याच ‘ओव्हर बर्डन’चा उपयोग खराब झालेल्या पांदण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी चांगल्या प्रकारे होऊ शकतो, असे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.

    पत्रात, पांदण रस्त्यांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ओव्हर बर्डन’ वरील सर्व रॉयल्टी माफ करून ते स्थानिक प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांना किंवा ग्रामपंचायतींना विनामूल्य उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. महसूलमंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा निर्णय झाल्यास, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि जिल्ह्याची एक मोठी पर्यावरणीय समस्या सोडवण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • Bhaucha Dandiya Chandrapur । भाऊचा दांडिया : लाइव्ह संगीतावर दांडियाची धमाल – तरुणाईसाठी खास आकर्षण

    Bhaucha Dandiya Chandrapur

    Bhaucha Dandiya Chandrapur : चंद्रपूर २० सप्टेंबर २०२५ : शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणण्यासाठी चंद्रपूरमध्ये सोमवार, २२ सप्टेंबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत ‘भाऊचा दांडिया’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर होणार आहे.

    दिव्यांगांना व्यवसायासाठी लाखोंचे अनुदान

    दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेतून या दांडियाची सुरुवात झाली होती, आणि ती परंपरा आजही अखंड सुरू आहे. या महोत्सवात गरबा-दांडियाचा मनमुराद आनंद लुटण्यासोबतच स्पर्धकांना दोन दुचाकी आणि रोख बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

    पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन

    नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा महोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन नसून, तो समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा एक मंच आहे. विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी पहिल्यांदाच लाइव्ह संगीतावर दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण, क्रीडा, कला आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. garba dandiya competition prizes Chandrapur

    हा महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहे. ‘भाऊचा दांडिया’मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, ज्यात दोन विजेत्यांना दुचाकी आणि इतर रोख बक्षिसे दिली जातील. चंद्रपूरकरांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.