Tag: MH34

  • 105 year old building demolition । धोका टळला! मनपाने 105 वर्षे जुनी धोकादायक इमारत केली जमीनदोस्त

    105 year old building demolition

    105 year old building demolition : चंद्रपूर 19 ऑगस्ट  – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येत असुन बाजार वॉर्ड,जैन मंदिर जवळील 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.

    वाळूमाफियांना कांग्रेसचा इशारा

    भरत अल्लेवार यांच्या मालकीची ही इमारत असुन त्यांना सदर इमारत पाडण्याची नोटीस मनपातर्फे देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वतः काही हालचाल न केल्याने मनपाने कारवाई करून त्यांच्या इमारतीचा जीर्ण झालेला भाग निष्कासित केला आहे. पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते.

    जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश

    मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. demolition of dangerous old building

    सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. उपायुक्त संदीप चिद्रावार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,नगर रचनाकार प्रतीक देवतळे,अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.

     
     


       

  • Chandrapur medical college charity event । डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ‘Pay Back to Society’ उपक्रम

    Chandrapur medical college charity event

    Chandrapur medical college charity event : चंद्रपूर, दि. 18 : कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात “सोहळा दातृत्वाचा… एक हात मदतीचा” हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक दायित्वाची जाणीव अधोरेखित करण्यात आली.

    चंद्रपुरात वृक्ष रक्षाबंधन

    या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी एक लाख रुपये किमतीचे स्ट्रेचर व व्हिल चेअर रुग्णालयासाठी दान केले. तर विकृतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व रक्तपेढी प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद यांनी 17 हजार रुपये किमतीचे डोनर चेअर रक्तपेढीला प्रदान करून सामाजिक जाणिवेचे उदाहरण घालून दिले. Chandrapur medical college

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. कांबळे होते. विशेष अतिथी म्हणून माधुरी कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित प्रेमचंद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

    वाढदिवसानिमित्त फुल न देता एखादी वस्तू दान

    या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. कांबळे म्हणाले, “प्रत्येकाने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काहीतरी दान केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ‘Pay Back to Society’ ही भावना जोपासावी. वाढदिवसानिमित्त फुल न देता एखादी वस्तू दान करून गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्य आहे.” Pay Back to Society medical college program

    कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जिवने, जन औषध विभागाचे प्रा. डॉ. अरुण हुमणे तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे यांनीही दानधर्माचे महत्त्व अधोरेखित केले.

    दान स्वरूपात मिळालेल्या साहित्याचे हस्तांतरण अधिष्ठाता डॉ. कांबळे यांच्या हस्ते संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी यांच्याकडे करण्यात आले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर झळके यांनी केले. संचालन समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी तर आभार  उमेश आडे यांनी मानले.

    या उपक्रमासाठी समाजसेवा अधीक्षक हेमंत भोयर, भूषण बारापात्रे, प्राजक्ता पेठे, योगिता माळी, नवीन उराडे तसेच नर्सिंग व तांत्रिक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

  • Chandrapur environmental Rakshabandhan । 🌳 चंद्रपूरात ‘वृक्षरक्षाबंधन’! विद्यार्थ्यांचा अद्वितीय संकल्प

    Chandrapur environmental Rakshabandhan

    Chandrapur environmental Rakshabandhan : चंद्रपूर: इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला. आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील ‘अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. यामध्ये एफईएस गर्ल्स महाविदयालय, सरदार पटेल महाविद्यालय, सुशीलाबाई मामीडवार महाविद्यालय सहभागी झाले होते.

    वनहक्क दाव्याचे प्रकरण निकाली कधी काढणार?

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालय चे प्रा डॉ किरणकुमार मनुरे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, प्रा. अशोक बनसोड एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रज्ञ जुनघरे प्रा. योगेश निमगडे तसेच वनपाल उत्तम गाठले, वनरक्षक धनराज गेडाम, राजु मोहुर्ले, सुलभा उरकुडे, हिरकन्या सावसाकडे उपस्थित होते. Eco-Pro Rakhi to environment event Chandrapur colleges

    चंद्रपूरकर नागरीकांनो सदैव तत्पर रहा

    चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपदेसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा, अपुऱ्या अधिवासामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढीचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे.

    इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 17 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2008-2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. Chandrapur college students tie Rakhi to forest trees

    या कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता इको-प्रो चे अब्दुल जावेद, कुणाल देवगिरीकर, बंडू दुधे, सुमित कोहळे, राजू काहिलकर, सनी दुर्गे, सचिन धोतरे, रुद्राक्ष धोतरे आदीनी सहकार्य केले. Chandrapur environmental Rakshabandhan

  • forest rights act pendency rural । 🌳 Forest Rights Act थांबलेले प्रकरण! ग्रामीण भागातील शेतकरी-आदिवासींचे हक्क धोक्यात?

    forest rights act pendency rural

    forest rights act pendency rural : चंद्रपुर जिल्हा :- अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ ची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शा. प. क्र. वहका-२०२१/प्र.क्र.५०/का-१४ दि. ०३ मार्च २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आदिवासी व इतर वनभूमीधारकांचे प्रलंबित वनहक्क दावे तात्काळ निकाली काढून त्यांना वन प्रमाणपत्र वाटप करित दावे मंजूर केलेल्या जमिनीची मोजणी करुन ७/१२ उतारे देवुन त्यांच्या कुटुंबाचे उपजिवीकेचे साधन उपलब्ध करण्यात येवून वनहक्क दावे प्रलंबित आहे.

    दहीहंडी हा केवळ खेळ नाही..तर संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

    असे असताना देखील जवळपास तीन वर्षापासून वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बळजबरी करुन जेसिबीद्वारे शेतजमीनी सभोवताल मोठ मोठे गड्डे व तारेचे वॉलकम्पाऊंड करुन जमीनमध्ये फळझाडे लावून पिक घेण्यास मनाई केल्यामुळे वनभूमीधारकांवर उपासमारी पाळी आली असून त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक मणिकंडा रामानुजम यांना शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असता यावेळी चंद्रपुर उपमहानगर प्रमुख विश्वास खैरे उपस्थित होते. Chandrapur tribal forest certificate delay starvation

    अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम, २००६ व नियम, २००८ आणि सुधारित नियम, २०१२ अन्वये अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी यांना कलम ३ (१) नुसार वैयक्तिक व सामूहिक वनहक्क किंवा दोहोंचे धारणाधिकार मिळण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपारिक वननिवासी यांना स्वतःच्या उपजीविकेकरिता शेती कसण्यासाठी वनजमिनी धारण करण्याचा व त्यामध्ये राहण्याचा हक्क, निस्तारासारखे हक्क, गावाच्या सीमांतर्गत किंवा सीमेबाहेर पारंपारिकरीत्या गोळा केले जाणारे गौण वनोत्पादन गोळा करुन त्याचा वापर करणे किंवा त्याची विल्हेवाट लावणे. forest rights act pendency rural

    यासाठी स्वामित्व हक्क, पाण्यामधील मत्स्य व अन्य उत्पादने, चराई करणे, पारंपारिक मोसमी साधनसंपत्ती मिळविण्यास हक्कदार असणे, निरंतर वापर करण्यासाठी पारंपारिकरीत्या संरक्षण व संवर्धन करण्यात आलेल्या कोणत्याही सामाजिक वनस्रोताचे संरक्षण, पुनर्निर्माण, संवर्धन, व्यवस्थापन करण्याचे हक्क इ. विविध वनहक्क प्राप्त असून देखील वनहक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होतांना दिसत नाही?

    प्रकरणे निकाली कधी निघणार?

    जेव्हा की, वन हक्क दावे विहित कालावधीत निकाली काढण्यासाठी तसेच वैयक्तिक व सामूहिक दावे मान्य केल्यानंतर दावेदारांना वनहक्क प्रमाणपत्र वाटप, दाव्यांची जमीन मोजणी, वैयक्तिक दाव्यांचा ७/१२ वाटप यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कालबध्द मोहिम हाती घेवुन जिल्हास्तरीय वनहक्क समिती व उपविभागस्तरीय वनहक्क समितीच्या नियमित बैठकीत निकाली काढण्याची आवश्यकता होती. वनहक्क कायदा २००६ अंतर्गत दावेदाराच्या कब्जात असणारे क्षेत्र व दावेदाराने मागणी केलेले क्षेत्र याचा विचार करून क्षेत्र मंजूर न करता कमी क्षेत्र मंजूर करण्यात येत असल्याचे दिसून येते त्याअनुषंगाने वनहक्क धारकांना नियमानुसार क्षेत्र मंजुर करुन अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्रातील (CWH) दावे केंद्र शासनाच्या निदेशाप्रमाणे त्वरित निकाली काढून अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास क्षेत्रातील वैयक्तिक, सामुहिक वनहक्क दावे, पुनर्विलोकनाची प्रकरणे आजपावतो निकाली काढण्यात आलेली नाहीत. Chandrapur adivasi land rights enforcement failure

    मा. सर्वोच्च न्यायालयाच्या याचिका क्र.१०९/२००८ मधील आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील अमान्य करण्यात आलेले दावे व अपिल यांची अभ्यासगटाव्दारे तपासणी करून पुनर्विलोकन करण्याबाबत वेळोवेळी जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे. सदर प्रकरणांचे पुनर्विलोकन करताना कागदपत्रे तपासणी करून योग्य निर्णय घेवुन अमान्य केलेल्या प्रकरणांची उचित कारणे नमूद करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे. तसेच आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी वनहक्क प्रकरणांचा निपटारा करणे, टायटल्स प्रदान करणे, मोजणी करणे व ७/१२ देणे इत्यादीच्या संदर्भात राबविण्यात येणा-या मोहिमेचे सनियंत्रण करुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना योग्य त्या सुचना देऊन त्यांच्याकडून पाठपुरावा करण्यात येवून उपरोक्त मोहिमेचा अहवाल दरमहा आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांना उपलब्ध करून द्यायचे होते.

    पालकमंत्री यांना निवेदन मात्र कारवाई नाही

    जेणे करुन आदिवासी व इतर पारंपारिक वनभूमीधारकांवर उपासमारीची पाळी येणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे होते.त्यामुळे वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आपण आदिवासी व इतर वनभूमीधारकांचे प्रलंबित वनहक्क दावे तात्काळ निकाली काढून त्यांना वन प्रमाणपत्र वाटप करित दावे मंजूर केलेल्या जमिनीची मोजणी करुन ७/१२ उतारे देवुन त्यांच्या कुटुंबाचे उपजिवीकेचे साधन उपलब्ध करण्यात यावे. यासंदर्भात आदिवासी विभाग विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोकजी उईके यांना दि.12 मार्च 2025 ला शिवसेना चंद्रपुर व वनभूमीधारकांच्या शिष्टमंडळानी निवेदन देवून सुद्धा कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही? forest rights act pendency rural

    जिल्हास्तरीय वनहक्क समितीमधील अशासकीय सदस्यांचा कार्यकाल जवळपास चार वर्षापासून संपृष्ठात असल्यामुळे जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सभेचे आयोजन शक्य नसल्यामुळे जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रकरणांची तपासणी करुन प्रकरणे तयार करुन ठेवण्यात आल्यावर जिल्हाधिकारी यांनी पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत सदर प्रकरणे निकाली काढण्यात येईल असे, चंद्रपूर जिल्हयातील अनुसुचित जमाती व गैर आदिवासी यांचे वैयक्तीक वनदावे सुरु असतांना वन विभागामार्फत शेतक-यांना शेतामध्ये जाण्यास मनाई करण्यात आली. forest rights act pendency rural

    त्या विषयासंदर्भात दि.१३ जुलै २०२३ रोजी दु. ४ वा. मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली बैठकीत घेवून प्रलंबित वनहक्क दावे असलेल्यांवर कुठलीही कार्यवाही करण्यात येवू नये, असे स्पष्ट निर्देश असताना सुद्धा वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून बळजबरीने वनहक्क दावे प्रलंबित असलेल्या धारकांच्या जमीनीत जेसिबीद्वारे सभोवताल मोठ मोठे गड्डे व तारेचे वॉल कम्पाऊंड करुन जमीनमध्ये फळझाडे लावून पिक घेण्यास मनाई केल्यामुळे तीन वर्षापासून त्यांच्यावर उपासमारी पाळी आली असून देखील जिल्हा प्रशासन व वन विभाग त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात येवून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. forest rights activism Chandrapur Shiv Sena demand

    तसेच पालकमंत्री यांनी सदर विषयासंदर्भात तात्काळ निर्णय घेवून अनुसूचित जमाती किंवा इतर पारंपारिक वननिवासींचे प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढून त्यांना वन प्रमाणपत्र वाटप करित दावे मंजूर केलेल्या जमिनीची मोजणी करुन ७/१२ उतारे देवुन त्यांच्या कुटुंबाचे उपजिवीकेचे साधन उपलब्ध देण्यात येवून अन्याय करणाऱ्या जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कठोर कार्यवाही करुन सदर विषयाकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली असून प्रशासन मात्र सदर विषयाची दखल घेत नसल्याचे निदर्शात येत असल्यामुळे शिवसेनेला त्यांना सोबत घेवून आंदोलनाचा मार्ग हाती घेण्यास भाग पाडु नये असा इशारा निवेदनातून देण्यात आला. forest rights act pendency rural

  • illegal sand mining Rajura Wardha River । ⚡ रेती माफियांना काँग्रेसचा इशारा – कठोर कारवाई नाही तर राजुरा हादरेल आंदोलनाने!

    illegal sand mining Rajura Wardha River

    illegal sand mining Rajura Wardha River : राजुरा :– राजुरा तालुक्यातील वर्धा नदी परिसरात धानोरा, आर्वी, विरूर स्टेशनसह विविध भागांत अवैध रेती उत्खनन व तस्करीचा महापूर उसळलेला असून शासनाला कोट्यवधींचा महसुली तोटा सहन करावा लागत आहे. नियम, अटी-शर्ती आणि परवाना प्रक्रियेची पायमल्ली करत, काही लोकप्रतिनिधींच्या छुप्या आशीर्वादाने रेती माफिया क्रेन, शेकडो ट्रॅक्टर, टिपर व डंपरच्या मदतीने दिवसाढवळ्या रेती उपसा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेची कोंबडा बाजारावर धाड

    स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने माफियांना चक्क मोकळा रस्ता मिळाल्याचे चित्र दिसत आहे. रात्रीच्या अंधारात सुरू होणारी ही वाहतूक केवळ नदीपात्रालाच नाही तर आजूबाजूच्या रस्त्यांनाही पोखरत आहे. भेंडाळा – विरूर स्टेशन – अमृतगुडा या मार्गावर प्रचंड खड्ड्यांमुळे खासगी तसेच शासकीय वाहनांची वाहतूक ठप्प झाली असून, शालेय विद्यार्थ्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. नागरिक व विद्यार्थी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करण्यास बाध्य झाले आहेत. Wardha river sand extraction

    कारवाई करा, युवक कांग्रेसचे मागणी

    पुरातत्त्व व पर्यावरणीय नियमांनुसार, महत्त्वाच्या ठिकाणांच्या ३०० मीटर परिसरात कोणतेही उत्खनन निषिद्ध आहे. मात्र या नियमालाही पायदळी तुडवत रेती माफिया नदीवरील पूल, पक्के रस्ते आणि निसर्गाचा उघडपणे ऱ्हास करीत आहेत. प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक समाजघटक व पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
    या गंभीर पार्श्वभूमीवर, तालुका काँग्रेस कमिटी राजुरा यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून तातडीने अवैध रेती उपसा व वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास जोरदार आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेसतर्फे देण्यात आला आहे. Rajura sand mafia

    यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सभापती विकास देवाळकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, सुरेश पावडे, धनराज चिंचोलकर, रामभाऊ धुमणे, मंगेश गुरनुले, प्रणय लांडे, अभिजीत भुते, हेमंत झाडे यासह तालुका काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



  • illegal cockfighting gambling Chandrapur । 🔥 कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार! खेळाडूंचा भंडाफोड

    illegal cockfighting gambling Chandrapur

    illegal cockfighting gambling Chandrapur : चंद्रपूर – १७ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने अवैधपणे कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या जुगार बहाद्दर विरोधात कारवाई केली, या कारवाई ३ आरोपी सह ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

    चंद्रपुरात २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक

    मौजा जांभरला गावाच्या तलावाजवळ काही इसम कोंबड्याच्या झुंजीवर जुगार खेळत आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने जांभरला या गावातील तलावाजवळ धाड मारली. यावेळी एकूण १५ कोंबडे, त्यापैकी ३ मृत कोंबडे, ६ दुचाकीवाहन सह रोख १५ हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ८८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जुगार हा अजयपूर मधील विशाल गावंडे चालवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

    हे आहेत जुगार बहाद्दर

    यावेळी जुगार खेळणारे आरोपी ३८ वर्षीय फारुख बहादूर शेख चंद्रपूर, ४६ वर्षीय मुकेश नामदेव दशमवार राहणार जुनोना चौक, बाबुपेठ व ३५ वर्षीय राजसिंग बहादूरसिंग पटवा राहणार शिवाजी चौक मूल यांना अटक झाली. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. cockfight gambling crime in Chandrapur

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, चेतन गज्जलवार, इम्रान खान, सतीश अवथरे, किशोर वाकाटे, सुमित बरडे, हिरालाल गुप्ता, प्रफुल्ल गारघाटे व शशांक बदामवार यांनी केली.

  • Chandrapur Dahi Handi । दहीहंडी हा केवळ खेळ नाही..तर संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

    Chandrapur Dahi Handi

    Chandrapur Dahi Handi : चंद्रपूर – दहीहंडी हा फक्त खेळ नाही तर भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहे. आपल्या इतिहासात आणि धर्मपरंपरेत दहीहंडीचे विशेष स्थान आहे. श्रीकृष्णाच्या बाललीलांतून धैर्य, साहस, चिकाटी आणि ऐक्याचा जो संदेश मिळतो, तोच आज या उत्सवातून युवकांना अनुभवायला मिळतो. आजच्या पिढीने हा उत्सव केवळ मनोरंजन म्हणून पाहू नये, तर त्यातून मिळणारे संस्कार आणि जीवनमूल्य आत्मसात करावेत, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी केले.

    चंद्रपुरातील या मनपा शाळेला मिळणार १० कोटी रुपयांचा निधी

    कृष्णजन्माष्टमी निमित्त तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तुकूम येथे दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक सुरेश पचारे, सतीश भिवगडे, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रवि गुरनुले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, वर्षा कोटेकर, सतीश तायडे, प्रा. निलेश बेलखेडे, जसबीरसिंग बोपारा, सिकंदर खान आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, विकासकामांनी शहराची ओळख निर्माण होत असते, हे सत्य असले तरी पारंपरिक व धार्मिक उत्सव देखील शहराची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत. आपण चंद्रपूरात महाकाली महोत्सवाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची महती देशपातळीवर पोहोचली आहे. येथील भाविकांची संख्या लक्षणीय वाढत आहे. आज आपण दहीहंडी स्पर्धेचे उत्तम आयोजन केले आहे. तिरंगा क्रिकेट क्लब आणि शिवस्वाभिमान बहुउद्देशीय संस्थेने अशा पारंपरिक उत्सवाचे आयोजन करून केवळ धार्मिक परंपरा जोपासली नाही, तर युवकांना एकत्र आणून समाजात सकारात्मकता पसरविण्याचे मोठे काम केले आहे. अशा उपक्रमांमधून आपली संस्कृती जिवंत राहते आणि समाजातील बंधुभाव वृद्धिंगत होतो. Cultural values in Dahi Handi

    ते पुढे म्हणाले की, युवकांनी पथक तयार करताना जसा एकमेकांवर विश्वास ठेवून मानवी पिरॅमिड उभारला, तसाच विश्वास, साहस आणि एकोप्याने आपण समाज उभारायला हवा. हाच खरा दहीहंडी उत्सवाचा संदेश आहे. दहीहंडी आपल्याला साहस आणि परिश्रमांशिवाय यश मिळत नाही, ही शिकवण देते. युवकांनी ही शिकवण आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. अशा उत्सवांमुळे आपल्याला संस्कृतीची जाणीव तर होतेच, पण समाजातील ऐक्य, बंधुता आणि आपुलकी अधिक बळकट होते, असे ते यावेळी म्हणाले. दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • Chandrapur Bhauchi Dahi Handi । भाऊंची दहीहंडी, तब्बल ६ थरांचा मानवी थर आणि…

    Chandrapur Bhauchi Dahi Handi

    Chandrapur Bhauchi Dahi Handi : चंद्रपूर : द मराठा चॅरीटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या वतीने १७ ऑगस्ट २०२५ रोजी  ‘भाऊची दहीहंडी २०२५’ आणि ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक येथे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा प्रथमच चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात आली होती. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, युवा पिढीला साहसी खेळाची संधी देणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि सामाजिक एकतेला चालना देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शना दरम्यान सांगितले.

    चंद्रपूर-यवतमाळ धोक्यात? पुराचा धोका

    यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, जेष्ठ काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, शहर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश चोखारे, इंटक नेते प्रशांत भारती, काँग्रेस नेते  प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, पंचायत समिती राजुरा माजी सभापती  ऍड. कुंदा जेणेकर, श्यामकांत थेरे,ए. आय. पी. सी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, रतन शिलावार, कुणाल चहारे यांची उपस्थिती होती.

    जय शीतला माता मंडळ ठरली विजेता

     या दहीहंडी स्पर्धेत चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध युवक आणि युवतींच्या पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या लढतीत, जय शितला माता मंडळ, बाबूपेठ वार्ड, चंद्रपूर येथील गोविंदांनी ६ थरांची भव्य मानवी साखळी तयार करून हंडी फोडली आणि रु. १,५१,००० चे प्रथम पारितोषिक पटकावले. महिला गोविंदा पथकांची दमदार उपस्थिती देखील वाखाण्याजोगी होती. गोपिका गर्ल्स, बल्लारपूर या महिला पथकाने ४ थरांची सलामी देत सर्वांची मने जिंकली आणि त्यांना प्रोत्साहनपर परितोषिकाने गौरवण्यात आले. Balu Bhau Mitra Pariwar charity dahi handi event

    dahi handi

    दहीहंडी उत्सवाच्या जोडीलाच  ‘भव्य वेशभूषा स्पर्धे’मध्ये चिमुकल्यांनी ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘भारतीय इतिहासातील महापुरुष’ या विषयांवर मनमोहक सादरीकरण केले. या स्पर्धेत ६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पृहा वाटेकर हिने रु. ५,००० चे प्रथम बक्षीस पटकावले, तर सान्वी लालसरे हिला रु. ३,००० चे द्वितीय बक्षीस आणि सानिधी इटनकर हिला रु. २,००० चे तृतीय बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यासोबतच १० स्पर्धकांना प्रोत्सानपर पारितोषिक देण्यात आले.  चंद्रपूरकरांच्या प्रचंड उपस्थितीने, तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि “गोविंदा आला रे आला!” या घोषणांनी दहीहंडी सोहळ्याला वेगळेच आकर्षण लाभले.

  • Anti-drug operation in Chandrapur । चंद्रपुरात नशेचं जाळं, मेफेड्रोन विक्री प्रकरणी २४ वर्षीय युवकाला अटक

    Anti-drug operation in Chandrapur

    Anti-drug operation in Chandrapur : चंद्रपूर – चंद्रपूर सारख्या लहान जिल्ह्यात मादक पदार्थाची तस्करी दिवसेंदिवस वाढत आहे, अनेक तरुण या नशेच्या आहारी गेल्याने गांजा सह मेफेड्रोन पावडर हे सहजतेने उपलब्ध होत आहे, विशेष बाब म्हणजे अल्पवयीन मुले, तरुण मुली व महिलांचा सुद्धा या मादक पदार्थ विक्रीमध्ये सहभाग वाढताना दिसत आहे.

    चंद्रपुरात दीड किलो गांजा जप्त

    चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखा मादक पदार्थविरोधात मोहीम राबवित आहे, या मोहिमेत १८ ऑगस्ट रोजी रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोपनीय माहितीच्या आधारे सरकार नगर मध्ये सापळा रचत २४ वर्षीय युवकाला मेफेड्रोन पावडर विक्री प्रकरणी अटक करण्यात आली.

    १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त

    सरकार नगर मध्ये दुचाकी वाहन mh३४ bn ०७५२ ला थांबवित चालकाची झडती घेतली असता २४ वर्षीय सौरभ दुर्वास कसारे राहणार मेजर गेट, वैद्य नगर चंद्रपूर याच्या ताब्यात असलेले ६.०६ ग्राम मेफेड्रोन पावडर जप्त करीत दुचाकी वाहन, मोबाईल व मेफेड्रोन पावडर असा एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, पोलिसांनी आरोप सौरभ वर एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे. youth Mephadrone arrest NDPS action

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोलीस कर्मचारी नितीन साळवे, नितीन कुरेकार, दीपक डोंगरे व अमोल सावे यांनी केली.

  • Isapur Dam water release flood threat । यवतमाळ–चंद्रपूर धोक्यात? इसापुर धरणातून पाण्याचा विसर्ग!

    Isapur Dam water release flood threat

    Isapur Dam water release flood threat : कोरपना – यवतमाळ व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुसद तालुक्यातील इसापूर चे १३ पैकी नऊ व जैनत मंडल तील सातनाला धरणाचे चार पैकी तीन दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. परिणामी यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना , चंद्रपूर तालुक्यातील पैनगंगा व वर्धा नदीच्या काठावरील गावाच्या शिवेवर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

    चंद्रपुरात दीड किलो गांजा जप्त

    पाणी पातळीत अधिक वाढ होत असल्याने नदी काठच्या गावात पूरस्थितीचा धोका निर्माण झाला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्युसेक पाण्याच्या विसर्गामुळे नदीपात्र दोन्ही थडीच्या काठोकाठ भरून गावाच्या वेशीवर शिरण्यास सुरुवात झाली आहे. यातच शेत शिवार, पूल रस्ते पाण्याखाली आले आहे. यावर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. Korpana flooding due to dam discharge

    चंद्रपूर – कोरपना तालुक्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील धानोरा – भोयगाव मार्गावरील शनिवारी सायंकाळी नऊ वाजता च्या सुमारास पूलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प पडली आहे. यामुळे दोन्ही बाजूला वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील कोडशी बूज – कोरपना , कोडशी बूज – कोडशी खु मार्ग तर यवतमाळ जिल्ह्याला जोडणारे गांधीनगर – तेजापूर, जेवरा – गाडेघाट, पिपरी – मूर्ती , परसोडा – पीपरड , कोडशी बूज – देऊरवाडा आदी मार्ग मध्य रात्रीपासून पूर्णतः बंद पडले आहे. flood situation Korapna

    महसूल व पोलीस प्रशासनाकडून सदर मार्ग खबरदारी म्हणून बॅरिकेट लावून वाहतुकीसाठी बंद केले आहे. पैनगंगा नदीतील जल स्तर वाढत असल्याने नदी काठावरील गावात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यातच वनसडी – भोयगाव सह अनेक मार्ग नाल्यातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे बंद होण्याची शक्यता आहे.

    flood situation korpana

    नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

    कोरपना तालुक्यातील परसोडा, रायपूर, कोठोडा बूज , मेहंदी , पारडी , अकोला , भोईगुडा , जेवरा , तुळशी , गांधीनगर , कोडशी बूज , कोडशी खू, पिपरी, वनोजा , अंतरगाव, सांगोडा, कारवाई , विरुर , इरई , भारोसा , भोयगाव आदी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    पुराच्या पाण्याने बुडाले शेत शिवार

    पाण्याची पातळी वाढून बाहेर फेकली जात असल्याने पुराचे पाणी शेतशिवारात आले आहे. यातच कापूस, सोयाबीन, तूर आदी लागवडीखालील पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.