Tag: News34 chandrapur

  • Chandrapur Warora Earthquake Update । भूकंप की ॲपची चूक? चंद्रपूरकरांसाठी प्रशासनाचं महत्वाचं अपडेट

    Chandrapur Warora Earthquake Update

    Chandrapur Warora Earthquake Update : चंद्रपूर: २४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील मार्डा आणि एकोना परिसरात ३.२ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाल्याची माहिती ‘सेसमिक स्टडी ऑफ इंडिया’ या भूकंप ॲपवर दिसली. यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तातडीने केलेल्या चौकशीत स्थानिक प्रशासनाने भूकंपाची शक्यता फेटाळून लावली आहे.

    चंद्रपूरच्या रस्त्यावर युवकाची दहशत, हातात तलवार घेत नागरिकांना धमकविण्याचा प्रयत्न

    प्रशासनाने केली सत्यता पडताळणी

    आपत्ती व्यवस्थापन, चंद्रपूरने दिलेल्या माहितीनुसार, भूकंप ॲपवर नोंद झाल्यानंतर लगेचच वरोरा परिसरातील ग्रामस्थ, पोलिस पाटील, तलाठी आणि वेकोली खदान व्यवस्थापनाशी संपर्क साधून खात्री करण्यात आली. या सर्व तपासणीत कोणालाही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे समोर आले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची नोंद झालेली नाही.

    भूकंपाची नोंद खरी, पण धक्के नाहीत?

    ज्या वेळी भूकंप ॲपवर ही नोंद झाली, त्याच वेळी मार्डा आणि एकोना गावातील लोकांनी कोणतेही भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगितले. यामुळे, जरी ॲपवर भूकंपाची नोंद झाली असली, तरी जमिनीवर त्याचे कोणतेही प्रत्यक्ष परिणाम जाणवले नाहीत. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची वाट पाहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • Chandrapur Police Seized Weapons । चंद्रपूर शहरातील रस्त्यावर हातात तलवार घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न

    Chandrapur Police Seized Weapons

    Chandrapur Police Seized Weapons : चंद्रपूर २४ सप्टेंबर २०२५ : रामनगर पोलिसांनी शहरात तलवारी घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी धीरज बबलू यादव (वय ३२, रा. लखमापूर, जि. चंद्रपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तीन स्टीलच्या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी त्याचा साथीदार राहुल (रा. लखमापूर) हा मात्र फरार आहे.

    वडिलांसमोर मुलावर वाघाचा हल्ला, मुलगा ठार

    स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती तलवारी घेऊन दहशत निर्माण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव ते आंबेडकर सभागृह परिसरात धीरज यादव हातात तलवार घेऊन लोकांना धमकावत असताना पोलिसांना आढळला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले.

    साथीदार पसार

    पोलिसांनी त्याच्याकडून ३,००० रुपये किमतीच्या तीन धारदार तलवारी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात धीरज यादव आणि त्याचा साथीदार राहुल (मो. ७४९९१७२२४) यांच्याविरोधात भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा (अ.क्र. ७७९/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

    ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय बलराम झाडोकर, पीएसआय संतोष निभोरकर, पीएसआय सर्वेश बेलसरे, पोहेकॉ जय सिंग, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, नितीन रायपुरे आणि दिनेश अराडे यांच्या पथकाने केली. फरार आरोपी राहुलचा पोलीस शोध घेत आहेत.

  • Immediately declare a wet drought | चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट: मुख्यमंत्र्यांकडे तातडीची मागणी

    Immediately declare a wet drought

    Immediately declare a wet drought : चंद्रपूर – २३ सप्टेंबर २०२५ – महायुती सरकारने राज्यातील अनेक जिल्ह्यांना ओला दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले चंद्रपूर जिल्हा या घोषणेतून वगळला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

    भद्रावती केंद्रीय विद्यालयाची इमारत जीर्ण, खासदार धानोरकर यांची तात्काळ कारवाई

    जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, घरांची व शेतीमालाची हानी झाली. शेतकरी कर्जबाजारीपणात सापडला असून आर्थिक संकट गडद झाले आहे.

    या पार्श्वभूमीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

    निवेदनातील प्रमुख मागण्या :

    • चंद्रपूर जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
    • बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी व तातडीने दिलासा द्यावा.
    • शेतीपयोगी साधनसामग्री व घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष पॅकेज द्यावे.

    निवेदनाची प्रत कृषीमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे.
    शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी चोखारे यांनी केली आहे.

  • NSUI Chandrapur student fee waiver । अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक संकट; विद्यार्थी शुल्क माफ करा – NSUI

    NSUI Chandrapur student fee waiver

    NSUI Chandrapur student fee waiver : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष मा. सागर सालुंखे जी यांच्या निर्देशानुसार तसेच आमचे नेते व मार्गदर्शक मा. रोशन दादा बिट्टू जी यांच्या मार्गदर्शनाखाली, एनएसयूआय चंद्रपूर जिलाध्यक्ष शफक शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

    MBBS प्रवेशित विद्यार्थ्यांची आत्महत्या, थक्क करणार कारण

    संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क व वसतिगृह शुल्क आकारले जात आहे. ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर मोठी आर्थिक जबाबदारी ठरत असून अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे.

    कठीण परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा

    विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी वरील सर्व शुल्क माफ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा मूलभूत हक्क आहे आणि कठीण परिस्थितीत सरकार व शिक्षण विभागाने दिलासा देणे ही जबाबदारी असल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.

    या निवेदन प्रसंगी एनएसयूआयचे युवा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये फैजल खान, नावेद शेख, आतिश दुपारे, सौम्या विश्वकर्मा, सुमित चौहान, गणेश यादव, आशीष गावडे, राहुल तापसे, प्रतमेश दाओरे यांचा सक्रिय सहभाग होता.

  • Kendriya Vidyalaya building repair । भद्रावती केंद्रीय विद्यालयाची जीर्ण इमारत, खासदार प्रतिभा धानोरकरांचा तातडीचा आदेश

    Kendriya Vidyalaya building repair

    Kendriya Vidyalaya building repair : चंद्रपूर २३ सप्टेंबर २०२५ : भद्रावती येथील केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी (चांदा)ची जीर्ण झालेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इमारतीची दुरुस्ती करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनी दिलेल्या निवेदनानंतर खासदार धानोरकर यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.

    मला व्यवसाय करायचा होता पण…२० वर्षीय मुलाने उचलले टोकाचे पाऊल

    आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे विद्यार्थ्यांच्या पाल्यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली. त्याची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी जयश्री नितीन डोंगरे, भावना वाढई, नाजूका नंदेकर, प्रिया निमसरकार, मिनाक्षी डेकाटे, सारिका कोठे, विद्या नरंजे, सविता नेरुलकर उपस्थित होते. 

    विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य

    खासदार प्रतिभा  धानोरकर म्हणाल्या, “विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. लवकरच यावर ठोस कार्यवाही केली जाईल आणि पालकांनाही याबाबतची माहिती दिली जाईल.”

  • MBBS student suicide note | टोकाचं पाऊल, मला व्यवसाय करायचा होता पण..

    MBBS student suicide note

    MBBS student suicide note : नवरगाव, चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५): शिक्षणासाठी साडेपाच वर्षे आणि लाखो रुपये खर्च करण्याऐवजी मला व्यवसाय करायचा होता, अशी सुसाइड नोट लिहून अनुराग अनिल बोरकर (२०) या ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे नवरगाव येथे घडली. विशेष म्हणजे, अनुराग त्याच दिवशी सकाळी शिक्षणासाठी गोरखपूरला निघणार होता.

    चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन, बच्चू कडू यांची उपस्थिती

    अभ्यासू विद्यार्थ्याची सुसाइड नोट

    अनुराग हा नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरकर यांचा मुलगा असून, तो अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने नीट युजी २०२५ परीक्षेत ओबीसी कॅटेगरीमधून १४७५ वा रँक मिळवून ‘एमबीबीएस’मध्ये प्रवेश मिळवला होता. शिक्षणासाठी गोरखपूरला जाण्याची त्याची सर्व तयारी झाली होती.

    मंगळवारी सकाळी त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता, तो खोलीत नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, त्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली.

    त्या सुसाइड नोटमध्ये त्याने लिहिले होते, “साडेपाच वर्षे वेळ आणि ‘एमबीबीएस’साठी लागणारा पैसा खर्च करण्यापेक्षा मला व्यवसाय करायचा होता, त्यामुळे मी आत्महत्या करत आहे.“

    परिसरात शोककळा

    पोलिसांनी शवविच्छेदनानंतर अनुरागवर नवरगाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

  • Chandrapur highway hit and run case । ट्रकच्या भीषण धडकेत महिला गंभीर जखमी, ॲक्टिव्हा एक किमी फरफटली

    Chandrapur highway hit and run case

    Chandrapur highway hit and run case : वरोरा, चंद्रपूर (२३ सप्टेंबर २०२५): वरोरा-नागपूर-चंद्रपूर महामार्गावर आनंदवन चौकाजवळ एका भरधाव ट्रकने दुचाकीला (स्कूटर) धडक दिल्याने ३० वर्षीय महिला गंभीर जखमी झाली. धडकेनंतर ट्रकने ॲक्टिवा स्कूटरला सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले, ज्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. हा अपघात २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला.

    बच्चू कडू यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात चक्काजाम आंदोलन

    अपघाताची माहिती

    पौर्णिमा प्रमोद कोल्हे (वय ३०, रा. देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागे, वरोरा) या त्यांच्या MH-34 CK 7880 क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने नागपूर-चंद्रपूर मार्गावरून आनंदवन चौकाकडे जात होत्या. त्याचवेळी, नागपूरकडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या ॲक्टिवाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे पौर्णिमा कोल्हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या.

    ट्रक चालक फरार

    ट्रकने महिलेला धडक दिल्यानंतर तो न थांबता ॲक्टिवाला फरफटत घेऊन गेला. सुमारे एक किलोमीटरपर्यंत फरफटल्यानंतर ॲक्टिव्हा जळून खाक झाली. यानंतर ट्रक चालक आपला ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला.

    स्थानिकांनी तातडीने जखमी महिलेला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वरोरा पोलीस फरार ट्रक चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

  • Chandrapur crime news 2025 । पाथरी शाळेतील शौचालयात मतिमंद मुलीवर अत्याचार, दोन आरोपी अटकेत

    Chandrapur crime news 2025

    Chandrapur crime news 2025 : चंद्रपूर : मतिमंद मुलीवर गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना २१ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. सावली तालुक्यातील पाथरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेत पाथरी पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह दोघांना अटक केली आहे.

    तो नरभक्षक बिबट जेरबंद

    तुलाराम तानाजी मडावी (२२), विक्की विनोद कोवे (२१) या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायधीशानी त्याची पोलिस कोठडीत रवानगी गेली आहे. तर दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

    संतापजनक

    १८ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास पाथरी गावातील चार जणांनी पीडित अल्पवयीन मुलीला फुस लावून गावाबाहेर असलेल्या शाळेच्या परिसरात घेऊन गेले. तेथील शौचालयात तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर तिला गावात नेऊन सोडून दिले. ही बाब घटनेच्या चार दिवसानंतर म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या आईच्या लक्षात आली.

    पीडितेच्या आईने लगेच पाथरी पोलिस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी कलम (६४ (१), ६४ (२), (आय), ६४ (२) के, ६४ (२) एम, ७० (१), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. पुढील तपास पाथरी ठाणेदार नितेश डोर्लीकर करत आहेत.

  • leopard captured in Gadbori village Chandrapur । सिंदेवाहीत बिबट्याची दहशत संपली – गडबोरीतील हल्लेखोर बिबट वनविभागाच्या ताब्यात

    leopard captured in Gadbori village Chandrapur

    leopard captured in Gadbori village Chandrapur : सिंदेवाही, चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावात एका आठ वर्षांच्या मुलाला ठार करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. २१ सप्टेंबर रोजी रात्री १०:५६ वाजता वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला, ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गडबोरी गावात निर्माण झालेला तणाव काही प्रमाणात निवळला आहे. Sindewahi leopard trapped by forest department

    बचत गटाच्या मासिक सभेत घडली दुर्घटना

    काय घडले होते?

    गडबोरी येथील आठ वर्षांचा चिमुकला, प्रशिल बबन मानकर, हा आपल्या काकांच्या जवळ होता. त्याचवेळी, बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला तोंडात पकडून झुडपात नेले. या हल्ल्यात प्रशिलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आणि ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ पकडण्यासाठी वनविभागावर दबाव आणला होता.

    वनविभागाची कारवाई आणि आमदार वडेट्टीवार यांचा पुढाकार

    या गंभीर घटनेची दखल घेऊन, वनविभागाने तात्काळ बचाव पथक (Rescue Team) आणि कॅमेरे व पिंजरे लावून बिबट्याचा शोध सुरू केला. परिसरातील झुडपांची साफसफाई देखील करण्यात आली होती, जेणेकरून बिबट्याची हालचाल सहज लक्षात येईल.

    याच दरम्यान, ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी गडबोरी गावाला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली, ग्रामस्थांशी संवाद साधला आणि मानकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, त्यांनी वनविभागाला तात्काळ बिबट्याला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे वनविभागाच्या कामाला अधिक गती मिळाली.

    आमदार वडेट्टीवार यांच्या आदेशानंतर आणि स्थानिक वनविभागाच्या अथक प्रयत्नांमुळे, अखेर २१ सप्टेंबरच्या रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या बिबट्याला सिंदेवाही येथील नर्सरीत सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

    या यशस्वी कामगिरीमुळे गडबोरी आणि आसपासच्या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाकडून अधिक उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

  • Ladki Bahin e-KYC Maharashtra । लाडकी बहीण योजनाः e-KYC अनिवार्य, २ महिन्यात केवायसी पूर्ण करा

    Ladki Bahin e-KYC Maharashtra

    Ladki Bahin e-KYC Maharashtra : चंद्रपूर २२ सप्टेंबर २०२५ – ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. तसेच पुढील दोन महिन्यात लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. या प्रक्रियेमुळे भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    बचत गटाच्या मासिक सभेत सिमेंट रेलिंग कोसळली, ३ महिला जखमी

    राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य-पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनातर्फे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. महिला व बाल विकास विभागाकडून ई-केवायसी माध्यमातून लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण केले जाणार आहे. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, महिला स्वतःच्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील, अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. लाभार्थीनी गोंधळून न जाता तसेच कोणीही आर्थिक मागणी करीत असेल त्यास बळी पडू नये असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

    अशी आहे प्रक्रिया

     : https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर KYC फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे. यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही. जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल. Official Ladki Bahin e-KYC portal

    जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल. जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल. यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटनावर क्लिक करावा. त्यानंतर लाभार्थ्याला आपला प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील.

    1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

    2. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे. शेवटी, ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.