Join the Congress Party ब्रम्हपुरी तालुक्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विकासाचा झंजावात व काँग्रेस पक्षाच्या विचार सरणीला प्रेरित होऊन तालुक्यांतील बरड किन्ही येथील अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत आज विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला खिंडार पडली आहे.
Join the Congress Party गेल्या १० वर्षापासून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी क्षेत्र विकासासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. तद्वतच संपुर्ण क्षेत्रांतील सर्व समाजाला समान न्याय, शिक्षण, आरोग्य, क्रीडा, अनेक सामजिक कार्य यासह अत्यावश्यक मूलभूत गरजा पुर्ण करुन नागरिकांच्या अडचणी दूर केल्या.
अशा विविध कार्यांना प्रेरित होऊन ब्रम्हपुरी तालुक्यांतील बरडकिन्ही येथील भाजपचे कट्टर समर्थक असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये महेंद्र राऊत, देवनाथ पाकडे, अमोल तोंडरे, सुरज नाकतोडे, कार्तिक नाकतोडे, रुपेश मैंद, सुधीर दोनाडकर, ,आदित्य शेंडे,भूपेश शेंडे, सुरज खोब्रागडे यांचा समावेश आहे. Join the Congress Party
आयोजित पक्ष प्रवेशाप्रसंगी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, ब्रह्मपुरी काँग्रेस विधानसभा युवक अध्यक्ष सोनू नाकतोडे, पोपटे सर व बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर बरड किन्ही येथील भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश यामुळे भाजपला खिंडार पडली असुन भाजीपाला लागलेल्या गळतीचा आगामी निवडणुकांमध्ये परिणाम जाणवणार हे निश्चित मानले जात आहे.
Unauthorized power flow महावितरणने घेतली गंभीर दखल…कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास होणार गुन्हा दाखल
Unauthorized power flow चंद्रपूर : – वन्य प्राण्यांपासून होणारी पिकाची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. परंतु त्यामुळे वन्य प्राण्यांबरोबरच शेतात कामांसाठी गेलेल्या आणि अनावधानाने कुंपणास स्पर्श करणा-या शेतकऱ्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे.
शिवाय यासाठी वीजही आकडे टाकून चोरून वापरत असल्याचे दिसून आले आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितावर विद्युत कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मागिल काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. Unauthorized power flow
याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले की, शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज प्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतक-यांचेही मृत्यू झाल्याच्या काही घट्ना उघडकीस आल्या आहेत.
एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीजचोरी बरोबरच सदोष मनुष्यवध यांसारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणवर थोपण्याचा आणि महावितरण कडून भरपाई मागण्याचा कल देखील दिसून येत आहे. Unauthorized power flow
महावितरणने घेतली गंभीर दखल: वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकोडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी, तांत्रिक कर्मचारी तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारात गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी हा प्रकार आढळला तर संबंधित शेतक-यावर विद्युत कायदा 2003 च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.
आकोडे टाकून वीज चोरी करून शेताच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडणा-या शेतक-याला यापुढे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून संभाव्य जीवित हानीची शक्यता लक्षात घेता याबाबत फौजदारी गुन्हाही नोंदविला जाऊ शकतो याची दखल घेत शेतकऱ्यांनी स्वतः या प्रकारामध्ये सहभागी होऊ नये आणि कोणी सहभागी होत असल्यास त्याला तसे करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन देखील महावितरणने केले आहे.
chandrapur bjp leader भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान आमदार किशोर जोरगेवार व राज्याचे माजी राज्यमंत्री तथा माना समाजाचे दिग्गज नेते डाॅ. रमेशकुमार गजभे यांची घरवापसी झाल्याने पक्षाची राजकीय ताकद शतपटीने वाढली असून या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भाजपाला पुनर्वैभव प्राप्त होईल असा विश्वास पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला.
Chandrapur bjp leader जिल्ह्यात भाजपाचे प्रबळ संघटन अस्तित्वात असून जोरगेवार व गजभे या लोकप्रिय नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे चंद्रपूर, वरोरा, चिमुर सह संपुर्ण जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षाला मोठ्या प्रमाणात जनाधार लाभणार असून भाजपा या प्रवेशाने पुन्हा संघटनात्मकदृष्ट्या मजबुत होईल असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
भाजपामध्ये प्रवेश करणारे किशोर जोरगेवार हे महायुतीचे चंदपूर विधानसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असल्यामुळे त्यांच्या प्रवेशाने अनुसुचित जाती वर्ग भाजपाप्रती अनुकुल राहील तसेच डाॅ. गजभे यांच्या राजकीय क्षेत्रातील गाढा अनुभव व अनुसुचित जमाती प्रवर्गात प्रभाव राखणाऱ्या या नेत्याचा निवडणुकीत मोठा लाभ होईल असे सांगत सर्व समाजामध्ये असलेला उभयतांचा प्रभाव दखलपात्र ठरेल असा आशावादही हंसराज अहीर यांनी व्यक्त केला असून या दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे त्यांनी स्वागत केले आहे.
cdcc bank recruitment शासनाचे नियम आणि आरक्षण धोरणानुसारच बँकेची नोकर भरती, विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नये – संतोषसिंह रावत
cdcc bank recruitment (गुरू गुरनुले) मुल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या नोकर भरतीची वास्तविकता न तपासता संतोषसिंह रावत यांच्या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची, नोकर भरती मधून आरक्षण हटवले, अशा प्रकारचे निराधार वृत्त प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून काही मंडळी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बँकेच्या प्रगती मध्ये बाधा पोहोचवण्याचे काम हेतुपुरस्सर करीत असल्याचे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
बँकेची निकड आणि मागणी लक्षात घेवुन बँकेतील रिक्त पद भरण्यासाठी प्रशासनाने शासन नियमाचे पालन करत शासन स्तरावर पाठपुरावा केला. दरम्यान काही सत्ताधारी मंडळींनी नोकर भरतीला प्रखर विरोध दर्शविल्याने सदरची भरती आज पर्यंत होऊ शकली नाही. शेवटी बँकेची वास्तविकता परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने आवश्यक असलेली पदे भरण्यासाठी बँकेला परवानगी दिली.
शासनाच्या त्या परवानगी पत्रानुसार नोकर भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणाने सुरू आहे. असे असताना काही मंडळी नोकर भरती मधून आरक्षण हटविले, असे कारण समोर करून हेतुपुरस्सर बदनाम करण्याचे उद्देशाने निराधार वार्ता प्रसारित करीत आहेत. cdcc bank recruitment
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्च २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत पारित झालेल्या ठरावानुसार महाराष्ट्र शासनाचे बँकेकडे असलेले शासकीय भाग भांडवल (Govt. Shears) रक्कम रुपये १२ लाख ७१ हजार भरणा केलेला आहे. शासकीय नियमानुसार ज्या सहकारी बँकेकडे शासनाचे भाग भांडवल शिल्लक नाही, त्या बँकांना आरक्षण नियम नियम २००१ लागू होत नाही. असे असताना नोकर भरतीला लागू असलेल्या आरक्षण बिंदू नामावली संदर्भात मार्गदर्शन करावे म्हणून दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी बँक प्रशासनाने सहकार आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला. cdcc bank recruitment
तेव्हा शासनाचे सहकार आयुक्त यांनी शासनाचे विधी व न्याय विभाग आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरतीची कार्यवाही करावी, असे बँक प्रशासनाला निर्देश दिले. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शासनाचे भागभांडवल नाही, त्यांना आरक्षण अधिनियम २००१ चे नियम लागू होत नाही. असा स्पष्ट निर्वाळा असताना राज्य शासनाचे सहकार आयुक्त पुणे यांचे पत्र क्रमांक १७५९ दिनांक २८ सप्टेंबर २०२१ आणि शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या निर्देशानुसार नोकर भरती संदर्भात बँक प्रशासन सकारात्मक आणि पारदर्शीफणाने कार्यवाही करीत आहे. असे असताना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता काँग्रेसने शब्द पाळला. आरक्षण हटविले, अश्या आशयाच्या खोट्या बातम्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करून बेरोजगार युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. cdcc bank recruitment
विरोधकांची ही कृती धादांत चुकीची, नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारी आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मी बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रामधुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवित असल्याने मला बदनाम करण्यासाठी खोट्या आणि निराधार बातम्या प्रसारित करीत असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले असून नागरिकांनी विरोधकांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता वास्तविस्ता लक्षात घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
Independent candidate गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रभर गाजत असलेल्या आणि भरपूर रस्सीखेच सुरू असलेल्या 72 बल्लारपूर मतदारसंघांमधील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले.
Independent candidate गेल्या दहा दिवसापासून 72 बल्लारपूर मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे तिकीट कुणाला मिळेल यावरून भरपूर रस्सीखेच आणि चर्चेला उधाण आलेलं होतं, मुंबईपासून दिल्लीपर्यंत या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भरपूर चर्चा सुरू होती.
मतदारसंघांमधील शिक्षित सक्षम महिला ओबीसी उमेदवार म्हणून डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांचे नाव आघाडीवर होतं आणि त्यांनी गेल्या दहा-पंधरा वर्षा पासून सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं होतं आणि गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी मूल बल्लारपूर मतदारसंघांमध्ये प्रतिभाताई धानोरकर या काँग्रेस उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. Independent candidate
अशा परिस्थितीमध्ये जर डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान पालकमंत्री आणि राज्यातील मातब्बर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक जड जाईल अशी चर्चा जिल्हाभरामध्येच नाहीतर राज्यभरामध्ये सुरू होती आणि त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी प्रचंड प्रयत्न सुद्धा केल्या गेले.
राहुल गांधी यांचं संख्येच्या प्रमाणामध्ये मागासवर्गीयांना प्रतिनिधीत्व देण्याचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये लागू करण्याचा प्रयत्न सुरू केला होत आणि म्हणून ही उमेदवारी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनाच मिळणार अशा कयास मतदारसंघातील मतदारांचा होता पण काँग्रेसमधील गटातटाचा राजकारणामध्ये एका सक्षम उमेदवाराचा बळी गेला आणि ती उमेदवारी डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना न मिळता संतोष सिंग रावत यांना काँग्रेसने जाहीर केली यानंतर डॉक्टर अभिलाषा ताई गावतुरे कोणते पाऊल उचलतात याकडे सर्व मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागलं होतं.
अभिलाषा गावतुरे यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा मतदारसंघातील जनतेची असल्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता मात्र आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मुल येथील तहसील कार्यालयामध्ये अपक्ष म्हणून सादर केला.
शक्ती प्रदर्शन
गेल्या तीन दशकापासून मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना कोणी सोडून राहिलेलं नाही आणि म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आमची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मतदार आम्हाला भरघोस प्रतिसाद देतील अशी अपेक्षाही डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केली.
75 lakh cash seized महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी (दि.29) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 105 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
75 lakh cash seized 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), रेशमा गणपत चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण मधुकरराव फुसे (अपक्ष), प्रवीण रामदास सातपाडे (अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे ( भारतीय जनता पार्टी), मंगेश हिरामण गेडाम (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी), गजानन गोदरु जुमनाके (गोडवाना गणतंत्र पार्टी), अरुण रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), भूषण मधुकर फुसे (संभाजी ब्रिगेड), किरण गंगाधर गेडाम (अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), अभय मारोती डोंगरे (बहुजन समाज पक्ष), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आणि वामन उद्धवजी आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.
75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण धोंडोजी सुर (मनसे), जयवंत नथुजी काकडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), दिनेश दादाजी चोखारे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), महेश पंढरिनाथ ठेंगणे (अपक्ष), रमेश कवडूजी मेश्राम (गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि अपक्ष), नामदेव किसनाजी ढुमणे (अपक्ष), मुकेश मनोजराव जीवतोडे (अपक्ष), अंबर दौलतराव खानेकर ( राष्ट्रीय समाज पक्ष), सेवकदास कवडूजी बरके ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक), प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), सुमितकुमार नामदेव चंद्रागडे (अपक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष) यांनी आज नामांकन अर्ज दाखल केले. 75 lakh cash seized
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे. 75 lakh cash seized
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 च्या अनुषंगाने पेट्रोलींग दरम्यान 75,00,000/- रु.(पंचहत्यात्तर लक्ष रु.) ची रोकड जप्त (चंद्रपूर पोलीसांची कामगिरी)
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -2024 च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाÚयांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज दिनांक 29/10/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी.पथकाने संयुक्तरित्या तपासणी केली.
सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी वाहन धारकाकडे विचारपुस केली असता, वाहन धारकाने रोख रक्कम एकुण 75,00,000/- रु. (अक्षरी रु.पंचहत्यात्तर लक्ष) वाहतुकी बाबतचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे. 75 lakh cash seized
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस.टी.पथक वरोरा यांनी केली आहे.
shetkari sangathan महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दरम्यान राजकीय पक्ष व अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली.
shetkari sangathan चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा क्षेत्रात विरोधकांना हादरविणारं शक्ती प्रदर्शन आज बघायला मिळालं, शेतकरी संघटना व परिवर्तन महाशक्ती चे उमेदवार माजी आमदार वामनराव चटप यांनी जंगी प्रदर्शन केले.
हजारोंच्या संख्येत विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या हक्काच्या माणसाला समर्थन देण्यासाठी राजुरा शहरात दाखल होत नामांकन रॅलीत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला.
शक्ती प्रदर्शन
अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने युवा, वयोवृद्ध महिला पुरुष या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाले होते, वामनराव चटप हे सामाजिक कार्यात अग्रेसर, राजकीय अनुभव व थेट जनतेच्या मनातील माणूस म्हणून त्याची ओळख आहे.
राजुरा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात कांग्रेसचे आमदार सुभाष धोटे, भाजपचे देवराव भोंगळे उभे आहे, यंदा शेतकरी संघटनेची थेट लढत कांग्रेस पक्षासोबत असणार आहे व यावेळी राजुरा विधानसभेत परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे.
BJP manifesto विकासाच्या बाबतीत मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तो कायम अग्रेसर रहावा यासाठी जनता पाठीशी आहे. जनतेच्या सूचनांमधूनच निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
BJP manifesto ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सोमवारी (ता.२८) अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा आणि प्रगतीचा जाहीरनामा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मांडला आहे. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही तर रयतेचे वचन पत्र आहे.
या वचनपत्राला जनताही डोक्यावर घेईल.’ राज्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यातील लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावांचे महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी भाजपा महायुतीला निवडून देतील हा विश्वास आहे, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.
माझ्या मतदारसंघाशिवाय स्टार प्रचार म्हणूनही माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघातून जास्तीत जास्त वेळ काढून मी इतर मतदारसंघात प्रचार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. BJP manifesto
राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जाहीर करण्याचे भाग्य लाभले. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा विश्वास राज्य गीतातून महाराष्ट्राला दिलेला आहे. त्याच दिल्लीतील सरकारचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचे स्थिर सरकार आम्ही आणणार आहोत, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे विशेष भर दिला. विविध समाजाच्या हक्काचे समाजभवन गावागावांमध्ये निर्माण करण्यात आले. ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी ग्रामिण आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण केले. विविध रोजगाराभिमुख प्रकल्पांच्या माध्यमातून क्षेत्रातील गावागावांतील हजारो युवक, महिला, नागरिकांना हक्काचे रोजगार देण्याचेही काम झाले. BJP manifesto
याशिवाय गावागावांमध्ये रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देण्याचे काम केले. या सर्व कामांमुळे जनतेच्या जीवनात सुलभता आली आहे. त्यामुळे जनता जनार्दन यावेळी देखील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहिल. केवळ बल्लारपुरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहिल, असाही विश्वास ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
Shakti pradarshan विधानसभा निवडणुकीच्या नामांकन रॅलीत आज जिल्ह्यातील 3 वारांनी आपली ताकद दाखवीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
Shakti pradarshan बल्लारपूर विधानसभेतील मतदारानों, तुम्हीच आहात बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार, आता विकासाचा हा रथ अधिक वेगाने पुढे नेऊया’, अशी साद घालत प्रचंड गर्दीच्या साक्षीने ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरताना मुल शहरात बाजार चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत भव्य रॅली काढून विजयाची खात्री दिली.
उमेदवारी अर्ज भरताना माजी केंद्रीय मंत्री फग्गनसिंह कुलस्ते, ज्येष्ठ भाजप नेते चंदनसिंह चंदेल,सौ. सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,माजी जि प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, अल्का आत्राम, विद्याताई देवाळकर, डॉ. मंगेश गुलवाडे, रत्नमाला भोयर,चंदू मार्गोनवार, प्रभाकर भोयर, नंदू रणदिवे, विनोद देशमुख, राहुल संतोषवार, अजित मंगळगिरीवार, रामपाल सिंह, हनुमान काकडे, राजू बुद्धलवार, किशोर पंदीलवार, निमगडे गुरुजी, वंदना आगरकाटे,रोशनी खान, सुलभा पीपरे ,खेमा रायपुरे,पूजा डोहने,वर्षा लोनबले, किरण गापगते, मंगेश पोटवार, विशाल नागुलवार यासह आदि भाजपा व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. Shakti pradarshan
यावेळी माध्यमांशी बोलताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी आणखी एक पाऊल आज टाकत आहे. माता महाकालीचा आशीर्वाद घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झालो आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रेम, शुभेच्छा आणि आशीर्वादाची ऊर्जा माझ्यासोबत आहे. सातव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभा राहताना जनकल्याणाचा वसा पुढे चालविण्याचे ध्येय आहे.’ विकासाचा झंझावात कायम ठेवून बल्लारपूर मतदार संघ राज्यात अव्वल ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
पुढे बोलताना ना.मुनगंटीवार म्हणाले, ‘जनतेच्या सर्वांगिण विकासासाठी मी काम केले आहे. आताही गोरगरीबांच्या कल्याणाचे ध्येय ठेवूनच मी निवडणूक लढविणार आहे. अशा स्थितीत कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता आपल्या मनाचे ऐका. आपल्याला पुढील पाच वर्षे दुःखात घालवायची आहेत की आनंदात, याचा विचार करा, असे आवाहन करीत ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या निवडणुकीत मी तुमचा उमेदवार म्हणून उभा नाही तर तुम्हीच सारे उमेदवार आहात, या शब्दांत जनतेच्या हृदयाला स्पर्श केला. Shakti pradarshan
विजय वडेट्टीवार शक्तिप्रदर्शन
या महाराष्ट्र राज्याशी आमच्या छत्तीसगड राज्याचे अतिशय जवळचे नाते आहे. संतांच्या या पावन भूमीला, छत्रपती शिवाजी महाराज,थोर क्रांतिकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांचा वारसा लाभला. मात्र महाराष्ट्र द्रोही भाजपवाल्यांनी सत्ता कारणासाठी महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम केले. तसेच महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मिती कार्यातही कमिशन खोरी केली. Shakti pradarshan
अशा महापापी सत्तापिपासुंना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपण सजग राहावे. ही लढाई स्वाभिमानी महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. असे प्रतिपादन छत्तीसगड राज्याची माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केले. ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नामांकन दाखल प्रसंगी ब्रम्हपुरी येथे आयोजित सभेत बोलत होते. Shakti pradarshan
आज महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामांकन दाखल केले. तत्पूर्वी पार पडलेल्या सभेस छत्तीसगड राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंश बघेल, काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विजय वडेट्टीवार, गडचिरोली – चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान, काँग्रेसचे ओझा, प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार,बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्र उमेदवार संतोषसिंह रावत, ॲड, राम मेश्राम, संदिप गड्डमवार, प्राचार्य जगनाडे, खेमराज तिडके,दिनेश चिटनुरवार, प्रमोद चिमूरकर, रमाकांत लोधे, नितिन गोहने, आदिवासीं नेते अवचितराव सयाम, ॲड. गोविंद भेंडारकर, धीरज शेडमाके, यशवंत दिघोरे, तसेच महिला आघाडी, युवक काँग्रेस, एनएसयुआय, तथा काँग्रेस पक्षाच्या सर्व सेल व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांची पदाधिकारी व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. Shakti pradarshan
यापुढे बोलताना छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, महाराष्ट्रातील काही भाजपवाल्यांनी सत्ता प्राप्तीसाठी आमदारांचा बाजार भरवून खोके देऊन त्यांची खरेदी केली. इथले उद्योग पळविल्या गेले. प्रचंड बेरोजगारी व महागाईचा जनतेला सामना करावा लागत आहे. हे महायुतीचे प्रचंड मोठे पाप असून महाराष्ट्रातील महायुती ही महाराष्ट्र द्रोही आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. तर संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्र सुपुत्र विजय वडेट्टीवार यांनी विरोधी बाकावर बसून किल्ला लढविला. या महाराष्ट्राने लोकसभेत मोदींना पराभवाची धूळ चारून ट्रेलर दाखविला आगामी विधानसभेत या महायुतीला संपूर्ण पिक्चर दाखवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. Shakti pradarshan
किशोर जोरगेवार यांचं जोरदार शक्तिप्रदर्शन
आज, सोमवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह जंगी शक्तिप्रदर्शन करत भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी निघालेल्या रॅलीचे विविध ठिकाणी पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप नेते तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भाजप चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, अशोक जीवतोडे, चंद्रपूर जिल्हा महानगर प्रमुख भरत गुप्ता, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, आरपीआय (आठवले गट) चे गौतम तोडे, हरीश दुर्योधन, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रज्वलंत कडू, सूरज पेदुलवार, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सविता कांबळे, प्रकाश देवतडे, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, सलीम शेख, राशिद हुसेन, सविता दंढारे, सायली येरणे, विमल काटकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. Shakti pradarshan
चंद्रपूरचे अपक्ष आमदार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट ) आणि मित्रपक्ष महायुतीच्या वतीने चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले असून आज सोमवारी त्यांनी भव्य मिरवणूक काढत आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे. यावेळी निघालेल्या मिरवणुकीचे सर्वधर्मीयांच्या वतीने ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले. दुपारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयातून सदर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी महायुतीतील हजारो कार्यकर्ते आणि जोरगेवार समर्थक सहभागी झाले होते.
सदर भव्य मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने होत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मागील पाच वर्षांत आपण अनेक विकासकामे करू शकलो असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांनाही प्राधान्याने पूर्ण करायचे आहे. सुरू झालेला हा विकासपर्व अधिक गतीशील करायचा आहे, यासाठी आपली साथ आणि आशीर्वाद असाच राहावा, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केला.
Nomination Application in Chandrapur District महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि.28) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.
Nomination Application in Chandrapur District 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात प्रिया बंडू खाडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), संजय यादवराव धोटे (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), चित्रलेखा कालिदास धंदरे (अपक्ष), सुदर्शन भगवान निमकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष), देवराव विठोबा भोंगळे (भारतीय जनता पार्टी), सचिन बापूराव भोयर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गजानन गोदरू पाटील जुमनाके (गोंडवाना गणतंत्र पार्टी), प्रवीण रामराव कुमरे (बहुजन मुक्ती पार्टी) आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले.
71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्हारी पाईकराव (अपक्ष), राजेश भीमराव घुटके (अपक्ष), जोरगेवार किशोर गजानन (भारतीय जनता पार्टी), प्रियदर्शन अजय इंगळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी व अपक्ष), प्रवीण नानाजी पडवेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), मिलिंद प्रल्हाद दहिवले (केंद्रीय मानवाधिकार संगठन व अपक्ष), ज्ञानेश्वर एकनाथ नगराळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-अ), भानेश राजम मातंगी (अपक्ष) आणि भुवनेश्वर पद्माकर निमगडे (अपक्ष) यांचा समावेश आहे. Nomination Application in Chandrapur District
72- बल्लारपूर विधानसभामतदारसंघात किशोर बंडू उईके (अपक्ष), संजय नीलकंठ गावंडे (अपक्ष), रामराव ओंकार चव्हाण (अपक्ष), निशा शीतलकुमार धोंगडे (अपक्ष), राजू देवीदास जांभुळे (अपक्ष), सतीश मुरलीधर मालेकर (वंचित बहुजन आघाडी), कुणाल पुरुषोत्तम गायकवाड (अपक्ष), सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार (भरतीय जनता पार्टी), अरुण देवीदास कांबळे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिर्फॉमिस्ट) आणि अभिलाषा राकेश गावतुरे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात विनोद अंबादास नवघडे (अपक्ष), कृष्णा सहारे (भारतीय जनता पार्टी), वसंत वर्जूर्कर (अपक्ष), अनंता भोयर (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक). Nomination Application in Chandrapur District
74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात अरविंद आत्माराम चांदेकर (वंचित बहुजन आघाडी), अनिल अंबादास घोंगळे (अपक्ष), सतीश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), हेमंत गजानन दांडेकर (अपक्ष), धनंजय मुंगले (अपक्ष), कैलास श्रीहरी बोरकर (अपक्ष), प्रकाश नान्हे (अपक्ष), डॉ. हेमंत सुखदेव उरकुडे (अपक्ष).
75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष), राजू मारोती गायकवाड. (अपक्ष), जयवंत नथ्थुजी काकडे (अपक्ष), जयंत मोरेश्वर टेमुर्डे (अपक्ष), अहेतेशाम सदाकत अली (प्रहार जनशक्ती), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भारतीय जनता पार्टी), मुकेश मनोज जिवतोडे (शिवसेना उबाठा आणि अपक्ष), चेतन गजानन खुटेमाटे (अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष) यांनी नामांकन दाखल केले. Nomination Application in Chandrapur District
महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर असून, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर पर्यंत आहे.