maha vikas aghadi राज्यात परिवर्तनाची लाट… गाफील राहू नका – विजय वडेट्टीवार, मुल येथे महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक
Maha vikas aghadi राज्यात महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून यामुळें राज्यातील शेतकरी, शेतमजूर नौकरदार, कर्मचारी, महीला वर्ग, विध्यार्थी, बेरोजगार तरुण – तरुणी यांच्यात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. तसेच राज्यांत गगनाला भिडलेली महागाई, महीला अत्याचार, गंभीर गुन्हे , गुंडाराज या सर्व बाबींमुळे हे भ्रष्ट महायुती सरकार सपेशल अपयशी ठरले आहे. आता राज्यांतील नागरीकांना परिवर्तन हवे असून येणारा सत्ताकाळ हा महाविकास आघाडीचा आहे.
Maha vikas aghadi यामुळे कसलेही गाफील न राहाता प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि विजय मिळवा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते बल्लारपूर – मुल विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या प्रचाराच्या नियोजनार्थ आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकी प्रसंगी बोलतं होते.
आयोजित बैठकीस काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी तथा मध्यप्रदेश आमदार कुणाल चौधरी, महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत, शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, संदीप गड्डमवार, घनश्याम मुलचंदाणी, चंदू पाटिल मारकवार, बेबी उईकें, सूर्यकांत खणके, मयूर राईकवार, प्रकाश गांगरेड्डीवार, सुनील समर्थ, सुमित उनाडकट, रामकृष्ण ओंद्रा, प्रमोद बोरीकर, दिलीप माकोडे, के. के. सिंग, अशोक निमगडे, डॉ.सुरेश महाकुलकर, चित्रा डांगे, करीम भाई शेख,गोविंद उपरे, कवडू कुंदावार तथा अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते. Maha vikas aghadi
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यांतील महायुती हेकेखोर सरकार केवळ कमिशन खोरी, भ्रष्ट्राचार, उद्योगपतींची चाकरी करणारे आहे. येथील प्रकल्प गुजरातला पाठवून यांनी महाराष्ट्राशी गद्दारी केली. राज्याची अस्मिता गुजरातला गहाण ठेवणाऱ्या या लुटारु सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठीं आपण तन – मन – धनाने महाविकास आघाडीचे हात बळकट करावे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी १८० ते १८५ जागा जिकणार असा सर्वे कर्त्यांचा अंदाज आहे. आता वेग वाढवा विरोधकांच्या खोटारड्या डावाला हाणून पाडा. असे आवाहन ही त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना महाराष्ट्र प्रभारी आमदार कुणाल चौधरी म्हणाले की, संतांच्या या पावन भूमीत महाभ्रष्ट , मनुवादी भाजप कडून थोर पराक्रमी राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळा निर्मितीत भ्रष्ट्राचार करून त्यांचा अवमान केला जातो. जाती धर्मामध्ये भांडणे लावली जातात. देश विकायला काढणाऱ्या या महापापी साम्राज्याला सत्तेतून पूर्णतः हद्दपार करण्यासाठी आपण सर्व एकजुटीने काम केले पाहिजे असे ते म्हणाले.
या प्रसंगी महाविकास आघाडी उमेदवार संतोषसिंह रावत आणि सामजिक कार्यकर्ते चंदू पाटिल मारकवार, यांनी बल्लारपूर – मुल विधानसभा क्षेत्रात विकासाच्या थापा मारणाऱ्या भाजप नेते सुधिर मुनगंटीवार यांच्या फोल प्रचाराचा विशेष शैलीत खरपूस समाचार घेतला. यावेळी बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
Chandrapur Bjp Worker आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करून महायुतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत असून शहरी भागासह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांनी प्रचारात पुढाकार घेत बैठकींचा तडाखा लावला आहे.
Chandrapur Bjp Worker या बैठकींना नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. काल पार पडलेल्या बैठकांमध्ये भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डाहुले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला आघाडी अध्यक्ष सविता कांबळे, भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, राकेश पिंपळकर, विजय बलकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विधानसभा निवडणुकीची रंगत आता वाढू लागली असून सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. मात्र महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांनी प्रचारात चांगली आघाडी घेतली असून मतदारसंघातील शहरी भागासह ग्रामीण भागातही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. Chandrapur Bjp Worker
भाजप कार्यकर्ते निवडणुकीत स्वतःला झोकून देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत अनेक बैठकांमध्ये योग्य ते मार्गदर्शन केले आहे, परिणामी भाजप कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागल्याचे दिसत आहे.
दरम्यान, शहरातील भिवापूर वार्ड येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांशी संवाद साधला. तर मोरवा, येरुर, साखरवाही येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकींनाही आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि हा उत्साह मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे आवाहन केले.
भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने कामाला लागला आहे. मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागाच्या विकासासाठी आपण मोठा निधी उपलब्ध करून देत दिला असून यातून येथे मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुढेही ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासाचा संकल्प आपला आहे. पक्षाचा विचार आणि आपली विकासकामे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमचा प्रत्येक कार्यकर्ता करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकींना ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ladki bahin yojana money राज्यातील महायुती सरकार काळात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच राज्यातील महीला भगिनींच्या समर्थनार्थ कठोर कायदे करून योग्य सुरक्षा पुरावीण्याऐवजी महायुती सरकारने सत्ताकाळात शासन तिजोरीवर डल्ला मारत सत्तेच्या मदमस्तीत जनतेला वाऱ्यावर सोडले.
ladki bahin yojana money राज्यातील महायुती सरकार काळात अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच राज्यातील महीला भगिनींच्या समर्थनार्थ कठोर कायदे करून योग्य सुरक्षा पुरावीण्याऐवजी महायुती सरकारने सत्ताकाळात शासन तिजोरीवर डल्ला मारत सत्तेच्या मदमस्तीत जनतेला वाऱ्यावर सोडले.
आता निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून आमच्या महिला भगिनींना “लाडकी बहीण’ म्हणून काही महिन्यांपूरते दीड हजार देऊ करत त्यांची मते वळविण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविला जात आहे. अशा हेकेखोर, स्वार्थी, लुटारु व राज्याची अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महाभ्रष्ट महायुतीला आता मतदानातून धडा शिकविणे काळाची गरज आहे.
जर राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली तर प्रतिमाह अडीच हजार रुपये दिले जाईल अशी ग्वाही राज्याचे विरोधी तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील मालडोंगरी येथे आयोजित कार्यकर्ता बैठकी प्रसंगी भाऊबीज निमित्ताने उपस्थीत महिला भगिनिंशी संवाद साधला. ladki bahin yojana money
पुढें बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझी आजवरची राजकीय कारकीर्द ही विकासासह, समाजकारण व जनसेवेसाठी समर्पित आहे. माझ्या विधानसभा क्षेत्रांतील महिला भगिनिंसाठी महीला बचत गट, उमेद कार्यकर्त्या आशा वर्कर, महीला गृहउद्योग, व इतर भगिनींसाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न चालविले.
यात महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्पेट निर्मिती व इतर लघु रोजगारासाठी विकास निधी उपलब्ध करून दिला.
सोबतच ब्रम्हपुरी शहरात गारमेंट्स व्यवसायाला चालना देऊन भविष्यात अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी माझी धडपड सुरू आहे.महायुती कडून “लाडकी बहीण’ हा केवळ निवडणूकी पुरता लॉलीपॉप असुन त्यांच्या खोट्या अमिषाला बळी पडू नका. आगामी काळात महाराष्ट्रात आमची सरकार येताच महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना २५०० प्रतिमाह लाभ देणार. ladki bahin yojana money
सोबतच शाळकरी मुली, महीला यांना विशेष संरक्षण देणारे कठोर कायदे करून महिलांना सन्मानाने बिनधास्त जगण्यासाठी आधार देणार. देशाचे संविधान वाचवण्यासाठी आमच्या लढ्यात सहभागी होऊन आपण महाविकास आघाडीचा भाग व्हा. असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. ladki bahin yojana money
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, कम्युनिस्ट पक्षाचे विनोद झोडगे, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, शहर काँग्रेस अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, जिल्हा बँक उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष सुरज मेश्राम, डॉ.नितीन उराडे, अनुसूचित जाती सेलचे प्रमोद मोटघरे, किसान काॅंग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, कृउबा किशोर राऊत यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Cdcc bank chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती वरून सध्या चांगलंच राजकारण तापलं असून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संचालक मंडळ पैसे द्या पद घ्या ही प्रक्रिया राबवित असल्याचा आरोप करीत बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर कारवाई करीत त्यांची विधानसभेची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
Cdcc bank chandrapur या आरोपावर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत म्हणाले की सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने होत असून यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही आहे, मी निवडणुकीत उमेदवार असल्याने मला हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा डाव विरोधी पक्षमार्फत सुरू असल्याची प्रतिक्रिया रावत यांनी दिली.
मनसेचे राजू कुकडे यांचे आरोप काय?
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेमध्ये येत्या 15 ते 17 नोव्हेंबर ला 360 पदाकरिता होत असलेली परीक्षा ही वादात सापडली आहे, कारण उच्च न्यायालयात ही भरती प्रक्रिया टी.सी.एस या नामांकित कंपनी मार्फत पारदर्शकपणे पार पाडू असे बँकेमार्फत शपथपत्रावर लिहून देण्यात आले होते आणि त्यानंतरच न्यायालयाने या भरतीस मान्यता दिली, मात्र बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने ठराव घेऊन आपल्या मार्जिच्या ITI या कंपनीला नोकर भरतीच्या परीक्षेचे काम देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे.
शासनाच्या लाभाच्या अनेक योजना बैंक राबवित असल्याने शासन निर्णयानुसार मागासवर्गीय असलेल्या ओबीसी एससी, एसटी व एनटी उमेदवारांना आरक्षण लागू असतांना त्यांचे आरक्षण रद्द करून आणि अवैध पद्धतीने शैक्षणिक व वयोमर्यादेत बदल करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 30 ते 50 लाख रुपये ITI कंपनी एजंट व संचालक मंडळाकडून घेतले जात आहे, त्यामुळे या भरतीस पात्र असणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने आचारसंहितेत बेकायदेशीरपणे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची चौकशी करून ही पद भरती रद्द करण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व ओबीसी, एसएसी, एसटी व एनटी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मनसे तर्फे बैंकेच्या भ्रष्ट संचालक मंडळा विरोधात आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. Cdcc bank chandrapur
दरम्यान 30/10/2024 ला आचारसहिंता असतांना बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी बैंकेतर्फे गटसचिव व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व कार्यालयीन नियमीत, कंत्राटी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करून मतदारास प्रलोभन दिल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी पण त्यांनी केली.
मागील कित्तेक वर्षांपासून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत नोकर भरती झाली नसल्याने बैंकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलल्या जात होते, मात्र जेंव्हा जेंव्हा पद भरती करण्याची घोषणा व्हायची तेंव्हा तेंव्हा न्यायालयीन व तांत्रिक बाबीमुळे पद भरती राखडली, आता या पद भारतीला मार्च 2024 ला सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून टी.सी.एस या नामांकित कंपनी मार्फत परीक्षा घेण्याकरिता मान्यता मिळाली असतांना पाच महिन्यांनतर आचारसहिंता काळात बैंकेचे अध्यक्ष संतोससिंग रावत यांना विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी ही पद भरती होत असल्याचे दिसत आहे. Cdcc bank chandrapur
दरम्यान सध्याचे बँकेचे संचालक मंडळ २०१२ साली अस्तित्वात आले होते व त्यांची ५ वर्षाची मुदत २०१७ सालीच संपली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर भरती प्रक्रिया राबविणे यासारखे धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार या संचालक मंडळास नाही. बैंकेने जाहिरात काढताना शासनाने ठरवून दिलेल्या आरक्षण धोरणानुसार सर्व प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या नाहीत. कारण यांना गेल्या ५ वर्षांपासून बँकेत तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या आणि ज्यांच्याकडून नोकरीच्या बदल्यात पैसे घेतले आहेत अशांची निवड यांना करावयाची आहे.
या जुन्या लोकांना नोकरी देता यावी म्हणून अवैध पद्धतीने वयोमर्यादा शिथिल करणे, शैक्षणिक पात्रतेत बदल करणे व फॉर्म भरण्याची मुद्दत वाढविणे या गोष्टी केल्या आहेत. यामुळे चुकीचे आरक्षण, अवैध पद्धतीने शैक्षणिक व वयोमर्यादेत केलेले बदल हे भरतीस पात्र असणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्यायकारकच आहे.
संचालक मंडळ व नोकर भरती विरोधात न्यायालयात याचिका
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बैंकेने दिलेल्या शपथपत्रानुसार नोकर भरतीची कार्यवाही होतांना दिसत नसून न्यायालयाची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने भरती केली जात असल्याबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही शासनाने बँकेला दिल्या आहेत. या बैंकेच्या संचालक मंडळाची मुदत 2017 लाचं संपून आता जवळपास 6 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असल्याने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून कायद्यानुसार निवडणुका घ्याव्यात याबाबतची याचिका सुद्धा न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. Cdcc bank chandrapur
बँकेचे विद्यमान अध्यक्ष रावत हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यानंतरही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत 19 ऑक्टोबर असतांना पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी ती 22 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बँकेच्या अध्यक्ष आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही भरती प्रक्रिया घाई घाईने उमेदवारांना पैशांच्या बदल्यात नोकरी देण्यासाठी राबविली असल्याचे स्पष्ट होते व बैंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांचा या भरती प्रक्रियेतून निवडणुकीसाठी मोठा निधी उभा करण्याचा मानस असल्याचे सिद्ध होते. Cdcc bank chandrapur
परंतु ही सर्व भरती प्रक्रिया अवैधरित्या, चुकीच्या पद्धतीने पैशासाठी राबविली जात असल्याने याबाबत शासन, निवडणूक आयोग, न्यायालय, पोलीस विभाग या विविध स्तरांवर अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर लवकरच कारवाई होईल आणि भरती प्रक्रिया रद्द होईल त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी एससी, एसटी व एनटी च्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेतून नोकरी लावण्याचे आमिष कोणी देत असेल तर त्या भूलथापांना बळी पडू नका. Cdcc bank chandrapur
किंबहुना असे कोणी आमिष दाखवत असेल तर त्याची तक्रार पोलिसांकडे करा आणि या चुकीच्या आणि आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण संपविणाऱ्या बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळ यांच्या विरोधात एकत्र या असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले आहे. Cdcc bank chandrapur
नियमाबाह्य संचालक मंडळ?
चंद्रपूर जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2012 मध्ये 5 वर्षासाठी झाल्या. वास्तविक पाहता 2017 मध्ये निवडणूक काही न्यायालयीन अडथळा निर्माण झाल्याने अजुनपावेतो निवडणुका झाल्या नाही. या 12 वर्षाच्या कालावधीत संचालक मंडळाविरुद्ध 4 पोलीस/ACB च्या कार्यवाह्या,न्यायालयात चार्ज शीट दाखल, म.रा.सहकारी कायद्याच्या कलम 88 अंतर्गत आर्थिक नुकसान ₹3.47 कोटी वसुलीची कार्यवाही, कलम 79 चे निर्देश इत्यादी अनेक तक्रारी असतांना त्याच संचालक मंडळाकडून नोकर भरती करण्यास सहकार विभाग सहकार्य करून भष्ट्राचारास खतपाणी घालत आहे. Cdcc bank chandrapur
बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची प्रतिक्रिया काय?
विधानसभा निवडणुकीत मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने विरोधकांचे षडयंत्र – संतोषसिंह रावत यांचा आरोप
मूल – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती उच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशान्वये पादर्शकपणणे सुरू असतांना काही मंडळी विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असल्याने विरोधकांच्या आमिषाला बळी पडून आपल्याला हेतुपुरस्सर बदनाम करू पाहत आहेत. बँकेच्या नोकर भरती बाबत ज्यांना आक्षेप आहे. त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा आहे. असे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे. Cdcc bank chandrapur
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ग्राहकांची मागणी आणि बँकेची निकड लक्षात घेवून शासनाने दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ३६० पदे भरण्यास परवानगी दिली, शासनाच्या परवानगी आदेशानुसार बँकेने कार्यवाही सुरू करताच काही जणांनी दबावतंत्राचा वापर करून भरती प्रक्रियेला स्थगिती आणली. याविरूध्द बँक प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केली. दाखल रिट पिटीशन नुसार सर्व दस्तऐवजांची पडताळणी करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने शासनाने बँकेच्या नोकर भरती बाबत दिलेले स्थगिती आदेश रद्द करीत शासन तालीकेतील संस्था/एजंसीकडून बँकेची नोकर भरती करण्यास मान्यता दिली. Cdcc bank chandrapur
त्यानुषंगाने बँक प्रशासनाने शासनाच्या तालीकेवर असलेल्या टीसीएस कंपनीला नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यास इच्छुक असल्यास संम्मती कळविण्यास विनंती केली. त्यानुसार प्रथमता टिसीएस कंपनीने होकार दर्शविल्याने टिसीएस कंपनीच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक असलेली माहिती पुरवून बँकेने करारनामा करण्यास टिसीएस कंपनीला कळविले असता टिसीएस कंपनीने प्रतिसाद दिला नाही. याबाबत बँकेने पाच ते सहा वेळा नोकर भरती संदर्भात टिसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला. परंतू टिसीएस कंपनीने करारनामा करण्यास प्रतिसाद दिला नाही. Cdcc bank chandrapur
या सर्व घडामोळीत पाच ते सहा महिण्यांचा कालावधी लोटून गेल्यानंतर बँक प्रशासनाने पुन्हा शासनाशी पत्रव्यवहार केला. त्या दरम्यान शासनाने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती करीता नव्याने सहा संस्था/एजंसीचे पॅनलची नामावली बँकेला कळविली. टिसीएस कंपनीने बँकेशी करारनामा न केल्यामूळे बँकेने शासनाच्या तालीके मधील इतर संस्थाशी पत्रव्यवहार करून नोकर भरती संदर्भात प्रस्ताव मागविले. Cdcc bank chandrapur
प्राप्त प्रस्तावाची छाणनी अंती सर्वात कमी दर असलेल्या कंपनीचे दरपत्रक मान्य करत त्या एजंसीकडून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यांत आल्यानंतर बँकेच्या नोकर भरती बाबत नियमानुसार व पारदर्शपणाने कार्यवाही सुरू केली. नोकर भरती संदर्भातील ही प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीपासून सुरू आहे. आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील इतरही विभागाकडून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यांत येत आहे, त्यामूळे बँकेच्या नोकर भरती संदर्भात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप निराधार असल्याचेही मत संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. Cdcc bank chandrapur
शासनाच्या विधी व न्याय विभाग तसेच सहकार आयुक्त यांचे निर्देशाप्रमाणे ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे शासनाचे भाग भांडवल नाही, त्या बँकाना आरक्षण अधिनियम २००१ लागु होत नाही, त्यामूळे आरोपकर्त्यांनी नोकर भरती प्रकियेत आरक्षणा संदर्भात भ्रम निर्माण करून जनतेची दिशाभूल करू नये. असा सल्ला संतोषसिंह रावत यांनी दिला.
गटसचिवांना सानुग्रह अनुदान वितरीत केल्याच्या मुद्द्याचे खंडण करतांना संतोषसिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकरी बंधु आणि भगिनींना पिक कर्ज व शेती पुरक कर्ज बँकेला संलग्न असलेल्या सेवा सहकारी संस्था/वि.का./आदिवासी वि.का. संस्थांच्या मार्फतीने करीत असतात. संबंधीत संस्थेचे गटसचिव यांना त्यांच्या दैनदिन कामात प्रौत्साहन मिळावे करीता बैंक कित्येक वर्षांपासून दिवाळीच्या काळात दिवाळीचा सण उत्साहाने साजरा करता यावा म्हणून सानुग्रह अनुदान वितरीत करीत आहे. त्यानुसारच गटसचिवांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यांत आले. Cdcc bank chandrapur
यामध्यें कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले नाही. याची जाणीव असतांना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता नोकर भरती बाबत पुरावे असल्याचे पोकळ वल्गना करून विधानसभा निवडणुकीत निष्कारण त्रास देण्याच्या उद्देशाने आपल्याविरूध्द बिनबुडाचे आरोप करीत आहे. हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
ram nagar police विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच पोलिसांचे अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सत्र सुरू झाले, चंद्रपुर पोलीस दलातील रामनगर पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केली आहे.
ram nagar police 30 ऑक्टोबर रोजी रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध सुगंधित तंबाखू घेऊन जाणाऱ्या युवकाला अटक केली, एक युवक दुचाकी वाहनाने सुगंधित तंबाखू घेऊन जात असल्याची माहिती सहायक पोलीस देवाजी नरोटे यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत बंगाली कॅम्प रोड येथे दुचाकी क्रमांक MH34 BU 8946 ला थांबवित त्याची झडती घेतली असता सदर वाहनात प्लॅस्टिक च्या चुंगडी मध्ये 18 हजार 760 रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व एकूण मुद्देमाल 88 हजार 760 सहित 21 वर्षीय अजय राजू झाडे रा. इंदिरानगर, पंचशील चौक याला अटक केली.
आरोपी युवक अजय झाडे हा बाबूपेठ मार्गाने बंगाली कॅम्प कडे सुगंधित तंबाखूची वाहतूक करीत होता.
दुसऱ्या कारवाईत रामनगर पोलिसांनी 1 नोव्हेंबर ला गुन्हे शोध पथक गस्तीवर असताना बंगाली कॅम्प चौक ते सावरकर चौक मार्गे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक क्रमांक MH34 BG 2216 मधील चालक प्रवीण बाबुराव गुरनुले व नरेश विलास वाढई यांना ट्रक मध्ये असलेल्या रेती परवाना बाबत विचारले असता त्यांनी रेतीचा परवाना नसल्याचे सांगितले. ram nagar police
विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील एकही वाळू घाटाचा लिलाव झाला नसल्याने अधिकृतपणे वाळू घाट सुरू झालेले नाही, त्यामुळे रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपीस ताब्यात घेत 5 ब्रास रेती किंमत 30 हजार व हायवा ट्रक किंमत 25 लाख असा एकूण 25 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ram nagar police
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक असिफ रजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, पोलीस कर्मचारी हिमांशू उगले, पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, प्रशांत शेंदरे, आनंद खरात, लालू यादव, अमोल गिरडकर, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, मनीषा मोरे, ब्युलटी साखरे यांनी केली.
Candidate Vijay Wadettiwar आगामी २० नोव्हेंबर रोजी राज्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील विविध गावातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत राज्यातील भ्रष्ट महायुती सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी काँग्रेस काळात झालेला विकास, नागरीकांना मिळालेल्या विवीध योजनांचा लाभ व संपुर्ण विकासाबाबत माहिती देऊन जोमाने कामाला लागण्याचे आदेश दिले.
Candidate Vijay Wadettiwar राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले. अशातच काँग्रेस नेते, तथा राज्याचे विरोधी पक्षनेते , आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यांतील उदापूर, निलज, पारडगाव, रणमोचन, रुई, बेटाळा, खरकाडा, पाचगाव येथील ग्राम काँग्रेस कमिटी पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेऊन संवाद साधला.
यावेळी मार्गदर्शनपर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातील भ्रष्ट महायुती सरकार काळात सत्ताधाऱ्यांकडून राज्याची तिजोरी लुटल्या गेली. Candidate Vijay Wadettiwar
आता निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने, विवीध प्रलोभने दाखवून जातकरणाच्या गुंत्यात गुरफटण्याचा रडीचा डाव, मनुवादी विचारांच्या भाजपवाल्यांनी सुरु केला आहे.यांच्या भूलथापा व खोटारड्या आमिषांना आपल्या विधानसभा क्षेत्रांतील नागरीकांना बळी न पडू देता गेल्या १० वर्षात मी खेचून आणलेला कोट्यावधींचा विकास निधी, पुर्णत्वास आलेली लोकउपयोगी विकास कामे, सामजिक कार्य, यांची इत्यंभूत माहिती व काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तसेच विकासात्मत विचार जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून राज्यातील भ्रष्ट सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन त्यांनी उपस्थीत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. Candidate Vijay Wadettiwar
आयोजित बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, जिल्हा काॅंग्रेस सचिव विलास विखार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, कृउबा संचालक किशोर राऊत, कृउबा संचालक सोनू मेश्राम, अॅड आशिष गोंडाणे, अनुसूचित जाती सेलचे मुन्ना रामटेके, किसान काॅंग्रेस तालुकाध्यक्ष वामन मिसार, जिल्हा काॅंग्रेस उपाध्यक्ष गुड्डु बगमारे, कृउबा संचालक दिवाकर मातेरे, कृउबा संचालक संजु राऊत, अण्णा ठाकरे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहसीन कुरेशी, निनाद गडे, अतुल राऊत, देवचंद ठाकरे, प्रा.चंद्रशेखर गणवीर, रविंद्र ढोरे, योगेश ढोरे, योगेश तुपट, विजय नाकतोडे, मंगेश दोनाडकर, विलास मेश्राम, पिंटू पिल्लेवान, दादाजी ढोरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Chandrapur Assembly Election प्रेम आणि युद्धात सगळं मान्य असतं, अशी म्हण आहे मात्र ही म्हण राजकारणात शिरल्याने त्यामध्ये सगळंच मान्य असते अशी प्रचिती सिद्ध होत आहे.
Chandrapur Assembly Election नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला, अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली मात्र त्यामध्ये अनेकांना तिकीट नाकारण्यात आले, विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय पक्षात हा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला असून आता त्याच पक्षातील बंडखोर आव्हान द्यायला तयार झाले आहे, मात्र हे करताना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात रडणारे नेते असा उदय झाला, आणि त्या भावनेत खोट्या शब्दांचा एक उड्डाणपूल निर्माण करण्यात आला मात्र आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी त्या खोट्या उड्डाणपूलाला काही क्षणात जमीनदोस्त केले.
चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार हे रिंगणात आहे, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करीत जोरगेवार यांनी तिकीट हिसकावली असे रडगाणं सध्या चंद्रपुरात जोरात वाजतंय, आणि ते खुद्द भाजपचे माजी सदस्य ब्रिजभूषण पाझारे वाजवीत आहे. Chandrapur Assembly Election
त्यांनी नुकतंच स्थानीय वाहिनीला मुलाखत दिली की माझ्यावर जोरगेवार यांनी अन्याय केला, माझ्या तोंडचा घास त्यांनी हिसकावून घेतला, ज्या दिवशी जोरगेवार यांच्या आई अम्मा उर्फ गंगुबाई जोरगेवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाला त्यादिवशी मी त्यांच्या चरणी स्पर्श करीत तुमच्या मुलाने माझ्यावर अन्याय केला मात्र मला आशीर्वाद द्या अशी माहिती पाझारे यांनी त्या मुलाखतीत सामायिक केली.
अम्मा चं निधन झालं त्यावेळी आमदार किशोर जोरगेवार हे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटाच्या संपर्कात होते, त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला होता, पण ऐनवेळी त्यांना थांबण्यास सांगितले, जोरगेवार घरी परतले व आपण आता अपक्ष निवडणूक लढू असे सांगितले पण नियतीला काही वेगळंच मान्य होते, भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी जोरगेवार यांना उमेदवारी देण्याचा निर्धार केला. Chandrapur Assembly Election
विशेष बाब म्हणजे भाजपच्या सर्व्हेत जोरगेवार हे अव्वल स्थानी होते, ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हापरिषद निवडणूक किंवा विधानसभा व लोकसभा यामध्ये भाजप आपला सर्व्हे करतो त्यामध्ये ज्या नावाला पहिल्या क्रमांकाची पसंती मिळते त्याला पक्ष उमेदवारी देत असतो.
मात्र हे पाझारे समजू शकले नाही त्यांनी भावनेच्या भरात अम्मा चं नाव काढलं आणि चुकले, त्यांनी खोटं भाष्य का केलं असावं? हा चर्चेचा विषय आहे, पण जिल्ह्यातील राजकारण्यांनी प्रामाणिकपणे निवडणूक लढवावी, आपण कोणत्या मुद्द्यावर लढू शकतो यावर विचार करावा अशी प्रतिक्रिया आप चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. Chandrapur Assembly Election
जनता अश्या खोट्या राजकारणाला बळी पडणार नाही, प्रामाणिक पणे काम करा असा सल्ला राईकवार यांनी दिला आहे.
स्थानिक वाहिनीला दिलेल्या मुलाखती मध्ये पाझारे म्हणतात की चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे, रस्ते नाही, पाण्याची समस्या कायम आहे पण पाझारे साहेब आपण सलग 30 वर्षे भाजपात होता, पालकमंत्री आपले होते तर त्यांना सदर बाब आपण लक्षात का आणून दिली नाही? अमृत पाणी पुरवठा योजना ही केंद्राची आहे त्यावर आपण सत्तेत असताना कधी बोलला काय? प्रदूषणावर आपण आपली भूमिका कधी मांडली काय? जटपुरा गेट च्या वाहतूक कोंडीचा विषय खुद्द पालकमंत्री मुनगंटीवार यांनी हाती घेतला होता त्यावर अनेकदा बैठका घेण्यात आल्या, आमदार जोरगेवार यांनी सुद्धा अनेक प्रयत्न वाहतूक कोंडी सुटावी यासाठी केले होते, मात्र त्या काळात आपण कुठे होता? याचा थांगपत्ता नाही. Chandrapur Assembly Election
आपण दर विधानसभा निवडणुकीमध्ये काही दिवसांपूर्वी सक्रिय होतात आणि नंतर असक्रिय होतात हे जनतेने बघितले आहे.
ब्रिजभूषण पाझारे यांना तिकीट नाकारले त्यानंतर ते धाय मोकलून रडले, माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर जोरगेवार यांनी अन्याय केला असं रडगाणं त्यांनी सुरू केले आहे, पण वर्ष 2009 मध्ये किशोर जोरगेवार यांना विधानसभेचे तिकीट नाकारले होते त्यावेळी ते रडले नाही पण पक्षासोबत लढले, व नाना श्यामकुळे यांना विजयी करून दाखविले. Chandrapur Assembly Election
वर्ष 2014 पूर्वी जोरगेवार यांनी पुन्हा पक्षाला तिकीट मागण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी त्यांना पुन्हा नाकारले मात्र त्यांनी भाजपला राम राम करीत शिवसेनेतून निवडणूक लढवली आणि 50 हजार मते प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
वर्ष 2014 ते 2019 पर्यंत किशोर जोरगेवार जनतेत गेले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्या पूर्ण कशा होतील यावर अनेक आंदोलने केली आणि 5 वर्षांनी अपक्ष म्हणून त्यांनी 72 हजारांचे मताधिक्य घेत भाजपच्या उमेदवाराचा विजयी रथ थांबविला. जोरगेवार त्या काळात रडले नाही ते जनतेच्या समस्या सुटाव्या यासाठी लढले आणि जिंकले.
कोरोना काळात त्यांनी गोर गरीब जनतेची मदत केली, निराधार नागरिकांना पोटभर जेवण मिळावे यासाठी अम्मा का टिफिन सुरू केला व आजही तो उपक्रम सुरू आहे. आपण म्हणता 200 युनिट पूर्ण झाले नाही पण सोलर आल्याने जोरगेवार यांनी जनतेला सबसिडी मिळावी यासाठी प्रयत्न का केला नाही असा पोरकटपणाचा प्रश्न यावेळी उपस्थित केला, पाझारे जी प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत 3 kv सोलर साठी 78 हजारांची सबसिडी आहे हे आपण विसरला वाटतं. Chandrapur Assembly Election
आपण निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणून उभे आहेत प्रामाणिकपणे निवडणूक लढली तर आपल्याला त्याचा लाभ होणार, भाजप सोडल्यावर सुद्धा आपण भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीला जात आहे, त्यांच्यासमक्ष रडत आहे, जनतेत तरी जा, कारण जनता आपला आमदार ठरविणार आहे, भाजप कार्यकर्ते नाही, आपण पक्ष सोडला पण कार्यकर्ते नाही अशी प्रचिती लोकांच्या मनात निर्माण होऊ नये म्हणजे झालं.
या सर्व प्रकरणी प्रामाणिक राजकारण म्हणजे कसं आणि काय हे आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी चांगलंच समजविले आहे.
Sambhaji Brigadeभूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढला, गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश
Sambhaji Brigade गडचांदूर – कोरपना तालुक्यात संभाजी ब्रिगेडमध्ये युवक, पुरुष व महिलांचे इनकमिंग सुरू झाले असून सामाजिक कार्यकर्ते भूषण मधुकरराव फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश केला.
शिवश्री भूषण मधुकरराव फुसे यांनी दुपट्टा टाकत सर्वांचे स्वागत केले. कोरपना तालुक्यातील चेन्नई खुर्द येथील मनसे उपाध्यक्ष दशरथ गेडाम, जांभुळदरा येथील कोरपना तालुका सोसायटी अध्यक्ष चंदुलाल शेडमाके यांनी सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश केला.
गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्र पिंजून काढत जनसंपर्क वाढविला आहे. डिस्को डांस, लावणी, डिस्को दांडिया, ठुमका, झुमका, नट्या, पार्ट्या अश्या कार्यक्रमांना बगल देत भूषण फुसे यांनी सामाजिक चळवळीतून प्रा. लक्ष्मण यादव. प्रा. वसंत हंकारे, भक्तिमय माता जगराता, कोणतीही गाजावाजा न करता गरजवंतांना वेळोवेळी सहाय्य्य, गोर, गरीब कष्टाळू लोकांचे कामे न करणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना तंबी, वेळ प्रसंगी दे दणका अश्या कामांना बघत शोषित-वंचित लोकांचा मोठा वर्ग भूषण फुसे यांच्या कडे आकृष्टल्या जात आहे. त्याचीच हि परिणीती असून गडचांदूरात शेकडो युवक, पुरुष व महिलांचा संभाजी ब्रिगेड पक्षा मध्ये प्रवेश घेतला.
Election Observator भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन संबंधितांना सुचना केल्या. तसेच जिल्हा प्रशासनाची टीम उत्तम असून राजकीय पक्षांमध्येसुध्दा येथे सौहार्दाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने खुल्या, मुक्त आणि निर्भयपूर्ण वातावरणात होईल, असा विश्वास निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला.
Election Observator नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीला सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजु रेवु, संगिता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका खुल्या आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. दिव्यांग मतदारांचे मतदान आणि 85 वर्षांवरील नागरिकांच्या गृहमतदानावर विशेष लक्ष द्यावे. सर्व मतदान केंद्रात किमान मुलभूत सुविधा त्वरीत पूर्ण करा. नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीकरीता महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आदींनी स्वीप उपक्रम वाढवावे. बाजारपेठेत व इतर गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती करावी. Election Observator
आंतरराज्यीय चेक पोस्टसह जिल्ह्यातील सर्व चेक पोस्टवर गांभिर्याने तपासणी करावी. दारू, रक्कम, ड्रग्ज, अवैध मार्गाने येणा-या वस्तुंची जप्ती करावी. सी-व्हिजीलवर येणा-या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूकीच्या कामात असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या टपाली मतदानाची टक्केवारी वाढवावी. सोशल मिडीयावर विशेष लक्ष देऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रियेकरीता अधिकारी व कर्मचा-यांचे उत्तम प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून निवडणुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशा सुचना सामान्य निरीक्षक संजयकुमार यांनी दिल्या. Election Observator
सामान्य निवडणूक निरीक्षक आर. मुत्यालाराजू रेवू म्हणाले, मतदार चिठ्ठी वाटप 100 टक्के करा. मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण जावू नये. संगिता सिंग म्हणाल्या, मतदान केंद्रांची किरकोळ दुरुस्ती त्वरीत पूर्ण करारी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प सुव्यवस्थित असावे. कायदा व सुव्यवस्था निरीक्षक अवधेश पाठक म्हणाले, स्ट्राँग रुमची सुरक्षा व्यवस्था सर्वोच्च असावी. चेकपोस्टसह सर्व नाके, रस्त्यांवर नाईट पेट्रोलिंग वाढवावी. खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. म्हणाले, वाहनांची परवानगी किती वेळेसाठी आहे, त्यानुसारच दर आकारण्याचे नियोजन करावे. धर्मेंद्र सिंह म्हणाले, विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च पथकामध्ये मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. Election Observator
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील निवडणूक विषयक पूर्वतयारीचे सादरीकरण केले. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.
राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद : तत्पुर्वी निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी वीस कलमी सभागृह येथे संवाद साधून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीदरम्यान ज्या ठिकाणी गडबडीची शक्यता, पैसे, दारु पुरवठा आदी संशयास्पद बाबी आढळल्या तर लगेच जिल्हा प्रशासनाशी किंवा निवडणूक निरीक्षकांसोबत संपर्क साधावा, अशा सुचना त्यांनी केल्या.
Bjp Kishor Jorgewar भाजप पक्ष हा संघटनात्मक बांधणीसाठी ओळखला जातो. आज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आपण मोठ्या संख्येने एकत्रित आले आहात. आपल्या चेहऱ्यावरील उत्साह बोलका आहे. सक्रिय कार्यकर्ताच पक्षाची आत्मा असून, याच एकतेने पक्षाचा विचार प्रत्येक घरात पोहोचवावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
Bjp Kishor Jorgewar आज घुग्घुस येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला. या प्रसंगी भाजपचे चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू, तालुका अध्यक्ष नामदेव डावले, भाजप नेते अनिल डोंगरे, महिला तालुका अध्यक्ष शोभा पिदुरकर, पारस पिंपळकर विजय बलकी, विनोद खेवले, सुशांत शर्मा, विजय आगरे, राकेश पिंपळकर, अनिता भोयर, यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भाजप हा पक्ष संघटन बांधणीसाठी ओळखला जातो. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे. पक्षाचे धोरण आणि विचार घुग्घुस शहरातील प्रत्येक घरात पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. हा पक्ष म्हणजे केवळ एका विचारधारेचा प्रवास नसून समाजासाठी, आपल्या लोकांसाठी एक तळमळीचा संघर्ष आहे.
आपल्यातील प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या समाजाचा आधार आहे आणि पक्षाची रीढ आहे. आपला उत्साह, निष्ठा, आणि समाजसेवेसाठी असलेली कटिबद्धता हीच पक्षवाढीसाठी महत्त्वाची आहे. चंद्रपूरसह घुग्घुस शहराच्या विकासासाठी आजपासून आपण निवडणुकीच्या कामाला लागून भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Bjp Kishor Jorgewar
मागील पाच वर्षांत आपण घुग्घुसच्या विकासासाठी पूर्णशक्तीनिशी प्रयत्न केले. याचे फलस्वरूप म्हणून घुग्घुस ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर परिषदेमध्ये झाले आहे. येथील विकासाला गती मिळाली आहे. लवकरच येथील उड्डाणपूल आणि ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. झालेली ही कामे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची असल्याचे यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले.
यावेळी भाजपच्या बंगाली कॅम्प मंडळ, बाबुपेठ मंडळ, सिव्हिल मंडळ, बाजार मंडळ, तुकुम मंडळ येथे बैठका पार पडल्या, आणि पूर्ण शक्तीने प्रचार कार्याला लागण्याचा संकल्प पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीला भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.