Tag: News34 chandrapur

  • Ahetesham Ali joins Congress । वरोरा-भद्रावतीत भाजपला मोठा धक्का; माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली काँग्रेसमध्ये!

    Ahetesham Ali joins Congress

    Ahetesham Ali joins Congress : चंद्रपूर : चंद्रपूर -वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या कार्यशैलीवर प्रेरित होवून वरोरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, भाजपचे माजी जिल्हा सचिव तसेच भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अहेतेशाम अली यांनी समर्थकांसह काँग्रेसमध्ये रविवारी पक्षप्रवेश केला. नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

    Also Read : खासदार धानोरकर यांच्या मागणीवर ताडोबा प्रशासन नरमल, स्थानिकांना जंगल सफारी मध्ये सवलत

    मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल २१ हजारांहून अधिक मते मिळवून अहेतेशाम अली यांनी आपला मजबूत जनाधार सिद्ध केला होता. एनएसयूआय व युवक काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करून ते वरोरा शहर काँग्रेसचे अध्यक्षही राहिले. मात्र, २०१४ साली माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांच्या सोबत त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. गेली दहा वर्षे ते भाजपमध्ये सक्रिय होते. २०१६ च्या वरोरा नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून जिल्ह्यातील सर्वाधिक मतांनी नगराध्यक्षपद मिळवले होते. Warora Bhadrawati political news

    लोकशाही वाचविण्यासाठी कांग्रेस पक्षात प्रवेश

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या सर्वसमावेशक कार्यशैलीवर प्रभावित होऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. लोकशाही वाचविण्याच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. Pratibha Dhanorkar leadership

    यावेळी भद्रावती भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, दादापाटील झाडे (संचालक, नंदोरी सेवा सहकारी संस्था), अशरफ खान (जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजरी), आशिष ठाकरे, बंडूभाऊ लभाने, सादिक अली, शाहिद अली, धर्मेंद्र हवेलीकर, अनिल खडके (माजी सरपंच), मारोती झाडे (माजी सरपंच, टेमुर्डा), गणेश जोगी (ग्रामपंचायत सदस्य, फत्तापूर), जयंत चंदनखेडे, सुभाष वाटकर (पंचायत समिती प्रमुख, बोर्डा), सौ. चंद्रकलाताई मते (अध्यक्ष, महिला गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा), जितुभाऊ कांबळे (ग्रामपंचायत सदस्य, बोर्डा) यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

    माजी नगराध्यक्ष अली हे भाजप पक्षातून निलंबित असले तरी त्यांचे पक्षात मोठे स्थान होते.

    अहेतेशाम अली यांच्यासह समर्थकांच्या काॅंग्रेस प्रवेशामुळे वरोरा-भद्रावतीसह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला बळ मिळणार असून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे हात आणखी बळकट होणार आहेत.

  • Kishor Jorgewar graduate voter initiative । पदवीधर मतदार नोंदणी मोहिमेत चंद्रपूर अव्वल ठेवण्याचा आमदार किशोर जोरगेवारांचा निर्धार!

    Kishor Jorgewar graduate voter initiative

    Kishor Jorgewar graduate voter initiative : चंद्रपूर ४ ऑक्टोबर २०२५ – पदवीधर हा समाजातील सुशिक्षित घटक आहे. त्याचे मत केवळ मतदानापुरते मर्यादित नसते, तर ते समाजाला दिशा देणारे असते. त्यामुळे प्रत्येक पदवीधर मतदार म्हणजे लोकशाहीचा बळकट दुवा आहे. या दुव्यांना जोडल्याशिवाय लोकशाहीची साखळी मजबूत होणार नाही. त्यामुळे उत्तम नियोजन करत प्रत्येक पदवीधर मतदारांची नोंदणी करून नोंदणी प्रक्रियेत चंद्रपूर मतदार संघ अव्वल ठेवा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : चंद्रपुरात २८५ जणांना शासकीय नोकरीचे नियुक्तीपत्र वाटप

    भारतीय जनता पार्टीच्या वतीने पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी अभियान राबविण्यात येणार असून, शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, दशरथसिंह ठाकुर, महामंत्री सविता दंढारे, अरुण तिखे, मंडळ अध्यक्ष अॅड. सरिता संदुरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. Chandrapur BJP graduate voter enrollment campaign

    भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पदवीधर मतदार नोंदणी अभियान ही केवळ औपचारिकता नसून, भारतीय जनता पार्टीच्या भविष्यातील राजकीय प्रवासाचा पाया आहे. पदवीधर मतदार नोंदणीमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला पाहिजे. आजच्या या बैठकीत आपण उत्तम नियोजन करून पुढे जाण्याचा निर्धार करा. नोंदणी मोहिमेत दैनंदिन आढावा घेणे आवश्यक आहे. प्रत्येक दिवसाची आपली प्रगती, आलेल्या अडचणी यांचा दैनंदिन आढावा घ्यावा, संघटित नियोजन करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत कार्यकर्त्यांना केल्या.

    प्रत्येक पदवीधर मतदाराचा सहभाग ही लोकशाहीची ताकद आहे. आपण संघटित नियोजन, सातत्यपूर्ण प्रगती आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ही मोहीम यशस्वी करू. पदवीधर म्हणजे केवळ शिक्षणाची पदवी मिळालेली व्यक्ती नव्हे, तर समाजाला मार्गदर्शन करण्याची क्षमता असलेला नागरिक आहे. त्यामुळे पदवीधर मतदार संघासाठीच्या निवडणुकीत पदवीधरांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे, असे ते यावेळी म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 । चंद्रपूरमध्ये ‘भाऊचा दांडिया’ महोत्सवाचा भव्य समारोप; विजेत्यांना लाखोंची बक्षिसे

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025

    Chandrapur Bhaucha Dandiya Winners 2025 : चंद्रपूर (४ ऑक्टोबर २०२५) – “दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रेरणा आणि चंद्रपूरकरांचे प्रेम यांमुळेच हा महोत्सव दरवर्षी अधिक उत्साहाने पार पडतो,” अशा भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-भाऊचा दांडिया’ या सोहळ्याचे चौथे वर्ष दिनांक २ ऑक्टोबर रोजी  थाटामाटात संपन्न झाले. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृतीला वंदन करत सलग अकरा दिवस (२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) चांदा क्लब मैदानावर दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी गुणवंत कलाकारांना दुचाकीसह लाखो रुपयांच्या रोख पुरस्कारांचे वितरण करून त्यांच्या कलागुणांना सन्मानित करण्यात आले.  Bhaucha Dandiya Festival Chandrapur

    Also Read : खासदार धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केले चक्काजाम आंदोलन

    हा अकरा दिवसांचा रंगारंग कार्यक्रम केवळ दांडियाचा मनमुराद आनंद देणारा नव्हता, तर शिक्षण, क्रीडा, कला, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत मान्यवरांचा गौरव करण्याचा एक महत्त्वाचा मंच ठरला.

    अनुराग घोरपडे आणि मनीषा सरकार चॅम्पियन

    समारोपावेळी दांडिया स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चॅम्पियन पुरुष गटातून अनुराग घोरपडे आणि चॅम्पियन महिला गटातून मनीषा सरकार यांनी दुचाकी आणि सन्मानचिन्ह पटकावले. याशिवाय, किंग मध्ये धनंजय मेश्राम आणि क्वीन मध्ये सुष्मिता मलिक यांनी पारितोषिक मिळवले.

    bhaucha dandiya festival chandrapur

    यावेळी रील स्पर्धा, ग्रुप दांडिया, लहान गट आणि ३५ वर्षांवरील महिला गटातील स्पर्धकांनाही रोख बक्षिसे देऊन प्रोत्साहन देण्यात आले. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आयोजित या महोत्सवामुळे चंद्रपूरकरांना एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची आणि दांडिया खेळण्याची उत्तम संधी मिळाली. या यशस्वी आयोजनाबद्दल स्पर्धकांनी व नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शहरातील काँग्रेसचे विविध पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

  • Nitin Bhatarkar Efforts Chandrapur । राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या पाठपुराव्याला यश; सभागृह नूतनीकरणासाठी मंजुरी

    Nitin Bhatarkar Efforts Chandrapur

    Nitin Bhatarkar Efforts Chandrapur : चंद्रपूर (५ ऑक्टोबर २०२५):- वेकोली च्या दुर्गापूर वसाहत क्षेत्रातील पुर्णपणे तुटलेले कामगार मनोरंजन केंद्र अद्ययावत करणेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नाला यश आले असून कामगार मनोरंजन केंद्राचे आता अद्ययावत नूतनीकरण होणार आहे.

    Also Read : तहसील कार्यालयात शेतकऱ्याने केले विष प्राशन, तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    वेस्टर्न कोलफिल्डस लिमीटेड चंद्रपूर क्षेत्रातील दुर्गापूर वसाहतीतील कामगार मनोरंजन केंद्र असलेल्या एकमेव सभागृहात वेकोली वसाहतीतील कामगारांच्या परिवारातील तसेच कॉलनी लगत असलेल्या परिसरातील नागरिकांचे लग्नसोहळयांसह सुखदुःखाचे मोठ्या स्वरुपात कार्यक्रम होत असते. यासंपुर्ण परिसरात ते एकमेव सभागृह असल्याने अनेकांचा प्राधान्य याच सभागृहात कार्यक्रम करण्याकरीता असतो. Chandrapur Western Coalfields colony social hall

    यामुळे सततचा पाठपुरावा

    मात्र जवळपास २०-२५ वर्षापासून या सभागृहाची डागडुगी वा नव्याने दुरुस्ती झालेली नाही. सभागृहावरील असलेले टिनपत्रे तुटून असल्याने मोठ्या प्रमाणात त्यामधून पाण्याची गळती होत असते तसेच भिंतीला सुध्दा अनेक ठिकाणी तडे गेलेले असून दरवाजे सुध्दा तुटलेल्या अवस्थेत होते यामुळे पुर्णपणे नादुरुस्त असलेल्या व जीर्ण झालेल्या सभागृहात भविष्यात दुर्घटना सुध्दा घडण्याचे नाकारता येत नव्हते व म्हणूनच सदर सभागृहाचे नुतनीकरण करण्या संदर्भात सतत पाठपुरावा करण्यात आला.

    सतत पत्रव्यवहार

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस साहेब, खासदार श्री प्रफुल पटेल साहेब, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अशोक उईके साहेब, मा. व्यवस्थापकीय संचालक, वेकोली, नागपूर, मा. क्षेत्रीय व्यवस्थापक वेकोली चंद्रपूर क्षेत्र, स्थानिक खासदार व आमदार यांच्याशी सतत पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला.

    आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेड कंपनी कार्यालयाचे पत्र क्रमांक वेकोली / चक्षे / महाप्र / सिविल / अम्लाधिकारी / डीपी – १३६३ / ६११५ दिनांक २३.०९.२०२५ रोजी सदर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी कंत्राट देण्यात आलेला असून सदर कंत्राटाची किंमत ५९ लाख ८४ हजार ९७० रुपये ६६ पैसे इतकी आहे. लवकरच या सभागृहाचे अद्ययावत नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल.

  • Tehsildar and Naib Tehsildar suspended । भद्रावती शेतकरी विषप्राशन प्रकरण: तहसीलदार व नायब तहसीलदार निलंबित

    Tehsildar and Naib Tehsildar suspended

    Tehsildar and Naib Tehsildar suspended : भद्रावती (३ ऑक्टोबर २०२५) – शेती संबंधित प्रकरणात न्याय न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने तहसील कार्यालयात विषप्राशन केल्याच्या गंभीर घटनेनंतर, महाराष्ट्र शासनाने तातडीने कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शासनाचे अवर सचिव प्रवीण पाटील यांनी या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

    शेतकऱ्याला न्याय नाकारल्याने उचलले टोकाचे पाऊल

    मोरवा येथील परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५) या शेतकऱ्याने तालुक्यातील कुरोडा येथील गट क्रमांक ८६, ८७, ९५ आणि ९८ मधील जमिनीच्या अभिलेखात वारसांची नावे नोंदवण्यासाठी सातत्याने मागणी केली होती. यासाठी त्यांच्याकडे २०१५ चा न्यायालयीन आदेश देखील होता. मात्र, निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी या आदेशाची अंमलबजावणी न करता, “मालकी हक्काबाबत वाद आहे” असे कारण देत अर्ज फेटाळून लावला.

    Also Read ; चंद्रपुरात ड्राय डे च्या दिवशी दारूविक्री, पोलिसांनी केली कारवाई

    अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या मेश्राम यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी भद्रावती तहसील कार्यालयातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Bhadravati land dispute government officer suspension

    महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

    या अत्यंत दुर्दैवी घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली. महसूल अधिनियम १९६६ आणि महाराष्ट्र नागरी सेवा आचारसंहिता नियम १९६९ चे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाच्या जनसामान्य विरोधी कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    वादग्रस्त कार्यकाळामुळे राजेश भांडारकर चर्चेत

    निलंबित झालेले तहसीलदार राजेश भांडारकर यांचा कार्यकाळ आधीपासूनच वादग्रस्त ठरला होता. त्यांच्यावर अवैध रेती उत्खनन, मुरूम उत्खनन प्रकरणे, कार्यालयात गैरहजेरी, शेतकऱ्यांच्या लोकअदालतीत अनुपस्थिती आणि नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित ठेवण्याचे अनेक आरोप होते. नागरिकशास्त्र संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल बदखल यांनी त्यांच्या विरोधात वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. शेतकरी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर प्रशासनाला अखेर कठोर भूमिका घ्यावी लागली, असे चित्र आहे.

  • Chandrapur government recruitment news । चंद्रपूरमध्ये 285 जणांना शासकीय नियुक्तीपत्रे; अनुकंपाधारकांना दिलासा

    Chandrapur government recruitment news

    Chandrapur government recruitment news : चंद्रपूर, दि. 03 : राज्य शासनाने 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अनुकंपाधारकांना नियुक्ती देणे, या बाबीचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये ही कार्यवाही पूर्ण करण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील 202 अनुकंपाधारक आणि 83 सरळसेवा भरती उमेदवार, असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते देण्यात येईल. या कार्यक्रमाचे आयोजन 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आले आहे. 

    Also Read : चंद्रपूर महाकाली महोत्सवाची सांगता

      अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या गरजू कुटुंबांसाठी शासनाकडून एक अत्यंत महत्वाचा  निर्णय घेण्यात आला. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रक्रियेला गती देऊन जिल्हा प्रशासनाने शेकडो कुटुंबांच्या जीवनात आशेचा नवा किरण आणला आहे. या नियुक्तीमुळे केवळ नोकरीच नाही, तर ज्या कुटुंबाने आपल्या कर्त्या पुरुषाला गमावले आहे, त्या कुटुंबांना मोठा भावनिक आणि आर्थिक आधार मिळाला आहे. हे नियुक्तीपत्र म्हणजे केवळ एक शासकीय कागद नसून, ते एका कुटुंबाच्या उज्वल भविष्याची पुनर्स्थापना आहे. Chandrapur compassionate appointment 2025

    285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे

    जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या परिश्रमांमुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत. यात जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील गट – 3 आणि गट – 4 च्या 202 उमेदवारांना तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या लिपीक – टंकलेखक (गट – 3) च्या 83 उमेदवारांना असे एकूण 285 जणांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात येणार आहे.

                अनुकंपाधारक उमेदवारांमध्ये राज्य शासनाच्या वतीने गट – ‘क’ चे 59, गट – ‘ड’ चे 69 (दोन्ही मिळून 128 उमेदवार), जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाच्यावतीने गट – ‘क’ चे 21, गट – ‘ड’ चे 26 (47 उमेदवार), नगर विकास विभाग, महानगरपालिका / नगरपालिका / नगर परिषदेच्या वतीने गट – ‘क’ चे 12, गट – ‘ड’ चे 15 (27 उमेदवार) असे 202 अनुकंपाधारक तर सरळ सेवा भरती द्वारे लिपीक – टंकलेखक म्हणून नियुक्ती झालेले 83 उमेदवार असे एकूण 285 जणांचा समावेश आहे.

    यापूर्वी, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आणि अधीक्षक नरेश बहिरम यांच्या मार्गदर्शनात 3 सप्टेंबर 2025 रोजी अनुकंपाधारकांचा मेळावा आणि 13 सप्टेंबर 2025 रोजी सरळसेवा अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती. यात उपलब्ध पदे, शैक्षणिक अहर्ता, पात्रता, वेतनश्रेणी, कामाचे स्वरूप, पदोन्नतील संधी, विशेष प्राविण्य, तंत्रज्ञ, शासकीय सेवेची जबाबदारी व कर्तव्य आदी माहिती देण्यात आली होती. या समुपदेशनामुळे शासकीय नोकरीत येणा-या नवनियुक्त उमेदवारांचे मनोबल उंचावण्यास मदत झाली.

  • Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav । सोनाली कुलकर्णींची महाकाली महोत्सवाला भेट; भक्तिरसाने भारलेले वातावरण

    Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav

    Sonali Kulkarni at Mahakali Mahotsav : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – श्री माता महाकाली महोत्सव केवळ भक्तीचा उत्सव नसून लोकउत्सव आहे. समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक धर्म, प्रत्येक जात या महोत्सवात सहभागी होते. ही एकता म्हणजेच आपल्या संस्कृतीचे सामर्थ्य आहे. महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून आपले धार्मिक महत्त्व देशपातळीवर पोहोचविण्याचे कार्य आपण करत असून यात चंद्रपूरकरांची मिळत असलेली साथ उत्साहवर्धक आहे. हा महोत्सव म्हणजे भक्ती, संस्कृती आणि सामाजिक ऐक्याचा लोकउत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Chandrapur Cultural Tourism

    ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार धानोरकरांचं चक्काजाम आंदोलन

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आयोजित पाच दिवसीय श्री माता महाकाली महोत्सवाचा बुधवारी नवदाम्पत्य यांच्या हस्ते यज्ञ आणि महाप्रसादाने समारोप करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात महोत्सव समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. यावेळी महोत्सवात सेवा देणाऱ्या सर्व समाज आणि सेवकांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, या पाच दिवसांत आपण कन्यापूजन, नवदाम्पत्यांच्या हस्ते होमहवन, सुहासिनींना सौभाग्याचा चुडा, ज्येष्ठ मायमाऊलींचा सन्मान, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम, समाजजागृती उपक्रम, महिला सक्षमीकरण, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशा असंख्य उपक्रम घेण्यात आले. हे सर्व उपक्रम फक्त धार्मिक कर्तव्य नसून, ते आपल्या समाजजीवनात संस्कार रुजवणारे दीपस्तंभ आहेत.

    पालखी सोहळ्यात भक्तांचा महासागर

    नगर प्रदक्षिणा पालखी सोहळ्यात भक्तांचा महासागर उफाळून आला. शहरातील प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली माता भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला. संपूर्ण चंद्रपूर या दिवसांत भक्तिरसाने ओतप्रोत भरून गेले. महोत्सवामुळे चंद्रपूरची कीर्ती दूरवर पोहोचली आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वर्षागणिक वाढत आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही चंद्रपूरचे महत्त्व वाढत असून, आपल्या शहराचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भक्तिभावाची परंपरा जगासमोर पोहोचत आहे. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी असंख्य संस्था, स्वयंसेवक, कलाकार, महिला मंडळे, महोत्सव समितीचे पदाधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या या सेवेला मी वंदन करतो. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या महोत्सवाचा सन्मान असल्याचे ते यावेळी म्हणाले. Kishor Jorgewar Mahakali Mahotsav

    चंद्रपूर हे इतिहासाचा, संस्कृतीचा आणि श्रद्धेचा ठेवा आहे. गोंडवाना साम्राज्याची ही राजधानी, ‘काळ्या सोन्या’चे भांडार असलेल्या या भूमीला ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मान मिळवून दिला आहे. माता महाकालीच्या मंदिराला वर्षानुवर्षे भाविक येथे येतात, त्यामुळेच हा महोत्सव केवळ उत्सव नसून भक्तीचा दीपोत्सव असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    यावेळी महोत्सव समितीचे उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, सुनील महाकाले, सचिव अजय जयस्वाल, सहसचिव बलराम डोडाणी, कोषाध्यक्ष पवन सराफ, सहकोषाध्यक्ष राजेश शास्त्रकार, विश्वस्त मिलिंद गंपावार, प्रभाकर मंत्री, जयश्री कापसे–गावंडे, वंदना हातगावकर, आशा महाकाले, सविता दंडारे आदींची उपस्थिती होती. Mahakali Palkhi Yatra

    mahakali mahotsav

    श्याम धोपटे, मुक्ता बोझावार, एकता पित्तूलवार, अलका ठाकरे, सुमेधा श्रीरामे, राजश्री मार्कंडेवार, रजनी पॉल, श्रद्धा एडलावार, भारती कोटकर, सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर, धनंजय तावडे, सुरक्षणा गायवकवाड यांनी पाच दिवस संचालनाची व्यवस्था सांभाळली. तर आरती संचामध्ये मनीषा पडगीलवार, राज ताटपल्लीवार, सार्थक उत्तरवार, मैथील कुंभरे, सुचिता पद्मावार, रिद्धी राऊत आदींची उपस्थिती राहिली. ज्येष्ठ नागरिक संघ, गायत्री परिवार, निर्मला माता सहज योग ध्यान साधना केंद्र यांच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम झाले. मंच व्यवस्था डॉ. आम्रपाली देवगडे, अतिथी गडकरी, प्रीती बिंद यांनी सांभाळली.

    सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी महोत्सव स्थळी

    महोत्सवाच्या चौथ्या दिवशी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी महाकाली महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते मातेची महाआरती करण्यात आली. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नियोजनबद्ध आयोजन आणि विविध सामाजिक उपक्रम याबद्दल सोनाली कुलकर्णी यांनी आयोजनाचे कौतुक केले.

  • Chandrapur Foreign Liquor Seized | ड्राय डे च्या दिवशी चंद्रपुरात दारूविक्री

    Chandrapur Foreign Liquor Seized

    Chandrapur Foreign Liquor Seized : चंद्रपूर ३ ऑक्टोबर २०२५ – २ ऑक्टोबर गांधी जयंतीला देशभरात ड्राय डे असतो त्यानंतरही काहीजण अवैधरित्या दारूची विक्री करतात, असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात घडला. पोलिसांनी यावेळी १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा विदेशी दारूसाठा पकडला.

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी दारूचा साठा

    २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त ड्राय डे असतो, त्यानंतरसुद्धा छुप्या पद्धतीने दारू विक्री केल्या जाते, चंद्रपूर शहरातील एकोरी वार्डात छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलटें यांना मिळाली.

    घरून सुरु होती दारूविक्री

    माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी एकोरी वॉर्डातील ५६ वर्षीय सुनीलकुमार राजकुमार मुल्ले यांच्या राहत्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी विदेशी दारूचा १ लाख ५४ हजार ४९० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांनी आरोपी मुल्ले ला अटक करीत महाराष्ट्र दारी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शार पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि कोलटें, निकोडे, पोलीस कर्मचारी लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, सचिन बोरकर. निकेश ढेंगे, जावेद सिद्दीकी, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, प्रफुल भैसारे, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, विक्रम मेश्राम, दीपिका झिंगरे व सारिका गौरकार यांनी केली.

  • Chandrapur Ravan Dahan Cancelled । परंपरेला ब्रेक! विजयादशमीला रावण दहन न झाल्याने नागरिक हताश; कारण जाणून तुम्हीही म्हणाल ‘योग्य निर्णय’

    Chandrapur Ravan Dahan Cancelled

    Chandrapur Ravan Dahan Cancelled : चंद्रपूर – चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून सतत रावण दहनाचा कार्यक्रम महाकाली मंदिर परिसरात केल्या जातो मात्र यंदा रावण दहन कार्यक्रम झाला नाही, नागरिक विजयादशमी २ ऑक्टोबर रोजी महाकाली मंदिर परिसरात मोठ्या संख्येत पोहोचले मात्र त्यांच्या हाती केवळ निराशा आली.

    अवघ्या ४ तासात आरोपी अटक, वाहनचालक मास्टरमाइंड

    रावण दहनाचा कार्यक्रम का रद्द झाला? महाकाली महोत्सवाच्या पेंडाल मुळे तर कार्यक्रम रद्द झाला नाही ना? अशी चर्चा कार्यक्रम बघायला आलेल्या हताश नागरिक करीत होते. समाज माध्यमांवर कार्यक्रम का खंडित झाला अश्या विविध चर्चा रंगल्या होत्या. नागरिकांना आधी वाटलं कि महाकाली महोत्सवाच्या पंडाल मुळे कार्यक्रम रद्द झाला असेल पण तस काहीच झालेलं नव्हतं.

    अतिवृष्टी मुळे कार्यक्रम रद्द

    याच उत्तर सार्वजनिक दसरा महोत्सव मंडळाने २ ऑक्टोबर रोजीच दिले, सध्या राज्यात सर्वत्र पावसामुळे हाहाकार माजला आहे. अनेकी जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने लाखो नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला. त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी बघता महाकाली मैदानात साजरा होणार दसरा महोत्सव आयोजकांनी रद्द केला. याबाबत शहरात त्यांनी बॅनर लावलेले होते.

    flood relief

    सण उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात नागरिक साजरे करतात, मात्र त्या पूरग्रस्त नागरिक व शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहत आपण यंदा महोत्सव साजरा करायचा नाही असा विचार मनात आणत दसरा महोत्सव मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. रावण दहन बघण्यासाठी आलेले नागरिक हताश झाले होते मात्र आयोजक मंडळाच्या निर्णय कळल्यावर त्यांनी त्यांचे कौतुक केले.

  • Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar | चंद्रपूरच्या विकास कामांची प्राजक्ता माळीने घेतली दखल, मुनगंटीवारांचा गौरव

    Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar

    Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar : मुल २ ऑक्टोबर २०२५ -‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्राजक्ता माळी तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आणतात, तेच हास्य मॉं दुर्गादेवी आणि माता महाकालींनी तुमच्या चेहऱ्यावर सदैव ठेवावे. नवरात्रोत्सव चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी आहेच, पण कृती अशी करा की माझ्या आणि तुमच्यामुळे वंचित आणि गरीबांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले पाहिजे. गरिबांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझ्या कामाचे समाधान आहे, अश्या भावना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

    धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतला आढावा

    मुल येथे आयोजित ‘भाऊंचा गरबा’ महोत्सवात ते बोलत होते. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळ सदस्य प्रकाश धारणे, रत्नमाला भोयर,नंदू रणदिवे, प्रभाकर भोयर, हरीश ढवस, चंद्रकांत आष्टणकर, अखिल गांगररेड्डीवार, अमोल चुदरी,प्रशांत बोबाटे, सूरज मांदाडे, रुपेश निकोडे, राकेश ठाकरे,विद्या बोबाटे,भावना चौखुंडे भाजपा मुल शहर व ग्रामीणचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Prajakta Mali Bhaucha Garba Chandrapur

    आ. मुनगंटीवार यांनी कार्तिकी प्रभाकर भोयर आणि जान्हवी नंदू रणदिवे या दोघींनी अतिशय नियोजनबद्ध महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

    आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमा मालिनी एकदा येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी मुल शहराचे भरभरून कौतुक केले. येथील लोक खूप चांगले आहेत, असे त्या म्हणाल्या. माझ्याही मतदारसंघात असंच काम करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला तेथे यावं लागेल आणि तुम्ही या, असे म्हणत त्यांनी या शहराचं महत्त्व विषद केलं होते.’

    चंद्रपुरातील लोक हे सोन्यासारखे आहे

    ‘जेव्हा भारत आणि चीनचं युद्ध सुरू झालं, तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला धावून गेले. तेव्हा याच मुलचे कर्मवीर स्व. मा. सा. कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले. ते मुख्यमंत्री झाले. तेव्हा भारत- चीनच्या युद्धासाठी शस्त्र घ्यायची आहेत आणि त्यासाठी पंडित नेहरूंनी सुवर्णदान करा असे आवाहन केले. तेव्हा देशात सर्वात जास्त सोनं दान करणारा जिल्हा चंद्रपूर होता. येथे केवळ सोनं दान करणारी लोक नाहीत, तर सोन्यासारखी लोक आहेत,’ असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी गौरव केला. Sudhir Mungantiwar achievements

    prajakta mali bhaucha garba chandrapur

    ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आपल्या भाषणात आ. मुनगंटीवार यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्या म्हणाल्या, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ चंद्रपूर जिल्ह्यासाठीत नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी भरपूर काम केले आहे. संपूर्ण देशाला हेवा वाटावा, असं बॉटनिकल गार्डन येथे आहे. वन खात्यासाठी, ताडोबासाठी त्यांनी केलेलं काम सगळ्यांना माहिती आहेच. टाटा कॅन्सर हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, आर्थिक, आरोग्य, सांस्कृतिक, वने सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कार्य केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. Chandrapur political news 2025

    आ.सुधीर मुनगंटीवार यांना विकासपुरुष का म्हटलं जातं?

    त्या पुढे म्हणाल्या, ‘आ.सुधीर मुनगंटीवार यांना विकासपुरुष का म्हटलं जातं याची प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातील विकास बघून येते. त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे मी प्रेरीत झाले आहे. मुल शहरात येत असताना चौपदरी सिमेंटचे रस्ते बघितले. या शहरात सुंदर, सुसज्ज नाट्यगृह, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, सिंचन सुविधा आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.’ Prajakta Mali speech on Sudhir Mungantiwar

    आमदार श्री. मुनगंटीवार यांच्यासोबत माझी पहिली भेट नागपुरात झाली होती. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि माॅं जिजाऊंवर भाषण दिले होते. ते भाषण ऐकून मी थक्क झाले. कारण इतिहासाचा इतका दांडगा अभ्यास असलेला नेता मी पहिल्यांदा पाहिला. त्यांनी फक्त भाषणच दिले नाही, तर आपल्या कृतीतून या आदर्शांवर प्रत्येक पाऊल टाकत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं त्यांनी लंडनहून मातृभूमीत परत आणून दाखवली. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि देशप्रेम ओतप्रोत भरून असलेलं एकत्रित रसायन म्हणजे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार आहेत.आमदार मुनगंटीवार या जिल्ह्याचे नेतृत्व करतात आणि मी येथे राहात नाही, याचे दुःख आहे. तुम्ही लोक भाग्यवान आहात. मला तुमचा हेवा वाटतो, असेही प्राजक्ता माळी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.