Tag: MH34

  • murder case : वारंवार त्रास देतो म्हणून केली हत्या

    murder case

    murder case 🙁गुरू गुरनुले) मूल: वारंवार त्रास देणाऱ्या युवकाला काही युवकांनी चाकूने सपासप वार करून निघृन हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी(दि.२८) रात्री १०.३० वाजता दरम्यान शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर घडली. घटनेने मूल शहरात दहशत पसरली.


    रितिक अनिल शेंडे वय (२४ वर्ष) वार्ड क्रमांक १६ विहिरगाव असे मृत युवकांचे नाव आहे. राहुल सत्तन पासवान (२० वर्ष),अजय गोटेफोडे(२२ वर्ष) व 1 विधिसंघर्ष बालक सहित तिघांना अटक केली असून हत्या प्रकरणात 1 आरोपी फरार असल्याची माहिती आहे.

    ग्रामीण भागातील कलावंतांनी तयार केला मराठी चित्रपट काजू

    रितीक शेंडे हा पंचायत समिती कार्यालयासमोरील बसस्थानकाजवळ दुचाकीवर भ्रमणध्वनीवर बोलत असताना अचानक आरोपी युवकांनी रितिकच्या छातीवर,पोटावर व कंबरेवर सपासप वार केले, अचानक झालेल्या या हल्ल्यात रितीक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.


    आरोपी यावरच थांबले नाही तर रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांना चाकू दाखवून ”चले जाओ नहीं तो हम तुम्हे भी खतम कर देंगे” अशी चेतावणी दिली.भीतीने जवळपास असलेले नागरिक तहसील कार्यालयाच्या गेटच्या आतमध्ये गेले.मात्र रीतिकला वाचवायला कुणीही धावून गेले नाही.

    रितीक ला मारल्यांनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप आगडे यांनी रीतिकला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले.

    वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रितिकला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागरिकानी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.

    घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे दाखल होत त्यांनी पंचनामा केला, आरोपीना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने प्रयत्न करीत राहुल पासवान, अजय गोटेफोडे व विधिसंघर्ष बालकाला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली. Chandrapur crime news

    घटना कशी घडली?

    मृतक रितीक शेंडे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, रितीक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने तो वारंवार राहुल पासवान ला धमकी देत त्रास द्यायचा, रितीक वारंवार त्रास देतो म्हणून राहुल ने हा त्रास कायमचा सम्पविण्याचा निर्णय केला व यामध्ये आपल्या मित्रांची साथ घेत 27 डिसेंबर रोजी रितीक वर चाकूने वार करीत त्याची हत्या केली. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

    शहर कडकडीत बंद

    रितीक च्या हत्येनंतर मूल शहरातील नागरिकांनी आरोपीना तात्काळ अटक व्हावी यासाठी बाजारपेठ बंद पाडली. व्यापाऱ्यांनी नागरिकांनी पुकारलेल्या बंद ला पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.

    चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी यासाठी ताबडतोब कारवाई करीत पथके तयार केली व 24 तासांच्या आत आरोपीना अटक केली. या प्रकरणातील 1 आरोपी अद्याप पसार आहे.


    आरोपीवर कलम 103 (1), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करीत मूल पोलीसांच्या ताब्यात दिले.
    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. (Murder case)


    प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहे.

  • new marathi movie release : ग्रामीण भागातील कलाकारांचा मराठी चित्रपट काजू

    New marathi movie release

    new marathi movie release : चंद्रपूर : चित्रपट सृष्टी म्हणजे मुंबई असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. केवळ मुंबईतील निर्माते चित्रपट तयार करू शकतात असा काहीसा अनुभव आहे. ग्रामीण भागातील युवक चित्रपट निर्माण करू शकत नाही, हा समज चंद्रपूर आणि यवतमाळ येथील तरुणांनी मोडीत काढला आहे.

    रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी दारू घेऊ शकतो काय? रेल्वेचे नियम काय सांगतात..

    अवघ्या ३०-३५ वयाच्या युवकांनी ग्रामीण भागातच तंत्रज्ञानाचा वापर करून काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. शूटिंग साठी लागणारे तंत्रज्ञानाचा वापर करून मुलगी आणि वडिलांच्या हळव्या नात्याची विण असलेला काजू या मराठी चित्रपटाची निर्मिती करून चित्रपटसृष्टीत येऊ पाहणार्‍या तरुणांना त्यांनी प्रेरणा दिली आहे. काजू हा मराठी चित्रपट येत्या ३ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. (Latest marathi movie)

    यानिमित्त काजू या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक रोशन दुपारे, मुख्य कलावंत अमित राऊत, अभिनेत्री रेणुका, बालकलावंत शरयू या कलावंतानी आज दिनांक २७ डिसेंबर रोजी चंद्रपूरला भेट दिली. यावेळी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ येथे काजू चित्रपटाविषयी जाणून घेण्यासाठी मिट द प्रेस आयोजित केली होती. यावेळी दिग्दर्शक रोशन दुपारे यांनी काजू चित्रपटाची निर्मिती आणि त्याचा प्रवास याविषयी पत्रकाराशी संवाद साधला. तर चित्रपटात बापाची भूमिका साकारणारे अमित राऊत यांनी मुलगी आणि वडिलांच्या भावनिक नात्यावर भाष्य केले.

    अभिनेत्री रेणुका हिने मुलीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बापाची होणारे आर्थिक घालमेल आणि संघर्ष याचा उलगडा केला. तर बालकलावांत शरयु हिने शूटिंग दरम्यान झालेले. काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. पत्रकारांच्या प्रश्नांचे समाधान करून चंद्रपुरात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन काजू चित्रपट बघण्याचे यावेळी आवाहन केले.

    यावेळी चित्रपटातील डायलॉग सादर करून उपस्थिताची कलाकारांनी मने जिंकली.यावेळी अध्यक्षस्थानी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत विघ्नेश्वर, सचिव प्रवीण बतकी, उपाध्यक्ष योगेश चिंधालोरे यांची आवर्जून उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.

    संचालन बाळू रामटेके यांनी तर आभार प्रवीण बतकी यांनी मानले. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मजहर अली, मराठी पत्रकार संघाचे राजेश सोलापण, अमित वेल्हेकर, राहुल आसूटकर, दिनेश एकवनकर, राजेश निचकोल, राजू अलोणे, हिमायू अली, देवानंद साखरकर, अल्का वायचळ, गौरव पराते, गोलू बारहाते, मंगेश देशमुख, तनशील पठाण आदि उपस्थित होते.

  • alcohol in train | रेल्वे प्रवासात दारू घेऊ शकता काय?

    alcohol in train

    alcohol in train : रेल्वे प्रवासाशी संबंधित एक महत्त्वाचा नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. रेल्वे गाड्यांमध्ये दारू नेण्याचे नियम आपणास माहीत असणे गरजेचे आहे. तुम्ही रेल्वेमध्ये दारू घेऊन जाऊ शकता का? जर होय तर किती बाटल्या? जाणून घ्या सविस्तर माहिती.

    नवीन वर्षात आगमन होत असल्याने सुट्टीचे वातावरण आहे म्हणजे यंदा भरपूर रेल्वे ने प्रवास होईल. मात्र या दरम्यान नागरिक नियम मोडताना नक्कीच दिसणार.

    लहान बाळांसाठी नावे शोधत आहात? जाणून घ्या

    या रेल्वे प्रवासाशी संबंधित एक महत्त्वाचा नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ट्रेनमध्ये दारू नेण्याचे काय नियम आहे. तुम्ही ट्रेनमध्ये दारू घेऊ शकता का? जर होय तर किती बाटल्या? आपण ते घेऊ शकत नाही आणि तरीही ते घेऊ शकत नाही तर काय? हे जाणून घ्या.

    ट्रेनमध्ये दारू नेण्यास पूर्णपणे बंदी आहे. म्हणजे तुम्ही दारू घेऊन ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाही. तुमच्याकडे सीलबंद बाटली असली तरीही रेल्वे प्रवासात दारू घेऊन जाणे यावर पूर्णतः बंदी आहे जर तुम्ही असे करताना आढळल्यास, रेल्वे कायदा 1989 च्या कलम 165 अंतर्गत तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.

    मद्य हे सिलिंडर आणि इतर ज्वलनशील पदार्थांच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे, त्यामुळे दारूसह पकडल्यास वरील कायद्यानुसार 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच ६ महिने कारावासाची तरतूद आहे. याशिवाय व्यक्तीने आणलेल्या प्रतिबंधित साहित्यामुळे कोणतेही नुकसान किंवा अपघात झाल्यास त्याचा खर्चही दोषी व्यक्ती उचलेल.

    इतकेच नाही तर तुमच्याजवळ दारूची उघडी बाटली आढळल्यास शांतता भंग केल्याबद्दल आरपीएफ तुमच्यावर दंड आकारू शकतो. याशिवाय जर रेल्वे (indian railways) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल, तर त्यात दारूबाबत करचुकवेगिरीचेही प्रकरण असू शकते. अशा परिस्थितीत, तुम्हाला जीआरपीकडे सोपवले जाईल आणि त्यानंतर त्या राज्याचे उत्पादन शुल्क विभाग नियमानुसार कारवाई करेल. हा नियम त्या राज्यांसाठी आहे जिथे दारूवर बंदी नाही. गुजरात किंवा बिहार सारख्या कोणत्याही राज्यात दारू वाहून नेताना पकडले गेल्यास मोठा दंड आणि शिक्षेसाठी तयार राहा. याचा अर्थ, रेल्वे प्रवासात अल्कोहोल कोणत्याही स्थितीत घेता येत नाही. (Alcohol in train)

    विशेष परिस्थितीत, तुम्ही तुमच्यासोबत 1.5 लिटर मद्य घेऊन जाऊ शकता. मात्र त्यासाठी आधी संबंधित रेल्वे झोन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. पण सदर दारू प्यायला घेत नाही हे कारणही द्यावे लागेल. उदाहरणार्थ चाचणीसाठी किंवा प्रयोगशाळेसाठी. यानंतर तुम्हाला त्या बाटलीची पावती तुमच्याकडे ठेवावी लागेल. बाटली पूर्णपणे सीलबंद केली पाहिजे. हे पण माहीत असू द्या.

  • Vadhu var parichay melava : उप वर-वधु परिचय मेळाव्यात विवाह करुन समाजासमोर आदर्श मांडा – खासदार प्रतिभा धानोरकर

    Vadhu var parichay melava

    Vadhu var parichay melava : चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर धनोजे कुणबी समाजाच्या (Dhanoje kunbi samaj) वतीने आयोजित उप वर-वधू परिचय मेळावा व कृषी मेळाव्याचे उद्घाटन 27 डिसेंबर 2024 रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

    चंद्रपुरात पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचा करार

    या उद्घाटन सोहळ्यात खासदार धानोरकर यांनी समाजाच्या भूमिका जागतिक स्तरावर मांडण्याची महत्त्वाची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भविष्यातील परिचय मेळाव्यांमध्ये केवळ परिचय करणे नाही, तर विवाह देखील पार पडले पाहिजे, जेणेकरून समाजात आदर्श निर्माण होईल.

    कृषी मेळाव्याच्या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन घेण्याची प्रेरणा दिली आणि तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन केले. या उद्घाटनावेळी समाजाची कृतज्ञता व्यक्त करताना खासदार धानोरकर म्हणाल्या, “समाजाने मला बरेच काही दिले आहे, आणि मी सदैव ऋणी आहे.”

    यावेळी मंचावर आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तमराव सातपूते, श्री. मालेकर, डॉ. विजय झाडे, विलास माथनकर, मनोहर पाऊनकर, राहूल पावडे, गजानन सातपुते, सुनंदा धोबे, सुनिता लोढीया, उमाकांत धांडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

  • Environmental Conservation : चंद्रपुरात पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती

    Environmental Conservation

    Environmental Conservation : चंद्रपूर महानगरपालिका व डॉ.खत्री महाविद्यालयात (Khatri College Chandrapur) सामंजस्य करार करण्यात आला असुन याअंतर्गत वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन या पर्यावरण विषयक महत्वाच्या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

    चंद्रपुरात विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन


       मनपा आयुक्त विपीन पालीवाल व डॉ.खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या स्वाक्षरीने झालेल्या या सामंजस्य करारानुसार मनपातर्फे राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड, रेन वॉटर हार्वेस्टींग (rain water harvesting) व घनकचरा व्यवस्थापन, ई वाहने,प्लास्टीक बंदी,कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी उपक्रमांविषयी आता डॉ.खत्री महाविद्यालयातर्फे जनजागृती करण्यात येणार आहे.


      शासन निर्देशानुसार चंद्रपूर मनपातर्फे पर्यावरण विषयक महत्वाच्या सर्व विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. या स्पर्धा, उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग असणे महत्वाचे असते,कारण जनसहभागातूनच पर्यावरण संवर्धन व रक्षण करणे शक्य आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जर नागरिकांची साथ मिळाली तर कोणताही उपक्रम यशस्वी होणे शक्य होते.      

     
       मनपातर्फे दर महिन्यास पर्यावरण विषयक उपक्रमांची जनजागृती करण्याचे ठराविक लक्ष महाविद्यालयास देण्यात येणार असुन महाविद्यालयातर्फे योजनाबद्ध रीतीने परिणामकारक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे व केलेल्या कामांची माहिती मनपास देण्यात येणार आहे.

    महाविद्यालयांच्या सहभागाने युवा वर्गाचा पर्यावरण संरक्षण व संवर्धनात सहभाग होणार असुन याचप्रकारे इतर महाविद्यालयांनीही सहयोग करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Baby boy name | भागवदगीतेमधून निवडा मुलांची नावे

    Baby boy name

    Meaningful baby boy name : जर तुम्हाला तुमच्या मुलाला सुसंस्कृत बनवायचे असेल तर तुम्ही ही नावे निवडू शकता, जी पूर्णपणे अद्वितीय आणि अर्थपूर्ण आहेत.

    पालक होणे ही मोठी जबाबदारी आहे. तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून तो एक चांगला माणूस बनू शकेल. पालक म्हणून तुमची जबाबदारी मुलाला चांगले आणि अर्थपूर्ण नाव देण्याची आहे. Unique boy names

    या घरगुती उपायाने पांढरे केस करा काळे

    नावाचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याने नाव विचारपूर्वक निवडणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत, आम्ही येथे लहान मुलाच्या नावांची यादी सामायिक करत आहोत, ज्यावर पवित्र ग्रंथ भगवद्गीतेचा प्रभाव आहे.

    ही आहे अर्थपूर्ण नावाची यादी

    • अर्जुन – अर्जुन, श्री कृष्णाचा प्रिय सहकारी आणि एक महान योद्धा, ज्याचा भगवान श्रीकृष्णाने गीतेत उपदेश केला.
    • कृष्ण – भगवान श्री कृष्णाचे नाव.
    • संजय – गीताचा संवादक, ज्याने धृतराष्ट्राला युद्धभूमीची घटना कथन केली.
    • योगेश – भगवान श्री कृष्णाने गीतेमध्ये योगाचे महत्त्व सांगितले.
    • विश्वरूप – भगवान श्रीकृष्णाचे दिव्य रूप, गीतेदरम्यान अर्जुनाने पाहिले.
    • कृष्णेश्वर – भगवान श्रीकृष्णाचे दुसरे नाव.
    • सत्येंद्र – सत्येंद्र म्हणजे “सत्याचा स्वामी”.व्यास – महाभारताचे लेखक आणि गीताचे संकलक.
    • अमिश- या नावाचा अर्थ खरा आणि विश्वासार्ह व्यक्ती असा होतो.
    • अद्वैत- जे प्रत्येकापेक्षा वेगळे आणि अद्वितीय आहे.
    • अच्युत- हे देखील भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे.
    • गिरधर- हे भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे.
    • केशव – तुम्ही हे नाव पण ठेवू शकता. हे देखील श्रीकृष्णाच्या सुंदर नावांपैकी एक आहे.
    • मुरली- हे भगवान श्रीकृष्णाचे नाव आहे.
    • माधव- हे नावही ठेवू शकता.
    • नेता – प्रत्येक कामात अग्रेसर असणारी व्यक्ती.
    • पलाश- हे नावही खास आहे. हे त्या झाडाचे नाव आहे ज्याच्या फुलांना रंग येतो.

    जर तुम्हाला तुमच्या मुलाला सुसंस्कृत बनवायचे असेल तर तुम्ही ही नावे निवडू शकता, जी पूर्णपणे वेगळी आणि अर्थपूर्ण आहेत.

  • Former PM Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन

    Former PM Manmohan Singh Passes Away

    Former PM Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांचे निधन झाले आहे. मनमोहन सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

    भारताचे 14 वे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग 92 वर्षांचे होते. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते.

    विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. 33 वर्षे ते खासदार होते. तर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते. PM Manmohan Singh

    डॉ. मनमोहन सिंग 1991 पासून राज्यसभेचे सदस्य होते जिथे ते 1998-2004 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर त्यांनी 22 मे 2004 आणि पुन्हा 22 मे 2009 रोजी पंतप्रधानपद स्वीकारले. डॉ.सिंग यांची विकासाप्रती असलेली बांधिलकी आणि त्यांच्या अनेक कर्तृत्वाची ओळख त्यांना बहाल करण्यात आलेल्या अनेक सन्मानांद्वारे करण्यात आली आहे.

    1 जानेवारी पासून नियम बदलणार

    यामध्ये 1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. PM Manmohan Singh

    डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले. PM Manmohan Singh

    तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली. UNCTAD सचिवालयात अल्पावधीत काम केल्यानंतर त्यांना दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

    1987-1990 पासून जिनिव्हा. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली.

  • White Hair Home Remedies : केस पांढरे व्हायला लागलेत? करा हा घरगुती उपाय

    White Hair Home Remedies

    White Hair Home Remedies : केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत केस काळे करण्यासाठी नैसर्गिक केसांचा रंग (natural colors) घरीच बनवून लावता येतो. येथे जाणून घ्या हे घरगुती उपाय करीत त्याला कसे वापरता येतील. Life style

    वाढत्या वयाबरोबर केसही पांढरे (white hair) होऊ लागतात. वयानुसार, टाळू केसांना काळा रंग देऊ शकत नाही. वृद्धत्व, तणाव, प्रदूषण, केसांची योग्य काळजी न घेणे, आहारातील पोषक तत्वांचा अभाव, आनुवंशिकता, आरोग्याची स्थिती, सूर्यप्रकाशाचा प्रभाव आणि रासायनिक पदार्थांचा अतिवापर यामुळेही केस पांढरे होण्यास सुरुवात होते.

    1 जानेवरी पासून 6 नियमात होणार बदल

    अशा परिस्थितीत केस काळे करण्यासाठी हेअर डाई (hair dye) लावली जाते. बाजारातून विकत घेतलेल्या हेअर डाईमध्ये केमिकल तर असतेच पण त्यामुळे केसांची हानी होते. अशा परिस्थितीत केसांवर फक्त घरगुती वस्तू (Home Remedies) वापरता येतात. या वस्तू चा वापर करीत ते केसांना लावल्याने केस काळे होऊ लागतात. हे केस मऊ आणि घट्ट होण्यास मदत करतात. जाणून घ्या कोणते आहेत हे आश्चर्यकारक घरगुती उपाय.

    खोबरेल तेल आणि लिंबाचा रस

    केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी, लिंबाचा रस मिसळून खोबरेल तेल (coconut oil) लावा. या उपायाने केस काळे होण्यास मदत होते. हा नैसर्गिक उपाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरला जाऊ शकतो. या तेलाने टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत पूर्णपणे मसाज करता येते.

    आवळा आणि मेहंदी

    आवळ्याचे पावडर मेहंदी मध्ये मिसळून डोक्याला लावल्यास केस काळे होऊ शकतात. आवळा (amla) आणि मेहंदी (mehndi) देखील केसांचा पोत सुधारण्यासाठी प्रभाव दर्शवतात. जेव्हा तुम्ही मेहंदी द्रावण बनवता तेव्हा तुम्ही त्यात शिजवलेली चहाची पाने किंवा कॉफी देखील घालू शकता. यामुळे केसांना गडद रंग येतो. Hair colouring

    कलोंजी

    पांढरे केस (white hair) काळे करण्यासाठी कलोंजीपासून हेअर डाई तयार करता येते. हेअर डाई (hair dye) करण्यासाठी नायजेला पावडर मेहंदीमध्ये मिसळा आणि पाण्याने द्रावण तयार करा. हे द्रावण केसांवर अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा. त्यामुळे केस काळे होऊ लागतात. नायजेला बिया खोबरेल तेलात शिजवून केसांना लावता येतात. हे तेल केसांच्या वाढीसही मदत करते. Home Remedies

    इंडिगो आणि मेहंदी

    नॅचरल केस डाई करण्यासाठी इंडिगो आणि मेहंदीचाही वापर केला जाऊ शकतो. अर्धा कप मेहंदीमध्ये एक कप इंडिगो पावडर (indigo powder) मिसळा. केसांना गडद काळा रंग देण्यासाठी या हेअर डाईचा चांगला परिणाम होतो. 40 ते 50 मिनिटे केसांवर ठेवा आणि नंतर धुवा. केस काळे होतात. कपाळ आणि कानाला टाळून ते लावा, अन्यथा त्वचेवर काळा रंग लागू शकतो. (White Hair Home Remedies)

    काळी चाय पत्ती

    आठवड्यातून 2-3 वेळा काळ्या चहाने केस धुतल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात. काळ्या चहाची पाने पाण्यात टाकून शिजवा. एका ग्लास पाण्यात २ चमचे चहाची पत्ती टाकता येतात. त्यात चिमूटभर मीठ किंवा साधे मीठ घाला. हे पाणी शिजवल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवा. यानंतर डोके धुवा. या पाण्याने केस धुतल्यावर पांढऱ्या केसांवर काळा थर दिसू लागतो. Dark black

    काळी मिरी आणि लिंबू

    ही रेसिपी अनेक घरांमध्ये ट्राय केली जाते. हा रंग तयार करण्यासाठी एक कप दह्यात २-३ चमचे काळी मिरी आणि सम प्रमाणात लिंबाचा रस मिसळा. हा (hair mask) हेअर मास्क केसांना लावा आणि तासाभरानंतर डोके धुवा. काही दिवस नियमित वापरल्यास केस काळे होऊ शकतात.

    हिबिस्कस फूल

    पांढरे केस (white hair) काळे करण्यासाठी हा उपायही वापरता येतो. हे करून पाहण्यासाठी, हिबिस्कसची फुले पाण्यात घाला आणि रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्याने डोके धुवा. हे फूल केसांचे पांढरे (white hair) होणे दूर करण्यासाठी परिणाम दर्शवते. याशिवाय कोंड्याची समस्याही कमी होते.

    कढीपत्ता आणि खोबरेल तेल

    केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी कढीपत्ता खोबरेल तेलात (coconut oil) शिजवून हे तेल केसांना लावता येते. एका भांड्यात खोबरेल तेल घ्या आणि त्यात कढीपत्त्याचा गुच्छ टाका. शिजल्यावर कढीपत्ता तडतडायला लागला की गॅस बंद करा. हे तेल डोक्याच्या मसाजसाठी वापरा. हे तेल आठवड्यातून २ ते ३ वेळा केसांना लावता येते.

    कांद्याची पेस्ट

    जर केस वेळेआधीच पांढरे होऊ लागले असतील आणि डोक्यावर काही पांढरे केस दिसू लागले असतील तर कांदा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कांदा बारीक करून ही पेस्ट (Onion Juice) संपूर्ण डोक्याला अर्धा तास लावा आणि नंतर धुवून स्वच्छ करा. हवे असल्यास कांद्याचा रसही डोक्याला लावू शकता. आठवड्यातून दोनदा याचा वापर केल्याने केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध होतो. यामुळे केस वाढण्यास आणि लांब वाढण्यास देखील मदत होते.

  • Veer bal diwas 2024 | खालसा कॉन्व्हेंट येथे वीर बाल दिवस कार्यक्रमाचे आयोजन

    Veer bal diwas 2024

    Veer bal diwas 2024

    Veer bal diwas 2024 : गुरू गोविंदसिंहजी यांच्या सुपुत्रांनी दाखवलेले पराक्रम आणि त्याग यांचे स्मरण आज आम्हाला प्रेरणा देते. आजचा दिवस केवळ एक स्मरणोत्सव नाही, तर मुलांना संस्कार, शौर्य, त्याग आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची उर्जा देणारा हा दिवस आहे. आजचा वीर बाल दिवस आपल्याला कायमच सत्य, धर्म आणि न्यायासाठी लढण्याची प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    इंग्रजी नामांकित शाळेत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

      वीर बाल दिवस निमित्त आज गुरुवारी खालसा कॉन्व्हेंटमध्ये (khalsa highschool) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला लाडी बसेसा, भारतीय जनता पार्टीचे मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, मुख्याध्यापिका सिमरन सहाणी, अमनप्रती गौरा, विश्वजित शाहा आदि प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते.

      यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या पुढच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. मुलांनी आणि युवकांनी या प्रेरणादायी इतिहासातून शिकावे, आपली संस्कृती, परंपरा आणि आदर्श जपावेत. या प्रसंगातून एकजुटीचा संदेश घेऊन पुढे जावे. आपल्या समाजातील मूल्यांना टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. विशेषतः आजच्या पिढीने आपल्या देशासाठी, समाजासाठी आणि न्यायासाठी सदैव तत्पर राहावे, ही प्रेरणा देणारा आजचा दिवस असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

      आजच्या दिवशी आपण ज्यांनी आपल्या शौर्याने आणि त्यागाने इतिहास घडवला, अशा महान बालवीरांना आदरांजली अर्पण करतो. लहान वयातसुद्धा मोठमोठ्या संकटांना तोंड देणाऱ्या वीर बालांनी आपले मोठे योगदान देशासाठी दिले आहे. गुरू गोविंदसिंह यांचे सुपुत्र साहिबजादे यांचा बलिदान, हा त्याग आणि धर्मासाठी दिलेली आहुती आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांच्या शौर्याने धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्याचा आदर्श घालून दिला आहे.

    khalsa highschool

      आपली नवी पिढी ही देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ आहे. त्यांना योग्य शिक्षण, मूल्यसंस्कार आणि समाजसेवेचे महत्त्व शिकविणे ही आपली जबाबदारी आहे. वीर बाल दिवसाच्या निमित्ताने, आपण आपल्या मुलांमध्ये देशप्रेम, आत्मसन्मान आणि आदर्श नागरिक होण्याची वृत्ती रुजवावी, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. 

  • Eklavya Model Residential School | इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेमध्ये इयत्ता 1ली प्रवेशकरिता अर्ज आमंत्रित

    Eklavya Model Residential School

    Eklavya Model Residential School : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील  इंग्रजी  माध्यमाच्या  नामांकित  निवासी  शाळेत इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश देण्याकरीता अनुसूचित जमातीच्या प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रवेशाकरीता 23 डिसेंबरपासून प्रवेश अर्ज नि:शुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज विहित कागदपत्रासह 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत स्विकारले जातील.

    अर्जासोबत विद्यार्थ्यांचा जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड जोडावे. विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय  नोकरदार नसावेत. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र तसेच विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे.

    चंद्रपुरात विदर्भस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन

    विद्यार्थ्यांचे पालक विधवा, घटस्फोटित, निराधार, परितक्या असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडावा. इयत्ता 1 ली मध्ये (class 1 admission) प्रवेश झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित निवासी शाळेमध्ये करण्यात येणार नाही. कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची वेळ आल्यास एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल (Eklavya Model Residential School) इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच करण्यात येईल.

      वरीलप्रमाणे प्रवेशाबाबतचे दाखले अर्जासोबत जोडून 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा कोणताही विचार करण्यात येणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे निवड प्रक्रियेचा पूर्ण अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समितीस राहील. शासनस्तरावर निवड झालेल्या शाळेत व मंजूर प्रवेश संख्येच्या अधिन राहून विद्यार्थी निवड प्रक्रिया करण्यात येईल. मंजूर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड प्रक्रिया केल्या जाईल.

    इयत्ता 1 लीत प्रवेश घेण्याकरीता अटी व शर्ती : 1. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. 2. विद्यार्थ्यांनी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी व प्रमाणपत्राची मुळप्रत तपासणीसाठी सोबत आणावी. 3. जर विद्यार्थ्याचे पालक दारिद्र्य रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी.एल. प्रमाणपत्र जोडावे.

    4. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा 1 लक्ष रु. इतकी असावी. 5. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे दि. 18 सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 6. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासननिर्णय/परिपत्रकानुसार इयत्ता 1 ली करीता विद्यार्थ्यांचे वय गृहीत धरण्यात येईल.

    या ठिकाणी आहेत प्रवेश अर्ज निशुल्क उपलब्ध : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा स्टेडीयम मागे, सिव्हील लाईन, चंद्रपूर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा, शासकीय वस्तीगृह, एकलव्य रेसिडेंशियल स्कुल, देवाडा या ठिकाणी प्रवेश अर्ज नि:शुल्क स्वरूपात उपलब्ध आहेत.

    इच्छुक विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.